ती सध्या काय करते

Submitted by अनाहुत on 3 August, 2017 - 23:05

संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल.. कुठे असेल .. ती सध्या काय करते ?
*********************************************************************************
आज तिला पाहिलं कशी दिसतेय हि चेह-यावर सूज आहे कि काय , किती बेढब झालीय हि आता . ती तेव्हा कशी दिसत होती आणि आता कशी दिसतेय . तिचा तो चेहरा , ते चाफेकळीसारखं नाक, ओठांच्या नाजूक पाकळ्या , आणि ते बोलके डोळे , अगदी अगदी आखीव रेखीव होती ती आणि आता कशी झालीय मध्ये किती वेळ गेला त्यापेक्षा कितीतरी जास्त वय वाटायला लागलाय तीच . ती कोवळीक तो गोडवा कुठंतरी हरवलाय . छे इतके दिवस तिला पाहावं अशी हुरहूर होती मनात पण आता वाटतंय कि नसतो भेटलो तर बर झालं असत . किमान मनात तीच ते आधीच रूपच राहील असत , तिला पाहायचं होत , तिला भेटायचं होत , आता दिसली ती पण मन शांत नाही झालं, उगाचच तिला भेटलो असं वाटतंय आता .

अगदी माझी झाली नाही म्हणून नाही पण जी व्यक्ती आपल्यासोबत नाही, ती तशी नाही ज्याचं आपल्याला आकर्षण होत, म्हणून बर वाटतंय . पण बर आहे ना कधीकधी सूड काळच उगारतो . चांगलं आहे आता अशी हुरहूर तर नाही राहणार कि हि आयुष्यात नाही आली . पण जाऊदे जेव्हा प्रेम असत तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्याच दिसतात पण जेव्हा जवळून ओळख होत जाते तेव्हा त्यांचे weak पॉईंट्स सुद्धा माहित होतात . आणि आता याचाच वापर करूया . भेटूया कि तिच्या नवऱ्याला बघूया काय म्हणतोय .
*********************************************************************************
" अरे यार तू भारी माणूस आहेस. बर झालं तू भेटलास . छान company झाली तुझी . मजा आली बघ . आपण श्रावण बिवण पळत नाही . मस्त enjoy . अरे एक हि life है just enjoy it . married life enjoy करायचं म्हणशील तर त्याच असं आहे त्याला बायको तशी हवी आणि बायको तशी असती तर तिच्या सोबत एन्जॉय केलं असत आणि घरी थांबलो असतो . पण बायको जाम बोर आहे, तिला इन्टरेस्टच नसतो कशात . कशी अजागळासारखी राहते . कुठं फिरायला नको कशाची हौस नाही कसली मौज नाही लाईफ अगदी बोर झालाय राव. "
*********************************************************************************
तीचा आवाज अगदी तसाच नसला तरीही काहीतरी होत त्यात जे अगदी तसच होत तीच हुरहूर .. तीच धडधड पुन्हा जाणवत होती इतक्या वर्षांनंतरही फक्त तिच्या आवाजाने . खरंच काहीतरी शिल्लक आहे का अजून ..
" कसा आहेस ? इथंच आहेस तरीही भेटला नाहीस कधी मला ... "

तिच्या आवाजात जो प्रश्न होताच तोच तिच्या डोळ्यात होता . तिचे डोळे आजही तसेच बोलके आहेत त्यात बघून इतक्या वर्षआधीची ती परत भेटली ... ती अगदी तशीच होती ... तिच्या डोळ्यात .... आजही ....

" तू इथं कसा ? "

" मी इथंच असतो आजकाल . "

" इथंच होता तर भेटला का नाहीस मला ?

तुझ्याशी खूपकाही बोलायचं होत पण कधी आपली भेटच होत नव्हती. आणि लग्न का केलं नाहीस अजून ? माझ्यासाठी असेल तर नको थांबूस आणि माझ्याबद्दल काही वाटत असेल तर एव्हढ ऐकशील माझं . माझं आजही प्रेम आहे तुझ्यावर माझ्या मनाच्या एका कप्प्यात तू आहेस आणि कायम राहशील.

संसार आहे मला माझा . करते आहे जस जमेल तस. नव-याला कशात इंटरेस्ट नाही . घरातील काम कशी होतात किंवा होत नाहीत . काय त्रास आहेत आणि कशाची गरज आहे त्याला कशाचं काहीच नसत . घरातलं सगळं बघायचं, मुलांचं आवरायचं, त्यांच्या नेण्या आणण्याचं त्यांना काय हवं काही नको या कशा कशात नसतो तो . तो तसा आजही single आहे . तो आणि त्याचे मित्र यातच त्याच आयुष्य चाललय . त्यांच्या सोबत party करायची त्यांच्या सोबत गप्पा टप्पा आणि मौजमजा यातच सगळं . घराची चिंता नको , कशाची काळजी नको. तुला वाटत असेल कशी राहतेय मी ? पण काय करू या सगळ्यातून वेळच मिळत नाही मला माझ्याकडं बघायला म्हणून अशी झालेय . पण आहे माझा संसार त्यात जमेल तस आणि जमेल तितकं करत राहीन . मी काय रडगाणं गात बसलेय तुझ्यापुढे . एक तर तू इतक्या दिवसांनी भेटलास, तुझ्याशी काय बोलायला हवं आणि मी काय बोलत बसलेय .

पण तू असा एकटा राहू नकोस आज तुला काही गरज नाही वाटणार पण उद्या तुलाही गरज वाटेल कोणाच्या तरी सोबतीची आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल तेव्हा आताच थोडा विचार कर आणि लग्न कर . अगदी मनापासून सांगतेय राहवत नाही म्हणून . बर चल निघते मी आता मुलांना घ्यायला जायचंय. नि ती निघालीही . तिला पाठमोरी पाहून मनात अनेक विचार येत होते .

आपण स्वतःलाच तर फसवत नव्हतो ना इतके दिवस .. आपलं तिच्यावर प्रेम आहे हे सुद्धा मान्य करायला मन कचरत होत, ती मात्र स्पष्टपणे सगळं सांगून मोकळी झाली . ती माझ्याबद्दल आताही चांगलाच विचार करते आहे आणि मी काय विचार करत होतो तिच्या बद्दल . छे ... बर झालं भेटलो तिला . ब-याचशा गोष्टी clear झाल्या . सगळं ठीक आहे ती तिच्या संसारात आहे . तिला तिच्या संसारात राहू दे त्याबद्दल काही नाही पण तरीही एक हुरहूर मात्र कायम राहील....

Group content visibility: 
Use group defaults

छान !
आवडली स्टोरी... Happy
पु.ले.शु.

छानय .

छान