त्या दिवशी एका मैत्रीणीच्या घरी गेले होते. एकत्र कुटुंब सुखी कुटुंब असे साधारण वातावरण होते. तिचा मोठा भाऊ, त्याची बायको, त्यांची एक मुलगी आणि एक मुलगा, त्यांचे आजी-आजोबा असे सारे एकत्र दिवाणखान्यात गप्पा मारत बसलो होतो. समोर टिव्ही चालू होता. टिव्हीवर गाणी लागली होती. बहुधा "लव आज कल" किंवा "कॉकटेल" सिनेमातील गाणे होते. त्यात दिपिका पदुकोन नाचत होती. सोबत त्या मैत्रीणीची साधारण चार-पाच वर्षांची भाची नाचत होती. भाचा तिच्यापेक्षा लहान असल्याने नुसतेच टाळ्या पिटत होता. सारेच कुटुंबीय एंजॉय करत होते. एकंदरीत चांगले वातावरण होते.
ती छोटीशी चिमुरडी खरेच छान नाचत होती. समोरच्या दिपिकाला कॉपी करताना आपल्यातर्फे काही इनोवेशन करत होती. मी मैत्रीणीला म्हटलेही, "छानच नाचते गं, रोजचा टाईमपास आहे तुम्हाला". मैत्रीण म्हणाली, "हो गं, आता पाच वर्षांची झाली की तिला डान्स क्लासला घालणार आहोत". आपल्या मुलीचे कौतुक ऐकून तिच्या आईचाही चेहरा खुलला.
आणखी एखाद दुसरे वाक्य बोललो असू, आणि आम्ही तो नाचाचा विषय जास्त वाढवतो आहे हे पाहून मैत्रीणीचे बाबा, म्हणजे त्या चिमुरडीचे आजोबा मध्येच म्हणाले, "ते नाच वगैरे मुलींच्या जातीला काही नाही. आपल्याकडे नको असलं काही". बोलण्याचा टोन अगदी उत्साहावर क्षणात विरजन टाकावे असाच होता. ते त्या मुलीच्या आईच्या चेहर्यावर दिसलेही. मला पटकन माझा स्वभावाला अनुसरून चार शब्द सुनवायची खुमखुमी आली. पण पहिल्यांदाच त्यांच्या घरी जात होते, कोण कसा असेल याची कल्पना नव्हती. आजोबांनी म्हटले म्हणून लगेच तसेच व्हावे असे नसावेही, आपण का उगाच विषय वाढवा असा विचार करून शांत राहिले.
पण मुलीचे बाबा, म्हणजे माझ्या मैत्रीणीचा भाऊ बोलला, "अहो असेच गंमतीने म्हटले. लगेच कोणी डान्स क्लासला टाकणार आहे का. मलाही नाही आवडत असे मुलींनी नाचलेले. त्यापेक्षा कराटेच्या क्लासला घालूया. आजच्या काळात मुलींना स्वत:चे संरक्षण करायला जमले पाहिजे"
मनातल्या मनात म्हणाले, अगदी आदर्श विचार आहेत. मुलींना बाहेरच्या गुंडमवाल्यांपासून आपले संरक्षण करणे जमलेच पाहिजे. पण या घरच्या संस्कृतीरक्षकांपासून त्यांचे संरक्षण कोण करणार?
समोर पडद्यावर दिपिका पदुकोन नाचत होती ते एवढा वेळ सारे एंजॉय करत होते, पण तीच दिपिका पदुकोन आपल्या घरात जन्माला यायला यांना नकोय.
मुलांना हवे ते आवडीचे करीअर करू द्यावेत, त्यांना आपले छंद जोपासू द्यावेत हा विचार हल्ली बळावत आहे. पण मुलींबाबत थोडा आणखी पुढे जाऊन विचार करायची अजूनही गरज आहेच.
पटलं तर विचार करा ...
