प्रशासकांना कळकळीची विनंती.

Submitted by योग on 9 September, 2017 - 07:02

माननीय प्रशासक,

'एका पत्रकाराची हत्या' या निमित्ताने गेले काही दिवस आपल्या मायबोलीवर बरेच काही लिहीले जात आहे. कदाचित आपल्या सर्वसमावेशक व व्यक्तीस्वातंत्र्य पुरस्कृत धोरणात ते योग्यही असेल. निव्वळ हा एकच बाफ नाही तर अशा अनेक घटनांचे अनेक बाफ व त्यावरील अनेक चर्चा आजवर ईथे झाल्या आहेत. त्या होवू देणे, आपली मते मांडायला लोकांना जागा ऊपलब्ध करून देणे याबद्दल तुमचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत. आणि तरिही काही खोडसाळ व नुकत्याच जन्मलेल्या आयडींच्या वैयक्तीक हल्याकडे दुर्लक्षित करूनही तुम्ही ही सुविधा कायम ठेवली आहेत यासाठी फारच मोठे मन, शक्ती, वेळ, व यंत्रणा लागते ज्यासाठी कमीत कमी तुमचे वैयक्तीक व व्यावसायिक आभार मानणे हे ऊचित ठरेल .

मात्र, आतशा या चर्चा, मुद्दे, ई. सर्व यांचा रोख, हेतू, यावर अनेक शंका घेण्याईतके सर्व स्पष्ट आहे.

मुळात जे सुशिक्षीत, 'सुजाण' व जबाब्दार समाजात घडणेच अपेक्षित नाही त्याची जबाबदारी व तोडगा आपण फक्त दुसर्‍यावर ढकलू पहात आहोत. चार दिवस हे चर्चेत रहाते मग पुन्हा कुठेतरी भयानक, निर्घ्रुण व माणुसकीला लाजवणारे अपराध वा कृत्त्य घडते आणि मग नविन प्रश्णांचे ढोल पिटले जातात.

आताशा मन 'सुन्न' होते म्हणजे काय हेही विसरायला होते ईतक्या संख्येने व नियमीतपणे अशा घटना वाचनात येतात. अशा गुन्हेगारांना चौकात हातपाय पाय तोडून दगडाने ठेचून मारले तरी अशा घटना कमी होतील का? गुन्हेगारांच्या मानवी हक्क अधिकारासाठी किती निष्पाप जीवांचे बळी अजून जाणार आहेत? टॉप टू बॉटम सिस्टिमॅटीक फेल्युअर असणार्‍या सिस्टीम मध्ये कुणा कुणाला फासावर लटकवत रहायचे? असे प्रश्ण ऊपस्थित करणे देखिल आजच्या घडीला वादग्रस्त ठरते आहे...! आणि कुणी केलेच तर पुन्हा तेच तेच मुद्दे व घटना वापरून निव्वळ एकेमेकांवर कुरघोडी करण्या पलिकडे काहिही होत नाही. या निमित्ताने वैयक्तीक स्कोर ईथे आणि बाकी सोशल मिडीया वर सेटल केले जातात. पुन्हा नविन घटना घडेपर्यंत वाट पहात रहाणे... प्रत्येक घटना एका नव्या बाफ चा विषय होवू शकेल.. पण कुठेतरी थांबायला हवे.

अशा कुठल्याही प्रकारच्या घटनांसाठी ज्या न्यायप्रविष्ट आहेत, त्यावर कुठल्याही प्रकारचे बाफ काढायला ईथल्या प्रशासनाने बंदी घालावी अशी कळकळीची विनंती आहे. मायबोलीच्या माझ्या १५ वर्षे वास्तव्यातील ही अशी पहिलीच विनंती करायची वेळ आली आहे हे फार मोठे दुर्दैव आहे! पण रोगापेक्षा अ‍ॅनालिसीस जहरी असे आता गेले काही वर्षे चालू आहे.

किमान मायबोलीवर हे वाचायला मिळू नये एव्हडीच अपेक्षा आहे. निव्वळ माझ्यासाठी नविन, गृप साठी नविन असे ऑप्शन वापरून मूळ मुद्दा व त्यावरील ऊपाय याकडे दुर्लक्ष होईल असे वाटते. मुळात बाफ काढून मुद्दाम चूकीचे संदेश पसरवणे, वातावरण दूषित करणे हे कुणितरी केल्याने त्यास ऊत्तर म्हणून ईतर (विशेषतः जुन्या जाणत्या) सदस्यांना लिहीणे भाग पडतेच. पण अशानेच एकास दोन आणि दोनाचे दोनशे होतात. प्रत्येक वेळी वेमा ना सगळीकडे झाडू मारणे अशक्य आहे हे आपणही जाणतात. पूर्वी ईथे मॉडरेटर्स होते... पण तो भूतकाळ झाला.

मायबोली चा जन्म, ईतीहास, आणि परंपरा ही ऊच्च दर्जाचे साहित्य, वैचारीक देवाण घेवाण, सर्वसमावेशक कार्यक्रम, ऊपक्रम अशी आहे हे काही मी वेगळे तुम्हाला सांगायला नको. वेळो वेळी तुम्ही देखिल या बाबतीत मार्गदर्शन केलेच आहे. मी वैयक्तीक अजूनही मायबोलीवर येतो याचे कारण नविन, अभिनव, सुंदर वाचायला मिळावे म्हणून. आणि मला खात्री आहे ईथल्या बहुतांशी सभासदांची देखिल तशीच अपेक्षा असावी. (आताशा वैयक्तीक ईथे येणे व लिहीणे कमी झाले आहे हे नक्की. )

तरिही निदान काही काळ तरी, जी जी प्रकरणे गंभीर आहेत, न्यायप्रविष्ट आहेत, ज्यात एक व्यक्ती नाही तर समाज, देश यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा प्रकरणांवर कुठल्याही प्रकारचा निव्वळ चर्चेचा बाफ ऊघडण्याची संमती दिली जाऊ नये. किंबहुना बंदी घालावी. फार तर अशा विषयावर केलेल्या कविता वा एखादे चित्र, किंवा निव्वळ त्याची लिंक देणे यास संमती असावी. याही पलिकडे ज्यांना ऊघडायचेच असेल त्यांना 'रंगीबेरंगी' वर ही सोय ठेवावी. नाही तर अशा सर्व बाफ चा 'वाहता धागा' केला जावा.

