'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल' केस ** नव्या संधीसह

Submitted by हायझेनबर्ग on 17 August, 2017 - 11:50

** नव्या संधीबद्दल जाणून घेण्यासाठी केस वाचून झाली असल्यास दुसर्‍या पानावरचा माझा बोल्ड टाईपमधला प्रतिसाद बघा.
https://www.maayboli.com/comment/4105365/edit

दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल

वसंत ऋतू येण्यास अजूनही दोन महिने बाकी असतांना सलग सहा दिवस आणि सहा रात्री आजिबात ऊसंत न घेता पडणार्‍या बर्फाने पर्वतराजीचा ईंचनईंच व्यापला होता. गुडघाभर खोल बर्फातून बाहेर डोक्यावणार्‍या शिळांच्या मागून लांब सुळे आणि करारी नजरेचा सायबेरिअन वाघ झडप घालेल की काय? पाईनच्या ऊंच झाडांमधून गर्जना करत एखादे ग्रिझली अस्वल पाठलागावर येईल की काय? ह्या पर्वतभर अथांग पसरलेल्या बर्फाच्या समुद्रात कुठे साधे खुट्टं वाजले तरी प्रचंड लाट येईल की काय? लाखो वर्षे पृथ्वीला श्वेतनरक बनवून वेठीस धरणारे हिमयुगच परतून आले आहे की काय?
प्रथमदर्शनी कुणालाही असे प्रश्नं पडून एक भयप्रद शिरशिरी त्याच्या मानेवरून ओघळण्याआधी, हा एकवीसाव्या शतकातल्या मनुष्यप्राण्यांच्या जीवनातला एक साधारण दिवसच असावा ह्याची साक्ष देणारा एकमेव पुरावा त्या पर्वतराजीत दिमाखात ऊभा होता. नजर जाईल तिथवर बर्फ लेवून अथांग पसरलेल्या पाईन वृक्षांच्या समुद्रात नांगर टाकून स्तब्धं ऊभ्या सोन्याच्या गलबतासारखे, दुरून बघणार्‍याला हिमगौरीच्या चंदेरी मुकुटावरचे लखाखते सोनेरी रत्नंच भासावे असे 'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल'

8.jpg

घड्याळातली कुठलीही वेळ कायम दिवस रात्रीच्या सीमारेषेवरंच पिंगा घालत असावी ईतपतंच ऊजाडणार्‍या जानेवारीतल्या कडक हिवाळ्याच्या अनेक दिवसांपैकीच तो एक दिवस होता ज्यादिवशी मि. अँड मिसेस ऑस्ट्री चार वाजताच्या शेवटच्या केबल कार ने हॉटेल बुखारेस्ट मध्ये दाखल झाले. पर्वताच्या पायथ्याशी गराज मध्ये गाडी पार्क करून बुखारेस्ट मध्ये येण्यास केबल कार हा एकमेव पर्याय होता. केबल कार आणि सहा मजली बुखारेस्टच्या भोवती ऊभारलेल्या वीस फुटी दगडी भिंतीबाहेर ठेवलेले कुठलेही पाऊल तुमचे ह्या पृथ्वीवरचे शेवटचे असू शकते ह्याची ग्वाहीच जणू बर्फाचा कणनकण ओरडून देत होता.
त्या दगडी भिंतींच्या आड दडलेले हॉटेल बुखारेस्ट मात्रं ह्या पृथ्वीवरचा क्षणनक्षण स्वर्गीय आहे ह्याची हमी देत असावे. विक्टोरिअन काळाची साक्ष देत तीस फुटी ऊंच छताला लटकणारे तीन पुरुष ऊंचीची झुंबरं, संपूर्ण छतावर अप्रतिम नजाकतीने रेखाटलेली ग्रीक देवतांची प्रणयदृष्ये, अनवाणी पायांना गुदगुल्या करणारी मखमली कारपेट, नुकतीच कात टाकून सूर्यप्रकाशात सळसळत झेपावणार्‍या सर्पांसारखे दोन्ही बाजुंनी वर झेपावणारे जिने, सोन्याचा मुलामा दिल्यासारख्या वाटाव्यात अश्या चहूबाजूंच्या भिंती, आणि गूढसे मंद संगीत. जणू दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल म्हणजे ईंद्राची मयसभा, ह्या मयसभेतील एकेक व्यक्ती म्हणजे ईंद्र आणि शची आणि त्यांची बडदास्तं सुद्धां तशीच स्वर्गीय. खर्‍या स्वर्गात बसून पृथ्वीचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळत रहाण्यासाठी मानवाने बनवलेली खिडकी म्हणजे 'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल'.

12.jpg20.jpg

विक्टोरिअन काळातला चेहरा असला तरी हॉटेल, प्रत्येक मजल्यावरती प्रशस्तं आणि भव्य स्वीट्स, जकुझी पासून अल्ट्रा लक्झुरी किचन पर्यंत, बिग स्क्रीन टीव्ही, हजारो चॅनल्स, साऊंड सिस्टिम, सुपरफास्ट ईंटरनेट, अविरत फोन सेवा, लायब्ररी, सिनेमा थिएटर, हीटेड स्वीमिंग पूल, जिम, छोटेसे हॉस्पिटल आणि गरज पडल्यास हेलिकॉप्टर अश्या यच्चयावत सुविधा, सुरक्षा आणि मनोरंजनासाठीच्या अत्याधुनिक तंत्रांनी सुसज्ज होते.
हॉटेल बुखारेस्ट जसे स्वर्गीय होते तसेच अभेद्य देखील. बाहेर निसर्गाने सहा महिने कितीही तांडव केले, कितीही मोठा संहार मांडला तरी बुखारेस्ट मध्ये राहणार्‍या पाहुण्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही की त्यांना कशाची ददात पडणार नाही. एकदा का हॉटेलचे मेन गेट संध्याकाळी सहा वाजता बंद झाले की साधा बर्फातला ऊंदीरही आतून बाहेर जाऊ शकणार नाही की बाहेरून आत येवू शकणार नाही.

पण ऑस्ट्री दांपत्यासाठी, ज्याचे वैभव बघून हुरळून जावे असा कोपरा वा ज्या वस्तूने डोळे दिपावे असे काहीही दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल मध्ये नव्हते. हॉटेलमधला कोपरा न कोपरा आणि वस्तू न वस्तू मागच्या बारा वर्षात त्यांच्या परिचयाची झाली होती. प्रत्येक वर्षीच्या हिवाळ्याचे तीन महिने स्कॉटलंडमधल्या बिझनेस एंपायरच्या धकाधकीपासून लांब हॉटेल बुखारेस्ट मध्ये आरामात घालवण्याचा त्यांचा नेम बारा वर्षांपासून आजही न चुकता चालू होता. वैभव म्हणावे तर त्यांचे स्वतःचे स्कॉटलंड मधले राहते घर हॉटेल बुखारेस्टमधल्या वैभवापेक्षा कांकणभर वरचढंच वाटले असते. वैभवासाठी नव्हे तर आरामासाठी, मावळतीला लागलेल्या आयुष्यातले काही क्षण मनाचे स्वास्थ्यं जपण्यासाठी आणि शांतता मिळवण्यासाठी हॉटेल बुखारेस्टला त्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्वं होते. त्यांच्याच काय, बुखारेस्टमध्ये पुढच्या काही आठड्यांसाठी रहायला आलेल्या जवजवळ वीस जोडप्यांची कहाणी थोड्याफार फरकाने हीच होती. कोणी साठीचे अतिश्रीमंत गृहस्थं तिसरे लग्नं करून आपल्या तिशीच्या बायकोला घेवून आले होते तर कोणी आयुष्यभराच्या जोडीदाराला काळाने हिरावून नेल्याने जुन्या आठवणी जागवण्यासाठी एकट्यानेच आले होते. नुकतेच कोर्टशिप करू लागलेली वा लग्नाच्या बंधनात अडकलेली काही मोजकी तरूण जोडपीही होती तर काही मोडकळीला आलेले लग्नं वाचवण्यासाठी आलेली जोडपीही होती. एकट्याने येवून राहणारे काही मोजके लोकंही होते ज्यांत आपल्या क्लायंट्सच्या बिझनेससाठी गुंतवणुकदार शोधणार्‍या काही 'कमिशन एजंट' लोकांचाही समावेष होता. पण ह्या सगळ्या लोकांमध्ये एक गोष्टं नक्कीच समान होती, ती म्हणजे श्रीमंती. बुखारेस्ट मध्ये आठवड्यासाठी राहण्याचा खर्च सर्वसाधारण लंडनवासीयाच्या दोन महिन्यांच्या पगाराएवढा होता.

हॉटेलचा चोवीस तास तत्परतेने काम करणारा स्टाफ, हरतर्‍हेचे खाणसामे, जिम आणि योगा शिक्षक, मसाज करणारे मसूज आणि मसूर, पूर्णवेळ डॉक्टर्स, सुरक्षारक्षक, बिल्डिंग आणि मशीनरी जाणणारे स्थायी ईंजिनियर्स असा सुसज्जं ताफाही बुखारेस्ट मध्ये कायम हजर असे. येणार्‍या पाहुण्यांच्या सेवेत कुठलाही खंड पडू नये ह्यावर हॉटेल व्यवस्थापनाची करडी नजर होती. 'हॉटेल बुखारेस्ट' ह्या नावाला, ब्रँडला पूर्ण युरोपात मोठा मान होता वजन होते.

ऑस्ट्री दांपत्याच्या आगमनानंतर संध्याकाळी सहाच्या ठोक्याला बुखारेस्टचे भरभक्कम दरवाजे त्यादिवसासाठी बंद झाले. साडे सहापासूनच प्रत्येक मजल्यावरच्या कॉरिडोरमध्ये - ऊंची डिनरसुट आणि गाऊन्स घालून जोडपी ग्राऊंड फ्लोअरवरच्या बॅन्क्वेट हॉलकडे जाण्यासाठी एलेवेटरची वाट बघत घोळक्याने ऊभी आहेत, बॅन्क्वेट हॉल मध्ये न जाता रूममध्येच जेवण मागवणार्‍या जोडप्यांच्या सरबराईसाठी सर्वर लोकांची सर्विंग ट्रे किंवा कार्ट घेवून लगबग चालू आहे, वाईन/ सिगरेट/ पुस्तक/ डीवीडी अश्या काही स्पेशल वस्तू रूममध्ये मागवणार्‍यांसाठी रूम सर्विसच्या तरूण मुलांचीही तत्पर धावपळ चालू आहे - हेच दृष्यं होते.

