फुलांचे प्रकाशचित्रण

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

डिजीटल कॅमेरे बाजारात आल्यापासुन प्रकाशचित्रणाच्या प्रांतात येक प्रकारे क्रांतीच झाली. डिजीटल कॅमेरात असलेली प्रीव्ह्यू ची सोय आणि त्यामूळे लगेच रिझल्ट्स यामूळे प्रकाशचित्रण करणं खुप सोप्प झालय असं सग्ळ्यानाच वाटु लागलं. मायबोलिवर सुद्धा गुलमोहरवर प्रकाशचित्रांचे अमाप पिक आलं. बहुतेक प्रकाशचित्र फुलांची. त्यात काही जणांची प्रकाशचित्र अतिशय सुंदर असतात तर बहुतेकांच्या छायाचित्रात त्याच त्या चुका दिसतात. मी स्वतः फारसं प्रकाशचित्रण करीत नसलो तरी येकेकाळी तो माझा येक खुप आवडता छंद होता. तेव्हा जमा केलेली काही प्राथमिक माहीती आणि अनुभव इथे कदाचित उपयोगी पडेल म्हणुन हा लिखाणाचा प्रपंच.

आज कितिही ईमेज स्टॅबिलाईझिंग तंत्र आली तरि ट्रायपॉड ला पर्याय नाहीये म्हणुन आपला हात जर स्टेडि नसेल तर येक ट्रायपॉड घ्यावाच. फ्लॉवर फोटोग्राफी मधे बहुतेकदा आपण क्लोजअप्स आणि मॅक्रो वर काम करतो यात मुळातच डेप्थ ऑफ फिल्ड खुप कमी आणि त्यातुन हात जरा जरी हलला तरी फोटो बिघडतो.

फुलं सुंदर दिसतात म्हणुन आप्ण त्यांचे फोटो काढतो पण त्या फुलांमधे आपल्याला नक्की काय आवडलय, त्यात फोकल पॉईंट काय आहे याचा थोडा विचार करायला हवा. कधी आपल्याला येखाद्या फुलाचा आकार आवडतो, तर कधी त्याचा तर कधी रंग तर कधी त्याचा लांब देठ.
त्या सब्जेक्ट प्रमाणे ठरवायला हव कि फ्रेम लँडस्केप कि पोर्ट्रेट ठेवायची, आपण सगळ जग लँड्स्केप मोड मधे बघतो म्हणुन बहुतेकदा लँड्स्केप फ्रेम हा बहुतेक वेळेला पहिला चॉईस असतो पण जर येखादी वेल किंवा फुलझाड पोर्ट्रेट फ्रेम मधे ही सुंदर दिसु शकते.
sadafuli.jpg

पहिला नियम म्हणजे हा फोकल पॉईंट जो काहि असेल तो अगदी मध्यभागी नसावा. कंपोझिशन चा रुल ऑफ थर्डस इथेही लागु होतो. त्यानंतर बघायला हव की कंपोझिशन किती टाईट हवे कि त्या फुला भोवती अजुन जागा सोडायला हवी. जी जागा सोडतोय ती नक्की कुठे आणि किती सोडायची याचा ही विचार व्हायला हवा उदा. जर येखाद्या फुलाचा मधला भाग /पुकेसर हा फोकल पॉईंट असेल तर टाईट फ्रेम सुंदर वाटेल, दोन तीन फुलांचा समुह असेल किंवा एखादि वेल असेल तर आजु बाजुला थोडि मोकळी जागा सोडली तर ती वेल , फुलांना थोडी जागा दिल्या सारखं वाटेल. ती मो़कळि जागा शक्यतो वेल किंवा फुलांच्या वाढीच्या दिशेने / समोरिल भागात असावी. जर ती फ्रेम फुला च्या मागच्या भागत रीकामी ठेवली तर कदाचीत अनाकर्षक दिसेल. फुलांचा ताटवा असेल तर अगदी मोकळं आकाश सुद्धा फ्रेम मधे सुंदर दिसते.

