बॉलिवूड मधील क्रीपी स्टॉकींग कधी थांबणार ?

Submitted by धनि on 30 June, 2017 - 15:10

बॉलिवूड मध्ये सतत आपण बघत आलो आहोत की हिरो हिरॉइनीचा पाठलाग करत असतो, तिला त्रास देत असतो, "ना का मतलब हा होता है" असे म्हणतो. आधीपासून हे सुरू आहेच पण ९० च्या दशकात "खुद को क्या समझती है" , "खंबे जैसी खडी है" वगैरे गाण्यांनी या गोष्टींना अधिकच हातभार लावला. आता खरं तर हे स्टॉकींग चूकीचे आहे. असे करायला नको. नो म्हणजे नो असे काही पिक्चर्स येत होते. पिंक सारख्या चांगल्या चित्रपटातून साध्या आणि स्पष्ट भाषेत हे समजवून सांगत होते.

आता जग बदलतंय, बॉलिवूड बदलतंय असे वाटत असतानाच एकदम टॉयलेट - एक प्रेम कथा मधले हंस मत पगली गाणे पाहिले. आता तसे पाहता हा पिक्चर एका चांगल्या विषयावर आधारीत आहे. त्यामुळे माझ्या या पिक्चर कडून बर्‍याच अपेक्षा होत्या. पण तेवढ्यात हे गाणे पाहिल्याने काही अपेक्षा ठेवणेच पाप आहे की काय असे वाटायला लागले.

Creep1.JPG

या गाण्यात अक्षय कुमार भूमी पेडणेकरच्या मागे लागलेला आहे. अगदी विचीत्र पणे तिचा पाठलाग करतो. तिचे फोटो काढतो. तिच्या कॉलेजभोवती फिरतो. ती सायकल चालवत असताना गाडीवर पाठलाग करतो. असे क्रीपी स्टॉकींग करताना दाखवलेले आहे.

Creep2.JPGCreep3.JPG

बॉलिवूडच्या दिग्दर्शकांना कधी कळणार की या सगळ्या रोमँटीक गोष्टी नसून स्टॉकींग आहे. यामुळे त्या मुलीला किती मानसीक त्रास होत असेल. आणि याचे अनुकरण किती मुले करतील आता सिनेमात पाहून. हे सगळे कुठे तरी थांबायला पाहिजे. अक्षय कुमार सध्या चांगल्या विषयावरचे चित्रपट करत असताना त्याने सुद्धा असे दाखवणे बरोबर वाटत नाही.

Creep4.JPG

ही आहे पूर्ण व्हिडीओ ची लिंकः https://www.youtube.com/watch?v=h2d8cevZDIQ
(चित्रे युट्युब वरून)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायझेनबर्ग, मी म्हणालो
.....
सुपर्रस्टार असे थिल्लरपणाचे शॉर्टकट मारून बनता आले असते तर शक्ती कपूर किंवा इम्रान हाशमी सुपर्रस्टार झाले नसते 
....
या वाक्याचा अर्थ तुम्हाला नेमका लागलेला दिसत नाही.
उलट मी इम्रान हाशमी, शक्ती कपूर या थिल्लर कलाकारांची माळ वेगळी काढली आहे Happy

अमित हीरो वर्शिप चे काय ज्याचे उदाहरण आत्ता इथेच ह्या बाफवर पाहिले. लोक सोयीस्कर अर्थ काढतातच ना. अक्षय एक सोशली रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहे हे त्याच्या सिनेमाबाहेरच्या कामातून कळते. मग एका वाईट, ऑफेन्सिव क्रिमिनल गोष्टीचा रिवार्ड मिळतो हा चुकीचा संदेश जात असेल तर? त्याची एथिकल/मॉरल जबाबदारी कोणी तरी घ्यायला हवी ना?