21.jpg

ऑस्ट्री दांपत्याच्या तिसर्‍या मजल्यावरचेही दृष्य फार वेगळे नव्हते - दोन जोडपी एलेवेटर येण्याची वाट बघत एकमेकांच्या ओळखी करून घेत औपचारिक गप्पा मारत होती. त्यांच्या बाजूलाच सुटाबुटातले एक मध्यमवयीन गृहस्थं खिडकीजवळ बॅगेतली बिझनेस कार्ड्स कोटाच्या खिशात ठेवत ऊभे होते. सर्विस एलेवेटर मधून बाहेर आलेला एक सर्वर कॉरिडोर मधून हलकेसे गाणे गुणगुणत सर्विंग कार्ट ढकलत रूम डिलवरी करायला चालला होता तर दुसरी सर्वर नुकतीच एका रूममध्ये डिलवरी करून सर्विंग ट्रे बोटावर फिरवत येत होती. रूम सर्विसचा एक पोरगेलेसा अतिऊत्साही तरूण, हातात वाईन बॉटल घेवून डिलीवरीसाठी चालला असतांना 'आपण येतांना कॉर्क स्क्रू आणायला तर विसरलो नाही ना?' आठवण होऊन वेंधळेपणाने खिसे चाचपडत चालत होता..............आणि तेवढ्यात कुणा पुरूषाच्या जीवघेण्या किंकाळीने तिसरा मजला दणाणून गेला. कॉरिडोर मधल्या आठही जणांच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलले. ते चपापून जागीच थांबत एकमेकांकडे बघत आवाज कुठून आला त्याचा कानोसा घेवू लागले. काही सेकंदात स्त्रीच्या आवाजातली दुसरी कर्कश्यं किंकाळी पुन्हा मजल्यावर घुमली आणि त्या आठही जणांना ती ऑस्ट्री दांपत्याच्या स्वीट नं. ३०२ मधूनच आल्याचा पक्का अंदाज आला. आपल्या अंदाजाची खातरजमा करण्यासाठी एकमेकांकडे विचारणा करत गोंधळलेले आणि मनातून चरकलेले ते आठही जण ३०२ च्या दारासमोर येवून ऊभे राहिले.
दोन क्षण भयाण शांतता पसरली आणि अचानक 'मला मारू नकोस, प्लीज मला मारू नकोस' असा मिसेस ऑस्ट्रींचा प्रचंड भ्यालेला आणि रडका आवाज पुन्हा घुमला. त्यातल्या एक जण ३०२ चे दार ठोठावत 'मॅडम काय झाले, दार ऊघडता का?' म्हणत असतांना त्याचे वाक्य संपते न संपते तोच 'ठ्वॉय' 'ठ्वॉय' आवाज करत बंदुकीच्या दोन जोरदार बारांनी तिसरा मजला पुन्हा दणाणून गेला. गोळ्यांच्या आवाजासरशी ते आठही जण लगबगीने दरवाजापासून लांब झाले. दोन्ही जोडप्यापैकी तरूण जोडप्यातल्या मुलीच्या तोंडातून एक भयप्रद किंकाळी बाहेर पडली तसे तिच्या जोडीदाराने तिला मिठीत घेतले. दुसरे तुलनेने वयस्कर जोडपेही हातात हात घेत एलेवेटरच्या दिशेने झेपावले. हॉटेल स्टाफचे तिघेही जण अजूनही एकमेकांच्या चेहर्‍याकडे बघत कॉरिडोरच्या दुसर्‍या बाजुला असलेल्या सर्विस एलेवेटर च्या दिशेने मागे सरकू लागले. आता कुठल्याही क्षणी हातात बंदुक घेतलेला मनुष्यं दार ऊघडून बाहेर येईल आणि पुन्हा गोळीबार करेल असे वाटत असल्याचा ताण अणि भिती त्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टं दिसत होती. तणावाचे दोन क्षण असेच गेले असतील नसतील तोच त्या पोरगेल्याश्या सर्वरला अचानक काही तरी दिसले आणि तो पुन्हा ३०२ च्या दिशेने धावत सुटला. चपळाईने त्याने ३०२ च्या दाराच्या बाजूलाच असलेला ईमर्जन्सी फोन ऊचलून '३०२ मध्ये गोळीबार झाला आहे लवकर या' असे ओरडून फोनचे रिसिवर टाकून देत झटक्यात दरवाजापासून बाजूला होत मागे फिरला.
ते आठही जण अजूनही घाबरलेले गोंधळलेले होते, एलेवेटर अजून एकदाही त्यांच्या मजल्यावर थांबले नव्हते. त्यांच्यापैकी प्रत्येकाची नजर अजूनही ३०२ च्या दरवाजावरंच खिळून होती. तितक्यात मजल्यावरचे जिन्याकडे जाणारे दार दाणकन ऊघडले आणि आणि दोन सिक्युरिटी गार्डस धावतपळत तिसर्‍या मजल्यावर दाखल झाले. गार्डस दिसता क्षणी आठही जण ३०२ च्या दरवाज्याकडे बोट दाखवत ओरडले 'आत गोळीबार झाला आहे, ३०२ मध्ये आत्ता गोळीबार झाला आहे'. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच दोघेही गार्ड आपापल्या बंदुका सरसावत ३०२ च्या दरवाजासमोर ऊभे ठाकले आणि त्यांनी त्या आठही जणांना 'कॉरिडोरच्या टोकाला जा, कोपर्‍यात आसरा घ्या' असे ओरडून सांगत ३०२ च्या दरवजापासून लांब, सुरक्षित अंतरावर राहण्यास सांगितले. त्या दोघातला एक जण त्यानंतरचे काही सेकंद ३०२ चा दरवाजा ठोठावत, ओरडत आतल्या व्यक्तीस बंदूक टाकून बाहेर येण्यास सांगत राहिला पण आतून काहीही आवाज ऐकू आला नाही की ३०२ चे दार ऊघडले नाही. दुसरा जण वॉकी टॉकी वरून मेन डेस्कला परिस्थितीची जुजबी माहिती देत होता. पहिल्याने पुन्हा 'आम्ही सिक्युरिटी आहोत रूममध्ये कोणी असल्यास आवाज द्या' असेही ओरडून सांगितले पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही. पळत गेलेल्या गार्डसना बघून बॅन्क्वेट हॉलमधले लोक काय झाले आहे ते बघण्यासाठी लॉबी मधल्या फ्रंट डेस्ककडे जाण्यास ऊठू लागताच हॉटेल कॉन्सिअर्ज (हॉटेल मॅनेजर) मि.गुस्ताफनी 'सगळ्यांनी शांतपणे आहे तिथेच बसून रहावे' असा विनंतीवजा सल्ला दिला. सगळ्या रूम्समध्येही 'पुढची सुचना येईपर्यंत रूममधून बाहेर पडू नये' अशी घोषणा झाली. कॉरिडोर मधल्या त्या आठही जणांच्या चेहर्‍यावर भिती अजूनही स्प्ष्टं दिसत असली तरी आपल्या डोळ्यांसमोर चाललेले हे नाट्य कसे ऊलगडते ह्याची किंचितशी ऊत्सुकताही डोकावत होतीच. अजून मिनिटभर प्रयत्न केल्यानंतरही आतून काहीच प्रतिसाद न आल्याने दोन्ही गार्डसनी दरवाजा ऊघडून आत जाण्याचा निर्णय घेतला.
अश्या गंभीर आणि घातक परिस्थितीत दरवाजा ऊघडून आत कसे जावे त्याच्या अ‍ॅकॅडेमीमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणा बरहुकूम, अतिशय सावधानतेने एकेक पाऊल टाकत दोघेही ३०२ च्या प्रशस्तं लिविंग रूममध्ये दाखल झाले. त्यांना मखमली कारपेटवर डोक्यातून आरपार झालेल्या एक आणि छाती फोडून गेलेल्या दुसर्‍या गोळीच्या जखमांतून वाहणार्‍या रक्ताच्या थारोळ्यात ऊताणा पडलेला मिसेस ऑस्ट्रींचा देह दिसला. एका गार्डने त्यांच्या नाकाजवळ बोट नेऊन श्वास तपासत दुसर्‍याकडे बघून नकारार्थी मान हलवली.

18.jpg

दोघेही गार्ड पुन्हा सावध होत एकमेकांना नजरेने ईशारा करत आजिबात आवाज न करता एकेक पाऊल टाकत आत बेडरूमकडे जाण्यास वळाले. बेडरूमला लागूनच असलेल्या बाथरूममध्ये अतिशय मंद प्रकाशात त्यांना कपाळावर कसला तरी जबरदस्तं प्रहार झाल्याने खोक पडलेला मि. ऑस्ट्रींचा बाथरोबमधला निश्चल देह चकचकीत टाईल्सवर अस्ताव्यस्तं अवस्थेत पडलेला दिसला. कपाळावरून रक्ताचे ओघळ चेहर्‍यावर पसरले होते. एका गार्डने पटकन त्यांच्या नाकाजवळ हात नेत श्वास तपासला आणि त्याचे डोळे लकाकले. 'हे सर अजून जिवंत आहेत' तो दुसर्‍याकडे पहात हळूच म्हणाला. दुसर्‍या गार्डने वॉकीटॉकी वरून ३०२ मध्ये तातडीने स्ट्रेचर आणि डॉक्टर ला पाठवण्याची सूचना केली.

24.jpg

दुसर्‍याच मिनिटाला सर्विस एलेवेटर मधून दोन मेल नर्स आणि एक तरूण डॉक्टर स्ट्रेचर घेवून ३०२ कडे अक्षरशः धावलेच. स्ट्रेचर आत येताच दोन्ही नर्सनी मि. ऑस्ट्रींचा देह स्ट्रेचर वर ठेवला, डॉक्टरांनी पुन्हा एकदा नाडी तपासून पटकन एक ऑक्सिजन मास्क मि. ऑस्ट्रींच्या नाकावर चढवला. स्ट्रेचर घेवून जातांना डॉक्टरने मिसेस ऑस्ट्रींचीही नाडी तपासली पण प्राण त्यांचे शरीर सोडून निघून गेल्याचे त्याची नजर सांगून गेली. डॉक्टर आणि नर्स आले तसे तातडीने सर्विस एलेवेटर ने बुखारेस्टच्या तळमजल्यावरच्या छोट्याश्या हॉस्पिटलमध्ये मि. ऑस्ट्रींना घेवून गेले.
रूम नं ३०२ मध्ये बेडरूमची हॉटेलच्या मागच्या बाजूला ऊघडणारी खिडकी सताड ऊघडी होती आणि त्यातून भणाणलेला वादळवारा बर्फाचे शेकडो नाजूक कण आत ऊडवत होता. मागे राहिलेल्या दोन्ही गार्डनी वस्तू न वस्तू जशीच्या तशी जागेवर असलेला पूर्ण स्वीट तीनतीनदा पाहून घेतला पण त्यांना तिसर्‍या माणसाच्या अस्तित्वाच्या कुठल्याही खुणा तिथे मिळाल्या नाहीत.

