फुलांचे प्रकाशचित्रण

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

डिजीटल कॅमेरे बाजारात आल्यापासुन प्रकाशचित्रणाच्या प्रांतात येक प्रकारे क्रांतीच झाली. डिजीटल कॅमेरात असलेली प्रीव्ह्यू ची सोय आणि त्यामूळे लगेच रिझल्ट्स यामूळे प्रकाशचित्रण करणं खुप सोप्प झालय असं सग्ळ्यानाच वाटु लागलं. मायबोलिवर सुद्धा गुलमोहरवर प्रकाशचित्रांचे अमाप पिक आलं. बहुतेक प्रकाशचित्र फुलांची. त्यात काही जणांची प्रकाशचित्र अतिशय सुंदर असतात तर बहुतेकांच्या छायाचित्रात त्याच त्या चुका दिसतात. मी स्वतः फारसं प्रकाशचित्रण करीत नसलो तरी येकेकाळी तो माझा येक खुप आवडता छंद होता. तेव्हा जमा केलेली काही प्राथमिक माहीती आणि अनुभव इथे कदाचित उपयोगी पडेल म्हणुन हा लिखाणाचा प्रपंच.

आज कितिही ईमेज स्टॅबिलाईझिंग तंत्र आली तरि ट्रायपॉड ला पर्याय नाहीये म्हणुन आपला हात जर स्टेडि नसेल तर येक ट्रायपॉड घ्यावाच. फ्लॉवर फोटोग्राफी मधे बहुतेकदा आपण क्लोजअप्स आणि मॅक्रो वर काम करतो यात मुळातच डेप्थ ऑफ फिल्ड खुप कमी आणि त्यातुन हात जरा जरी हलला तरी फोटो बिघडतो.

फुलं सुंदर दिसतात म्हणुन आप्ण त्यांचे फोटो काढतो पण त्या फुलांमधे आपल्याला नक्की काय आवडलय, त्यात फोकल पॉईंट काय आहे याचा थोडा विचार करायला हवा. कधी आपल्याला येखाद्या फुलाचा आकार आवडतो, तर कधी त्याचा तर कधी रंग तर कधी त्याचा लांब देठ.
त्या सब्जेक्ट प्रमाणे ठरवायला हव कि फ्रेम लँडस्केप कि पोर्ट्रेट ठेवायची, आपण सगळ जग लँड्स्केप मोड मधे बघतो म्हणुन बहुतेकदा लँड्स्केप फ्रेम हा बहुतेक वेळेला पहिला चॉईस असतो पण जर येखादी वेल किंवा फुलझाड पोर्ट्रेट फ्रेम मधे ही सुंदर दिसु शकते.
sadafuli.jpg

पहिला नियम म्हणजे हा फोकल पॉईंट जो काहि असेल तो अगदी मध्यभागी नसावा. कंपोझिशन चा रुल ऑफ थर्डस इथेही लागु होतो. त्यानंतर बघायला हव की कंपोझिशन किती टाईट हवे कि त्या फुला भोवती अजुन जागा सोडायला हवी. जी जागा सोडतोय ती नक्की कुठे आणि किती सोडायची याचा ही विचार व्हायला हवा उदा. जर येखाद्या फुलाचा मधला भाग /पुकेसर हा फोकल पॉईंट असेल तर टाईट फ्रेम सुंदर वाटेल, दोन तीन फुलांचा समुह असेल किंवा एखादि वेल असेल तर आजु बाजुला थोडि मोकळी जागा सोडली तर ती वेल , फुलांना थोडी जागा दिल्या सारखं वाटेल. ती मो़कळि जागा शक्यतो वेल किंवा फुलांच्या वाढीच्या दिशेने / समोरिल भागात असावी. जर ती फ्रेम फुला च्या मागच्या भागत रीकामी ठेवली तर कदाचीत अनाकर्षक दिसेल. फुलांचा ताटवा असेल तर अगदी मोकळं आकाश सुद्धा फ्रेम मधे सुंदर दिसते.

