फार महत्वाचा नसलं तरी जरा नाजूक विषय आहे. पण चर्चा झाली तर बरे होईल.
परवाची गोष्ट. ऑफिसमध्ये जुन्या प्रोजेक्ट टीम मधली एक सहकारी गर्भवती आहे असे लक्षात आले. तशी हि गुड न्यूज तिच्या सध्याच्या टीम मध्ये तर सर्वांनाच कळली होती. पण मला ती अनेक दिवसांनी पहिल्यांदाच लिफ्ट मध्ये भेटली. प्रेग्नंट आहे लक्षात आले. तर हाय हेलो झाल्यावर मी सहज तिला अभिनंदन म्हणालो. पण तिची प्रतिक्रिया फारशी चांगली नव्हती. वाईटसुद्धा नव्हती. नुसतेच कसनुसे स्मितहास्य केल्यासारखे करून ती दुसरीकडे पाहू लागली. नंतर काही बोलली पण नाही. त्यानंतर लिफ्टमधून बाहेर पडल्यावर सुद्धा बाय वगैरे न करताच निघून पण गेली.
मी आपल्याशीच विचर करत राहिलो. माझे तर इथे काही चुकले नाही ना? प्रामाणिकपणे सांगायचे तर अशावेळी (जेन्वा सहकारी मैत्रीण अनेक दिवसांनी अचानक भेटते व प्रेग्नंट आहे असे लक्षात येते) अभिनंदन म्हणायचे असते कि नसते? कि एकदम बाळ झाल्यावरच अभिनंदन करायचे असते? याबद्दल मी आधीपासूनच कमालीचा कन्फ्युज्ड आहे. आणि विषय इतका नाजूक असल्याने याबाबत आजवर कुठे चर्चा पण करता आली नाही. बाकीचे कुणी मला अशावेळी अभिनंदन वगैरे म्हणताना कधी दिसले नाहीत. किंवा माझ्या पाहण्यात तरी आलेले नाहीत. तरीही त्यावेळी मी तिला सहज तोंडातून बाहेर आले आणि अभिनंदन म्हणून गेलो.
हे माझे चुकले का? याबाबत योग्य शिष्टाचार काय आहे?
एका मित्राच्या एका एक्स
एका मित्राच्या एका एक्स सहकार्याच्या एका प्रसंगातील वर्तणुकीबद्दलच्या त्या एका मित्राच्या समजुतीवरून इतकी जनरलायझेशन्स?
जर न्यूज ऑलरेडी पब्लिक असेल
जर न्यूज ऑलरेडी पब्लिक असेल तर कसे ऊल्लंघन होते आहे पर्सनल स्पेसचे?>>>>> अरे पण तोच तर मुद्दा आहे ना? न्युज ऑलरेडी पब्लिक आहे की नाही ह्या बद्दल दुमत असेल तर काय? असा प्रश्न आहे. मी वर लिहिलं आहेच. पब्लिक असेल न्युज तर प्रश्नच येत नाही.
सरप्राईझ बेबी शॉवरला प्रेग्नंट व्यक्ती आमंत्रण देते का?>>>>>> आवो दादा! त्यात सरप्राईज हे त्या व्यक्तीला शॉवर करण्यात/देण्यात येत आहे ह्यात असतं. म्हणजे तुझा शॉवर आहे बरका असं तोंडावर न सांगून त्यांना एके दिवशी एका खोलीत जाऊन बुव्वा कूक्क करतात. त्याला म्हणतात सरप्राईज बेबी शावर. उद्या त्या व्यक्तीनी ऑफिशियली न्युज शेअरच नाही केली तर कोन दील त्याला शावर?
भारतात डिलिव्हरी च्या आधी
भारतात डिलिव्हरी च्या आधी बाळाचे लिंग विचारून बघा बरं! आले मोठे नॉर्थ अमेरिकेत आणि भारतात सेम टू सेम वागणारे
ओह.. लिंगाचं नाही हो विचारणार
ओह.. लिंगाचं नाही हो विचारणार.
