प्रशासकांना कळकळीची विनंती.

Submitted by योग on 9 September, 2017 - 07:02

माननीय प्रशासक,

'एका पत्रकाराची हत्या' या निमित्ताने गेले काही दिवस आपल्या मायबोलीवर बरेच काही लिहीले जात आहे. कदाचित आपल्या सर्वसमावेशक व व्यक्तीस्वातंत्र्य पुरस्कृत धोरणात ते योग्यही असेल. निव्वळ हा एकच बाफ नाही तर अशा अनेक घटनांचे अनेक बाफ व त्यावरील अनेक चर्चा आजवर ईथे झाल्या आहेत. त्या होवू देणे, आपली मते मांडायला लोकांना जागा ऊपलब्ध करून देणे याबद्दल तुमचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत. आणि तरिही काही खोडसाळ व नुकत्याच जन्मलेल्या आयडींच्या वैयक्तीक हल्याकडे दुर्लक्षित करूनही तुम्ही ही सुविधा कायम ठेवली आहेत यासाठी फारच मोठे मन, शक्ती, वेळ, व यंत्रणा लागते ज्यासाठी कमीत कमी तुमचे वैयक्तीक व व्यावसायिक आभार मानणे हे ऊचित ठरेल .

मात्र, आतशा या चर्चा, मुद्दे, ई. सर्व यांचा रोख, हेतू, यावर अनेक शंका घेण्याईतके सर्व स्पष्ट आहे.

मुळात जे सुशिक्षीत, 'सुजाण' व जबाब्दार समाजात घडणेच अपेक्षित नाही त्याची जबाबदारी व तोडगा आपण फक्त दुसर्‍यावर ढकलू पहात आहोत. चार दिवस हे चर्चेत रहाते मग पुन्हा कुठेतरी भयानक, निर्घ्रुण व माणुसकीला लाजवणारे अपराध वा कृत्त्य घडते आणि मग नविन प्रश्णांचे ढोल पिटले जातात.

आताशा मन 'सुन्न' होते म्हणजे काय हेही विसरायला होते ईतक्या संख्येने व नियमीतपणे अशा घटना वाचनात येतात. अशा गुन्हेगारांना चौकात हातपाय पाय तोडून दगडाने ठेचून मारले तरी अशा घटना कमी होतील का? गुन्हेगारांच्या मानवी हक्क अधिकारासाठी किती निष्पाप जीवांचे बळी अजून जाणार आहेत? टॉप टू बॉटम सिस्टिमॅटीक फेल्युअर असणार्‍या सिस्टीम मध्ये कुणा कुणाला फासावर लटकवत रहायचे? असे प्रश्ण ऊपस्थित करणे देखिल आजच्या घडीला वादग्रस्त ठरते आहे...! आणि कुणी केलेच तर पुन्हा तेच तेच मुद्दे व घटना वापरून निव्वळ एकेमेकांवर कुरघोडी करण्या पलिकडे काहिही होत नाही. या निमित्ताने वैयक्तीक स्कोर ईथे आणि बाकी सोशल मिडीया वर सेटल केले जातात. पुन्हा नविन घटना घडेपर्यंत वाट पहात रहाणे... प्रत्येक घटना एका नव्या बाफ चा विषय होवू शकेल.. पण कुठेतरी थांबायला हवे.

अशा कुठल्याही प्रकारच्या घटनांसाठी ज्या न्यायप्रविष्ट आहेत, त्यावर कुठल्याही प्रकारचे बाफ काढायला ईथल्या प्रशासनाने बंदी घालावी अशी कळकळीची विनंती आहे. मायबोलीच्या माझ्या १५ वर्षे वास्तव्यातील ही अशी पहिलीच विनंती करायची वेळ आली आहे हे फार मोठे दुर्दैव आहे! पण रोगापेक्षा अ‍ॅनालिसीस जहरी असे आता गेले काही वर्षे चालू आहे.

किमान मायबोलीवर हे वाचायला मिळू नये एव्हडीच अपेक्षा आहे. निव्वळ माझ्यासाठी नविन, गृप साठी नविन असे ऑप्शन वापरून मूळ मुद्दा व त्यावरील ऊपाय याकडे दुर्लक्ष होईल असे वाटते. मुळात बाफ काढून मुद्दाम चूकीचे संदेश पसरवणे, वातावरण दूषित करणे हे कुणितरी केल्याने त्यास ऊत्तर म्हणून ईतर (विशेषतः जुन्या जाणत्या) सदस्यांना लिहीणे भाग पडतेच. पण अशानेच एकास दोन आणि दोनाचे दोनशे होतात. प्रत्येक वेळी वेमा ना सगळीकडे झाडू मारणे अशक्य आहे हे आपणही जाणतात. पूर्वी ईथे मॉडरेटर्स होते... पण तो भूतकाळ झाला.

मायबोली चा जन्म, ईतीहास, आणि परंपरा ही ऊच्च दर्जाचे साहित्य, वैचारीक देवाण घेवाण, सर्वसमावेशक कार्यक्रम, ऊपक्रम अशी आहे हे काही मी वेगळे तुम्हाला सांगायला नको. वेळो वेळी तुम्ही देखिल या बाबतीत मार्गदर्शन केलेच आहे. मी वैयक्तीक अजूनही मायबोलीवर येतो याचे कारण नविन, अभिनव, सुंदर वाचायला मिळावे म्हणून. आणि मला खात्री आहे ईथल्या बहुतांशी सभासदांची देखिल तशीच अपेक्षा असावी. (आताशा वैयक्तीक ईथे येणे व लिहीणे कमी झाले आहे हे नक्की. )

तरिही निदान काही काळ तरी, जी जी प्रकरणे गंभीर आहेत, न्यायप्रविष्ट आहेत, ज्यात एक व्यक्ती नाही तर समाज, देश यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा प्रकरणांवर कुठल्याही प्रकारचा निव्वळ चर्चेचा बाफ ऊघडण्याची संमती दिली जाऊ नये. किंबहुना बंदी घालावी. फार तर अशा विषयावर केलेल्या कविता वा एखादे चित्र, किंवा निव्वळ त्याची लिंक देणे यास संमती असावी. याही पलिकडे ज्यांना ऊघडायचेच असेल त्यांना 'रंगीबेरंगी' वर ही सोय ठेवावी. नाही तर अशा सर्व बाफ चा 'वाहता धागा' केला जावा.