धनि गल्लत होत्येय मला वाटतं.
जी, पीजी, पीजी १३ सर्टीफिकेशनला हे नियम नक्की असावे. पण जनरल पिक्चर मध्ये हे नको ते नको सुरु केलं की ती थिन लाईन कधी ओलांडली जाईल आणि इंटरकोर्स शब्द नको सारखी माणसांची डोकी कधी चालतील समजणार पण नाही.
उदा द्यायचं तर ब्रेकिंग बॅड मध्ये मेथ, गॅन्ग इ. इतकं जवळून दाखवलं पण त्याची भलामण कुठेच केली नाही की वॉल्टर व्हाईटला मसीहा बनवलं नाही, असं करता आलं तर उत्तमच.
उलट उदाहरण द्यायचं झालं तर प्रकाश आमटे त्याचं कार्य इतकं महान आणि आदरणीय आहे पण त्याच्या वरचा सिनेमा इतका सुमार होता की अजिबात आवडला नाही.

अजिबातच नाही. पण म्हणून व्हिलनवर कोणी सगळी गाणी चित्रीत करत नाही 
>>>>
म्हणजे ज्यावर गाणी चित्रित होतात तो हिरो समजायचे का Happy

तरी शाहरूखवर किती गाणी चित्रित झालेली त्यात? बहुतेक एकच. बडी मुश्कील है खोया मेरा दिल है. ते स्टॉकिण्ग होते आणि चित्रपटात त्याचाच "अंजाम" काय होतो हे दाखवले होते Happy

Happy तुम्ही कोण कोणास काय म्हणाले यात पूर्णपणे गल्लत करत आहात, ऋन्मेष.
"क्रिपीपणा तो क्रिपीपणाच असतो मग तो शारूख नी केलेला काय की अक्षय कुमार ने केलेला..." या वाक्याचा इतकाच अर्थ निघतो की तो कोणीही केलेला असला तरीही तो क्रिपीपणाच असतो. त्यातलं फक्त शाहरूखचं नाव वेचून अश्या धाग्यावर वाद घालणं - ज्याचा विषय काहीतरी वेगळाच आहे - तुम्हाला तरी पटतं का?
दुसरी गोष्ट - शाहरूख डर मधे व्हिलन जरी असला तरीही लोकं अनुकरण करताना त्याचंच करतील अशीच शक्यता जास्त आहे कारण त्याच्याभोवतीचं वलयच तसं आहे, नाही का? तेव्हा ही अनुकरण करणारी लोकं असा विचार करतील का की 'हा तर व्हिलन आहे आणि हे असं वागायचं नसतं'?

अमित, मला स्पष्टपणे वाटते की स्टॉकिंग चे उद्दातीकरण वाईट आहे आणि चित्रपटांमधून ठळकपणे दाखवून देणे की स्टॉकिंग केल्याने मुलगी पटते हे हानिकारक आहे !

मग एका वाईट, ऑफेन्सिव क्रिमिनल गोष्टीचा रिवार्ड मिळतो हा चुकीचा संदेश जात असेल तर?

>>>>>

एक्झॅक्टली हायझेनबर्ग!
तुम्हाला तर मुद्दा कळला आहे. आणि तरीही तुम्ही डर आणि अंजामची नावे घ्यावीत याचे आश्चर्य वाटले. त्यात काय रिवॉर्ड मिळाला ते पाहिलेत ना. सजा ए मौत Happy

धनि तू म्हणतोस ते पूर्णपणे पटतं पण मोराल पुलिसिंग नको इतकच मला म्हणायचं आहे.
आणि त्या ट्रोलला नका फीड करू. त्याला स्पर्शिकेत (tangent :D) बोलायचं आहे तर बोलू द्याना. धाग्याची वाट लावेल तो.

रमड,
मी शाहरूखचे नाव नाही वेचले तर मी डर आणि अंजाम ही चुकीची उदाहरणे वेचली. मग पुढे शाहरूख आला.
बाकी शाहरूखला (किंवा कुठल्याही बिग स्टारला) वलय आहे म्हणून लोकं त्याचेच अनुकरण करतील हा मुद्दा चर्चेला योग्य आहे. उदाहरणार्थ संजय दत्तचा वास्तव मधून पोरं भाईगिरी शिकली. पण यात एक लक्षात घ्यायला हवे की तेव्हा शाहरूख बिग स्टार नव्हता. जेव्हा झाला तेव्हा असे चित्रपट केलेच नाहीत. पण मग अश्यावेळी अश्या हिरोंवर ईमेज जपण्याचाही आरोप होतो. अश्यांनी मग करायचे काय Happy

पुस्तकी शिक्षणाने सगळे साध्य झाले असते तर क्राईम सारखी गोष्टं घडते का? उलट सगळ्यांत जास्तं स्टॉकिंग कॉलेजलातूनच होत असेल. अगदी शिक्षकांकडून आणि शिक्षकांचे सुद्धा.
सिनेमा हे भारतीयांचे मूल्यशिक्षणाचे एकमेव साधन आहे.

