प्रशासकांना कळकळीची विनंती.

Submitted by योग on 9 September, 2017 - 07:02

माननीय प्रशासक,

'एका पत्रकाराची हत्या' या निमित्ताने गेले काही दिवस आपल्या मायबोलीवर बरेच काही लिहीले जात आहे. कदाचित आपल्या सर्वसमावेशक व व्यक्तीस्वातंत्र्य पुरस्कृत धोरणात ते योग्यही असेल. निव्वळ हा एकच बाफ नाही तर अशा अनेक घटनांचे अनेक बाफ व त्यावरील अनेक चर्चा आजवर ईथे झाल्या आहेत. त्या होवू देणे, आपली मते मांडायला लोकांना जागा ऊपलब्ध करून देणे याबद्दल तुमचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत. आणि तरिही काही खोडसाळ व नुकत्याच जन्मलेल्या आयडींच्या वैयक्तीक हल्याकडे दुर्लक्षित करूनही तुम्ही ही सुविधा कायम ठेवली आहेत यासाठी फारच मोठे मन, शक्ती, वेळ, व यंत्रणा लागते ज्यासाठी कमीत कमी तुमचे वैयक्तीक व व्यावसायिक आभार मानणे हे ऊचित ठरेल .

मात्र, आतशा या चर्चा, मुद्दे, ई. सर्व यांचा रोख, हेतू, यावर अनेक शंका घेण्याईतके सर्व स्पष्ट आहे.

मुळात जे सुशिक्षीत, 'सुजाण' व जबाब्दार समाजात घडणेच अपेक्षित नाही त्याची जबाबदारी व तोडगा आपण फक्त दुसर्‍यावर ढकलू पहात आहोत. चार दिवस हे चर्चेत रहाते मग पुन्हा कुठेतरी भयानक, निर्घ्रुण व माणुसकीला लाजवणारे अपराध वा कृत्त्य घडते आणि मग नविन प्रश्णांचे ढोल पिटले जातात.

आताशा मन 'सुन्न' होते म्हणजे काय हेही विसरायला होते ईतक्या संख्येने व नियमीतपणे अशा घटना वाचनात येतात. अशा गुन्हेगारांना चौकात हातपाय पाय तोडून दगडाने ठेचून मारले तरी अशा घटना कमी होतील का? गुन्हेगारांच्या मानवी हक्क अधिकारासाठी किती निष्पाप जीवांचे बळी अजून जाणार आहेत? टॉप टू बॉटम सिस्टिमॅटीक फेल्युअर असणार्‍या सिस्टीम मध्ये कुणा कुणाला फासावर लटकवत रहायचे? असे प्रश्ण ऊपस्थित करणे देखिल आजच्या घडीला वादग्रस्त ठरते आहे...! आणि कुणी केलेच तर पुन्हा तेच तेच मुद्दे व घटना वापरून निव्वळ एकेमेकांवर कुरघोडी करण्या पलिकडे काहिही होत नाही. या निमित्ताने वैयक्तीक स्कोर ईथे आणि बाकी सोशल मिडीया वर सेटल केले जातात. पुन्हा नविन घटना घडेपर्यंत वाट पहात रहाणे... प्रत्येक घटना एका नव्या बाफ चा विषय होवू शकेल.. पण कुठेतरी थांबायला हवे.

अशा कुठल्याही प्रकारच्या घटनांसाठी ज्या न्यायप्रविष्ट आहेत, त्यावर कुठल्याही प्रकारचे बाफ काढायला ईथल्या प्रशासनाने बंदी घालावी अशी कळकळीची विनंती आहे. मायबोलीच्या माझ्या १५ वर्षे वास्तव्यातील ही अशी पहिलीच विनंती करायची वेळ आली आहे हे फार मोठे दुर्दैव आहे! पण रोगापेक्षा अ‍ॅनालिसीस जहरी असे आता गेले काही वर्षे चालू आहे.

