युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डार्क कलर टॉप व्हाइट लेगिंग्ज व ओढ्णी बरोबर सुन्दर दिसेल. त्याच्या गळपट्टीवर पांढर्‍या रंगाने व सोनेरी रंगाने बॉर्डर करता येइल. तशीच बाहीला पण करायची. बरोबर पर्लचे लोंबते कानातले घालायचे. नाजूक दिसेल.

सुपरमार्केट मधून आणलेले बटन मश्रूम्स कसे टिकवायचे?

फ्रीज मधे ठेवलेले दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाहीत.रंग बदलतो लगेच्.अगदी Pack उघड्लेला नसला तरी.

Deep Freezer मधे ठेवले तर टिकतील ५-६ दिवस? का अजून काही करावे लागेल?

लवकर त्या दिवशी संपविले तर बरे. मशरूम धुवायच्या नसतात असे कुठेतरी वाचले होते. मार्गदर्शन करा जाणकार.

एकदा मसाला भाजी करावी. दुसरे सँडविच फिलिन्ग बनवून ते फ्रीज करावे व वापरून टाकावे. पास्ता मध्ये पण घालून टाकता येइल.

डीप फ्रीझरमध्ये ठेवल्यास टेक्स्चर खराब होईल.

कॉटनचा ड्रेसचा रंग न जाण्यासाठी काय करावे?
किंवा असा कोणता कॉटन कपड्याचा प्रकार आहे का ज्याचा रंग अजिबात जात नाही?

हसरी कॉटन कपडा गार पाण्यात मीठ घालुन बुडवुन ठेवावा चार तास मग धुवुन वाळत घालावा.

मी ४ दिवसाच्या ट्रिपसाठी तिखटमिठाच्या पुर्‍या करुन नेल्या होत्या. चौथ्या दिवशीच त्या खराब झाल्या. केल्यावर गार करुन फॉईलमध्ये गुंडाळल्या होत्या. इकडे हवाही फार गरम नाहीये.

टिकाऊ पुर्‍यांसाठी युक्ती सुचवा.

अदिती, तुमचा प्रश्न "माझं काय चुकलं?" मध्ये असायला हवा होता..:)
बाकी जाणकार प्रश्नाचं उत्तर देतीलच..

सखी मश्रुम ताजेच खायचे असतात. जास्त दिवस वापरायचे नसतील तर टिन आणलेला चांगला.
आदिती, खराब झाल्या म्हणजे काय झाले ? बुरशी आली का ?
एकतर त्या पुर्‍यांचे पिठ घट्ट भिजवावे लागते. शिवाय लाटल्यावर थोड्या वार्‍यावर पसरुन वाळवून मग तळायच्या असतात. बुरशी आली असेल, तर कुठेतरी पाणी लागले वा राहिले असे असेल.
पुर्‍या फॉईलमधे गुंडाळण्यापेक्षा एखाद्या हवाबंद डब्यात ठेवायला हव्या होत्या.
खवट झाल्या का ? तेल खराब वा एकदा वापरलेले असेल तर असे होईल.
आंबल्या का ? शक्यता कमी आहे, कमी तळल्या गेल्या असतील.
या पुर्‍या तळल्यावर डब्यात भरण्यापुर्वी त्या पुरत्या खुसखुशीत झाल्या आहेत का ते बघावे. मऊ वा तेलकट असू नयेत. तसेच वरुन थोडे मीठ भुरभुरावे.

सेल्फ रायझिंग फ्लोअर वापरुन, भटुरे छान होतात. हे तळायची गरज नसते, भाजले तरी चालतात (अर्थात भाजल्यावर ट्म्म फूगत नाहीत.)

सेल्फ रायसिंग फ्लार वापरुन पॅनकेक्स, भाज्यांची धिरडी करता येतात.

पॅनकेक्स सोबत बनाना स्लाईसेस, कॅरॅमल सॉस आणि फेटलेल क्रिम किंवा फ्रेश स्ट्रॉबेरीज आणि आईसक्रिम मस्त लागेल - न्याहारी/ब्रेफा किंवा ब्रंच म्हणुन मस्त Happy

धिरड्यांसाठी मिश्र पिठांबरोबर सेल्फ रे फ्लार वापरले तर धिरडी हलकी आणि जाळीदार होतात.

मस्तच आयडीया आहे भटुरे, धिरडे आणि पॅनकेक्स ची!! धन्यवाद दिनेश आणि लाजो ! मी मोठ्ठा पॅक आणला आहे सगळचं करता येईल!

हो ग मनु, धन्स! आजच मी नान करुन पाहीले. मस्तच झाले. ब्रेड कसा करायचा? तुझ्याकडे आहे का रेसीपी?