स्वाती तीच तर मज्जा आहे ना?
स्वाती तीच तर मज्जा आहे ना?
एकेक भारी भारी विचार ऐकायला मिळतात.
हो ना बुवा, तेच तर. तीसेक जणांची टीम, मॅनेजर्स वगैरे बहुतांश लोकांचा व्यावसायिक संबंधांपलिकडे जास्तं काही सबंध नसतांना पुढाकार घेवून बेबी शॉवर करतातंच ना. बरं जो अरेंज करतो बेबी शॉवर तो ईतरांना परस्परच बोलावणार.
मग त्या ३० जणांव्यतिरिक्त एखाद्या दुसर्या टीममधल्याने अभिनंदन केले तर 'तू कोण पर्स्नल स्पेस मध्ये येणारा' हा दुटप्पीपणा नाही झाला का?
>> पुन्हा अति जजमेंटल.
>> पुन्हा अति जजमेंटल.
त्या ओळखीच्या फलाण्याने अभिनंदन केल्याने काही निगेटिव घदून येते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मि. फलाणे वडील असतील तर त्यांचे अभिनंदन चालेल पण नसतील तर चालणार नाही असे आहे का? मिसेस फलाण्यांचे अभिनंदन चालेल का? मिस फलाण्यांचे अभिनंदन चालेल का?
अभिनंदन केल्याने निगेटिव्ह घडून येते हे किंवा असा अर्थ ध्वनित करणारे सुद्धा मी काहीही लिहिलेले नाही. पण आता बोलला आहात म्हणून सांगतो कि जर काही निगेटिव्ह झाले तर नंतर अभिनंदन करणाऱ्या त्या "पब्लिक"ला सामोरे जाणे हे विशेषकरून स्त्रीला अत्यंत कठीण जात असते (आता इथे तुम्ही का म्हणून विचारणार हे तुमच्या आतापर्यंतच्या एकंदर मांडणीवरूनच कळते). म्हणून ते आधी पब्लीकली सांगितले जात नाही. पण मी हे सगळे तुम्हाला का सांगत आहे? माझ्या प्रश्नांना उत्तर दूरच, उलटे मलाच अपरिपक्व दर्जाचे प्रश्न विचारले जात आहेत. अशा प्रकारे चर्चा अथवा वादविवाद नाही होऊ शकत. डिबेटचे बेसिक्सच जिथे क्लीअर नाहीत तिथे काय बोलणार. मी पामर.
(बाय द वे, "मि. फलाणे वडील असतील तर त्यांचे अभिनंदन चालेल" हे काय लिहिलेय? इथेच त्रिफळा उडालाय. अहो मी अभिनंदन करणाऱ्याला फलाणा म्हणतोय. ज्यांचे करायचे त्यांना नव्हे. असो. जाउ द्या)
अहो मी अभिनंदन करणाऱ्याला
अहो मी अभिनंदन करणाऱ्याला फलाणा म्हणतोय. ज्यांचे करायचे त्यांना नव्हे. >>
हाब, त्याला आपलं (ढिकाणा) म्हणा. आणि इमानदाराना फक्त आपलं म्हणा.

तीसेक लोक जवळचे असू शकतातच की
तीसेक लोक जवळचे असू शकतातच की ! >> विकु आता तुम्ही वादासाठी वाद घालता आहत असे म्हणायला हरकत नाही.
आपले पोटाकडे लक्ष गेले आहे ..
आपले पोटाकडे लक्ष गेले आहे ... जे जाणे अगदी सहज शक्य आहे आणि ते गेले आहे हे समोरच्या व्यक्तीने बघितल्या नंतर तुम्ही कोणी अभिनंदन न म्हणता पुढे जाता का? जात असाल तर का?