डी कॅप्रिओ एन्व्हारोमेंटल कॉज साठी सिरीयस आहे, त्याने तसे मुव्ही ही केलेत, भाषणातूनही तो विषय तिकडे आवर्जून वळवतो किंवा मेरिल स्ट्रीपने गोल्डन ग्लोब मध्ये स्पष्ट भूमिका घेतली. कोणी मुलं दत्तक घेतं कोणी आणखी काही करतं. पण म्हणून त्यांना कोणी देव्हाऱ्यात (खऱ्या किंवा मनाच्या) बसवलेले माहित नाही.
काय चांगलं काय वाईट हे ज्याचं त्याने ठरवायला नको का? जे चूक आहे ते केलं तर त्यावर कायदा आणि सुव्यवस्था असेल तर त्वरित आणि कडक शासनही होईल. यातलं काहीच सुधारायचं नाही आणि पिक्चर मध्ये असं नसलं पाहिजे म्हणायचं ही वरची मलमपट्टी नाही का वाटत तुम्हाला?
चित्रपटांना सर्टीफिकेशन द्यायचं आणि कुठल्या वयात काय नसावं ठरवायचं हे मला पूर्ण पटतं पण मग ज्या मुलांचे ते कळायचे वय नाही त्यांना असे सिनेमे दाखवू नये ही अक्कल ही शिकल्या सवरलेल्या लोकांकडे नाही का? आणि १८ वर्षे वयाच्या लोकाना काय चांगलं काय चूक कळत नसेल तर त्याना शिक्षा करा किंवा का कळत नाहीये हे समजून घेऊन तसं शिक्षण द्या.
पिक्चर मध्ये बंद करून अत्याचार थांबतील हा भाबडा आशावाद वाटतो मला तरी.

अनवॉलंटरी मॉरल पुलिसिंग चा मुद्दा बरोबर वाटतो आहे म्हणूनच आधी धनिला विचारलेले दृष्यांबद्दलच आक्षेप आहे की त्यांच्या लीगल अश्या ईंटरप्रीटेशनब्द्दल.
पण लोक सिनेमातल्या दृष्यांनी अक्षरश: पछाडतात हे ही खरे आहे त्यामुळे रूट लेवलवरच धनि चा मुद्दा मला व्हायेबल वाटतो.
तू कॅप्रिओ आणि स्ट्रीपने ज्याना मेसेज दिला त्या आणि आपण ज्या लोकांविशयी बोलत आहोत त्यांचे मॉरल आणि एज्युकेशन एकाच लेवलवर का बघतो आहेस.?

कारण स्ट्रीप आणि कॅप्रिओ ज्या देशात आहेत त्याची सर्वोच्च व्यक्ती स्टॉकिंग करते आणि त्याची खुली समर्थक आहे, हे समजूनही त्या व्यक्तीला बहुसंख्य (लेस ३ मिलियन पण ते असो) लोकांनी निवडून दिलं आणि तरीही स्टॉकिंगच्या घटनांत वाढ झाल्याचे वाचलं नाही. Lol

ऑन सिरीयस नोट, स्टॉकिंग बंद करायचं म्हटलं तर कसं करणार बंद? सेन्सॉर? काय नियम असतील त्याचे?

पटकथा हिरो नाही लिहीत हे देखील ध्यानात घ्यायला हवे. >> पण हिरो क्लॉजेस घालतात contract मध्ये जसे सलमान किसिंग सीन करत नाही, अभय देओल फेयरनेस क्रिम अ‍ॅड करत नाही तसं स्टॉकिंग सीन्स करणार नाही असा क्लॉज घालूच शकतात हिरो-हिरॉईन्स. आमिर खानने सत्यमेव जयते मध्ये मी सिनेमात हे करायला नको होते असे जाहिरपणे मान्य केले.

