Submitted by सायु on 17 August, 2017 - 07:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
करवंद : १२ ते १५ ( ईकडे हिरवी, किंवा गुलाबी मिळतात)
लसुण : १ गट्टा
जिरं : १ चहाचा चमचा
तिखट : २ चहाचे चमचे
गुळ : दोन लिंबा एवढा
मिठ : अंदाजे
क्रमवार पाककृती:
साधारण श्रावण महिन्यात हिरवी, किंवा पांढरी गुलाबी करवंद बाजारात येतात आणि मग आमच्या कडे आवर्जुन ही चटणी केल्या जाते.
करवंदाचे लोणचे पण छान होते तसेच तिखट चटणी पण छान लागते, मी आज ईथे देतेय ती गोड चटणीची पा कृ.
तर सगळ्यात आधी, करवंदे धुवुन पुसुन कोरडी करवीत. मग सुरीने मधुन चिरुन दोन भाग करुन बिया काढुन घ्याव्यात.
लसणाच्या पाकळ्या, जिरं, मिठ, करवंदाचे काप आणि खिसलेला गुळ सगळे एकत्रच मिक्सरला फिरवुन घ्यावे.
चटपटीत आंबट- गोड, तिखट चटणी जेवणाची लज्जत वाढवायला तय्यर आहे.
वाढणी/प्रमाण:
काय सांगु चटणी आहे ती.
माहितीचा स्रोत:
सासु बाई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त!
मस्त!
पहिल्या वहिल्या प्रतिसादा
पहिल्या वहिल्या प्रतिसादा साठी आभार.
व्वा फोटो कसला सुंदर आहे.
व्वा फोटो कसला सुंदर आहे..तोंडाला पाणी सुटलं माझ्या...
खतरनाक..
फोटो सुरेख !
फोटो सुरेख ! छान पाकाकृती.
व्वा फोटो कसला सुंदर आहे.
व्वा फोटो कसला सुंदर आहे..तोंडाला पाणी सुटलं माझ्या...
करुन बघा . नक्की आवडेल.
खतरनाक.. ++
रन्स, धन्स .
मला का फोटो दिसत नाहिये?
मला का फोटो दिसत नाहिये?
सायु, काय सॉलिड खतरनाक दिसतेय
सायु, काय सॉलिड खतरनाक दिसतेय . मस्त रेसिपी .नक्की करून बघणार .
लाळगाळू फोटो
लाळगाळू फोटो
आवडती चटणी माझी..
आवडती चटणी माझी..
काय चुम्मा रंग आलाय गं..
करवंदाच लोणच पन कर ना.. मी केल तर रेस्पी देईल इथे..नाहीतर तू दे
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय.
पण एक प्रश्न आहे, करवंदांचा चीक निघतो ना चिरल्यावर?
तिखट/ लसून कच्च राहणारपण.
तिखट/ लसूण कच्च राहणारपण..पचेल का?
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
मस्त साधी सोपी चट्णी दिसते
मस्त साधी सोपी चट्णी दिसते आहे. टेस्टी असणार...
slurrrrrrrrrp............
slurrrrrrrrrp............
वॉव मस्त दिसतेय चटणी.
वॉव मस्त दिसतेय चटणी.
सुरेख फोटो आणि रेसिपीही.
सुरेख फोटो आणि रेसिपीही.
मस्त!
मस्त!
वॉव किती छान,
वॉव किती छान,
करायला आवडले असते पण मला नेहमी काळी अन पिकलेली करवंदेच दिसतात, अशी हिरवी कधी पाहिलीच नाही
वॉव सायु. तोंडाला पाणी सुटल.
वॉव सायु. तोंडाला पाणी सुटल.
आमच्याकडे हिरवी करवंद एप्रिलपर्यंत मिळतात. मे मधे पिकतात ती.
सगळयांचे प्रतिसाद खुप आवडलेत.
सगळयांचे प्रतिसाद खुप आवडलेत.. आभार ----------/\---------
मला का फोटो दिसत नाहिये? +++ क्रोम नी लॉग ईन करुन बघ दक्षिणा
सायु, काय सॉलिड खतरनाक दिसतेय . मस्त रेसिपी .नक्की करून बघणार .+++ हेमा ताई, नक्की करुन बघा.
काय चुम्मा रंग आलाय गं..
करवंदाच लोणच पन कर ना.. मी केल तर रेस्पी देईल इथे..नाहीतर तू दे ++++ धन्स टीना. लोणच्याची रेस्पी तु दे...
पण एक प्रश्न आहे, करवंदांचा चीक निघतो ना चिरल्यावर? ++ करवंदाला चीक असतो, पण चिरतांना निघत नाही.. झाडावरुन तोडतांना मात्र निघतो.
तिखट/ लसूण कच्च राहणारपण..पचेल का? अगची पचेल.. तसेही कच्चे लसुण वातहारक असते.
धन्स जागु.
धन्स जागु.
आमच्याकडे हिरवी करवंद एप्रिलपर्यंत मिळतात. मे मधे पिकतात ती. +++ अच्छा!
फोटो एकदम भारी!!!
फोटो एकदम भारी!!!
ह्या सीजनमध्ये कच्ची करवंद मिळतात हे खरंच माहित नव्हतं. कोकणात साधारणतः मार्च ते एप्रिलमध्ये कच्ची करवंद मिळतात. पण या करवंदांचा आकार कोकणातील करवंदांच्या मानाने बराच मोठा दिसतोय.
धन्स नरेश.. विदर्भात याच
धन्स नरेश.. विदर्भात याच सिझन मधे करवंद मिळतात..
जागु सांगतेय तसे कोकणार मार्च एप्रिल मधे मिळत असावित.. या वर्षी जुन मधे कोकणात श्रीवर्धनला जाण्याचा योग आला.
तिथे काळी करवंद / डोंगरी मैना चा मनसोक्त आस्वाद घेतला.:) डोंगरी मैना काही ईथे विदर्भात मिळत नाहीत.