फार महत्वाचा नसलं तरी जरा नाजूक विषय आहे. पण चर्चा झाली तर बरे होईल.
परवाची गोष्ट. ऑफिसमध्ये जुन्या प्रोजेक्ट टीम मधली एक सहकारी गर्भवती आहे असे लक्षात आले. तशी हि गुड न्यूज तिच्या सध्याच्या टीम मध्ये तर सर्वांनाच कळली होती. पण मला ती अनेक दिवसांनी पहिल्यांदाच लिफ्ट मध्ये भेटली. प्रेग्नंट आहे लक्षात आले. तर हाय हेलो झाल्यावर मी सहज तिला अभिनंदन म्हणालो. पण तिची प्रतिक्रिया फारशी चांगली नव्हती. वाईटसुद्धा नव्हती. नुसतेच कसनुसे स्मितहास्य केल्यासारखे करून ती दुसरीकडे पाहू लागली. नंतर काही बोलली पण नाही. त्यानंतर लिफ्टमधून बाहेर पडल्यावर सुद्धा बाय वगैरे न करताच निघून पण गेली.
मी आपल्याशीच विचर करत राहिलो. माझे तर इथे काही चुकले नाही ना? प्रामाणिकपणे सांगायचे तर अशावेळी (जेन्वा सहकारी मैत्रीण अनेक दिवसांनी अचानक भेटते व प्रेग्नंट आहे असे लक्षात येते) अभिनंदन म्हणायचे असते कि नसते? कि एकदम बाळ झाल्यावरच अभिनंदन करायचे असते? याबद्दल मी आधीपासूनच कमालीचा कन्फ्युज्ड आहे. आणि विषय इतका नाजूक असल्याने याबाबत आजवर कुठे चर्चा पण करता आली नाही. बाकीचे कुणी मला अशावेळी अभिनंदन वगैरे म्हणताना कधी दिसले नाहीत. किंवा माझ्या पाहण्यात तरी आलेले नाहीत. तरीही त्यावेळी मी तिला सहज तोंडातून बाहेर आले आणि अभिनंदन म्हणून गेलो.
हे माझे चुकले का? याबाबत योग्य शिष्टाचार काय आहे?
मी इतका पण थराला नाही हो
मी इतका पण थराला नाही हो गेलेला कि प्रेग्नंट स्त्रीच्या पोटाकडे न्याहाळून बघत बघत अभिनंदन म्हणेन
>>>>>
असे न्याहाळून कोणी अभिनंदन करत नसावेच. पण त्याआधी न्याहाळणे होऊ शकते आणि हे त्या स्त्रिला जाणवावे ईतका वेळ होऊ शकते. आणि यात काही त्या थराला जाणे वगैरे नाही. हा साफ मनाचा शुद्ध बावळटपणा असू शकतो. पुढे आपल्याला जर समजले की असे आपण क्षणभरापेक्षा जास्त वेळ न्याहाळले आणि हे त्या स्त्रिच्या लक्षात आले तर आपल्यालाच ओशाळल्यासारखे होते.
तसेच एक डोक्यात किडाही असतो, किती महिन्यांची गरोदर असावी या उत्सुकतेपोटीही आपण जास्त वेळ न्याहाळू शकतो. यातही आपल्या भावना साफच असतात, आणि हे स्त्रीपुरुष दोघांबाबत होऊ शकते. किंबहुना पुरुषांना याबाबत लगेच कुठलाही अंदाज बांधता येत नाही. त्यामुळेही वेळ जास्त असू शकते.
लिफ्टमध्ये असताना आधीच
.
अर्थात ही फर मोठी चूक झाली
अर्थात ही फर मोठी चूक झाली असेही नव्हे. जस्ट मूव्ह ऑन. पर्सनल स्पेस ची कल्पना मी अमेरिकेत नवा होतो तेव्हा मलाही नव्हती.>>>>>>>
हे मगाशी लिहिता लिहिता राहिलं. परफेक्ट आहे विकु. पर्सनल स्पेस ह्याचे निकष हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे.
