'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल' केस ** नव्या संधीसह

Submitted by हायझेनबर्ग on 17 August, 2017 - 11:50

** नव्या संधीबद्दल जाणून घेण्यासाठी केस वाचून झाली असल्यास दुसर्‍या पानावरचा माझा बोल्ड टाईपमधला प्रतिसाद बघा.
https://www.maayboli.com/comment/4105365/edit

दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल

वसंत ऋतू येण्यास अजूनही दोन महिने बाकी असतांना सलग सहा दिवस आणि सहा रात्री आजिबात ऊसंत न घेता पडणार्‍या बर्फाने पर्वतराजीचा ईंचनईंच व्यापला होता. गुडघाभर खोल बर्फातून बाहेर डोक्यावणार्‍या शिळांच्या मागून लांब सुळे आणि करारी नजरेचा सायबेरिअन वाघ झडप घालेल की काय? पाईनच्या ऊंच झाडांमधून गर्जना करत एखादे ग्रिझली अस्वल पाठलागावर येईल की काय? ह्या पर्वतभर अथांग पसरलेल्या बर्फाच्या समुद्रात कुठे साधे खुट्टं वाजले तरी प्रचंड लाट येईल की काय? लाखो वर्षे पृथ्वीला श्वेतनरक बनवून वेठीस धरणारे हिमयुगच परतून आले आहे की काय?
प्रथमदर्शनी कुणालाही असे प्रश्नं पडून एक भयप्रद शिरशिरी त्याच्या मानेवरून ओघळण्याआधी, हा एकवीसाव्या शतकातल्या मनुष्यप्राण्यांच्या जीवनातला एक साधारण दिवसच असावा ह्याची साक्ष देणारा एकमेव पुरावा त्या पर्वतराजीत दिमाखात ऊभा होता. नजर जाईल तिथवर बर्फ लेवून अथांग पसरलेल्या पाईन वृक्षांच्या समुद्रात नांगर टाकून स्तब्धं ऊभ्या सोन्याच्या गलबतासारखे, दुरून बघणार्‍याला हिमगौरीच्या चंदेरी मुकुटावरचे लखाखते सोनेरी रत्नंच भासावे असे 'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल'

8.jpg

घड्याळातली कुठलीही वेळ कायम दिवस रात्रीच्या सीमारेषेवरंच पिंगा घालत असावी ईतपतंच ऊजाडणार्‍या जानेवारीतल्या कडक हिवाळ्याच्या अनेक दिवसांपैकीच तो एक दिवस होता ज्यादिवशी मि. अँड मिसेस ऑस्ट्री चार वाजताच्या शेवटच्या केबल कार ने हॉटेल बुखारेस्ट मध्ये दाखल झाले. पर्वताच्या पायथ्याशी गराज मध्ये गाडी पार्क करून बुखारेस्ट मध्ये येण्यास केबल कार हा एकमेव पर्याय होता. केबल कार आणि सहा मजली बुखारेस्टच्या भोवती ऊभारलेल्या वीस फुटी दगडी भिंतीबाहेर ठेवलेले कुठलेही पाऊल तुमचे ह्या पृथ्वीवरचे शेवटचे असू शकते ह्याची ग्वाहीच जणू बर्फाचा कणनकण ओरडून देत होता.
त्या दगडी भिंतींच्या आड दडलेले हॉटेल बुखारेस्ट मात्रं ह्या पृथ्वीवरचा क्षणनक्षण स्वर्गीय आहे ह्याची हमी देत असावे. विक्टोरिअन काळाची साक्ष देत तीस फुटी ऊंच छताला लटकणारे तीन पुरुष ऊंचीची झुंबरं, संपूर्ण छतावर अप्रतिम नजाकतीने रेखाटलेली ग्रीक देवतांची प्रणयदृष्ये, अनवाणी पायांना गुदगुल्या करणारी मखमली कारपेट, नुकतीच कात टाकून सूर्यप्रकाशात सळसळत झेपावणार्‍या सर्पांसारखे दोन्ही बाजुंनी वर झेपावणारे जिने, सोन्याचा मुलामा दिल्यासारख्या वाटाव्यात अश्या चहूबाजूंच्या भिंती, आणि गूढसे मंद संगीत. जणू दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल म्हणजे ईंद्राची मयसभा, ह्या मयसभेतील एकेक व्यक्ती म्हणजे ईंद्र आणि शची आणि त्यांची बडदास्तं सुद्धां तशीच स्वर्गीय. खर्‍या स्वर्गात बसून पृथ्वीचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळत रहाण्यासाठी मानवाने बनवलेली खिडकी म्हणजे 'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल'.

12.jpg20.jpg

विक्टोरिअन काळातला चेहरा असला तरी हॉटेल, प्रत्येक मजल्यावरती प्रशस्तं आणि भव्य स्वीट्स, जकुझी पासून अल्ट्रा लक्झुरी किचन पर्यंत, बिग स्क्रीन टीव्ही, हजारो चॅनल्स, साऊंड सिस्टिम, सुपरफास्ट ईंटरनेट, अविरत फोन सेवा, लायब्ररी, सिनेमा थिएटर, हीटेड स्वीमिंग पूल, जिम, छोटेसे हॉस्पिटल आणि गरज पडल्यास हेलिकॉप्टर अश्या यच्चयावत सुविधा, सुरक्षा आणि मनोरंजनासाठीच्या अत्याधुनिक तंत्रांनी सुसज्ज होते.
हॉटेल बुखारेस्ट जसे स्वर्गीय होते तसेच अभेद्य देखील. बाहेर निसर्गाने सहा महिने कितीही तांडव केले, कितीही मोठा संहार मांडला तरी बुखारेस्ट मध्ये राहणार्‍या पाहुण्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही की त्यांना कशाची ददात पडणार नाही. एकदा का हॉटेलचे मेन गेट संध्याकाळी सहा वाजता बंद झाले की साधा बर्फातला ऊंदीरही आतून बाहेर जाऊ शकणार नाही की बाहेरून आत येवू शकणार नाही.

पण ऑस्ट्री दांपत्यासाठी, ज्याचे वैभव बघून हुरळून जावे असा कोपरा वा ज्या वस्तूने डोळे दिपावे असे काहीही दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल मध्ये नव्हते. हॉटेलमधला कोपरा न कोपरा आणि वस्तू न वस्तू मागच्या बारा वर्षात त्यांच्या परिचयाची झाली होती. प्रत्येक वर्षीच्या हिवाळ्याचे तीन महिने स्कॉटलंडमधल्या बिझनेस एंपायरच्या धकाधकीपासून लांब हॉटेल बुखारेस्ट मध्ये आरामात घालवण्याचा त्यांचा नेम बारा वर्षांपासून आजही न चुकता चालू होता. वैभव म्हणावे तर त्यांचे स्वतःचे स्कॉटलंड मधले राहते घर हॉटेल बुखारेस्टमधल्या वैभवापेक्षा कांकणभर वरचढंच वाटले असते. वैभवासाठी नव्हे तर आरामासाठी, मावळतीला लागलेल्या आयुष्यातले काही क्षण मनाचे स्वास्थ्यं जपण्यासाठी आणि शांतता मिळवण्यासाठी हॉटेल बुखारेस्टला त्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्वं होते. त्यांच्याच काय, बुखारेस्टमध्ये पुढच्या काही आठड्यांसाठी रहायला आलेल्या जवजवळ वीस जोडप्यांची कहाणी थोड्याफार फरकाने हीच होती. कोणी साठीचे अतिश्रीमंत गृहस्थं तिसरे लग्नं करून आपल्या तिशीच्या बायकोला घेवून आले होते तर कोणी आयुष्यभराच्या जोडीदाराला काळाने हिरावून नेल्याने जुन्या आठवणी जागवण्यासाठी एकट्यानेच आले होते. नुकतेच कोर्टशिप करू लागलेली वा लग्नाच्या बंधनात अडकलेली काही मोजकी तरूण जोडपीही होती तर काही मोडकळीला आलेले लग्नं वाचवण्यासाठी आलेली जोडपीही होती. एकट्याने येवून राहणारे काही मोजके लोकंही होते ज्यांत आपल्या क्लायंट्सच्या बिझनेससाठी गुंतवणुकदार शोधणार्‍या काही 'कमिशन एजंट' लोकांचाही समावेष होता. पण ह्या सगळ्या लोकांमध्ये एक गोष्टं नक्कीच समान होती, ती म्हणजे श्रीमंती. बुखारेस्ट मध्ये आठवड्यासाठी राहण्याचा खर्च सर्वसाधारण लंडनवासीयाच्या दोन महिन्यांच्या पगाराएवढा होता.

हॉटेलचा चोवीस तास तत्परतेने काम करणारा स्टाफ, हरतर्‍हेचे खाणसामे, जिम आणि योगा शिक्षक, मसाज करणारे मसूज आणि मसूर, पूर्णवेळ डॉक्टर्स, सुरक्षारक्षक, बिल्डिंग आणि मशीनरी जाणणारे स्थायी ईंजिनियर्स असा सुसज्जं ताफाही बुखारेस्ट मध्ये कायम हजर असे. येणार्‍या पाहुण्यांच्या सेवेत कुठलाही खंड पडू नये ह्यावर हॉटेल व्यवस्थापनाची करडी नजर होती. 'हॉटेल बुखारेस्ट' ह्या नावाला, ब्रँडला पूर्ण युरोपात मोठा मान होता वजन होते.

ऑस्ट्री दांपत्याच्या आगमनानंतर संध्याकाळी सहाच्या ठोक्याला बुखारेस्टचे भरभक्कम दरवाजे त्यादिवसासाठी बंद झाले. साडे सहापासूनच प्रत्येक मजल्यावरच्या कॉरिडोरमध्ये - ऊंची डिनरसुट आणि गाऊन्स घालून जोडपी ग्राऊंड फ्लोअरवरच्या बॅन्क्वेट हॉलकडे जाण्यासाठी एलेवेटरची वाट बघत घोळक्याने ऊभी आहेत, बॅन्क्वेट हॉल मध्ये न जाता रूममध्येच जेवण मागवणार्‍या जोडप्यांच्या सरबराईसाठी सर्वर लोकांची सर्विंग ट्रे किंवा कार्ट घेवून लगबग चालू आहे, वाईन/ सिगरेट/ पुस्तक/ डीवीडी अश्या काही स्पेशल वस्तू रूममध्ये मागवणार्‍यांसाठी रूम सर्विसच्या तरूण मुलांचीही तत्पर धावपळ चालू आहे - हेच दृष्यं होते.