कॉरिडोर मधल्या त्या आठही जणांची भीड आता चेपली होती. डॉक्टर घाईघाईत स्ट्रेचरवर कुणालातरी घेवून जातांना त्यांनी पाहिले होते. ते सगळेच ३०२ च्या दारापाशी येवून आत डोकावत नेमकं काय चाललंय त्याचा कानोसा घेत असतांना तेवढ्यात तिथे आलेल्या कॉन्सिअर्ज मि. गुस्ताफनी त्यांना लांब ऊभे राहण्यासाठी विनंती केली. आत संशयास्पद असे अजून काहीच न दिसल्याने गार्डस लगोलग बाहेर आले. बाहेरंच ऊभ्या हॉटेल मॅनेजर गुस्ताफना आतली पूर्ण परिस्थिती सांगून झाल्यावर हॉटेलच्या नियमांप्रमाणे मि. गुस्ताफनी तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांच्या सुचनेप्रमाणे लगेचच स्वीट नं ३०२ सील करत त्यांनी एका गार्डला तिथेच रूमबाहेर पहारा देण्याचा हुकूम दिला. फ्रंट डेस्कला कुठल्याही परिस्थितीत मेन गेट न ऊघडण्याचा हुकूम देत त्यांनी दुसर्‍या गार्डची पाठवणी मेन गेटवर पहारा देण्यासाठी केली. कॉरिडोरमधल्या त्या आठही जणांची सगळी माहिती घेवून त्यांनी पोलिस येईपर्यंत झाल्या प्रकाराची ईतर कुणाबरोबरही चर्चा करू नये अशी विनंती त्यांना केली. पाचही पाहुण्यांची पाठवणी त्यांच्या रूम्समध्ये करून शांतपणे जडजड पावलं टाकत ते बॅन्क्वेट हॉल मधल्या पाहुण्यांशी बोलण्यासाठी एलेवेटर कडे निघाले.
हॉटेल बुखारेस्ट मधल्या त्यांच्या मागच्या तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही असा प्रसंग अनुभवला नव्हता. एलेवेटरमधल्या त्या वीस सेकंदांच्या प्रवासात बुखारेस्टचा सगळा ईतिहास त्यांच्या नजरेसमोर तरळून गेला. ह्या घटनेची मोठी किंमत बुखारेस्टला सोसावी लागणार आहे, कदाचित बुखारेस्टचे भवितव्यंच क्रुसावर टांगले जाईल आणि आपल्या कारकिर्दीत बुखारेस्टच्या नावाला बट्टा लागला असे वाटून त्यांचे वयोवृद्धं हृदय काळजीने पिळवटून गेले.
बॅन्क्वेट हॉल मधले वातावरण अगदीच गोंधळाचे नसले तरी पाहुणे घोळक्या घोळक्याने काही तरी कुजबुजत होते. तेवढ्यात मि. गुस्ताफचा आदरयुक्तं पण करडा आवाज तिथे घुमला -
लेडीज अँड जंटलमेन, आपल्या हॉटेलमध्ये तिसर्‍या मजल्यावर एक दुर्घटना घडली आहे. घटनेचा कुठलाही तपशील मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. आम्ही पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि बाहेरचे वादळ थांबताच त्वरेने त्यांना ईथे आणण्याची व्यवस्थाही हॉटेल करत आहे. दुर्दैवाने आज संध्याकाळचे सगळे प्रोग्राम आम्हाला रद्दं करावे लागंत आहेत. सर्वांनी आपापल्या रूममध्ये जाऊन जेवणाच्या ऑर्डर द्याव्यात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. हॉल रिकामा होताच गेस्ट एलेवेटर आणि जिने सर्व पाहुण्यांसाठी बंद करण्यात येतील, पण फोन लाईन्स, फ्रंट डेस्क आणि आमचा सगळा स्टाफ तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतील. तुम्हाला होत असलेल्या गैरसोयीबद्दंल हॉटेल बुखारेस्ट आणि मी वैयक्तिक रित्या दिलगीर आहोत. कुणालाही आपल्या सुरक्षेबाबत शंका वाटण्याचे काहीही कारण नाही. पोलिस येवून गेल्यानंतर घटनेची माहिती सगळ्यांना दिली जाईल पण तोवर आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे अशी माझी सर्वांना विनंती आहे.' - असे सांगून ते तडक स्टाफला सुचना देण्यासाठी आत निघून गेले.

पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशने तेजाळलेली बर्फाची शुभ्रधवल चादर बाहेर दूरवर पसरलेली असतांना ती रात्रं बुखारेस्टच्या पासष्टं वर्षांच्या ईतिहासातली सर्वात अंधारी रात्रं होती. रात्रभर घोंघावणारे निर्दयी वादळ सुर्याची पहिली किरणे पृथ्वीवर पडताच शहाण्या बाळासारखे शांत झाले. अर्ध्या तासातंच म्हणजे आठाच्या ठोक्याला केबलकार मधून आलेल्या पोलिसांनी हॉटेल बुखारेस्टमध्ये पाऊल ठेवले. काल संध्याकाळी सहाला बंद झालेले बुखारेस्टचे भले मोठे दार पहिल्यांदाच करकरत ऊघडले आणि पोलिस आत जाताच पाठोपाठ पुन्हा बंदही झाले.

पोलिस डायरीतल्या नोंदी.

टाईमलाईन - पार्किंग गराज, केबल कार आणि हॉटेलमधल्या लॉबी व कॉरिडोर मधल्या वेगवेगळ्या कॅमेरांमध्ये कॅप्चर झालेल्या हालचाली

 • -दुपारी १:०० क्लिनिंग साहित्याची एक भली मोठी कार्ट घेवून रूम क्लीनर लेडी रूम नं ३०२ मध्ये गेली
 • -दुपारी २:०० क्लिनिंग कार्ट घेवून क्लीनर लेडी रूम नं ३०२ मधून बाहेर पडली
 • -दुपारी ३:०० ऑस्ट्री दांपत्याने त्यांची लँडरोवर बुखारेस्टच्या पर्वताच्या पायथ्याला असलेल्या गराजमध्ये पार्क केली
 • -दुपारी ३:३० ऑस्ट्री दांपत्याने केबल कारमध्ये प्रवेश केला
 • -दुपारी ४:०० ऑस्ट्री दांपत्याचे हॉटेल बुखारेस्ट मध्ये आगमन
 • -दुपारी ४:१० तिसर्‍या मजल्यावरच्या कॅमेरामध्ये ऑस्ट्री दांपत्य गेस्ट एलेवेटरने वर येवून त्यांच्या रूममध्ये गेल्याचे दिसत आहे.
 • -दुपारी ४:११ ऑस्ट्री दांपत्याच्या सामानाची ट्रॉली आणणारा बेलबॉय सर्विस एलेविटरने तिसर्या मजल्यावर आला आणि दोनच मिनिटात रिकामी ट्रॉली घेवून सर्विस एलेवेटरने खाली गेला.
 • -दुपारी ४:४० मि. ऑस्ट्री रूममधून बाहेर पडून मेन गेटमधून बाहेर गेले.
 • -दुपारी ५:२० मि. ऑस्ट्री मेन गेटमधून आत येवून रूममध्ये गेले.
 • -संध्या. ५:३० मिसेस ऑस्ट्रींनी फोन करून जेवणाची ऑर्डर दिली.
 • -संध्या. ६:१० डिनर कार्ट घेवून सर्वर ३०२ मध्ये गेला.
 • -संध्या ६:११ मिसेस ऑस्ट्रींनी फ्रंट डेस्कला फोन करून 'त्यांचा सावत्रं मुलगा आणि त्याची बायकोही हॉटेलमध्ये थांबले आहेत का?' ह्याची चौकशी केली.
 • -संध्या ६:२० रिकामी डिनर कार्ट घेवून सर्वर ३०२ मधून बाहेर आला.
 • -संध्या ६:२४ मिसेस ऑस्ट्रींनी त्यांच्या योगा टीचरला ऊद्या सकाळच्या सहाच्या क्लासला येत असल्याचे एसएमस पाठवून कळवले.
 • -संध्या ६:२८ मिसेस ऑस्ट्रींनी दुसर्‍या दिवशीच्या मसाज सेशनसाठी हॉटेल वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंग केले.
 • -संध्या ६:३४ तिसर्‍या मजल्यावरच्या कॉरिडोरमध्ये पहिली किंकाळी ऐकल्याचे लोकांच्या हालचालीवरून दिसते आहे.
 • -संध्या ६:३७ वाईन सर्वर ने ईमर्जन्सी कॉल केला
 • -संध्या ६:३९ दोन सिक्युरिटी गार्ड्स ३०२ समोर दाखल
 • -संध्या ६:४२ सिक्युरिटी गार्ड्सनी ३०२ चे दार ऊघडून आत प्रवेश केला

क्राईमसीन/ फॉरेन्सिक डिटेल्स

 • -बेडरूमची हॉटेलच्या मागच्या बाजूला ऊघडणारी खिडकी सोडल्यास पूर्ण रूम मधली एकही वस्तू जागची हलली असावी असे वाटत नाही
 • -कधी कधी पाहुण्यांकडून खिडक्या ऊघड्या राहिल्याने थंड हवा, बर्फ आत येवून रूमचे आणि हिटिंग सिस्टीमचे नुकसान होते म्हणून हॉटेल मॅनेजमेंटने चार पाच वर्षांपूर्वीच सगळ्या रूम्समधल्या खिडक्या लॅच करून खिडक्यांचे हँडल्स काढून टाकले आहेत.
 • -हँडल शिवाय खिडकी ऊघडणे अशक्य आहे. खिडकी ऊघडणार्‍याने नक्कीच हँडलच्या खोबणीत हँडल बसवून आतून खिडकी ऊघडली असावी.
 • -हॉटेलमध्ये पूर्वी राहून गेलेल्या कुणालाही ही हँडलची बाब माहित असणे शक्य आहे. खिडक्या स्टँडर्ड असल्याने बाहेरून असे हँडल विकत घेऊन येणे फारंच सोपी गोष्टं आहे.
 • -हँडल वापरून खिडक्या ऊघडता आल्यास खिडकीतून सज्जावर ऊतरून बाजूच्या ३०४ रुममध्ये किंवा रेलिंगच्या आधाराने चढून वरच्या ४०२ रूममध्ये जाणे शक्यं आहे.
 • -बेडरूममधल्या नाईटस्टॅंडवरच्या स्टीलच्या फ्लॉवरपॉट खाली पाण्याचे बर्फ जमलेले होते. तो पॉट धुण्याचा प्रयत्नं केला गेला असावा. ओल्या पॉटवरून पाणी निथळल्याने आणि ऊघड्या खिडकीतून अतिथंड बर्फाळ हवा येत असल्याने निथळलेल्या पाण्याचे बर्फ झाले.
 • -फ्लॉवर पॉटवर मि. ऑस्ट्रींच्या हाताचे अगदी पुसट ठसे आहेत आणि त्यांच्या रक्ताचा एक बारीक थेंबही पॉटवर मिळाला.
 • -खिडकीतून, खाली साचलेल्या बर्फावर कोणीतरी ऊंचावरून ऊडी मारल्याने बुटांच्या खोल खुणा दिसत आहेत. बर्फाचा थर जाड पण भुसभुशीत असल्याने ऊडी मारणार्‍याला दुखापत होण्याचा काही धोका नव्हता. ऊडी मारल्याचा आघात मोठा असल्याने रात्रीतून बर्फ पडूनही ऊडीच्या खुणा शाबुत आहेत.
 • -रात्रीतून भरपूर बर्फ पडल्याने, ऊडी मारल्यानंतर जर खुनी (एक किंवा अनेक) चालत वा 'स्की' करून गेला असल्यास त्याच्या बुटांच्या किंवा स्कीच्या खुणा पुसल्या जाणे सहज शक्य आहे.
 • -बर्फातल्या ऊडीच्या खुणा बरोबर ग्राऊंड फ्लोरवरच्या रूम नं १०२ च्या खिडकीबाहेर दिसत आहेत.
 • -हॉटेलचे मेन गेट सहालाच बंद झाल्याने ऊडी मारणार्‍याला हॉटेलमध्ये पुन्हा हॉटेलमध्ये प्रवेश मिळवणे अशक्यं आहे.
 • - काल रात्रीच्या हिमवादळात प्रोटेक्टिव गिअर घालून चालत किंवा स्की करून जाणे पाईन वृक्षांच्या गर्दीमुळे आणि अतिप्रचंड शिळांमुळे अशक्यप्राय आहे. खुन्याने असे धाडस केले असल्यास ते नक्कीच जीवघेणे ठरले असण्याची शक्यता आहे.
 • -हॉटेलला लागून असलेल्या मशिनरी रुममध्ये खुन्याने आसरा घेतला असल्यास त्याला तिथे वादळापासून निवारा मिळणे सहज शक्यं आहे.
 • -मशिनरी रूममध्ये कोणी तरी आसरा घेतल्याचे, छोटेसे हीटर वापरल्याचे आणि अ‍ॅल्युमिनिअम फॉईलमध्ये गुंडाळलेले अन्न खाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.
 • - तपासकार्य चालू असतांना हॉटेलचे मेन गेट पूर्णवेळ बंदच होते.
 • -मिसेस ऑस्ट्रींच्या बोटातली डायमंड वेडिंग रिंग आणि गळ्यातले मुल्यवान नेकलेस असा एक मिलिअन ब्रिटिश पौंडाचा ऐवज गायब आहे.
 • -मि. ऑस्ट्रींची वेडिंग रिंग बेडरूममधल्या नाईट स्टँडच्या ड्रॉवर मध्ये मिळाली.
 • -डायनिंग टेबलवर फोर कोर्स मेन्यू चे डिनर वाढून ठेवलेले होते त्याला कोणी हात लावलेला दिसला नाही, पण एक बोल पूर्ण रिकामा होता.
 • - घटनेच्या वेळी तिसर्‍या मजल्यावरच्या कॉरिडोरमध्ये ऊपस्थित असलेले पाच पाहुणे, तीन स्टाफ, दोन गार्डस, दोन मेल नर्स आणि डॉक्टरच्या जबानीत जे घडले त्याविषयी सांगतांना कुठलीही विसंगती आढळून आली नाही.