किमान मायबोलीवर हे वाचायला मिळू नये एव्हडीच अपेक्षा आहे. निव्वळ माझ्यासाठी नविन, गृप साठी नविन असे ऑप्शन वापरून मूळ मुद्दा व त्यावरील ऊपाय याकडे दुर्लक्ष होईल असे वाटते. मुळात बाफ काढून मुद्दाम चूकीचे संदेश पसरवणे, वातावरण दूषित करणे हे कुणितरी केल्याने त्यास ऊत्तर म्हणून ईतर (विशेषतः जुन्या जाणत्या) सदस्यांना लिहीणे भाग पडतेच. पण अशानेच एकास दोन आणि दोनाचे दोनशे होतात. प्रत्येक वेळी वेमा ना सगळीकडे झाडू मारणे अशक्य आहे हे आपणही जाणतात. पूर्वी ईथे मॉडरेटर्स होते... पण तो भूतकाळ झाला.

मायबोली चा जन्म, ईतीहास, आणि परंपरा ही ऊच्च दर्जाचे साहित्य, वैचारीक देवाण घेवाण, सर्वसमावेशक कार्यक्रम, ऊपक्रम अशी आहे हे काही मी वेगळे तुम्हाला सांगायला नको. वेळो वेळी तुम्ही देखिल या बाबतीत मार्गदर्शन केलेच आहे. मी वैयक्तीक अजूनही मायबोलीवर येतो याचे कारण नविन, अभिनव, सुंदर वाचायला मिळावे म्हणून. आणि मला खात्री आहे ईथल्या बहुतांशी सभासदांची देखिल तशीच अपेक्षा असावी. (आताशा वैयक्तीक ईथे येणे व लिहीणे कमी झाले आहे हे नक्की. )

तरिही निदान काही काळ तरी, जी जी प्रकरणे गंभीर आहेत, न्यायप्रविष्ट आहेत, ज्यात एक व्यक्ती नाही तर समाज, देश यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा प्रकरणांवर कुठल्याही प्रकारचा निव्वळ चर्चेचा बाफ ऊघडण्याची संमती दिली जाऊ नये. किंबहुना बंदी घालावी. फार तर अशा विषयावर केलेल्या कविता वा एखादे चित्र, किंवा निव्वळ त्याची लिंक देणे यास संमती असावी. याही पलिकडे ज्यांना ऊघडायचेच असेल त्यांना 'रंगीबेरंगी' वर ही सोय ठेवावी. नाही तर अशा सर्व बाफ चा 'वाहता धागा' केला जावा.

मला माहित आहे, माझी विनंती कदाचित तुमच्या धोरणात बसणारी नसेल, पण कुठेतरी कुणितरी थांबायला हवे. पब्लिक फोरम वर हे रोखण्याची संधी, हक्क, व काही प्रमाणात जबाब्दारी ही प्रशासक म्हणून तुमची आहे असे समजून मी ही विनंती करत आहे. तेही फक्त काही काळासाठी. प्रयोग म्हणून करून पहायला काही हरकत नसावी?
अगदी एकीकडे गणेशोत्सवा सारखे सुंदर ऊपक्रम सुरू असताना ईथे असे ईतर बाफ काढले जात होते... ते देखिल खटकले. आपण वातावरण दूषित करत नसलो तरी ते दूषित होवू देत रहाणे हे देखिल ऊचित नव्हे ना?

असो.
फार विचार करून व एकंदरीत मायबोलीचा १५ वर्षाचा सभासद, साक्षीदार या नात्याने ही विनंती करत आहे. यावर कृपया जरूर विचार व्हावा.
(ज्या ईतर सभासदांना माझी विनंती मान्य असेल त्यांनी ईथे खुशाल तसे नमूद करावे.)
आभारी.
योग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्ण लेख नाही वाचला..पण काय म्हणायचय ते लक्षात आलयं..
आपण माझ्यासाठी नविन ,ग्रुपमधे नविन हे ऑप्शन यूज करु शकतो म्हणा..पण तरीही,
योग तुम्हाला अनुमोदन.. कालपासून एकच टॉपिक घेऊन किती बाफ आलेत.. Sad

>>आपण माझ्यासाठी नविन ,ग्रुपमधे नविन हे ऑप्शन यूज करु शकतो म्हणा..पण तरीही,
निव्वळ माझ्यासाठी नविन, गृप साठी नविन असे ऑप्शन वापरून मूळ मुद्दा व त्यावरील ऊपाय याकडे दुर्लक्ष होईल असे वाटते.
आपण वातावरण दूषित करत नसलो तरी ते दूषित होवू देत रहाणे हे देखिल ऊचित नव्हे ना?