अभिनंदन केल्याने निगेटिव्ह
अभिनंदन केल्याने निगेटिव्ह घडून येते हे किंवा असा अर्थ ध्वनित करणारे सुद्धा मी काहीही लिहिलेले नाही. >> मग नक्की प्रॉब्लेम काय आहे?
हाय/हॅलो सारखे 'अभिनंदन' आहे, ज्याला हसून थँक यू म्हणता येते.
(बाय द वे, "मि. फलाणे वडील असतील तर त्यांचे अभिनंदन चालेल" हे काय लिहिलेय? इथेच त्रिफळा उडालाय. अहो मी अभिनंदन करणाऱ्याला फलाणा म्हणतोय. ज्यांचे करायचे त्यांना नव्हे. असो. जाउ द्या) >> तुम्ही चुकीचा अर्थ काढला. अभिनंदन करणारे मिं. फलाणे वडील असतील तर असेच मी म्हणत आहे, तुम्हीही असेच वाचा. सॉरी माझे मराठी थोडे कच्चे आहे.
डिबेटचे बेसिक्सच जिथे क्लीअर नाहीत तिथे काय बोलणार. मी पामर. >> आमचे बेसिक्स आणि अॅडवान्स्ड स्कील सगळे मायबोलीचीच देण आहे, जे होन करण्याची जबाबदारी तुमच्यावरही आहे हो.
पण तुम्हाला पुढे चर्चेत रस नाही असे दिसते. त्यामुळे असो.
माझ्या बायकोने अमेरिकेत
माझ्या बायकोने अमेरिकेत आपल्या टिमला ओफिशिअली सांगेपर्यंत कुणीही तिला याबद्दल विचारले नाही वा अभिनंदन केले नाही. वर असाम्याने म्हटल्याप्रमाणे इन्विजिबल टॉपिक. साधारण ५व्या जेव्हा ती ऑब्विअसली प्रेग्नंट दिसत होती तेव्हा तिने लन्चमध्ये सर्वांना सांगितले. त्यानंतर त्यांनी अभिनंदन केले, जोक केले, तसेच आम्हाला कळलेच होते पण वाट बघत होतो तू कधी सांगशिल वगैरेही बोलले. त्यानंतर त्यांनी तिला विविध सल्ले, स्वतःला मुले झाली/वाढवली ते किस्से सांगणे कॉमनली चाले/चालते. हे सर्व लोक वय वर्षे ५०+ आहेत. टिममध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे, रोज एकमेकांशी अनौपचारीक गप्पा, लन्चमध्ये एकत्र चर्चा वगैरे चालू असते.
तेव्हा एकुणात असे दिसते की त्या बाईने सांगेपर्यंत कोणी बोलत नाही, सांगितल्यावर अभिनंदन करणे वगैरे नॉर्म्समध्ये बसते बहुतेक.
या उलट मॉलमध्ये वगैरे काहीच ओळख नसलेले लोक (९९% बायका, कुठल्या पुरुषाने केल्याचे लक्षात नाही) विश करत किंवा नुसतेच सुचक हसत.
मी भारतात असताना अगदी जवळचेच संबंध (म्हणजे कॉलेजात एकत्र होतो) असलेल्या एक दोन सहकर्मचारी सोडल्यास इतर कुणी अगदी ऑब्विअस दिसत असले तरी प्रेग्नन्सीबद्दल अभिनंदन केले नाहिये ना कुणाला करताना पाहिलेले नाही.