हेच ऊलट्या अर्थानेही खरे आहे ना बुवा? कॉम्प्लिकेशन्स असतील यंव असेल त्यंव असेल असेही का गृहीत धरायचे मग साधे अभिनंदन करायला?>>>>>>> अरे वर विकुंनी लिहिलय तसं वर्कप्लेस मध्ये ते तितकं साधं राहत नाही आणि ते पर्सनल स्पेस मध्ये मोडतं. आपले अगदी सदभावनेनी केलेले अभिनंदन हे दुसर्याच्या पर्स्नल स्पेसचे उल्लंघन करत असेल तर ते बरोबर नाही ना? इथे परत विकुंनी लिहिलय तसं, फार मोठी चूक वगैरे आहे असं नाही पण लेसन लर्न्ड म्हणून बघता येइल आणि पुढच्यावेळी योग्य रितीने शिष्टाचार पाळायला मदत होईल.
आणखी एक मुद्दा म्हणजे हे त्या
आणखी एक मुद्दा म्हणजे हे त्या स्त्रिने तुम्हाला सांगितलेले नसते, किंवा तिच्यासमोर वा तिच्यावतीने कोणी तुम्हाला सांगितले नसते.
तर केवळ समोर दिसतेय म्हणून आपणच सेल्फ एक्सायटेड होऊन अभिनंदन करणे याला आगाऊपणाही म्हणू शकतो. किंवा तसे त्या समोरच्या स्त्रीला वाटू शकते.
चांगले धागे तिकडे
मुळात हा धागा काढण्याचा विषय आहे का असाच प्रश्न पडलाय मला.
जर उलटा विचार केला, म्हणजे
जर उलटा विचार केला, म्हणजे अभिनंदन नाही केले तर काय बिघडेल? म्हणजे ती तुम्हाला खडूस समजेल का? काय हे, कसला आहे हा, अभिनंदनही नाही करत माझे.... तर याची शक्यता कमी. म्हणून कन्फ्यूजन असेल तर अभिनंदन न केलेलेच चांगले.
तरीही आपण खडूस नाही आहोत हे दाखवायचे असेल तर अभिनंदन न करता फक्त छानशी स्माईल द्या. आणि थोडेफार सौजन्य दाखवा. जसे की दरवाजा उघडून द्या, आधी जायला द्या, बसायला जागा द्या वगैरे..
एक मित्र यांनी काहीही चुकीचे
एक मित्र यांनी काहीही चुकीचे केले नाही.त्यांनी अभिनंदन केले.ज्या बाईंना केले त्यांना ते अपेक्षित नसावे किंवा 'त्यात कसलं आलंय अभिनंदन...टीम बदलणार...अनेक वर्षे नोकरीत प्रमोशन नाही मिळणार' असे काहीसे क्रॅपी विचार चालू असतील त्यामुळे साधा रिस्पॉन्स दिला असेल.
दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी ते बर्थ च्या मध्ये प्रचंड अनिश्चितता असतात.जवळ पासच्या बायांनी त्यांच्या आयुष्यातल्या हपनिंग गोष्टी असलेल्या म्हणजे त्यांच्या नात्यातल्या बाईच्या कॉम्प्लिकेशन्स शेअर केलेल्या असतात.(हो लोक करतात.'ती अमकी प्रेग्नन्ट होती आणि चक्कर येऊन विळीवर पोटाच्या बाजूने पडली' अश्या गोष्टी अलरेडी नॉर्मल डांबरी रस्त्यावर पण तारेवरून चालण्याच्या काळजीने चालणाऱ्या बायांना सांगतात.
'हातात खरं खरं बाळ येऊन रडत नाय तोवर काही भरवसा नाही बघा' वाले फिलिंग सतत येत असल्याने त्या बाईला काँग्रेट्स केले काय नाही केले काय एकच.
पण या सगळ्या भावनांचा तुम्ही चांगल्या मनाने केलेल्या अभिनंदनाशी काही संबंध नाही हे जाणून बाई नक्कीच चांगल्या भावना बाळगेल(किंवा असलेल्या या एका घटने मुळे घालवणार नाही)
खरं सांगायचं तर कलीग असलेल्या बायका एकमेकींना वॉश रूम मध्ये पण अगदी 10 दिवसांनी सुट्टीवर जाणार इतके व्हिजिबल झाल्याशिवाय या विषयावर बोलत नाहीत.काँग्रेट्स लांब.तेही आधी कशी तब्येत आहे वगैरे जनरीक वाक्यांवरून चालू करून.