मला माहित आहे, माझी विनंती कदाचित तुमच्या धोरणात बसणारी नसेल, पण कुठेतरी कुणितरी थांबायला हवे. पब्लिक फोरम वर हे रोखण्याची संधी, हक्क, व काही प्रमाणात जबाब्दारी ही प्रशासक म्हणून तुमची आहे असे समजून मी ही विनंती करत आहे. तेही फक्त काही काळासाठी. प्रयोग म्हणून करून पहायला काही हरकत नसावी?
अगदी एकीकडे गणेशोत्सवा सारखे सुंदर ऊपक्रम सुरू असताना ईथे असे ईतर बाफ काढले जात होते... ते देखिल खटकले. आपण वातावरण दूषित करत नसलो तरी ते दूषित होवू देत रहाणे हे देखिल ऊचित नव्हे ना?

असो.
फार विचार करून व एकंदरीत मायबोलीचा १५ वर्षाचा सभासद, साक्षीदार या नात्याने ही विनंती करत आहे. यावर कृपया जरूर विचार व्हावा.
(ज्या ईतर सभासदांना माझी विनंती मान्य असेल त्यांनी ईथे खुशाल तसे नमूद करावे.)
आभारी.
योग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोस्ट आवडली नानाकळा. फक्त एक मी खात्रीने सांगू शकतो. तुम्ही जे भाजपसमर्थकांबद्दल म्हणत आहात, ते भाजपविरोधकांकडूनही तितक्याच जोरात होते हे मी गेली अनेक वर्षे पाहिलेले आहे. ही ढोबळ तुलना आहे. अगदी धागा-बाय-धागा, पोस्ट-बाय-पोस्ट मॅच होईल असे नाही पण साधारणपणे.

पण अभ्यासपूर्ण लेखनाबद्दल पूर्ण सहमत.

त्यामुळे राजकीय भांडणांवरून दोन्ही पार्ट्या वातावरण (नॉन राजकीय / नॉन सामाजिक लेख , साहित्य) खराब करत आहेत हा आरोप मला अजिबात मान्य नाही. >>> नाही मी माबोवरचे राजकीय/सामाजिक चर्चांच्या संदर्भातील वातावरणच म्हणतोय मी. इतर लेखांबद्दल नव्हे.

मोदी भक्त आणि मोदी विरोधक यांच्या सारखाच एक नवीन ग्रूप मायबोलीवर जाणवतो.
सतत जिथे जमेल तेंव्हा
"आता मायबोलीवर काही मजा उरलीच नाही"
"कायम इथे भांडणेच असतात. म्हणूनच मायबोलीवर यावेसेच वाटत नाही"
"तीच ती घाण सगळीकडे."
अशाच फक्त प्रतिक्रिया देत रहायच्या. चांगल्या धाग्यांवर हे लोक कधीच काही आवडलं हे लिहित नाही. थोडक्यात मायबोलीवरचं वातावरण किती गढूळ झालं आहे याचीच फक्त सतत जाणीव करून द्यायची.
वर या पानावर लिहिणार्‍या कुणालाही उद्देशून ही प्रतिक्रीया नाही. पण जरा ही बाजू लक्षात ठेवली की सारख्या सारख्या त्याच आयडी , कधी कधी ओढून ताणून या प्रतीक्रिया देत आहेत हे जाणवते. त्यांना प्रत्यक्षात सकारात्मक बदलात रस आहे असे वाटत नाही. हा केवळ नैसर्गिक आळस आहे, त्यांना खरोखर मायबोलीच्या वातावरणाबद्दल काहीतरी वाटते आहे आणि ते चांगले होण्याची अपेक्षा आहे की मायबोलीवरचे वातावरण गढूळले आहे असे नियोजीतपणे सतत दाखवत राहणे हे उद्दीष्ट आहे हे समजत नाही.
पुन्हा एकदा वर या पानावर लिहिणार्‍या कुणालाही उद्देशून ही प्रतिक्रीया नाही. पण याबद्दल लिहिल्याने इतरांनाही हे जाणवते का ते कळावे असे वाटले.

माने गुरुजी ,
सहमत,
ववी च्या धाग्यांवर याचा अनुभव आलाच,
आम्ही ववी ला आलो नाही कारण माबो वरचे वातावरण बिघडले आहे, अशा अर्थाच्या काही पोस्ट तिकडे आल्या,

या सो कोल्ड वातावरण बिघडवणार्या गटामध्ये (read as राजकीय चर्चा करणाऱ्या) मी मोडत असल्यामुळे, मला उगाच कानकोंडे झाल्या सारखे वाटायचे,
But नो मोर, ज्यांना वाटतंय राजकीय चर्चानी वातावरण बिघडते आहे, त्यांनी आकडेवारी घेऊन समोर यावे, आणि सिद्ध करावे.

बेफिकीर,
तुमच्या बाबत काय झालंय हे मला खरेच माहीत नाही, मी जे तुमचे ललित/कादंबरी/कविता वाचल्या आहेत त्यात कधी राजकीय विषयावरून गोंधळ घातल्याचे बघितले नाही आहे,
तुम्ही हल्ली राजकीय-ललित हा नवीन साहित्य प्रकार सुरू केला आहे, पण तो राजकीय असल्याने तिकडे "चर्चा" तर होणारच.