जस्ट आठवल म्हणुन लिहीतेय
जस्ट आठवल म्हणुन लिहीतेय अवांतर आहे: एक शॉर्ट फिल्म बघितली होती. त्यात एका खेड्यातल्या शाळेतुन कुठल्यातरी कॉम्पिटीशन साठी कलाकार पाठवायचे असतात. एक अगदी छान अॅक्टींग करणारा आणिअॅक्टींग मधे इन्टरेस्ट ही असलेल्या मुलाचे सिलेक्शन होते पण वडील पाठवत नाहीत म्हणुन दुसर्या नंबर वाल्याला जायला चान्स मिळतो. तो दुसरा त्या संधीचा फायदा घेउन मोठा अॅक्ट्रर बनतो. नंतर तो गावात येतो तेव्हा सगळा गाव त्याला भेटाय्ला येतो.
अदिती आपली पोस्ट जराही अवांतर
अदिती आपली पोस्ट जराही अवांतर नाही. अगदी मार्मिक शॉर्ट फिल्म आहे या धायाच्या दृष्टीने.
कोणती शॉर्ट फिल्म आहे...
कोणती शॉर्ट फिल्म आहे... चांगली वाटतेय.. नाव कळू शकेल का
दे धक्का मध्ये फाइनल राउंड
दे धक्का मध्ये फाइनल राउंड आठवली
त्यात नक्कीच समजते - नाचायचे तर कसे
आणि नाचू नये तर कसे
नृत्य जर कला आहे ...तर
कलाकार कलेशी प्रमाणिक रहावा
बीभत्स अंगविक्षेप केलेले नाच कोणत्याच कलाप्रेमीसाठी कायम अप्रिय घटना ठरावी
बीभत्स अंगविक्षेप केलेले नाच
बीभत्स अंगविक्षेप केलेले नाच कोणत्याच कलाप्रेमीसाठी कायम अप्रिय घटना ठरावी
>> 'विभत्स' हा ही एक रस आहे नवरसांपैकी.
accha means u say its
accha
means u say its perfectly fine to dance accordingly.... is it?
means u say its perfectly
means u say its perfectly fine to dance accordingly.... is it?
>>> Means you say it's not fine to dance accordingly.... is it?
मुळात स्त्रीनी नाचावं का? या
मुळात स्त्रीनी नाचावं का? या प्रश्नाचं उत्तर आहे, "हो तिला आवडत असेल तर तिनी नक्कीच नाचावं". तिला काहिही करण्याचं स्वातंत्र्य आहे अन तिचं नाचणही त्या स्वातंत्र्यात मोडते. म्हणून तिनी जरुर नाचावं. पण.... हे स्वातंत्र्य उपभोगताना रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स पाळायचे असतात. या रिजनेबल रिस्ट्रिक्शन्सचं कायद्यामध्ये सखोल इन्टरप्रिटेशन झालेलं आहे. स्त्रीच्या नाचण्याचं या रिजनेबल रिस्ट्रिक्शन्सशी को-रिलेशन कसं मांडणार हा प्रश्न उद्भवतो. यावर आपल्या देशातील कायद्यात तरी रिजनेबल रिस्ट्रिक्शन्सवर बरच इन्टरप्रिटेशन झालेलं आहे. जिथे मागिल इन्टरप्रिटेशन कमी पडेल तिथे नवीन इन्टरप्रिटेशनला स्कोप व पुरेसे ग्राउंड्स उपलब्ध आहेत. थोडक्यात फक्त स्त्रीचं नाचण्याचं स्वातंत्र्य नाही तर प्रत्येक स्वातंत्र्य उपभोगताना हे स्वातंत्र्य अनलिमिटेड/अनकंट्रोल्ड स्वरुपात उपभोगता येत नाहीत. ते नेहमीच सब्जेक्ट टू रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स असतात. तर मग स्त्रीच्या नृत्यावर हे रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स लावण्याचे निकष काय असावे असा प्रश्न येतो. त्यावर उत्तर सोपं आहे. तिच्या नृत्यातून अश्लिल हावभाव होऊ नयेत. पुरुषांना उत्तेजीत करण्याचा प्रकार घडू नये. काही विशिष्ट पोज जे बेडरुममधल्या घटनांशी रिसेंबल होतील ते नृत्यातून येऊ नयेत. इ. इ. गोष्टी रिजनेबल रिस्ट्रिक्शन्सचे निकष ठरु शकतात.