जेव्हा आपण अवती भवती मोकळी जागा सोडतो तेव्हा येक धोका संभवतो तो म्हणजे प्रकाश चित्रा चा पार्श्वभाग अनाकर्षक किंवा चित्राला मारक ठरु शकतो. उदा. सब्जेक्ट मागे उन्हा चे कवडसे, तीरेप असेल आणि ती ओव्हर एक्स्पोज झाली तर चित्रात हॉट स्पॉट दिसतील, DoF जास्त होऊन चित्रात नको असलेली पानं किंवा फांद्या शार्प दिसतील, आणि अगदीच वाईट म्हणजे कुठे मागे सुकत घातलेले कपडे, वायर्स, कुंड्या किंवा इतर ओब्जेक्ट्स फ्रेम मधे येतील. हे सगळं टाळणं सहज शक्य आहे. उदा. नको असलेली फुलं, सुकलेली फुल तोडता येतात, येखादी नको असलेली फांदी बाजुला सारु शकतो, किंवा आपण स्वतः बाजुला होउन अँगल बदलुन बघु शकतो. DoF कमी करुन मागचा भाग ब्लर करु शकतो.
डिजीटल कॅमेरा मधे प्रिव्ह्यु असल्याने या सगळ्या अ‍ॅडज्स्ट्मेंट सहज करता येतात.
मागे अगदीच क्लटर असेल तर सरळ काळा कपडा बॅक्ड्रॉप म्हणुन वापरा
m.jpg

प्रकाश चित्रणात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लाईट ची क्वालीटी. दुपारच्या रखरखीत प्रकाशात, किंवा डायरेक्ट लाइट मधे काढलेले फोटो फ्लॅट येतात म्हणुन शक्यतो फोटो सकाळी, रिप्फ्लेक्टेड लाइट वापरुन काढावेत, अगदी दुपारी फोटो काढायचे झालेच तर छत्री किंवा आणि कसली तरी साऊली सब्जेक्ट वर धरावी.
1.jpg

शक्यतो फ्लॅश चा वापर टाळावा पण अगदीच टाळता येत नसेल तर कमीत कमी प्लॅश समोर अ‍ॅक्रेलीक किंवा थोडा सेमिट्रांस्परन्ट पेपर पकडुन लाईट डिफ्युज करावा ज्यामुळे शॅडो कास्ट होणार नाहित.
_MG_2681.jpg

डिजीटल कॅमेराचि एक्स्पोजर लॅटीट्युड कमी ( फिल्म कॅमेरा पेक्षा) असते त्या मुळे एक्स्पोजर थोड चुकल तरी रंग वेगळे दिसतात, प्रत्येक कॅमेरा प्रमाणे आणि मीटरींग मेथड प्रमाणे एक्स्पोजर बदलत असलं तरी डिजीटल साठी ज्या भागत जास्त प्रकाश असेल तीथे रीडींग घ्यावं , तुमचा कॅमेरा जर ब्रॅकेटींग सपोर्ट करत असेल तर त्याचा ही वापर करावा. सफेद फुलांचे , लाल फुलांचे फोटो घेताना बर्‍याचदा प्रॉब्लम होतो. शक्य असेल तर सफेद फुला मागे येखादा सफेद कपडा /कागद पकडुन एक्ष्पोजर रिडींग घ्या नंतर तो कागद काढुन टाका आणि आधिच्या रिडिंग प्रमाणे फोटो काढा,
lily.jpg

लाल फुलां ऐवजी बाजुच्या हिरव्या पानांचं रिडींग घ्या, एक ते दोन स्टॉप अंडर एक्स्पोज करा, लाल रंग व्यवस्थीत येईल, अर्थात जर तुम्ही मॅनुअल मोड मधे काम करायला सुरुवात केलित तर हे ठोकताळे आपोआप जमतील.
red.jpg

खूप छान माहिती!!

अजय, तो गुलाबाचा फोटो क्लास आलाय. मी कॉपी करून घेऊ??
--------------
नंदिनी
--------------

