सेन्सॉर बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 June, 2017 - 16:54

सेन्सॉर बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे का?

ही बातमी वाचा, तुम्हीही हेच बोलाल.

थोडक्यात अशी,
गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज अली दिग्दर्शित जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाचे प्रोमो प्रदर्शित करण्यात येत आहेत. त्यामधील एका प्रोमोमध्ये असलेल्या ‘इंटरकोर्स’ या शब्दावरून वाद उद्भवला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी हा शब्द चित्रपटातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, एका अटीवर ते ‘इंटरकोर्स’ शब्द चित्रपटात तसाच ठेवण्यास तयार आहेत. सामान्य जनतेने पाठिंबा म्हणून ‘इंटरकोर्स’ शब्दासाठी मतदान केल्यास आणि त्यातून किमान एक लाख मतं जरी मिळाली तरी ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रोमो आणि चित्रपटातील हा शब्द वगळला जाणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

><>>>>>>>>>>>

सविस्तर ईथे वाचा,
http://www.loksatta.com/manoranjan-news/will-keep-word-intercourse-in-ja...

>>>>>>>>>>>>>>>

जेव्हा चित्रपट वा तत्सम माध्यमातून समाजात अश्लील अश्लाघ्य विचार पसरण्याची भिती असते तेव्हा मी स्वत: याबाबतीत कडक धोरणांचा आहे हे या आधी माझ्या एआयबी रोस्ट विरोधात निघालेल्या धाग्यांनी तुम्हाला माहीत असेलच.

तसेच एक धागा मी क्या कूल है हम आणि ग्रांडमस्ती सारख्या तद्दन टाकाऊ चित्रपटांच्या विरोधातही काढला होता.

पण हे मात्र अत्यंत हास्यास्पद आहे, नव्हे सेन्सॉर बोर्डाने ईथे स्वत:चीच खिल्ली उडवून घेतली आहे.
शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण हवे असे एकीकडे आपण म्हणतो आणि दुसरीकडे हा असा विचार केला जातो?

मी ऋन्मेष एक शाखाप्रेमी म्हणून नाही, एक संघप्रेमी म्हणून नाही, तर एक चित्रपटप्रेमी म्हणून जब हॅरी मेट सेजलला आणि ईम्तियाज अलीला समर्थन देतो.
आणि ईतर चित्रपटप्रेमी आणि सुजाण नागरीकांकडून हिच अपेक्षा ठेवतो.

बातमीत म्हटल्याप्रमाणे, भारत बदलला आहे का ते सेन्सॉर बोर्डाला बघायचं आहे. आपल्या १२ वर्षांच्या मुलाला इंटरकोर्स या शब्दाचा अर्थ कळावा असं भारतातील कुटुंबांना वाटतं का ते सेन्सॉर बोर्डाला बघायचं आहे.
या धाग्यावर आपली मते येऊद्यात या ईंटरकोर्स बद्दल ...
भारत बदलला आहे की नाही हा फैसला आपण ईथेच करूया !

- धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष,
अर्धवट माहिती दिलीस बघ,
उरलेली माहिती जास्त मनोरंजक आहे,
,
" या 1 लाख मता मध्ये अविवाहित किंवा तरुण लोकांची मते चालणार नाहीत, 12 वर्षाचे मूल असणाऱ्या व्यक्ती , म्हणजे किमान 36 वय असलेल्या व्यक्ती चे मत मे ग्राह्य धरेन असे ते पुढे म्हणाले"

http://amp.indiatimes.com/entertainment/bollywood/pahlaj-nihalani-will-c...

Importantly, I will not settle for votes from unmarried people. And neither will I be satisfied if votes come from people who are less than 36-years old. Assuming that an average age when a man/woman gets married is 23, I think they would have a 12-year old child when they are 36. Hence I want the voting public to be at least 36-years-old

आणि हे "अंदाज " सारखा मुवि बनवणारा माणूस बोलत आहे

करेक्शन : सेन्सॉर बोर्डाला डोके आहे काय?

एन्डीटीव्ही या अँटिनॅशनल न्यूज चॅनेलवर आदर्णीय पहलाज निहलानी चर्चेसाठी आले होते. एन्डीटीव्हीच्या अँकरला ते म्हणाले - जो शब्द मी वापरत नाहीए आणि जो शब्द तू पुन्हा पुन्हा वापरतो आहेस......

कोणता शब्द हे कळून घेण्यासाठी इच्छुकांनी पहलाज निहलानी निर्मित , अनिल कपूर, जूही चावला, करिस्मा कपूर अभिनीत, संस्कारांनी ओतप्रोत भरलेला 'अंदाज' नावाचा चित्रपट, किमान त्यातली गाणी जरूर पाहावीत.

