सेन्सॉर बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 June, 2017 - 16:54

सेन्सॉर बोर्डाचे डोके ठिकाणावर आहे का?

ही बातमी वाचा, तुम्हीही हेच बोलाल.

थोडक्यात अशी,
गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज अली दिग्दर्शित जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाचे प्रोमो प्रदर्शित करण्यात येत आहेत. त्यामधील एका प्रोमोमध्ये असलेल्या ‘इंटरकोर्स’ या शब्दावरून वाद उद्भवला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी हा शब्द चित्रपटातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, एका अटीवर ते ‘इंटरकोर्स’ शब्द चित्रपटात तसाच ठेवण्यास तयार आहेत. सामान्य जनतेने पाठिंबा म्हणून ‘इंटरकोर्स’ शब्दासाठी मतदान केल्यास आणि त्यातून किमान एक लाख मतं जरी मिळाली तरी ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रोमो आणि चित्रपटातील हा शब्द वगळला जाणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

><>>>>>>>>>>>

सविस्तर ईथे वाचा,
http://www.loksatta.com/manoranjan-news/will-keep-word-intercourse-in-ja...

>>>>>>>>>>>>>>>

जेव्हा चित्रपट वा तत्सम माध्यमातून समाजात अश्लील अश्लाघ्य विचार पसरण्याची भिती असते तेव्हा मी स्वत: याबाबतीत कडक धोरणांचा आहे हे या आधी माझ्या एआयबी रोस्ट विरोधात निघालेल्या धाग्यांनी तुम्हाला माहीत असेलच.

तसेच एक धागा मी क्या कूल है हम आणि ग्रांडमस्ती सारख्या तद्दन टाकाऊ चित्रपटांच्या विरोधातही काढला होता.

पण हे मात्र अत्यंत हास्यास्पद आहे, नव्हे सेन्सॉर बोर्डाने ईथे स्वत:चीच खिल्ली उडवून घेतली आहे.
शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण हवे असे एकीकडे आपण म्हणतो आणि दुसरीकडे हा असा विचार केला जातो?

मी ऋन्मेष एक शाखाप्रेमी म्हणून नाही, एक संघप्रेमी म्हणून नाही, तर एक चित्रपटप्रेमी म्हणून जब हॅरी मेट सेजलला आणि ईम्तियाज अलीला समर्थन देतो.
आणि ईतर चित्रपटप्रेमी आणि सुजाण नागरीकांकडून हिच अपेक्षा ठेवतो.

बातमीत म्हटल्याप्रमाणे, भारत बदलला आहे का ते सेन्सॉर बोर्डाला बघायचं आहे. आपल्या १२ वर्षांच्या मुलाला इंटरकोर्स या शब्दाचा अर्थ कळावा असं भारतातील कुटुंबांना वाटतं का ते सेन्सॉर बोर्डाला बघायचं आहे.
या धाग्यावर आपली मते येऊद्यात या ईंटरकोर्स बद्दल ...
भारत बदलला आहे की नाही हा फैसला आपण ईथेच करूया !

- धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूखच्या 'माया मेमसाब' बद्दल आपली बहुमोल मते नक्की ईथे लिहा... वाट बघत आहे.

जाऊ द्या हो... तेंव्हा शाखा the शाखा नव्हता ... नवीन होता तो... का रुंम्याला शब्दात पकडताय

माया मेमसाब बघितला नाहीये.

एक तर तो माझ्या काळातला पिक्चर नाहीये. तसे शाखाचे जुने पिक्चरही पाहिले आहेत, पण त्यासाठी ते डीडीएलजे, डीटीपीएच, कभी हा कभी ना असे हवेत.. माया मेमसाब नक्की शाखाचा आहे की त्यात त्याचा छोटासा रोल आहे? माझ्या माहितीनुसार छोटासा रोल होता आणि शाखाच्या नेहमीच्या जातकुळीचा चित्रपट नव्हता म्हणूनही बघणे झाले नाही.

तरी काय विशेष आहे त्यात जाणून घ्यायला आवडेल Happy

बरेचदा होते काय, एखाद्या बोल्ड विषयावरचा चित्रपट आणि एखादा वल्गर थिल्लर चित्रपट यामध्ये फरक करण्यात बहुतेकांची चूक होते. त्यामुळे माया मेमसाब नक्की कोणत्या जातकुळीतला आहे हे जाणकारांकडून जाणून घ्यायला आवडेल. प्रकाश पाडा Happy