@ बी.एस @ सिम्बा
तुम्ही दिलेल्या सूचनेवर काम चालू आहे. पण त्या अंमलात आणायला काही पायाभूत सुविधांची गरज होती. त्या आधी आणल्याशिवाय तुमच्या सूचना उपयोगी ठरणार नाहीत. नुकताच केलेला बदल ही त्या दिशेने सुरू असलेली वाटचाल आहे.
@ऋन्मेऽऽष
तुमची शंका रास्त आहे. वर दोघांनी सुचवलेल्या सूचनांप्रमाणे बदल करताना , राजकीय विषय आणि चालू घडामोडी वेगळ्या कशा राहू शकतील यावर विचार करतो आहोत.

राजकीय विषय आणि चालू घडामोडी वेगळ्या कशा राहू शकतील यावर विचार करतो आहोत.

एक उपाय आहे.

चालू घडामोडी गृप काढून त्या जागी राजकिय गृप चालू करा. ९९% चालू घडामोडी या राजकिय असतात अथवा त्याला राजकिय पार्श्वभूमी ही असते. त्या गृप वर धागा सार्वजनिक करण्याचा ऑप्शन देऊच नका. तो धागा तिकडेच राहील.

शब्द राजकिय निवडला की धागा त्या गृप मध्ये जायला हवा

हे धागे इकडे हलवा, तिकडे हलवा, ह्या गृपमध्ये नको, त्या नको असं का?
धाग्याचे कन्टेन्ट तर उघडल्याशिवाय दिसत नाही, मग ही लपवाछपवी कशासाठी?

ज्या लोकांना राजकारणाची ऍलर्जी आहे ते राजकारण गृप चर मेम्बर होणार नाहीत, आणि त्यांना आपसूकच हे धागे दिसणार नाहीत,

और भाया. इ तो होने से रहा.... लोक चवीचवीने हे धागे वाचतीलच आणि अरण्यरुदन करतीलच. लिख लो!

ह्यावर एक ऊपाय आहे...
संयोजक मंडळ किंवा अ‍ॅडमिन टीम सारखी 'मायबोली एथिक्स कमिटी' ची स्थापना करणे आणि ह्या कमिटीनी सदस्यांमधल्या चर्चेदरम्यान, भाषा, मुद्दे, विषयांतर, मुद्दाम राजकीय व सिनेमा संदर्भातले असबंध विषय आणणे, अजेंडा राबवणे, अपशब्दं वापरणे ई. पॉईंट्सवर सदस्यांनी फॉलो करावी अशी एथिक्स गाईडलाईन (नियमावली नव्हे) तयार करणे. जी तयार करण्यात अ‍ॅडमिन आणि वेबमास्टरांचाही मोलाचा सहभाग असेल. ही गाईडलाईन नवीन धागा काढून प्रसिद्धं करणे आणि सगळ्या सदस्यांनी ही गाईडलाईन आम्ही पाळू असे डिस्क्लोजर करणे.
जोवर सदस्यं असा डिस्क्लोजर देणार नाहीत तोवर त्या सदस्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा वा ईतर प्रतिसादांची देवाणघेवाण ईतर सदस्यांनी कुठल्याही धाग्यावर करू नये. धागा ऊघडण्यासाठी किंवा चर्चेत भाग घेण्यासाठी हे डिस्क्लोजर मँडेटोरी करावे. असे डिस्क्लोजर केलेले आयडी वेगळे ओळखता यावे.
धाग्यात किंवा चर्चेत ह्या गाईडलाईन्स वायोलेट करणार्‍या सदस्याला एथिक्स कमिटीने पॉईंट आऊट केल्यास, त्या सदस्याशी ईतर सदस्यांनी कुठलीही चर्चा करू नये किंवा त्या सदस्याच्या प्रतिसादास वा धाग्यास काही काळ (सहा महिने वगैरे) प्रतिसाद देऊ नये. थोडक्यात त्या सदस्याचे 'मी गाईडलाईन पाळतो' हे डिस्क्लोजर वॉईड होईल.
सर्व सदस्यांनी डिस्लोक्जर करतांनाच मी केवळ गाईडलाईन फॉलो करणार्‍या सदस्याशीच संपर्क ठेवेन असे कमिट करणे जरूरी आहे.
माझ्या मते मायबोलीवरचे सध्याचे गढूळ वातावरण सुधारण्यासाठी अ‍ॅडमिन आणि वेबमास्तरांबरोबरच सगळ्या सदस्यांचा पूर्ण सहभाग जरूरी आहे. वायोलेशन टोकाचे असल्यास ही कमिटी सदस्यावर कारवाई करण्यासाठी अ‍ॅडमिन/ वेबमास्तरला सांगू शकतात. कमिटी मेंबर सहा महिने किंवा वर्षभराच्या कार्यकाळासाठी नियुक्तं करावे. एखाद्या कमिटी मेंबरकडून वायोलेशन झाल्यास ईतर कमिटी मेंबर्स त्याला साधारण सदस्यासारखेच ट्रीट करू शकतात.

कमिटी असल्यामुळे अ‍ॅडमिन/वेबमास्तरांच्या स्टँडवर प्रश्नंचिन्हं येणार नाहीत.. आणि एखाद्या सदस्याने वायोलेशन केले आहे की नाही ते ठरवणे व्यक्तीसापेक्ष न राहता कमिटी मेंबर आपसात बहुमत घेऊन ठरवतील.

हाब यांच्या सुचवणीशी असहमत. अशाने हे संस्थळ एक तुरुंग बनून राहील ज्याचे कायदे मूठभर लोकांच्या हातात मनाला येईल तसे वापरता येतील असे असतील. मोकळेपणा असणार नाही, पार्शलिटीचे आरोप होत राहतील दोन्ही बाजुने.

वेमा आणि अ‍ॅडमिन यांचे आत्ता जे चालू आहे ते उत्तम आहे. त्यांचा मालक म्हणून व कायदेशीर जबाबदार म्हणुन जे काही धोरण आहे व ते अंमलात येत आहे ते योग्य आहे.

