बॉलिवूड मधील क्रीपी स्टॉकींग कधी थांबणार ?

Submitted by धनि on 30 June, 2017 - 15:10

बॉलिवूड मध्ये सतत आपण बघत आलो आहोत की हिरो हिरॉइनीचा पाठलाग करत असतो, तिला त्रास देत असतो, "ना का मतलब हा होता है" असे म्हणतो. आधीपासून हे सुरू आहेच पण ९० च्या दशकात "खुद को क्या समझती है" , "खंबे जैसी खडी है" वगैरे गाण्यांनी या गोष्टींना अधिकच हातभार लावला. आता खरं तर हे स्टॉकींग चूकीचे आहे. असे करायला नको. नो म्हणजे नो असे काही पिक्चर्स येत होते. पिंक सारख्या चांगल्या चित्रपटातून साध्या आणि स्पष्ट भाषेत हे समजवून सांगत होते.

आता जग बदलतंय, बॉलिवूड बदलतंय असे वाटत असतानाच एकदम टॉयलेट - एक प्रेम कथा मधले हंस मत पगली गाणे पाहिले. आता तसे पाहता हा पिक्चर एका चांगल्या विषयावर आधारीत आहे. त्यामुळे माझ्या या पिक्चर कडून बर्‍याच अपेक्षा होत्या. पण तेवढ्यात हे गाणे पाहिल्याने काही अपेक्षा ठेवणेच पाप आहे की काय असे वाटायला लागले.

Creep1.JPG

या गाण्यात अक्षय कुमार भूमी पेडणेकरच्या मागे लागलेला आहे. अगदी विचीत्र पणे तिचा पाठलाग करतो. तिचे फोटो काढतो. तिच्या कॉलेजभोवती फिरतो. ती सायकल चालवत असताना गाडीवर पाठलाग करतो. असे क्रीपी स्टॉकींग करताना दाखवलेले आहे.

Creep2.JPGCreep3.JPG

बॉलिवूडच्या दिग्दर्शकांना कधी कळणार की या सगळ्या रोमँटीक गोष्टी नसून स्टॉकींग आहे. यामुळे त्या मुलीला किती मानसीक त्रास होत असेल. आणि याचे अनुकरण किती मुले करतील आता सिनेमात पाहून. हे सगळे कुठे तरी थांबायला पाहिजे. अक्षय कुमार सध्या चांगल्या विषयावरचे चित्रपट करत असताना त्याने सुद्धा असे दाखवणे बरोबर वाटत नाही.

Creep4.JPG

ही आहे पूर्ण व्हिडीओ ची लिंकः https://www.youtube.com/watch?v=h2d8cevZDIQ
(चित्रे युट्युब वरून)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चोरी, रेप, खून, आत्महत्या, अमली पदार्थांचे सेवन आणि अगदी समलैंगिकता हे सगळं भारतात गुन्हा आहे. आता हाच रूल या सगळ्या आणि इतर गुन्ह्यांना पण लावायचा का?>>>> अमित, जोवर हे गुन्हे रिवार्डिंग आहेत असे सिनेमांमध्ये दाखवले जात नाही तोवर काही प्रॉब्लेम नाही असे वाटते. ह्या गुन्ह्यांचे उदात्तीकरण दाखवले असल्याचे काही सिनेमे नक्कीच असतीलही पण त्यांचे प्रमाण फारच कमी असावे. सुपरस्टार्स नसतील तर व्ह्युअर बेस ही कमीच त्यामुळे स्टॉकिंगपेक्षाही हा ईश्यू गंभीर असला तरी वाईडस्प्रेड नसावा.

हाब, सिनेमा पाहिला आहेस का? ड्रीम सीक्वेन्स आहे ते गाणं! >>> हो सिनेमा अनेकदा पाहिला आहे, हे गाणं माझं अतिशय आवडतं आहे आणि मला गाण्याचा विडिओही आवडतो. पण एकदा अँटी स्टॉकिंग स्टँड घेतल्यानंतर शाहरूख चं हे स्टॉकिंग आहे पण पालेकरांचं नाहीये, अक्षय चं आहे पण देवानंदचं नाहीये असा स्टँड घेणं दुटप्पी ठरेल, ईंटेंट चा खूप मोठा फरक आहे हे दिसतंय आणि कळतंय तरी.

