सहकारी/मैत्रीण गर्भवती आहे असे प्रथमच दिसते तेंव्हा...

Submitted by एक मित्र on 9 August, 2017 - 09:21

फार महत्वाचा नसलं तरी जरा नाजूक विषय आहे. पण चर्चा झाली तर बरे होईल.

परवाची गोष्ट. ऑफिसमध्ये जुन्या प्रोजेक्ट टीम मधली एक सहकारी गर्भवती आहे असे लक्षात आले. तशी हि गुड न्यूज तिच्या सध्याच्या टीम मध्ये तर सर्वांनाच कळली होती. पण मला ती अनेक दिवसांनी पहिल्यांदाच लिफ्ट मध्ये भेटली. प्रेग्नंट आहे लक्षात आले. तर हाय हेलो झाल्यावर मी सहज तिला अभिनंदन म्हणालो. पण तिची प्रतिक्रिया फारशी चांगली नव्हती. वाईटसुद्धा नव्हती. नुसतेच कसनुसे स्मितहास्य केल्यासारखे करून ती दुसरीकडे पाहू लागली. नंतर काही बोलली पण नाही. त्यानंतर लिफ्टमधून बाहेर पडल्यावर सुद्धा बाय वगैरे न करताच निघून पण गेली.

मी आपल्याशीच विचर करत राहिलो. माझे तर इथे काही चुकले नाही ना? प्रामाणिकपणे सांगायचे तर अशावेळी (जेन्वा सहकारी मैत्रीण अनेक दिवसांनी अचानक भेटते व प्रेग्नंट आहे असे लक्षात येते) अभिनंदन म्हणायचे असते कि नसते? कि एकदम बाळ झाल्यावरच अभिनंदन करायचे असते? याबद्दल मी आधीपासूनच कमालीचा कन्फ्युज्ड आहे. आणि विषय इतका नाजूक असल्याने याबाबत आजवर कुठे चर्चा पण करता आली नाही. बाकीचे कुणी मला अशावेळी अभिनंदन वगैरे म्हणताना कधी दिसले नाहीत. किंवा माझ्या पाहण्यात तरी आलेले नाहीत. तरीही त्यावेळी मी तिला सहज तोंडातून बाहेर आले आणि अभिनंदन म्हणून गेलो.

हे माझे चुकले का? याबाबत योग्य शिष्टाचार काय आहे?

Group content visibility: 
Use group defaults

भारतात बुवा लोकांनी असा अभिनंदन वैगेरे केलं तर माझ्या सर्कलमध्ये तरी त्यालला (बायका-बुवा दोघेही) बायकी समजतील!

>>> 'मी तुमचे प्रेग्नंसी बद्दल अभिनंदन केल्यास तुम्हाला ऑकवर्ड वाटेल का' असे विचारून घेत चला.
Biggrin Biggrin Biggrin

>>> तुम्ही तिच्या पोटाकडे न्याहाळून बघितलं याचा पण राग आलेला असू शकतो की तिला.
>>> तुमचे ऑफिसातील रेप्युटेशन काय आहे, तुम्ही कशा प्रकारे अभिनंदन म्हणालात, यावर देखील रिअ‍ॅक्शन अवलंबुन आहे.
>>> कामापुरते संबंध म्हणजे तितकेच ठेवावे.

वरील तिन्ही प्रतिक्रियांतून नक्की काय सुचवायचे आहे? मी इतका पण थराला नाही हो गेलेला कि प्रेग्नंट स्त्रीच्या पोटाकडे न्याहाळून बघत बघत अभिनंदन म्हणेन. किंवा तिने योग्य प्रतिसाद दिला नाही म्हणजे माझे ऑफिसातले रेप्युटेशन खराब?? Sad आणि "कामापुरते राहा" हा तर शुद्ध टोमणा आहे. सॉरी तू से. बट, डिप्रेशन दिले तुम्ही तिघींनी पण मला. Uhoh

बायकी कशाला? चांगली ओळख असेल तर चेहर्‍याकडे पाहुनच कळते अभिनंदन अपेक्षित आहे की नाही. पोट न्याहाळत केलेले अभिनंदन कुणाला आवडेल?