इथे येणारे सर्व सदस्य सज्ञान व जबाबदार आहेत. इथे व्यक्त होणारे विचार, भाषा, मते हीच त्यांची ओळख आहे. व त्या ओळखीनुसारच त्यांना आपले अस्तित्व प्राप्त आहे. वाचक इथे लिहिणार्‍यांना कितपत गंभीरतेने घेतात, नाव बघून सोडून देतात, किंवा आवर्जून वाचतात हे त्यांच्या सततच्या लेखनावर, विचारांवर व भाषेवर अवलंबून आहे हे वारंवार दिसत आले आहे. वाह्यात आयडींचे लेखन कुणी वाचत नाही, त्याला गंभीरतेने घेत नाही. तेव्हा ही इकॉलॉजीही उत्तमच सुरु आहे.

ज्यांना वाटतंय राजकीय चर्चानी वातावरण बिघडते आहे, त्यांनी आकडेवारी घेऊन समोर यावे, आणि सिद्ध करावे. >>> सिम्बा, राजकीय चर्चांनी नव्हे, त्यात लिहीण्या जाणार्‍या काही टाइप्स च्या पोस्ट्स नी - हे माझे मत. इतरांचे काय आहे माहीत नाही.

और भाया. इ तो होने से रहा.... लोक चवीचवीने हे धागे वाचतीलच आणि अरण्यरुदन करतीलच. लिख लो!
>>>>>>

अहो नानाकळा, जर चालू घडामोडींसोबत राजकीय ग्रूप काढला तर ज्यांना राजकीय चर्चांचा त्रासच होतो ते त्या ग्रूपला सबस्क्राईब करणार नाहीत आणि त्यांना ते दिसणारच नाही.

याऊपर मग कोणी त्या ग्रूपला जॉईन करून वर पुन्हा अशी बोंबाबोंब करत असेल की यांचे फारच चालू आहे तर तो कांगावा होईल.
तसेचतिथे चालणार्‍या एखाद्या विषयात कधी कोणाला रस असेल तर तो तात्पुरता तो ग्रूप जॉईन करून त्याचे अपडेटस मिळवू शकतो किंवा ऑल करून वाचू शकतोच.

आणखी एक म्हणजे, त्या ग्रूपला वाचक कमी असतील, किंवा सामान्य जनता अश्या धाग्यांपासून दूरच राहतेय हे एकदा लक्षात आले तर आता नक्की ब्रेनवॉश कोणाचा करायचा म्हणत लिहिणारेही जास्त तावातावात येणार नाहीत.

एखादा रामरहीम वा गोरखपूर ऑक्सिजन कांड धागा चालू घडामोडीतच काढला जावा. कारण मी जर एखाद्या बातमीवर धागा काढत असेल तर ती सर्व सामान्य जनतेला समजावी आणि त्यांनी आपले मत त्यावर द्यावे अशी अपेक्षा माझी असणारच. पण पुढे जर त्यावर राजकीय चर्चा, किंबहुना चिखलफेक सुरू झाली तर मॉडरेटरसनीच तो राजकीय विभागात हलवावा.

पण एखादा धागा राजकीय घडामोडीसंदर्भात असेल तर तो थेट राजकीय ग्रूपमध्ये काढला जावा.

हाब यांच्या सुचवणीशी असहमत. अशाने हे संस्थळ एक तुरुंग बनून राहील ज्याचे कायदे मूठभर लोकांच्या हातात मनाला येईल तसे वापरता येतील असे असतील. मोकळेपणा असणार नाही, पार्शलिटीचे आरोप होत राहतील दोन्ही बाजुने. >> नाना, ही सर्व सदस्यांची सामुहिक अ‍ॅक्शन असणार आहे... मुठभर लोक कुठून आले? कमिटी मेंबर म्हणता आहात का? पण त्यांच्याकडे काहीच अधिकार नाहीत. आत्ता आहेत तसे सगळॅ अधिकार अ‍ॅडमिन कडेच राह्तील.
पोलिस, वकील, संसद सदस्य सगळ्यांचे वर्तन मॉनिटर कराणारी असोसिएशन असते. ते फक्तं रिपोर्ट करतात अ‍ॅक्शन काहीच घेत नाहीत.
सगळ्या मायबोलीकरांनी मिळून बनवलेली गाईडलाईन वायोलेट झाली आहे का हेच फक्तं ते बघत आहेत. कमिटी मेंबर कोल्यूड करतील असे तुम्हाला का वाटते आहे?
तुम्हाला कमिटी मेंबर्सवर भरवसा वाटत नाही पण सगळे मायबोलीकर जबाबदार, पूर्वग्रह नसलेले, संयत आणि सौजन्यशील आहेत असा विश्वास वाटतो .... तुमचे हे बोलणे परस्परविरोधी नाही का?

इथे येणारे सर्व सदस्य सज्ञान व जबाबदार आहेत. इथे व्यक्त होणारे विचार, भाषा, मते हीच त्यांची ओळख आहे. व त्या ओळखीनुसारच त्यांना आपले अस्तित्व प्राप्त आहे. वाचक इथे लिहिणार्‍यांना कितपत गंभीरतेने घेतात, नाव बघून सोडून देतात, किंवा आवर्जून वाचतात हे त्यांच्या सततच्या लेखनावर, विचारांवर व भाषेवर अवलंबून आहे हे वारंवार दिसत आले आहे. वाह्यात आयडींचे लेखन कुणी वाचत नाही, त्याला गंभीरतेने घेत नाही. तेव्हा ही इकॉलॉजीही उत्तमच सुरु आहे. >> अतिशय चूक गृहीतक. सगळ्या व्यक्तींचे मॉरल कंपास वेगळे असते ज्यात लिहिणारे आणि वाचणारे दोघेही आले. सोशल साईटवर वावरणार्‍या समुदायाला एक कॉमन मॉरल कंपास असणे जरूरी आहे. जो समुदाय सर्वानुमते ठरवू शकतो आणि कमिटी त्या मॉरल कंपासचे अवलंबन घडवून आणू शकते. कॉमन मॉरल कंपास अभावी कुणालाही मिळालेल्या सुविधांचा नियमात राहूनही अब्यूज करता येणे अतिशय सोपे आहे.
गाईड लाईनचे वायोलेशन करणार्‍याच्या मायबोली वावरावर कुठलीही आडकाठी येणारच नाहीये पण त्याला प्रतिसाद हवे असतील आणि चर्चेत भाग घ्यायचा असेल तर गाईडलाईन पाळणे जरूरी आहे.
घरात/परिवारात आपण 'हे वागणे कायदेशीर ते बेकायदेशीर' असे म्हणत नाहीप, सर्वच कायदेशीर असते पण तरीही संस्कार नावाचा अजून एक मॉरल कंपास प्रत्येक कुटुंब आपापला तयार करते. मायबोली परिवारालाही त्या मॉरल कंपासची नितांत गरज आहे. संस्काराने घर तुरुंग होत नाही किंवा पालकांनी चालवलेली हुकूमशाही होत नाही.