वरच्या सर्व विवेचनाचा सॅम्पल साइज १
हाब आणी अमितव,
हाब आणी अमितव,

तुम्ही तर असं मांडताय की जणू दिसली गर्भवती आणि तिला वीश नाय केलं तर अमेरिकन सरकार ताजिरात-ए-उसगाव के तहत एक बिलियन डॉलर जुर्माना और ५०० सालकी कैद-ए-बामुश्कत सजा सुनवणार आहे.... मला तर असं वाटायलंय की अमेरिकेत विश अॅट साईट अशी काय ट्रम्पने ऑर्डर काढलीये का काय....? म्हणजे ती प्रेगबाई नाइनवनवन ला कॉल करुन सांगेन की तो काळ्या कपड्यात, पीवळ्या शूजमध्ये जाणार्या टकल्याने मला विश नाय केलं, मी प्रेगनंट असून.... धरा, पकडा त्याला... आणि व्ह्यॅव व्ह्यॅव करत पोलिस व्हॅन घेरणार तुम्हाला, वरुन हेलिकाप्टरमधून सरासरा मरिन्स उतरुन तुम्हाला जमीनीवर पाडून हातकडी घालणार...... तुम्हारी रवानगी थेट ग्वाटेमाला मेइच
इथे आता भारतवासी विरुद्ध अमेरिकावासी असा शुद्ध वाद दिसत आहे. तुम्ही आणि अमितव शुद्ध अम्रीकी पर्स्पेक्टीवातून बोलत आहात. इदरकु ऐसा नै चलता.....
>>हाब ला जोर्दार अनुमोदन.<<
>>हाब ला जोर्दार अनुमोदन.<<
+१
कल्चर चा प्रश्न आहे. इथे ओळखीतल्या गरोदर बाईला अभिनंदन केलंत तर तिचं उत्तर साधारण "थँक यु, सो स्विट ऑफ यु" असं असु शकेल...
संपला पोपकॉर्न... मजा अली..
संपला पोपकॉर्न... मजा अली..
एकुणातच 'पर्सनल स्पेस' ही
एकुणातच 'पर्सनल स्पेस' ही कन्सेप्ट समजून घ्यायला भारतीयांना अजूनही जड जातं असं वाटतय.
धागालेखकांनी स्पष्ट केलं आहे की त्यांची आणि त्या स्त्रीची नाममात्र, केवळ कामापुरती ओळख होती. गर्भारपण ही कितीही व्हिजिबल गोष्ट असली तरी एक प्रायव्हेट गोष्ट आहे. नाममात्र ओळख असलेल्या पुरुषाने केवळ आपलं पोट वाढलेलं बघून अभिनंदन करणं हे त्या स्त्रीला कानकोंडं वाटलं असेल हे समजायला काहीच हरकत नाही. आणि कृपया अमेरिकेत कसं असतं त्याचे दाखले देऊ नयेत. प्रत्येक देशाचे सोशल नॉर्म्स वेगवेगळे असतात. मध्यपूर्वेत पुरुष एकमेकांना भेटले की चुंबन घेतात, म्हणून तुम्हीपण मित्रांचे चुंबन घेता का?
याचा अर्थ असा नाही की त्या स्थितीची दखल घेऊ नये. गर्भार स्त्रीला सीट देणे, हा जंटलमननेसच आहे. पण जंटलमननेस आणि भोचकपणातली सीमारेषा कळायला अवघड जाऊ नये.
मूल झालं म्हणून अभिनंदन करणं वेगळं आणि गर्भार असल्यासाठी अभिनंदन करणं वेगळं. कारण पहिली गोष्ट पर्सनल नाही आणी दुसरी आहे. यातला फरक नसेल समजत तर एक पॅरलल देतो. (होपफुली मुद्दा भरकटवण्याचा आरोप होणार नाही) 'मन जुळणं' ही पर्सनल गोष्ट आहे आणि 'लग्न होणं' ही पब्लिक. ऑफिसातल्या सेजलचं लग्न झालं म्हणून अभिनंदन करणं ठीक आहे. आणि 'काय गं, तुला विशालबरोबर फिरताना दोनतीनदा पाहिलं. स्टेडी झालं वाटतं तुमचं' म्हणून अभिनंदन करणं वेगळं.
एखादी गोष्ट केवळ 'व्हिजिबल' आहे म्हणून ती ओपनली डिस्कस करण्यात त्या व्यक्तिला काही प्रत्यवाय नसावा, असंही समजायची गरज नाही.