स्टॉकिंग सीन्स करणार नाही असा क्लॉज घालूच शकतात हिरो-हिरॉईन्स. >> +१००
अर्थात भल्या भल्या अभिनेत्यां/ नेत्रीं कडून हे मी केलं नाही तर कोणी तरी करणारच टाईप समर्थन इतर विषयांवर ऐकलं आहे. नव्या पिढीचे लोकं जे फ़ायनाशिअली जास्त स्टेबल असतील कदाचित त्यांनी तरी असा stand घ्यावा.

लोक चित्रपटाच सही सही अनुकरण करतात हे प्रत्येक सुपरहिट चित्रपटाने सिद्ध केलेय, जस हम आपके नतर बुट लपवायची साथ आली होती, सैराट नतर त्यातले डायलॉग सुपरहिट झाले होते, डर्,बाजिगर नतर प्रपोज फेल गेले मुलिने नकार दिला की अ‍ॅसिड फेकायच्या घटना वाढल्या होत्या, आपल्याकडे सुपरस्टार्सची क्रे़झ काय असते यासाठी अमिताभ किवा शाखा च्या दाराशी उभ्या हजारो करोडो (बिनकामाच्या )लोकावरुन कळते. तो जे पडद्यावर करतो ते बरोबर असा समज करुन वागणारे अनेक युवक असतिल.
पडद्यावर स्टॉकिन्ग हा समाजाचाच आरसा आहे हे जितक खर आहे तितकच सिनेमाच अनुकरण करुन युवक नविन कल्पना शिकतात हेही खरय मग ते मुन्न्भाई नतर गान्धिगिरी असो की इतर काहि...

ती डिवेलप्ड कंट्री ची सर्वोच्च व्यक्त असल्याने स्टॉकिंग पासून ग्रॉपिंग पर्यंत डिवेलपमेंट आधीच झालेली आहे. आपल्या डिवेलपिंग कंट्री ची गाडी अजून स्टॉकिंग वरच अडकली आहे, तर तेवढेच सोडवू. Proud

म्हणून आपल्याकडे डिटेक्टीव्ह हे पुचाट आणि विनोदी असतात का? की स्मार्ट कल्पना दिल्या लोकांना तर लोकं चोरी करत सुटतील. Happy

आता सैराट मधून ज्या लोकाना पळून जाऊन लग्न करा हा संदेश दिसला आणि त्यांनी विरोध केला आणि ते आणि कोणा संस्कृतीरक्षकाला चूक वाटलं आणि त्यांनी सैराट वर बंदी घातली तर मग मात्र बोलू नका.

Agree with Dhani 100%. It is even more creepy when one is parent to young girl. There is an entire category of stalker films in Telugu. Making it acceptable to chase a girl even if she says no.

आता सैराट मधून ज्या लोकाना पळून जाऊन लग्न करा हा संदेश दिसला >>> हे तर झालंच होतं ना तेव्हा? Happy भरपूर व्हॉट्सअ‍ॅप संदेशही फिरत होते याबद्दल.

अमित तू लीगॅलिटीचा पॉईंट मिस करतो आहेस. पळून जाउन लग्न करणे ईल्लीगल नाहीए पण स्टॉकिंग हॅरॅसमेंट अ‍ॅक्ट खाली गुन्हा आहे.

चोरी, रेप, खून, आत्महत्या, अमली पदार्थांचे सेवन आणि अगदी समलैंगिकता हे सगळं भारतात गुन्हा आहे. आता हाच रूल या सगळ्या आणि इतर गुन्ह्यांना पण लावायचा का?
परत म्हणतो, की ही थिन लाईन आहे, हे चूक ते बरोबर आणि म्हणून यावर पिक्चर काढा आणि हे दाखवा ते दाखवू नका हा स्लिपरी स्लोप आहे. कुठल्याही बंधनाला माझा विरोध असेल. कारण आज कोणी सेन व्यक्तीने रूल केले तरी सिस्टीमच्या विरुद्ध किंवा सिस्टीममध्ये पुलिसिंग करता येते त्याचा एकदा का पायंडा पडला की पाताळ इज लिमिट.

र्म्द, सैराटच्या वेळी तसं झालेलं आणि त्यावरून जर कोणी त्याच्यावर बंदी घातली असती तर मला खात्री आहे तू त्या बंदीच्या विरुद्ध असतीस.