एका स्पेशल केसची माहिती

 • - ऑस्ट्रींच्या रूममध्ये किचन ओट्यावर "$WOLF$"अक्षरे कोरलेली एक चांदीची अंगठी सापडली आहे जे फार चक्रावणारे आहे.
 • - चार वर्षांपूर्वीपर्यंत बुखारेस्ट सारख्याच ईतर चार विंटर हॉटेल्स मध्ये 'विंटर वुल्फ' नामक क्रूर आणि निर्दयी चोराने, चोरीच्या ईराद्याने दोन लेस्बियन जोडपी, एक घटस्फोटित आणि एक विधवा अश्या सहा श्रीमंत स्त्रियांचे वेगवेगळ्या वर्षी निर्घूण खून पाडले होते.
 • -प्रत्येक वेळी त्याने वापरलेली खून करण्याची पद्धत वेगळी होती.
 • - प्रत्येकवेळी मयतांच्या अंगावरून अतिशय मौल्यवान ज्वेलरी चोरली गेली होती आणि घटनास्थळावर "$WOLF$" कोरलेली चांदीची अंगठी सापडली होती.
 • - चार वर्षांपूर्वी पोलिसांच्या पाठलागात 'विंटर-वुल्फ' पोलिसांसमक्षं खोल दरीत पडला होता, पण अद्याप त्याची बॉडी मिळवणे शक्यं झाले नव्हते.
 • - 'विंटर वुल्फचे' खरे नाव 'डोरिअन व्हाईट' होते. तो अतिशय चलाख आणि पट्टीचा स्की खेळाडू होता.
 • - ऑस्ट्रींच्या रूममध्ये सापडलेली अंगठी 'विंटर वुल्फ' च्या अंगठीसारखीच होती पण तिचा आकार मागच्या चारही अगठ्यांपेक्षा थोडा मोठा होता, आणि "$WOLF$" अक्षरेही ईटालिक फाँट मध्ये नव्हती.
 • - जिवंत असतांना 'विंटर वुल्फ' विषयी पेपरमध्ये बरीच माहिती छापून येत असे ज्यात काही माहिती खरी होती तर काही नुसत्याच वदंता. त्याच्या चोरी आणि धाडसाविषयीच्या गोष्टी लोक मोठ्या चवीने चघळत.

मेडिकल रिपोर्ट

 • -मिसेस ऑस्ट्रींचा मृत्यू छातीत आणि डोक्यात घुसलेल्या गोळीमुळे झालेल्या प्रचंड रक्तस्त्रावाने झाला.
 • -त्यांच्या पोटात फक्तं वाईन आणि रक्तात अक्लोहोल सापडले.
 • -मि.ऑस्ट्रीं च्या कपाळावर बेडरूममधल्या फ्लॉवरपॉटचा वार झाला. हा वार घेरी येवून बेशुद्धं होण्या ईतपतच जोराचा होता पण जीवघेणा नव्हता.
 • -रूमची खिडकी ऊघडी असल्याने रूममधे १२ तासापेक्षा जास्तं वेळ अतिथंड हवा भरून राहिल्यामुळे मृत्यूची नेमकी वेळ सांगता येणे अवघड आहे.
 • पण मृत्यू संध्या. सहा ते रात्री आठ च्या दरम्यान झाला असावा असे वाटते.

मि. ऑस्ट्रींचा जबाब

 • - मी पावणेपाच वाजता नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर चालायला गेलो होतो आणि साधारणतः अर्धा तास चालून सवा पाचला रूमवर परत आलो.
 • - चालून आल्यानंतर पाच दहा मिनिटं आराम केला आणि सूझनला जेवणाची ऑर्डर द्यायला सांगून मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो.
 • - आंघोळ करून मी बाथरूममध्येच आवरत होतो तेव्हा अचानक बाथरूमची लाईट बंद झाली, मस्तकावर काही तरी जोरात आदळले, वेदनेमुळे मी ओरडलो आणि मला घेरी आली... बस्स मला त्यापुढचे काहीच आठवत नाही.
 • - मी डोळे ऊघडले तेव्हा हॉस्पिटल बेडवर होतो आणि डोके प्रचंड ठणकत होते.
 • -मी माझी वेडिंग रिंग आंघोळ करतांना बेडरूममधल्या नाईट स्टँडच्या ड्रॉवरमध्ये काढून ठेवली होती.

३०२ च्या रूम सर्विस रेनर्ड फ्रॉस्ट चा जबाब

 • -मी सहाच्या आसपास जेवणाची डिलवरी घेऊन आलो असेल.
 • -मी आत आलो तेव्हा मिसेस ऑस्ट्री वाईन पीत होत्या आणि फोनवर काही तरी पहात होत्या. त्यांनी कुणाला तरी कॉलही केला होता
 • -त्यांनी मला जेवण डायनिंग टेबलवर सर्व करायला सांगितले. त्यांची फोर-कोर्स डिनर मेन्यूची ऑर्डर होती- स्टार्टर्स, सॅलड, आँट्रे आणि डिझर्ट. मी आमच्या हॉटेलच्या ट्रेनिंगप्रमाणे सगळे नीट टेबलावर मांडले आणि निघून गेलो.
 • - मि. ऑस्ट्री काही दिसले नाहीत पण ते बाथरूम मध्ये असावेत असे मला वाटते कारण नळाच्या पाण्याचा आवाज येत होता.
 • -तिसर्‍या मजल्याचा 'मल्टी-कोर्स डिनर' सर्वर मीच असल्याने मी पुन्हा दुसर्‍या रूमची जेवणाची ऑर्डर घेऊन आलो होतो तेव्हा गोळीबार झाला, आमची 'लाईट मील' सर्वर डॉटी आणि 'वाईन रनर' एग्जीही होते तिथे.
 • - (डायनिंग टेबलचा फोटो दाखवून रिकाम्या बोलबद्दल विचारले असता) बहुतेक त्या बोलमध्ये मी अ‍ॅल्युअमिनिअम फॉईलमध्ये गुंडाळलेले ग्रिल्ड पोटॅटो ठेवले होते.

प्रासंगिक माहिती

 • - हॉटेलात दरवर्षी येणार्‍या लोकांच्या म्हणण्यानुसार मिसेस ऑस्ट्री ह्या अतिशय शिष्टं, बोलायला फटकळ व ऊर्मट आणि श्रीमंतीची प्रचंड घमेंड असलेल्या एक अहंकारी स्त्री होत्या.
 • -मागच्या वर्षी, आपल्या एका क्लायंटच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करावी ह्यासाठी मि. ऑस्ट्रींची मनधरणी करत ओळख वाढवू पाहणार्‍या एका स्पॅनिश कमिशन एजंट मि. मार्टिनेझचा मिसेस ऑस्ट्रींनी सर्वांसमोर फार वाईटरित्या पाणऊतारा केला होता. मि. मार्टिनेझही गरम डोक्याचेच असावेत त्यामुळे वाद विकोपाला गेला. कॉन्सिअर्ज मि. गुस्ताफनी मध्यस्थी केली तेव्हाच तो वाद थांबला, पण मि. ऑस्ट्री एकदाही मध्ये पडले नाहीत की त्यांनी मिसेस ऑस्ट्रींना एका शब्दाने आवरायचा प्रयत्न केला नाही. मिसेस ऑस्ट्रींनी, मि. मार्टिनेझ ना हॉटेल मधून घालवून देण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंटवर फार दबाव आणला होता. दोन दिवसांनी मि. मार्टिनेझ स्वतःच निघून गेले पण ह्यावर्षी ते पुन्हा हॉटेल मध्ये ऊतरले आहेत.
 • -मागच्याच वर्षी मि. ऑस्ट्रींचा मुलगा सायमन त्याच्या प्रेयसीला घेऊन त्यांना ईथे भेटायला आला होता तेव्हा मिसेस ऑस्ट्रींनी (ज्या सायमनच्या सावत्रं आई आहेत) त्याचाही अपमान करत त्याला 'तू ह्या मिडलक्लास मुलीशी लग्नं केल्यास मी तुला ईस्टेटीतून एक पैसाही मिळू देणार नाही' सुनावत रूममधून घालवून दिले. सायमनही मिसेस ऑस्ट्रींना बरेच शिव्याशाप देत निघून गेला. त्यांची आरडाओरड ऐकून बरेच लोक गोळा झाले होते. पण मि. ऑस्ट्री तेव्हाही शांतपणे रूममध्ये बसून राहिले.
 • - मिसेस ऑस्ट्रींच्या अगदी ऊलट असे मि. ऑस्ट्रींचे व्यक्तीमत्व होते. शांत, विचारी, धीरगंभीर, आदर वाटावा असे, परंतू ते फारंच कमी बोलत. ते कायम ऊदास रहात नव्हते पण साधे मंदसे हसतांनाही ते कधी दिसले नाहीत.
 • -रूम नं ३०४ मध्ये स्पॅनिश कमिशन एजंट मि. मार्टिनेझ ऊतरले आहेत.
 • -रूम नं ४०२ मध्ये मि. सायमन ऑस्ट्री आपल्या बायकोबरोबर ऊतरले आहेत.
 • -रूम नं १०२ मध्ये मि. हिरोशी मात्सुमुरा ऊतरले आहेत. टोकियो मधून थेट हॉटेल बुखारेस्ट मध्ये आलेल्या मि. हिरोशींचे व्यक्तीमत्वं फारंच संशयास्पद वाटते, हॉटेल स्टाफलाही त्यांचा हॉटेलमधला मागच्या एक आठवड्यातला वावर संशयास्पद वाटला. मि. हिरोशींनी पायथ्याच्या गावातून लंडनमध्ये काही कॉल्स केले आणि हार्डवेअर दुकानात खरेदीही केली. त्यांनी लंडनमध्ये केलेले कॉल मिसेस ऑस्ट्रींच्या भावाच्या ऑफिसमध्ये गेल्याचे समजले आहे. मिसेस ऑस्ट्री आणि त्यांच्या भावात वडिलांच्या गडगंज संपत्तीवरून कोर्ट केस चालू आहे जिने गंभीर वळण घेतले आहे. मि. हिरोशी प्रोफेशनल अ‍ॅसॅसिन असू शकतात.
 • -मि. मार्टिनेझ, मि. सायमन ऑस्ट्री आणि मि. हिरोशी तिघांनीही 'घटनेच्या वेळी आपण रूममधेच होतो आणि 'रूम मध्येच रहावे' अशी घोषणा झाल्याने रूममधून बाहेर पडलो नाही, असे सांगितले.
 • -क्लिनिंग कार्टमधली वॅक्यूम क्लीनर आणि ईतर काही सामान काढून जागा मोकळी असल्यास तिथे एखादी व्यक्ती काही मिनिटे बसू शकते. कार्ट चहू बाजूंनी बंदिस्तं असल्याने आतले सामान दिसत नाही.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
नेमके काय झाले असेल 'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल' मध्ये?
मिसेस ऑस्ट्रींचा खून झाला असल्यास कोणी, का व कसा केला असेल?
मि. ऑस्ट्रींवरही हल्ला झाला, तो कोणी केला असेल आणि का?