थोडक्यात एवढ्चं म्हणता येईल की तिचं नाच वल्गर वाटणार नाही असं असावं. आता प्रत्येकाची वल्गरपणाची परिभाषा भिन्न असल्यास परत बोंबच.
एकूण काय तर... बाई, काही कर पण जरा जपून.
रानपाखरु.... अंबंज्ञ यांनी
रानपाखरु.... अंबंज्ञ यांनी मांडलेले विधानच तुम्ही एलाबोरेट केले आहे.
माझे असे म्हणणे आहे की कला अशी कोणत्याही साच्यात बांधता येत नसते. कायदेबाह्य आक्षेपार्ह वर्तन ठरवणे हा भाग सोडला तर इतर बाबतीत कोणी नियंत्रण ठेवण्याची भाषा करु शकत नाही.
संभोगदृश्ये चित्रपटात असतातच. विभत्स म्हणाल तर अनेक हिंसाचार, विकृती दाखवणारे चित्रपट मालिका वगैरे आहेत. नवरसांची हळुवार ते घनघोर अशी भलीमोठी रेंज असते व कलाकार त्यात्या वेळी, त्या त्या गरजेप्रमाणे ती सादर करतात. यात हे असे नको ते तसे नको म्हणणे योग्य नव्हे. फारतर त्यात प्रेक्षकांची हे सर्व बघण्याची तयारी आहे की नाही हाच प्रश्न महत्त्वाचा ठरत असतो.
कामभावना उद्दिपित करणारे अनेक कलाप्रकार आहेत. काही तर खास त्यासाठीच निर्माण केले गेलेले आहेत. आपल्या भारतीय शास्त्रिय नृत्यांमधला एक महत्त्वाचा नृत्यप्रकार तर खास शृंगाररसाला वाहिलेला होता...
विभत्स-विकृत हावभाव करणे - करु शकणे हे कलाकारांसाठी कसोटी पाहणारे असते. मोठमोठ्या अभिजात-उच्चभ्रू नटनट्यांनी हे सगळे प्रकार केलेले आहेत, तेव्हा त्यांचे कौतुकही झाले आहे. मला आठवते की स्वर्गीय रीमा लागू यांच्या कोण्यातरी नाटकातल्या वेश्येच्या भूमिकेच्या तंतोतंतपणाबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले होते.
----- प्रेक्षकांची दृष्टी, विचारसरणी व मानसिकता ही फार महत्त्वाची. जेजेला असतांना एकदा एक मित्रासोबत त्याच्या वडीलांना घेऊन जहांगीर आर्ट गॅलरीला गेलो होतो. त्याचे वडील टिपिकल खेड्यापाड्यातून वाढलेले कन्झर्वेटीव विचारसरणीचे. तर प्रदर्शन लागले होते एका मोठ्या गाजलेल्या चित्रकाराच्या न्युड पेन्टींगचे... किमान ५०-७० लाइफसाइज नग्न स्त्रियांची पेन्टींग्स होती. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी अॅनाटॉमी, फीगरड्रॉइंग इ.च्या अभ्यासाच्या दॄष्टीने ती एक मेजवानी होती तर त्याच्या वडीलांना फार अन्कम्फर्टेबल झाले. मी त्यांना पेन्टींगबद्दल मत विचारले तर भयंकर नाराजी दाखवून म्हणाले, सगळी वेश्यांची पेन्टींग्स वाटतात. हा एकाच कलाप्रकाराबद्दलचा दोन लोकांचा वेगवेगळा दृष्टीकोन आहे. ----
सरतेशेवटी काही उरत असेल तर औचित्याचा प्रश्न. तोच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पाच-सात वर्षांच्या चिमुरड्यांनी मादक अदा करत लावणी सादर करणे उचित आहे का? त्याची गरज आहे का? तसे मनोरंजन करुन नेमके काय समाधान मिळते हा प्रश्न विचारल्या जाणे गरजेचा आहे. अशा भलत्या वयात भलत्या गोष्टींचा सोस करुन आपण मुलांचे बालपण हिरावून घेतोय का हे स्वतःला विचारणे आवश्यक आहे. औचित्याचा विषय चर्चेस घेणे गरजेचे.