हे केवळ त्या अभिनेत्याच्या आणि त्याने विचार केला नाही तर आपल्या हातात आहे. आयएमडीबी वर, सोशल साईटवर स्पॉयलर अलर्ट देऊन काय वाईट आहे ते लिहु शकतो, आपल्या मुलांना शिकवू शकतो, नियम पाळायची सवय लावू शकतो असं नियम आणि मुस्कटदाबी करून काहीही हाती लागणार नाही, काळ मात्र सोकावेल.

अमित +१

>>> जानेमन जानेमन म्हणत मागे मागे फिरणारे पालेकर सुद्धा स्टॉकरंच.
हाब, सिनेमा पाहिला आहेस का? ड्रीम सीक्वेन्स आहे ते गाणं! आणि सिनेमात शेवटी सभ्य वर्तणुकीचा नॉट सो सटल 'संदेश'ही आहे. Happy

अमितव, सैराट पिक्चरवर बंदी घालायच्या मी नक्कीच विरूद्ध असते.

इथे या धाग्यावर अक्षयकुमारने स्टॉकिंग एंडॉर्स करण्याबद्दल चर्चा चालू आहे आणि त्याबद्दल माझं मत इतकंच आहे की तसं त्याने टाळावं - स्पेशली जेव्हा सध्या त्याची जनरल प्रतिमा लोकांच्या भल्यासाठी काम करणारा, रिअल हिरो वगैरे अशी आहे. पिक्चरवर बंदी आणा असं धनिही कुठे म्हणतोय असं मला दिसत नाहीये.

अक्षयकुमारने स्टॉकिंग एंडॉर्स करण्याबद्दल >> ते गाणे नीट बघ. दुसरा कार्टा बघतो भूमीला तर त्याला "ताडू" म्हणून टपली मारतो, पण स्वतः ताडणे चालूच... तो स्टॉकिंग एंडॉर्स करत नाही, पण स्वतः करतो Wink Happy

अमित, इथे सिनेमा मॉरल्स किंवा संदेश एक मिनिटाकरता बाजुला ठेवू कारण तुझं बरोबर आहे, सिनेमा वाल्यांनी दर वेळेस कसा संदेश जातोय ह्याकडे बघण्यापेक्षा आर्ट, काँटेंट कडे लक्ष द्यावं आणि प्रेक्षकांनी आपली सदसदविवेकबुद्धी वापरावी. ही झाली आयडियल केस पण तरी असं टोटली होऊ शकतं असं मी गृहित धर्तो.
मग आपण आता आर्ट कडे बघू. तू दिलेल्या ब्रेकिंग बॅड च्या उदाहरणात अगदी सॉलिड बेसिस आहे. तो प्रोफेसर असतो आणि काही कारणांनी तो वाईट मार्गाला लागून बरच काही करतो. कितीही अशक्य वाटलं तरी शेवटी ती कथा आहे आणि लेखकाला पुर्ण स्वातंत्र्य आहे इतकी अशक्य गोष्ट शक्य असल्याची. At the end it is fiction.
Now, does showing fiction mean you break the basic laws of physics? If you were making a movie on Superman, it would make sense to break the laws of physics (that too you can but with proof. You know why super man flies, right?). Bottom line, there is a sound basis for fantasy too.
If you read Harry Potter, you will see J K Rowling establishes a very firm base that makes all magic totally believable.
Moving on to Akshay Kumar's movie. His movie is also probably based on fictional characters but the society they live in is not fictional or imaginary at all. Now, in what town or city in India this kind of indiscriminate harassing is normal? Nowhere. If you are using an existing model of the society, as a filmmaker then, isn't it your responsibility to show a true representation of it?
मला आजकाल म्हणूनच बहुतांशी हिंदी अन मराठी सिनेमे आजिबात बघवत नाहीत. म्हणजे बघायचा प्रयत्न करतो पण कशाचा कशाला मेळच नाही असं हँडलिंग असतं बर्याच सिनेम्यांचं. १० मिनिटांच्यावर बघवत नाही.
Now going back to the audience using its common sense. As much as it should be, that the audience should use good judgement, it seldom happens in India. Movies do have a big effect on the audience and that's why these gross generalizations and incorrect representations of what is "normal" in society do have an impact on the audience. Especially young and uneducated public.
I've already said above that I understand and agree that movie makers are not responsible for public reform but they surely are obligated to portray true and accurate representation of the society they depict in their movies. Unfortunately, in India, people already have a lot of misconceptions about civil liberties (especially civil liberties of women) and Akshay's portraying of indiscriminate harassing as normal not only sends a very wrong and dangerous message, as a form of art it is deeply flawed as well.