ज्यांना ऊघडायचेच असेल त्यांना 'रंगीबेरंगी' वर ही सोय ठेवावी. नाही तर अशा सर्व बाफ चा 'वाहता धागा' केला जावा.>>
दोन्ही ऑप्शन छान आहेत
खरेच ह्याचा गांभीर्याने विचार केला जावा ही अपेक्षा

आपण वातावरण दूषित करत नसलो तरी ते दूषित होवू देत रहाणे हे देखिल ऊचित नव्हे ना? >>> योग्य मुद्दा १००% सहमत..
होप कि प्रशासक योग्य तो डिसिजन घेतील..

या बाफ वरचे प्रतिसाद आणि त्या प्रतिसादकर्त्यांचा राजकीय कल यातला परस्परसंबंध तपासणे रोचक असणार आहे. समोरच्याचं म्हणणं त्याला मांडताच येऊ नये अशी व्यवस्था करणं हे लोकशाहीला घातक आहे

नेमक्या कुठल्या कुठल्या धाग्यांबद्दल आहे हे? लेखात स्पष्ट लिहावे असे वाटते. उदाहरणे देत मुद्दा क्लीअर झाला तर ईथली चर्चा योग्य दिशेत राहील.

बाकी ते पत्रकार हत्येसंदर्भात अजून मी एकाही धाग्यावर टिचकी मारली नाहीये, त्यामुळे त्यातील कुठलाही गोंधळ अजून पाहिला नाहीये. पण कल्पना करू शकतो.
अर्थात माझ्या आवडीचा वाद विषय नसेल तर मी तिथे जाणे टाळतो, तेच त्या विषयावरच्या धाग्यांवर केलेय, त्यामुळे मला पर्सनली काही त्रास नसल्याने असे वाटत नाही की अश्या धाग्यांवरच बंदी असावी.
बाकी मला ज्या विषयांबद्दल जाणून घ्यायचे असते ते धागे कोणी काढले नाहीत तर मी स्वतःच काढतो. लेटेस्ट उदाहरणे, गोरखपूर ऑक्सिजन कांड किंवा रामरहीम बाबा. पण काही वेळाने त्या धाग्यांवर राजकीय चिखलफेक सुरू झाली की तो धागा सोडतो. पत्रकार हत्येबाबत पहिल्यापासून शेवटपर्यंत तेच चालू असावे असा विचार करून मी तिथे टिचकीही मारली नाही.

मला राजकारणाच्या चर्चेत रस नाही म्हणून ईतरांच्या आवडीला मी नावे ठेवू शकत नाही. पण तिथे लोकं वैयक्तिक हल्ले करत ईर्ष्येने वाद घालतात, लगेच हमरीतुमरीवर येतात त्यामुळे वाचायला बोर होते ईतकेच.

पूर्ण अनुमोदन .
तसेही आता नव्या सुविधे मुळे मला फक्त "माझा"च ग्रुप दिसतो. त्यावर मी खुश आहे.