सरतेशेवटी काही उरत असेल तर
सरतेशेवटी काही उरत असेल तर औचित्याचा प्रश्न. तोच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पाच-सात वर्षांच्या चिमुरड्यांनी मादक अदा करत लावणी सादर करणे उचित आहे का? त्याची गरज आहे का? तसे मनोरंजन करुन नेमके काय समाधान मिळते हा प्रश्न विचारल्या जाणे गरजेचा आहे. अशा भलत्या वयात भलत्या गोष्टींचा सोस करुन आपण मुलांचे बालपण हिरावून घेतोय का हे स्वतःला विचारणे आवश्यक आहे. औचित्याचा विषय चर्चेस घेणे गरजेचे.>>>>>
+1111
दीपिका वयाच्या 25साव्या वर्षी जे समजून उमजून तिच्या पोटापाण्याचा उद्योग म्हणून करतेय ते तुमच्या मुलीने वयाच्या पाचव्या वर्षी तुम्हाला हौस व तिचे कसब म्हणून करावे का? काही जणांना हो करावे असे वाटते, काहींना नाही.
दीपिका वयाच्या 25साव्या वर्षी
दीपिका वयाच्या 25साव्या वर्षी जे समजून उमजून तिच्या पोटापाण्याचा उद्योग म्हणून करतेय ते तुमच्या मुलीने वयाच्या पाचव्या वर्षी तुम्हाला हौस व तिचे कसब म्हणून करावे का?
>>>>>
लता मंगेशकर/ आशा भोसले गायन कोणत्या वयात शिकल्या?
लता मंगेशकर/ आशा भोसले यांनी आपले पहिले व्यावसायिक गाणे कितव्या वर्षी गायले?
मला नाही वाटत एखादी गोष्ट शिकण्यासाठी सज्ञान व्हायची गरज आहे.
तसेच कलाक्षेत्रात व्यावसायिकपणे उतरण्यासाठीही ईतके थांबायची गरज नाही.
जर क्रिकेटमध्ये अंडर फोर्टीन खेळता येते तर नाचाने काय घोडे मारलेय?
सोळाव्या वर्षी सचिन आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सज्ञान व्हायच्या आत पैसा, प्रसिद्धी आल्यावर तो देखील बहकला असता... आणि तो बहकला असता असा विचार करून त्याच्या वडिलांनी परदेशात क्रिकेटच खेळायला पाठवले नसते तर...
काही जणांना हो करावे असे
काही जणांना हो करावे असे वाटते, काहींना नाही.">>>>
पुढे हेही लिहिलेय हे वाचले नाही का? की अर्धवट वाचून प्रतिसाद द्यायची घाई?
विषय काय चाललाय ते समजून घ्या आधी मग सुरू व्हा.
काही जणांना हो करावे असे
काही जणांना हो करावे असे वाटते, काहींना नाही.">>>>
पुढे हेही लिहिलेय हे वाचले नाही का? >>>>
ते वाचूनच लिहिलेय.
तुमच्या पोस्टला विरोधी पोस्ट नाहीयेच मुळी माझी. ती शक्यही नव्हती कारण तुम्ही मुळात एक मत माण्डले नाही हे शेवटच्या वाक्यावरून समजले.