मला माहित आहे, माझी विनंती कदाचित तुमच्या धोरणात बसणारी नसेल, पण कुठेतरी कुणितरी थांबायला हवे. पब्लिक फोरम वर हे रोखण्याची संधी, हक्क, व काही प्रमाणात जबाब्दारी ही प्रशासक म्हणून तुमची आहे असे समजून मी ही विनंती करत आहे. तेही फक्त काही काळासाठी. प्रयोग म्हणून करून पहायला काही हरकत नसावी?
अगदी एकीकडे गणेशोत्सवा सारखे सुंदर ऊपक्रम सुरू असताना ईथे असे ईतर बाफ काढले जात होते... ते देखिल खटकले. आपण वातावरण दूषित करत नसलो तरी ते दूषित होवू देत रहाणे हे देखिल ऊचित नव्हे ना?

असो.
फार विचार करून व एकंदरीत मायबोलीचा १५ वर्षाचा सभासद, साक्षीदार या नात्याने ही विनंती करत आहे. यावर कृपया जरूर विचार व्हावा.
(ज्या ईतर सभासदांना माझी विनंती मान्य असेल त्यांनी ईथे खुशाल तसे नमूद करावे.)
आभारी.
योग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाना, प्राण,
मी माझी बाजू मांडली, त्यांना त्यातल्या एकही मुद्द्यांचा प्रतिवाद करावासा वाटला नाही, यातच सगळे आले

त्यांना त्यांचे मत मांडायचा पूर्ण अधिकार आहे, नको असलेल्या धाग्यांवर जाऊन पोस्टीं टाकून नंतर यो धागा किती वाईट आहे हे पटवून द्यायला त्यांच्याकडे खूप वेळ असेल, पण त्यांच्याशी वाद घालण्यात आपला किती वेळ फुकट घालवायचा हे आपले आपण ठरवायचे.

त्यांच्या वैयक्तिक हल्ल्याचा कृपया आपण प्रतिवाद करू नये असे मी सुचवेन.

सिम्बा यांच्याशी सहमत!
इंग्रजीत एक छान म्हण आहे...
You are not stuck in traffic, you are traffic.

तेव्हा इतरांना/मायबोलिला दोष देणे थांबवा. You are Maayboli.

योग यांची चिडचिड समजू शकतो
याच कारणाने मीही आजकाल इकडे फारसा फिरकत नाही
आणि माझ्यासारखे इतर बरेच असतील
मायबोली वर वादविवाद पूर्वीही होते पण at least लोक स्वताची मते मांडायचे, वेगवेगळे मतप्रवाह अनुभवायला मिळायचे आणि त्यातही मजा असायची
पण या राजकीय लाथाळ्या म्हणजे कहर आहे, ज्याला आपण ओळखतही नाही अश्या कुणावर तरी तात्पुरती शाब्दिक कुरघोडी करण्यासाठी इतकी एनर्जी आणतात कुठुन हे लोक?
इतका वेळ मिळतो कसा कुणाला? का खरच ते एकमेकांवर आरोप करतात तसे राजकीय पक्षांचे पेड हस्तक आहेत?
बर इतकी सगळी उरस्फोड करुन समोरच्या बाजूच्या एका तरी व्यक्तीचे मत बदलता आलय का कुणाला?
मग कशाला एव्हढी स्वताचीच मन:शांती पणाला लावायची?
कशासाठी? कुणासाठी?

अरे वाटायचाच आहे तर जरा आनंद वाटा की, आत्ता जे काय करताय त्याने कुणाचे आणि काय भले होणारेय याचा जरा स्वताशीच विचार करा

असे धागे बंद होतील न होतील पण कुणाला तरी आपण इतके नकोसे होतोय तर आपले कुठेतरी काहीतरी चुकतय का? याचे एकदा आत्मपरिक्षण केले पाहिजेल

लोकांनी आठवण काढावी असे लिहा रे.... लोक मायबोली सोडून जावीत असे नको!

बर इतकी सगळी उरस्फोड करुन समोरच्या बाजूच्या एका तरी व्यक्तीचे मत बदलता आलय का कुणाला?
>>>>>>

हा मुद्दा बरेचदा वाचलाय.
पण हा चुकीचा आहे.
एखाद्या राजकीय समर्थकाला आपल्या विरोधकांची मते बदलायची नसतात. तर ईतर वाचक जनतेचा ब्रेनवॉश करायचा वा झालेला काढायचा असतो. दोन्ही बाजू याच प्रयत्नात असतात.

एक मिनिट - एक शंका - हा धागा शाहरूखप्रेमी आणि शाहरूखद्वेष्टे यांनाही लागू होतो का?