योग, पूर्ण अनुमोदन.
या चर्चांमधून चिखलफेक किती होते! नोटबंदीच्या वेळी निघालेल्या धाग्यांवर झालेल्या 'चर्चा' वाचून अनेक दिवस मायबोलीवर यायची इच्छा मेली होती. ( आधीही अशा 'चर्चा' होत असतील, मी त्या वाचत नव्हते) .
मला स्वतःला तरी मायबोलीवर यायचं असतं कारण इथे मला चांगलं साहित्य , चांगल्या पाककृती, चांगली माहिती ( उपकरणे, सहलीची ठिकाणे , इत्यादी अनेक प्रकारची) मिळते.
इथे तावातावाने बोलून कुणाला नक्की काय मिळतं हे मला खरंच माहिती नाही. राजकीय संदर्भ असलेल्या विषयावर चर्चा करूच नये असे नाही. पण कायम चढ्या आवाजात कशासाठी? आणि तुम्ही एकमेकांची मतं तर बदलू शकत नाही ( इतकी ती ठाम असतात). दोन्ही बाजू केवळ वादासाठी वाद घालत आहेत हे काय वाचणार्यांना कळत नाही ? सुज्ञ वाचक दुर्लक्ष करायला शिकतात. मग निष्पन्न काय ? काही नाही.
मी फारसे प्रतिसाद देत नाही, पण इथे द्यावासा वाटला.

. मुळात बाफ काढून मुद्दाम चूकीचे संदेश पसरवणे, वातावरण दूषित करणे हे कुणितरी केल्याने त्यास ऊत्तर म्हणून ईतर (विशेषतः जुन्या जाणत्या) सदस्यांना लिहीणे भाग पडतेच. पण अशानेच एकास दोन आणि दोनाचे दोनशे होतात.////

Never mess with someone who has more free time than you do.
असं जाणत्या लोकांनी सांगून ठेवलं आहे. मुद्दाम खोटा प्रचार करणाऱयांकडे जर खूप खूप वेळ असेल तर तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ किती खर्च करणार हा प्रश्न आहे.

जर कोणी काही ओपिनियन पोस्ट करत असेल तर हक्क आहेच. उदा कोणी म्हणालं राहुल गांधी ओबामापेक्षा प्रभावी वक्ते आहेत, तर ते ओपिनियन आहे, व्यक्त करायची मुभा हवीच.

कोणी काही खोटा प्रचार करत असेल तर काही वेळा action घेतलीही जाते-
अलीकडेच घडलेलं एक उदाहरण म्हणजे फेसबुकवर एका इसमाने पोस्ट टाकली की देवेन फडणवीस यांच्या ऑफिसमधून त्याला पैसे ऑफर झाले. ही पोस्ट (screenshot) मायबोलीवरही आहे. फडणवीस यांच्या ऑफिसने पोलिसात तक्रार केली. सायबर क्राईम, तपासांनंतर सगळा प्रकार लक्षात आला आणि फेक आयडी बनवून आपणच आपल्याला पैसे ऑफर केल्याची पोस्ट बनवणारा तो इसम गजाआड झाला.
अशाप्रकारे काही वेळा योग्य स्टेप्स घेतल्याही जातात.

Hona,
इकडे मिलिंद जाधव नावाचा एक इसम, वारंवार खोट्या बातम्या टाकतो, (म्हणजे तो बातम्या टाकतो , आणि त्या खोट्या ठरतात असे नाही बरे का... खऱ्या बातम्या बाहेर असताना तो खोट्या बातम्या पोस्ट करतो),
किंवा कुठल्याही जनावरांचे शेण चालणार असताना मुद्दामहून गाई ला मध्ये आणतो,
सेम विथ दूध,

It seems त्यांच्या कडे खूप मोकळा वेळ असावा Happy
मुद्दाम खोटा प्रचार करणाऱयांकडे जर खूप खूप वेळ असेल तर तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ किती खर्च करणार हा प्रश्न आहे.

अडमिन ने असे खोटे नाटे पसरावणार्या आणि मुद्दामहून वाद होतील अशी शब्दरचना करणाऱ्या आईडींवर कारवाई करावी,

माझ्यासाठी तरी असल्या धाग्यांचं (आणि धागाकर्ते, निवडक प्रतिसादि/प्रतिवादि) उपद्रवमुल्य नगण्य/कमी आणि मनोरंजनमुल्य जास्त असल्याने ते बंद करु नये असं वाटतं. हा, कधी-कधी मेगाबाय्टी प्रतिसाद ओलांडायला लांब उडी मारावी लागते; त्याची पण आता सवय झालेली आहे... Happy

समजले नाही असे बाफ का येउ देउ नयेत. ज्यांना चिखलफेकच करायची आहे ते कोणत्याही बाफवर काही संबंध नसलेली पोस्ट टाकून पूर्णपणे बाफ भरकटवून पाहिजे तिकडे नेतातच.

