नोटबंदीचे सु-परीणाम भाग २

Submitted by मिलिंद जाधव on 15 July, 2017 - 04:52

पुर्वी " नोटबंदीचे सु-परीणाम " असा ऐक धागा काढलेला होता. त्या धाग्यावर आता प्रतिक्रीया सुविधा बंद केलेली असल्याने नविन धागा उघडलेला आहे.

नोटबंदी हा आजच्या सरकारने घेतलेला महत्वाचा व धाडसी निर्णय होता. सरकारचे प्रमुख ह्या नात्यांने पंतप्रधान यांना हा निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला. नोटबंदीचा पर्याय हा सरकारच्या अर्थ विभागाच्या यंत्रणेने दिलेला असावा व त्याचे बरे वाईट परीणाम काय होतील ह्याची माहिती सध्याच्या सरकारला दिलेली असेलच. स्वतःच्या ( पर्यायाने भाजपाच्या ) राजकीय कारकिर्दीला क्षणात नष्ट करु शकेल असा निर्णय घेणे सोप्पे नसावे. ज्या सरकारी यंत्रणेने नोटबंदीचा पर्याय सुचवलेला त्यांनी नोटबंदीचा आवाका, त्यामुळे होऊ शकणार्या समस्यां व त्यावरचे उपाय ह्यावर ईतका सखोल विचार केलेला नव्हता हे नोटबंदीच्या नंतरच्या काळात समोर आल होत.

नोटबंदी मुळे जनतेला त्रास झाला, १०० लोक मरण पावली, आणी नोटबंदी ही विरोधी पक्षाच्या मते आताच्या सरकारच्या अपयशातील अजुन एक प्रकरण ठरली .

आता भाजपाला झोडपायला नोटबंदीचा उच्चार पुरेसा आहे अस वाटत असतानाच नविन माहीती समोर आलेली आहे. ही माहिती मटाच्या बातमीत दिलेली आहे. अर्थात आताच्या सरकारच्या चांगल्या कामावर आलेल्या सर्व बातम्या बिनबुडाच्या खोट्या असतात हे सर्व स्विकारुनच ही बातमी ईथे दिलेली आहे.

कॅशलेस व्यवहार ८०० अब्जांवर!
http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/cashless-t...

नोटाबंदीनंतर सर्वसामान्य जनतेला बँकांबाहेर मोठमोठ्या रांगा लावण्याची वेळ आली खरी...पण आता आठ महिन्यानंतर या निर्णयाचे फायदेही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. काळ्या पैशावर नियंत्रण येण्याखेरीज ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाणही वाढले आहे. नोव्हेंबर ते जून या कालावधीत देशातील कॅशलेस व्यवहार अंदाजे ८०० अब्ज रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

एका अहवालानुसार नोटाबंदीचा निर्णय घेतला नसता, तर ८०० अब्ज रुपयांचे कॅशलेस व्यवहार होण्यासाठी २०२० पर्यंत वाट पाहावी लागली असती. कॅशलेस व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचा सर्वाधिक फायदा केंद्र सरकारला झाला असून, सर्वच व्यवहारांवर नजर ठेवणे सोपे झाले आहे. शिवाय काळ्या पैशाच्या निर्मितीला लगाम घालणेही शक्य झाले आहे.

Group content visibility: 
Use group defaults

महत्त्वाचे म्हणजे क्ष, अ,ब,क यांनी गुन्हा केला आहे...अगदी बरोबर.पणा त्या काळात भारतातल्या कोत्यावधी लोकानी हा गुन्हा केला आणि काळा पैसा जिरवला.

हे उदाहरण देऊन त्यांनी नोटांबंदी वर सेल्फ गोल केला आहे, हे त्यांना समजले की नाही, कुणास ठाऊक

Lol

नोटा बदलून देण्याचा कालावधी फार मोठा असल्याने या अवधीमध्ये काळा पैसा इतरत्र फिरवून भामट्यांनी सगळा काळा पैसा बरोबर पांढरा करुन घेतला. फक्त एक आठवड्याची मुदत दिली असती तर बराच फरक दिसून आला असता. शेवटी हा भारत आहे, स्वार्थ मोठाच आहे देशापेक्षा.
>> हा माझा नोटबंदीवरील दुसऱ्या धाग्यावरचा प्रतिसाद!!