एकेकाचा वे ऑफ एक्सप्रेशन.तुम्ही घटना तुम्हाला सांगितली नसताना अभिनंदन केले हा तुमचा चॉईस आणि त्याला फार उत्साह न दाखवता थॅंक्यु म्हणणे हा त्या बाईचा चॉईस.
नो वन इज राईट ऑर रॉन्ग.
मला ऋन्मेषच्या पोस्टी बघून
मला ऋन्मेषच्या पोस्टी बघून पिकु मधला इरफान खानचा डायलॉग आठवतो. तो अगदी आश्चर्यानी अमिताभ कडे बघत "कैसे आप हर बात आपके मोशन से जोड देते हो" असं म्हणतो.

काही प्रतिक्रिया मध्ये स्त्री
काही प्रतिक्रिया मध्ये स्त्री पुरुष अशी अनाठायी चर्चा सुरु आहे. अहो काय संबंध आहे त्याचा इथे मला सांगाल तुम्ही?
एक मित्र,
समजा तुमच्या मित्राची पत्नी गर्भवती आहे. पण त्या मित्राने ते स्वत: न सांगता अन्य मार्गाने तुम्हाला ते कळले (जसे कि तिला तुम्ही स्वत: तिला जाता येतं कुठेतरी पाहिल्यानंतर) तर तुम्ही त्या मित्राला, "अरे वा आजच सकाळी वहिनींना मी पाहिले. अभिनंदन" असे म्हणाल का? आणि म्हटले तर ते त्याला आवडेल का?
तुमचे लग्न झालेय कि माहिती नाही. पण मला जर कोणी असे आगंतुक अभिनंदन म्हटले तर ते मला अजिबात आवडणार नाही. बहुतेक इथे कुणालाच तसे आवडणार नाही. तेंव्हा स्त्री पुरुष असा मुद्दाच नाही.
एक लक्षात घ्या बाळ झाल्यानंतर मिठाई वाटतात. गर्भधारणा झाली म्हणून नव्हे. विषय संपला.
नवीन Submitted by mi_anu on 9
नवीन Submitted by mi_anu on 9 August, 2017 - 22:34
>>> सुंदर प्रतिसाद. अतिशय पटला...!
समजा तुमच्या मित्राची पत्नी
समजा तुमच्या मित्राची पत्नी गर्भवती आहे. पण त्या मित्राने ते स्वत: न सांगता अन्य मार्गाने तुम्हाला ते कळले (जसे कि तिला तुम्ही स्वत: तिला जाता येतं कुठेतरी पाहिल्यानंतर) तर तुम्ही त्या मित्राला, "अरे वा आजच सकाळी वहिनींना मी पाहिले. अभिनंदन"
>>>> यात चुकीचे काय आहे... मित्र तार आहे.
>>> यात चुकीचे काय आहे...
>>> यात चुकीचे काय आहे... मित्र तार आहे.
अहो मग मित्र आहे तर त्याने स्वत: इतके दिवस तुम्हाला सांगितलेले नाही हे पण आहे ना. काहीतरी कारण असेल ना त्यामागे. केवळ मेडिकलच असे नव्हे. त्याला स्वत:ला आधी जाहीर करायला आवडत नसेल. व्हाटएव्हर. काहीही जे कारण असेल त्याचा रिस्पेक्ट ठेवायला नको का?
एक लक्षात घ्या बाळ झाल्यानंतर
एक लक्षात घ्या बाळ झाल्यानंतर मिठाई वाटतात. गर्भधारणा झाली म्हणून नव्हे. विषय संपला.
नवीन Submitted by इनामदार on 9 August, 2017 - 22:40
>>>> अगदी अगदी!!!
माझ्या पहिल्या मुलाच्या गुडन्युजच्या वेळी मी ऑफिसात सगळ्यांना पेढे वाटलेले, दुसर्या-तिसर्या महिन्यात कळलेले तेव्हा...
तर तेव्हा आमच्या अॅडमिन स्त्रीने मला शांतपणे समजावले की पेढे मूल झाल्यावर वाटायचे, सर्व काही ठिक आहे हे समजल्यावरच. तिने ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने ते सांगितले ते मला चांगलेच पटले व त्यातला फोलपणा कळला. तेव्हा मी थोडा जास्तीच उत्साही असल्याने असा येडपटपणा करायचो.