@प्राण ,
दृष्टिकोन तुमचा एकांगी आणि वैतागलेला आहे.
(हे मीच ठरवणार आणि लिहीणार समजल का? पटतय तर ठिक नाही तर चालू लागा) >> तुम्ही कोण आहात आम्हाला चालू लागा म्हणून सांगणारे ?
सिम्बा यांनी माझ्या प्रतिसादातील "कंटाळा आला" एवढाच एक शब्द उचलून समस्त कंटाळा येणार्यांना उद्धेशून लिहिलं आहे . असं करा तस करा. वेगळे धागे काढा. याव करा आणि त्याव करा . त्यावर माझा प्रतिसाद आहे तो वैयक्तिक नव्हेच. माझ म्हणण एवढच आहे जे काय करायचं ते आमचं आम्ही ठरवू ना . आम्हाला नाही काढायचेत वेगळे धागे. हे काय काहीतरी येड्याबागड्यावानी लिहायचं आपलं Lol

तुम्हाला नाही काढायचा नका काढू इतरांच्या बाजूने बोलायला तुम्ही कोण आहात? उगाच आपले खरडायचे म्हणून खरडायचे. कैवार घेतल्यासारखे लिहीत सुटायचे.

Rofl

जमतयं जमतय.

तुम्हाला नाही काढायचा नका काढू इतरांच्या बाजूने बोलायला तुम्ही कोण आहात?>> समस्त कंटाळा येणाऱ्यांपैकी एक. ज्यांना ते सांगताहेत धागे काढा . यावं करा आणि त्याव करा . तुम्ही पण त्यांचे कैवार घेणारे आहातच ना Lol

असे धागे मला पब्लिसिटी स्टंट वाटतात. (असे धागे म्हणजे असे सर्वच, ज्यांच्यावरची चर्चा कोणत्याच ठाम निर्णयावर पोचत नाही)
योग, तुम्ही १५ वर्षांपासून माबोवर आहात, आणि त्यानंतर तुम्ही हा धागा काढला, genuine नाही वाटत... (१५ वर्षांत तुम्हाला माबोकर या धाग्याला काय प्रतिक्रिया देतील याची कल्पना आलीच असेल, मग याला पब्लिसिटी स्टंट नाहीतर काय समजावे?)
....... बाकी तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण मांडूनही काही होणारच नाही...

सूजा,
माझ्या बाजूने मी जितका थांबायचा प्रयत्न करतोय तितके तुम्ही फाटे फोडत आहात,
>>>>>>
एखादी घटना घडली रे घडली उघड धागा आणि करा त्याच त्याच चर्चा . चिखलफेक . पूर्वीचे बाद झालेले आयडी नवे नवे आयडी घेऊन उगवतात आणि तीच तीच चर्चा करतात . सगळेच काय ते घटनेचे विश्लेषक आणि मीच काय तो शहाणा मोड मध्ये . तेच तेच गुऱ्हाळ .
>>>>>
या पूर्ण भावनेला होता,माझा प्रतिसाद होता,
अशीच भावना वर काही लोकांनी व्यक्त केली आहे,
अशीच भावना ववी च्या धाग्यांवर लोकांनी व्यक्त केली होती,
त्या सगळ्यांना उद्देशून होता, तुम्हाला वैयक्तिक नव्हता (हे मी त्या प्रतिसादातच स्पष्ट केले होते)
आत्ताचा तुमचा प्रतिसाद निमित्तमात्र आहे,

घडलेली घटना कोणती ते धाग्याच्या हेडर मध्ये स्पष्ट लिहिलेले असते, तिकडे काय होणार हे तुम्हाला अनुभवावरून माहीत असते, तुम्ही तिकडे येऊन आपली मते देता (तुमच्या शब्दात चिखल फेकीत सहभागी होता),
अशा परिस्थितीत त्या धाग्यांवर आक्षेप घ्यायचा तुम्हाला काय नैतिक हक्क आहे?
असो.... माझी भूमिका मी टवाळी न करता , चांगल्या शब्दात मांडली आहे,
तुम्हाला मुद्द्याला उत्तर द्यायचे असेल स्वागत आहे,
"आम्ही हवे ते करू, तुम्ही सांगणारे कोण" हे एकमेव अर्ग्युमेंट असेल तर आपला संवाद होणे कठीण आहे ,
धन्यवाद

सूजा,
माझ्या बाजूने मी जितका थांबायचा प्रयत्न करतोय तितके तुम्ही फाटे फोडत आहात>> तुम्ही थांबलाच आहात हो पण तुमचे कैवारी फाटे फोडत आहेत. त्यांना मी उत्तर देत आहे. दुर्लक्ष करा अशा त्यांना तुम्ही इंस्ट्रक्शन देऊनही ते थांबतच नाहीयेत . त्यांच्या कडे पण तुम्ही मला म्हटल्याप्रमाणे भरपूर वेळ दिसतो आहे असं म्हणायच का ? माझा पण तुम्हाला वैयक्तीक प्रतिसाद नाहीच आहे . हे परत एकदा नमूद करते. तुम्ही माझ्या प्रतिसादातील " कंटाळा आला " हा एकच शब्द उचलून त्यावर जे काही लिहिलं आहे त्या प्रतिसादाला प्रतिसाद होता तो Happy

मी तुमच्या प्रतिसादातील फक्त कंटाळा आला ला रिऍक्ट झालो नाहीये,
तुम्ही त्या आधी जी भावना व्यक्त केली आहे ( जी आधी सुद्धा विविध ठिकाणी लोकांनी व्यक्त केली आहे) त्याला रिऍक्ट झालो आहे,
Saying that,