खुनी आणि खुनाबद्दल तुमच्या एकापेक्षा अनेक थिअरीज असतील तरी हरकत नाही पण घटनाक्रम आणि थोडी कारणीमीमांसा द्यावी अशी अपेक्षा. थोडक्यात पोलिसांच्या रोलमध्ये जाऊन आपल्याला ही केस सॉल्व करायची आहे.
क्लू देण्याची गरज पडू नये असे सध्यातरी वाटते आहे. पण काही कन्फ्युझिंग वाटत असल्यास आणि फॅक्ट्सचे क्लॅरिफिकेशन हवे असल्यास बोल्ड ईटालिक फाँट मध्ये लिहिले तर मला त्या पोस्ट्स ना ऊत्तर देणं सोपं जाईल. बाकीचं सगळं नेहमीप्रमाणे रेग्यूलर फाँटमध्ये चालूदेत. मी शक्य तेवढ्या प्रतिक्रिया, शक्य तेवढ्या वेगाने आणि शक्य तेवढा मेंदू वापरून वाचत राहीन, समजून घेत राहीन आणि गरज वाटल्यास ऊत्तर देत राहीन.

केस सोडवायला घेण्याआधी हा धागा नक्की डोळ्याखालून घाला
https://www.maayboli.com/node/62828

घटना सोडून वरती बुखारेस्टबद्दल मी जे वर्णन केले आहे ते फक्तं मेकॅनिकली केस सोडवण्यापेक्षा वाचकांना काहीतरी थरारक वाचल्याचा अनुभव मिळावा ह्यासाठीच. ऑस्ट्री दांपत्य आणि केसमधले ईतर लोक एक व्यक्ती म्हणून कसे आहेत हे सांगण्यासाठीही बरेच लिहिले आहे. एकदा का घटनास्थळाचे आणि एकेका व्यक्तीचे कॅरिकेचर समजले की ती वर्णनात्मक माहिती पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडू नये. घटनाक्रम आणि ईतर डीटेल्स वर्क-आऊट करूनच खुनी ( जर हा खूनच आहे असा तुमचा विश्वास असल्यास ) आणि खुनाची पद्धत समजू शकते. मान्य आहे ही केस थोडी मोठी झाली आहे, माहितीही खूप दिली आहे पण ऊलट त्या माहितीचा ऊपयोग अ‍ॅम्बिग्विटी टाळून स्ट्रीमलाईन्ड थिंकिंगसाठीच होईल असे वाटते.

केस सोडवण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा!!

केस सोडवून कंटाळा आल्यास 'दि ग्रँड बुडापेस्ट हॉटेल' सिनेमामधे दाखवलेले बुडापेस्ट हॉटेल कसे होते ते ह्या ४ मिनिटांच्या डॉक्यू. मध्ये बघायला मिळेल. https://www.youtube.com/watch?v=gYMfEKELveQ
विडिओ बघून झाल्यावर केस सोडवायला परत ईथे यायचे विसरू नका Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ओळखली केस काय असणार...

स्पॉयलर एलर्ट
.
.
.
.
.
.
.
.
.
.

हॉटेल मध्ये एका महिलेचा खून असणार !

बरोबर राजसी.. ते 'दि ग्रँड बुडापेस्ट हॉटेलं' सिनेमाचंच पोस्टर आहे.
पण सिटाडेल सारखं ते हॉटेलही फिक्शनल आहे...

वावा वा आलं का कोडं!!
-संध्या. ६:१० डिनर कार्ट घेवून सर्वर ३०२ मध्ये गेला. - टृऑलीमधून कोणीतरी आत जाऊ शकते.
-संध्या ६:११ मिसेस ऑस्ट्रींनी फ्रंट डेस्कला फोन करून
>>>> म्हणजे तोवर मिसेस ऑस्ट्री जिवंत असाव्यात.
-संध्या ६:२० रिकामी डिनर कार्ट घेवून सर्वर ३०२ मधून बाहेर आला. >>>> १० मिनिट टाइम बराच जास्त वाटतो डीनर फक्त सर्व करायला. त्या वेळेत खून करून पुन्हा टृऑलीतून खुनी बाहेर गेला असेल का?
पण इन दॅट केस सर्वर खुनी/ खुन्याला सामील असावा लागेल.
-संध्या ६:२४ मिसेस ऑस्ट्रींनी त्यांच्या योगा टीचरला ऊद्या सकाळच्या सहाच्या क्लासला येत असल्याचे एसएमस पाठवून कळवले.

-संध्या ६:२८ मिसेस ऑस्ट्रींनी दुसर्‍या दिवशीच्या मसाज सेशनसाठी हॉटेल वेबसाईटवरून ऑनलाईन बुकिंग केले. तसेच ती ६:३४ ची किंकाळी>>>> हे खुन्याने अ‍ॅलिबी तयार करण्यासाठी समहाऊ केलेले असू शकते.
पण २ किंकाळ्या अवघड आहेत मेनेज करायला Happy
एसेमेस ने योगा क्लास आणि वेब वरून मसाज बुक करणे या माहिती चा तेवढाच अर्थ लागला मला.

१० मिनिट टाइम बराच जास्त वाटतो डीनर फक्त सर्व करायला >> टेबल वर टेबलक्लॉथ चढवणे, दोघांसाठी फॉर्मल डायनिंग सेट करणे, भांड्यांचे आजिबात आवाज न करता एकेक भांड्याची झाकणे काढणे. जेवण डिनर प्लेटस्,बोल मध्ये सर्व करणे, सिल्वरवेअर व्य्वस्थित अँगल मध्ये ठेवणे. बरेच वेळखाऊ काम आहे हे. Happy

settable_01_0.jpg

जेवणारे तोवर पेशन्स कसा ठेवतात ते विचारू नका. Proud

नवीन केस! Happy

त्या विंटर वूल्फचे आणि हिवाळ्यातल्या हॉटेलचे वर्णन वाचून प्वारोची 'लेबर्स ऑफ हर्क्युलस'मधली 'The Erymanthian Boar' आठवली. इथे मात्र विंटर वूल्फ रेड हेरिंग आहे. खून विंटर वूल्फने केला असावा, असा फक्त देखावा खऱ्या खुन्याला तयार करायचा असावा. सापडलेली अंगठी काही तपशीलांत वेगळी होती त्यावरून अंदाज!

तणावाचे दोन क्षण असेच गेले असतील नसतील तोच त्या पोरगेल्याश्या सर्वरला अचानक काही तरी दिसले आणि तो पुन्हा ३०२ च्या दिशेने धावत सुटला.<<<<<<
हा पोरगेलासा सर्व्हरच कॉर्क स्क्रू विसरला की काय म्हणून बघत होता तोच का? हा नवीन लागला होता का हॉटेलात? त्याला काहीतरी दिसलं आणि तो परत रूमकडे धावत सुटला, यावरून माझा एक अंदाज की तो खुन्याचा सहकारी असावा. मे बी, दरवाजा किंचित उघडा आहे, पूर्ण लॉक नाही, हे त्याला कळलं असावं. मे बी, त्या उघड्या खिडकीतून आलेल्या बर्फाळ हवेच्या किंचित झोतामुळे? खुन्याला निसटून जायला वेळ हवा म्हणून त्याने तो लावून घेतला?

एलेवेटर अजून एकदाही त्यांच्या मजल्यावर थांबले नव्हते.
<<<<<
हे कसे शक्य आहे? ती दोन जोडपी जेव्हा एलेव्हेटर येण्याची वाट पाहत गप्पा मारत होती तेव्हा कुणी ना कुणीतरी बटन दाबलेच असेल ना एलेवेटरसाठी. तेव्हा या गडबडीत ते एकदातरी तिसऱ्या मजल्यावर थांबले असेलच. की खुन्याने त्यात काड्या केल्या तिसऱ्या मजल्यावर ते थांबू नये आणि तिथे एलेवेटरसाठी थांबलेली माणसे त्याला अपेक्षित असा जबाब द्यायला उपलब्ध असावीत.

'लेबर्स ऑफ हर्क्यूलस' हो आठवते आहे, लेडी सिरिअल किलर पेंटींग्ज च्या मागे असते असे काही तरी असते. ... पॉरोच्या काही फार फेच्ड मिस्ट्री पैकी होती ती असे आठवते आहे. मार्पलच्याही एका एपिसोडमध्ये दाखवले आहे वाटते स्नो स्टॉर्म आणि हॉटेल वगैरे. मस्तं वाटते ते बघायला.

'विंटर वुल्फ' थोडेसे ओशन्स १३ मधल्या 'नाईट फॉक्स' सारखे आहे. Happy

लेडी सिरिअल किलर पेंटींग्ज च्या मागे असते असे काही तरी असते. ... पॉरोच्या काही फार फेच्ड मिस्ट्री पैकी होती ती असे आठवते आहे.<<<<<
त्यांनी टीव्ही रूपांतर करताना मूळ पुरुष खुनी स्त्री खुनी म्हणून दाखवले. त्यात फार फेचड काही वाटले नाही पण. तो खुनी नेमकी कोण व्यक्ती आहे हे माहीत नसते. The person is only known as marrascoud. आणि अशाच डोंगरावरच्या फक्त केबल कारने ऍक्सेस होणाऱ्या हॉटेलात स्नोस्टॉर्ममुळे प्वारोसकट सगळे लोक अडकून पडतात.

मे बी, त्या उघड्या खिडकीतून आलेल्या बर्फाळ हवेच्या किंचित झोतामुळे? खुन्याला निसटून जायला वेळ हवा म्हणून त्याने तो लावून घेतला? >> असू शकते पण नसू ही शकते.. Open to interpreatation

एलेवेटर अजून एकदाही त्यांच्या मजल्यावर थांबले नव्हते.
<<<<<
हे कसे शक्य आहे? >> Open to interpreatation.. सहा मजल्यांवरचे लोक बॅन्क्वेट हॉल मध्ये जाण्यासाठी एलेवेटर वापरत होते. कुठल्यातरी मजल्यावर ते बिझी असावे असे असू शकते. कॉन्सिअर्ज गुस्ताफ येतात एलेवेटरने वर म्हणजे ते चालूच असावे.

कॉरिडोर मधल्या आठही जणांच्या चेहर्‍यावरचे भाव झरझर बदलले. ते चपापून जागीच थांबत एकमेकांकडे बघत आवाज कुठून आला त्याचा कानोसा घेवू लागले. काही सेकंदात स्त्रीच्या आवाजातली दुसरी कर्कश्यं किंकाळी पुन्हा मजल्यावर घुमली आणि त्या सातही जणांना ती ऑस्ट्री दांपत्याच्या स्वीट नं. ३०२ मधूनच आल्याचा पक्का अंदाज आला. आपल्या अंदाजाची खातरजमा करण्यासाठी एकमेकांकडे विचारणा करत गोंधळलेले आणि मनातून चरकलेले ते सातही जण ३०२ च्या दारासमोर येवून ऊभे राहिले. >>
नक्की किती? आठ का सात?

marrascoud >> हो हो आठवले.
बघायला पाहिजे पुन्हा तो एपिसोड, बघतो आता.

नक्की किती? आठ का सात? >> आठच पाहिजे. चूक दुरुस्तं करतो. धन्यवाद पायस.

-रूमची खिडकी ऊघडी असल्याने रूममधे १२ तासापेक्षा जास्तं वेळ अतिथंड हवा भरून राहिल्यामुळे मृत्यूची नेमकी वेळ सांगता येणे अवघड आहे.
पण मृत्यू संध्या. सहा ते रात्री आठ च्या दरम्यान झाला असावा असे वाटते. >>>> हे कळल नाहीये किंवा खुन आधीच झाला असेल तर मग गार्ड आत आले तेंव्हा आॅस्ट्रींच शरीर कडक असायला हवयं. १२ तास आधीपासुन खिडकी उघडी असेल चेकइन करताना लक्शात येईलच की

हो मलाही वाटतं की त्या बाईला तिच्या नवऱ्याने मारलं आणि कुणीतरी एक सर्व्हर त्याला सामील आहे. त्याच्या मदतीने त्याने मशिनरी रूममध्ये हिटर वापरून कुणीतरी अन्न खाल्ले वगैरे देखावा क्रिएट केला.