जिथे से. बोर्डाने साला शब्दावर आक्षेप घेतला होता तिथे इंटरकोर्स शब्द म्हणजे जरा बरंच रीझन आहे पब्लिसिटीचं.
इंटरकोर्स शब्दाला हरकत असेल दाखवण्याला नसेल कदाचित.

हो तोच ओ. अनिल कपूर टीचर, करीस्मा स्टुडेन्ट, जुही अनिल कपूरची बायको असते वैगेरे. पण त्यात विशेष काही किंवा आक्षेपार्ह काही होतं असं आता मला आजिबात आठवत नाहीये.
त्यात इंटरच्या परीक्षा वैगेरे दिलेल्या काय शाळेत?

अंदाज तोच ना.. लैईला बिचारी क्या करती नजरीया मजनूसे लढ गई. पढने को आई थी और सबक कुछ और ही पढ गई.. अंधुक आठवतोय. त्यात एक शक्ती कपूर सोडला तर आक्षेपार्ह काय होते? कोणी आठवण करून देईल का? ईथे लिहूही शकत नाही असे काही होते का? असल्यास मला विपू करा, मग बघतो बरोबर त्या पहलाजला..

पण त्यात विशेष काही किंवा आक्षेपार्ह काही हो>> तो एका तेलुगु सिनेमाचा रीमेक होता व पूर्ण सिनेमाच व्हल्गर होता. घरी टीव्हीवर बघणेही अवघड होते.द्व्यर्थी संवाद, अ‍ॅक्क्षन्स इत्यादि. नवीन लग्न झालेला नायक स्कूल टीचर त्याच्या प्रेमात पडलेली शाळकरी मुलगी अनभिज्ञ बायको आणि इतर आचरट पणा होता. हा संदर्भ आहे.
उडता पंजाब मधील कटस बद्दलही भरपूर विरोध झाला होता परंतू तो सिनेमा मी नेटफ्लिक्स वर बघायचा प्रयत्न केला इतकी शिवराळ व घाणेर डी भाषा आहे की साठ सत्तर कटस नी काही फरक पडला नसेल. अर्थात प्रत्यक्ष चित्रण आहे. पण मला ते ऐकवले नाही इतकेच.
हा नवा सिनेमा येतो आहे त्याच्या प्रसिद्धी साठी ह्या विधानांचा उपयोग होईल. चिल पीपल.

रच्याकने "इंटरकोर्स" या शब्दाचा अर्थ काय आहे ? 
Submitted by भूशन on 28 June, 2017 - 10:50
>>>>

समागम
चुकत असेल तर कोणीतरी करेक्ट करा.

आज मी माझ्या अकरा वर्षाच्या चुलत भाच्यासमोर हा शब्द उच्चारून बघतो. कदाचित तो माझ्या ज्ञानात भर टाकेन.

हा नवा सिनेमा येतो आहे त्याच्या प्रसिद्धी साठी ह्या विधानांचा उपयोग होईल.
>>>>
शाहरूखच्या चित्रपटाला कुठल्याही निगेटीव्ह पब्लिसिटीची गरज असेल असे मला वाटत नाही. तो स्वत:च एक ब्रांड एक आयकॉन आहे. Happy

या 1 लाख मता मध्ये अविवाहित किंवा तरुण लोकांची मते चालणार नाहीत, 12 वर्षाचे मूल असणाऱ्या व्यक्ती , म्हणजे किमान 36 वय 
>>>>>>>

मूल असण्यासाठी विवाहीत असणे गरजेचे नाही तर ईंटरकोर्स होणे पुरेसे असते हेच ज्या सेन्सॉर बोर्डाला माहीत नाही त्याकडून काय अपेक्षा करायची Happy

शाहरूखच्या चित्रपटाला कुठल्याही निगतव्ह पब्लिसिटीची गरज असेल असे मला वाटत नाही.>> माय नेम इज खान च्या रिलीजच्या आधी अमेरिकेत डिटेन केल्याच्या घटनेची प्रसिद्धी करवून घेतलेली आहे. ह्या आय कॉन ला ज्या इनकम टॅक्स व इ डि कडून नोटिसा सर्व्ह केल्या जातात त्याच्याही बातम्या वाचायला मिळतात. वयस्कर हिरो आनी विचित्र हिरोइन काही का करेना धाग्यावर प्रतिसाद वाढल्याशी कारण.