बाफ कशावरही असला, तरी त्यात बादरायण संबंध लावून ठराविक "गळ" विषय - म्हणजे गांधी, नेहरू, मुसलमान, राहुल गांधी, सावरकर, मोदी, हिंदू, ब्राह्मण, फुरोगामी, खांग्रेजी वगैरे टाकायचे. जमले तर त्यांच्याबद्दल काहीतरी प्रक्षोभक लाइन टाकायची. मग तोपर्यंत इतर बाफ वर इकडेतिकडे पोहोणारे त्यांचे समर्थक मासे गळाला लागतात. उलट्या पोस्टी येतात. आणि मग सेण्ट्रल ची गाडी वेस्टर्न लाइन वर जाते. तरीही नाही गेली, तरी वैयक्तिक हल्ले करून हार्बर लाइन वरून नेता येते.

विषयांतर करणार्‍यांना समज देउन ते थांबवणे, वैयक्तिक, किंवा इथे अ‍ॅक्सेप्टेबल नसलेले लिहीणार्‍यांना समज देणे->पोस्ट उडवणे->आयडी गोठवणे या क्रमाने रोखणे हे काम सतत करत राहण्यानेच हे कंट्रोल मधे राहील. हे सतत करत राहायला १-२ जण पुरेसे नाहीत. भरकटवणारे लिहीले तर पोस्ट लगेच उडते, व रणधुमाळी व्हायच्या आत आयडीही गोठवला जाउ शकतो हे होउ लागले, तरच हे प्रकार कमी होतील.

अ‍ॅडमिन काय ते ठरवतीलच पण 'मी जास्त चांगला की तु जास्त चांगला' यापेक्षा "मी जास्त वाईट की तु जास्त वाईट" याच चर्चा सतत होत रहातात (राजकारणतील पक्ष, जात, धर्म हे सर्व यात येतात) त्या नक्कीच कमी व्हाव्यात ही इच्छा आहे.

अशा कुठल्याही प्रकारच्या घटनांसाठी ज्या न्यायप्रविष्ट आहेत, त्यावर कुठल्याही प्रकारचे बाफ काढायला ईथल्या प्रशासनाने बंदी घालावी अशी कळकळीची विनंती आहे. >> अगदी बरोबर . पूर्वीची मायबोली हरवत चालली आहे. एखादी घटना घडली रे घडली उघड धागा आणि करा त्याच त्याच चर्चा . चिखलफेक . पूर्वीचे बाद झालेले आयडी नवे नवे आयडी घेऊन उगवतात आणि तीच तीच चर्चा करतात . सगळेच काय ते घटनेचे विश्लेषक आणि मीच काय तो शहाणा मोड मध्ये . तेच तेच गुऱ्हाळ .
कंटाळा आलाय या सगळ्याचा Sad

<<'एका पत्रकाराची हत्या' या निमित्ताने गेले काही दिवस आपल्या मायबोलीवर बरेच काही लिहीले जात आहे. >>
-------- वादग्रस्त असे शेकडो धागे आले असतील पण मग तुम्ही याच एका धाग्याला का निवडले? अजुन किमान ५ - ६ नावे लिहायची म्हणजे तुमचा विनन्ती धागा सर्वप्रकारच्या वादान्ना समान लेखतो असा खणखणित सन्देश वाचकान्ना मिळाला असता.