तुम्हाला कमिटी मेंबर्सवर भरवसा वाटत नाही पण सगळे मायबोलीकर जबाबदार, पूर्वग्रह नसलेले, संयत आणि सौजन्यशील आहेत असा विश्वास वाटतो .... तुमचे हे बोलणे परस्परविरोधी नाही का?
>> नाही. मी "सगळे मायबोलीकर" यांच्याबद्दल असे काही म्हटलेले नाही. ते फक्त सज्ञान आहेत इतकेच म्हटले आहे. मी वैयक्तिक सदस्याच्या ओळख आणि इमेज बद्दल बोललो आहे. लिहिणार्‍याची इमेज तयार होते, ती वाचणार्‍यावर १००% अवलंबून नसते. पुरोगामी विचार असणार्‍या सदस्यांने जातीयवादी भूमिका मांडली तर ती मला पटत नसल्यास मी तिचा विरोध करतो. ह्यात तो पुरोगामी आहे म्हणून बचाव करुया असे मी करत नाही. ते माझे वैयक्तिक मत. असे प्रत्येक जण करतोच असे मला म्हणायचेच नाही. मी इथे वैयक्तिक सदस्यांचा लेखनाच्या जबाबदारीच्या त्याला स्वतःला असलेल्या जाणीवेबद्दल बोलत आहे.

कमीटी आणि तीचे मेंबर्स ही एक तकलादू (दिलबहलानेकेलियेखयालअच्छाहै) प्रकार आहे.

----------------
समुदायाला एक कॉमन मॉरल कंपास असणे जरूरी आहे. जो समुदाय सर्वानुमते ठरवू शकतो आणि कमिटी त्या मॉरल कंपासचे अवलंबन घडवून आणू शकते.
>> आपले यावर मतभेद होऊ शकतील कारण मी समुदाय हा प्रकार मानत नाही. इथे येणारा प्रत्येकजण सर्वस्वी एक इन्डिविजुअल आहे. त्याला त्याच्या स्वतःच्या मान्यता आहेत. त्या इतर सदस्यांची जुळवून घ्याव्या लागतील अशी जबरदस्ती असू नये. त्याने अभिव्यक्तीला मर्यादा पडतात. किमान इथे तरी वाटेल तसे अभिव्यक्त होता यायला हवे असे माझे मत आहे.

यावर तुम्ही म्हणाल की एखाद्या जागी जायचे तर तिथले नियम, आचरण, संस्कृती पाळणे बंधनकारक असावे. असे असेल तर कालांतराने ती व्यवस्था एकतर बंधिस्त होते किंवा खंडहर. व्यवस्थेत जीवंतपणा असावा त्यासाठी खुलेपणा असावा. समुदाय म्हणून एक दडपण आणण्याचा प्रकार मला तरी मान्य नाही.

मॉरल कंपासच्या मर्यादा असतात. व त्या सिचुएशन टू सिचुएशन पर्सन टू पर्सन बदलतात. त्याने गोंधळ होऊ शकतो. त्यापेक्षा सभ्य वावराचे जे काही सर्वसाधारण नियम आहेत, जसे शिविगाळ करु नये, स्कोअर सेटलींग करु नये वगैरे जुजबी व ठळक लक्षणं -ज्यावर प्रथमदर्शी निर्णय घेणे अ‍ॅडमिन ला विनाप्रयास शक्य असते तेच असू द्यावेत.

जे धोरण आता पाळले जात आहे ते पुरेसे प्रभावी आहे. कारण मायबोली हे एक खाजगी संस्थळ असून कुणा एक दोन व्यक्तींच्या मालकी हक्काचे व कमर्शियली चालवले जाणारे आहे. त्यात सामुदायिक निर्णयप्रक्रिया हा प्रकार नसावा.

माझ्यामते हा एक क्लब आहे, क्लबच्या मालकाने काही धोरणं आखून दिली आहेत, त्याबाहेर वर्तन करणार्‍यांना मालक उचलून बाहेर फेकतात. अ‍ॅज सिम्पल अ‍ॅज दॅट. ज्याला ती धोरणं पसंत असतील ते राहतील, नसतील ते फुटतील. क्लबच्या ग्राहकांनी येऊन व्यवस्था ठरवायची असे शक्य होणार नाही.

माझे काही चुकत असल्यास अवश्य कळवा. मी जे काही लिहितोय तेच तंतोतंत योग्य आहे असे नाही, वेगळा विचारही ऐकून घेऊ शकतो.

प्रशासक, परत एकदा धन्यवाद

हे बदल छान आहेत. सध्या तरी यामुळे मायबोलीवर येतच राहावं असं वाटत आहे. आता जरा चांगले non-political धागे , कथा यांवर आवर्जून वाचून प्रतिक्रिया लिहावी असं सर्वानी ठरवायला हवं.