मी फक्त त्या दोन विचारांमधील सकारात्मक विचार कोणता यावर भाष्य केले ईतकेच
ज्या काहींना नाही वाटते त्यांच्या मुलांचे आयुष्य मग वर उल्लेखलेल्या शॉर्टफिल्ममधील त्या संधी हुकलेल्या मुलासारखे होते. म्हणून नकारात्मक विचार झटकावेत. आपल्या संस्कारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या पाल्याला त्याच्यातील कलागुणांना न्याय देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
नानाकळा , साधना चांगल्या
नानाकळा , साधना चांगल्या पोस्ट्स
कोणती शॉर्ट फिल्म आहे...
कोणती शॉर्ट फिल्म आहे... चांगली वाटतेय.. नाव कळू शकेल का << शोधावी लागेल. शोधते..
एका मुलीला नाचण्याचा छंद आहे.
एका मुलीला नाचण्याचा छंद आहे. तिला तिचा छंद जोपासायला घरच्या संस्कृतीरक्षकांपासून परवानगी मिळत नाही. याचे मला तेव्हा वाईट वाटलेले. आता जराही आश्चर्य वाटत नाहीये. ईथलेच बघा ना. सनी लिओन, नाचणे म्हणजे धंदा करणे, अश्लील हावभाव, बीभत्स रस, वगैरे कित्येक मुद्दे एवढ्या प्रतिसादात येऊन गेले. हे मुद्दे नाही तर एखादी मुलगी जेव्हा नृत्य हा छंद जोपासायची ईच्छा व्यक्त करते तेव्हा समाजाच्या डोक्यात येणारे हे विचार आहेत. तिथे ती काय आपल्या मनासारखे करणार. आणि मला खात्री आहे की हाच जर मुलावर धागा असता तर वर उल्लेखलेला एकही मुद्दा धाग्यात आला नसता. आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे हेच खरे.
आपल्याला खूप लांबचा पल्ला
आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे हेच खरे. >>> +१
आपल्याला खूप लांबचा पल्ला
आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे हेच खरे. >>> +१ >>> +७८६
आमचा मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे याचा अभिमान बाळगणे खूप सोपे आहे. आमची मुलगी नाचात नंबर वन आहे याचा अभिमान बाळगणे तितकेसे सोपे नाहीये.
त्या दिवशी अजय चव्हाणांच्या कथेवरही मी लिहिले होते. स्कॉलर मुलाकडे तो सज्जन असेल असेच पहिले ईम्प्रेशन बनते. पण तेच कोणी नाचात प्रावीण्य राखून असेल पण अभ्यासात हुशार नसेल तर मात्र तो कॅरेक्टरने कसा असेल काय माहीत अशी शंका सहज घेतली जाते.
की हाच जर मुलावर धागा असता तर
की हाच जर मुलावर धागा असता तर वर उल्लेखलेला एकही मुद्दा धाग्यात आला नसता >>> wrong interpretation
गणपती / इतर मिरवणूक वा तत्सम सार्वत्रिक ठिकाणी नाचणारे ( most of time दारू पिवून अश्लील विकृतअंग विक्षेप करणारे) मुलगे सुद्धा ह्या कैटेगरीमध्ये येतील न !
विचित्र पण जाणीव पूर्वक केलेले सिडक्टिव्ह अंगविक्षेप हा जर घरगुती डान्स प्रकार म्हणून मुला /boys,.. मुलींना / girls लहानपणापासून घरातच प्रोत्साहन मिळणार असेल तर अजुन काय बोलावे
माझा प्रतिसाद उपहासात्मक
माझा प्रतिसाद उपहासात्मक नव्हता.
समाजाच्या जाणिवा प्रगल्भ व्हायची प्रक्रिया संथ आहे. सध्या निषिद्ध असलेल्या बऱ्याच गोष्टी कालांतराने मूळ प्रवाहात नक्कीच येतील.
It is just a matter of time.