अग आपले पदार्थ विचारलेस ना..मी ते वाचलेच नाही Happy
मग जिलेबी, गुबा, खाजा(बालुशाही) होतील की. आपला पदार्थ नाही पण बिस्कीटे,पाय सुद्धा होतील.

ब्रेड मी लिहिली आहे मी इथेच, देते शोधून.

कुणी फ्रोजन पोळ्या ट्राय केल्या आहेत का? (रोटी , पराठा , नान नाही. पोळ्याच) असतील तर एखादा चांगला ब्रँड सुचवू शकाल का? जवळच्या देसी ग्रोसरीतल्या फ्रेश पोळीच्या नावाखाली मिळणार्या पोळ्या नाही आवडल्या कुठल्याच. येता आठवडा बिझी आहे खूप. साग्रसंगीत सगळा स्वयपाक करणं कठीण आहे.

प्रॅडी
फ्रोझन नाही केल्या कधी , पण जवळच्या देसी ग्रोसरी मधल्या ताज्या पोळ्या वेगवेगळ्या झिपलॉक मधे फ्रीज मधे ठेवल्या तर आठवडाभर चांगल्या रहातात . कॉस्ट्कोमधे पण रोटी मिळायच्या त्याही चांगल्या होत्या. पण त्या कच्च्या असायच्या अन तव्यावर भाजून घ्यायला लागायच्या. २-३ महिन्यांपूर्वीपर्यंत आणल्या आहेत त्या. ( आता आई इथे आहे ना Happy )

देसी दुकानात फ्रोझन पोळ्या अजिबात चांगल्या मिळत नाहीत. पराठे चांगले असतात. पण कॅलरीज लै. काहीच नाही जमले तर होल फूडमधला व्हीट टॉर्टिया चांगला लागतो. पोळीसारखा एक-एक बाजू भाजून घेतली तर छान टम्म फुलतो. तूप लावून खायचा. मात्र डब्यात नाही नेऊ शकत. वात्तड होतो.

मी ट्राय केल्या होत्या फ्रोजन पोळ्या. टुक्कार लागतात एकदम. त्यापेक्षा देसी दुकानातल्या ताज्या पोळ्या पुष्कळ बर्‍या लागतात. मी कवा/ दीप ट्राय केल्या होत्या. कवा बर्‍या त्यातल्या त्यात. पिल्सबरीच्या मावेमध्ये होणार्‍या पण मिळतात असं ऐकुन आहे, मला नाही दिसल्या कधी पटेलमध्ये.

रोटी लँड कॉस्टको.
दीप चे गव्हाचे पराठे , मेथी पराठे, मसाला पराठे.
(ताज्या चपात्याशी कंपेअर न करता हे ब्रँड मला बरे वाटले.)

रोटी लँड आवडल्या होत्या पण अपॅरेंटली अटलांटाच्या कॉस्टको मधे मिळत नाही. ( कॅलिफोर्नियाच्या कॉस्टको मधे भारावून गेले होते अगदी नानकची रसमलाई , हल्दीराम स्नॅक्स, रोटीलँडच्या रोटीचं सँपलिंग वगैरे बघून.) एकूण फ्रोजन पोळ्यांचा ऑप्शन चांगला नाही असं दिसतंय. बघते मग देसी ग्रोसरीतून फ्रेश पोळ्याच आणीन. (आलीया भोगासी..) धन्यवाद सगळ्यांना.

प्रॅडी, कवन च्या पोळ्या चांगल्या वाटल्या मला. पिल्सबरीच्या मायक्रोवेवेबल पोळ्या छान मऊसुत वगैरे असतात पण आकार लहान असतो. फुलकेच पण तेही पातळ.. त्यामुळे फार खावे लागतात...
बाकी रोटीलँडच्या पोळ्या त्यातल्या त्यात जास्त आवडल्या मलाही.. सद्ध्या तोच सहारा आहे मला.. (पूर्वी कॉस्कोमध्ये मिळायच्या या, परंतू आता आम्ही इंडीयन स्टोअर मधूनच आणतो..)

बाकी दीपबिप काही आणू नकोस.. आम्ही एकदा असंच ट्राय करायला प्रत्येक ब्रँडची पोळ्यांची पाकीटं आणलेली त्यातून काढलेला हा निष्कर्श आहे..

पिल्सबरी च्या मावे मध्ये करण्याच्या आहेत चांगल्या.मऊसूत असतात. अजून एक कॅनेडिअन ब्रँडच्या मिळतात आमच्या इथे. त्या छान आहेत. आकाराने पण मोठ्या आणि मावेमध्ये गरम करता येतात. घरी गेले की नाव सांगते.

Pages