घडलेली घटना कोणती ते धाग्याच्या हेडर मध्ये स्पष्ट लिहिलेले असते, तिकडे काय होणार हे तुम्हाला अनुभवावरून माहीत असते, तुम्ही तिकडे येऊन आपली मते देता (तुमच्या शब्दात चिखल फेकीत सहभागी होता),
अशा परिस्थितीत त्या धाग्यांवर आक्षेप घ्यायचा तुम्हाला काय नैतिक हक्क आहे?
या माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
("आमची मर्जी , तुम्ही कोण विचारणारे? "हेच उत्तर असेल तर गोष्ट वेगळी)

@ सिम्बा ,
कुठल्याही धाग्यात मला जेव्हा लिहायचे होते ज्याला प्रतिवाद करावासा वाटला तिथेच आणि तिथेच मी लिहिलेलं आहे .माझे एकदा लिहून झाले कि शक्यतो त्या धाग्यावर मी फिरकलेली नाहीये हे माझं मलाच माहित आहे . तेव्हा त्या मत देण्याच्या प्रक्रियेत मी सहभागी होते अस तुम्ही म्हणू शकत नाही ना मी त्या धाग्यांवर आक्षेप घेतलाय . आणि" चिखलफेक" हा शब्द माझ्या प्रतिसादा आधी आणखीन एका आयडीने ( वावे ) सुद्धा वापरला आहे. त्यामुळे माझ्या भाषेत मी तो शब्द पहिल्यांदीच वापरला आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर तसा तो आक्षेप पण माझ्या कडे जात नाहीच

राहता राहिला प्रश्न योग यांच्या विनंतीचा त्यात सुद्धा " अशा कुठल्याही प्रकारच्या घटनांसाठी ज्या न्यायप्रविष्ट आहेत, त्यावर कुठल्याही प्रकारचे बाफ काढायला ईथल्या प्रशासनाने बंदी घालावी अशी कळकळीची विनंती आहे " हे वाक्य अधोरेखित करून मी त्या त्यांच्या विनंतीला किव्वा त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे इतकंच . या उप्पर आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर क्षमस्व Happy

>>>>>>
कुठल्याही धाग्यात मला जेव्हा लिहायचे होते ज्याला प्रतिवाद करावासा वाटला तिथेच आणि तिथेच मी लिहिलेलं आहे .माझे एकदा लिहून झाले कि शक्यतो त्या धाग्यावर मी फिरकलेली नाहीये>>>>>>

धाग्याचा विषय माहीत असताना ,तिकडे काय चिखलफेक झालीये हे माहीत असताना, आणि या सगळ्या बद्दल मनापासून तिटकारा असताना तुम्हाला तुमचे मत ऐकवावेसे वाटते, आणि ते तुम्ही ऐकवता , इतर लोक जे धाग्यांवर परत परत प्रतिसाद देतात , त्यांना ही उर्मी परत परत आवरत नाही, असे म्हणायला लागेल,
मग राजकारणात मनापासून रस असलेल्या आणि त्या बद्दल स्ट्रॉंग मते असणाऱ्या लोकांनी ताज्या बातम्यांवर धागे काढले आणि त्यावर आपली मते हिरीरीने मांडली तर त्या बद्दल इतकी निगेटिव्हीटी का?

आणि जिकडे तुम्ही परत फिरकत नाही त्यामुळे मायबोली ची हवा कशी दूषित झाली आहे , या बद्दल परत परत तक्रारी करण्यात काय अर्थ आहे?

जरी तुमचा प्रतिसाद उद्धृत केला असेल तरी हा प्रश्न तुम्हाला वैयक्तिक रित्या टार्गेट केलेला नाहीये,
हे लॉजिकं देणाऱ्या सगळ्यांना हा प्रश्न आहे.

असले धागे माबोवर लोकप्रिय आहेत त्यामुळे अजिबात बंद करू नये. नियमांची अंमलबजावणी मात्र आज होते त्याहून जास्त करावी. दोनच लोक पार्ट टाईम माबो प्रशासन काम करतात हे सांगू नये. अर्थात गेले वर्षभर माबो प्रशासक जास्त जागरूक झाले आहेत आणि माबो अपग्रेड आणि अंमलबजावणी दोन्ही उत्तम चालू आहे त्यामुळे त्यांचे अभिनंदन.
मला कायम असं वाटतं की माबो ही फॉर profit साईट आहे त्यामुळे जिकडे टीआरपी मिळतो ते धागे बंद करून प्रशासक पायावर धोंडा कशाला पाडून घेतील?
स्वतःला विचारलं तर असले हमारीतुमरीवर येणारे वाद हे माझ्यासाठी मनोरंजन आहे, जमेल तेव्हा एक विचारपिंक ही टाकता येते. एकीकडे टीम कागाळे आणि दुसरी कडे टीम साती. सर्योदायापासून मूळ धाग्यावर मारामारी आणि सूर्य मावळला की आतल्या गोटात (कट्टा /अड्डा) खास टिपण्ण्या. फार काही झालं की एफआयआर दर्ज करायला स्टेशनात. एक पार्टी गेली की दुसरी त्यांचे एक्झीबिट घेऊन तिकडेच. मी एन्जॉय करतो, कारण का? तर या राजकीय लाथाळ्या करणारे (बरेचसे)लोकं जेन्यूअनली तसाच विचार करतात असं मला वाटतं. उलट लिहून मुद्दाम काडी करून लोकांची प्रतिक्रिया बघणे असं दोन्ही कडील जे लोक करतात त्यांना जंप करायला आता जमलंय म्हणूनही असेल. अर्थात संबंध नसलेला विषय ओढून ताणून आपल्या अजेंडावर आणणे (पगारे, लिंबू स्टाईल) हे भरपूर होतंच.