Excellent thinking.
Check out what are all things the husband says he did after checking in.
What about the Japanese guy?

-मशिनरी रूममध्ये कोणी तरी आसरा घेतल्याचे, छोटेसे हीटर वापरल्याचे आणि अ‍ॅल्युमिनिअम फॉईलमध्ये गुंडाळलेले अन्न खाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.>>>>
हे अन्न त्या रिकाम्या बाउल मधून आलं होतं. हीटर हार्ड्वेर स्टोर मधून. (जो हिरोशी खरेदी करू शकतात)

मि. ऑस्टी आणि हिरोशी यांनी मिळून खून केल्याचा तर्क. तो सिरियल किलर वर ढकलायचा प्रयत्न. नेकलेस आणि रिंग ची चोरी हे गुन्हा चोरी मुळे झाला हे दाखवायला केलेले staging

-हॉटेलमध्ये पूर्वी राहून गेलेल्या कुणालाही ही हँडलची बाब माहित असणे शक्य आहे. खिडक्या स्टँडर्ड असल्याने बाहेरून असे हँडल विकत घेऊन येणे फारंच सोपी गोष्टं आहे.>>>
हार्डवेअर दुकानातून हिरोशी यांनी ही ही खरेदी केली.
खून केल्यावर खिडकी उघडली आणि बाहेर निसटला. १०२ समोरच उडी मारल्याने आपल्या रूममधे आला. आपल्या रूमचीही खिडकी आधीच तशी उघडून ठेवल्याने आत प्रवेश करणे सोपे झाले. मि. ऑस्ट्रीला फ्लोवरपॉट मारून बेशुद्ध केले आणि त्यावरच्या खुणा, निशाणी मिटवण्यासाठी ते धुतले.

तसेच बाउल मधून अन्न उचलले आणि आपल्या रूममधे जायच्या आधी मशिनरी रूममधे जाऊन तिथले staging केले आणि मग आपल्या रूमवर आले. आपण रूममधेच होतो या त्यांच्या विधानाला पुष्टी देणारा कोणताही पुरावा, alibi, नाहीये.

ही माझी आत्तापर्यंत डेव्हलप झालेली थिअरी. यात काही मिसिंग लिंक्स आहेत, त्यांच्याबद्दल काही अंदाज आहेत पण पूर्णतया कन्व्हिन्स्ड नसल्याने ते अंदाज मांडत नाही.

खून मि. ऑस्ट्रींनी केला

मिसेस ऑस्ट्री व मि. ऑस्ट्री यांच्या नातेसंबंधात जे क्लूज दिले आहेत त्यावरून असे चित्र निर्माण होते. ऑस्ट्रींच्या श्रीमंतीमागे मिसेस ऑस्ट्रींच्या वडिलोपार्जित इस्टेटीचा हात असावा. हे लग्न कसे जुळले याविषयी अधिक टिप्पणी करता येणार नाही (तसेच हाब यांच्या बेसिस व प्रिमाईस चौकटीला मोडल्यासारखे होईल) पण निश्चितच ऑस्ट्रींना आपल्या बायकोच्या श्रीमंत कौटुंबिक पार्श्वभूमिचा लाभ झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मिसेस ऑस्ट्रींचा व्यवसायाशी संबंधित हस्तक्षेप मि. ऑस्ट्री खपवून घेत होते. याचे दोन अर्थ असू शकतात
१) ऑस्ट्रींचा व्यवसाय बायकोला मिळत असलेल्या अथवा मिळणार असलेल्या इस्टेटीवर अवलंबून असावा.
२) ऑस्ट्रींच्या व्यवसायाला उतरती कळा लागली असावी व बायकोच्या वडलांच्या गडगंज संपत्तीची त्यांना नितांत गरज असावी. याविषयी फारशी माहिती दिलेली नसल्याने - मृत्युपत्राचे स्पेसिफिक्स, कोणत्या कंडिशनमध्ये संपत्ती मुलीच्या नवर्‍याला मिळेल, खासकरून ऑस्ट्री ब्रिटिश असल्याने असे स्पेसिफिक्स मृत्युपत्रात असलेच पाहिजेत - ही पहिली मिसिंग लिंक.
असम्प्शनः हे मोटिफ घेऊन ऑस्ट्री खून करायचे ठरवतात.

खून कसा झाला याची अर्ग्युमेंट देण्याआधी आता इतर संशयितांकडे नजर टाकू.

मि. मार्टिनेझ - मि. मार्टिनेझ यांची बिझिनेस डील मिसेस ऑस्ट्रींमुळे फसली होती तसेच त्यांचा वैयक्तिक स्वरुपाचा अपमानही झाला होता. दिलेल्या माहितीनुसार मार्टिनेझ गरम डोक्याचे आहेत. अशा व्यक्ति सहसा वैयक्तिक अपमान विसरत नाहीत. हा स्ट्राँग मोटिफ आहे. असे मानले की मार्टिनेझ यांनाही ऑस्ट्रींचा खून करायचा होता तर त्यांनी निश्चित हॉटेलच्या संरचनेचा अभ्यास केला असावा. ३०४ व ४०२ या दोन्ही खोल्यांमधून मिसेस ऑस्ट्रींच्या खोलीत प्रवेश करता येतो (तसेच परतही जाता येते). काही मार्गाने ही सर्व माहिती मार्टिनेझ यांनी मिळवली असावी आणि म्हणून त्यांनी त्यापैकी एक रूम ३०४ घेतली. त्यांना मि. ऑस्ट्रींना मारून काही फायदा नाही. त्यामुळे जर त्यांनी खून केलाच तर तो मि. ऑस्ट्री रूममध्ये नसताना केला असता. पण मि. ऑस्ट्री रूमबाहेर जाऊन परत आल्यानंतर वेटरने फोनवर मिसेस ऑस्ट्रींकडून ऑर्डर घेतली होती. हे सर्व करणे मार्टिनेझ यांच्या आवाक्याबाहेरचे आहे - आवाज कधी रेकॉर्ड केला, मार्टिनेझ यांना मिसेस ऑस्ट्रींचा आवाज काढता येतो का? इ. त्यामुळे मार्टिनेझ नाही.

सायमन - सायमनला आईकडून आपल्या लग्नाला होकार हवा आहे. इथे मिसेस ऑस्ट्रींच्या मृत्युपत्राचे स्पेसिफिक्स नसल्याने (मिसिंग लिंक टू) सायमनला मिसेस ऑस्ट्रींचा खून करणे फायदेशीर आहे का हे सांगता येत नाही. मिसेस ऑस्ट्रींनी दिलेली धमकी बघता, निदान तेव्हा तरी तो मृत्युपत्रात वारसदार होता. जर त्याच्यात बदल नसेल तर त्याला हे करण्यास मोटिफ आहे. म्हणून त्याने दुसरी सोयीस्कर खोली ४०२ घेतली. सायमनला एक साथीदारही आहे - त्याची प्रेयसी. पण सायमन विरुद्ध कोणताच ठोस पुरावा नाही - मिसिंग लिंक थ्री. याच्यावर आधारित वेगळी थिअरी बनवता येऊ शकते पण ती फार फेच्ड असेल.

मात्सुमुरा - मात्सुमुराचा या खूनाशी संबंध आहे. मिसेस ऑस्ट्रींच्या भावाने पाठवलेला भाडोत्री खूनी मात्सुमुरा आहे असे सुचवण्यात आले आहे. हे गृहीतक धरून चालू. मात्सुमुरा भाडोत्री खूनी असल्याने तो अधिक पारंगतही आहे. यामुळे तो खोलीत घुसण्याकरता कार्टचा वापर करतो.

खून कसा झाला?
३) क्लिनिंग कार्टच्या मार्गे मात्सुमुरा ३०२ मध्ये दाखल होतो. यानंतर तो कुठेतरी लपला, एखाद्या क्लोजेटमध्ये शक्यतो बाथरुममधल्या क्लोजेटमध्ये. ऑस्ट्री दांपत्य ३०२ मध्ये दाखल होते. मात्सुमुरा व ऑस्ट्री दोघेही योग्य संधीची वाट बघत असतात. ऑस्ट्रींनी विंटर वूल्फ विषयी ऐकले असावे. त्यांचा प्राथमिक प्लॅन खूनाचे खापर विंटर वूल्फवर फोडायचे असावे. पण मात्सुमुराप्रमाणे सराईत खूनी नसल्याने त्यांना विंटर वूल्फ मारला गेला आहे हे माहित नसावे तसेच त्यांनी बनवलेली अंगठीही विंटर वूल्फच्या अंगठीपेक्षा वेगळी आहे. ऑस्ट्री फिरायला जातात तेव्हा ते बायकोला वाईनची बाटली देऊन जातात - मिसेस ऑस्ट्रींनी वाईन प्यायली होती पण सर्वरला वाईन द्यायची कधी संधीच मिळाली नाही - मिसेस ऑस्ट्रींचे कॅरेक्टर बघता त्यांनी यथेच्छ वाईन ढोसली असल्याची शक्यता आहे. अशा अवस्थेत खून करणे साहजिक सोपे जाणार.

४) बायकोला प्यायला वेळ देण्यासाठी ऑस्ट्री वॉकला जातात. इथे मात्सुमुरा खून करू शकला असता (मिसिंग लिंक फोर) पण काही कारणाने तो तसे करत नाही. परत आल्यावर ते बायकोला खाण्याची ऑर्डर देण्यास सांगतात - इथे सर्वरची अ‍ॅलिबी तयार करणे हा हेतु वाटतो. मिसेस ऑस्ट्रींना मेसेज सायमनने पाठवला होता - ६:१० त्या फोनवर काहीतरी बघत होत्या, ६:११ त्यांनी मुलाची चौकशी केली. ऑस्ट्री व मात्सुमुरा दोघांनी सर्वर जायची वाट पाहिली. इथे दोघांपैकी कोणी एकाने खिडकी उघडली. थंड वातावरणात प्रेताचे तापमान हळू हळू कमी होते व एस्टिमेटेड टाईम ऑफ डेथ हा अ‍ॅक्चुअल टाईम ऑफ डेथ पेक्षा नंतरचा असतो म्हणून त्याने ही खबरदारी घेतली असावी. ऑस्ट्रींना त्यांचा अ‍ॅलिबीचा लाभ घ्यायचा असू शकतो.

५) ऑस्ट्री बायकोला गोळ्या घालून ठार करतात - ६:३४ च्या आसपास. इथे ते सायलेन्सर वापरतात. मात्सुमुराला हे अनपेक्षित असते. बाहेरच्यांना ऐकू आलेली किंकाळी ही मात्सुमुराची होती. ऑस्ट्रींकडे दोनच पर्याय आहेत. यातर मात्सुमुराला विश्वासात घ्या - त्याच्या क्लायंटचाही यात फायदाच आहे - किंवा त्यालाही मारून टाका. ऑस्ट्रींना बायकोचा खून झाला बराच नंतर झाला असे ठसवायचे असावे - नंतर खिडकी बंद केली आणि हिटर चालवला की तापमान बर्‍यापैकी नॉर्मलला येईल आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये खून कधी झाला हे चुकीचे नमूद होईल. मग स्वतःला जखमी करून विंटर वूल्फवर नाव घ्यायला ते मोकळे.