भारतात बुवा लोकांनी असा अभिनंदन वैगेरे केलं तर माझ्या सर्कलमध्ये तरी बायकी समजतील! >>> सो जजमेंटल. Sad

लास्ट टाईम आय चेक्ड, प्रेग्नंसी अनादी काळापासून होत असलेली एक नॉर्मल गोष्टं आहे. राजकुमार्/री येणार म्हणून राजा राणीचे अभिनंदन करायला प्रजा लोटत असे असेही ऐकले आहे.

एक मित्र - तुम्ही केले असेल असे नाही म्हणत मी. पण शिष्टाचार विचारला आहात म्हणुन सांगतेय. चेहरा पाहुन कळते की दुसरा आपल्याला कितपत चांगला सहकारी मानतो. आपण खाजगी बाबतीत अभिनंदन करावे की नाही इ.

हाब, मी नमूद केलेल्या कोणत्याही कारणात लेखकाला 'तुम्ही चूकच केली बघा' असा अर्थ नाहीये.... मी दिलेली कारणं तिच्या 'अलरेडी आलेल्या' रिऍक्शन वर चं अनालिसिस आहे, 'अभिनंदन केल्यावर काय होऊ शकतं' यावर नाही.

तसेच लेखक जे म्हणतायत कि असे अभिनंदन करताना कोणाला बघितलं नाही, तर मी पण असे बघितलं नाही. ते करू नये याचे काही अलिखित संकेत आहेत...

प्रेग्नेंट स्त्रीला स्वतःहून तिनें न सांगता अभिनंदन करणे भारतात तरी प्रचलित नाही, याचा अर्थ ते चुकीचे आहे, काही भयंकर गुन्हा आहे असे नव्हे....

एक मित्र,

माफ करा. पण मुळात हा प्रश्न पडायलाच नको. ती स्त्री केवळ ओळखीची / मैत्रीण / सहकारी आहे म्हणून आपल्याला जरी जाणवले की ती प्रेग्नंट आहे तरी आपण अभिनंदन म्हणण्याचे कारणच काय? ही तिची अतिशय खासगी बाब नाही का? दोघेच असतानाही म्हणू नये आणि इतरांच्या समोरही म्हणू नये. जवळच्या नात्यातील कोणी स्त्री असेल (जसे बहिण, वहिनी वगैरे) तर ठीक आहे. बहुधा तिचा चेहरा कसनुसा झाला ह्याचे कारण हेच असणार की 'ह्या बाबतीत हे कोण बोलणार'!

मेबी प्रेग्नन्ट नसेल जाड असेल, पॉट सुटले असेल..>>>>>>>>>>>> : हहगलो: असा किस्सा माझ्याबाबतीत झालेलाय ट्रेन मधे मी ४थ सीट्वाल्या बाईसमोर उभी होते आणि नंतर तिला काय वाटलं की म्हटली तुम्ही बसा तुम्हाला गरज आहे (पोटाकडे हात दाखवून) आणि मला येणारं अशक्य हसू दाबत (मी नव्हते काही प्रेगो वगैरे) गर्भवती बायका बसतात तशी बसून घेतले....:फिदी:

अवांतरः मी प्रेग्नंट असताना अगदी ८-९व्या महित्न्यात इकडे अनोळखी लोकं पण अभिनंदन करायचे, बेबीसाठी ऑल द बेस्ट म्हणायचे, व्हेन आर यु ड्यु असंही विचारले गेलेय.... पण काही ऑड वाटले नाही. पुरुष मंडळी पण होती यात.

सो डिपेंड्स ऑन एव्हरी पर्सन ते कसं घेतात यावर.