हो संदेशही आहेच, फक्त पालेकरांची ती अ‍ॅक्ट 'संग संग चले मेरे, मारे आगे पीछे फिरे' स्टॉकिंग वाटते एवढेच म्हणायचे होते.

Stalking चित्रपटात मोठ्या प्रमाणात दाखवतात व ते चूकच आहे. पण धनि यांचे मूळ मुद्दे मला समजले व पटले ते असे-
१. हे गाणं पर्टिक्युलरली जास्त क्रिपी आहे. Taking it to another, creepier level टाईप्स.
२. हा चित्रपट काहीतरी सोशल मेसेजवाला असल्याचा प्रचार होतोय व चित्रपटाच्या टायटल वरून तसं वाटतही होतं पण हे चीप रितिने चित्रित केलेलं गाणं यात कसं हा प्रश्न आहे.
३. अक्षय कुमारची इमेज देशभक्तीचे सिनेमे करणारा, सैनिकांचे रोल्स करणारा , सार्वजनिक जीवनातही तत्व जपणारा अशी 'सध्या' आहे. त्यामुळे त्याने असा रोल करणे हे जास्तच आक्षेपार्ह वाटते. हेच शकती कपूर करताना दाखवला तर प्रश्न नव्हता.

चित्रपटातून कापून काढा, चित्रपट सेन्सर करा हे सोल्युशन नाहीच आहे. Filmmakers should just be true to their trade and make sure they are not propagating incorrect representations. फॅक्चुअल बेसिस नसणार्या गोष्टी दाखवायची काय गरज आहे? वाट्टेल तसं हॅरॅस केलं तरी मुलगी पुढे लाडानी होकार वगैरे देते हा ऑलमोस्ट न घडणारा पाचकळ पणा दाखवाय्ची काय गरज आहे?
मग पुढे असाही आर्ग्युमेंट येइल की तसं जर समाजात होतच नाहीये तर मग दाखवलं सिनेमात तर काय बिघडलं? खरं एकदम बालिश आर्ग्युमेंट आहे हा पण तरी, जर समाजात ह्या गोष्टी नॉर्मल समजल्या जात नाहीत तर तुम्ही त्या समाजात वावरणारे कॅरॅक्टर आणि स्टोरी दाखवत आहात तर मग हे असं खोटं चित्र दाखवून काय मिळतं तुम्हाला?
हा पाचकळपणा दाखवून खरं पुढे लोकं रियल लाईफ मध्ये चीप अनुकरण करताना दिसतात. The thing is, Eve teasing and harassing girls in India is a common "crime" but not a common "normal" which is acceptable to girls/women. These mindless movies are showing this stuff as being completely normal which is a very dangerous thing and that's exactly the point. It's nothing to do with moral policing.

हे गाणं पर्टिक्युलरली जास्त क्रिपी आहे. Taking it to another, creepier level टाईप्स.>>>>> +१