'अरे वा, रानडे बाई, तुमच्या टेबलावरच्या पाटीवरचं आडनाव बदललं, डिव्होर्स झाला वाटतं फायनल?'
'दाते साहेब, तुमच्या टकलावरचं केशारोपण चांगलं दिसतंय बरंका!'
'सॅण्ड्रा, काही नाही, तुझी कृत्रिम वक्षारोपणाची सर्जरी सक्सेसफुल झालेली दिसतेय, म्हणून अभिनंदन करायला आलो'
अशा गोष्टी त्रयस्थांनी बोलू नयेत!
पटतंय तर घ्या. नाहीतर बसा पिसं काढत. नाहीतरी लोक या धाग्यावर अगदी शड्डू ठोकून 'दाखवतोच की नाही जिंकून बघा!' अशा आवेशात उतरल्यासारखे वाटत आहेत
'अरे वा, रानडे बाई, तुमच्या
'अरे वा, रानडे बाई, तुमच्या टेबलावरच्या पाटीवरचं आडनाव बदललं, डिव्होर्स झाला वाटतं फायनल?'
'दाते साहेब, तुमच्या टकलावरचं केशारोपण चांगलं दिसतंय बरंका!'
'सॅण्ड्रा, काही नाही, तुझी कृत्रिम वक्षारोपणाची सर्जरी सक्सेसफुल झालेली दिसतेय, म्हणून अभिनंदन करायला आलो'
अशा गोष्टी त्रयस्थांनी बोलू नयेत!
>>>
देजा वू..... बम्बाट प्रतिसाद
देजा वू..... बम्बाट प्रतिसाद एकदम!
याचा अर्थ असा नाही की त्या
याचा अर्थ असा नाही की त्या स्थितीची दखल घेऊ नये. गर्भार स्त्रीला सीट देणे, हा जंटलमननेसच आहे. पण जंटलमननेस आणि भोचकपणातली सीमारेषा कळायला अवघड जाऊ नये. >> अनुमोदन.
अभिनंदन करणे हा सुद्धा जंटलमननेसच आहे हे आधी सांगायचं राहून गेलं होतं.
'मन जुळणं' ही पर्सनल गोष्ट आहे आणि 'लग्न होणं' ही पब्लिक. ऑफिसातल्या सेजलचं लग्न झालं म्हणून अभिनंदन करणं ठीक आहे. >> तुम्हाला सेजलने लग्नाला आमंत्रण दिलं नवह्तं म्हणून मार्केट मध्ये भेटलेल्या लग्नाची सगळी सुचिन्हं ल्यायलेल्या सेजलला 'कधी झालं, मला माहितंच' नव्हतं म्हणत वेड घेवून पेडगावला जाण्यात मात्रं जंट्लमननेस नाही.
आणि वादाचं काय घेवून बसलात, आदर्श वाद आहे हा. अजून कुणाची अक्कल निघालेली नाही, जुन्या निष्ठा, ऊमाळे बाहेर आले नाहीत, अॅडमिनला बोलावणे धाडले नाही, अजून काय घेता. फ्रंट पेजवर पाहिजे ह्या वादाची लिंक.
आठवून सांगा बरं मायबोलीवर असा आदर्श वाद (आदर्शवाद नव्हे) मागच्या वेळी कधी झाला होता ते.
टवणे सरांची पोस्ट एकदम करेक्ट
टवणे सरांची पोस्ट एकदम करेक्ट उदाहरण आहे सहसा इथे काय प्रोटोकॉल पाळतात त्या बद्दल.
देजा वू
अनुमोदन पोस्टीला तुमच्या.