नाना, तुम्ही rules and regulations आणि ethical guidelines मध्ये गल्लत करत आहात.

ethical guidelines नियमांसारख्या सक्तीच्या नाहीत. मी फक्तं एवढेच म्हणत आहे की जर एखादा त्या गाईडलाइन्स पाळत नसेल तर त्याच्याशी मायबोलीच्या तुम्ही म्हणाला तसे सद्भावना आणि सौजन्यावर आधारलेली संवादाची बेसलाईन आहे हे मानणार्‍या आणि ती पाळणार्‍या ईतर सदस्यांनी संपर्क ठेऊ नये. आणि ह्या बेसलाईनचे ऊल्लंघन झाले आहे की नाही हे सब्जेक्टिव नाही तर ऑबजेक्टिव नजरेने बघणे जरूरी आहे ज्यासाठी कमिटी हवी. हवे तर अ‍ॅडमिन्/वेबमास्तरांनाही कमिटी मेंबर करा.
तुम्हाला मायबोलीवर आयडी टिकवण्यासाठी गाईडलाईन पाळणे जरूरी नाही... पण तुम्हाला ईतरांशी दुतर्फा संवाद अपिक्षित असेल तर कॉमन ग्राऊंड रूल्स मान्य करायला हवे. ह्यात कुठलेही डिस्क्रिमिनेशन नाही. तुम्ही आधी जे सभ्य, जबाबदार, सौजन्यशील (ज्याचे काही मोजमाप नाही कारण माझ्या आणि तुमच्या सौजन्याच्या व्याख्या वेगळ्या आहेत हे आपण प्रेग्नंन्सी बाफ वर बघितलेच आहे) असण्याबद्दल लिहिले आहे तेच 'नेमके कसे असावे' हे सांगणे म्हणजे ह्या गाईडलाईन्स लिहिणे.

मॉरल कंपासच्या मर्यादा असतात. व त्या सिचुएशन टू सिचुएशन पर्सन टू पर्सन बदलतात. त्याने गोंधळ होऊ शकतो. त्यापेक्षा सभ्य वावराचे जे काही सर्वसाधारण नियम आहेत, जसे शिविगाळ करु नये, स्कोअर सेटलींग करु नये वगैरे जुजबी व ठळक लक्षणं -ज्यावर प्रथमदर्शी निर्णय घेणे अ‍ॅडमिन ला विनाप्रयास शक्य असते तेच असू द्यावेत. >> हेच तर म्हणतो आहे मी.... व्यक्तीसापेक्ष मॉरल कंपासला मर्यादा आहेत.. म्हणून सभ्य वावराचे जे काही सर्वसाधारण नियम आहेत, जसे शिविगाळ करु नये, स्कोअर सेटलींग करु नये वगैरे जुजबी व ठळक लक्षणं ई गोष्टी डॉक्युमेंट करा, पब्लिश करा. मी ह्या मर्यादा पाळेन हे लिहून घ्या आणि ऑब्जेक्टिवली मर्यादांचे वायोलेशन होत आहे का ते 'सदस्यांतूनच फॉर्म झालेल्या कमिटीकडून' मॉनिटर करा. आणि सगळ्यात महत्वाचे कमिटीने पॉईंट आऊट केलेल्या वायोलेशन करणार्‍या सदस्यांशी ईतर सर्वांनी संवाद टाळा.
आयडी उडवून काही होत नाही... आपल्या मानसिकतेला ऊचलून धरून आपल्याशी संवाद करणारे लोक आहेत हे माहित असल्याने ऊडवलेले आयडी परत येतात. बाकीचेही न ऊडवलेले आयडी तेच वायोलेशन्स कंटिन्यू ठेवतात. अ‍ॅडमिनच्या अ‍ॅक्शनवर मर्यादा आहेत. ते ४% (नंबर मेडअप आहे पण लो हिट रेशो लक्षात घ्या) केसेस मध्येही लक्ष घालू शकत नाहीत... पुन्हा अंडर द रेडार राहून एथिक्स वायोलेट करणारे अनेक आयडी आहेतच.
माझा मायबोली प्रशासनाबद्दलचा अनुभव बघता असे कमिटी वगैरे काही होणार नाही ह्याचीही मला १००% खात्री आहे... कारण प्रशासनाच्या मतानुसार, हे वाद वगैरे नेहमीच होत राहतात, जुन्या सदस्यांची मायबोली आता पूर्वीसारखी राहिली नाही ही कटकटही नेहमीचीच आहे, मायबोलीचा दर्जा वगैरे सापेक्ष असतो, एक दोन आयडी ऊडवले म्हणजे शिस्तं परतून येते ईत्यादी ईत्यादी.
प्रशासन हे जनरली प्रशासन म्हणून विचार करते सदस्य म्हणून कधीच नाही... त्यामुळे बदलाची जी निकड सदस्याला जाणवते ती प्रशासनाला जाणवेलंच असे नाही.

मायबोली प्रायवेट क्लब आहे वगैरे... असेल बुवा...पण मेंबरांमुळे क्लब चालतो असे मला ऊगीचच वाटते. क्लबमालक म्हणत असतील 'आहे हे असे आहे पटलं तर रहा नाही तर फुटा' तर मग अश्या क्लबमध्ये पटलं नाही की लागलीच रामराम करावा. क्लबमालकाला मेंबरांचे कन्सर्न्स जाणून घेण्याची ईच्छा आहे ह्या अ‍ॅझम्पशन वरच हे सगळे लिहित आहे.

बाकी बंदिस्तं, खंडहर वगैरे तुम्ही खूप अ‍ॅबस्ट्रॅक्ट लिहिले आहे. त्या ईफ्स आणि बट्स साठी माझ्या कडे ऊत्तर नाही. अश्या एथिकल कमिट्या सगळ्या सक्सेसफूल प्रोफेशनल ऑर्गनाझेशन (समुदाय) मध्ये असतात. तुम्ही समुदाय मानत नाहीत वगैरे ईरिलेवंट आहे, तुमच्या मानण्या न मानण्याने घटना, वाद घडायचे रहात नाहीत.