जिज्ञासा, >>अजून आपल्या देशात असायला हवी तितकी सामाजिक प्रगल्भता नाही >> मान्य. पण मग समाजात या गोष्टी घडतायत म्हणून त्या चित्रपटात आल्या, ८०-२० रूल प्रमाणे कोणी हुशार लेखक/ दिग्दर्शक असेल तर तो स्टीरिओटाईप्स तोडून काही दाखवेल. बाकी सामान्य लोक सामान्य चित्रपटात काही असामान्य करतील ही भाबडी आशा आहे.
>> Now, in what town or city in India this kind of indiscriminate harassing is normal? Nowhere.>> बुवा, are you sure? त्या गाण्यात अक्षय कुमार फोन घेऊन तिला रेकॉर्ड करतो, झाडावर चढून परत रेकॉर्ड करतो, कुठलीही परवानगी न घेता रस्त्यात येता जाता फोन वरून रेकॉर्ड करत सुटतो. ज्याचं डोकं व्यवस्थित काम करत नाही, मर्यादाचं भान नाही, ज्यांच्या सेक्स, परस्पर संमती, श्रेष्ठत्व इ. बद्दलच्या संकल्पना विकृत आहेत आणि ज्यांच्या कडे हातात फोन आहे ते असं खरच करत नसतील असं वाटतं का? मला वाटतं भारतात हे बऱ्याच प्रमाणात होत असावं. परवाच आल्बर्टा (कॅनडा) मध्ये एका माणसाला पकडलं जो डाऊनटाऊन मध्ये असाच रस्त्यावर कॅमेरा लावून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींचे व्हिडीओ रेकॉर्ड करून फेबु वर टाकत होता.

सामुहिक बलात्काराच्या घटना इतक्या कानावर येतात ते काय पिक्चर मध्ये बघून? डोमेस्टिक व्हायोलंस, घरातल्या लहान लहान मुलामुलींवर जवळच्या नातेवाईकांकडून जबरदस्ती, आणि हे काही आजच नवीन नाही, पूर्वापार चालत आलेलं आहे, संधीचा/ गर्दीचा फायदा घेऊन ग्रोपिंग हे सगळं पिक्चर बघून होतं? असं वाटत असेल तर आपण समस्येच खूपच सिम्प्लिफ़िकेशन करतोय आपण असं मला मनापासून वाटतं.

मला शाळेत आणि इतर कुठेही कन्सेंट म्हणजे काय हे शिकवलं गेलं न्हवतं. ओपन कल्चर आपण ठेवलंच नाही, लैंगिक शिक्षण म्हणजे स्त्री आणि पुरुष याचे लैंगिक अवयव आणि रिप्रोडक्षन करायला होणारा इंटरकोर्स यापलीकडे काही लैंगिक शिक्षण असतं याची किती लोकाना भारतात कल्पना आहे? कॉम्प्रीहेन्सिव लैंगिक शिक्षण ज्यात सेक्शुअल ओरिएन्टेशन, ह्युमन रिलेशन, वेगवेगळ्या कल्चर मधील मर्यादा आणि लैंगिकता ही नॉर्मल natural वे ऑफ लाईफ आहे असं पोझीटीव्ह शिक्षण मिळतं का?

फेक न्यूज आणि त्याचे परिणाम आपण बघतोच आहोत, यावर उपाय फेक न्यूज साईट बंद करणे हा वाटतो का युथला फेक काय आणि खरं काय हे ओळखायला शिकवणे हा वाटतो?
हाब आणि बुवांचा उदात्तीकरणाचा मुद्दा जनरली समजला आणि मान्य आहे.
पण समलैंगिक लोक असणे हे नॉर्मल आहे, हे भारताच्या सध्याच्या कायद्याप्रमाणे उदात्तीकरण आहे. सो समलैंगिक व्यक्तीला विनोदी दाखवलं असेल तर ठीक अन्यथा चालणार नाही ना? Happy

बुवा, are you sure? त्या गाण्यात अक्षय कुमार फोन घेऊन तिला रेकॉर्ड करतो, झाडावर चढून परत रेकॉर्ड करतो, कुठलीही परवानगी न घेता रस्त्यात येता जाता फोन वरून रेकॉर्ड करत सुटतो. ज्याचं डोकं व्यवस्थित काम करत नाही, मर्यादाचं भान नाही, ज्यांच्या सेक्स, परस्पर संमती, श्रेष्ठत्व इ. बद्दलच्या संकल्पना विकृत आहेत आणि ज्यांच्या कडे हातात फोन आहे ते असं खरच करत नसतील असं वाटतं का? मला वाटतं भारतात हे बऱ्याच प्रमाणात होत असावं. परवाच आल्बर्टा (कॅनडा) मध्ये एका माणसाला पकडलं जो डाऊनटाऊन मध्ये असाच रस्त्यावर कॅमेरा लावून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींचे व्हिडीओ रेकॉर्ड करून फेबु वर टाकत होता.>>>>>>> अमित, exactly my point!!
हाच कॉमन क्राईम आणि कॉमन नॉर्मलचा फरक आहे. आता अक्षय हे करत असताना सिनेमा मध्ये काय दाखवलय? असं दाखवलय की ते क्राईम किंवा विकृत संकल्पना नसून एकदम नॉर्मल आहे! Which is absolutely misleading. Hope it is now clear what I and some other people here are trying to say. Happy