६) मात्सुमुराच्या किंकाळीमुळे हा प्लॅन फसला. मग त्यांनी मात्सुमुराला विश्वासात घेतले. त्याच्या मदतीने खूनी खून करून मशिनरी रूममध्ये लपला होता असा बनाव त्यांनी रचला. मात्सुमुराला त्यांनी फ्लॉवर पॉट देऊन स्वतःला जखमी करायला सांगितले. इथे त्यांचे पुसट ठसे आले तर मात्सुमुराने ग्लोव्ह्ज घातले असावेत. हे सर्व विंटर वूल्फने केले असे दाखवण्यासाठी त्यांनी नेकलेस व अंगठी गायब केली. मर्डर वेपन (सायलेन्सर सहित) सहित मात्सुमुराने ती बर्फात फेकली असावी. बाहेरच्यांना ऐकू आलेला मिसेस ऑस्ट्रींचा आवाज मात्सुमुराचा असावा. जपानी आवाज हे इतर आवाजांपेक्षा पातळ असतात, तसेच सराईत भाडोत्री खुन्याला स्त्रीचा आवाज काढता येऊ शकतो (मिसिंग लिंक फाईव्ह). बाहेरच्यांना मिसेस ऑस्ट्रींचा आवाज कितपत ओळखता येतो हे सांगितलेले नाही (मिसिंग लिंक सहा). मग ते दोन गोळ्या खिडकीतून बाहेर झाडतात ज्याचे आवाज बाहेरचे सर्व ऐकतात.

७) मात्सुमुरा आयत्या वेळी ठरल्याप्रमाणे मि. ऑस्ट्रींना बाथरुममध्ये बेशुद्ध करतो व खिडकी उघडी टाकून पळतो. मशिनरी रूममध्ये ग्रिल्ड पॉटेटोज ची अ‍ॅल्युमिनिअम फॉईल प्लांट करतो व आपल्या रूममध्ये येऊन बसतो.

८)हे सर्व करण्यासाठी खूनी थंड रक्ताचा, आतल्या गाठीचा हवा. ऑस्ट्रींचे व्यक्तीमत्व अबोल स्वभावाचे दाखवले आहे. थोडक्यात त्यांच्या मनाचा थांगपत्ता लागणे कठीण. तसेच ते उदास राहत असल्याने ते मिसेस ऑस्ट्रींना कंटाळलेही असावेत.

इथे पोलिस एव्हिडन्स/कन्फेशन फोर्सिंग असे वापरू शकतात

१) विंटर वूल्फ कोरलेली अंगठी ऑस्ट्रींनी लंडनमध्ये बनवून आणली असावी. लंडनमध्ये तपास केल्यास त्याचे धागे ऑस्ट्रींपर्यंत ताणता येतील.
२) मात्सुमुरा भाडोत्री खूनी असल्यास त्याची बॅकग्राऊंड चेक करणे शक्य आहे. त्याच्या कडून कन्फेशन फोर्स करता येईल.
३) मात्सुमुराने क्लिनिंग कार्टवाल्या मेडला सामील केलेले असू शकते. ही मेड ब्रेक होण्याची शक्यता अधिक. तिच्या मदतीने मात्सुमुरावर प्रेशर आणणे अधिक सुलभ होईल
४) हे जरा फार फेच्ड आहे पण जर पोलिसांना हवामान सुधारल्यावर शोध घेता आला तर बर्फात मर्डर वेपन सापडू शकते. ते सापडल्यावर बर्‍याच गोष्टी सुकर होतील.

ऑस्सम! ऑस्सम! थिअरी आणि सॉलिड पोस्ट पायस!
तुमची केसच्या चौकटीत राहून एकाचवेळी सग़ळ्या अ‍ॅंगल्सने विचार करण्याची पद्धंत खूपच ईंप्रेसिव आहे. तुम्ही केस सोडवण्याच्या खूपंच जवळ पोचले आहात असे मला वाटते.
थिअरीतले सगळे मुद्दे अगदी मान्यं आहेत. तुमच्याकडून कदाचित दोन महत्वाचे अँगल्स दुर्लक्षित झाले आहेत की त्यांचा ऊहापोह करणे ईथे तुम्ही टाळले आहे? माझ्या मते
१) मि. ऑस्ट्रींना ईतर कुणाच्याही मदतीशिवाय अथ-पासून ईतिपर्यंत घटना घडवून आणणे शक्य आहे का हे बघणे जरूरी आहे
२) वडील आणि मुलगा हे नॅचरल अलाय होऊ शकतात असे गृहीत धरल्यास मि. हिरोशी ची जागा सायमनही घेवू शकतो का ते ही बघणे जरूरी आहे कारण तोही मि. मार्टिनेझ आणि मि. हिरोशी सारखाच ऑस्ट्री दांपत्यं येण्याआधीपासून हॉटेल मध्ये ऊपस्थित आहे.

तुमचा प्रतिसाद आत्तापर्यंतचा सर्वोत्तम म्हणून मार्क करतो.

पायस उत्तम प्रतिसाद...... माझे काही मुद्दे....

१> क्लीनर लेडीच्या मदती शिवाय १२ तास खिडकी उघडी राहु शकत नाही आणि एवढी मोठी रुम थंड होउ शकत नाही. दुपारी २ नंतर खिडकी उघडली तर ६.४० पर्यन्त मरायची वेळ न कळे पर्यन्त बॉडी थंड होउ शकत नाही.

२> मिसेस चा खुन हा रुम मध्ये गेल्यावर लगेच झाला असावा नाहीतर तिला रुम खुप थंड असल्याची जाणिव झाली असती. . कारण रुम थंड तिने केलेली नसावी. खुन मिस्टर आणि त्याचा मुलाने केला असावा. मुलानी बंदुक घेउन गेली असावी. मिस्टराचा नंतर खिडकी बंद करुन खाली प्रोग्रम्ला जाण्याचा बेत असावा. त्याचा प्लान नुसार नंतर वर आल्यावर तापमान वाढलेले असेल मात्र मरणाची वेळ चुकीची नोंदवली जाईल आणि त्यावेळी मात्र ऑस्ट्री रुमवर न्हवते.

३> तसेच ऑस्ट्रीनी बंदुकीचे आवाज आणि मिसेस्च्या ओरडण्याचा आवाज ( बायको असल्याने कधीही, नशेत असताना, मस्करीत रेकॉर्ड करुन ठेवला होता. कदाचित खुन करताना पण रेकॉर्ड करुन amplify केला असावा_) आणि तो त्यानी बायकोच्या मोबाईल मध्ये प्रोग्राम करुन ठेवला होता. त्यानीच "$WOLF$" वाली अंगठी ठेवली होती. मुलानी फोन आणि वेब चे सेट केले असावे. त्यात फक्त मोजकेच प्रश्न विचारले गेले असतिल.

४> हाताला लागलेली गन पावडर धुण्यासाठी ऑस्ट्री बाथरुम मध्ये गेलेले असताना मात्सुमुरा खिडकीतुन आत आला. त्यानी मिसेस ऑस्ट्री ला बघितल्यावर तिचे सगळे दागिने काढुन घेतले. पण त्या गडबडीत मात्सुमुरा च्या हातुन मोबाईल चालु झाला आणि ऑस्टीचा प्लॅन बारगळला. दागिने घेउन मात्सुमुरा आल्या मार्गाने पळुन गेला.

५> प्लॅन बारगळला म्हणुन ऑस्ट्री नी डोके आपटुन खोच पाडुन घेतली . पण त्या आधी मोबाईल मधली रेकोर्ड डिलिट करायला विसरले नाहीत.

सोर्स.... दोन वेगवेगळे CID. एकात रुम थंड केली होती तर दुसर्यात बायकोच्या फोन वर बंदुक आणि आवाज रेकोर्ड केला होता.

प्रतिसाद अजिबात वाचले नाहीयेत आणि माझी पोस्ट लिहून होईपर्यंत वाचणारही नाहीये.

इथे अनेक संशयास्पद लोकं आहेत -
१. सायमन आणि मार्टिनेझ डायरेक्ट संशयी ठरतात.
२. ऑस्ट्रीबाईंचा भाऊ व्हाया हिरोशी संशयी ठरतो.
३. कदाचित ऑस्ट्रीबुवा बायकोच्या स्वभावाला कंटाळले असतील तर ते देखिल एक संशयी असू शकतात. आणि मग हिरोशी आणि ऑस्ट्रीबुवा दोघांनी मिळून हा बेत तडीस नेला असण्याची शक्यता असू शकते.
४. हॉटेलचा स्टाफ सामिल असण्याची शक्यता नगण्य वाटते. खरंतर क्लीनर लेडी आणि बेल बॉय निदान खिडकीचं हँडल लावून लॅच उघडून ती बंदच ठेऊ शकतात. पण बाहेरच्या वार्‍यामुळे खिडकी कधीही उघडली जाऊ शकते आणि मिसेस ऑस्ट्री तक्रार करू शकतात. शिवाय इतक्या प्रेस्टिजियस हॉटेलात काम करणार्‍या स्टाफचं पूर्ण चेकिंग होत असणार. त्यांना बेतात सामिल करून घेणं तसं कठीण. त्यामुळे स्टाफला वगळत आहे.

मला तरी ऑस्ट्रीबुवांनीच हा खून घडवला असेल असं वाटतंय. हिरोशीच्या मदतीनं.

मि. ऑस्ट्री आणि हिरोशी यांच्यात हा बेत हॉटेलात येण्यापूर्वीच शिजला. विंटर वुल्फच्या दंतकथेचा आणि त्याची डेडबॉडी न मिळाल्याचा फायदा उठवून दोघांनी या बेताला विंटर वुल्फची फोडणी दिली. त्यासाठी अंगठी तयार करवली. ती हिरोशीनं जपानमधूनच करून आणली कारण ऑस्ट्रींना ती कोणाच्या नकळत करून घेणं कठीण असणार. जपानमधून कोणा लहान कारागिरा कडून करवून घेतल्यानं अगदी तंतोतंत न बनता लेटरींग आणि आकारात फरक पडला.

हॉटेलात चेक इन झाल्यावर संध्याकाळी फिरायला बाहेर गेले असताना ऑस्ट्रीबुवांनी मशिनरीच्या खोलीत कोणीतरी तिथे वावरलं असल्याचे पुरावे ठेवले. प्रचंड थंडी असल्याने त्यांनी जाड ओव्हरकोट घातला असणार आणि त्यामधून ही थोडीशी सामग्री घेऊन जाण्यासाठी त्यांना काही विशेष प्रयास पडले नसणार. मशिनरीरूम हॉटेलला लागूनच असल्याने आणि शिवाय मि ऑस्ट्री चालायलाच बाहेर पडल्याने त्यांच्या बुटांचे ठसे इथे तिथे आढळले तरी त्यांच्यावर डायरेक्ट आळ घेणं कठीण जाणार. शिवाय ते इतक्या वर्षांचे आणि आदरणीय कस्टमर असल्याने त्यांच्यावर कोणाची नजर असणं ही कठीण.

इतक्या वर्षांच्या अनुभवाने डिनरला बायको काय ऑर्डर करणार हे मि. ऑस्ट्रींना माहित होतं अथवा डिनरमध्ये त्यांच्या स्वतःसाठी ग्रिल्ड पोटॅटो ऑर्डर करायलाही त्यांनी बायकोला सांगितले असावे. त्यामुळे हिरोशीनेही आधीच ठरल्याप्रमाणे ग्रिल्ड पोटॅटो ऑर्डर करून करायला सांगितले आणि चालायला जाताना ते पोटॅटो आणि हीटर वगैरे हिरोशीच्या रूममधून उचलले. अथवा हिरोशीने त्यांना कॉरीडॉर / लॉबी / कॉमन रेस्टरूममधे त्यांना ते दिले.

त्याचबरोबर खिडकी उघडता येईल असं हँडल, ती अंगठी आणि एक गनही दिली. या दोन्ही वस्तूंना दोर्‍या बांधलेल्या होत्या.

