सेन्सॉर बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 June, 2017 - 16:54

सेन्सॉर बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे का?

ही बातमी वाचा, तुम्हीही हेच बोलाल.

थोडक्यात अशी,
गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज अली दिग्दर्शित जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाचे प्रोमो प्रदर्शित करण्यात येत आहेत. त्यामधील एका प्रोमोमध्ये असलेल्या ‘इंटरकोर्स’ या शब्दावरून वाद उद्भवला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी हा शब्द चित्रपटातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, एका अटीवर ते ‘इंटरकोर्स’ शब्द चित्रपटात तसाच ठेवण्यास तयार आहेत. सामान्य जनतेने पाठिंबा म्हणून ‘इंटरकोर्स’ शब्दासाठी मतदान केल्यास आणि त्यातून किमान एक लाख मतं जरी मिळाली तरी ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रोमो आणि चित्रपटातील हा शब्द वगळला जाणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

><>>>>>>>>>>>

सविस्तर ईथे वाचा,
http://www.loksatta.com/manoranjan-news/will-keep-word-intercourse-in-ja...

>>>>>>>>>>>>>>>

जेव्हा चित्रपट वा तत्सम माध्यमातून समाजात अश्लील अश्लाघ्य विचार पसरण्याची भिती असते तेव्हा मी स्वत: याबाबतीत कडक धोरणांचा आहे हे या आधी माझ्या एआयबी रोस्ट विरोधात निघालेल्या धाग्यांनी तुम्हाला माहीत असेलच.

तसेच एक धागा मी क्या कूल है हम आणि ग्रांडमस्ती सारख्या तद्दन टाकाऊ चित्रपटांच्या विरोधातही काढला होता.

पण हे मात्र अत्यंत हास्यास्पद आहे, नव्हे सेन्सॉर बोर्डाने ईथे स्वत:चीच खिल्ली उडवून घेतली आहे.
शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण हवे असे एकीकडे आपण म्हणतो आणि दुसरीकडे हा असा विचार केला जातो?

मी ऋन्मेष एक शाखाप्रेमी म्हणून नाही, एक संघप्रेमी म्हणून नाही, तर एक चित्रपटप्रेमी म्हणून जब हॅरी मेट सेजलला आणि ईम्तियाज अलीला समर्थन देतो.
आणि ईतर चित्रपटप्रेमी आणि सुजाण नागरीकांकडून हिच अपेक्षा ठेवतो.

बातमीत म्हटल्याप्रमाणे, भारत बदलला आहे का ते सेन्सॉर बोर्डाला बघायचं आहे. आपल्या १२ वर्षांच्या मुलाला इंटरकोर्स या शब्दाचा अर्थ कळावा असं भारतातील कुटुंबांना वाटतं का ते सेन्सॉर बोर्डाला बघायचं आहे.
या धाग्यावर आपली मते येऊद्यात या ईंटरकोर्स बद्दल ...
भारत बदलला आहे की नाही हा फैसला आपण ईथेच करूया !

- धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

18 वर्षांची मुलगी आणि 21 वर्षांचा मुलगा (दोघंही एकमेकांशी विवाहबद्ध असलेले) अशा दोघांनी मिळून एकच मत दिलं तर चालेल का ऋ?

हा काय आधार कार्ड मागणार आहे का वोट करताना वय बघायला...
मूर्ख आहेत सेन्सर वाले... Befikre मध्ये ४० किस ठेवले.. कापले नाहीत...
तमाशा मधला १ किस कापला...

मागे त्याचा फोटो असलेली फिल्म फेअर मासिके त्या शाखाने स्वतःच लाखाने विकत घेवून त्यांचा खप वाढवला होता, तसे माणसं विकत घेवून वोटिंग करवले असेल..
>>>>>
शक्य आहे!
हि इझ द मोस्ट पॉवरफुल एण्ड रिचेस्ट सेलिब्रेटी!
अमेरीकेची माणसे विकत घेऊ शकतो ज्यांची किंमत डॉलरमध्ये आहे, तर भारतातील रुपयाण्त स्वस्त पडत असतील.