मला सगळ्यात जास्त त्रास रुन्मेशचा वाटतो. कारण तो एक अजेंडा घेऊन आपण फार स्मार्ट आहोत स्टाईल लिहित पोकळ शाब्दिक बुडबुडे वाद घालत बसतो. त्याचे धागे काढतो ते ठीकच आहे, पण इतर धाग्यांवर विषय नसताना मुद्दाम चर्चेचा रोख आपल्याकडे / आपल्या अजेंडा कडे वळवायचा हे प्रचंड इरिटेटिंग वाटतं. अर्थात त्याला जमेल तसं कोंडीत पकडणे किंवा कोणी पकडले असेल तर आनंद लुटणे हा गेम मनोरंजन करतोच.
मायबोली हे माझ्यासाठी समविचारी लोकांशी संवाद, काही चांगलं वाचायला मिळेल त्यातून आणि तद्दन फिल्मी फ़ाईट सीन वाटतील अशा वादातून मनोरंजन करायचे साधन आहे. सो ऑल इज गुड.
सिम्बा, तू जे लिहिलं आहेस तोच विचार मी ही आधी करत असे. हल्ली ते व्हिक्टिम ब्लेमिंग आहे की काय असं वाटू लागलंय.

असे नक्की किती धागे दुसऱ्या वळणावर नेण्यात आले?
निघालेल्या एकंदर धाग्यांपैकी किती % धाग्यांबद्दल हा प्रकार झाला असे तुमचे निरीक्षण आहे?
माझ्या आठवणी प्रमाणे फार कमी धागे या प्रकारात मोडतील,>>>

सिम्बा - माझ्या माहितीप्रमाणे उत्तर देतो. एकूण धाग्यांपैकी अशा भरकटलेल्या धाग्यांची संख्या खूप कमी असेल. माझा पॉइण्ट हा होता की भलतीकडे न्यायचा तर कोणताही धागा नेता येतो, त्यामुळे वादग्रस्त विषयांवर धागे काढायला बंदी करून काही साध्य होणार नाही.

एकूणच तुमचे आणि माझे मत फार वेगळे आहे असे मला वाटत नाही. मी ही हेच म्हणतोय की अशा चर्चा होउदेत.

मला आक्षेप फक्त मुद्द्यांवर न भांडता असंबंधित प्रक्षोभक मजकूर असलेल्या, एकमेकांवर वैयक्तिक हल्ला करणार्‍या, किंवा प्रत्यक्षात काहीही मुद्दा न लिहीता खांग्रेजी, भाजप्ये/भक्त, आले फुरोगामी बोंबा मारत/नागपूर हून आदेश आले का छाप मजकूर असलेल्या पोस्टींबद्दल आहे. ते कंट्रोल करण्याबद्दल मी वरती ऑलरेडी लिहीलेले आहे तेच माझे मत आहे. यात कोणीतरी एक एण्ट्री मारतो, आणि मग इतर अनेक जण त्याने सुरूवात केली हे जस्टिफिकेशन देत तेच दळण पुढे चालू करतात. ज्या बाफ वर हे होते तेथे जाण्याचा इतरांचा इण्टरेस्ट संपतो.

मी अशा अनेक चर्चांमधे तरीही लिहीलेले असल्याने याबाबतीत माझे मत ग्राह्य असावे होपफुली Happy

सिम्बा, अगदी हेच मला म्हणायचे आहे. मायबोलीची हवा दूषित झाली वगैरे हा शुद्ध कांगावा आहे. >>> नानाकळा, थोडा सहमत, थोडा नाही. हवा दूषित झाली आहे असे मलाही वाटते. पण ती तशी झाली म्हणून तक्रार करणार्‍यांपैकी अनेक जण चर्चांमधे फारसे न उतरताच ते म्हणतात. लोकांना वेळ नसतो, आम्हाला हाच एक उद्योग आहे का वगैरे सगळे ठीक आहे. पण मग याबाबतीत लोकांची नक्की काय अपेक्षा आहे हे कळले तर बरे होईल.

हवा दूषित झाली बद्दल दोन उदाहरणे, चांगले वाद कसे असतात त्याची. एक दोन वर्षांपूर्वी नवरात्रातच पुण्यातले पुणेकर वर ते मटा रोज साड्यांचे रंग घोषित करतो आणि असंख्य स्त्रिया ते फॉलो करतात याबद्दल वाद झाला होता. २-३ तास सलग लोक दोन्ही बाजूंनी लिहीत होते. पण एकदाही तो वाद भरकटला नाही.

दुसरे उदाहरण सध्या ऐसी अक्षरे साइटवर आहे. हा बाफ पाहा.

म्हणजे मग प्रत्येक चर्चा ही शामळू, कमालीच्या पॉलिटिकल करेक्टनेस ने लिहीलेल्या अळणी पोस्ट्स मधूनच व्हावी का? तर तसे अजिबात नाही. धारदार पोस्टी वाचायलाही मजा येते. दुसर्‍याच्या पोस्टची खिल्ली उडवणेही चूक नाही. विडंबन बिनधास्त असावे. पण हे सगळे जे पोस्ट बद्दल. आयडी किंवा व्यक्तीबद्दल नाही. नाहीतर मग तो आयडी/ती व्यक्ती ते बॅगेज पुढे महिनोन्महिने बाळगून कर्मा मधल्या उस थप्पड की गूँज सारखे बाहेर काढत राहते Happy

मी स्वतः वाचनमात्र असते नेहमी. फक्त ठराविक धाग्यांवरच प्रतिसाद देते. इथे एक सुचवावे असं वाटलं म्हणून हा प्रतिसाद..
राजकीय विषय किंवा चालू घडामोडी वरील धागे सार्वजनिक न करता फक्त ग्रूप सभासदांसाठी मय्रादीत केले तर....? म्हणजे आता नवीन बदलानुसार ज्यांना नकोत असे धागे ते मग येणार नाहीत. फक्त ग्रूप सभासद.!