मग त्या ३० जणांव्यतिरिक्त एखाद्या दुसर्या टीममधल्याने अभिनंदन केले तर 'तू कोण पर्स्नल स्पेस मध्ये येणारा' हा दुटप्पीपणा नाही झाला का?>>>>> बेबी शॉवरला इन्वाईट आलं तर परत तो प्रश्न येत नाही. ज्यानी बेबी शॉवर अरेंज केला, त्या व्यक्तीनी शिष्टाचार समजून आणि वापरुन ती जबाबदारी उचललेली असते. अजून एक म्हणजे ऑफिस मध्ये लोकं दोन गटात येतात, एक जवळचे मित्र आणि एक इतर. आता न्युज सगळ्यांना सांगायची नसेल तर फक्त जवळच्या मित्रांना सांगून त्यांना कोणाला सांगू नका असं सांगता येतं पण बाकी इतर लोकांना तुम्ही सांगत असाल तर ते पब्लिक केल्या सारखं आहे. हा झाला बातमी सांगणार्याच्या अँगलनी.
बातमी एकणार्याच्या अँगलनी बघितलं, तर बातमी नक्की पब्लिक आहे का हे पडताळून पाहायची जबाबदारी त्या व्यक्तीवर असतेच. शंका असेल तर आजिबात ओळख देऊ नये. थोडक्यात काहीच गृहित धरु नये अशा पर्स्नल स्पेसच्या मॅटर्स मध्ये.
आणि वादाचं काय घेवून बसलात,
आणि वादाचं काय घेवून बसलात, आदर्श वाद आहे हा. अजून कुणाची अक्कल निघालेली नाही, जुन्या निष्ठा, ऊमाळे बाहेर आले नाहीत, अॅडमिनला बोलावणे धाडले नाही, अजून काय घेता.
>>>
खरे तर २०१४पासून भारतीय पुरुषांना गर्भवती बाई दिसली की अभिनंदन करण्याचे उमाळे येतात असे दिसते आहे.
काय चूक आहे त्यात? गेली ६० वर्ष तुम्ही बोलत नव्हता त्याला आम्ही काय करू.
तुमच्याकडे घरी कोणी गर्भवती नाही, सगळे सडे पुरुष मग बाहेरच्या बायकांचेच अभिनंदन करणार.
अहो तुम्ही समाजसेवेच्या नावाखाली एकमेकांना गर्भवती करणार मग बाहेरच्यांकडे कशाला लक्ष जातय.
सडलेल्या मेंदूतून असलेच विचार येणार.
इतके वर्ष काम न केल्यामुळे तुमचाच मेंदू सडलाय. आता आम्ही कामं करत आहोत म्हणून मेंदू तल्लख आहे व तुमचा मरगळलेला.
गोमूत्र पिऊन मेंदू तल्लख ठेवता का?
गोमूत्र प्यायल्याने मेंदूतून उत्पन्न होणार्या करंटमध्ये वाढ होते असे संशोधन आयआयटीमध्ये झाले आहे.
संशोधक म्हणण्याच्या लायकीचे लोक आहेत का आता कमिट्यात?
मला गाईचे शुद्ध देशी गोमूत्र कुठे मिळेल?
गाय शुद्ध हवी की गोमूत्र?
तुमच्या डोक्याला लावा जरा म्हणजे कळेल गाय देशी की गोमूत्र देशी ते
अॅड्मिन इथे बघता का जरा वैयक्तिक हल्ले होत आहेत. आमच्या डोक्याला आम्ही गोमय लावू की गोमूत्र तो वैयक्तिक प्रश्न आहे.
अॅड्मिन इथे आयडी उडवला नाही यांचा तर काही आयडींना अभय आहे असे समजण्यात येइल.
अॅडमिन अजून इथल्या पोस्टी दिसतच आहेत
क्षक्षक्ष
*********
विषयाला धरून बोला. क्षक्षक्ष यांचा आयडी स्थगित करण्यात आला आहे.