21.jpg

ऑस्ट्री दांपत्याच्या तिसर्‍या मजल्यावरचेही दृष्य फार वेगळे नव्हते - दोन जोडपी एलेवेटर येण्याची वाट बघत एकमेकांच्या ओळखी करून घेत औपचारिक गप्पा मारत होती. त्यांच्या बाजूलाच सुटाबुटातले एक मध्यमवयीन गृहस्थं खिडकीजवळ बॅगेतली बिझनेस कार्ड्स कोटाच्या खिशात ठेवत ऊभे होते. सर्विस एलेवेटर मधून बाहेर आलेला एक सर्वर कॉरिडोर मधून हलकेसे गाणे गुणगुणत सर्विंग कार्ट ढकलत रूम डिलवरी करायला चालला होता तर दुसरी सर्वर नुकतीच एका रूममध्ये डिलवरी करून सर्विंग ट्रे बोटावर फिरवत येत होती. रूम सर्विसचा एक पोरगेलेसा अतिऊत्साही तरूण, हातात वाईन बॉटल घेवून डिलीवरीसाठी चालला असतांना 'आपण येतांना कॉर्क स्क्रू आणायला तर विसरलो नाही ना?' आठवण होऊन वेंधळेपणाने खिसे चाचपडत चालत होता..............आणि तेवढ्यात कुणा पुरूषाच्या जीवघेण्या किंकाळीने तिसरा मजला दणाणून गेला. कॉरिडोर मधल्या आठही जणांच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलले. ते चपापून जागीच थांबत एकमेकांकडे बघत आवाज कुठून आला त्याचा कानोसा घेवू लागले. काही सेकंदात स्त्रीच्या आवाजातली दुसरी कर्कश्यं किंकाळी पुन्हा मजल्यावर घुमली आणि त्या आठही जणांना ती ऑस्ट्री दांपत्याच्या स्वीट नं. ३०२ मधूनच आल्याचा पक्का अंदाज आला. आपल्या अंदाजाची खातरजमा करण्यासाठी एकमेकांकडे विचारणा करत गोंधळलेले आणि मनातून चरकलेले ते आठही जण ३०२ च्या दारासमोर येवून ऊभे राहिले.
दोन क्षण भयाण शांतता पसरली आणि अचानक 'मला मारू नकोस, प्लीज मला मारू नकोस' असा मिसेस ऑस्ट्रींचा प्रचंड भ्यालेला आणि रडका आवाज पुन्हा घुमला. त्यातल्या एक जण ३०२ चे दार ठोठावत 'मॅडम काय झाले, दार ऊघडता का?' म्हणत असतांना त्याचे वाक्य संपते न संपते तोच 'ठ्वॉय' 'ठ्वॉय' आवाज करत बंदुकीच्या दोन जोरदार बारांनी तिसरा मजला पुन्हा दणाणून गेला. गोळ्यांच्या आवाजासरशी ते आठही जण लगबगीने दरवाजापासून लांब झाले. दोन्ही जोडप्यापैकी तरूण जोडप्यातल्या मुलीच्या तोंडातून एक भयप्रद किंकाळी बाहेर पडली तसे तिच्या जोडीदाराने तिला मिठीत घेतले. दुसरे तुलनेने वयस्कर जोडपेही हातात हात घेत एलेवेटरच्या दिशेने झेपावले. हॉटेल स्टाफचे तिघेही जण अजूनही एकमेकांच्या चेहर्‍याकडे बघत कॉरिडोरच्या दुसर्‍या बाजुला असलेल्या सर्विस एलेवेटर च्या दिशेने मागे सरकू लागले. आता कुठल्याही क्षणी हातात बंदुक घेतलेला मनुष्यं दार ऊघडून बाहेर येईल आणि पुन्हा गोळीबार करेल असे वाटत असल्याचा ताण अणि भिती त्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टं दिसत होती. तणावाचे दोन क्षण असेच गेले असतील नसतील तोच त्या पोरगेल्याश्या सर्वरला अचानक काही तरी दिसले आणि तो पुन्हा ३०२ च्या दिशेने धावत सुटला. चपळाईने त्याने ३०२ च्या दाराच्या बाजूलाच असलेला ईमर्जन्सी फोन ऊचलून '३०२ मध्ये गोळीबार झाला आहे लवकर या' असे ओरडून फोनचे रिसिवर टाकून देत झटक्यात दरवाजापासून बाजूला होत मागे फिरला.
ते आठही जण अजूनही घाबरलेले गोंधळलेले होते, एलेवेटर अजून एकदाही त्यांच्या मजल्यावर थांबले नव्हते. त्यांच्यापैकी प्रत्येकाची नजर अजूनही ३०२ च्या दरवाजावरंच खिळून होती. तितक्यात मजल्यावरचे जिन्याकडे जाणारे दार दाणकन ऊघडले आणि आणि दोन सिक्युरिटी गार्डस धावतपळत तिसर्‍या मजल्यावर दाखल झाले. गार्डस दिसता क्षणी आठही जण ३०२ च्या दरवाज्याकडे बोट दाखवत ओरडले 'आत गोळीबार झाला आहे, ३०२ मध्ये आत्ता गोळीबार झाला आहे'. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच दोघेही गार्ड आपापल्या बंदुका सरसावत ३०२ च्या दरवाजासमोर ऊभे ठाकले आणि त्यांनी त्या आठही जणांना 'कॉरिडोरच्या टोकाला जा, कोपर्‍यात आसरा घ्या' असे ओरडून सांगत ३०२ च्या दरवजापासून लांब, सुरक्षित अंतरावर राहण्यास सांगितले. त्या दोघातला एक जण त्यानंतरचे काही सेकंद ३०२ चा दरवाजा ठोठावत, ओरडत आतल्या व्यक्तीस बंदूक टाकून बाहेर येण्यास सांगत राहिला पण आतून काहीही आवाज ऐकू आला नाही की ३०२ चे दार ऊघडले नाही. दुसरा जण वॉकी टॉकी वरून मेन डेस्कला परिस्थितीची जुजबी माहिती देत होता. पहिल्याने पुन्हा 'आम्ही सिक्युरिटी आहोत रूममध्ये कोणी असल्यास आवाज द्या' असेही ओरडून सांगितले पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही. पळत गेलेल्या गार्डसना बघून बॅन्क्वेट हॉलमधले लोक काय झाले आहे ते बघण्यासाठी लॉबी मधल्या फ्रंट डेस्ककडे जाण्यास ऊठू लागताच हॉटेल कॉन्सिअर्ज (हॉटेल मॅनेजर) मि.गुस्ताफनी 'सगळ्यांनी शांतपणे आहे तिथेच बसून रहावे' असा विनंतीवजा सल्ला दिला. सगळ्या रूम्समध्येही 'पुढची सुचना येईपर्यंत रूममधून बाहेर पडू नये' अशी घोषणा झाली. कॉरिडोर मधल्या त्या आठही जणांच्या चेहर्‍यावर भिती अजूनही स्प्ष्टं दिसत असली तरी आपल्या डोळ्यांसमोर चाललेले हे नाट्य कसे ऊलगडते ह्याची किंचितशी ऊत्सुकताही डोकावत होतीच. अजून मिनिटभर प्रयत्न केल्यानंतरही आतून काहीच प्रतिसाद न आल्याने दोन्ही गार्डसनी दरवाजा ऊघडून आत जाण्याचा निर्णय घेतला.
अश्या गंभीर आणि घातक परिस्थितीत दरवाजा ऊघडून आत कसे जावे त्याच्या अ‍ॅकॅडेमीमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणा बरहुकूम, अतिशय सावधानतेने एकेक पाऊल टाकत दोघेही ३०२ च्या प्रशस्तं लिविंग रूममध्ये दाखल झाले. त्यांना मखमली कारपेटवर डोक्यातून आरपार झालेल्या एक आणि छाती फोडून गेलेल्या दुसर्‍या गोळीच्या जखमांतून वाहणार्‍या रक्ताच्या थारोळ्यात ऊताणा पडलेला मिसेस ऑस्ट्रींचा देह दिसला. एका गार्डने त्यांच्या नाकाजवळ बोट नेऊन श्वास तपासत दुसर्‍याकडे बघून नकारार्थी मान हलवली.

18.jpg

दोघेही गार्ड पुन्हा सावध होत एकमेकांना नजरेने ईशारा करत आजिबात आवाज न करता एकेक पाऊल टाकत आत बेडरूमकडे जाण्यास वळाले. बेडरूमला लागूनच असलेल्या बाथरूममध्ये अतिशय मंद प्रकाशात त्यांना कपाळावर कसला तरी जबरदस्तं प्रहार झाल्याने खोक पडलेला मि. ऑस्ट्रींचा बाथरोबमधला निश्चल देह चकचकीत टाईल्सवर अस्ताव्यस्तं अवस्थेत पडलेला दिसला. कपाळावरून रक्ताचे ओघळ चेहर्‍यावर पसरले होते. एका गार्डने पटकन त्यांच्या नाकाजवळ हात नेत श्वास तपासला आणि त्याचे डोळे लकाकले. 'हे सर अजून जिवंत आहेत' तो दुसर्‍याकडे पहात हळूच म्हणाला. दुसर्‍या गार्डने वॉकीटॉकी वरून ३०२ मध्ये तातडीने स्ट्रेचर आणि डॉक्टर ला पाठवण्याची सूचना केली.

24.jpg

दुसर्‍याच मिनिटाला सर्विस एलेवेटर मधून दोन मेल नर्स आणि एक तरूण डॉक्टर स्ट्रेचर घेवून ३०२ कडे अक्षरशः धावलेच. स्ट्रेचर आत येताच दोन्ही नर्सनी मि. ऑस्ट्रींचा देह स्ट्रेचर वर ठेवला, डॉक्टरांनी पुन्हा एकदा नाडी तपासून पटकन एक ऑक्सिजन मास्क मि. ऑस्ट्रींच्या नाकावर चढवला. स्ट्रेचर घेवून जातांना डॉक्टरने मिसेस ऑस्ट्रींचीही नाडी तपासली पण प्राण त्यांचे शरीर सोडून निघून गेल्याचे त्याची नजर सांगून गेली. डॉक्टर आणि नर्स आले तसे तातडीने सर्विस एलेवेटर ने बुखारेस्टच्या तळमजल्यावरच्या छोट्याश्या हॉस्पिटलमध्ये मि. ऑस्ट्रींना घेवून गेले.
रूम नं ३०२ मध्ये बेडरूमची हॉटेलच्या मागच्या बाजूला ऊघडणारी खिडकी सताड ऊघडी होती आणि त्यातून भणाणलेला वादळवारा बर्फाचे शेकडो नाजूक कण आत ऊडवत होता. मागे राहिलेल्या दोन्ही गार्डनी वस्तू न वस्तू जशीच्या तशी जागेवर असलेला पूर्ण स्वीट तीनतीनदा पाहून घेतला पण त्यांना तिसर्‍या माणसाच्या अस्तित्वाच्या कुठल्याही खुणा तिथे मिळाल्या नाहीत.

कॉरिडोर मधल्या त्या आठही जणांची भीड आता चेपली होती. डॉक्टर घाईघाईत स्ट्रेचरवर कुणालातरी घेवून जातांना त्यांनी पाहिले होते. ते सगळेच ३०२ च्या दारापाशी येवून आत डोकावत नेमकं काय चाललंय त्याचा कानोसा घेत असतांना तेवढ्यात तिथे आलेल्या कॉन्सिअर्ज मि. गुस्ताफनी त्यांना लांब ऊभे राहण्यासाठी विनंती केली. आत संशयास्पद असे अजून काहीच न दिसल्याने गार्डस लगोलग बाहेर आले. बाहेरंच ऊभ्या हॉटेल मॅनेजर गुस्ताफना आतली पूर्ण परिस्थिती सांगून झाल्यावर हॉटेलच्या नियमांप्रमाणे मि. गुस्ताफनी तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांच्या सुचनेप्रमाणे लगेचच स्वीट नं ३०२ सील करत त्यांनी एका गार्डला तिथेच रूमबाहेर पहारा देण्याचा हुकूम दिला. फ्रंट डेस्कला कुठल्याही परिस्थितीत मेन गेट न ऊघडण्याचा हुकूम देत त्यांनी दुसर्‍या गार्डची पाठवणी मेन गेटवर पहारा देण्यासाठी केली. कॉरिडोरमधल्या त्या आठही जणांची सगळी माहिती घेवून त्यांनी पोलिस येईपर्यंत झाल्या प्रकाराची ईतर कुणाबरोबरही चर्चा करू नये अशी विनंती त्यांना केली. पाचही पाहुण्यांची पाठवणी त्यांच्या रूम्समध्ये करून शांतपणे जडजड पावलं टाकत ते बॅन्क्वेट हॉल मधल्या पाहुण्यांशी बोलण्यासाठी एलेवेटर कडे निघाले.
हॉटेल बुखारेस्ट मधल्या त्यांच्या मागच्या तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही असा प्रसंग अनुभवला नव्हता. एलेवेटरमधल्या त्या वीस सेकंदांच्या प्रवासात बुखारेस्टचा सगळा ईतिहास त्यांच्या नजरेसमोर तरळून गेला. ह्या घटनेची मोठी किंमत बुखारेस्टला सोसावी लागणार आहे, कदाचित बुखारेस्टचे भवितव्यंच क्रुसावर टांगले जाईल आणि आपल्या कारकिर्दीत बुखारेस्टच्या नावाला बट्टा लागला असे वाटून त्यांचे वयोवृद्धं हृदय काळजीने पिळवटून गेले.
बॅन्क्वेट हॉल मधले वातावरण अगदीच गोंधळाचे नसले तरी पाहुणे घोळक्या घोळक्याने काही तरी कुजबुजत होते. तेवढ्यात मि. गुस्ताफचा आदरयुक्तं पण करडा आवाज तिथे घुमला -
लेडीज अँड जंटलमेन, आपल्या हॉटेलमध्ये तिसर्‍या मजल्यावर एक दुर्घटना घडली आहे. घटनेचा कुठलाही तपशील मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. आम्ही पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि बाहेरचे वादळ थांबताच त्वरेने त्यांना ईथे आणण्याची व्यवस्थाही हॉटेल करत आहे. दुर्दैवाने आज संध्याकाळचे सगळे प्रोग्राम आम्हाला रद्दं करावे लागंत आहेत. सर्वांनी आपापल्या रूममध्ये जाऊन जेवणाच्या ऑर्डर द्याव्यात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. हॉल रिकामा होताच गेस्ट एलेवेटर आणि जिने सर्व पाहुण्यांसाठी बंद करण्यात येतील, पण फोन लाईन्स, फ्रंट डेस्क आणि आमचा सगळा स्टाफ तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतील. तुम्हाला होत असलेल्या गैरसोयीबद्दंल हॉटेल बुखारेस्ट आणि मी वैयक्तिक रित्या दिलगीर आहोत. कुणालाही आपल्या सुरक्षेबाबत शंका वाटण्याचे काहीही कारण नाही. पोलिस येवून गेल्यानंतर घटनेची माहिती सगळ्यांना दिली जाईल पण तोवर आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे अशी माझी सर्वांना विनंती आहे.' - असे सांगून ते तडक स्टाफला सुचना देण्यासाठी आत निघून गेले.

पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशने तेजाळलेली बर्फाची शुभ्रधवल चादर बाहेर दूरवर पसरलेली असतांना ती रात्रं बुखारेस्टच्या पासष्टं वर्षांच्या ईतिहासातली सर्वात अंधारी रात्रं होती. रात्रभर घोंघावणारे निर्दयी वादळ सुर्याची पहिली किरणे पृथ्वीवर पडताच शहाण्या बाळासारखे शांत झाले. अर्ध्या तासातंच म्हणजे आठाच्या ठोक्याला केबलकार मधून आलेल्या पोलिसांनी हॉटेल बुखारेस्टमध्ये पाऊल ठेवले. काल संध्याकाळी सहाला बंद झालेले बुखारेस्टचे भले मोठे दार पहिल्यांदाच करकरत ऊघडले आणि पोलिस आत जाताच पाठोपाठ पुन्हा बंदही झाले.

पोलिस डायरीतल्या नोंदी.

टाईमलाईन - पार्किंग गराज, केबल कार आणि हॉटेलमधल्या लॉबी व कॉरिडोर मधल्या वेगवेगळ्या कॅमेरांमध्ये कॅप्चर झालेल्या हालचाली

  • -दुपारी १:०० क्लिनिंग साहित्याची एक भली मोठी कार्ट घेवून रूम क्लीनर लेडी रूम नं ३०२ मध्ये गेली
  • -दुपारी २:०० क्लिनिंग कार्ट घेवून क्लीनर लेडी रूम नं ३०२ मधून बाहेर पडली
  • -दुपारी ३:०० ऑस्ट्री दांपत्याने त्यांची लँडरोवर बुखारेस्टच्या पर्वताच्या पायथ्याला असलेल्या गराजमध्ये पार्क केली
  • -दुपारी ३:३० ऑस्ट्री दांपत्याने केबल कारमध्ये प्रवेश केला
  • -दुपारी ४:०० ऑस्ट्री दांपत्याचे हॉटेल बुखारेस्ट मध्ये आगमन
  • -दुपारी ४:१० तिसर्‍या मजल्यावरच्या कॅमेरामध्ये ऑस्ट्री दांपत्य गेस्ट एलेवेटरने वर येवून त्यांच्या रूममध्ये गेल्याचे दिसत आहे.
  • -दुपारी ४:११ ऑस्ट्री दांपत्याच्या सामानाची ट्रॉली आणणारा बेलबॉय सर्विस एलेविटरने तिसर्या मजल्यावर आला आणि दोनच मिनिटात रिकामी ट्रॉली घेवून सर्विस एलेवेटरने खाली गेला.
  • -दुपारी ४:४० मि. ऑस्ट्री रूममधून बाहेर पडून मेन गेटमधून बाहेर गेले.
  • -दुपारी ५:२० मि. ऑस्ट्री मेन गेटमधून आत येवून रूममध्ये गेले.
  • -संध्या. ५:३० मिसेस ऑस्ट्रींनी फोन करून जेवणाची ऑर्डर दिली.
  • -संध्या. ६:१० डिनर कार्ट घेवून सर्वर ३०२ मध्ये गेला.
  • -संध्या ६:११ मिसेस ऑस्ट्रींनी फ्रंट डेस्कला फोन करून 'त्यांचा सावत्रं मुलगा आणि त्याची बायकोही हॉटेलमध्ये थांबले आहेत का?' ह्याची चौकशी केली.
  • -संध्या ६:२० रिकामी डिनर कार्ट घेवून सर्वर ३०२ मधून बाहेर आला.
  • -संध्या ६:२४ मिसेस ऑस्ट्रींनी त्यांच्या योगा टीचरला ऊद्या सकाळच्या सहाच्या क्लासला येत असल्याचे एसएमस पाठवून कळवले.
  • -संध्या ६:२८ मिसेस ऑस्ट्रींनी दुसर्‍या दिवशीच्या मसाज सेशनसाठी हॉटेल वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंग केले.
  • -संध्या ६:३४ तिसर्‍या मजल्यावरच्या कॉरिडोरमध्ये पहिली किंकाळी ऐकल्याचे लोकांच्या हालचालीवरून दिसते आहे.
  • -संध्या ६:३७ वाईन सर्वर ने ईमर्जन्सी कॉल केला
  • -संध्या ६:३९ दोन सिक्युरिटी गार्ड्स ३०२ समोर दाखल
  • -संध्या ६:४२ सिक्युरिटी गार्ड्सनी ३०२ चे दार ऊघडून आत प्रवेश केला

क्राईमसीन/ फॉरेन्सिक डिटेल्स

  • -बेडरूमची हॉटेलच्या मागच्या बाजूला ऊघडणारी खिडकी सोडल्यास पूर्ण रूम मधली एकही वस्तू जागची हलली असावी असे वाटत नाही
  • -कधी कधी पाहुण्यांकडून खिडक्या ऊघड्या राहिल्याने थंड हवा, बर्फ आत येवून रूमचे आणि हिटिंग सिस्टीमचे नुकसान होते म्हणून हॉटेल मॅनेजमेंटने चार पाच वर्षांपूर्वीच सगळ्या रूम्समधल्या खिडक्या लॅच करून खिडक्यांचे हँडल्स काढून टाकले आहेत.
  • -हँडल शिवाय खिडकी ऊघडणे अशक्य आहे. खिडकी ऊघडणार्‍याने नक्कीच हँडलच्या खोबणीत हँडल बसवून आतून खिडकी ऊघडली असावी.
  • -हॉटेलमध्ये पूर्वी राहून गेलेल्या कुणालाही ही हँडलची बाब माहित असणे शक्य आहे. खिडक्या स्टँडर्ड असल्याने बाहेरून असे हँडल विकत घेऊन येणे फारंच सोपी गोष्टं आहे.
  • -हँडल वापरून खिडक्या ऊघडता आल्यास खिडकीतून सज्जावर ऊतरून बाजूच्या ३०४ रुममध्ये किंवा रेलिंगच्या आधाराने चढून वरच्या ४०२ रूममध्ये जाणे शक्यं आहे.
  • -बेडरूममधल्या नाईटस्टॅंडवरच्या स्टीलच्या फ्लॉवरपॉट खाली पाण्याचे बर्फ जमलेले होते. तो पॉट धुण्याचा प्रयत्नं केला गेला असावा. ओल्या पॉटवरून पाणी निथळल्याने आणि ऊघड्या खिडकीतून अतिथंड बर्फाळ हवा येत असल्याने निथळलेल्या पाण्याचे बर्फ झाले.
  • -फ्लॉवर पॉटवर मि. ऑस्ट्रींच्या हाताचे अगदी पुसट ठसे आहेत आणि त्यांच्या रक्ताचा एक बारीक थेंबही पॉटवर मिळाला.
  • -खिडकीतून, खाली साचलेल्या बर्फावर कोणीतरी ऊंचावरून ऊडी मारल्याने बुटांच्या खोल खुणा दिसत आहेत. बर्फाचा थर जाड पण भुसभुशीत असल्याने ऊडी मारणार्‍याला दुखापत होण्याचा काही धोका नव्हता. ऊडी मारल्याचा आघात मोठा असल्याने रात्रीतून बर्फ पडूनही ऊडीच्या खुणा शाबुत आहेत.
  • -रात्रीतून भरपूर बर्फ पडल्याने, ऊडी मारल्यानंतर जर खुनी (एक किंवा अनेक) चालत वा 'स्की' करून गेला असल्यास त्याच्या बुटांच्या किंवा स्कीच्या खुणा पुसल्या जाणे सहज शक्य आहे.
  • -बर्फातल्या ऊडीच्या खुणा बरोबर ग्राऊंड फ्लोरवरच्या रूम नं १०२ च्या खिडकीबाहेर दिसत आहेत.
  • -हॉटेलचे मेन गेट सहालाच बंद झाल्याने ऊडी मारणार्‍याला हॉटेलमध्ये पुन्हा हॉटेलमध्ये प्रवेश मिळवणे अशक्यं आहे.
  • - काल रात्रीच्या हिमवादळात प्रोटेक्टिव गिअर घालून चालत किंवा स्की करून जाणे पाईन वृक्षांच्या गर्दीमुळे आणि अतिप्रचंड शिळांमुळे अशक्यप्राय आहे. खुन्याने असे धाडस केले असल्यास ते नक्कीच जीवघेणे ठरले असण्याची शक्यता आहे.
  • -हॉटेलला लागून असलेल्या मशिनरी रुममध्ये खुन्याने आसरा घेतला असल्यास त्याला तिथे वादळापासून निवारा मिळणे सहज शक्यं आहे.
  • -मशिनरी रूममध्ये कोणी तरी आसरा घेतल्याचे, छोटेसे हीटर वापरल्याचे आणि अ‍ॅल्युमिनिअम फॉईलमध्ये गुंडाळलेले अन्न खाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.
  • - तपासकार्य चालू असतांना हॉटेलचे मेन गेट पूर्णवेळ बंदच होते.
  • -मिसेस ऑस्ट्रींच्या बोटातली डायमंड वेडिंग रिंग आणि गळ्यातले मुल्यवान नेकलेस असा एक मिलिअन ब्रिटिश पौंडाचा ऐवज गायब आहे.
  • -मि. ऑस्ट्रींची वेडिंग रिंग बेडरूममधल्या नाईट स्टँडच्या ड्रॉवर मध्ये मिळाली.
  • -डायनिंग टेबलवर फोर कोर्स मेन्यू चे डिनर वाढून ठेवलेले होते त्याला कोणी हात लावलेला दिसला नाही, पण एक बोल पूर्ण रिकामा होता.
  • - घटनेच्या वेळी तिसर्‍या मजल्यावरच्या कॉरिडोरमध्ये ऊपस्थित असलेले पाच पाहुणे, तीन स्टाफ, दोन गार्डस, दोन मेल नर्स आणि डॉक्टरच्या जबानीत जे घडले त्याविषयी सांगतांना कुठलीही विसंगती आढळून आली नाही.

एका स्पेशल केसची माहिती

  • - ऑस्ट्रींच्या रूममध्ये किचन ओट्यावर "$WOLF$"अक्षरे कोरलेली एक चांदीची अंगठी सापडली आहे जे फार चक्रावणारे आहे.
  • - चार वर्षांपूर्वीपर्यंत बुखारेस्ट सारख्याच ईतर चार विंटर हॉटेल्स मध्ये 'विंटर वुल्फ' नामक क्रूर आणि निर्दयी चोराने, चोरीच्या ईराद्याने दोन लेस्बियन जोडपी, एक घटस्फोटित आणि एक विधवा अश्या सहा श्रीमंत स्त्रियांचे वेगवेगळ्या वर्षी निर्घूण खून पाडले होते.
  • -प्रत्येक वेळी त्याने वापरलेली खून करण्याची पद्धत वेगळी होती.
  • - प्रत्येकवेळी मयतांच्या अंगावरून अतिशय मौल्यवान ज्वेलरी चोरली गेली होती आणि घटनास्थळावर "$WOLF$" कोरलेली चांदीची अंगठी सापडली होती.
  • - चार वर्षांपूर्वी पोलिसांच्या पाठलागात 'विंटर-वुल्फ' पोलिसांसमक्षं खोल दरीत पडला होता, पण अद्याप त्याची बॉडी मिळवणे शक्यं झाले नव्हते.
  • - 'विंटर वुल्फचे' खरे नाव 'डोरिअन व्हाईट' होते. तो अतिशय चलाख आणि पट्टीचा स्की खेळाडू होता.
  • - ऑस्ट्रींच्या रूममध्ये सापडलेली अंगठी 'विंटर वुल्फ' च्या अंगठीसारखीच होती पण तिचा आकार मागच्या चारही अगठ्यांपेक्षा थोडा मोठा होता, आणि "$WOLF$" अक्षरेही ईटालिक फाँट मध्ये नव्हती.
  • - जिवंत असतांना 'विंटर वुल्फ' विषयी पेपरमध्ये बरीच माहिती छापून येत असे ज्यात काही माहिती खरी होती तर काही नुसत्याच वदंता. त्याच्या चोरी आणि धाडसाविषयीच्या गोष्टी लोक मोठ्या चवीने चघळत.