माबो वर प्रत्येक गोष्टीची चर्चा केली जाते.
त्यात राजकरण,चालू घडामोडी इ. सुध्दा आलचं.
कधीकधी चर्चेच रुपांतर वादात होत असलं तरी त्यावर वेमा यांचे लक्ष असत आणि ते तशी सूचना सुध्दा देतात.
चालू घडामोडी ची मी सदस्य आहे, पण मी फक्त वाचते..
खूप वेळा त्या चर्चा वाचून नवीन काही माहित पडतं.
आणि जिथे दोन विचारसरणीची माणसं असतात तिथे वाद होणे स्वाभाविक आहे.
त्यामुळे चर्चा वाढत जाते.. आणि ज्यांना रस नाही त्यांना ते इरिटेटिंग वाटते.
पण यासाठी तिथे असणार्या सदस्यांना रिकामटेकडे,पडीक असे बोलणे योग्य नाही.

Bs,
अशी सूचना मी स्वतः अडमीन ना कमीत कमी 2 वेळा केली होती,
पण त्यांनी तसे केले नाही,
पण आता आलेल्या नवीन सोयी मुळे थोड्या बहुत प्रमाणात तोच इफेक्ट मिळणार आहे.

फारेंड, काही बाबतीत सहमत, काही मध्ये नाही, थोड्या वेळात लिहितो.

राजकीय विषय किंवा चालू घडामोडी वरील धागे सार्वजनिक न करता फक्त ग्रूप सभासदांसाठी मय्रादीत केले तर....? म्हणजे आता नवीन बदलानुसार ज्यांना नकोत असे धागे ते मग येणार नाहीत. फक्त ग्रूप सभासद.!

याबद्दल सहमत. एक 'राजकीय आखाडा' काढून द्यावा व तो फक्त ग्रुप सभासदांसाठी असावा. सार्वजनिक नको. आणि मग टीव्ही मालिका, क्रिकेट, लाईफस्टाइल वगैरेवर कोणी राजकीय वळण देत असेल तर ते allow करू नये.

राजकीय विषय किंवा चालू घडामोडी वरील धागे सार्वजनिक न करता फक्त ग्रूप सभासदांसाठी मय्रादीत केले तर....? म्हणजे आता नवीन बदलानुसार ज्यांना नकोत असे धागे ते मग येणार नाहीत. फक्त ग्रूप सभासद.!

>>>>>>
तसे केले तर हा अन्याय होईल.
चालू घडामोडी म्हणजे राजकीय गुर्हाळे नाहीत.
किंवा मग राजकीय चर्चा असा वेगळा ग्रूप काढावा आणि एखादा चालू घडामोडीमधील धागा त्या वळणावर जाऊ लागल्यास राजकीय चर्चा ग्रूपमध्ये हलवून ग्रूपपुरता मर्यादीत करावा.

म्हणजे मग प्रत्येक चर्चा ही शामळू, कमालीच्या पॉलिटिकल करेक्टनेस ने लिहीलेल्या अळणी पोस्ट्स मधूनच व्हावी का? तर तसे अजिबात नाही. धारदार पोस्टी वाचायलाही मजा येते. दुसर्‍याच्या पोस्टची खिल्ली उडवणेही चूक नाही. विडंबन बिनधास्त असावे. पण हे सगळे जे पोस्ट बद्दल. आयडी किंवा व्यक्तीबद्दल नाही. नाहीतर मग तो आयडी/ती व्यक्ती ते बॅगेज पुढे महिनोन्महिने बाळगून कर्मा मधल्या उस थप्पड की गूँज सारखे बाहेर काढत राहते
>> फा, तुमचे हे म्हणणे अगदी पटले. माझा अनुभव सांगतो. माझे जालावर वास्तव्य हे उणेपुरे तीन वर्षांचे आहे. साधारण २०१४ नोव्हेंबर पासून मी मराठी संस्थळांवर आहे. त्याआधी फेबुवर होतो. मोदींसाठी प्रचंड कॅम्पेनिंग केलेले (ऑनलाइन्/ऑफलाइन). मी आकृष्ट झालो त्याला मूळ कारण ह्या चांगल्या चर्चा, प्रश्न-उत्तरे, नवीन अनुभव, वेगळे अनुभव ऐकणे, सांगणे ह्या सगळ्या गोष्टी. पण नंतर नंतर जेव्हा मी मोदी-भाजप वर टिका करायला लागलो (जी मी अशीच कॉंग्रेसवरही करायचोच) तर अचानक समर्थकांची भाषाच बदलली. ती विखारी टोकदार होऊ लागली. त्याला आधी मी फार बिचकलो होतो. कारण सामान्यपणे हीच ती लोकं होती जी आधी अतिशय मायेने, मित्रत्वाने वागत होती.

मोदीविरोधक म्हटल्यावर अगदी जिथे अ'राजकिय धागा आहे तिथेही कॉर्नरिंग करणे, खिल्ली उडवणे प्रकार होऊ लागलेत. हे प्रकार अराजकिय असले तरी डुख धरुन हल्ला केल्यासारखेच असतात. मुद्देसूद अभ्यासपूर्ण चर्चा, आकडेवारी, तर्कशुद्ध विचार या सर्वांची कितीही उधळण करा, कोणी त्याला साधी पोचही देत नाही. धडधडीत सत्यही मान्य करणे तर सोडाच. समर्थकांतर्फे पूर्वी आकडेवार्‍या वगैरे यायच्या पण त्याचे धिंडवडे निघायला लागल्याने फक्त नेम कॉलिण्ग आणि विश्वासहनन करण्याचे सुनियोजित उद्योग सूरु झाले आहेत.

