मायबोली गणेशोत्सव २०१७ - भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम - "रंगरंगोटी"

Submitted by संयोजक on 18 August, 2017 - 12:11

नमस्कार मायबोलीकर, सालाबादप्रमाणेच यंदाही मायबोलीकरांच्या पाल्यांसाठी सादर करत आहोत एक उत्साहपूर्ण उपक्रम "रंगरंगोटी!"
rangrangoti.png

रंगरंगोटी - नावातच सर्व आलं ना? चित्रं काढायला आणि रंगवायला मोठ्या मुलांनाही आवडते हे लक्षात घेऊन यंदा वयोमर्यादा वाढवली आहे तसेच मुलांना स्वतः चित्र काढायचे स्वातंत्र्यही आहे! तर दोस्तांनो, घ्या हातात आपले ब्रश, पेन्सिली, स्केच पेन्स, रंगाच्या बाटल्या. आपला गणेशोत्सव रंगीबेरंगी करून टाका आणि तुम्हीही मनसोक्त रंगून जा रंगात!!

उपक्रमाचे नियम:
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
३) कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आय डीनेच भाग घ्यायचा आहे.
४) वयोगट - १८ वर्षां खालील मुला मुलींसाठी.
५) उपक्रमाचे स्वरूप :
संयोजकांनी खाली दिलेले चित्र छापून रंगवणे.
अथवा
पाल्याने स्वतःच चित्र काढून रंगवणे. चित्र गणपतीशी / गणेशोत्सवाशी संबंधित असावे, बस्स इतकाच नियम!
अथवा
इंटरनेट वरून चित्र घेऊन रंगवले तरी चालेल. मात्र इंटरनेटवरून वा इतर कुठून चित्र घेतल्यास ते प्रताधिकार मुक्त आहे याची शहानिशा करुन मगच ते वापरावे.

६) चित्रं पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता २५ ऑगस्ट रोजी खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
७) 'मायबोली गणेशोत्सव २०१७' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
८) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१७ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
९)प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती इथे मिळेल.
१. लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
२. पिकासा ते मायबोली फोटो देणे.
९) प्रवेशिका "रंगरंगोटी- पाल्याचे नाव" या नावाने द्यावी. एका आयडीकडून एकाहून अधिक प्रवेशिका चालतील.
१०) चित्रं गणेश चतुर्थीपासून, २५ ऑगस्ट २०१७ (भारतीय प्रमाण वेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, ५ सप्टेंबर २०१७ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.

रंगवण्यासाठीचे चित्रः (सौजन्य- मॅगी)

Runner Bappa_0.jpg

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. Happy
प्रवेशिकांवर संख्येचं बंधन आहे का? (आमची पाल्य आणि आम्ही फारच रंगात यायची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून चौकशी. Proud )

अठरा वर्षाखालील.... गेल्या वर्षी तरी ठेवायचे होते हे.. भाग घेतला असता.. यंदा एकोणविसावे लागले Wink
येलिजेबल कॅन्डीडेट्सना शुभेच्छा Happy

मस्त! आमच्या 2 भावी माबोकरांना विचारते त्यांना भाग घ्यायचा आहे का.

>>> 'मायबोली गणेशोत्सव २०१७' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.

हे कुठे दिसेना मला?

सभासद होण्याची मुदत उलटून गेली का ?

'मायबोली गणेशोत्सव २०१७' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
>>>>>>> निळ्या शब्दांवर टिचकी मारली तर 'सामील व्हा' कुठेच दिसेना Uhoh

आबा मायबोली गणेशोत्सव २०१७ या निळ्या शब्दांवर टिचकी मारल्यावर उजव्या बाजूला बाप्पाच्या फोटोखली तुम्हाला Subscribe to group असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा मग सामिल व्हा हा ऑप्शन दिसेल त्यावर टिचकी मारल्यानंतर तुम्ही मायबोली गणेशोत्सव २०१७ या ग्रुपचे सदस्य व्हाल्/सदस्यत्व मिळेल...

मला माहीत नाही पण... मी आत्ता अस करून पाहिल तर होतयं..
१) त्या चित्रावर लेफ्ट क्लिक करा मग open image in new tab वर क्लिक करा ..इमेज दुसर्या विंडो मधे ओपन होईल ..मग प्रिंट घ्या...
print हा ऑप्श्न तुम्हाला स्क्रिनच्या उजव्या बाजूला कोपर्यात ३ . (डॉट)एकाखाली एक आहेत ते ...त्या वर क्लिक करा म्हणजे प्रिंट हा पर्या य दिसेल ..

मी मायबोली गणेशोत्सव २०१७ ग्रुपचा सभासद आहे पण "रंगरंगोटी" उपक्रमात चित्र समावेश कस करायचा ते कळत नाही.

याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१७ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत). >>>>>>>>>>>. पण मी गणेशोत्सव २०१७ ग्रूप उघडला तर 'नवीन लेखनाचा धागा', गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्यायच दिसत नाहीत.