चर्चेचा आतापर्यंतचा साधारण रोख "चित्रपटांमुळे स्टॉकिंग वाढलं" अशा तऱ्हेचा दिसतोय, जे पूर्णपणे बरोबर नाही. एक काळ होता, जेव्हा मी सुध्दा अशीच स्टॉकिंग केल्यामुळे जोडे खाल्लेत. अगदी नंतर थोडी समज आल्यावर (तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून) स्टॉकिंग किती घृणास्पद आहे, याची जाणीव झाली.

पण माझ्या मते यामागचं मूळ कारण आहे, समाजात तरुण मुलामुलीत असणारी अबोल भिंत. जेव्हा मुलं अन मुली दोघेही वयात येतात, तेव्हा परस्परांबद्दल आकर्षण वाटणं साहजिक आहे. पण ते व्यक्त करायचं तरी कसं? बऱ्याचदा मुलींना मुलांशी थेट बोलता येत नाही, कारण फालतू संस्कारांच्या आणि चारित्र्याच्या नावाखाली मुलीवर अनेक बंधने घरच्यांकडून आणि समाजाकडून येतात. मुलांना मुलींशी अनेकदा थेट बोलता येत नाही, कारण त्याला भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर संवाद कसा साधायचा याची काहीच कल्पना नसते, असली तरी असे धाडस (हो, धाडसच) समाजाच्या भीतीने करण्याची शक्यता खूप कमी आहे.

मग संवाद साधायचा कसा? एकच मार्ग त्यातल्यात्यात मुलांना बरा वाटतो तो हा, स्टॉकिंग. लपूनछपूण पाठलाग करायचा, एखादा सिग्नल मिळायची वाट बघायची, सूत जमलं तर जमलं, नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. बऱ्याचदा मुलांना दुसऱ्या व्यक्तीला यामुळे किती त्रास होत असेल हे त्यांच्या गावीही नसते.

हा सगळा मामला समाजाच्या संस्कृती आणि शील, अशा तद्दन फालतू गोष्टींमुळे प्रमाणाबाहेर चिघळलाय.

शहरी भागात तरी त्यामानाने बरी परिस्थिती म्हणावी लागेल, पण तुलनेने ग्रामीण भागात या गोष्टी जैसे थे आहेत. Sad चित्रपटात जे स्टॉकिंग दाखवतात , तो फक्त एक आरसा आहे, मूळ कारण नाही. चित्रपटातून या गोष्टी जरी कापून काढल्या, तरी स्टॉकिंग व्हायचे मुळीच थांबणार नाही. जोपर्यंत आपल्याकडे मुलामुलीत पुरेसा मोकळेपणा येत नाही, तोपर्यंत कितीही सेन्सॉरशिप लादा, काहीही परिणाम होणार नाही.

मला अमितव आणि धनि दोघांचेही मुद्दे पटत आहेत. Moral policing करू नये हे जितकं खरं तितकंच अजून आपल्या देशात असायला हवी तितकी सामाजिक प्रगल्भता नाही हेही खरं. ज्या देशात तरुणाई बहुसंख्य आहे आणि सिनेमाचा प्रभाव प्रचंड आहे तिथे stalking चे उदात्तीकरण करणारे सिनेमे बनू नयेत. जुन्या काळात काय घडले यावर आज काय घडावं हे ठरवणं चूक वाटतं. ह्यापुढे काय घडावं हे जास्त महत्वाचे आहे.
Stalking is a doable fantasy so it is more dangerous. For a parallel example, I read somewhere that the young readers of Harry Potter were more scared of Umbridge than Voldemort because having a teacher like Umbridge seemed a feasible fantasy.
Feasible fantasies are a bit more influential.

Pages