जाऊ द्या हो... तेंव्हा शाखा the शाखा नव्हता ... नवीन होता तो... का रुंम्याला शब्दात पकडताय>>>
ऊलट त्याच्यासारख्या शाखाच्या फॅन्सनी 'आमच्या हिरोने माया मेमसाब' मध्ये ईं*****र्स चा सीनच ईनॅक्ट केला आहे (विडिओचा पुरावा देऊन) त्याच्यावर कुणाचा आक्षेप नसतांना, आता नुसत्या ईं*****र्स शब्दाला कात्री का लावता' ? असे ठणकावून विचारले पाहिजे सेन्सॉर बोर्डाला.
वाटल्यास त्या विडिओच्या फ्री सीडी पब्लिकमध्ये वाटून अवेअरनेस वाढवला पाहिजे, वॉट्सअ‍ॅप वर विडिओ वायरल केला पाहिजे, शाळा कॉलेजात विडिओ दाखवून नवीन फॅन्स तयार केले पाहिजेत, पोस्टरं छापून सेन्सॉर बोर्डावर मोर्चा नेला पाहिजे, तेव्हा कुठे फॅन म्हणता येईल एखाद्याला शाहरूखचा.
नुसते मायबोलीवर जिथे तिथे त्याच्या नावाची बळजबरी ऊबळ आणण्याने थोडी कोणी फॅन होत असतो, तरी बरं शाहरूखनेच आयडीअल फॅन कसा असावा त्याचे ऊदाहरण घालून दिले आहे त्याच्या फॅन सिनेमाद्वारे.

Maaya memsaab is good art movie. Back in the days of video libraries i asked for this cassette and the parlour owner was embarrassed. He thought i was asking for something from his porn collection. Deepa Sahi is an older lady. Shahrukh a younger man. But it is more about her dreams. Directed by Deepas husband.

अमा, माहितीबद्दल धन्यवाद. कल्पना होतीच तो वेगळ्या धाटणीचा सिनेमा असावा. शाहरूखने असे सिनेमे करावेत असे मला कधीच वाटले नाहीत. भले त्यात त्याच्या अभिनयाला वाव मिळाला तरी. त्यासाठी ईतर आहेत. त्याने ते करावे ज्यात तो बेस्ट आहे आणि जे ईतर कोणाकडे नाही असेच वाटते. असो विषय शाहरूखवर नाही. सेन्सॉरवर आहेम् तरी माया मेमसाब वर अजूनही आक्षेप असणारयांनी तो नेमका का आणि कश्यावर हे सांगावे Happy

अजून एक म्हणजे शाहरूखच्या रईसमध्ये लैला आयटमसॉनगवर खुद्द सनी लिओन सुद्धा वल्गर न दिसता गोड दिसली आणि त्याच्या या कृतीचे सर्वच समीक्षकांनी अफाट कौतुकही केले.

एखाद्या बोल्ड विषयावरचा चित्रपट आणि एखादा वल्गर थिल्लर चित्रपट यामध्ये फरक करण्यात बहुतेकांची चूक होते. त्यामुळे माया मेमसाब नक्की कोणत्या जातकुळीतला आहे>>>> माया मेमसाब वल्गर थिल्लर चित्रपट नाहीये. मी ६-७ वर्षापुर्वी पाहिलाय. आवडला मला.

शाहरूखच्या 'माया मेमसाब' बद्दल आपली बहुमोल मते नक्की ईथे लिहा... वाट बघत आहे. >>> एकच आर्ट चित्रपट करणार्‍याबद्दल मत लिहा म्हणजे आपले त्या चित्रपटाच्या रोल वरुन त्या कलाकाराच्या संपुर्ण कारकिर्दीचा आढावा घेत असेल तर रिचा चढ्ढा, इम्रान हाश्मी, लिप्स्टीक अंडर माय बुरखा, लव सेक्स ऑर धोका , देव डी, साहब बीवी गुलाम (नवीन) इ. सारख्या चित्रपटात काम करणार्‍या कलाकारांबद्दल सुध्दा आपले मत काय असेल? वाट बघत आहे

Once upon a time in Mumbai 2 मध्ये हा शब्द होता.
>>>>>
मूळात हा खूप कॉमन शब्द आहे. साध्य सहज गप्पा मारतानाही च्यायला मायला बोलावे तसे कित्येकदा माझ्या तोंडात येतो.

मूळात हा खूप कॉमन शब्द आहे. साध्य सहज गप्पा मारतानाही च्यायला मायला बोलावे तसे कित्येकदा माझ्या तोंडात येतो.>>>> कोणता शब्द??

एकच आर्ट चित्रपट करणार्‍याबद्दल मत लिहा म्हणजे आपले त्या चित्रपटाच्या रोल वरुन त्या कलाकाराच्या संपुर्ण कारकिर्दीचा आढावा घेत असेल तर रिचा चढ्ढा, इम्रान हाश्मी, लिप्स्टीक अंडर माय बुरखा, लव सेक्स ऑर धोका , देव डी, साहब बीवी गुलाम (नवीन) इ. सारख्या चित्रपटात काम करणार्‍या कलाकारांबद्दल सुध्दा आपले मत काय असेल? वाट बघत आहे>>>> इम्रान हाश्मी आर्ट फिल्म मध्ये कधी गेला? Uhoh