जेव्हा आपण अवती भवती मोकळी जागा सोडतो तेव्हा येक धोका संभवतो तो म्हणजे प्रकाश चित्रा चा पार्श्वभाग अनाकर्षक किंवा चित्राला मारक ठरु शकतो. उदा. सब्जेक्ट मागे उन्हा चे कवडसे, तीरेप असेल आणि ती ओव्हर एक्स्पोज झाली तर चित्रात हॉट स्पॉट दिसतील, DoF जास्त होऊन चित्रात नको असलेली पानं किंवा फांद्या शार्प दिसतील, आणि अगदीच वाईट म्हणजे कुठे मागे सुकत घातलेले कपडे, वायर्स, कुंड्या किंवा इतर ओब्जेक्ट्स फ्रेम मधे येतील. हे सगळं टाळणं सहज शक्य आहे. उदा. नको असलेली फुलं, सुकलेली फुल तोडता येतात, येखादी नको असलेली फांदी बाजुला सारु शकतो, किंवा आपण स्वतः बाजुला होउन अँगल बदलुन बघु शकतो. DoF कमी करुन मागचा भाग ब्लर करु शकतो.
डिजीटल कॅमेरा मधे प्रिव्ह्यु असल्याने या सगळ्या अ‍ॅडज्स्ट्मेंट सहज करता येतात.
मागे अगदीच क्लटर असेल तर सरळ काळा कपडा बॅक्ड्रॉप म्हणुन वापरा
m.jpg

प्रकाश चित्रणात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लाईट ची क्वालीटी. दुपारच्या रखरखीत प्रकाशात, किंवा डायरेक्ट लाइट मधे काढलेले फोटो फ्लॅट येतात म्हणुन शक्यतो फोटो सकाळी, रिप्फ्लेक्टेड लाइट वापरुन काढावेत, अगदी दुपारी फोटो काढायचे झालेच तर छत्री किंवा आणि कसली तरी साऊली सब्जेक्ट वर धरावी.
1.jpg

शक्यतो फ्लॅश चा वापर टाळावा पण अगदीच टाळता येत नसेल तर कमीत कमी प्लॅश समोर अ‍ॅक्रेलीक किंवा थोडा सेमिट्रांस्परन्ट पेपर पकडुन लाईट डिफ्युज करावा ज्यामुळे शॅडो कास्ट होणार नाहित.
_MG_2681.jpg

डिजीटल कॅमेराचि एक्स्पोजर लॅटीट्युड कमी ( फिल्म कॅमेरा पेक्षा) असते त्या मुळे एक्स्पोजर थोड चुकल तरी रंग वेगळे दिसतात, प्रत्येक कॅमेरा प्रमाणे आणि मीटरींग मेथड प्रमाणे एक्स्पोजर बदलत असलं तरी डिजीटल साठी ज्या भागत जास्त प्रकाश असेल तीथे रीडींग घ्यावं , तुमचा कॅमेरा जर ब्रॅकेटींग सपोर्ट करत असेल तर त्याचा ही वापर करावा. सफेद फुलांचे , लाल फुलांचे फोटो घेताना बर्‍याचदा प्रॉब्लम होतो. शक्य असेल तर सफेद फुला मागे येखादा सफेद कपडा /कागद पकडुन एक्ष्पोजर रिडींग घ्या नंतर तो कागद काढुन टाका आणि आधिच्या रिडिंग प्रमाणे फोटो काढा,
lily.jpg

लाल फुलां ऐवजी बाजुच्या हिरव्या पानांचं रिडींग घ्या, एक ते दोन स्टॉप अंडर एक्स्पोज करा, लाल रंग व्यवस्थीत येईल, अर्थात जर तुम्ही मॅनुअल मोड मधे काम करायला सुरुवात केलित तर हे ठोकताळे आपोआप जमतील.
red.jpg

अजय अतिशय उपयुक्त आणी सुंदर माहीती. Happy सगळे फोटो पण अप्रतिम. तो गुलाबाचा मागेच टाकला होतास तू. सहीच आहे. शेवटचा मात्र आवडला नाही मला.

आपण खरच एकदा ठरवून फोटो काढायला जाऊया कुठेतरी म्हणजे आणखी मार्गदर्शन मिळेल. Happy

~~~~~~~~~~~~
हे बघा. http://www.maayboli.com/node/6346
~~~~~~~~~~~~

खूप छान माहिती.
-----------------------------------------
- सक्षम दळवी

अजय तुमचे अनेकाअनेक धन्यवाद...

जो विषय कोणीतरी सुरू करावा असे माझ्या मनात आले, अगदी त्याच क्षणी हा लेख आला...

खरे तर प्रकाशचित्र मध्ये 'फुलांचे प्रकाशचित्रण' वाचुन मी लगेच उघडले नाही. म्हटले फोटो नंतर पाहु आरामात...