जस्ट आठवल म्हणुन लिहीतेय
जस्ट आठवल म्हणुन लिहीतेय अवांतर आहे: एक शॉर्ट फिल्म बघितली होती. त्यात एका खेड्यातल्या शाळेतुन कुठल्यातरी कॉम्पिटीशन साठी कलाकार पाठवायचे असतात. एक अगदी छान अॅक्टींग करणारा आणिअॅक्टींग मधे इन्टरेस्ट ही असलेल्या मुलाचे सिलेक्शन होते पण वडील पाठवत नाहीत म्हणुन दुसर्या नंबर वाल्याला जायला चान्स मिळतो. तो दुसरा त्या संधीचा फायदा घेउन मोठा अॅक्ट्रर बनतो. नंतर तो गावात येतो तेव्हा सगळा गाव त्याला भेटाय्ला येतो.
Submitted by अदिति on 31 July, 2017 - 10:19
>> मला अख्खाच्या अख्खा बिल्लु बार्बर सिनेमा आठवला.
त्या सिनेमातला बिल्लू हल्ली
त्या सिनेमातला बिल्लू हल्ली मायबोलीवर लिहित असतो हे माहितीये का तुम्हाला?
मलाही बिल्लू आठवला. पण त्याची
मलाही बिल्लू आठवला. पण त्याची कथा जरा वेगळी होती. चांगला चित्रपट होता पण शाहरूखच्या धाटणीचा बनवावा की ईरफानच्या हे नक्की न झाल्याने जरा गण्डला.
अवांतर - त्याचे नाव बदलून नंतर बिल्लू ईतकेच ठेवण्यात आलेले.
गणपती / इतर मिरवणूक वा तत्सम
गणपती / इतर मिरवणूक वा तत्सम सार्वत्रिक ठिकाणी नाचणारे ( most of time दारू पिवून अश्लील विकृतअंग विक्षेप करणारे) मुलगे सुद्धा ह्या कैटेगरीमध्ये येतील न ! >> नक्किच नाही येत. ह्यांचि तूलना दिपिकाच्य चित्रपटतील डान्स सोबत नाही होवू शकत.
समजा टायगर श्रॉफ चा डान्स चालू आहे. सगळ कुटूंब एन्जॉय करत आहे. चिमूरडा मूलगा छान डान्स करतोय, टिव्ही वर बघून. ते बघून लेखिका कौतूक करत म्हणते की छान डान्स करतोय मूलगा. मूलाचि आई उत्तरते की आम्ही त्याला डान्स क्लास ला घालणार आहोत. ह्यावर आजोबा काय म्हट्ले असते? आणी त्यांच्या मूलाने काय उत्तरे दिले असते?
लेखात दिलेलि उत्तरेच असती कि वेगळी.
शेवटी, नक्की काय आहे: पदुकोन,
शेवटी, नक्की काय आहे: पदुकोन, का पडुकोण, का पदुकोण, का पादुकोण (हे बहुदा नसावं)
>> मला अख्खाच्या अख्खा बिल्लु
>> मला अख्खाच्या अख्खा बिल्लु बार्बर सिनेमा आठवला. << बघतांना नाही वाटला पण इथे टाईप करतांना मला बिल्लु आठवलेला. बघतांना फक्त समोर आलेली संधी न घेतल्याने त्या मुलाचे कसे नुकसान झाले आणि त्याच्या ईतक टॅलेन्ट नसुनही संधीचा योग्य फायदा घेतल्याने दुसरा मुलगा कसा पुढे आला हेच जाणवल. शॉर्ट फिल्म मधे शेवटचा सिन कसा घेतला होता ते आठवत नसल्यामुळे बिल्लुच डोळ्यासमोर येत होता म्हणुन डिटेल्स लिहीले नाहीत :प
गाठायचा आहे हेच खरे.
गाठायचा आहे हेच खरे.
Submitted by अर्चना सरकार on 2 August, 2017 - 00:31
>>>+1000000
नवीन Submitted by कंसराज on 3
नवीन Submitted by कंसराज on 3 August, 2017 - 02:17>>>
means gender bias ?
i already stated it should not b
what's ur conclusion
Pages