>>>>>परंतू तो सिनेमा मी नेटफ्लिक्स वर बघायचा प्रयत्न केला इतकी शिवराळ व घाणेरडी भाषा आहे की साठ सत्तर कटस>>>
अमा, काँट्रॅव्हर्सी झाली ते कट्स शिवराळ भाषेसाठी नव्हते सुचवले,
जिथे "सरकारचे धोरण"/ सरकार संबंधित उल्लेख होता तिकडे कट्स सुचवले होते
करण तिकडे खूप कास्ट काळ bjp चे सरकार होते.
आणि येऊ घातलेल्या निवडणुकीत त्याचा फटका bjp ला बसला असता, म्हणून सेन्सॉर बोर्ड सरकारची बटीक बनून ते उल्लेख काढून टाकायला पाहत होती.

सस्मित
>>>>ओ. अनिल कपूर टीचर, करीस्मा स्टुडेन्ट, जुही अनिल कपूरची बायको असते वैगेरे. पण त्यात विशेष काही किंवा आक्षेपार्ह काही होतं असं आता मला आजिबात आठवत नाहीये.>>>>
यु ट्यूब वर अंदाज song म्हनून शोधून पहा,
3-4 गाणी येतील, पिक्चर पाहताना कदाचित तुम्ही फार लहान असाल , बहुदा त्यातले डबल मिनींग आता तुमच्या लक्षात येईल

सेन्सॉर बोर्ड सरकारची बटीक बनून >> ह्या बद्दल सहमत. जिथे जिथे फ्री थिंकिंग चा उगम होउ शकतो तिथे तिथे वरून वैचारिक ढापण लावायचे काम चालू आहे. आणि त्याला दांभिक जर आहे.

पिक्चर पाहताना कदाचित तुम्ही फार लहान असाल , बहुदा त्यातले डबल मिनींग आता तुमच्या लक्षात येईल> Lol बघते
मला फक्त
लैला बेचारी क्या करती के आखे मजनुसे लड गयी
पढनेको आइ कुछ और सबक कुछ और ही पढ गयी

हेच गाणं आठवतंय.

पाहिली अंदाजची गाणी.
आता एकदा डब्बल मिनिंग आहे हे डोक्यात आल्याने सगळंच डबल मिनिंग वाटु लागलं मला. अगदी ज्यात डबल मिनिंग नसेल तेही. Lol
पण आहेत खरी आचरट गाणी.
त्यातलं कुकु कुकु मला माहित होतं पण आठवत नव्हतं. त्यातला करीशमाचा ब्लॅक आणि वर चौकडी वाला पोषाख आचरट आहे. Lol

सिम्बा यु वर राईट. जेव्हा पाहिला होता, झी सिनेम्याच्या कृपेने, तेव्हा हे लक्षात येणं शक्य नव्हतं. Happy

त्यात इंटरच्या परीक्षा वैगेरे दिलेल्या काय शाळेत?
लै भारी इनोद! अर्थातच तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहित असेलच - विनोद म्हणूनच असे लिहीले हे कळते आहे.

<<<इंटरकोर्स म्हणजे काय?????? रच्याकने "इंटरकोर्स" या शब्दाचा अर्थ काय आहे ?>>>

गंमतच आहे त्याची पण - माझ्या माहितीप्रमाणे या शब्दाचा सध्याचा प्रचलित अर्थ, मूल होण्यासाठी स्त्री-पुरुष आपआपसात जी क्रिया करतात ती क्रिया असा आहे. (म्हणजे नुसते लग्न करणे नव्हे!)
पण पूर्वी या शब्दाचा अर्थ केवळ परस्पर संबंध, म्हणजे बोलणे, व्यवहार करणे असा होता.
माझी वहिनी १९६२ मधे अमेरिकेत आली, अमेरिकेत हा शब्द पूर्वीपासून सध्या प्रचलित असलेल्या अर्थाने वापरत. जेंव्हा मा़झी वहिनी दोन तीन वर्षांनी भारतात भेटीसाठी आली, तेंव्हा काही लोकांनी तिला विचारले, काहो तुम्ही अमेरिकेत रहाता तर तिथल्या इतर, गोर्‍या लोकांशी, शेजारी लोकांशी तुमचा इंटरकोर्स होतो का?
माझी वहिनी मनातल्या मनात शंभर फूट उडाली. हा कसला भलताच वैयक्तिक प्रश्न! (तेंव्हाहि मराठीत बोलताना उग्गाच इंग्रजी शब्द वापरून आपले प्रचंड (अ)ज्ञान दाखवण्याची भारतात पद्धत होती) . मग एक दोन मिनिटाने सावरून तिने शांतपणे उत्तर दिले " होत असले तरी उघडपणे याबद्दल कुणि बोलत नाहीत. " . नि तिने विषय बदलला.