एक लक्षात घ्या बाळ झाल्यानंतर
एक लक्षात घ्या बाळ झाल्यानंतर मिठाई वाटतात. गर्भधारणा झाली म्हणून नव्हे. विषय संपला. >> डोहाळजेवण, बेबी शॉवर हे पब्लिक कार्यक्रम कधी करतात ते सांगता का जरा?
नाना तुम्ही सांगितले तरी चालेल.
>> डोहाळजेवण, बेबी शॉवर हे
>> डोहाळजेवण, बेबी शॉवर हे पब्लिक कार्यक्रम कधी करतात ते सांगता का जरा?
सर, ते पब्लिकला बोलवून करत नाहीत. घरच्या घरी करतात. फार फार तर अगदी जवळचे पै पाहुणे. हा महत्वाचा फरक लक्षात घ्या.
डोजे पण डिलिव्हरी होऊन निदान
डोजे पण डिलिव्हरी होऊन निदान निओ नेटल आय सी यु मध्ये मूल वाचेल अशी शक्यता निर्माण झाल्यावरच म्हणजे सातवा लागून 1 आठवड्याने वगैरे करतात.
मुद्दा हाच:सगळं नीट झाल्याशिवाय खूप सेलिब्रेशन नको
याला दृष्ट लागणे वगैरे कल्पना पण आहेत(भारतातच नाही, परदेशात पण ईव्हील आय वगैरे कन्सेप्ट आहेत).
खूप हसलं तर युवर कर्मा विल मेक यु पे अँड क्राय इकवल अमाउंट लॅटर या भावनेने बरेच जण आनंद झाला तरी व्हिजिबली दाखवत नाहीत.
ह्या प्रकाराचे खरच एकाच
ह्या प्रकाराचे खरच एकाच प्रकारचे नॉर्म्स आहेत कि नाहित ह्याबद्दल शंका आहे. माझ्या बाबतीमधे ऑफीसमधे झालेला किस्सा.
तीन जणांचा ग्रूप एका स्त्रीच्या मॅनेजरच्या हाताखाली काम करत असे. She was expecting but never shared anything explicitly about it until she was nearing to 8 months. Of course none of us, including her ever wished her or brought it up in any project planning discussions. It was treated as an invisible subject. बहुधा नवव्या महिन्याच्या सुरूवातीला एका प्लॅनिंग मीटींगमधे तीने "I will not be available for next X days/month" असे काही सांगितले. त्यावर आमची प्रतिक्रीया फक्त OK अशी होती. मग तिने "All of three of you are married. So you can see and understand what this is about ?" असे विचारले.
इथे आम्ही काही बोलण्याअगोदर अभिनंदन करायला हवे होते कि नाही ? आम्ही काही तरी मंबल केलेले एव्हढेच मला आठवते.
अरे वर विकुंनी लिहिलय तसं
अरे वर विकुंनी लिहिलय तसं वर्कप्लेस मध्ये ते तितकं साधं राहत नाही आणि ते पर्सनल स्पेस मध्ये मोडतं. आपले अगदी सदभावनेनी केलेले अभिनंदन हे दुसर्याच्या पर्स्नल स्पेसचे उल्लंघन करत असेल तर ते बरोबर नाही ना? >> जर न्यूज ऑलरेडी पब्लिक असेल तर कसे ऊल्लंघन होते आहे पर्सनल स्पेसचे?
सरप्राईझ बेबी शॉवरला प्रेग्नंट व्यक्ती आमंत्रण देते का?
मग अश्या बेबी शॉवरला ऊपस्थित राहणे आणि अभिनंदन करणे तर पर्स्नल स्पेस कोड अँड कंडक्टचे ट्रॅक्टर घेवून ऊल्लंघन केले म्हणावे लागेल?
सर, ते पब्लिकला बोलवून करत
सर, ते पब्लिकला बोलवून करत नाहीत. घरच्या घरी करतात. फार फार तर अगदी जवळचे पै पाहुणे. हा महत्वाचा फरक लक्षात घ्या. >>
डोजे साठी हॉल, केटरर्स, सजावट वगैरे लहानपणापासून 'कोणी तरी येणार येणार गं' ऐकत आलो आहे बुवा.