हि इझ द मोस्ट पॉवरफुल एण्ड रिचेस्ट सेलिब्रेटी!
अमेरीकेची माणसे विकत घेऊ शकतो ज्यांची किंमत डॉलरमध्ये आहे, तर भारतातील रुपयाण्त स्वस्त पडत असतील.>>>>>>>>>>
मग भारतातील रुपायांमध्येच तिकिटे विकत घेऊन फॅन आणि रईस का हिट करवले नाहीत?
मलाही अमेरिकेच्या माणसांची प्राईज डॉलर मध्ये आणि भारतीयांची रुपयांमध्ये जाणून घ्यावयाची आहे.
रुन्मेष फॅन असणं ठीक आहे. त्याची तू कितीही आरती गा. तू त्याला फुकट विकला जाशील. आम्ही पगार रुपयातच कमवतो. पण रुपयांत कमावणारे माणसं विकले जाण्याइतपत नाही स्वस्त. आणि इथे डॉलरमध्ये कमावणारे बरेच जण आहेत, तेही नसतील विकले गेले. इथे प्रत्येकाला डीग्निटी आहे. तेव्हा मुद्दाम धागा चालविण्याठी काहीही पिंका मारत जाऊ नकोस.
अजून एक. तुझ्या पाकिस्तान जितेगा या धाग्यावर मी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. कारण तू पाकिस्तान टीमला सपोर्ट करतोय, पाकला नाही असं मी समजून घेतलं होतं. पण हे अति होतंय. तुझा रीचेस्ट आणि पावरफुल सेलेब्रिटी भारतातल्या रुपयांवरच जगतो, हे लक्षात घे.
आणि २०१६ च्या लिस्टमध्ये तो रीचेस्ट राहिलेला नाही.
http://www.forbesindia.com/lists/2016-celebrity-100/1587/1
वन ऑफ द रीचेस्ट आहे मात्र.
आणि रईस आणि फॅननंतर तो पावरफुलही राहिलेला नाही. त्याच्याच चेन्नई एक्स्प्रेस ने 227 कोटींचा धंदा केला होता आणि रईस 126 कोटींवर येऊन थांबलाय. (नेट इंडियन कलेक्शन)
बहुतेक रुपयांवाल्याना विकत घ्यायची ताकद नाही राहिली वाटतं!!!

पण रुपयांत कमावणारे माणसं विकले जाण्याइतपत नाही स्वस्त. आणि इथे डॉलरमध्ये कमावणारे बरेच जण आहेत, तेही नसतील विकले गेले. इथे प्रत्येकाला डीग्निटी आहे.

>>>>>>

एक्झॅक्टली.
हेच माझेही मत आहे.
तुम्हाला खरेच असे वाटते का की शाहरूख माणसं विकत घेऊन स्वताची इमेज बनवतो असा एक शाहरूख फॅन म्हणून मी त्यावरच आरोप करेन Happy
मी ते उपरोधाने लिहिले होते हे स्पष्ट आहे. शाहरूखवर लोकांचे प्रेम आहे. लाख काय करोड मते हा हा म्हणते जमतील जर तसाच मोठा ईश्यू असता.
आणि सचिन, शाहरूख वगैरे यांची किंमत ते पैश्यांत किती श्रीमण्त आहेत यावरून ठरवावे ईतकी छोटी सोच नाहीये माझी. हा त्यांचा अपमान आहे. मी शाहरूखचा अपमान कसा करेन Happy

असं असेल तर चांगलच आहे!
चला मी चाललो तेलगू चित्रपटाकडे!
रुन्मेष काही नवीन लिंक दिल्या आहेत! Wink

जर कोणाला ठाऊक नसेल हे कोणत्या चित्रपटाबद्दल चालू आहे तर हे ईथे बघा

https://www.youtube.com/watch?v=U5Gyw-nGf1I

मै बनी तेरी राधा ... अशी शब्द रचना असलेले गाणे ज्यात आहे त्या चित्रपटात थिल्लरपणा कसा असू शकतो.. खरेच सेन्सॉर बोर्डाचे डोके ठिकाणावर नाही Happy

फारच क्वचित असा प्रसंग येतो की ऋन्मेषच्या विधानाशी सहमत व्हावे लागते. आता हे विधान -

{{{ तसेच माझ्यासाठी ईण्टरकोर्स ही सुद्धा नॉर्मल गोष्ट आहे. त्यामुळे तो शब्दही काही असभ्य अश्लील अश्लाघ्य पद्धतीने वा तसा हेतू मनात ठेऊन उच्चारला नसेल तर त्यात काही वावगे नाहीत. }}}

राजकीय पक्षांच्या एकमेकांवरील टीकेकरिता तोंडसुख हा नेहमी वापरला जाणारा शब्द - जसा की http://www.loksatta.com/maharashtra-news/shiv-sena-slams-bjp-over-gst-bm... आज या बातमीत देखील वापरला गेलाय. तसा निरुपद्रवी वाटणारा हा शब्द देखील थोड्या वेगळ्या अँगलने विचार केला तर नक्कीच अश्लील वाटु शकतो.

अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी या सरांच्या प्रॉडक्शन हाऊस मार्फत सरांचा हा त्रागा सॉरी धागा वाचनात आला. सरांची कडक मते वाचून धन्य झालो. सर शाखाप्रेमी म्हणून नाही, संघप्रेमी म्हणून नाही तर एक चित्रपटप्रेमी म्हणून मत मांडत आहेत.

Pages