जालावर राजकिय चर्चांत भाग घेणारी सभासद संख्या फार मोजकी आहे. त्यात सरकारतर्फे प्रोपगंडा प्सरवण्यासाठी पेड लोक प्रचंड प्रमाणात पेरलेली आहेत. अशावेळेस सामदामदंडभेद पद्धतीने खोट्या प्रचाराचा फुगा फोडत राहून भारतीय जनतेला वस्तुस्थितीबद्दल जाणीव करुन देणे आवश्यक आहे. किमान दुसरी बाजू तरी समोर ठेवणे हे प्रचंड पैसा ओतून चालवल्या जाणार्‍या मशिनरीसमोर अतिशय हिमतीचे, व तितकेच भयंकर कठीण काम आहे. शेवटी राजकिय पक्ष येत जात राहतात, जनता इथेच राहते, तिला जे प्रश्न भेडसावतात ते पुढे येत राहिले पाहिजेत. तेच महत्त्वाचे आहे.

गेल्या सहा महिन्यात मी इथे भाजपसमर्थकांतर्फे फक्त विरोधकांची खिल्ली उडवणारे धागे बघितले आहेत, कमेन्ट्स बघितल्या आहेत. पण आवाहन करुनही भाजप समर्थकांकडून ते भाजपला समर्थन का करतात याचे कोनतेही धागे-प्रतिसाद आलेले नहीत, ना कोणत्याही योजनांबद्दल माहिती, आकडेवारी, अभ्यासपूर्ण कमेण्ट्स आलेल्या नाहीत. मला अशा धाग्यांवर चर्चा करायची आहे, माझी मते मांडायची आहेत.

पण होतंय काय तर भाजपसमर्थक फक्त राहूल आणि कंपनीची रोज खिल्ली उडवण्याचा धंदा उघडून बसल्यासारखे राहूलकाँग्रेस-एके-राहूलकॉंग्रेस करतात. पाहिलं तर त्या मुद्द्याला काहीही अर्थच नाही.

मोदी-भाजप सत्तेत आहेत तर त्यांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर ज्या प्लॅटफॉर्मवर शक्य होईल तिथे जनजागॄती करत टिका करण्याचा लोकशाही देशचा नागरिक म्हणून मला अधिकार आहे. जो मी कॉण्ग्रेस सत्तेत असतांनाही बजावला आहे. (तेव्हा असे विखारी समर्थक नव्हते म्हणा).

मला तर समर्थकांच्या मानसिकतेची चिंता वाटते. ते इतके वाहवून गेले आहेत की देअर इज नो पॉइन्ट ऑफ रिटर्न.

असो.

बाकीच्यांचे मला माहित नाही. माझ्याबाबतीत मात्र मी एक खात्री देऊ शकतो की जर सरकारसमर्थक नीट आकडेवारी, अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद चर्चा करायला तयार असतील तर मी ही एका बोटावर तयार आहे.

इथे एक अभ्यासपूर्ण प्रतिसाद लिहायचा तर खायचे काम नसते. निरनिराळ्या बातम्या शोधून काढणे, त्यांच्यामागच्या बातम्या, आजूबाजुच्या बातम्या शोधणे, कनेक्टींग द डॉट्स करणे, आकडेवारी अभ्यासणे, त्यांच्यामागचे अर्थ, सरकारी अजेंडे, बाबूशाही अजेंडे, पक्षीय अजेंडे, मिलीभगत, मिडियाची चालूगिरी, अनेकविध प्रकारची माहिती शोधून प्रोसेस करणे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी चर्चा करणे, त्यांच्याकडून आलेली मते तपासून पाहणे, ती सातत्यपूर्णतेने एकसारखी आहेत की कालसापेक्ष, पक्षसापेक्ष, व्यक्तिगत फायदातोटा सापेक्ष आहेत का ह्याचा अभ्यास करणे, प्रचाराच्या पलिकडे जाऊन बघणे, जनमानसाचा अभ्यास करणे, प्रत्यक्ष लोकांमध्ये फिरुन माहिती गोळा करणे, मागचे अनुभव, व्यक्तिगत ज्ञान याचा उपयोग करणे. हे सर्व करावेच लागते. अन्यथा दुसर्‍या प्रतिसादात प्रतिपक्ष अभ्यासपूर्ण धिंडवडे काढू शकतो. (अर्थात काढायचे असेल तरच, आजकाल फक्त खिल्ली उडवायचेच उद्द्योग चालू आहेत)

हे सर्व करुन कोणी आपले मत मांडत असेल आणि त्याला खाली केवळ ख्या ख्या करणारे, हुल्लडबाजी करणारे प्रतिसाद येत अस्तील आणि त्यावर इथले सभ्य, सुसंस्कृत, भद्रपणा व डेकोरम ची चाड असणारे, त्याची इच्छा धरणरे सदस्य काहीच अ‍ॅक्शन घेणार नसतील तर राजकिय धागे ह्या फक्त गटारगंगाच होऊन राहतील. व ही इतरत्रही पसरत जाऊन घाण होईलच.

यात प्रशासकांचे काम मोठे असले तरी सभासद म्हणून सगळ्यांच्या जबाबदार्‍या आहेतच. त्या ओळखून सहभाग दिलात तर मायबोली वर यावेसे वाटत नाहीहो असे अरण्यरुदन करायची गरज उरणार नाही असे मला वैयक्तिक वाटते.

