मायबोली गणेशोत्सव २०१७ - भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम - "मायबोली ज्युनियर मास्टरशेफ"

Submitted by संयोजक on 18 August, 2017 - 12:31

"मायबोली ज्युनियर मास्टरशेफ"

दर वर्षी आई बाबांसाठीच का म्हणून पाककला स्पर्धा?
तर छोट्या दोस्तांनो, या वर्षी तुम्हालाही आहे मास्टरशेफ बनायची संधी!!

jrmastechef.jpgउपक्रमाचे स्वरूप :
रंगीबेरंगी भाज्या, फळं वापरून तुम्हाला नाविन्यपूर्ण आणि दिसायलाही सुंदर अशी सॅलड्स बनवायची आहेत.
अथवा
तुम्हाला स्वतःला जमेल अशी कोणतीही पाककृती बनवली तरी चालेल.

तुमच्या पाककलेचा आविष्कार बघण्यास आम्ही आणि बाप्पा पण उत्सुक असणार आहेत!
चला, लावा तर मग तुमची कल्पनाशक्ती कामाला!

उपक्रमाचे नियम:

१) हा बच्चेकंपनीसाठीचा उपक्रम आहे. ही स्पर्धा नाही.
२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आयडीनेच भाग घ्यायचा आहे. मायबोलीकरांच्या नातेवाइकांच्या / मित्रमंडळींच्या पाल्यांना यात सहभागी व्हायचे असल्यास त्यांच्या पालकांना प्रथम मायबोलीचे सभासद व्हावे लागेल .
४) या उपक्रमासाठी वयोमर्यादा १८ वर्षांपर्यंत आहे.
५) सुरी, गॅस इ. वापरताना सुरक्षिततेच्या कारणास्तव पालकांनी मदत केलेली चालेल.
६) पाककृती / सॅलड शाकाहारी असावे.
७) तयार पदार्थाचे / सॅलडचे प्रकाशचित्र अनिवार्य आहे. पदार्थ बनवतानाच्या प्रत्येक पायरीचे प्रकाशचित्र असेल तर उत्तम.
८) प्रवेशिका ' पालकाचा मायबोली आयडी - ज्युनिअर मास्टर शेफ <पदार्थ> - पाल्याचे नाव ' या पद्धतीने द्यावी.
प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे.
९) 'मायबोली गणेशोत्सव २०१७' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
१०) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१७ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
११) प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून, २५ ऑगस्ट २०१७ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, ५ सप्टेंबर २०१७ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) ) पाठवता येतील.
१२) एकाहून अधिक पाककृती द्यायच्या असल्यास प्रत्येक पदार्थासाठी वेगळी प्रवेशिका पाठवावी.
१३) प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती इथे मिळेल.
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या सुट्ट्या असल्याने पदार्थ आत्ताच (पुढच्या ४-५ दिवसांत) करून मग २५ नंतर प्रवेशिका पाठवली तरी चालेल ना?

सध्या सुट्ट्या असल्याने पदार्थ आत्ताच (पुढच्या ४-५ दिवसांत) करून मग २५ नंतर प्रवेशिका पाठवली तरी चालेल ना? >> नक्कीचं चालेल.

थोडा हेल्थ थोडा जंक प्रकार चालेल का?सॅलड मध्ये बिस्कीट किंवा नाचो?
पूर्ण सॅलड आमचे पात्र स्वेच्छेने बनवेल अशी आशा नाही.
स्वतः आयडीया देऊन नुसतं एकसिक्युट करण्यात विशेश अर्थ वाटणार नाही

थोडा हेल्थ थोडा जंक प्रकार चालेल का?सॅलड मध्ये बिस्कीट किंवा नाचो? >> शाकाहारी आणि अल्कॉहॉल रहित एवढेच नियम आहेत.
या नियमात बसणारी बिस्किटे / नाचोज चालतील .