ह्या मध्ये एस एल आर कॅमेर्‍यांचे लेन्स बदलता येतात, म्हणजे, वेगवेगळी झूम लेन्सेस, मायक्रो वगैरे.. पण एकतर हे कॅमेरे आकाराने मोठे असतात. किंमतीने महाग असतात, वेगळी लेन्सेस खरीदावी, संभाळावी लागतात. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे, लेन्स बदलताना, आत धुळ वगैरे गेली तर साफ करायला बराच खर्च येतो. तेव्हा, अगदीच गरजेचे असेल तरच एस एल आर घ्यावा.
आज कॅनन एस एक्स ११० आय एस सारखा पी एस कॅमेरा पंधरा हजाराच्या आसपास मिळतो. छोटा आकार, भरपुर झुम, (१०एक्स) असंख्य बदलता येण्याजोगी फंक्शन्स.., इतर कंपन्यांचीसुद्धा अशीच मॉडेल्स आहेत. डिजीटल कॅमेर्‍यांचे आयुष्य थोडक्याच वर्षांच असल्याने आणी पुना: विकताना मातीमोल कींमत मिळत असल्याने खर्च करताना विचार केलेला बरा नाही का?
कॅनन एस एक्स १०० आय एस ने काढलेला फोटो सोबत जोडतो आहे.
image0001.jpg

Chaoo- तुमच म्हणंण बरचस खरं आहे, म्हणुनच मी वर लिहलं होतं की आपल बजेट, फोटोग्राफिची गरज यावर कॅमेराची निवड ठरते, सुरुवात अशा कॅमेराने केली आणि फोटोग्राफीत आणि काही करावसं वाट्लं तर तुम्हाला PS camera ची लिमिटेशन्स लक्षात येतील,
दोन ठळक फरक १. सेंसर साईज- पीएस मधे जी झुम मीळते ती खुप छोट्या सेंसर साईज मुळे उदा. SX 110 IS १० x झुम 36-360mm (35mm equiv) लेंस खर तर ६- ६० mm आहे, सेंसर साईज मुळे हा क्रॉप फॅक्टर येतो, Noise performance मधला फरक सुद्धा कॉम्प्यूटर मॉनीटर वर एन्लार्ज करुन पाहिल्यावर लक्षात येईल ( एन्ट्री लेवल DSLR ला सुद्धा क्रॉप फॅक्टर असतो पण पिएस पेक्षा त्यांचा सेंसर मोठा असतो) अर्थात आप्ल्याला रेग्युअल्र स्नॅप शॉट्स घ्यायचे असतील तर आजचे पीएस उत्त्म रिझल्ट्स देतात, आणि त्यात टेक्नॉलॉजीकल प्रगति होतच राहाणार आणि कदचीत काही दिवसात डि एस एल आर आणि पी एस चा पर्फोरमन्स अगदी सारखा असेल
२. डी एस एल आर च्या लेंस बदलता येत असल्या मुळे फोटो च्या गरजे प्रमाणे चेंज करुन हवे तसे रिझल्ट्स मिळवता येतात , उदा. प्राईम लेंस ने घेतलले फोटो आणि झुम लेंस ने घेतलेला फोटो ( बाकी सगळी सेटींग सेम ठेउन) काढला तर फरक लगेच लक्षात येईल. तसेच जर केमेरा बॉडिचा माऊंट सेम असेल तर बॉडी चेंज केल्या नंतर सुद्धा या लेंस वापरता येतात ( investment protection Happy )

शेवटी Man behind machine matters more than machine , दोन्ही प्रकारच्या कॅमेराने सुंदर फोटोमेकींग करणारे आहेतच

छान

फोटो उत्तम.

सही रे! अजून पूर्ण वाचलं नाहिये, पण तरीही ....'पाहून' बरं वाटलं. Happy

परागकण

क्रॉप फॅक्टर आणि Noise performance म्हणजे काय??

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

Ashbaby- Crop factor थोड कठीण आहे समजावणं पण शक्य तितक सोप्प करुन लिहतो
डिजीटल च्या आधि फिल्म कॅमेरात ३५ mm ची फिल्म वापरली जायची , डीजीटल मधे फिल्म ऐवजी वेगवेगळे सेंसर वापरले जातात, जर डिजीटल चा सेंसर साइज ३५ mm असेल तर तो झाला फुल फ्रेम कॅमेरा, उदा. Canon 5 D mark II ची effective सेंसर साईज 36 x 24 mm आहे म्ह्णजे हा झाला फुल फ्रेम कॅमेरा, बहुतेक Entry level DSLR चा सेंसर साईज आणि छोटा असतो उदा. चनोन ४५० D , sensor size 22.2 x 14.8mm , म्हणजे फुल फ्रेम वर आणि या कॅमेरावर जर एकाच फोकल लेंथ ने फोटो काढले तर ४५० D वर इमेज साधारण ४० % crop होइल किंवा दुसर्‍या शब्दात १.६ Times जास्त झुम मिळेल
तेच जर Point and shoot digital मधे बघितलं तर सेंसर आणि खुप छोटा असतो आणि क्रॉप फॅक्टर वाढतो