त्याच वेळी मला असे फोटो काढता का येत नाही, कोणी मार्गदर्शन करेल का? असा विचारही आला. आपणच बाफ उघडून या विषयाला वाचा फोडावी असेही वाटले, पण कोणी लक्ष देईल न देईल.. कोण एवढा वेळ घालवणार?

शेवटी आता फोटो पाहुच म्हणुन क्लिक केले, आणि आनंदाश्चर्याचा धक्काच बसला...... आनंद अगदी गगनात मावेनासा झाला... परत एकदा धन्यवाद... अजुन माहिती दिलीत तर दुधात साखरच...

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

छान लेख रे अजय! Happy
(याची लिन्क मी दुसर्‍यान्ना पाठवली!)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

छान लेख Happy पुढ्च्या लेखाची उत्सुकता आहे.

छान माहिती, आवडली.
एक शंका विचारते, तिसर्‍या फोटोबद्दल. मागे एकदा, तुम्ही असा एकाच रंगाचा फोटो काढू नये असं सांगितलं होतंत, लिंक सापडली तर देईन, तर ह्या फोटोत रंगारंगातही फरक आहे, म्हणून असा काढू शकतो का?

अजय, माहितीबद्दल धन्यवाद.
फोटो अप्रतीम आहेत. या विषयावर अधिक बोलण्याकरता तुम्हाला भेटायलां नक्की आवडेल.
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

खूप सुरेख धागा सुरू केला आहेस अजय....

शक्य असेल तर बाकीच्या वस्तूंच्या छायाचित्रणाबद्दल पण माहिती लिहिणार का?
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

लिहाय्च्या आधि साशंक होतो पण प्रतिक्रिया बघुन बरं वाटंलं, धन्यवाद, काही वर्षांपुर्वी प्रकाशचित्रणावर छान चर्चा व्हायची इथे ती या निमित्ताने परत सुरु झाली तर या लेखाचा हेतु साध्य झाला असे वाटेल.
किरु- तुम्ही बोरिवलिकर म्हणजे आपण नक्किच भेटु शकतो Happy
ITgirl- मागे मी लिहल होत ते पॅटर्न ब्रेक करण्या बद्दल, या फोटोतही जर येखाद फुल थोड्या वेगळ्या रंगाचं असतं तर छान वाटल असत, हा फोटो दुपारी सावलीत काढ्लाय आणि त्यामुळे सॉप्फ्ट लाईट कसा मिळवायचा याच उदाहरण म्हणुन टाकलाय .
हिम्सकुल- मला जेव्हढ येतं तेव्हढ नक्किच लिहु शकेन पण त्यावर चर्चा होउन धागा पुढे गेला पाहिजे

अच्छा अजय, धन्यवाद. ह्याच फोटोबद्दल जरा विस्ताराने लिहिता का? वर तुम्ही म्हटलय ना की काहीतरी सावली धरावी अश्यावेळी, हा फोटो काढतेवेळी धरली होतीत का? सावलीत काढला आहे हे म्हटलच आहे, पण विस्तारात वाचायला आवडेल.

गुलांबांचय फोटोंसाठी काय सेटींग्ज वापरलीत तेही सांगाल का? मला तसा प्रयोग करायचा आहे.

हो , हो सांगा , मी पण करुन बघणार आहे तो प्रयोग Happy
-----------------------------------------
- सक्षम दळवी

अजय,खूप उपयुक्त अशी माहीती दिलीत तुम्ही !

छान झालाय लेख ...तुम्ही इथे उदाहरणादाखल टाकलेले सगळेच फोटो 'क्लास्' आहेत Happy

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

गुलांबांचय फोटोंसाठी >>>
आयटे, त्याने Reverse Lense चा प्रयोग केला होता बहुतेक. त्याची लिंक पण टाकली होती. अजय, चुकीची माहीती देत असल्यास दुरुस्त कर. Happy

ITgirl- तो फोटो दुपारि काढला होता (केरळ मुन्नार) आणि सावली साठी न्युजपेपर वर धरला होता.
बरोबर kp गुलाबाचा फोटो लेंस रिव्हर्सल ने काढला होता ( लेंस उलट माऊंट केली की मॅक्रो लेंस बनते) त्या साठी रेडी अ‍ॅडाप्टर मीळतात
http://www.camray.us/index.php?option=com_products&task=list&id=57
बँगलोरला शेतला कॅमेरा मधे अशा अ‍ॅक्सेसरीज मीळू शकतील असं वाट्ते

मी वापरतो तो अ‍ॅडाप्टर स्वतः बनवलाय आणि मी आधी इथेच त्याची माहिती लिहली होती http://www.maayboli.com/node/1115

धन्यवाद अजय, केपी. बंगलोरला पाहीन मी अजय.