अहो तुम्ही समाजसेवेच्या
अहो तुम्ही समाजसेवेच्या नावाखाली एकमेकांना गर्भवती करणार मग बाहेरच्यांकडे कशाला लक्ष जातय.>>>>> .टवणे सर
देजा वू
देजा वू
"
काय गं, तुला विशालबरोबर फिरताना दोनतीनदा पाहिलं. स्टेडी झालं वाटतं तुमचं'
"
हे अगदी रिलेट झाले. मागे एकदा गर्लफ्रेण्डसोबत नरीमन प्वाईंटला समुद्रकाठी बसलो होतो. साधंसच आपलं हवा खात हातात हात गुंफून. तिथे तिच्या ऑफिसमधील एक बाई आली. वयाने मोठी, विवाहीत, तिची काही खास मैत्रीण वगैरे होती असे नाही. पण उगाचच मला बघून तिला म्हणाली, "काय ग्ग, बॉयफ्रेण्ड का?" आणि उगाचच हसत सुटली.
मी त्रासून म्हणालो नाही, अंगरक्षक... तसे मी काहीतरी जोक मारलाय असे आणखीनच हसत सुटली.
तर मुद्दा योग्यच आहे. आम्ही आमचे प्रेमप्रकरण स्वत:हून सांगितल्याशिवाय ईतरांनी अक्षता उधळत फिरणे मलाही आवडणार नाही.
टवणे मास्तर...
टवणे मास्तर...
टवणे
टवणे
मी खरंच शोधायला चाललो होतो लेखात अशी वाक्ये कोणी लिहिली आहेत का ते.
ऋन्मेष,
आता तुम्ही आलाच आहात तर हा धागा पुढे चालवायची जबाबदारी तुमची. १००+ ची ओपनिंग पार्टनरशिप करून दिलेली आहे तर स्लॉग ओवर्समध्ये आता ३००+ होतील असे बघा.
गफ्रे. आलेलीच आहे, शा. खा., सोनू, पिंट्या वगैरे घेवून या सगळ्यांना.
३०० साठी शुभेच्छा!
हाबं, अवो तुम्ही कुडं चाल्ले
हाबं, अवो तुम्ही कुडं चाल्ले इतक्यत गन्पती विसर्जन करुन? अजुन तर मिर्वणूक चिमण्या गणपती पाशी आलीये आत्ताशी! आता तर नागीन डांस सुरु होईल.
टवणे
टवणे
हो हो. रुन्मेशचा नागिन डान्स पॉप़कॉर्न घेउन बघू की. फक्त ते त्याचं नेहेमीचं अवघे धरु सुपंथ चालू झालं तर मग बोर होईल. कमरेचं काढुन डोक्याला बांधुन एक दोन स्टेप करायची फर्माईश आली तर त्यापण करु.
अवो एकंच मिर्वणूक आस्ती व्हय
अवो एकंच मिर्वणूक आस्ती व्हय आम्हाला... लई डिमांड हाये यावर्षीला.. तिकडं पल्याडल्या आळीत बी हाय नी मिर्वणूक. पोरं लावून दिलत्ये जरा दोन-चार त्ये जाग्यावर हायेत का ऊलथलेत त्ये पघून येतो.
तुम्ही ह्या आमच्या ऋन्म्या बरोबर नागीन करून घ्या तवर.. पट्टीचं हाये पोरगं बिल्कूल दमत नाय की थकत नाय .. कल्लूळाचं पाणी ढवळायला बार लावून येतोच म्या.
नानाकळा आणि डेजावू यांचे
नानाकळा आणि डेजावू यांचे प्रतिसाद हिलारीयस आहेत
गण्याला एक ओळखीची प्रेग्नन्ट
गण्याला एक ओळखीची प्रेग्नन्ट बाई लिफ्टमध्ये भेटते.

गण्या: अरे वा, गुड न्यूज वाटतं! कितवा महिना?
बाई (लाजत): आठवा !!!
गण्या: मी कशाला आठवू, माझा काय संबंध???
लोल
लोल
Pages