मेडिकल रिपोर्ट

  • -मिसेस ऑस्ट्रींचा मृत्यू छातीत आणि डोक्यात घुसलेल्या गोळीमुळे झालेल्या प्रचंड रक्तस्त्रावाने झाला.
  • -त्यांच्या पोटात फक्तं वाईन आणि रक्तात अक्लोहोल सापडले.
  • -मि.ऑस्ट्रीं च्या कपाळावर बेडरूममधल्या फ्लॉवरपॉटचा वार झाला. हा वार घेरी येवून बेशुद्धं होण्या ईतपतच जोराचा होता पण जीवघेणा नव्हता.
  • -रूमची खिडकी ऊघडी असल्याने रूममधे १२ तासापेक्षा जास्तं वेळ अतिथंड हवा भरून राहिल्यामुळे मृत्यूची नेमकी वेळ सांगता येणे अवघड आहे.
  • पण मृत्यू संध्या. सहा ते रात्री आठ च्या दरम्यान झाला असावा असे वाटते.

मि. ऑस्ट्रींचा जबाब

  • - मी पावणेपाच वाजता नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर चालायला गेलो होतो आणि साधारणतः अर्धा तास चालून सवा पाचला रूमवर परत आलो.
  • - चालून आल्यानंतर पाच दहा मिनिटं आराम केला आणि सूझनला जेवणाची ऑर्डर द्यायला सांगून मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो.
  • - आंघोळ करून मी बाथरूममध्येच आवरत होतो तेव्हा अचानक बाथरूमची लाईट बंद झाली, मस्तकावर काही तरी जोरात आदळले, वेदनेमुळे मी ओरडलो आणि मला घेरी आली... बस्स मला त्यापुढचे काहीच आठवत नाही.
  • - मी डोळे ऊघडले तेव्हा हॉस्पिटल बेडवर होतो आणि डोके प्रचंड ठणकत होते.
  • -मी माझी वेडिंग रिंग आंघोळ करतांना बेडरूममधल्या नाईट स्टँडच्या ड्रॉवरमध्ये काढून ठेवली होती.

३०२ च्या रूम सर्विस रेनर्ड फ्रॉस्ट चा जबाब

  • -मी सहाच्या आसपास जेवणाची डिलवरी घेऊन आलो असेल.
  • -मी आत आलो तेव्हा मिसेस ऑस्ट्री वाईन पीत होत्या आणि फोनवर काही तरी पहात होत्या. त्यांनी कुणाला तरी कॉलही केला होता
  • -त्यांनी मला जेवण डायनिंग टेबलवर सर्व करायला सांगितले. त्यांची फोर-कोर्स डिनर मेन्यूची ऑर्डर होती- स्टार्टर्स, सॅलड, आँट्रे आणि डिझर्ट. मी आमच्या हॉटेलच्या ट्रेनिंगप्रमाणे सगळे नीट टेबलावर मांडले आणि निघून गेलो.
  • - मि. ऑस्ट्री काही दिसले नाहीत पण ते बाथरूम मध्ये असावेत असे मला वाटते कारण नळाच्या पाण्याचा आवाज येत होता.
  • -तिसर्‍या मजल्याचा 'मल्टी-कोर्स डिनर' सर्वर मीच असल्याने मी पुन्हा दुसर्‍या रूमची जेवणाची ऑर्डर घेऊन आलो होतो तेव्हा गोळीबार झाला, आमची 'लाईट मील' सर्वर डॉटी आणि 'वाईन रनर' एग्जीही होते तिथे.
  • - (डायनिंग टेबलचा फोटो दाखवून रिकाम्या बोलबद्दल विचारले असता) बहुतेक त्या बोलमध्ये मी अ‍ॅल्युअमिनिअम फॉईलमध्ये गुंडाळलेले ग्रिल्ड पोटॅटो ठेवले होते.

प्रासंगिक माहिती

  • - हॉटेलात दरवर्षी येणार्‍या लोकांच्या म्हणण्यानुसार मिसेस ऑस्ट्री ह्या अतिशय शिष्टं, बोलायला फटकळ व ऊर्मट आणि श्रीमंतीची प्रचंड घमेंड असलेल्या एक अहंकारी स्त्री होत्या.
  • -मागच्या वर्षी, आपल्या एका क्लायंटच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करावी ह्यासाठी मि. ऑस्ट्रींची मनधरणी करत ओळख वाढवू पाहणार्‍या एका स्पॅनिश कमिशन एजंट मि. मार्टिनेझचा मिसेस ऑस्ट्रींनी सर्वांसमोर फार वाईटरित्या पाणऊतारा केला होता. मि. मार्टिनेझही गरम डोक्याचेच असावेत त्यामुळे वाद विकोपाला गेला. कॉन्सिअर्ज मि. गुस्ताफनी मध्यस्थी केली तेव्हाच तो वाद थांबला, पण मि. ऑस्ट्री एकदाही मध्ये पडले नाहीत की त्यांनी मिसेस ऑस्ट्रींना एका शब्दाने आवरायचा प्रयत्न केला नाही. मिसेस ऑस्ट्रींनी, मि. मार्टिनेझ ना हॉटेल मधून घालवून देण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंटवर फार दबाव आणला होता. दोन दिवसांनी मि. मार्टिनेझ स्वतःच निघून गेले पण ह्यावर्षी ते पुन्हा हॉटेल मध्ये ऊतरले आहेत.
  • -मागच्याच वर्षी मि. ऑस्ट्रींचा मुलगा सायमन त्याच्या प्रेयसीला घेऊन त्यांना ईथे भेटायला आला होता तेव्हा मिसेस ऑस्ट्रींनी (ज्या सायमनच्या सावत्रं आई आहेत) त्याचाही अपमान करत त्याला 'तू ह्या मिडलक्लास मुलीशी लग्नं केल्यास मी तुला ईस्टेटीतून एक पैसाही मिळू देणार नाही' सुनावत रूममधून घालवून दिले. सायमनही मिसेस ऑस्ट्रींना बरेच शिव्याशाप देत निघून गेला. त्यांची आरडाओरड ऐकून बरेच लोक गोळा झाले होते. पण मि. ऑस्ट्री तेव्हाही शांतपणे रूममध्ये बसून राहिले.
  • - मिसेस ऑस्ट्रींच्या अगदी ऊलट असे मि. ऑस्ट्रींचे व्यक्तीमत्व होते. शांत, विचारी, धीरगंभीर, आदर वाटावा असे, परंतू ते फारंच कमी बोलत. ते कायम ऊदास रहात नव्हते पण साधे मंदसे हसतांनाही ते कधी दिसले नाहीत.
  • -रूम नं ३०४ मध्ये स्पॅनिश कमिशन एजंट मि. मार्टिनेझ ऊतरले आहेत.
  • -रूम नं ४०२ मध्ये मि. सायमन ऑस्ट्री आपल्या बायकोबरोबर ऊतरले आहेत.
  • -रूम नं १०२ मध्ये मि. हिरोशी मात्सुमुरा ऊतरले आहेत. टोकियो मधून थेट हॉटेल बुखारेस्ट मध्ये आलेल्या मि. हिरोशींचे व्यक्तीमत्वं फारंच संशयास्पद वाटते, हॉटेल स्टाफलाही त्यांचा हॉटेलमधला मागच्या एक आठवड्यातला वावर संशयास्पद वाटला. मि. हिरोशींनी पायथ्याच्या गावातून लंडनमध्ये काही कॉल्स केले आणि हार्डवेअर दुकानात खरेदीही केली. त्यांनी लंडनमध्ये केलेले कॉल मिसेस ऑस्ट्रींच्या भावाच्या ऑफिसमध्ये गेल्याचे समजले आहे. मिसेस ऑस्ट्री आणि त्यांच्या भावात वडिलांच्या गडगंज संपत्तीवरून कोर्ट केस चालू आहे जिने गंभीर वळण घेतले आहे. मि. हिरोशी प्रोफेशनल अ‍ॅसॅसिन असू शकतात.
  • -मि. मार्टिनेझ, मि. सायमन ऑस्ट्री आणि मि. हिरोशी तिघांनीही 'घटनेच्या वेळी आपण रूममधेच होतो आणि 'रूम मध्येच रहावे' अशी घोषणा झाल्याने रूममधून बाहेर पडलो नाही, असे सांगितले.
  • -क्लिनिंग कार्टमधली वॅक्यूम क्लीनर आणि ईतर काही सामान काढून जागा मोकळी असल्यास तिथे एखादी व्यक्ती काही मिनिटे बसू शकते. कार्ट चहू बाजूंनी बंदिस्तं असल्याने आतले सामान दिसत नाही.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
नेमके काय झाले असेल 'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल' मध्ये?
मिसेस ऑस्ट्रींचा खून झाला असल्यास कोणी, का व कसा केला असेल?
मि. ऑस्ट्रींवरही हल्ला झाला, तो कोणी केला असेल आणि का?

खुनी आणि खुनाबद्दल तुमच्या एकापेक्षा अनेक थिअरीज असतील तरी हरकत नाही पण घटनाक्रम आणि थोडी कारणीमीमांसा द्यावी अशी अपेक्षा. थोडक्यात पोलिसांच्या रोलमध्ये जाऊन आपल्याला ही केस सॉल्व करायची आहे.
क्लू देण्याची गरज पडू नये असे सध्यातरी वाटते आहे. पण काही कन्फ्युझिंग वाटत असल्यास आणि फॅक्ट्सचे क्लॅरिफिकेशन हवे असल्यास बोल्ड ईटालिक फाँट मध्ये लिहिले तर मला त्या पोस्ट्स ना ऊत्तर देणं सोपं जाईल. बाकीचं सगळं नेहमीप्रमाणे रेग्यूलर फाँटमध्ये चालूदेत. मी शक्य तेवढ्या प्रतिक्रिया, शक्य तेवढ्या वेगाने आणि शक्य तेवढा मेंदू वापरून वाचत राहीन, समजून घेत राहीन आणि गरज वाटल्यास ऊत्तर देत राहीन.

केस सोडवायला घेण्याआधी हा धागा नक्की डोळ्याखालून घाला
https://www.maayboli.com/node/62828

घटना सोडून वरती बुखारेस्टबद्दल मी जे वर्णन केले आहे ते फक्तं मेकॅनिकली केस सोडवण्यापेक्षा वाचकांना काहीतरी थरारक वाचल्याचा अनुभव मिळावा ह्यासाठीच. ऑस्ट्री दांपत्य आणि केसमधले ईतर लोक एक व्यक्ती म्हणून कसे आहेत हे सांगण्यासाठीही बरेच लिहिले आहे. एकदा का घटनास्थळाचे आणि एकेका व्यक्तीचे कॅरिकेचर समजले की ती वर्णनात्मक माहिती पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडू नये. घटनाक्रम आणि ईतर डीटेल्स वर्क-आऊट करूनच खुनी ( जर हा खूनच आहे असा तुमचा विश्वास असल्यास ) आणि खुनाची पद्धत समजू शकते. मान्य आहे ही केस थोडी मोठी झाली आहे, माहितीही खूप दिली आहे पण ऊलट त्या माहितीचा ऊपयोग अ‍ॅम्बिग्विटी टाळून स्ट्रीमलाईन्ड थिंकिंगसाठीच होईल असे वाटते.

केस सोडवण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा!!

केस सोडवून कंटाळा आल्यास 'दि ग्रँड बुडापेस्ट हॉटेल' सिनेमामधे दाखवलेले बुडापेस्ट हॉटेल कसे होते ते ह्या ४ मिनिटांच्या डॉक्यू. मध्ये बघायला मिळेल. https://www.youtube.com/watch?v=gYMfEKELveQ
विडिओ बघून झाल्यावर केस सोडवायला परत ईथे यायचे विसरू नका Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्तापर्यंत त्यातल्या त्यात काय बरोबर तर्क मांडले गेले आहेत ते सांगा ना. आधीच्या केसच्या तुलनेत हिला जरा वेळ लागतो आहे Happy

आत्तापर्यंत त्यातल्या त्यात काय बरोबर तर्क मांडले गेले आहेत ते सांगा ना. आधीच्या केसच्या तुलनेत हिला जरा वेळ लागतो आहे >> मैत्रेयीच्या पहिल्याच प्रतिसादानंतर मला वाटलं केस फार फार तर अजून दहा प्रतिसादातंच संपेल. Proud

डिनर कार्टमधे खुनी (हिरोशी) लपून आला? मग सर्वर त्याला सामील होता. डिनर कार्ट एवढी मोठी होती? ती क्लिनिंग कार्ट नाहीये.