अरे इतका छान लेख कसा काय नजरेस पडला नव्हता माझ्या, अजय लेख खूप आवडला. असे माहितीपूर्ण लेख अजुन लिहा, आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल Happy

एकदम मस्तच लेख.
डिजिटल कॅमेरा १०१ असा एक लेखपण लिहा. मला तरी फार गरज आहे त्याची.

ajai भारीच लेख लिहलाय तुम्ही. खुपच माहितीपुर्ण आहे.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

ajai छानच लेख लिहलाय तुम्ही. खुपच माहितीपुर्ण आहे. अशी टेक्निकल माहिती नसल्यामुळे बरीचसी प्रकाशचित्रे वाया जात होती,आता थोडी कल्पना आली. धन्यवाद! Happy

चांगली माहिती दिलीत अजय Happy

छानच लेख अजय. मी फोटो काढताना कधी इतका शास्त्रशुद्ध विचार करत नाही, पण मला वाटते केला तर जरा बरे फोटो काढू शकेन.

अप्रतिम फोटो आणि उपयुक्त माहीती, आज डीजीटल कॅमेरे आल्याने अतिच फोटो काढले जातात, पण "चांगले" फोटो कसे काढावे ह्यावर लीहीलेल्या ह्या लेखाची गरजच होती.
धन्यवाद.
वाचकांना जर आपले फोटो इथे टाकायला सांगुन ते कसे अधीक चांगल्या प्रकारे काढ्ता येतील ह्यावर सल्ला दिल्यास उद्बोधक ठरेल.

लेख छानच आहे. नविन डिजीटल कॅमेरा घेताना काय काळजी व काय माहिती घ्यावी, याबद्दलही एकदा लिहाल तर बरे!

मी तर लेख वाचायला सुरुवात केली आणि ते विसरुन सगळे फोटोच बघत बसलो आधी.
लेख आणि फोटो दोन्ही छान. Happy

अजय.. मस्त लेख... तुम्ही अगदी बेसिक concepts पासून सुरुवात होणारा लेख लिहू शकाल का?
e.g. apperture settings, exposure, shutter speed, modes इ. चा फोटो वर काय आणि कसा परिणाम होतो?? किंवा कोणत्या background वर काय सेटींग वापरावीत etc..
मला स्वत:ला फोटॉ काढून ते नंतर फोटोशॉप मधे एडीट करण्यापेक्षा मुळातच चांगले आलेले फोटो आवडतात.. त्यामुळे ह्या टिप्स तुम्ही देऊ शकालात तर खूप उपयोगी पडेल....
तुम्हाला लेख टाईप करण्याची अडचण असेल वेळेअभावी वगैरे अआणि तुम्ही मला हस्तलिखित किंवा स्कॅन केलेल्या स्वरूपात लेख दिलात तर मी टायपिंगच काम करायला तयार आहे.. Happy