भारतात बुवा लोकांनी असा अभिनंदन वैगेरे केलं तर माझ्या सर्कलमध्ये तरी त्यालला (बायका-बुवा दोघेही) बायकी समजतील!<<<<

समजतील म्हणण्यापेक्षा समजावे असे माझे मत!

एक मित्र, हे पर्सनली तुम्हाला उद्देशून असे म्हणालेलो नाही. कृपया अजिबात गैरसमज नसावा.

तशी हि गुड न्यूज तिच्या सध्याच्या टीम मध्ये तर सर्वांनाच कळली होती.>>>> हाबं, बरोबर आहे. खात्रीशीर माहित असेल की सगळ्यांना अगदी माहितच आहे तर मग काहीच प्रश्न उरत नाही पण जेणेकरुन त्या व्यक्तीला काहीतरी ऑकवर्ड वाटलं ह्यावरुन बातमी इतरांना किंवा काही जणांना माहित असली तरी ऑफिशियली त्या व्यक्तीनी जाहिर केलेली नाही असं टोटली असू शकतं. बातमी स्वतःहूनच सांगितलेली असताना पुढे कोणी अभिनंदन केल्यास ऑकवर्ड वाटायचे काहीच कारण नाही. थोडक्यात शंकेला वाव असेल तर समोरच्यानी अनाऊन्स करे पर्यंत काही म्हणू नये असं माझं मत आहे.

राजकुमार्/री येणार म्हणून राजा राणीचे अभिनंदन करायला प्रजा लोटत असे असेही ऐकले आहे.
Submitted by हायझेनबर्ग on 9 August, 2017 - 11:56
>>>>> हे कुठशी वाचलत,की आर्ग्युमेंट जिकांयला काहीही ठोकून द्यायचे.

मि वर म्हणटल्याप्रमाणे स्त्रीया या बाबतीत(लैंगिकता आणि संबंधीत) फारच दांभिक असतात.इथे तो विषय नाही ,नाहीतर माझ्याकडे असले फार किस्से आहेत.फुर्सतीत केव्हातरी सांगेन.

हाबं, बरोबर आहे. खात्रीशीर माहित असेल की सगळ्यांना अगदी माहितच आहे तर मग काहीच प्रश्न उरत नाही पण जेणेकरुन त्या व्यक्तीला काहीतरी ऑकवर्ड वाटलं ह्यावरुन बातमी इतरांना किंवा काही जणांना माहित असली तरी ऑफिशियली त्या व्यक्तीनी जाहिर केलेली नाही असं टोटली असू शकतं. >> लेखकाच्या मैत्रिणीचा स्टँड करंट टीममधल्या सहकार्‍यांनी अभिनंदन केले तर चालेल पण जुन्या टीममधल्या सहकार्‍यांनी अभिनंदन केले तर 'मला ऑकवर्ड वाटेल' असा दुटप्पी ही असू शकेल.
अश्या दुटप्पी वागण्याबद्दल आपल्या लेखकांनी 'चूक तर झाली नाही' असे वाटून वैषम्य का वाटून घ्यावे?

लेखकाच्या मैत्रिणीचा स्टँड करंट टीममधल्या सहकार्‍यांनी अभिनंदन केले तर चालेल पण जुन्या टीममधल्या सहकार्‍यांनी अभिनंदन केले तर 'मला ऑकवर्ड वाटेल' असा दुटप्पी ही असू शकेल.>>>>> असू शकेल पण ते तसच असेल असं आपण गृहित धरुन नाही चालू शकत.
तसा प्रकार असेल तर बरोबर आहे. वैषम्य वाटायचं कारण नाही कारण लेखकानी मग काही चूक केलेली नाही. मी वर लिहिलच आहे. त्या व्यक्तीनी पब्लिकली अनाऊन्स केलेलं असेल आणि ह्याची पक्की माहिती असेल तर प्रश्न येत नाही.