फेक न्यूज आणि त्याचे परिणाम आपण बघतोच आहोत, यावर उपाय फेक न्यूज साईट बंद करणे हा वाटतो का युथला फेक काय आणि खरं काय हे ओळखायला शिकवणे हा वाटतो?>>>>>> बंद करुच शकत नाही कारण पुरावा नाही पण मेनस्ट्रीम मधल्या न्युज साईट्स ज्यांना एथिक्स ची काळजी आहे ते मीडीया आउटलेट्स नेहमी जागरुक असतात misrepresentation of facts न करणे ह्या बाबतीत आणि त्यांना पबलिक आणि लॉमेकर्स कडून धारेवर धरलं पण जातं ह्यावरुन.
तसच सिनेमा वाल्यांचे पण ते एक फंडामेन्टल ऑब्लिगेशन आहे. You can pick whatever subject to make a cinema but misrepresenting facts is not and should not be considered as art.
परत वर दिलेल्या न्युज मिडिया आउटलेट्स सारखं सिनेमा वाल्यांना धारेवर धरता येत नाही त्यामुळे हे काम त्यांनी त्यांची जबाबदारी ओळखून स्वतःच केलं पाहिजे which takes us back to Dhani's main point in the heading. आधी त्या फिल्ममेक्॑रांन्॑अ अक्कल आली पाहिजे. No one is saying they need to be shut down or policed but the point is they should take their job seriously and understand that what they do matters. Educating the public and improving their judgement is an ongoing process which depends upon a lot of socioeconomic factors and it's something that will happen in time. Nothing you, I or even the filmmakers can do anything about it. Happy

सामुहिक बलात्काराच्या घटना इतक्या कानावर येतात ते काय पिक्चर मध्ये बघून? डोमेस्टिक व्हायोलंस, घरातल्या लहान लहान मुलामुलींवर जवळच्या नातेवाईकांकडून जबरदस्ती, आणि हे काही आजच नवीन नाही, पूर्वापार चालत आलेलं आहे, संधीचा/ गर्दीचा फायदा घेऊन ग्रोपिंग हे सगळं पिक्चर बघून होतं? असं वाटत असेल तर आपण समस्येच खूपच सिम्प्लिफ़िकेशन करतोय आपण असं मला मनापासून वाटतं.>>>>>>>>> A lot of rape and other crazy fantasies leading to groping etc are indeed coming from people's increased access to porn. Again, to be more specific, increased access of porn to uneducated (and probably unemployed) youth. Of course, these incidents were happening before this digital age too, so no one is saying this is the only reason but there is enough evidence to suggest these things are very real triggers. I don't think anyone can stop distribution of porn, the govt has been trying but that's difficult. Here the only solution is education.

About mainstream movies, just like I said above, not all incidents of Eve teasing and harassment stem from movies but some definitely do, so it will help. And just to be clear, I have clarified the point about moral code above. We are not asking the movie makers to do this as a service to the country or anything but simply because that is their job.