सज्ञान झाल्यावर भारतातल्या पहिल्या जॉब पासून बेबी शॉवर ही बर्याच लोकांचे अटेंड केले आहेत. पब्लिक म्हणजे नक्की कोण आता त्याचेही पॅरालिसिस करावे लागेल.
पै पाहुण्यांच्या शुभेच्छा चालतात पण ओळखीच्या कोणी मोठ्या मनाने अभिनंदन केले तर 'पर्सनल स्पेस' चे ऊल्लंघन का? बरंय.
हाब तुम्ही आता नुसते वादासाठी
हाब तुम्ही आता नुसते वादासाठी वाद घालत आहात असे वाटते.
न्यूज पब्लिक असेल तरीही जोपर्यंत ति आपल्याला अधिकृत पणे मिळत नाही तोपर्यंत पर्सनल स्पेस चे उल्लंघन आहे.
आणी सरप्राईज बेबी शॉवर ला फक्त जवळच्या व्यक्तीना बोलवतात.
मी बागेत फिरालया गेलो तिथे एक बेबी शॉवर सुरु होते. आगाऊपणे तिथे जाऊन अभिनंदन करून सामोसे खाणे योग्य आहे का?
>> पब्लिक म्हणजे नक्की कोण
>> पब्लिक म्हणजे नक्की कोण आता त्याचेही पॅरालिसिस करावे लागेल.
अर्थात ज्यांना आमंत्रण नाही ते सगळे "पब्लिक" स्पेस मध्ये येतात ना?
>> पै पाहुण्यांच्या शुभेच्छा चालतात पण ओळखीच्या कोणी मोठ्या मनाने अभिनंदन केले तर 'पर्सनल स्पेस' चे ऊल्लंघन का? बरंय.
बाळ झाल्यानंतर "त्या ओळखीच्या फलाण्याने अभिनंदन केले" चालते हो. पण प्रेग्नन्सीचा कालावधी आनंदाचा कमी आणि अनिश्चिततेचा अधिक असतो. आणि बाय द वे, तुम्ही लग्न झाल्यावर स्वत: कधी बाप होण्याचा हा काळ अनुभवला आहात का? तरच बोलू. अनुभव नसेल तर बोलण्यात काही अर्थ नाही. मी सांगितलेले तुम्हाला कळणार नाही. आणि तुम्ही तुमचे तात्त्विक ज्ञान घेऊन अंतहीन मुद्दे मांडत बसणार. त्याला अर्थ नाही.
इथे आम्ही काही बोलण्याअगोदर
इथे आम्ही काही बोलण्याअगोदर अभिनंदन करायला हवे होते कि नाही ? >>> करावेसे वाटले ... केले -> बरोबर
नाही करावेसे वाटले... नाही केले -> बरोबर
अजून दोन काँबिनेशन होतील तीही बरोबरंच आहेत.
एखाद्या व्यक्तीचे अभिनंदन करण्यात 'प्रेग्नंसी सारख्या व्यक्तिगत कारणासाठी' का असेना काय चूक असू शकते कळत नाहीये.
समजा केले असते अभिनंदन तर काय? एच आर कडे कंप्लेन केली असती? माझ्या मते अभिनंदन करणे ते सहृदय असण्याचे लक्षण आहे.
हाब तुम्ही आता नुसते वादासाठी वाद घालत आहात असे वाटते. >> चुकीचे वाटते आहे विकु तुम्हाला.
न्यूज पब्लिक असेल तरीही जोपर्यंत ति आपल्याला अधिकृत पणे मिळत नाही तोपर्यंत पर्सनल स्पेस चे उल्लंघन आहे. >> डिफाईन अधिकृत.
आणे सरप्राईज बेबी शॉवर ला फक्त जवळच्या व्यक्तीना बोलवतात. >> असं काही नाही बुवा .. तीसेक जणांच्या टीम बरोबर सुद्धा केले आहे. एकदा नव्हे अनेकदा.
न्यूज पब्लिक असेल तरीही
न्यूज पब्लिक असेल तरीही जोपर्यंत ति आपल्याला अधिकृत पणे मिळत नाही तोपर्यंत पर्सनल स्पेस चे उल्लंघन आहे.>>>>>>>>ऑ!!! या अधिकृतचा काय अर्थ विकु? डोळ्यांना दिसतं ते अधिकृत नसतं काय??