Noise performance - हे समजावण आणि थोड कठीण आहे,
सेंसर (CCD\CMOS) त्यावर पडणारा प्रकाश अ‍ॅब्सॉर्ब करतात आणि त्याप्रमाणे इमेज प्रोड्युस करतात, प्रत्येक सेंसर ची लिमिटेशन असतात आणि त्याप्रमाणे पडणारा प्रकाश आणि रिप्रोडक्शन यात फरक पडतो हा फरक म्हणजे नॉईज, जसा सेंसर छोटा होतो तशी ही टॉलरन्स रेंज कमी होत जाते आणि खासकरुन लो लाईट फोटो मधे हा नॉइज ग्रेंन्स च्या रुपात दिसतो

ह्म्म.. मला कळले थोडे थोडे...

डिजी ने रात्री काढलेल्या फोटोंवर कधीकधी ग्रेंन्स पाहिलेत मी.. विशेषतः विडिओ मोड मध्ये.
लो शटर स्पीड ठेऊन रात्री फोटो काढला तर Noise performance कमी होईल का?
लो शटर स्पीड अजुन कधी कधी वापरायचा?

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

शटर स्पीड आणि एकंदर एक्स्पोजर बद्दल नंतर वेगळा लेख लिहिन

कोणी................केले म्हणून आपण बोलुन दाखवायच नसत.......

अजय, सुंदर लेख नी प्रश्नोत्तरे...मराठीतून अशा टेक्निकल बाबी मिळणे अवघड...
अजून येऊ द्या

अजय - सुरेखच लेख - शेवटचा प्रश्ण मलाही होता - लाल रंगांच्या फुलाबद्दल.
तो जमेल तसा प्रयत्न करुन बघेन !!

पाटील, इथे काहीजण फोटोग्राफीबद्दल खूप चांगली माहिती देतात. तुम्ही त्यातलेच एक.

वरचे तुमचे फोटो अफाट आहेत. मला स्वतःला फोटोग्राफीचं ज्ञान नाही. शिकायची इच्छा खूप आहे व फुलांचे प्रकाशचित्रण करायला खूप आवडतं, पण तरीही तुम्ही वर लिहिलेलं सगळं कळलं नाहीये. कारण खूप टेक्निकल भाषा वाटतेय. Sad

पाटील बुवा खूपच उपयुक्त माहीती...खूप खूप धन्यवाद...
माझ्या निवडक १० मध्ये...
मला एक शंका अशी आहे की वेलीवरचे उंचावरच्या फुलाचा फोटो काढायचा आहे. फुलाच्या जवळ जाणे शक्य नाही आणि ट्रायपॉडही नाही. अशा वेळी जास्तीत जास्त चांगला फोटो येण्यासाठी काय खबरदारी घ्यावी?

नमस्कार, अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेख. हातात डी एस् एल् आर आल्याबरोबर क्लिकत सुटणार्‍या माझ्यासारख्याना एखादा फोटो (चुकून) आला तरीही त्यामागचं कारण कळत नाही.

किरुबरोबर तुम्हाला भेटायला आवडेल. मागे जिप्सीशी बोलणं झाल्याप्रमाणे एखादं वर्कशॉप घेता येईल का ? म्हणजे ज्यांना जमेल ते सगळे कुठेतरी भरपूर फोटो काढता येतील अश्या ठिकाणी भेटू. एकाच सब्जेक्टचे फोटो काढू त्यावर चर्चा करु. आमच्यासारख्यांना भरपूर शिकता येईल.

कॅनन डी ३५० (रिबेल एक्स टी) ने ऑटो मोडमध्ये काढलेला फोटो डकवतो आहे. योग्य नसल्यास जरुर सांगा, उडवून टाकेन. फोटो काढताना सर्वात प्रथम डोळ्यात भरला तो फुलाचा रंग, म्हणून असा फोटो काढला

Sadafuli.jpg

Pages