मला वाटतेय हॉटेल चा किमान एक स्टाफ मेंबर सामील असल्याशिवाय खुन्याला हे काम करता येणार नाही.
तो कोण ते विचार करतेय. ते लक्षात आले तर खून कसा झाला यावर प्रकाश पडेल असे वाटते.
दुसरी सर्वर नुकतीच एका रूममध्ये डिलवरी करून सर्विंग ट्रे बोटावर फिरवत येत होती. >>> हे संशयास्पद आहे . ट्रे घेऊन येत होती? मग ट्रॉली कुठे आहे ?
रूम सर्विसचा एक पोरगेलेसा अतिऊत्साही तरूण, >>> हाही थोडासा संशयास्पद. पोरगेला उत्साही म्हणाजे हा नविन जॉइन झालेला आहे का ?

इज धिस टू ऑफ ट्रॅक?

डिनर कार्ट एवढी मोठी होती? >> नाही डिनर कार्ट क्लिनिंग कार्ट सारखी मोठी नव्हती. तसे असते तर पोलिसांनी नोंद केली असती.
ठीक आहे आता सांगून टाकतो.

एकूण चार केसेस पैकी आजची ही केस एकाच वेळी सगळ्यात सोपी आणि सगळ्यात अवघड अशी दोन्हीही होती.
सोपी ह्यासाठी की खुन्याने अगदी म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने खून करून खून कसा झाला हे सोडवण्याची मेहनत घेण्याचे कारणंच ठेवले नाही.
आणि अवघड ह्यासाठी की हा खुनी मागच्या तीन खुन्यांपेक्षा सगळ्यातं जास्तं तय्यार, शिस्तप्रिय, फोकस्ड आणि सगळ्यात महत्वाचे कूल होता.

ही केस आहे डोळे आणि कान ह्यांच्या लिमिटेशन्स ची, 'वेळ आणि आवाज' ह्यांच्या गणिताची आणि मानवी मेंदूच्या वरवर विचार करून पटकन २+२ =४ करायच्या सवयीची आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे टायमिंगची

माझ्या मते ह्या केसच्या ऊत्तरासाठी दोन अतिशय महत्वाचे प्रश्नं आहेत...
१) खिडकी बाहेरून ऊघडता येते का?
२) प्रशस्तं स्वीट मधल्या लिविंगरूम नंतरच्या बेडरूमच्या आतल्या बाथरूममध्ये ऑस्ट्री ओरडल्याचा आवाज कॉरिडोर मधल्या एलेवेटर पर्यंत येतो का?

१) माझ्या मते कुठलीही खिडकी आतून लॅच असल्यास बाहेरून तिच्याशी छेडखानी केल्याशिवाय ऊघडता येणे अशक्यं आहे. म्हणजे खिडकी ऊघडता येते पण तसे करतांना कराव्या लागणार्‍या ऊपद्व्यापाच्या खुणा मागे राहतात. आपल्या केसमध्ये हे घडले असते तर पोलिस नोंदीत ते आले असते. थोडक्यात ऑस्ट्रींच्या रूमची खिडकी आतूनच ऊघडली गेली.
२) आवाज एलेवेटरपर्यंत येतो का? हे प्रात्यक्षिक करूनच बघता येईल पण लिविंग रूममध्ये पडलेल्या मिसेस ऑस्ट्री आणि आत बाथरूममधल्या मि. ऑस्ट्रींचा आवाज सेम ईंटेन्सिटी ने येणार नाही. त्यात स्त्रियांच्या आवाजाची ट्रेबल जास्तं असते. पण हा खूप तांत्रिक मुद्दा झाला आणि आपल्याला ईथे नुसते वाचून लिहून त्याचा अंदाज बांधणे शक्यं नाही तर तो बाजूला ठेऊ.

क्लिनिंग कार्ट मधून कोणी आले असल्यास मि. ऑस्ट्री रूमममध्ये नसतांना मिसेस ऑस्ट्रींना मारण्याचा आणि खिडकीवाटे पळून जाण्याचा गोल्डन चान्स तो सोडणार नाही. म्हणजे क्लिनिंग कार्टमधून कोणीही ऑस्ट्री चेक ईन करण्याआधीच रूममध्ये येवून बसले नव्हते असे म्हणू शकतो.

तर खिडकी बाहेरून ऊघडत नसल्याने सायमन, मार्टिनेझ आणि हिरोशी ह्या तिघांपैकी कुणालाही मि. किंवा मिसेस ऑस्ट्रींची मदत मिळल्याशिवाय खिडकीतून आत येता येणार नाही. एक नव्हे दोन गोळ्या लागून मिसेस ऑस्ट्री मेल्याने त्याच टार्गेट होत्या हे नक्की. म्हणजे खिडकी ऊघडण्यात मि. ऑस्ट्रींचाच हात असावा हे धडधडीत सिद्धं होईल आणि त्यांना ते नाकारताही येणार नाही. पण मि. ऑस्ट्री, ज्यात ते स्वतः मेन संशयित होतील असा कुणाचा प्लॅन का अ‍ॅक्सेप्ट करतील. ते सायमन, मार्टिनेझ आणि हिरोशी ह्या तिघांपैकी कुणलाही सामील असल्यास चालायला जाण्याआधी हँडल वापरून खिडकी पूर्ण ऊघडून नाही पण अनलॅच्ड करून ठेवतील मग तिघांपैकी कोणीही येवून 'शांतपणे' (आवाज न करता) खून करून जाऊ शकतो आणि ऑस्ट्री परत येतील तेव्हा त्यांना बायकोचा मृतदेह दिसेल.
म्हणजे मिसेसला मारण्याचे काम होईल आणि बाहेर असल्याने ते ह्यात अडकणारही नाहीत. म्हणून तिघांपैकी कोणालाही खून करण्यासाठी मि. ऑस्ट्रींना हाताशी धरणे जरूरी होते आणि ऑस्ट्रींना रूममध्ये नसणे. म्हणून तिघांपैकी कोणीही ईन्वॉल्व नव्हते असे म्हणू शकतो.

आता ऊरला प्रश्नं ऑस्ट्री हे काम ईतर तिघांच्या मदतीविनाच एकट्यानेच करू शकतात का? तर 'हो' पण त्यांनी असे केल्यास, स्वतःला वाचवणे त्यांना अवघड गेले असते आणि त्यांना पकडणे सोपे झाले असते. -
चालायला गेल्यावर १०२ च्या खिडकीखाली बर्फातली ऊडी, मशिनरी रुममधला सेटअप करणे, मग रूममध्ये आल्यावर आधी खिडकी ऊघडून ठेवणे, कॉरिडोर मध्ये लोक आहेत ह्याची आयहोल मधून बघत खात्री करणे, स्वतः किंकाळी फोडून हल्ला माझ्यावर आधी झाला असे भासवणे, मग बंदूक घेवून मिसेस ऑस्ट्रींसमोर आल्यावर मिसेस ऑस्ट्रींची किंकाळी, 'मला मारू नकोस' म्हणणे आणि त्यांना दोन गोळ्या मारणे. जे बाहेरच्या लोकांनी ऐकले.
एवढे करूनही गन, खिडकीचे हँडल, अंगातले कपडे, कपड्यांवरचा गन पावडर रेसिड्यू, बोल मधले बटाटे आणि त्यांची फॉईल आणि मिसेसची ज्वेलरी ह्या सगळ्यांची विल्हेवाट लावणे कसे जमवणार? गन आणि खिडकीचे हँडल बर्फावर फेकले तरी मेटल डिटेक्टर ने सापडता येते पण अंगातल्या कपड्यांची विल्हेवाट कशी लावणार ते कुठे फेकणार? समजा कपडे न घालता खून केला, आंघोळही केली पण गोळ्यांचे आवाज ऐकून कोणी लगेच आत आले असते आणि हे सगळे करायला वेळंच मिळाला नसता तर?
मग आत जाऊन स्वतःच्या कपाळावर फ्लॉवरपॉट मारून घेणे, (व्य्क्तीला स्वतःला स्वतःच्या डोक्याच्या मागच्या भागात जोरात मारून ईजा करून घेणे अवघड आहे ) तिसरीच व्यक्ती रूममध्ये होती आणि तिने फ्लॉवर पॉटवरचे ठसे धुण्याचा प्रयत्न केला असे भासवणे ( कारण फक्तं त्यांचेच पूर्ण ठसे फ्लॉवरपॉटवर सापडले असते तर मग संपलीच केस, ऑस्ट्री अडकले असते ) आणि बाथरूममध्ये झोपून जाणे. जे बेशुद्धं पडल्याचे एक नाटक आहे जे त्यांना फार खुबीने करावे लागले असते कारण बुखारेस्ट मध्ये डॉक्टर्स आहेत हे त्यांना माहित होते. (रिअल लाईफमध्ये आपण फक्तं बेशुद्धंच पडू ईतपतंच वार स्वतःवर करणे आणि बेशुद्धं पडल्याचे नाटक करणे हा अवघडातला अवघड प्रकार आहे, एकवेळ स्वतःला मारणे, आत्महत्या सोपी आहे पण न मरता बेशुद्धंच पडू असे प्रिसिजनने करणे अवघड आहे ).
ह्या सगळ्या गुंतागु़ंतीमुळे मि. ऑस्ट्रींनी हे घडवून आणण्याची शक्यता फारंच कमी आहे. पुन्हा आजवर त्यांनी बायकोविरूद्धं एक शब्दंही काढला नव्हता, खून करणे म्हणजे त्यांच्या स्वभावाविरूद्धं १८० चा घुमजाव करणे ठरले असते.

मग कोणी केला खून ?
तर खून केला 'विंटर वुल्फ' ह्या कल्पनेने अर्थात सर्वर 'रेनर्ड फ्रॉस्ट'ने
त्याने आत आल्या आल्या मिसेस ऑस्ट्री फोनवर आहेत आणि पाण्याच्या आवाजावरून मिस्टर ऑस्ट्री बाथरुममध्ये हे ताडले. सायलेंसर गनमधून मिसेस ऑस्ट्रींना दोन गोळ्या घातल्या आत जाऊन बाथरूमची लाईट बंद करत मि. ऑस्ट्रींवर फ्लॉवरपॉटने हल्ला केला. संशय तयार करण्यासाठी मुद्दाम फ्लॉवरपॉट धुऊन ठेवला, खिडकी ऊघडली, "$WOLF$" ची अंगठी ठेवली, बाईंचे दागिने काढले, पटकन डिनर टेबल सेट करून डिनर सर्व केले आणि मुझिक सिस्टिममध्ये एक सीडी टाकून तो निघून गेला. जाण्याआधी तो मिसेस ऑस्ट्रींच्या फोन मध्ये (जि मिसेस ऑस्ट्री वापरत असल्याने अनलॉक्ड मिळाला असेल) स्केड्यूल्ड मॅसेज डिलवरी करायला विसरला नाही आणि रूममधून गेल्यानंतर त्याने मिसेस ऑस्ट्रींच्या नावाने मसाज सेशनचे रजिस्ट्रेशनही केले.
अर्थात हे त्याने आधीपासूनच प्लॅन केले असणार कारण एकतर तो स्वतः विंटर वुल्फ असेल (जी शक्यता कमी आहे) नाही तर विंटर वुल्फचा कॉपी कॅट (ज्याची १००% शक्यता आहे). सर्वर लोकांना मल्टिकोर्स मील सर्व करतांना वेळ लागण्याचे कारण म्हणजे ' भांड्यांचे आवाज येणार नाही ह्याची काळजी घेत नजाकतीने मांडणी करणे' एकदा का दोन्ही ऑस्ट्रींचे काम तमाम झाले की त्याला अशी नजाकत दाखवत मांडणी करायची गरंजच नव्हती जिथे त्याने त्याला आधीच्या गोष्टींना लागणारा वेळ कवर केला. बोल मध्ये बटाटे त्याने सर्व केलेच नाहीत. सर्वर लोक नेहमी पांढरे कापडी हँडग्लवज घालून असतात त्यामुळे कुठे त्याचे ठसे येण्याचा प्रश्नंच नव्हता. वादळामुळे पोलिस रात्रंभर येवू शकणार नाही हेही त्याला माहित होते. खिडकीचे हँडल, बर्फातल्या खुणांची आणि मशिनरी रुममधली अरेंजमेंट तो स्टाफ असल्याने त्याच्यासाठी बिल्कूल अवघड नव्हती. ऑस्ट्रींचे बाहेर जाणेही त्याला माहित असावे आणि मार्टिनेझ व सायमन बरोबरचे भूतकाळातले भांडण देखील.
आपण दुसरी डिलवरी द्यायला पुन्हा येणारंच आहोत हे त्याला माहित होते आणि सगळ्याच फ्लोर वर वर्दळ आहे हे सुद्धा. त्याने दुसर्‍या फेरीत फक्तं रिमोटने ( ऑस्ट्रींची रूम फिक्स असल्याने आणि तो स्टाफ असल्याने त्यांच्या रुममधल्या ओरिजिनल रिमोटची फ्रीक्वेन्सी मॅच करत दुसरा रिमोट आधीच बनवून ठेवणे त्याच्यासाठी सोपे आहे) सीडी प्प्लेअर ऑन केला आणि पुढचा कि़ंकाळी, गनशॉट्स वगैरे घटनाक्रम घडला. तो दोनच गोळ्या वापरू शकत होता कारण सीडी मध्ये दोन गोळ्यांचेच आवाज रेकॉर्ड होते. म्हणून बेसावध ऑस्ट्रींवर त्याने फ्लॉवर पॉट वापरला. पुन्हा 'विंटर वुल्फ' ने आजवर कधीच पुरुषांना मारले नसल्याने त्याला ऑस्ट्रींचा जीव घेता येण्यासारखे नव्हते. "$WOLF$" ची अंगठी त्याने विंटर वुल्फ बद्दल ऊपलब्धं माहितीवरून बनवली पण अंगठीचे एक्झाक्ट मेजरमेंट्स माहित असणे त्याला शक्य नव्हते. तो हॉटेलचा स्टाफ असल्या कारणाने त्याला हॉटेलमध्ये सगळीकडेच अ‍ॅक्सेस होता. घटनेनंतरही स्टाफ असल्याने त्याला हॉटेलमध्ये सगळीकडे फिरण्याची मोकळीक होती म्हणून गन, हँडल चोरीचा माल लपवणे, कपडे बदलणे सहज शक्य होते.
त्याच्यासाठी एकंच गोष्टं महत्वाची होती ती म्हणजे मि. ऑस्ट्रींना त्याचा चेहरा, कपडे न दिसणे, जे त्याने लाईट घालवून जमवले.
ती सीडी हीच रूममधली जास्तीची गोष्टं होती, पण अश्या क्राईमनंतर सीडी प्लेअर किंवा म्युझिक सिस्टिम चेक करावे हे सुचणे अवघड आहे.