बाकी ईतका बिन्डोक प्रश्ण सेन्सॉर बोर्डाला आधी कुणि विचारला नसावा... Happy
(असो. जाव पहेले ऊसका साईन लेके आव जिसने बाजीराव पिंगा के साथ पास किया... फिर मेरे भाई... )

कोणता शब्द??
>>>>
घ्या म्हणे कोण रामाची सीता.... अहो ईंटरकोर्स

'ईंटरकोर्स' शब्द साध्य सहज गप्पा मारतानाही च्यायला मायला बोलावे तसे कित्येकदा तुझ्या तोंडात येतो?? अश्या कोणत्या विषयावर गप्पा मार्तो भौ तु?? Lol

अहो सस्मित साधी साधी वाक्यं..
उदाहरणार्थ, ए जा रे बाबा, आधीच माझं डोकं तापलंय, तू आणि त्याचा ईंटरकोर्स करू नकोस.. किंवा जा ना. कश्याला सकाळी सकाळीच डोक्याचा ईण्टरकोर्स करतोयस..
किंवा तुझे वय काय, तू बोलतोस किती.. तसे तुझे वय काय आणि तुझी ईण्टरकोर्सची हौस किती.. वगैरे वगैरे.. फार साध्याश्या वापरातला नेहमीचा शब्द आहे हो.. उगाच आपल्या शाखामागे लागलेत.

अहो ऋन्मेष, ह्या साध्या वाक्यामधेही मी इंटरकोर्स हा शब्द ऐकला नाहीये कधी. उलट इंटरकोर्सच्या जागी भलते भलते लै शब्द ऐकले/ वापरले आहेत.
उदाहरणार्थ, ए जा रे बाबा, आधीच माझं डोकं तापलंय, तू आणि त्याचा ईंटरकोर्स डोक्याची आX बXX करू नकोस. वै. वै.

असो, तु वापरत असशील कदाचित.

उदाहरणार्थ, ए जा रे बाबा, आधीच माझं डोकं तापलंय, तू आणि त्याचा ईंटरकोर्स करू नकोस.. किंवा जा ना. कश्याला सकाळी सकाळीच डोक्याचा ईण्टरकोर्स करतोयस..
किंवा तुझे वय काय, तू बोलतोस किती.. तसे तुझे वय काय आणि तुझी ईण्टरकोर्सची हौस किती.. वगैरे वगैरे.. फार साध्याश्या वापरातला नेहमीचा शब्द आहे हो. >>> हे अस बोलता तुम्ही ??? भयान आहे Uhoh

मी तरी एवढंच बोलतो, ' ऐ डोकं नको खाऊ रे/गं'
>>>>>>>

एक्झॅक्टली, तुमच्यासाठी जसे खाब्बे ही नॉर्मल गोष्ट आहे तसेच माझ्यासाठी ईण्टरकोर्स ही सुद्धा नॉर्मल गोष्ट आहे. त्यामुळे तो शब्दही काही असभ्य अश्लील अश्लाघ्य पद्धतीने वा तसा हेतू मनात ठेऊन उच्चारला नसेल तर त्यात काही वावगे नाहीत. हे लोकं उगाच माझ्या शाहरूखच्या मागे लागलेत.. मायबोलीवर जे कोणी 36 वयाचे असतील त्यांनी जरा मदत करा.. ईथे आपले वय नाही सांगितले तरी चालेन.. पण शाहरूखसाठी वोट करा..

ऋ शाखा च्या acting साठी माझं vote कनफर्म!
after all त्याच्या acting नं (ddlj, kkhh, dtph, veerzara,mohobbaten and so on) प्रेम करायला शिकवलं... आणि मी cross ३० नाहीये... त्यामुळे शाखाच्या acting चा एक ठराविक वर्ग चं fan आहे असं काही नाहीये.. जो प्रेमात पडतो तो srk चा fan astoch.. कोणी हे कबूल करतं कोणी नाही..ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

जो प्रेमात पडतो तो srk चा fan astoch..
>>>>
येस्स! +786

क्रिकेटमध्ये सचिन तसे बॉलीवूडचा शाहरूख. काही पिढ्या यांच्यासोबत मोठ्या झाल्या तर काही मागाहून येत याण्च्या प्रेमात पडल्या. यावर एका पिढीची मक्तेदारी नाही.

मेघा, 36 किमान वय.. आणि विवाहीत असणे गरजेचे..

मागे त्याचा फोटो असलेली फिल्म फेअर मासिके त्या शाखाने स्वतःच लाखाने विकत घेवून त्यांचा खप वाढवला होता, तसे माणसं विकत घेवून वोटिंग करवले असेल, नाही तर ह्याच्या माकड चाळ्य्यांना वैतागलेल्या मागच्या तीन आणि पुढच्या कैक पिढीत त्याला कोण वोटिंग करणार?

किमान ३६??
वय ३५ वर्ष आणि १२ वर्षाचं मुल असेल तर वोटींग नाही करता येणार का?

Pages