> पण हिरो क्लॉजेस घालतात contract मध्ये
>>>>>

नक्कीच घालतात आणि घालू शकतात.
पण हे स्टॉकिंगबाबत ट्रिकी आहे. असा प्रत्येक गोष्टीचा क्लॉज आधीच घालू शकत नाही तर ते आयत्यावेळी नकार देत ठरवावे लागते की ही थिल्लर किंवा चुकीची गोष्ट आहे. मी काम करत असलेले कॅरेक्टर असे वागणार नाही.
आणि मला वाटते बरेच हिरो असे करतातही. माझे आवडते कलाकार याबाबत काळजी घेतात याचा आनंदच आहे.
माझा पॉईण्ट एवढाच होता की हे आधी येते दिग्दर्शकाच्या डोक्यात. तिथेच नाही आले तर कोणी हिरो स्वताहून कश्याला पटकथेत बदल घडवून स्टॉकिंग सीन टाका म्हणून विनंती करेन. त्यामुळे दिग्दर्शक आधी आरोपीच्या पिण्जरयात हवे. पडद्यावर दिसणारया हिरोंवर आपण जास्त जबाबदारी टाकतो आणि त्यांना जास्त भाव देतो ही सुद्धा चित्रपटप्रेक्षक म्हणून आपलीच चूक. असो तो वेगळा विषय झाला.

वरील गाणे मी पाहिले नाही काय लेव्हलचे आहे. पण अक्षयकुमारची आताची ईमेज जी काही असली तरी त्याने सुरुवातीच्या काळात थिल्लर चित्रपटही गाजवून झालेत. तर या कलाकाराबाबत हा धक्का नसेल.

वर आपण सलमान किसिंग सीन करत नाही असे म्हटले पण सुलतानसारख्या सिनेमात स्टॉकिंग करतोच. कारण आपण जे करतोय ते चुकीचे आहे याची अक्कल यावी लागते जी प्रगल्भतेने येते. सलमान अजून तितका प्रगल्भ नाहीये.

जर मी कधीच स्टॉकिण्ग केली नाही असे मी म्हणत असेल तर ते धादांत खोटे ठरेल. एखादी मुलगी आवडतेय तर तिला बघायला तिच्या मागे मागे जाणे किंवा तिच्या क्लास कॉलेजच्या वेळा बघून त्या नुसार तिच्या दर्शनासाठी ताटकळत उभे राहणे. लायब्ररी वा कॅन्टीनमध्ये ती दिसेल अश्या जागी बसणे. तिच्यासाठी आपल्या बसचा रूट बदलणे. हे सारे नॉर्मल होते माझ्यासाठी.. अर्थात त्यातील थिल्लरतेची लेव्हल तितकी नसावी कारण बेसिकली मी तितका मवाली कॅटेगरी मुलगा नाही. पण ते मी ठरवू शकत नाही तर ज्या मुलीला मी फॉलो केले असेल ती काय विचार करते यावर आहे...
असो, हा पॅरा लिहायचा मुद्दा ईतकाच की हे मी चित्रपटातून नाही शिकलो. ज्या उपजत भावना होत्या त्या कश्या व्यक्त करायच्या वा कश्या रिएक्ट करायचे हे आपण आपल्या आजूबाजूचे वातावरण बघून ठरवतो. जर एखाद्या चित्रपटातील टपोरीगिरी आणि गुण्डागर्दी युपी विहार.मध्ये दाखवली असेल तर हे आपल्या मुंबईत चालत नाही ही अक्कल आपल्याला मुंबईत राहण्याने येते.

इथं चर्चा करून काय ते गाणे आणि बॉलीवूड च स्टोकिंग थांबणार आहे का... माबो च पब्लिक म्हणजे सुप्रेम कोर्ट च वकील आहेत फुल्ल....
बाकी मोवी बघून लोक इन्स्पिर होतात हे मात्र खरंय.. अमोल पालेकर बघून त्या काळी नक्कीच लोकांनी स्टॉकिंग केलं असेल... ७० मध... सध्या लोक हुशार आहे.. नुसतं मोवी बघून फोल्लो करणार नाहीत...

परफेक्ट लिहिलय ह्या आर्टिकल मध्ये. वर लिहिलय तसा एग्जॅक्टली साऊंड बेसिस चा मुद्दा पण मांडलाय. त्या अंगमाली डायरीज मधे तर डायरेक पीपींग आहे पण त्याला बॅकग्राउंड, बेसिस आहे.