आणणे, अजेंडा राबवणे, अपशब्दं वापरणे ई. पॉईंट्सवर सदस्यांनी फॉलो करावी अशी एथिक्स गाईडलाईन (नियमावली नव्हे) तयार करणे. >> म्हणजे नेमकं काय करायचं? एखादं उदाहरण देऊन सांगितलं तर चांगलं समजेल. कारण अपशब्द वापरणे इत्यादी नियमावलीत आहेच.
हा थँकलेस जॉब करायला लोक येतील का? वेमा आणि admin सध्या जे करतात त्याला अड्डा आणि कट्टा गॅन्ग विखारी शब्दांत आणि शेलक्या विशेषणात टीका करतात. दोन दिवसांपूर्वीच इब्लिस यांनी admin वर काय भाषेत टीका केल्येय ते वाच हाब.

मला क्लाउड स्कोरिंग सारख काही केलं तर सुधारेल वाटतं. (ऐसी अक्षरेवर असतं बहुतेक) तुम्ही काय लिहिता/ काय कमेंट करता त्याप्रमाणे तुम्हाला आणि तुमच्या धाग्याला स्कोर मिळेल. admin ला स्कोर स्क्यु करायला जास्त power असू शकेल. सगळ्यात लोकशाही तरीही स्मार्ट मार्ग वाटतो मला.

.... त्याच्याशी
मायबोलीच्या सद्भावना आणि सौजन्यावर आधारलेली संवादाची बेसलाईन आहे हे मानणार्‍या आणि ती पाळणार्‍या ईतर सदस्यांनी संपर्क ठेऊ नये.
>>> नॉट अ‍ॅट ऑल प्रॅक्टीकल. मायबोलीच्या हजारो सदस्यांपैकी हार्डली वीसेक जण माझ्याशी खरोखर इन्टरॅक्शन करत असतील. प्रत्यक्षात तर एकही नाही. संपर्क ठेवू नये म्हणजे काय? समजा संपर्क ठेवला तरी त्या इतर सदस्यांवर वॉच ठेवायला आणखी एक कमीटी? दिस वील गो अ लॉन्ग अ‍ॅन्ड इम्प्रॅक्टीकल वे.

---------------------

आणि ह्या बेसलाईनचे ऊल्लंघन झाले आहे की नाही हे सब्जेक्टिव नाही तर ऑबजेक्टिव नजरेने बघणे जरूरी आहे ज्यासाठी कमिटी हवी.
हवे तर अ‍ॅडमिन्/वेबमास्तरांनाही कमिटी मेंबर करा.
>> कमीटी इज नॉट मशीन. तीही माणसेच असतील. 'एक रुका हुआ फैसला' मध्ये असलेल्या १२ ज्युरींचे मंडळ असे स्वरुप मला सध्यातरी दिसते आहे.

-----------------------------------

तुम्हाला मायबोलीवर आयडी टिकवण्यासाठी गाईडलाईन पाळणे जरूरी नाही..गाईडलाईन्स लिहिणे.

>>अशा गाईडलाइन्स तुम्ही लिहू शकत नाही.
एक उदाहरण देतो.
"काय बेवडा मारुन लिहितो का बे"
"काय मदिरापान चाललंय का?"
"झाली का संध्याकाळ?"

ह्यात सभ्य, जबाबदार, सौजन्यशील कोणाला म्हणणार? काही लोक इतक्या कलात्मक आणि साहित्यीक उच्च सुसंस्कृत भाषेत चक्क घाणेरड्या शिव्या देतात की सुभानअल्लाह! लागट बोलणे हेही त्यातलेच. ह्या सर्वांसाठी गाईडलाइन्स मुश्किल. तुम्ही एक बार सेट करा, लोकं त्याच्यावरुन दहाफूट उडी मारुन अचूक तलवार खुपसतील. (ये हमारा सियासती मुआमलो का तजुर्बा-ए-मुबाहिसा है )

---------------
कमिटीकडून' मॉनिटर करा. आणि सगळ्यात महत्वाचे वायोलेशन करणार्‍या सदस्यांशी ईतर सर्वांनी संवाद टाळा.
>> ह्म्म्म... मॉनिटरींग आताही होतंच आहे. ज्याला काही खुपते तो स्क्रीनशॉट घेऊन वेमांचा अंगणात रांगोळी घालून येतो. बाकी ते सोशल बॉयकॉट काही कामाचे नाही. मला लिहायला इथे जोवर बंदी नाही तोवर इतरांनी मला प्रतिसाद दिले काय न दिले काय, मला काही फरक पडत नाही. मी आपला एकच अजेंडा रेटत लिहित बसू शकतो. बाकीचे फक्त संवाद करु शकत नसल्याने बॉर्डर सिनेमातल्या जॅकी श्रॉफ सारखे विमानावर हात आपटत, 'ब्लडी हेल, रात को नही उड सकता" असे म्हणत फ्रस्टेट होत राहतील.

------------------
आयडी उडवून काही होत नाही...... पुन्हा अंडर द रेडार राहून एथिक्स वायोलेट करणारे अनेक आयडी आहेतच.
>> संवाद नाही, लोक परत येतात कारण त्यांना लिहायचे असते, ती एक अनाम उर्मी आहे जी स्वस्थ बसू देत नाही. त्यांना एक्स्प्रेस व्हायचं असतं. त्यांच्या व्हायोलेशनचा रेट बघितला तर तोही एकूण लिखाणापैकी ०.००४ टक्केही नसेल. तसेच असे व्हायोलंट लिहिणारेही ०.४ टक्केही नसतील. तेव्हा खरोखर जी काही मेस म्हणून आपण कन्सिडर करत आहोत ती मॅग्निफायिंग ग्लास मधून तर बघत नाही ना हा विचार करायला हवा. माझे निरिक्षण असे आहे की अपमानकारक, भोचक, चिडवणारे लिहिणारे फार कमी लोक आहेत. ते आयडेन्टीफाइड आहेत. त्यांची दारु ग्लासातून उतू जायला लागली की वेमा त्यांना 'हवा तेज चलता है दिनकरराव, टोपी संभालो उड जायेगा' म्हणून वॉर्निंग देतातच.