माझ्यामते ऑस्ट्रींना शेवटचे जिवंत कोणी बघितले तो पहिला संशयित असायला हवा होता. Happy

रेनर्ड (युरोपिअन साहित्यात एका फेमस कोल्ह्याच्या पात्राचे नाव आहे) फ्रॉस्ट (हिवाळा, बर्फ)... अर्थात विंटर वुल्फ सारखे 'स्नो फॉक्स'
https://en.wikipedia.org/wiki/Reynard

ओह सर्वर च निघाला खुनी Happy
मी इथे खूप लिहिले नाही पण वाचत होते. आणि विचार चालू होते एकीकडे मनात.
लिहीत जा अजून Happy

बरेच लोक लिहित नसले तरे वाचत असावेत असा अंदाज होताच.
चीकू तुम्ही शेवटपर्यंत अथक प्रयत्न करीत राहिलात ह्यासाठी तुमचे खूप कौतूक वाटत आहे आणि त्यासाठी तुमचे स्पेशल आभार.
सहिल शहांनी पहिल्यांदा रेकॉर्डींगची शक्यता बोलून दाखवली होती पण खिडकी कधी ऊघडली ह्याचे त्यांचे बेस अ‍ॅझंपशनच चुकीचे असल्याने पुढचा कनक्लूजनचा डोलारा ऊभा राहिलाच नाही.
मैत्रेयी, पायस, श्रद्धा, मामी, साहिल, निरा ह्यांनी घटनाक्रमाच्या ईतर शक्यता बोलून दाखवल्या, त्यांनी केसच्या अभ्यासासाठी दिलेल्या वेळबद्दल त्यांनाही धन्यवाद.
खेळात भाग घेणार्‍या किंवा नुसतेच वाचणार्‍या सगळंयानाच धन्यवाद. मला नेहमीप्रमाणेच फार मजा आली ह्या केस मध्येही.

केस किंवा त्याच्या सोल्य्यूशनबद्दल काही शंका, प्रश्नं असल्यास नक्की विचारा.

तणावाचे दोन क्षण असेच गेले असतील नसतील तोच त्या पोरगेल्याश्या सर्वरला अचानक काही तरी दिसले आणि तो पुन्हा ३०२ च्या दिशेने धावत सुटला. चपळाईने त्याने ३०२ च्या दाराच्या बाजूलाच असलेला ईमर्जन्सी फोन ऊचलून '३०२ मध्ये गोळीबार झाला आहे लवकर या' असे ओरडून फोनचे रिसिवर टाकून देत झटक्यात दरवाजापासून बाजूला होत मागे फिरला.

हे काय होते? काय दिसले ?

हे काय होते? काय दिसले ? >> कॉरिडोर मध्ये ३०२ च्या दरवाजाबाहेर लावलेला ईमर्जन्सी फोन.
फोन ३०२ च्या दरवाजाजवळ होता आणि आतला गनमॅन बाहेर येण्याची शक्यता असल्याने त्याने प्रसंगावधान दाखवत घाईने सिक्युरिटीला फोन लावला आणि दोन शब्दं बोलून, फोन टाकून पुन्हा मागे फिरला.
बहूतेक ईमर्जन्सी फोन 'हॉट लाईन' असतात म्हण्जे रिसिवर ऊचलला की लगेच पलिकडे एका रिंग मध्येच अटेंडंट कडून रिसिव केला जातो. नंबर डायल करण्याची गरज नसते.

हे काय होते? काय दिसले ? >> कॉरिडोर मध्ये ३०२ च्या दरवाजाबाहेर लावलेला ईमर्जन्सी फोन. >> अच्छा...मला वाटलं की ईमर्जन्सी फोन करायचं फक्त निमित्त होतं, त्याला काहीतरी वेगळं दिसलं असेल...

स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद हा.ब.

मस्त केस बर्ग ! दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल सिनेमा आठवला !
मि ऑस्टी दोषी वाटत आहेत.
रुम सर्वर ने सांगितल्या प्रमाणे "मी आत आलो तेव्हा मिसेस ऑस्ट्री वाईन पीत होत्या आणि फोनवर काही तरी पहात होत्या." ही वाईन कधी मागवली ? अती श्रीमंत ऑस्टी स्कॉटलंट हून वाईन घेऊन येतील असे वाटत नाही.

दुसर्‍या फेरीत फक्तं रिमोटने ( ऑस्ट्रींची रूम फिक्स असल्याने आणि तो स्टाफ असल्याने त्यांच्या रुममधल्या ओरिजिनल रिमोटची फ्रीक्वेन्सी मॅच करत दुसरा रिमोट आधीच बनवून ठेवणे त्याच्यासाठी सोपे आहे) सीडी प्प्लेअर ऑन केला आणि पुढचा कि़ंकाळी, गनशॉट्स वगैरे घटनाक्रम घडला. >> hotel room च्या बाहेरुन रीमोट ने operate केल्यास cd player on होईल का? तेही दरवाजा बंद असतांना.. I doubt that...
2. pseudo wolf ला जर त्यानेच हे काम केलं आहे हे दाखवायचं होतं ( अंगठी ) तर तो flowerpot फक्त धून कशाला ठेवेल?
3. CD सापडणारच नाही याची काय gurantee ? त्यापेक्शा.. नुसत शहरातून पळून जाण सोपं.. नाहितरी.. पोलीस लोकं सकाळ पर्य्ंत येणार नव्हतेच.. ( हिमवाद्ळ manage करावं लागेल..)

हाब, छान आहे तर्कसंगत घटनाक्रम. मात्र अशा खुनांमध्ये सर्वरवर सगळ्यात पहिले संशय येईल आणि त्याची कसून तपासणी होईल. शिवाय, फ्लॉवर पॉटनं मारल्यावर रक्ताचे शिंतोडे त्याच्या ग्लव्जवर (जे पांढरेच असतात) आणि त्याच्या युनिफॉर्मवर ( जो बहुतांशी पांढरा असतो) उडालेच असणार आणि ते कोणापासून दवडणे कठीण वाटते.

शिवाय तो ड्युटीवर असताना, चटकन आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलणे, कपडे आणि इतर वस्तू लपवणे इतकं सोपं नाहीये. त्याची रूम हॉटेलच्या मुख्य विभागापासून दूर असणार. बरेचदा स्टाफरूम्स हॉटेलना संलग्न नसतात कारण ड्युटीवर नसलेल्या स्टाफला सहज ये-जा करता येऊ नये याची काळजी घेतलेली असते. पण इथे हे विंटर हॉटेल असल्याने धरून चालूयात की हॉटेलातून स्टाफरूम्सकडे जाण्यासाठी आतूनच रस्ता / लिफ्ट होती. पण तरीही त्याची कार्ट अन-अटेंडेड ठेऊन त्याला रूमवर जाऊन कपडे बदलून, वस्तू लपवून येण्यास किमान १५ मिनिटे लागतील. त्याची सर्विस एकामागोमाग एक असेलच. शिवाय त्याच्यावर लक्ष ठेवणारे, तो वेळेत एक सर्विस संपवून पुढची करत आहे याची खात्री करून घेणारे कोणीतरी असणारच. या सर्विसेस वेळेत होण्याबद्दल काटेकोरपणे लक्ष दिले जाते.

अजून एक म्हणजे पुढची सर्विस कधी हे त्याला आधीच कळणार नाही. कदाचित त्याला सर्व्ह करावी लागणारी ऑस्ट्रींची एकच सर्विस असू शकते किंवा आयत्यावेळी अचानक दुसरी सर्व्हिसही येऊ शकते. इतकी अनसर्टानिटी तो त्याच्या प्लॅनमध्ये गृहित धरू शकत नाही. कारण वेळ डिनरची होती. कोणीही हाडाचा सर्वर लंच डिनर च्या वेळात खून प्लॅन करणं शक्य नाही. आणि मर्डर तर प्लॅन्ड आहे.

शिवाय, स्टाफ झाला तरीही हॉटेलबाहेर सहज बाहेर पडणं कठीण. स्टाफची तर नक्कीच तपासणी होते हॉटेलबाहेर पडताना.

मस्त केस हाब.
यावेळी एकतर केस पहायलाच उशीर झाला अन मीटिंग्स अन इतर व्यापात पाठपुरावा करायला जमलं नाही.
पण खूप छान लॉजिकल रीझनिंग असलेलं सोल्यूशन दिलंय.

लगे रहो.
पुढच्या केसच्या प्रतीक्षेत.

(फक्त एकच विनंती. टीजरमधे नुसतं कमिंग सून द्यायच्या ऐवजी टेंटेटिव्ह रिलीझ डेट असूदे)

सर्वर खुनी??? सम्हाउ नाही पटतंय मला. त्या निवडुंग्या अजगारासारखंच फीलिंग आलं मला ह्यावेळीही. Light 1
मि. ऑस्ट्री एकटे किंवा सायमन, हिरोशी किंवा तो बिझिनेसमन मिलिभगत करुन चालले असते खुनी म्हणुन Happy

पण केस जबरदस्त. तुम्ही खुप विचार करुन केस तयार करता ते कळतं. ग्रेट.