हे अक्शय कुमारचं नवीन गाणं नाही पाहिलं पण बॉलिवुड मधे फार जुन्या काळापासून आहेत अशी क्रीपी स्टॉकिंग/ इव टिझिंग साँग्ज !
"बोल राधा बोल संगम होगा के नही" तर कळस आहे !
देव आनंदचं ' रुख्साना ओ जाना हमसे दो बाते करके चली जाना"
धर्मेंद्रचं " तेरापिछा ना छोडुंगा सोनिये भेजदे चाहे जेलमे"
बच्चन शशी कपुरचं " जानु मेरी जान".
९० च्या काळात 'ओ लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता, दिवाना मुझसा नही" खंबेजैसी खडी है, एक चुम्मा तू मुझको उधार दे दे आणि अशी अनेक.
नव्या गाण्यां मधे अक्शय कुमार 'पतली कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया' आणि 'गन्दी बात ' तर अशक्य लिरीक्स आहेत, एका मुलीने या विषयावर आणि अशा गाण्यांवर केलेली स्टँडप कॉमेडी मधे खूप लोकांनी शेअर केली होती, अगदी मस्ट वॉच आहे :
Why rape is joke in India : http://youtu.be/wwegkC3Z3V8
प्रॉब्लेम असा आहे कि यातली बरीच गाणी ठेका धरायला लावणारी, तोंडात सहज बसणारी आहेत Uhoh

फक्त स्टॉकिंगच नाही तर ,हिंसाचार , गुन्हेगारीचं उदात्तीकरन , इत्यादी गोष्टीही bollywood मधून हद्दपार करनं ही तेवढचं गरजेचं आहे .

दीपांजली, तुम्ही शेअर केलेला विडिओ मस्त आहे त्या पोरीचा..
त्यात उल्लेख झालेले गंदी बात गाणे मात्र मी कधीच ऐकले नव्हते. आता मुद्दाम चेक केले.. फेमस असेल खरेच तर मी कुठच्या जगात राहतो चेक करायला हवे..

चांगलच फेमस आहे, धुमामुळ घालत पब्लिक पार्टज मधे लागलं कि !
अर्थात लिरिक्स सोडून दिले तर गाण्याचे बिट्स , शाहिद कपुरचा डान्स भारी आहे त्यात !

धनि , अगदी चांगला विषय.
आता हे जास्त जाणवत याच कारण फो न/ सहजा सहजी फोटो काढून ते शेअर करण/फोर्वर्ड करण हे अगदी सहज शक्य झाल आहे.
नविन गाण , रितिक रोशन आणि सोनम कपुरच आहे ते मला बघताना असच वाटलेलं. फोनची अ‍ॅड केल्यासारख गाण घेतल आहे. फोटो/व्हिडिओ शुटींग वगैरे करताना दाखवलय.
गाण मस्त आहे पण प्रत्य्क्षात खरच अस कुणी केल तर जेल मध्येच.