प्रशासनाच्या मतानुसार, हे वाद वगैरे नेहमीच होत राहतात, प्रशासन हे जनरली प्रशासन म्हणून विचार करते सदस्य म्हणून कधीच नाही... त्यामुळे बदलाची जी निकड सदस्याला जाणवते ती प्रशासनाला जाणवेलंच असे नाही.
>> प्रशासन अगदी योग्य विचार करतं. दे हॅव टू रन द शो, नॉट रुइन द शो फॉर फ्यु डफर्स. चार माणसे एकत्र आली तर वाद होनारच. 'अब कुच्छ भी पहले जैसा नही रहा' सिन्ड्रोम जगातल्या प्रत्येक गोष्टीत आहे. इथे मोदींचे वाक्य कोट करतो, 'ये क्लायमेट चेंज नही हुवा है, हम चेंज हो गये है"

क्लबमालक म्हणत असतील 'आहे हे असे आहे पटलं तर रहा नाही तर फुटा' तर मग अश्या क्लबमध्ये पटलं नाही की लागलीच रामराम करावा.
>> सिरियसली, किती लोक असं करतात? इथे काढून दिलेले परत परत येतात, अ‍ॅडिक्शन माय लॉर्ड अ‍ॅडिक्शन. आहे त्या व्यवस्थेत जर तुम्हाला कूर कूर ऐकू येत असेल तर कुरबूरत का होईना लोक इथे राहतायत हेच लक्षात येतं की. दूधवाला घरोघरी लाइन टाकतो, दारुवाल्याकडे लोक स्वतः लाइन लावतात.

अश्या एथिकल कमिट्या सगळ्या सक्सेसफूल प्रोफेशनल ऑर्गनाझेशन मध्ये असतात. तुम्ही समुदाय मानत नाहीत वगैरे ईरिलेवंट आहे, तुमच्या मानण्या न मानण्याने घटना, वाद घडायचे रहात नाहीत.
>> बिन अधिकारी, बिन पगारी कमिट्या जन्क असतील. माबो कमर्शियल असली तरी प्रोफेशनल नाही.

आमचे काही प्रोफेशनल लोकांचे व्हॉट्सप गृप्स आहेत. अगदी एका द्राक्षउत्पादक शेतकर्‍यांच्या व्हॉट्सपग्रुपवर मी आहे. २५५ सदस्य आहेत, एकही विषयाच्या बाहेर असलेला मेसेज नसतो. बिनकामाचे 'आग की तरह फैला दो' फारवर्ड तर नसतातच पण केवळ द्राक्षाच्या शेतीच्या पिकपद्धती, हवामान अंदाज, औषधयोजना या माहितीव्यतिरिक्त, इतर कोणतेही दुसर्‍या पिकांसंबंधी मेसेजेस नाही, अगदी कर्जमाफी, शेतकरी मोर्चाही नाही. रडक्या शेतकरीराजा कविताही नाही.

इतके प्रोफेशनलिजम मातीत काम करणारे शेतकरी कोणत्याही एथिकल कमीटीशिवाय पाळू शकतात तर इथे माबोवर का नाही होऊ शकत?

माझे इतकेच म्हणणे आहे.

हाब आणि नाना तुमचे सर्व प्रतिसाद वाचले,
हाब, तुम्ही म्हणत आहेत तसा मोरल कम्पास "वावरायचे नियम" यात कव्हर होत नाही का?

तुम्ही म्हणता ती कल्पना चमकदार आहे, पण इम्प्लिमेंटशन खूप कठीण, बहुतेक मुद्दे नाना नि वर कव्हर केलेच आहेत.

मोडरेटर्स चा गृप ही संकल्पना माबो वर वापरून झालीये, तेव्हा मी ROM मध्ये असायचो, त्यामुळे तुणच्या यशपयशाबद्दल माहीत नाही.

मायबोलीच्या एथिक्स कमिटीचा चेयरमन म्हणून विनामोबदला सर्ववेळ काम करायला मी तयार आहे. ही उत्तम सूचना मंडणाऱ्यांचे अभिनंदन.

***

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आय डी उडवला जाणे ह्या गोष्टीला काहीही अर्थच नाही.
<<
हो ना. टिकलेल्या आयडीजच्या अर्वाच्य लिखाणाच्या रांगोळ्या ३ नंबरच्या विपुत हव्या तितक्या सापडतील. त्यामुळे आयडी उडणे म्हणजे उडालेल्या आयडीचा उचकण्याचा थ्रेशोल्ड कमी आहे इतकाच अर्थ निघतो.

@फारेंड,
हो खरे आहे, तशी शेरेबाजी होते,
पण आता तो सासू सुनेच्या भांडणा सारखा क्रोनिक प्रॉब्लेम झाला आहे, नेमका कुठे सुरू झाला ते माहीत नाही,
पण as फार as ती शेरेबाजी त्या ठराविक गृप पुरती मर्यादित रहात असेल तर बाकीच्यांनी बाऊ करू नये असे वाटते.

{सोशल बॉयकॉट काही कामाचे नाही. मला लिहायला इथे जोवर बंदी नाही तोवर इतरांनी मला प्रतिसाद दिले काय न दिले काय, मला काही फरक पडत नाही. मी आपला एकच अजेंडा रेटत लिहित बसू शकतो}

याच्याशी सहमत

अरे काय चाल्लय काय? मॉरल कंपास काय, एथिकल कमिटी काय, कुठे नेउन ठेवताय मायबोली आमची? क्युर इज वर्स दॅन दि डिसिज...

मुळात बाफ काढून मुद्दाम चूकीचे संदेश पसरवणे, वातावरण दूषित करणे हे कुणितरी केल्याने त्यास ऊत्तर म्हणून ईतर (विशेषतः जुन्या जाणत्या) सदस्यांना लिहीणे भाग पडतेच. पण अशानेच एकास दोन आणि दोनाचे दोनशे होतात --++ 1

I agree to all the contents of this post.

Pages