सर्वर खुनी??? सम्हाउ नाही पटतंय मला. त्या निवडुंग्या अजगारासारखंच फीलिंग आलं मला ह्यावेळीही. >> सस्मित अनुमोदन.

hotel room च्या बाहेरुन रीमोट ने operate केल्यास cd player on होईल का? तेही दरवाजा बंद असतांना.. I doubt that... >> There are many remotes out there that work through walls. Try to google about them.

pseudo wolf ला जर त्यानेच हे काम केलं आहे हे दाखवायचं होतं ( अंगठी ) तर तो flowerpot फक्त धून कशाला ठेवेल? >> तुम्ही सर्वर रेनर्ड विंटर वुल्फ आहे किंवा असल्याचे भासवतो आहे ह्या अँगलने विचार करत आहात. जे बरोबर आहे पण हाच विचार अजून थोडा पुढे नेणे जरूर आहे.
हे लक्षात घ्या तो स्वतःला विंटर वुल्फ म्हणवून घेत नाहीये तर हे काम विंटर वुल्फ ने केले असे भासवतो आहे. आणि जर 'पोलिसांना' वाटले हे फक्तं विंटर वुल्फच्या नावावर बिल फाडणे आहे तर हा घ्या विंटर वुल्फ चा बनाव कोणी रचला असू शकतो त्याचा संशयित- मि. ऑस्ट्री.
ज्या शस्त्राने ऑस्ट्रींवर हल्ला झाला तो फ्लॉवर पॉट धुतलेला आहे (विंटर वुल्फ अंगठी ठेऊन जातो आहे तर तो निश्चितंच फ्लॉवर पॉट धुणार नाही) हा संशय बनवला आणि त्यावर मि. ऑस्ट्रींचे पुसट ठसे सापडले की हा फ्लॉवरपॉट मि. ऑस्ट्रींनीच धुतला हा संशय तयार होतो आणि वुल्फ चा बनाव कोणी रचला असू शकतो त्याचा संशयित सुद्धा. Happy
(तर पॉट वर ऑस्ट्रींचे पुसट ठसे हे सर्वर रेनर्ड ने मुद्दाम ठेवलेले होते जे आधी लिहायचे राहून गेले)

3. CD सापडणारच नाही याची काय gurantee ? त्यापेक्शा.. >> सापडण्याची शक्यता आहे पण कमी. सापडली तरी कोणी ठेवली कधी ठेवली ह्याचा शोध लावणे महाकठीण.
समजा नाही सापडली आणि काही दिवसांनी पोलिसांनी रूमचे सील काढून टाकले तर रेनर्ड कधीही जाऊन ती सीडी काढून घेऊ शकतो.

नुसत शहरातून पळून जाण सोपं.. नाहितरी.. पोलीस लोकं सकाळ पर्य्ंत येणार नव्हतेच.. ( हिमवाद्ळ manage करावं लागेल..) >> सहा वाजता मेन गेट बंद झाले आणि घटना सहा नंतर घडली. कसा पळून जाणार होता तो? He is hiding in plain sight.

रेनार्डचा plan चांगलाच होता. फक्त १-२ रिस्क होत्या
१. मिसेस ऑस्ट्रीना गोळ्या घातल्यावर त्या जोराने ओरडल्या असत्या तर बिंग तेव्हाच फुटले असते
२. मि. ऑस्ट्रीवर प्रहार केल्यावर ते ओरडले, बाथरूम आत असल्याने ते बाहेर ऐकू गेले नाही असे समजू या पण जर वरीलप्रमाणेच बाहेर आवाज गेला असता तर प्रोब्लेम झाला असता
३. रिमोट ऑपरेट करण्यासाठी रेनार्डला नंतर परत त्याच रुमसमोर येणं जरूरीचं होतं, समजा त्याची सर्विसची वेळ बदलली असती, अचानक काही last minute changes आले असते तर परत गोंधळ झाला असता. समजा तो येण्याआधीच सायमन वडलांना भेटायला आला असता तर?
एकूण plan चांगला असला तरी काही unknown factors ही होतेच. त्यामुळे तेवढा fullproof वाटला नाही.

मात्र अशा खुनांमध्ये सर्वरवर सगळ्यात पहिले संशय येईल आणि त्याची कसून तपासणी होईल. >> कोण घेणार आहे संशय मामी
पोलिस की डिटेक्टिवज ? .... पोलिस आणि डिटेक्टिव तुम्ही आणि केस सोडवणारे ईतर सगळेच तर होते की आतापर्यंत. जी माहिती पोलिसांकडे होती तीच ईथे सगळ्यांना सांगितली होती, मग कोणी घेतला का संशय सर्वर रेनर्डवर Happy

रक्तं ऊडाले असते तर बाथरूममध्ये ईतर ठिकाणीही सापडले असतेच, ज्याचा ऊल्लेख नाहीये. चीकू ने अजून कुठे रक्तं सापडले का त्यालाही मी 'नाही' असे ऊत्तर दिले.
तरी समजा..... रक्तं वगैरे ऊडून कपडे बदलण्याची गरज पडलीच तर तो ऑस्ट्रींच्या रूममधूनच बदलून निघेल ना (एवढा मोठा प्लॅन केला आहे तर एक जास्तीचा शर्ट जवळ ठेवणे अवघड नाही) स्वतःच्या रूममध्ये का जाईल तो त्यासाठी. आणि तसेही तो सर्वर आहे किचनमध्ये जा ये करतो जिथे कपड्यांवर डाग वगैरे लागणे सहज शक्यं आहे. स्वच्छं, नीटनीटके, डागरहित कपडे असणे हा त्याच्या कामाचा भाग आहे मग, त्याने डाग पडले म्हणून कपडे चेंज केलेही तरी ते कुणाला विचित्रं वाटू नये. पुन्हा तो युनिफॉर्म घालत असल्याने कपडे बदलले तरी ते कळून येणे अशक्य आहे.
त्याची जबानी बघा त्याने स्पष्टं म्हंटले आहे त्या फ्लोरचा मल्टी कोर्स सर्वर तो एकटाच आहे. रोजच्या डिनर ऑर्डर्सचा पॅटर्न त्याला माहितंच असणार. आणि ऑस्र्टींच्या ऑर्डर बरोबर त्याच मजल्यावरची दुसरी मल्टी-कोर्स ऑर्डर आल्याची शक्यता अधिक आहे म्हणूनच तर तो लगेच फ्लोरवर परत आला. ही घटना अजून १० मिनिटांनी घडली असती तरी काही फरक पडत नवह्ता.
त्यांचे कपडे पूर्ण पांढरे नसतात तर थ्री पीस सूट, पांढरे हात मोजे, कमरेला पांढरा रुमाल वगैरे असते.

शिवाय, स्टाफ झाला तरीही हॉटेलबाहेर सहज बाहेर पडणं कठीण. स्टाफची तर नक्कीच तपासणी होते हॉटेलबाहेर पडताना. >> हे कसं काय? ते काही ज्वेलरी शॉप नाही स्टाफची बाहेर पडतांना तपासणी व्हायला. आणि तो राहतोच त्या हॉटेलमध्ये त्याचे घरंच आहे ते.. डिनर सर्विंग टाईम नसण्याच्या काळात तो नक्कीच जमवू शकतो हे.

पण सर्वर ने खून करण्याचे कारण काय? >> दक्षिणा... चोरी
विंटर वुल्फ सारखे रेनर्ड ने खून करून मिसेस ऑस्ट्रींच्या अंगावरचे मौल्यवान दागिने लंपास केले. डायमंड रिंग आणि नेकलेस वगैरे दागिन्यांसाठीच मिसेस ऑस्ट्रींचा खून झाला.

१. मिसेस ऑस्ट्रीना गोळ्या घातल्यावर त्या जोराने ओरडल्या असत्या तर बिंग तेव्हाच फुटले असते >> त्याने १००% मिसेस ऑस्ट्री फोन मध्ये बिझी असतांना त्यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि दुसरी लगोलग छाती मध्ये. मिसेस ऑस्ट्रींना कळालेही नसेल काय झाले ते.
डोक्यात आणि छातीत गोळी मारणे म्हणजे विना आवाज १००% मृत्य्यूची गॅरेंटी.
मेंदूमध्ये रक्त स्त्रावाने सेंसरी कार्य बंद होतात. छाती मध्ये रक्तस्त्रावाने रेस्पिरेटरी सिस्टिम कोलमडून आवाज निघत नाही.

ह्याचे एक विचित्रंं भयानक उदाहरण... आई वडील गँबलिंगसाठी पैसे देत नाहीत म्हणून अमेरिकेतल्या एका मुलाने रात्री झोपेत आई वडिलांच्या डोक्यात कुर्‍हाड मारली.. आई लगेच मेली पण वडील लगेच मेले तर नाहीत पण त्यांनी डोक्यात अडकलेल्या कुर्‍हाडी सहित नेहमीप्रंमाणे पहाटे ऊठून ड्राईव वे मधून न्यूजपेपेर ऊचलून आणला , सिरिअल्स बनवले. ते खात असतांना ते खुर्चीतून पडले आणि मेले.

२. मि. ऑस्ट्रीवर प्रहार केल्यावर ते ओरडले, बाथरूम आत असल्याने ते बाहेर ऐकू गेले नाही असे समजू या पण जर वरीलप्रमाणेच बाहेर आवाज गेला असता तर प्रोब्लेम झाला असता. >> होऊ शकले असते पण बेसावध माणसावर झालेला हल्ला ते ही प्रशस्तं अश्या स्वीट च्या बेडरूमच्या आतल्या बाथरूममध्ये.. आवाज येण्याची शक्यता कमी.

३. रिमोट ऑपरेट करण्यासाठी रेनार्डला नंतर परत त्याच रुमसमोर येणं जरूरीचं होतं, समजा त्याची सर्विसची वेळ बदलली असती, अचानक काही last minute changes आले असते तर परत गोंधळ झाला असता. >> ह्याचे ऊत्तर वरती दिले आहे... दोन तीन महिने काळासाठी राहणारे लोक रोज रोज ऑर्डर न देता त्यांच्या डिनर ऑर्डर ह्या बहुतेक फिक्स असतात. स्पेशल रिक्वेस्ट किंवा बदल असेल तर तसे कळवले जाते.

समजा तो येण्याआधीच सायमन वडलांना भेटायला आला असता तर? >> सावत्रं आई मुळे त्यांच्यामध्ये वितुष्टं आहे.. आईने ऑलरेडी एकदा रूममधून हाकलून दिले असतांनाही वडील गप्प होते मग सायमन का येईल परत? त्याला वडिलांना भेटायचेच असते तर तो त्यांना एकट्याने गाठून भेटला नसता का? आई रूममध्ये असतांना का?

सर्वर खुनी??? सम्हाउ नाही पटतंय मला. >> सस्मित, का नाही पटत आहे.. ऑस्ट्रींना मारण्याची त्याच्या ईतकी बेस्ट संधी होती का कुणाकडे ?

मि. ऑस्ट्री एकटे किंवा सायमन, हिरोशी किंवा तो बिझिनेसमन मिलिभगत करुन चालले असते खुनी म्हणुन >> बिझनेसमन माणसे दोर्‍या लाऊन खिडकीतून चढत ऊतरत आहेत, दोरीने बूट सोडून बर्फावर खुणा करत आहेत, खिडक्यांची हँडल्स बनवून आणत आहेत किंवा वयोवृद्धं ऑस्ट्री असा स्टंट अंमलात आणत आहेत वगैरे विश्वसनीय वाटले असते का तुम्हाला? Happy
दोर्‍या चढणे ऊतरणे हिरोशींना शक्यं असले तरी, हिरोशी खरोखरंच गिर्यारोहक असू शकतात जे मिसेस ऑस्र्टींच्या भावाच्या सांगण्यावरून बुखारेस्ट मध्ये रहायला आले.

यावेळी एकतर केस पहायलाच उशीर झाला अन मीटिंग्स अन इतर व्यापात पाठपुरावा करायला जमलं नाही. >> अँकी, अरे गणपतीच्या आठवड्यात लुडबूड नको म्हणून विकेंडलाच टाकली होती केस. Happy

चीकू,
त्या क्लू विषयी लिहायचे राहिले.
सर्व संशयितांच्या ( समजा रेनर्ड फ्रॉस्ट सहित) रूम्सची झडती घेतली तेव्हा काही सापडले नाही आणि मशिनरी रूम आणि बुखारेस्टच्या बिल्डिंग बाहेरच्या ग्राऊंडवर जिथवर कोणी गन फेकू शकते असे वाटते तिथपर्यंत मेटल डिटेक्टरने तपासणी करूनही काही सापडले नाही, असे लिहिले होते.

फ्रॉस्ट सोडून कोणीही संशयित रूमच्या बाहेर पडला नसल्याने (पडला असता तर कॉरेडोरमधल्या कॅमेरात दिसले असते) ह्याचा अर्थ गन हॉटेलमध्येच होती पण कुणाच्या रूम मध्ये नव्हती. घटनेनंतर फक्तं फ्रॉस्टला हॉटेलमध्ये सगळीकडे अ‍ॅक्सेस होता त्यामुळे त्याच्याकडे थेट फिंगर पॉईंटिंग होत होते.