आहे त्या कालावधीत बदलून घ्यायलाच मोठ्या लाईनी लागल्या, अजून कमी वेळ दिला असता तर लोक एकमेकांच्या उरावर बसले असते

रद्द झालेल्या नोटांपैकी ९९% हून अधिक नोटा, ज्यातला काही भाग का ळा पैसा होता, परत कशा जमा झाल्या, त्यात सरकारला टॅक्सही मिळाला नाही आणि सामान्य माणसांना भ्रष्टाचार करायची संधी कशी मिळाली, हे सोदाहरण दाखवल्याबद्दल विक्षिप्त मुलगा यांचे आभार आणि अभिनंदन.

भरत,
तुम्हाला खरंच उद्योग नाहीये का?
कोणताही मूर्ख id नोटबंदी ने भ्रष्टाचार कमी झाला म्हणाला तर त्याच्याशी 1-2-1 वाद घालून त्याला समजावणार का?

तुम्ही कितीही लॉजिकल मुद्दा मंडलात तरी त्याचा मूर्खपणा त्याच्या तोंडाने तो कबूल करेल का?
मागची 2 पाने हे अचाट कँव्हीन्सिंग चालू आहे, त्याची खरेच गरज आहे का?

गच्छ सूकर भद्रं ते वद सिंहो मया हृतः ।
पण्डिता एव जानन्ति सिंह सूकरयो र्बलम् ॥

म्हणून सोडून द्या

गच्छ सूकर भद्रं ते वद सिंहो मया हृतः ।
पण्डिता एव जानन्ति सिंह सूकरयो र्बलम् ॥

लै बेक्कार

<< रद्द झालेल्या नोटांपैकी ९९% हून अधिक नोटा, ज्यातला काही भाग का ळा पैसा होता, परत कशा जमा झाल्या, त्यात सरकारला टॅक्सही मिळाला नाही आणि सामान्य माणसांना भ्रष्टाचार करायची संधी कशी मिळाली, हे सोदाहरण दाखवल्याबद्दल विक्षिप्त मुलगा यांचे आभार आणि अभिनंदन. >>

--------- ९९.३ %
१५.४१ लाख कोटीचे ०.३ % पण खूप मोठा आकडा आहे, असो.

नोटबंदी चूक असेल तर मला काहीच म्हणायचे नाही. चूका होतातच. पण खूप विचार केला, खोलवर सर्व बाजूंनी विचार केला हे फसवे आहे, खोटे आहे. विचार पुर्वक निर्णय घेतलेला असेल तर नव्या नोटांचा आकार ATM ने स्विकारला असता... अगदीच बाळाबोध चूक. आपल्या घरातले जूने फनिर्चर बदलायचे आहे, ते बाहेर काढले आहे. पण नवे फर्निचर घरातल्या मुख्य दरवाज्यामधून घरांत घेता येत नाही. कारण आकार काही जुळत नाही. Sad फर्निचरचा आकार आधी माहित झाला असता तर कमी पैसा परत आला असता अशी मखलाशी करणारे करतील.

वर एक छान उदाहरण दिल्या गेले आहे, अर्थात तो सेल्फ गोल होता. अनेकांना त्यांच्या जवळ असलेली अमाप/ बेहिशोबी पैसा.... काळा पैसा राजरोस पणे पांढरा करता आला. काही (जे वर उदाहरणात आले आहेत) काळा पैसाधारकांना एक सुवर्णसंधी दिल्या गेली.

दुसरा फायदा बँकेच्या लोकांना OT मिळाला.

ज्या बँका स्टेट बँकेत विलीन झाला त्या़च्या करँमचाऱ्यांना ओटी मिळाला नव्हता.
एटीएम मध्ये नोटा भरणाऱ्या आणि recalibrate करणाऱ्या कंपन्यांची बिलं चुकती केली नव्हती. राष्ठ्रहितासाठी त्यांनी ते फुकटात करायला हवं असं सांगितलं गेलं.

१२- १५ तास काम करुन OT नाही हे माहित नव्हते. राष्ट्रहितासाठी काही किमान गोष्टी करायला हव्यातच.... इतरांनी.

Pages