मी राजकीय धाग्यांवर प्रामुख्याने असतो, म्हणून वर जे कंटाळा आला types आरोप आहेत त्याला उत्तर देऊ इच्छितो,

हा आरोप करणाऱ्यांच्या म्हणण्या नुसार काही ठरवीक id, त्याच त्याच विषयांवर धागे काढून चिखलफेक इत्यादी करतात,
मी या लोकांना विचारू इच्छितो हे असे id किती आहेत? 10-20- 30?? मायबोलीची सदस्य संख्या लाखभर आहे, त्यातील ऍक्टिव्ह सभासद हजाराच्या घरात असतील, मग हे 20 25 सदस्य तुम्हाला वेठीस कसे आणि का धरू शकतात?
तुम्ही (म्हणजे "आम्ही नाही त्यातले" म्हणत कंटाळा आला आरडाओरड करणारे लोक) सशक्त पर्याय उभा करा, जास्त धागे काढा, दुसऱ्या विषयांवर चर्चा घडवून आणा, कोणी थांबवले आहे तुम्हाला?
ही रणधुमाळी सुरू असताना देखील किती तरी धागे आलेत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालाय,( फारेंड चे सिनेमा रसग्रहण, हाब च्या केसेस ही अगदी अलीकडची उदाहरणे)

या चिखलफेकी धाग्यावर तुम्ही एकही पोस्ट टाकली नाहीये किंवा फार न्यूट्रल पोस्ट टाकल्या अस प्रकार आहे का ? तर नाही , तुम्ही सगळे आखाड्यात उतरताच, मग बाहेर येऊन आत फारच धक्काबुक्की असते बाई , म्हणन्याला काय अर्थ आहे?
या धाग्याना TrP देण्यात तुम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहात, खरच हे धागे आवडत नसतील तर तिकडे फिरकू सुद्धा नका, TrP अभावी धागे मरून जातील किंवा तिकडचे दूषित वारे तुमच्या पर्यंत न पोहोचल्याने तुम्ही सुखी रहाल.

दुसरा आरोप कोणताही विषय असला तरी तो ओढून ताणून राजकारणावर नेला जातो (फारेंड वर तुम्ही एक्सपलिसीटली हा आरोप केला असलात तरी खालचे फक्त तुम्हाला उद्देशून नाहीये, हा आरोप ववी च्या धाग्यांवर पण झालाय , त्याचा ही इकडे रेफ आहे)
असे नक्की किती धागे दुसऱ्या वळणावर नेण्यात आले?
निघालेल्या एकंदर धाग्यांपैकी किती % धाग्यांबद्दल हा प्रकार झाला असे तुमचे निरीक्षण आहे?
माझ्या आठवणी प्रमाणे फार कमी धागे या प्रकारात मोडतील,
या साठी पण वरचाच प्रश्न रिपीट,
तुम्ही काय केलेत? धागा ट्रॅक वर आणायला पोस्ट टाकलीत?(आणि युद्धज्वर चढलेल्या पब्लिक ने ती धुडकवली?) की तुम्ही पण बदललेल्या ट्रॅक वर पोस्टीं टाकल्यात? की परत हा धागा पण वळणावर गेला म्हणून शेल मध्ये गेलात?

वरील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे स्वतः:लाच द्यावीत, आणि मग पक्का डेटा हातात घेऊन xyz ने मायबोली वातावरण दूषित केले म्हणून आरोप करावेत.

सिम्बा
अगदी मर्मिक पोस्ट
ऋन्मेश वर ही लोक टीका करतात आणि हीच लोक प्रतिसाद देऊन त्याचे धागे वर आणतात.

हा मजकूर ललित लेखनात का आहे?

मायबोलीवर धागे उघडणे बंद केल्याने या अशा हत्या थांबणार असतील, तर नक्की बंदी घाला.

उदय अडचणीचे प्रश्न विचारू नये.
याआधी एकाने त्याच्या धाग्याच्या नावात शिवी दिलेली होते. तेव्हा योग यांनी अशी तक्रार केलेली नव्हती. उलट त्या धाग्यावर चांगली चर्चा केली होती.