हॉटेलमध्ये संध्याकाळी बॅन्क्वेट असल्याने लोकं कॉरीडॉरमध्ये असतील अशी वेळ साधून प्लॅन आमलात आणला गेला. बायकोच्या नकळत मि ऑस्ट्रींनी खिडकी उघडली आणि मोठ्याने आरोळी ठोकली. यामुळे बाहेर जे कोणी असतील त्यांना वाटेल की मारेकर्‍याने पहिल्यांदा मि ऑस्ट्रींवर हल्ला केला. मग त्यांनी गन / पिस्तुलानं मिसेस ऑस्ट्रींचा खून केला. आणि लगोलग दोर्‍या बांधलेलं हँडल आणि गन खिडकीतून खाली सोडली. याचबरोबर बोलमधले ग्रिल्ड पोटॅटोज, मिसेस ऑस्ट्रींच्या गळ्यातला नेकलेस आणि अंगठीही खाली सोडली. या सर्व गोष्टी १०२ मध्ये राहत असलेल्या हिरोशीनं आधीच ठरल्याप्रमाणे स्वतःच्या ताब्यात घेतल्या.

त्यानंतर मि ऑस्ट्रींनी फ्लॉवर पॉट घेऊन स्वतःच्या डोक्यात मारून घेतला आणि त्या अवस्थेत तो घाईघाईनं धुवून पुन्हा जागेवर ठेवला. मग बाथरूममध्ये ते पडून राहिले. जखम मोठी होती पण तरीही जीवघेणी नव्हती. रक्त्रस्त्राव झाल्यानं ते बेशुद्ध पडले. जो त्यांच्या प्लॅनचाच भाग होता. ते बेशुद्धावस्थेत सापडणं गरजेचं होतं. शिवाय ते बाथरूममध्ये सापडणेही गरजेचं होतं. म्हणूनच ते बाथरोबमध्ये होते आणि स्वतःची अंगठीही बाथरूममध्येच ठेवण्याची खबरदारी घेतली होती. जर ते बायकोसोबत बाहेरच्या खोलीत असते तर त्यांना गोळी का मारली नाही हा प्रश्न पडू शकला असता. शिवाय त्यांच्यावर पहिला हल्ला झाला आणि ते बेशुद्ध पडले असं भासवल्यानं बायकोला गोळी मारत असताना त्यांनी आवाज / प्रतिकार का केला नाही? हा प्रश्नही निकालात निघाला.

बर्फातल्या बुटाच्या ठश्यासाठी आणि विंटर वुल्फला मध्येच घुसडण्यासाठी हिरोशीनं स्वतःचे बर्फातले मोठे बुट (जे कदाचित त्याच्या मापाचे न आणता एखाद साईज मोठी किंवा लहान आणली होती. किंवा त्या ठश्यावर पुढे बर्फवर्षाव झाल्यानं नक्की साईज कळू शकणार नव्हती.) त्यात हार्डवेअर मधून घेतलेल्या सर्वसाधारण पण वजन असलेल्या अशा गोष्टी घालून त्या बुटांना दोर्‍या / इलॅस्टिक लावून ते पहिल्या मजल्यावरच्या त्याच्या रूमच्या खिडकीतून जोरात खाली टाकून मग पुन्हा दोर्‍यांमुळे वर ओढून घेतले. मिसेस ऑस्ट्रींच्या भावाच्या ऑफिसात फोन ही केवळ दिशाभूल होण्यासाठी केले होते.

*********
या माझ्या विवेचनात एक कच्चा दुवा आहे की ऑस्ट्रींनी स्वतःला इतकी जोरात आणि तरीही योग्य प्रमाणात जखम कशी काय करून घेतली? आणि फ्लॉवर पॉट पुन्हा जागेवर ठेवताना कार्पेटवर रक्त सांडले कसे नाही? तर त्याचे एक संभाव्य उत्तर असे की त्यांनी फ्लॉवर पॉट फार जोरात मारलाच नाही. थोडीफार जखम होऊन रक्तस्त्राव झालेला दिसावा इतपतच त्यांना इजा अपेक्षित होती. ती त्यांनी केली आणि मग फ्लॉवर पॉट धुऊन ठेवला. तो फार काळजीपूर्वक धुतला नाही कारण त्यावर रक्त सापडण्याची गरज होती. आणि मारेकर्‍यानं तो घाईघाईनं धुऊन पुन्हा जागेवर ठेवला असा आभास निर्माण करायचा होता. पण तो जागेवर ठेऊन, गन वगैरे खिडकीतून सोडून घाईघाईनं पुन्हा बाथरूममध्ये आपली जागा घेताना ते खरंच घसरले आणि अस्ताव्यस्त पडले.

साहिल
१२ तास खिडकी ऊघडी राहिली हे खून झाल्यानंतर बॉडी पोलिसांनी पोस्ट्मॉर्टेम ला दिल्यापर्यंतचे १२ तास आहेत.
गार्डसना खिडकी ऊघडी मिळाली, पण तो क्राईम सीन असल्या कारणाने त्यांना ती लाऊन घेता आले नाही. खिडकी आधी १२ तास ऊघडी असती तर ऑस्ट्र्री दांपत्याने चेकईन तरी केले असतेका त्या रूम मध्ये?

प्रतिसाद अजिबात वाचले नाहीयेत आणि माझी पोस्ट लिहून होईपर्यंत वाचणारही नाहीये. >>> बेस्ट आहे हे मामी. दुसर्‍यांचे प्रतिसाद आपले थिंकिंग कंट्यामिनेट करतात.

मामी ब्रावो! एक अतिशय ऊत्तम स्टार्ट टू एंड थिअरी.
विंटर वुल्फ ने आजवर कधीही कोणत्या पुरूषाला मारले नाही, त्याचे सगळे गुन्हे बायका आणि दागिन्यांशी निगडीत आहे.
त्यामुळे मि.ऑस्ट्रींचा हल्ला जीवघेणा नसणे गरजेचे होते.
खुनी 'विंटर-वुल्फ' नसेलच हे नुसत्या अंगठीवरून ठरवणे थोडे अवघड आहे. चार वर्षांच्या गॅप नंतर अंगठीच्या 'क्वालिटी कंट्रोल' मध्ये थोडा फरक पडू
शकतोच.. तो काय बॅटमॅन थोडीच आहे. Happy

कुणाला ह्या धाग्याचे पेज लोड होतांना प्रॉब्लेम येतो आहे का?
माझे पेज लोड होते आहे पण लगेचच अजून एक नवीन ब्लँक पेज लोड होते आहे. डेस्क्टॉप आणि मोबाईल दोन्हींवर.
धाग्याचे पेज लोड होताच डाव्या कोपर्‍यातले फुलीचे साईन प्रेस करून पुढच्या ब्लँक पेजचे लोडिंग थांबवता येते आहे पण धागा ब्लँक पेज वर का जातो आहे ते कळंत नाहीये.

हो. पान लोड होत नव्हतं इतका वेळ. jahirat yet hoti. mala mazach pratisad vachata yeina. mala tar bhiti vatali itaka motha pratisaad uDala ki kaay. karan mi to sakali mazya pahilya pratisadanantar lihayala ghetala. pan thoda lihun zalyavar mi divasbhar baher gele hote. mag alyavar uralela pratisad lihila. itaka zalyavar to uDala ki kaay vatun jaamach vaitag ala hota.

मराठीतून टाईप करता येत नव्हतं. म्हणून मिंग्लिशम्ध्ये केलं. मग काहीतरी संपादन करायला पुन्हा उघडलं तर आता मराठी टाईप होतंय. पण आता राहूदेत वरचं तसंच.

हल्लेखोराने मिस्टरांवर हल्ला करून फ्लावरपॉट धुवून ठेवला , ही मोठी विसंगती दिसते आहे,
त्याच्या हल्ल्याने मेलेली बाई सगळ्यांना दिसणार आहे, मग फ्लॉवरपॉट धुवून ठेऊन काही घडलेच नाही असा बनाव करायचे काय कारण?

माझा पहिलाच प्रयत्न... मिसेस ऑस्ट्रि च्या भावाने केला असण्याची शक्यता वाटतेय, मि ऑस्ट्रि च्या संगनमताने. भाउ त्या सर्वर च्या कार्ट मध्ये बसून रूम मध्ये गेला, तिथे लपून बसला ... मि. ऑस्ट्रि बाहेर गेल्यावर खिडकी उघडली ..... मि ऑस्ट्रि बाथरूम मधून यायची वाट पाहिली, पहिला हलका वार त्यांच्यावर केला आणि ठरल्याप्रमाणे गोळ्या मात्र फक्त मिसेस ऑस्ट्रि ना मारल्या, मग सर्वर ला मारेकरी पळाला हे दिसल्यासरशी त्याने ई. फोन केला (जो त्याने खरं तर आधी च करायला पाहिजे होता, पण तो कशाची तरी वाट पाहात होता)

हिरोशी ला हे क्रुत्य करायचं असेल पण मि ऑस्ट्रि ना चान्स घ्यायचा नसेल कारण त्यांनी फारच विचार पूर्वक सगळं प्लान केलं...

मी पायस चे उत्तर सर्वोत्तम म्हणुन मार्क केले आणि तो लोड प्रॉब्लेम चालू झाला. ते उत्तर काढून टाकले आहे तर आता प्रॉब्लेम येत नाहीये धागा लोड होण्यास.
धन्यावाद जाई.

खिडकी उघडण्याचा उद्देश, रूम गार करणे याबरोबरच बाहेरच्या इसमाला रूममधे प्रवेशाची सोय करणे (सायमन?) हेही असू शकते.

संध्या ६:११ मिसेस ऑस्ट्रींनी फ्रंट डेस्कला फोन करून 'त्यांचा सावत्रं मुलगा आणि त्याची बायकोही हॉटेलमध्ये थांबले आहेत का?' ह्याची चौकशी केली>>
रूम नं ४०२ मध्ये मि. सायमन ऑस्ट्री आपल्या प्रेयसीबरोबर ऊतरले आहेत.>> हे चुकून झालंय का? नक्की बायको की प्रेयसी?

तुमच्याकडून कदाचित दोन महत्वाचे अँगल्स दुर्लक्षित झाले आहेत की त्यांचा ऊहापोह करणे ईथे तुम्ही टाळले आहे? >> उहापोह करणे टाळले आहे. माझ्याकडे या अँगल्सवर फुलप्रूफ अर्ग्युमेंट नाहीये म्हणून टाळले.

खिडकी उघडण्याचा उद्देश, रूम गार करणे याबरोबरच बाहेरच्या इसमाला रूममधे प्रवेशाची सोय करणे (सायमन?) हेही असू शकते. >> क्लिनींग कार्ट मधे बसून दुसरी व्यक्ती येइल हे farfetched वाटते आहे >> याच्यात प्रॉब्लेम असा आहे की हे प्रतिष्ठित विंटर हॉटेल आहे आणि ऑस्ट्री इथे कित्येक वर्षांपासून येत आहेत. विंटर हॉटेलची कल्पनाच मुळात हिवाळी सुट्टीच्या ठिकाणी राहण्याची सीलबंद जागा आहे. हिवाळ्यात इथे चुकूनही खिडक्या उघडल्या जाणार नाहीत - म्हणून तर त्या लॅचबंद केल्या आहेत. आणि समजा त्या उघडल्याच तर ऑस्ट्रींसारख्या बाईच्या ते लक्षात आल्याखेरीज राहणार नाही आणि असला हलगर्जीपणा ती अजिबात खपवून घेणार नाही.
तसेच अशा हॉटेलातल्या क्लिनिंग कार्ट्स अजस्त्र असतात. मध्यम बांध्याची व्यक्ती अगदी सहज तिच्यात अंग चोरून बसू शकते.

Pages