छान. खूप विचार करून तुम्ही ही केस बनवली आहे. loose ends नाहीतच काही. आता रेनार्डला कोणी संशयित का ठरवले नाही याचे नवल वाटते Happy
असो. पुढची केस लवकर टाका Happy

There are many remotes out there that work through walls. Try to google about them. >> Generally Consumer products like TV, DVD Players use Infrared Remote Control Technology based Remote Control. And for operating them we need line of sight operation. Signal can not pass through walls. If at all we need the signal to pass through walls we need IR extenders or such infrastrucuture; which again is limited only inside hotel rooms and can not be operated through outside. Moreover nothing in electronics is just plug and play inless and until it comes from the OEM; it needs a lot of testing, trial and error. I don't know when the murderer would find time to do that. Was he an electronics geek as well?

[ sorry for long post in english.. ]

या problem वर solution हेच की खून झाल्यावर खुनीने CD टाकून CD player on केला.. CD मध्ये पहिले 20 मी. blank होते.. आणि त्यानंतर ओरडणे होते.. जे की play झाले.. [ यात फक्तं खूनीचे timing perfect हवे..]

शिवाय..flower pot धूवून ठेव्ण्याचे logic पटलेले नाही मला.. पण ते insignificant म्हणून मी case solve करण्याच्या वेळी सुद्धा सोडून दिले होते..

rest of the explanation is logical.. and case description was very good.. all the best for next case.. I am waiting Happy

विक्टोरिअन काळातला चेहरा असला तरी हॉटेल, प्रत्येक मजल्यावरती प्रशस्तं आणि भव्य स्वीट्स, जकुझी पासून अल्ट्रा लक्झुरी किचन पर्यंत, बिग स्क्रीन टीव्ही, हजारो चॅनल्स, साऊंड सिस्टिम, सुपरफास्ट ईंटरनेट, अविरत फोन सेवा, लायब्ररी, सिनेमा थिएटर, हीटेड स्वीमिंग पूल, जिम, छोटेसे हॉस्पिटल आणि गरज पडल्यास हेलिकॉप्टर अश्या यच्चयावत सुविधा, सुरक्षा आणि मनोरंजनासाठीच्या अत्याधुनिक तंत्रांनी सुसज्ज होते. >> ह्या वर्णनात स्पेसिफिकली रिमोट कंट्रोल RF बेस्ड किंवा ब्ल्यूटूथ बेस्ड आहे असेही लिहून हवे होते का Wink
खरे तर मला सीडी वापरली असे सांगायचीही गरज नव्हती. वाय-फाय कनेक्टेड होम थिएटर आहे किंवा ब्लू टूथ वापरून केले (जे तुम्ही आम्ही रोज करतो) असे म्हणू शकलो असतो पण मला ते खूप जास्तं टेक्निकल बनवायचे नव्हते. आता वाय फाय कनेक्ट करायला गीक असावा लागत नाही की त्याच्याच हॉटेलमधल्या रूमच्या वायफायचा पासवर्ड मिळवणे त्याला अबघड आहे .
सगळ्यांचे एकंच ऊत्तर आहे, तो स्टाफ होता आणि तिथेच रहात होता म्हणून रिमोट काय किंवा वायफाय काय ते जमवणे सहज शक्यं होते.
ते जमवण्यासाठी रिसोर्सेस आणि टाईम दोन्ही होते त्याच्याकडे.
मर्डर केल्यानंतरच फ्रीक्वेन्सी वगैरे मॅच करण्याची गरज नाही. ऑस्ट्रींची रूम दरवर्षी आणि विंटरचे तीन महिने फिक्स असल्याने ऑस्ट्री आणि विंटर येण्याआधीच्या ९ महिन्यात ते काम कधीही करून ठेवता येणे शक्यंच आहे. साधे रिमोट सेट करायला ईलेक्रॉनिक्स गीक कशाला असायला हवे कोणी?

शिवाय..flower pot धूवून ठेव्ण्याचे logic पटलेले नाही मला.. पण ते insignificant म्हणून मी case solve करण्याच्या वेळी सुद्धा सोडून दिले होते.. >> नेमके काय पटले नाही? जसा त्याने अंगठी ठेवून विंटर वुल्फचा बागुलबुवा तयार केला तसा मुद्दाम फ्लॉवर पॉट धुऊन त्यावर ऑस्ट्रींच्या बोटाचे ठसे लाऊन अजून एक बागुलबुवा तयार केला.
जसे खिडकी ऊघडल्याने मार्टिनेझ, सायमन आणि हिरोशी संशयित झाले तसे फ्लॉवरपॉट धुतल्याने आणि ठसे सापडल्याने ऑस्ट्री संशयित झाले. Happy

ह्या वर्णनात स्पेसिफिकली रिमोट कंट्रोल RF बेस्ड किंवा ब्ल्यूटूथ बेस्ड आहे असेही लिहून हवे होते का Wink >> RF based पण audio/video devices आहेत का? Bluetooth साठी त्याला थोडा software control लागणार [ म्हणजे साध्या remote ने काम होणार नाही ].. wifi मध्ये पण wifi ने on/off control होत असेल का? का फक्तं net connectivity achieve होते? .. anyway.. let's not go so much into technical.. what matters is it was not entirely undoable.. so I am fine with it..

नेमके काय पटले नाही? जसा त्याने अंगठी ठेवून विंटर वुल्फचा बागुलबुवा तयार केला तसा मुद्दाम फ्लॉवर पॉट धुऊन त्यावर ऑस्ट्रींच्या बोटाचे ठसे लाऊन अजून एक बागुलबुवा तयार केला.
जसे खिडकी ऊघडल्याने मार्टिनेझ, सायमन आणि हिरोशी संशयित झाले तसे फ्लॉवरपॉट धुतल्याने आणि ठसे सापडल्याने ऑस्ट्री संशयित झाले. Happy >>

The fact that flower pot is washed indicates Austi didn't do it.. असं मला वाट्तं.. कारण.. त्यांचे ठसे हे झटापटीत पण येउ शकतातं ..

सह्ही हाब. आता सगळंच पटतंय.
बॉलीवुडीय माइन्ड थिंकिंग असल्या कारणाने <<<<<बिझनेसमन माणसे दोर्‍या लाऊन खिडकीतून चढत ऊतरत आहेत, दोरीने बूट सोडून बर्फावर खुणा करत आहेत, खिडक्यांची हँडल्स बनवून आणत आहेत किंवा वयोवृद्धं ऑस्ट्री असा स्टंट अंमलात आणत आहेत वगैरे>>>> काही वेळासाठी पटवुन ही घेतलं असतं. Lol
पण तुम्ही मस्त केस उभी केली आहे. ग्रेट.

हो अभिनव, RF बेस्ड ऑडिओ विडिओ डिवायसेस आहेत बाजारात ऊपलब्धं.. तसेही कुठला ही IF डिवाईस सुद्धा RF रिसिवर लाऊन एनेबल करता येतो. सगळ्या स्मार्ट टीवीं मध्ये IF आणि RF दोन्ही कॉन्फिगर करता येतात. एवढेच नाही तर RF रिसिवर वापरून रिमोटनेच होम थिएटर असलेल्या मिडिया रूम चे लाईट्स ही सोफ्यावर बसल्या बसल्या कंट्रोल करता येतात.
ज्या लोकांनी पूर्ण घरात साऊंड सिस्टिम लाऊन घेतली आहे त्यांना कुठल्याही रूममधून IF साठी लागणार्‍या 'लाईन ऑफ साईट' शिवाय होम थिएटर ऑपरेट करता यावे ह्यासाठीच RF बेस्ड सेटअप वापरतात. आणि डुप्लिकेट रिमोट बनवून सगळ्या रूम्समध्ये ठेवतात जेणेकरून रिमोट सुद्धा कॅरी करावा लागू नये. स्मार्टफोन वरूनही ऑपरेट करता येऊ शकते.

अ‍ॅडवान्स्ड वाय फाय / ब्लू टूथ बेस्ड सिस्टिम कायम ऑन राहू शकतात, त्यांना काम झाल्यावर बंद करायची गरज पडत नाही. ऑडिओ सिग्नल डिटेक्ट झाल्यावर आपोआप ऑन होणारे ही डिवायसेस आहेत.

The fact that flower pot is washed indicates Austi didn't do it.. असं मला वाट्तं.. कारण.. त्यांचे ठसे हे झटापटीत पण येउ शकतातं .. >> आधी झटापट आणि मग फ्लॉवरपॉट धुणे असे होईल ना. झटापटीत ठसे आले तरी ते धुतल्यावर निघून जातील. त्या पॉटवर सापडलेला पुसट ठसा हा 'धुतलेला'' फ्लॉवरपॉट शेवटी कोणी हँडल केला ते दाखवतो, म्हणून ऑस्ट्री संशयित होतात.

Point No. 1 >> Doable आहे.. Agreed..

Point No. 2 >> ऑस्ट्री यांची चूक झाली ( शेवटी ठसे राहिल्यामुळे ) .. असं pseudo wolf भासवतो आहे.. असं मी धरतो.. then that point is also fine..

हुश्श... बेस्ट केस. वेळेत न वाचता आणि प्रतिसाद न दिल्याबद्दल प्रचंड वाईट वाटतंय. Sad
खिडकी आतून उघडली का बाहेरून यावर मी विचार केलेला. आणि आतूनच उघडली असणार कारण बाहेर हंडल घालायला काही स्लॉट असण्याची शक्यता नाही असा तर्क लावून कोणीतरी आतलाच खुनी असणार... आणि बाहेरचा असेल तर आतल्याची मदत असणार असा विचार करून मिस्टर ऑस्ट्रीं खुनी असण्याची शकयता वाटत होती.
वरची उत्तरे वाचता वाचता एकदा मिसेस ऑस्ट्रींनी मिस्टर ऑस्ट्रींच्या खुनाचा प्लान केला. ते बाहेरून फिरून आल्यावर त्याच्या डोक्यात फ्लॉवर पॉट घातला पण ते मेलेच नाहीत आणि जरावेळाने उठून पिस्तुल घेऊन बायकोला मारायला धावले आणि ही ओरडली काका मला वाचवा.. इतका इल्ल्लोजीकल हिंदी मुव्ही विचार पण केलेला. पण सर्वर काही डोक्यात आला नाही.

RF based पण audio/video devices आहेत का? >> वायफाय रिमोट खूपच कॉमन आहेत. आमच्या रोकुत आहे की Proud
इतक्या मोठ्या हॉटेलात गेमिंग कन्सोलही असेलच ज्यात प्लेअर आणि वायफाय रिमोट असेल.
हाब मस्त केस.... वेळेत लिहायला जमलं नाही. असं लिहिण्याचा प्रयत्न नेहेमी करावासा वाटतो पण तेव्हढी चिकाटी टिकत नाही.

धन्यंवाद अमित Happy
माझ्या मते, ह्या केसेस सोडवण्याची बेस्ट मेथड म्हणजे कागदावर 'आपण स्वतः' एकेक पात्रं आहोत ऊदा. हिरोशी किंवा मि. ऑस्ट्री असे समजत जी घटना घडली ती घडवून आणण्यासाठी मला काय काय करावे लागेल ते मांडत लॉजिकशी फारकत कुठे होते आहे ते बघणे. Happy

केस आणि लॉजिकची चिरफाडंच मला पुढच्यावेळी ते अजून वॉटरटाईट, अन-अ‍ॅंबिगिअस बनवण्यासाठी ऊद्यूक्तं करते, म्हणून मी त्यातल्या गॅप्स आणि चुकांबद्दल विचारत राहतो, शंकांना प्रश्नांना ऊत्तरं देत राहतो. Proud

सर्वरने दागिने चोरण्यासाठी मिसेसचा खून करणे आवश्यक होते का? त्याने जसं मिस्टर ऑस्ट्रींना मारून बेशुद्ध केलं तसंच मिसेसनाही करता आलं असतं. पण शुद्धीवर आल्यावर त्या बोलल्या असत्या, त्यामुळे ते आवश्यक होते.

मिस्टरांना मारणे नक्कीच चालले नसते कारण मग संशय शेवटच्या माणसावर (म्हणजे सर्वरवर) आधी आला असता. मिस्टरांना काहीच केलं नसतं आणि मिसेसना मारून खिडकी उघडून पण मेन दारातून पसार झाला असता तर?
मिस्टरांनी रास नहाणात आतून दार लावून घेतलं असतं तर त्याला कदाचित तेच करावं लागलं असतं. कारण आधी मिसेसचा खून आणि मग मिस्टरांना मारणे हा क्रम बदलणे शक्य न्हवते.
मिस्टरांना मारण्याचे प्रयोजन फुलदाणीवर त्याच्या रक्ताचे नमुने सापडणे हेच आहे का? ते नसते सापडले तर केस मध्ये काय फरक पडता?

Pages