कंटाळा आला म्हणजे कंटाळा आला . तुम्हाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. समजल ना ? आमचं मत ( कंटाळा येणारे ) आम्ही कुठल्याही धाग्यावर व्यक्त करू शकतो . सशक्त पर्याय आम्ही उभे करू कि नाही जास्त धागे काढू कि नाही हे आमचं आम्ही ठरवू . तुम्ही कशाला आम्हाला सांगताय ? नाही तर काय . काही आपले सांगतात Lol

मग काय, बसा बोंबलत! (श्रेय अव्हेर -नाव विसरलो)
अगं अगं म्हशी मला कुठे नेशी!!
Happy

मला पण सिम्बा यांची पोस्ट पटली. मी व्यक्तिशः कधी ही एक ही पोस्ट असल्या धाग्यांवर लिहीत नाही तरी ही. धाग्यावर बंदी घालून काही साध्य नाही होणार.
ते धागे जर तुम्हाला म्हणजे बहुसंख्य लोकांना आवडत नाहीत तर ते इतके पॉप्युलर होतात कसे ? पॉप्युलर होतात म्हणजे ते इथल्या लोकांना आवडतायत. जर भरपूर जणांना आवडले नाहीत , त्यात काही ही लिहिले असले तरी लोकांनी प्रतिसाद दिले नाहीत तर ते आपोआपच मागे पडतील. प्रतिसाद द्यायचा की नाही हे तर आपल्या हातात च आहे ना ?
एक आहे ज्या गुणवत्तेची जनता असते त्याच गुणवत्तेचं सरकार असत . तसच माबो सभासदांची जी गुणवता असेल त्याच गुणवत्तेचे धागे इथे असणार आहेत . माबो बिघडली आहे असं जर वाटत असेल आणि ती ह्यापेक्षा चांगली व्हावी असं वाटत असेल तर प्रत्येकाने आपली गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे . ज्यांना हे धागे आवडत नाहीत त्यानी चांगले धागे काढावेत . पण हे जर जमले नाही तर खराब जुन्यापान्या नोटा चांगल्या नोटांना चलनामधून हुसकावून लावतात तसच होईल माबोच ही.

>>>>>>>>
कंटाळा आला म्हणजे कंटाळा आला . तुम्हाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. समजल ना ? आमचं मत ( कंटाळा येणारे ) आम्ही कुठल्याही धाग्यावर व्यक्त करू शकतो . सशक्त पर्याय आम्ही उभे करू कि नाही जास्त धागे काढू कि नाही हे आमचं आम्ही ठरवू . तुम्ही कशाला आम्हाला सांगताय ? नाही तर काय . काही आपले सांगतात Lol
Submitted by सुजा on 10 September, 2017 - 1>>>>>>
या उर्मट प्रतिसदानंतर काय समजायचे ते मी समजलो,
दखल घेतल्या बद्दल धन्यवाद ___/\___

सिम्बा, आपला प्रयत्न प्रामाणिक होता. त्याला आलेली ती उद्धट प्रतिक्रिया पुरेसे स्पष्टीकरण देत आहे. एकूण काय तर एकांगी धागे व एकांगीच मते इथे येत राहावीत असे मानस तक्रारकर्त्यांचे दिसते आहे.

@मग काय, बसा बोंबलत!
अगं अगं म्हशी मला कुठे नेशी!! >> तेही आमचं आम्ही ठरवू . कुठल्या धाग्यावर फिरकायचं का नाही फिरकायचं . व्यक्त व्हायचं का नाही व्हायचं ते हि पूर्ण पणे आमचं आम्ही ठरवू

@या उर्मट प्रतिसदानंतर काय समजायचे ते मी समजलो,
दखल घेतल्या बद्दल धन्यवाद ___/\___ हा उर्मट प्रतिसाद आहे हेही तुमचं तुम्हीच ठरवलंत ? याला मी रोखठोक म्हणून शकते . प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. नाही का ? Happy

दृष्टिकोन तुमचा एकांगी आणि वैतागलेला आहे.
(हे मीच ठरवणार आणि लिहीणार समजल का? पटतय तर ठिक नाही तर चालू लागा)

आपल्याला पण जमलं राव Wink

Pages