>>Chaoo-वाचकांना जर आपले फोटो इथे टाकायला सांगुन ते कसे अधीक चांगल्या प्रकारे काढ्ता येतील ह्यावर सल्ला दिल्यास उद्बोधक ठरेल.
-- गुलमोहर चा येक हेतु कदाचीत हाच आहे, तीथल्या प्रतिक्रिया देताना छान, मस्त च्या पलिकडे जाऊन दिल्या जाव्यात Happy
>>Rajaa- नविन डिजीटल कॅमेरा घेताना काय काळजी व काय माहिती घ्यावी,
-- राजा अशा वेळी मी माझ्या google नावाच्या मित्राची मदत घेतो पण काही गोष्टी लिहतो इथेच
१. पॉईंट अँड शुट , प्रोज्युमर कि डीएसएलआर- कॅमेरा नक्की कशा साठी वापरणार आहोत, आपलं फोटोग्राफिच ज्ञान किती आहे आणि आपण किती वेळ देउ शकतो त्या प्रमाणे या तीन प्रकारा पैकी येक कॅमेरा प्रकार निवडावा लागेल. जर फक्त कॅज्युअल स्नॅप शॉट्स घ्यायचे असतील तर P/S चालुन जाईल, थोडे सिरियस असु तर दुसर्‍या प्रकार चा कॅमेरा कारण हल्ली त्यात ही बरेच मॅन्यूअल क्रीएटीव कंट्रोल आलेत आणि खरच जर ललित कला म्हणुन फोटोग्राफी करायची असेल तर डीएसएलआर , अर्थात बजेट महत्वाचे कारण ईथे कॅमेरा बॉडी पेक्षा लेन्सेस वर जास्त खर्च होईल
२.मेगा पिक्सेल- हल्ली खुप कमी फोटोज प्रींट केले जातात आणि बहुतेक प्रिंट्स ८x१२ च्या पढे नसतात त्यामूळे याने काही फरक पडत नाही,
३.पहिल्या दोन प्रकारात ले कॅमेरे घेतले तर ऑप्टीकल झुम ची रेंज ( वाईड ते झुम दोन्ही बघुन घ्या) आपल्या गरजे प्रमाणे आहे कि नाही ते बघा, कारण बहुतेक कॅमेरे फिक्स लेंस वाले असतात, साधारण ३ x पर्यंत झुम सगळ्या सिच्युएशन साठी सफिशंट आहे आणि हल्ली बहुतेक कॅमेरे या पेक्षा जास्त झुम देतात. ऑप्टिकल आणि डिजीटल झुम मधे गल्लत करु नका.

डीएसएलआर घेत असाल तर मात्र तुमच्या गरजे प्रमाणे लेंसेस घ्याव्या लागतील, कीट लेंस घ्यायची की त्यात आणि पैसे टाकुन अजुन कोणत्या लेंसेस घ्यायच्या ते ठरवावे लागते. आपल्या कड्च्या जुन्या लेंसेस वापरता येणार आहेत का तेही बघाव लागतं
४.LCD size- प्रिव्हु चा कंपोझिषन मधे खुप फायदा होतो त्या मुळे हल्लि लार्ज साईज LCD वाले कॅमेरा आलेत ते काहि जण प्रिफर करतात
५. ISO range/shooting modes/macro/close up mode/white balance, manual controls , card type , battery इत्यादी कम्पेअर करुन स्पेक्स आणि बजेट प्रमाणे तीन चार मॉडेल्स शॉर्टलिस्ट करा, त्यानंतर त्यांचे रिव्ह्यु बघा. ( मित्रांचे फिड बॅक टाळा कारण आपला कॅमेरा मस्त आहे असं प्रत्येक जण सांगेल Happy ), नेट वर कुठे टेस्ट शॉट्स असतील तर बघा
६. आणि सगळ्यात महत्वाचे- दुकानात जाऊन स्वतः कॅमेरा हाताळा, त्याचे वजन हँडलींग, कंट्रोल्स ची पोझीशन, मेन्यु नेव्हिगेशन किती सहज आहे ते बघा, वेगवेग्ळ्या झुन लेंथ, ISO सेटींग्ज, लो लाईट, वेगळे वेगळे मोड यामधे टेस्ट शॉट्स घ्या, ते LCD वर झुम करुन रिझल्ट्स पहा, खास करुन नॉईज, डिस्टोर्शन, कलर रेंडरींग. आणि जर समाधान झाले असेल तर कॅमेरा घ्या.

>>Adm- तुम्ही अगदी बेसिक concepts पासून सुरुवात होणारा लेख लिहू शकाल का?
e.g. apperture settings, exposure, shutter speed, modes इ. चा फोटो वर काय आणि कसा परिणाम होतो?? किंवा कोणत्या background वर काय सेटींग वापरावीत etc..
- खर तर ही माहीती सहज उपलब्ध आहे तरीही मायबोलिवर येका जागी ही माहीती असावी म्हणुन लिहीन काही दिवसांनी

खूप आधी मायबोलीवर प्रकाशचीत्रांवर खूप उपयुक्त चर्चा व्हायची. त्यातून बरेच शिकायला मिळायचे. maverick नावाचा id खूप मस्त माहिती द्यायचा. त्याचे फोटो पण उच्च असायचे! अजय तुमचा लेख त्याच तोडीचा आहे. फोटो आणि त्याखाली त्यात वापरलेले तंत्र असे दिलेत तर अधीक माहीती मिळेल.

Pages