मेगाबाईटी निबंधासाठी क्षमस्व.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आय डी उडवला जाणे ह्या गोष्टीला काहीही अर्थच नाही. त्या सदस्याला दुसरा आय डी अगदी सहज मिळतो. असा दुसरा आय डी अधिकाधिक किती वेळा मिळावा ह्याला बंधन नाही. वीस, तीसवेळाही नवीन आय डी मिळू शकतो असे एक उदाहरण आत्ताच अस्तित्वात आहे. सर्वात पहिला आय डी गेल्यानंतर 'मेलेले कोंबडे आगीला भीत नाही' ह्या न्यायाने नवीन आय डी घेऊन बेताल प्रतिसाद देणे, हीन दर्जाची टीका करणे, हाराकिरी मोडमध्ये जाणे ह्याचे काही वाटेनासे होते.

कोणी जर भाषेतील आक्रमकता आणि विखार ह्यांचे वर्गवारी केली तर हे सहज लक्षात येईल की ज्या सदस्यांचे मूळ आय डी उडवले गेलेले आहेत (व त्यांनी नवीन घेतलेले आहेत) त्यांचेच प्रतिसाद अतीव आक्रमक आणि विखारयुक्त असतात. जे अजूनही मूळ आय डी चालवत आहेत ते त्या लेव्हलला जाताना दिसत नाहीत.

ही जी लेव्हल, जिच्यामुळे हा धागा काढण्यास (बहुधा) धागाकर्ते प्रवृत्त झाले असावेत, ती प्रशासनाने सतरा वेळा उडवलेल्या आय डींकडून सातत्याने वापरली जाते. वरवर दिसायला असे दिसते की ती लेव्हल प्रत्येकजणच गाठत आहे. पण तसे नसतेच. चंद आय डी च त्या पातळीचा सातत्याने वापर करतात. हे चंद आय डी अमर्याद पुनर्जन्मांचे वरदान मिरवत असतात.

मग काय? तुम्हाला वैताग येत असला तर वैतागा!

दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या चर्चांवर मी नेहमी लिहायचो की ज्यांना हे वाचायचे नाही त्यांनी वाचू नये व आपापले धागे काढावेत किंवा वेगळ्या विषयावरचे चांगले धागावेत. पण नंतर डोळे उघडले. 'क्रीडाक्षेत्राबाबतचे दोन प्रश्न' ह्या मी खरोखर शंकानिरसनासाठी काढलेल्या धाग्याला तातडीने राजकीय रंग दिला गेला व तोही इतक्या सहजपणे की मी आता असे म्हणणे, की मला खरोखर शंकानिरसन करून घ्यायचे होते, हे कोणाला पटणारही नाही. देवयानी हॉस्पीटल ह्या नवीन हॉस्पीटलची माहिती देणारा धागा मी काढला त्यावर अत्यंत जहरी जातीय टीका करण्यात नेहमीचेच सदस्य आघाडीवर होते.

योग ह्यांची कळकळीची विनंती मला पटली नाही ह्याचे कारण माझ्यापुरतए वेगळे आहे. ह्या चर्चा जिवंतपणा टिकवून ठेवतात म्हणून त्या होत राहाव्यात. पण तेवढेच अवतारकार्य असल्याप्रमाणे काहीजण वावरतात हे पटत नाही.

फारेंड ,तुम्ही म्हणता ते काही अंशी बरोबर आहे,

पण हा फेनोमेनो बहुतांशी हार्डकोर कट्टा आणि अड्डा वरील मर्यादित सदस्यांतच दिसून येतो,
पण गुनेहगारोंकेभी उसुल होते है, या वाक्य प्रमाणे एकमेकांच्या , नॉन राजकीय लेख, गझल, कविता प्रकारांवर काही गोंधळ घातला जात नाही, झालेच तर एखाद्या वाक्यात कौतुकच होते, हे पुराव्याने दाखवता येईल,
दोन्ही बाजूने जे काही टोमणे असतात ति त्या राजकीय धाग्यापूरते मर्यादित असतात, दुसऱ्या राजकीय धाग्यांवर मागच्या धाग्याचा संदर्भ नक्की दिला जातो, पण त्या बाहेर नाही.
नेहमीची गिर्हाइके सोडता मला वाटत नाही कोणी डूख धरून परत काही ऐकवले असेल.
सो थप्पड की गुंज वगैरे ठराविक सदस्यांसाठी खरे आहे (आणि ते सभासद धागे बॅन करा वगैरे अजिबात म्हणत नाहीयेत) ,हे id धागे बॅन करा, म्हणून मागणी करत आहेत त्यांना असा अनुभव आला असेल का?याची मला शंका आहे.

त्यामुळे राजकीय भांडणांवरून दोन्ही पार्ट्या वातावरण (नॉन राजकीय / नॉन सामाजिक लेख , साहित्य) खराब करत आहेत हा आरोप मला अजिबात मान्य नाही.

>>>>पण गुनेहगारोंकेभी उसुल होते है, या वाक्य प्रमाणे एकमेकांच्या , नॉन राजकीय लेख, गझल, कविता प्रकारांवर काही गोंधळ घातला जात नाही, झालेच तर एखाद्या वाक्यात कौतुकच होते, हे पुराव्याने दाखवता येईल,<<<<

तुम्ही जितके पुरावे द्याल त्यातील एकाला पाच अशी 'नॉन राजकीय धाग्यांवर गोंधळ घातल्याची' उदाहरणे माझ्याकडे आहेत व ते धागे माझेच आहेत. गोंधळ घालणारे आय डी हे 'राजकीय विरोधक'च आहेत हेही दिसेल.

Pages