उद्या एखादी उफाड्याची बाई केळ्याच्या सालीवरुन घसरुन आपटलेली डोळ्यांना दिसली तरी तिने अधिकृत कॉल देई पर्यंत तिला उचलायला जावू नये काय?
हाब ला जोर्दार अनुमोदन.
हाब ला जोर्दार अनुमोदन.
व्यवस्थित पोट वाढलेलं दिसलं नजरा नजर झाली आणि समोरची व्यक्ती कर्टसी टाईप हसली की अभिनंदन न म्हणणे हा बावळटपणा आहे. समोरच्या स्त्री ने हसून धन्यवाद म्हटले की मुलगा आहे का मुलगी इतपत स्मॉल टॉकही न करणे हे रूड आहे. त्यावर समोरची हार्मोनल इमबॅलंसने मॉर्निंग सिकनेस इ. बोलू लागली तर कट करून जाऊ नये. सहानुभूती दाखवावी.
वेडिंग क्राऊन घातलेली बाई दिसली की जसं अभिनंदन न म्हणणे हा मूर्खपणा असतो थोडंफार तसच.
नॉर्थ अमेरिकेत मी असाच वागतो आणि भारतातही मी असाच वागेन.
अधिकृत - त्या बाईने /
अधिकृत - त्या बाईने / नवऱ्याने / आई-वडील यांनी प्रत्यक्ष सांगणे. तरीही अभिनंदन करायचं नाही. हसरा चेहरा आणि मे बी अरे वा! छान बातमी असं अणि इतकेच स्वगत पुरुषाने करायचं.
बाळ झाल्यानंतर "त्या ओळखीच्या
बाळ झाल्यानंतर "त्या ओळखीच्या फलाण्याने अभिनंदन केले" चालते हो. पण प्रेग्नन्सीचा कालावधी आनंदाचा कमी आणि अनिश्चिततेचा अधिक असतो. आणि बाय द वे, तुम्ही लग्न झाल्यावर स्वत: कधी बाप होण्याचा हा काळ अनुभवला आहात का? तरच बोलू. अनुभव नसेल तर बोलण्यात काही अर्थ नाही. मी सांगितलेले तुम्हाला कळणार नाही. आणि तुम्ही तुमचे तात्त्विक ज्ञान घेऊन अंतहीन मुद्दे मांडत बसणार. त्याला अर्थ नाही. >>
पुन्हा अति जजमेंटल.
त्या ओळखीच्या फलाण्याने अभिनंदन केल्याने काही निगेटिव घदून येते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
मि. फलाणे वडील असतील तर त्यांचे अभिनंदन चालेल पण नसतील तर चालणार नाही असे आहे का?
मिसेस फलाण्यांचे अभिनंदन चालेल का?
मिस फलाण्यांचे अभिनंदन चालेल का?
तीसेक जणांच्या टीम बरोबर
तीसेक जणांच्या टीम बरोबर सुद्धा केले आहे. एकदा नव्हे अनेकदा.
तीसेक लोक जवळचे असू शकतातच की !
Especially at workplace it is better to err on the side of caution.
अमितला जोर्दार अभिनंदन आपलं
अमितला जोर्दार अभिनंदन आपलं अनुमोदन.
मी तर ह्या ताई/बाई आता पुढची पाच मिनिटे त्यांचा डॉक्टर कसा बेस्ट आहे ते हजबंड/बॉयफ्रेंड ने सीक्रेट/सरप्राईझ अरेंजमेंट केलेल्या ह्यांना कश्या ऑलरेडी माहिती आहेत असे रामायण ऐकावे लागणार ह्या भितीनेच बर्याच वेळा पटकन स्मॉल टॉक करून कलटी मारतो.
हे अगदी क्लायंट मीटींगमध्ये जुजबी ओळ्खईवरही झाले आहे, होत आहे.
(No subject)
तीसेक लोक जवळचे असू शकतातच की
तीसेक लोक जवळचे असू शकतातच की ! >> मग एकतीसाव्या थोड्याश्या लांबच्याने सौजन्याने केलेले अभिनंदन का खुपावे विकु?
Pages