हाब व नानाकळा तुम्ही दोघेही आपापल्या जागी बरोबर आहात.
एक मित्र आजकाल लोकांना आपल्या स्पेस बद्दल इतकी काळजी असते की कुठलीही गोष्ट ते स्पोर्टली घेउ शकत नाही
मी गरोदर असतांना अॉफिस मधल्या तोंड ओळख असलेल्या नी पण मला विश केल होत व त्याच मला काही वावग वाटल नव्हत बर ही अशी गोष्ट आहे की नजरेत येतेच.
आणि आता थायरॉइड मुळे जाड झालेय स्पेशली पोट सुटलेय तरी फार दिवसांनी भेटणारं कोणीतरी विचारत की good news का. त्याच काही मला विशेष वाटत नाही
पण मुद्दा राहतोच की प्रत्येकाचा स्पेस चा परिघ आकसत चालला आहे.
त्यामुळे विश न करण योग्य किंवा इतर करत असतील तेव्हाच विश करा
हे माझ मत.

एखाद्या ओळखीच्या /अनोळखी प्रेग्नंट दिसणार्‍या स्त्रीला बस मध्ये बसायला जागा देणे व लिफ्ट मध्ये तिचे अभिनंदन करणे या सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. पहिली एटिकेट मध्ये मोडते.

माझ्या मते असे अभिनंदन करू नये. वर लिहिल्याप्रमाणे तिच्या प्रेग्नंसी मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असू शकतील, असे अभिनंदन तिला भोचक पणाचे वाटेल, तिचा मूड वाईट असेल. आपली जवळची मैत्रीण असेल व त्यांनी ही बातमी शेअर केली असेल तरच

अर्थात ही फर मोठी चूक झाली असेही नव्हे. जस्ट मूव्ह ऑन. पर्सनल स्पेस ची कल्पना मी अमेरिकेत नवा होतो तेव्हा मलाही नव्हती. एम्पायर स्टेट च्या रांगेत मिरजेच्या माधव टॉकीज प्रमाणे पुढच्याचा एकदम जवळ उभा राहिलो तेव्हा मित्राने हे मिरज नाही असे सांगितले.

सर्व प्रतिसाद अजून वाचले नाही, पण मला एक सांगा..
तुम्ही आधी तिच्या पोटाकडे निरखून पाहिले होते का?
आणि ते तिच्या लक्षात आलेले का?
किंवा अभिनंदन करताना चेहरयाकडे न पाहता पोटाकडे बघत तर नाही केले?

> हे कुठशी वाचलत,की आर्ग्युमेंट जिकांयला काहीही ठोकून द्यायचे. >> बियॉन्से, मिडलटन बाईंच्या प्रेग्नंसी क्लोदिंग आणि डाएटची नॅशनल मिडियावर झालेल्या चर्चा कौतुकाने बघणार्‍यांचे टीआरपी आणि व्युवर्स डेमोग्राफिक्सची माहिती हवी आहे का तुम्हाला.. गूगल करा.

पर्सनल स्पेस ची कल्पना मी अमेरिकेत नवा होतो तेव्हा मलाही नव्हती.
>>>>
प्रेग्नन्ट स्त्री ला इथे सर्रास विचारतात, कॉंग्रेतुलेशन्स इस इत गर्ल ओर अ बॉय.. डिड यौ फाईड इत..

आवडत्या पुरुषाने या बायकांना काहीही प्रश्न विचारलेले त्यांना आवडतात.
>>>>

हे खरे आहे.
पण याचा अर्थ असा नाही की तो पुरुष कूल डूड असला पाहिजे.
मुख्यत्वे विवाहीत बायका असतील तर तुम्ही किती डिसेंट आहात त्यावर ते ठरते.