चित्रपट "हम आप के है कौन"
पाकात बुडवलेला साखरेत घोळवलेला असल्याने कोणाच्याच लक्षात आला नाही हा सिन.
लक्ष्या "भाऊजी (का असलंच काहीतरी) जवाहर J लिखूं या G से"
सलमान " z से लिख"
त्यावर उच्चार करण्यासाठी लक्ष्याने केलेली वेडीविद्री तोंडं.
असे अनेक सोवळे चित्रपट सापडतील

अंदाज हा अं पासून ज पर्यंत अश्लिल होता. दादा कोंडकेने स्क्रीप्ट लिहील अस वाटव .
"मी मालगाडी तू धक्का लगा" या गाण्यातून काय सांगायच असेल.

तात्पर्य : शाहरूखला हिटची सक्त गरज आहे आणि त्यासाठी हे चाललाय.
त्यातल गाण पाहून मला NTR बरोबर नाचणारी श्रीदेवी आठवली.

मुम्बैच्या कालिजातली कोणतरी प्रोफेसर बाई आहे,दायमा का काहितरी.तिने एक पिटीशन टाकून टेलेव्हीजनवरचं सॉफ्ट पोर्न बंद केलं होतं.तेव्हापासुन विंग्रजी पिक्चर आळणी वाटायला लागले.मी बंद केलं बघणं.
आजकाल इंटरनेटवरचं सहज उपल्ब्ध होणारं हार्ड पोर्नविषयी या बाईचं काय म्हणनं आहे हे जणून घ्यायला आवडेल.
India has crossed the point of no return.

India has crossed the point of no return.
>>>>
भारताबद्दल कधीच काही जनरलायझेशन होऊ शकत नाही. विविधतेने आणि विषमतेने नटलेला ईत्रतित्र पसरलेला मोठा देश आहे हा. येथील समाज कित्येक स्तरात विभागला गेला आहे.

ईटरनेटमुळे सहज उपलब्ध होणारे पॉर्न जरी आता जिओमुळे मोबाईलवर चुटकीसरशी उपलब्ध झाले असले तरी चित्रपट हे वेगळे माध्यम आहे. तिथे यश चोप्रासारखे दिग्दर्शक शाहरूखसारख्या कलाकारांना सोबत घेऊन आपली संस्कृती टिकवून आहेत. करन जोहार वाह्यातपणा करतो मात्र शाहरूख त्याचा जिगरी दोस्त असूनहे त्या सोबत कधी वाहावत गेला नाहीये हे विशेष. त्यामुळे ज्या शाहरूखचा चित्रपट आम्ही बिनधास्त फॅमिलीसोबत बघतो त्यात काही वल्गर असू शकेल ही कल्पनाच मला स ह न हो त ना ही.

त्यामुळे ज्या शाहरूखचा चित्रपट आम्ही बिनधास्त फॅमिलीसोबत बघतो त्यात काही वल्गर असू शकेल ही कल्पनाच मला स ह न हो त ना ही. >> शाहरूखच्या 'माया मेमसाब' बद्दल आपली बहुमोल मते नक्की ईथे लिहा... वाट बघत आहे.

{शाहरूखला हिटची सक्त गरज आहे आणि त्यासाठी हे चाललाय.}
सेन्सॉर बोर्डाचा प्रमुख शाहरुखच्या चित्रपटाचंं मार्केटिंग करतोय?

सेन्सॉर बोर्डाचा प्रमुख शाहरुखच्या चित्रपटाचंं मार्केटिंग करतोय?
>>>>>>>
शक्य आहे Happy
वर अमा यांची पोस्ट वाचा,

माय नेम इज खान च्या रिलीजच्या आधी अमेरिकेत डिटेन केल्याच्या घटनेची प्रसिद्धी करवून घेतलेली आहे.

म्हणजे अमेरीकन सरकार आणि अमेरीका सुरक्षाव्यवस्था सुद्धा शाहरूखच्या चित्रपटांच्या मार्केटींगला मदत करते असे म्हणावयास वाव आहे, तर तिथे आपले सेन्सॉर बोर्ड त्यापेक्षा मोठे आहे का?

जगातील पॉवरफुल नेता कोण, याच्या उत्तरात मोदी की ट्रंप याबाबत वाद होईल,
मात्र जगातील पॉवरफुल हिरो कोण याबाबत निर्विवादपणे एकच नाव येईल .......... जर वरील लॉजिक खरे मानले तर हा Happy

Pages