चर्चेचा आतापर्यंतचा साधारण रोख "चित्रपटांमुळे स्टॉकिंग वाढलं" अशा तऱ्हेचा दिसतोय, जे पूर्णपणे बरोबर नाही. एक काळ होता, जेव्हा मी सुध्दा अशीच स्टॉकिंग केल्यामुळे जोडे खाल्लेत. अगदी नंतर थोडी समज आल्यावर (तिसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून) स्टॉकिंग किती घृणास्पद आहे, याची जाणीव झाली.
पण माझ्या मते यामागचं मूळ कारण आहे, समाजात तरुण मुलामुलीत असणारी अबोल भिंत. जेव्हा मुलं अन मुली दोघेही वयात येतात, तेव्हा परस्परांबद्दल आकर्षण वाटणं साहजिक आहे. पण ते व्यक्त करायचं तरी कसं? बऱ्याचदा मुलींना मुलांशी थेट बोलता येत नाही, कारण फालतू संस्कारांच्या आणि चारित्र्याच्या नावाखाली मुलीवर अनेक बंधने घरच्यांकडून आणि समाजाकडून येतात. मुलांना मुलींशी अनेकदा थेट बोलता येत नाही, कारण त्याला भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर संवाद कसा साधायचा याची काहीच कल्पना नसते, असली तरी असे धाडस (हो, धाडसच) समाजाच्या भीतीने करण्याची शक्यता खूप कमी आहे.
मग संवाद साधायचा कसा? एकच मार्ग त्यातल्यात्यात मुलांना बरा वाटतो तो हा, स्टॉकिंग. लपूनछपूण पाठलाग करायचा, एखादा सिग्नल मिळायची वाट बघायची, सूत जमलं तर जमलं, नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. बऱ्याचदा मुलांना दुसऱ्या व्यक्तीला यामुळे किती त्रास होत असेल हे त्यांच्या गावीही नसते.
हा सगळा मामला समाजाच्या संस्कृती आणि शील, अशा तद्दन फालतू गोष्टींमुळे प्रमाणाबाहेर चिघळलाय.
शहरी भागात तरी त्यामानाने बरी परिस्थिती म्हणावी लागेल, पण तुलनेने ग्रामीण भागात या गोष्टी जैसे थे आहेत. Sad चित्रपटात जे स्टॉकिंग दाखवतात , तो फक्त एक आरसा आहे, मूळ कारण नाही. चित्रपटातून या गोष्टी जरी कापून काढल्या, तरी स्टॉकिंग व्हायचे मुळीच थांबणार नाही. जोपर्यंत आपल्याकडे मुलामुलीत पुरेसा मोकळेपणा येत नाही, तोपर्यंत कितीही सेन्सॉरशिप लादा, काहीही परिणाम होणार नाही.>>>>>>>
१०००+

संस्कृती आणि शील ह्यांच्या विशाल अर्थांचे आकुंचन होत होत आता "स्त्र्यियांचे लैंगिक वर्तन नियंत्रित ठेवणे" एवढाच उरलाय आता.

क्रीपी स्टॉकींग>>>यावर एव्हढा आक्षेप!!! त्या बाहुबलीचे तर किती कौतुक झाले :-|
बाहुबली भाग १ मध्ये तो बाहुबली नायिकेला म्हणतो तुम एक लडकी हो, मै एक लडका, मै तुम्हे प्यार करने आया हू.......त्यानंतर जी काही फलतुगिरी दाखविली आहे.... मला कळेना कि हे का बरे चालते पब्लिकला Uhoh

सोनाली, सीन किंवा सिनेमाचा इथे उल्लेख आला नाही म्हणून चालतं किंवा मान्य आहे असा अर्थ काढू नका. आक्षेप सिनेमातल्या एखाद्या सीनबद्दल असु शकतो, पण ह्याचा अर्थ संपूर्ण सिनेमाचाच निषेध करावा असे नाही आणि नसावे. सिनेमाचे अपयश किंवा छप्परपाड यश सुद्धा आक्षेप असण्याची किंवा नसण्याची फुट्पट्टी नाही.

मी अंजाम, डर बद्दल म्हणालो कारण त्यातल्या प्रोटॅगनिस्टला बहाल करण्यात आलेले देवपण आणि त्याचा फॉलोअर्सवरचा अ‍ॅडवर्स ईफेक्ट. फार जवळून बघितले आहेत डर, बाजीगरच्या फॅन्सचे उपद्व्याप.

हिरो प्रेम, कोर्टशिपच्या नावाखाली हिरोईनला स्टॉक करतो तसेच मॉलेस्ट कॅटेगरीतले चाळे वगैरे जे काही चित्रपटात दाखवतात त्याला सेन्सॉरनेच कात्री लावावी असा प्रेक्षकांनीच आग्रह धरावा. एरवी ही आपली संस्कृती नाही असे म्हणत ऊठसूठ स्वयंघोषित संस्कृतीरक्षक त्रास देतात ते चालते आणि हे असे वर्तन सातत्याने सिनेमात दाखवणे कुठल्या भारतीय संस्कृतीचे समर्थन असते? शेवटी आर्थिक दृष्ट्या तोट्याचे आहे असे झाल्याशिवाय हे असे चित्रण थांबणार नाही!