मी इतका पण थराला नाही हो गेलेला कि प्रेग्नंट स्त्रीच्या पोटाकडे न्याहाळून बघत बघत अभिनंदन म्हणेन>>
साॅरी.
मला तुम्ही न्याहाळून बघितलं असं म्हणायचं नाहीये. पण तिने जर स्वतःहून टिमच्या बाहेर कुणाला सांगितलं नसेल. तर तिला कदाचित असं वाटलं असेल की तुम्हाला कसं कळलं?? याने आपल्या पोटाकडे पाहिलं म्हणूनच कळलं असेल हा अंदाज बांधला जाऊ शकतो. त्यामुळे तिला राग आला असावा.

असू शकेल पण ते तसच असेल असं आपण गृहित धरुन नाही चालू शकत.>> हेच ऊलट्या अर्थानेही खरे आहे ना बुवा? कॉम्प्लिकेशन्स असतील यंव असेल त्यंव असेल असेही का गृहीत धरायचे मग साधे अभिनंदन करायला?

माझ्या मते असे अभिनंदन करू नये. वर लिहिल्याप्रमाणे तिच्या प्रेग्नंसी मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असू शकतील, असे अभिनंदन तिला भोचक पणाचे वाटेल, तिचा मूड वाईट असेल. >>> प्रामाणिक भावनेने केलेले अभिनंदन तिला ऊभारी देणारच नाही, आनंद देणारच नाही असे का गृहीत धरता आहात विकु?

लेखक महाशय, ईथेच तुम्हाला ' पुरुषाने असे अभिनंदन करण्यात काहीही वावगे वाटले नाही' असे मोकळ्या मनाने म्हणणार्‍याही मिळाल्या आहेत . तेव्हा तुम्हीच ठरवा आता काय करायचे ते. अभिनंदन केले, नाही केले तरी 'चूक झाली' म्हणत गिल्ट मनाला लावून घेवू नका. तुमची भावना प्रामाणिक असेल तर समोरच्य्च्या रिअ‍ॅक्शनचा जास्तं विचार करू नका.

बाकी पर्सनली मला असे वाटते की क्लोज फ्रेंड नसू तर सोबत काम करतो या आधारावर आपल्याकडे कोणत्या गरोदर महिलेला अभिनंदन करायला जाऊ नये.
ईथे आपल्याकडे हे महत्वाचे.
त्याचवेळी असे वाटते की हा जो काही संकोच आपल्याकडे आढळतो तो स्त्रियांनी देखील झटकून टाकायला हवा.
पण मी स्त्री नसल्याने याबाबत नेमके सांगू शकत नाही.

Work-in-progress चे अभिनंदन नसते हे अजून एक कारण. नवंनवं कळलं तर ते बाहेरच्यांना माहीत असायचा काही संबंध नसतो आणि पाचव्या महिन्यानंतर जेव्हा न सांगता पन बाहेरतयांना कळतं तेव्हा wrong time. बेसिकली, प्रेग्नन्ट बाईचे अभिनंदन भारतात तरी नो-नो.

पण मी स्त्री नसल्याने याबाबत नेमके सांगू शकत नाही.

काढ नवा पोल ! होउ दे खर्च ! ( गमती लिहिले आहे, खरेच पोल काढू नका प्लीज)

हायझेनबर्गच्या सगळ्या पोस्टशी सहमत. 'एक मित्र' मला तरी तुमच्या विश करण्यात काहीही ऑड, चुक आणि बायकी तर मुळीच नाही वाटलं. वर कोणी तरी लिहिल्याप्रमाणे पर्सनल स्पेसचं अवाजावी स्तोम आणि त्या नावाखाली केलेला शिष्ठपणा असु शकतो. प्रेग्नंसी ही किती आनंदाची गोष्ट असते. कोणत्याही नॉर्मल स्त्रीला विश केलं तर चेहर्‍यावर स्माइलच येइल. Known कलिगला विश करण्यात तर काहीच चुक नाही.

अहो ईतक काय मनावर घेताय, नेक्स्ट टाईम गरज असेल तरचं बोला त्यांच्याशी नाहीतर सरळ ईग्नोर करा.

Pages