बरोबर स्वाती. संस्कृती वगैरे अ‍ॅबस्ट्रॅक्ट गोष्टी झाल्या, ईथे अनेक उच्चशिक्षित माणसे एकत्र येवून एका बेकायदेशीर गोष्टीचे उदात्तीकरण करून, पब्लिक ईमोशन्स एक्स्प्लॉईट करून वाहवा आणि आर्थिक फायदा मिळवत आहेत, हे मला फार डिस्टर्बिंग वाट्ते आहे.
हे क्लास अ‍ॅक्शन सूट करून कोर्टातूनच बंद करता येवू शकते. पब्लिक कडून अपेक्षा नाहीत.

एकंदरितच भारतात कमरशियल सिनेमा बनवताना आपण काय ते एक प्रकारचा पाचपोच (?) नसणे म्हणतो त्यातला प्रकार वाटतो मला. आता हे बावळटासारखं सिनेमाच्या मूळ विषयाला अनुसरुन नसलेलं किंवा आजिबात गरज नसलेलं आणि पार हॅरॅसिंग म्हणता येइल ह्या दर्जेच कोर्टींग दाखवायची काय गरज असा प्रश्न त्या डायरेक्टर ला का पडला नसावा?
नुसतं कोर्ट्शिपच्या सीन मध्येच नाही पण इतर बर्याच साध्या संवांदांमध्ये, सिचुएशन्स मध्ये इतकं अनैसर्गिक असं चित्रिकरण दाखवतात की त्या डायरेक्टर, स्क्रिप्टरायटर वगैरे नेमका काय विचार करतात असा प्रश्न पडतो.

चिनूक्स चांगला लेख आहे. अगदी बरोबर म्हणतो आहे तो लेख. जर एखादा पिक्चर लोकांना संदेश देण्याकरता निर्माण केला जात असेल ( उदा: टॉयलेट एक प्रेम कथा - घरात टॉयलेट बांधा) तर त्या चित्रपटातून बरोबर संदेश जातो आहे हे दाखवणे आवश्यक आहे असेच मला वाटते.

{परत म्हणतो, की ही थिन लाईन आहे, हे चूक ते बरोबर आणि म्हणून यावर पिक्चर काढा आणि हे दाखवा ते दाखवू नका हा स्लिपरी स्लोप आहे. कुठल्याही बंधनाला माझा विरोध असेल. कारण आज कोणी सेन व्यक्तीने रूल केले तरी सिस्टीमच्या विरुद्ध किंवा सिस्टीममध्ये पुलिसिंग करता येते त्याचा एकदा का पायंडा पडला की पाताळ इज लिमिट.}
+१
एकदम चपखल शब्दात माझेच विचार व्यक्त केले आहेत असं वाटलं

छोटीसी बात मधला सशाचं काळीज असणारा पण तरीही स्टॉकिंग करणारा अमोल पालेकर आणि नंतर त्याच्यावर भाळलेली विद्या अशा साच्यातल्या ३ खर्‍या प्रेमकथा जवळुन माहीत आहेत. मुलीने दम दिल्यामुळे तिचा नाद सोडलेल्या तर अगणित कथा माहीत आहेत.

स्टॉकिंग (हा शब्द तेव्हा माहीत नव्हता) करा पण मुलगी नाही म्हणाली तर तिचा नाद सोडा असा आमचा फंडा होता तेव्हा. शेवटी मुलीची कन्सेंट महत्वाची हे कोणी न शिकवताच आम्ही शिकलेलो.

रच्याकने मी एका मुलीच्या मागे होतो, आज ती माझी बायको आहे.

Pages