बव्हेरियन ब्लू

Submitted by लालू on 10 March, 2009 - 00:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

१ कप कमी फॅटचे दूध
१/४ कप फॅट फ्री दुधाची पावडर (carnation चालेल)
१ पॅक फ्रोजन ब्लूबेरीज (१६ oz चे १ पॅक, रूम टेम्परेचरला आणून ठेवावे.)
१/२ कप साखर ( + १ चमचा साखर)
चिमूटभर मीठ
१ कप फॅट फ्री Sour क्रीम
१ पॅकेट unflavored gelatin
१/४ कप थंड पाणी
थोड्या ताज्या ब्लूबेरीज

क्रमवार पाककृती: 

दूध आणि दुधाची पावडर एकत्र करुन whisk ने नीट मिसळून ते मिश्रण अर्ध्या तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवावे.

पॅकेटमधल्या ब्लूबेरीज, साखर, मीठ एका भांड्यात घालून भांडे मध्यम ते मंद विस्तवावर ठेवावे. साखर विरघळून आणि मिश्रण आटून ब्लूबेरीज मॅश करता येऊ लागेपर्यंत गरम करावे. साधारण १५ ते २० मिनिटे लागतील. हे मिश्रण थंड होऊ द्यावे. मग त्यात अर्धा कप sour क्रीम मिसळावे.

१/४ कप पाणी थोडे कोमट करुन त्यात जिलेटीन विरघळून घ्यावे.

थंड झालेले दुधाचे मिश्रण फ्रीजरमधून काढून घुसळावे. electric mixer वापरला तर सोपे पडेल. साधारण केकच्या फ्रॉस्टिन्गसारखे दिसू लागले की १ चमचा साखर आणि जिलेटीन घालून घुसळावे. मग हे ब्लूबेरीच्या मिश्रणात ओतून हळूहळू एकत्र करावे.

नंतर हे मिश्रण बोल किंवा ग्लासमध्ये ओतून सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. साधारण २ तास लागतील. एकाच भांड्यात ओतून सेट केले तरी चालेल. वरुन प्लास्टिक wrap किंवा झाकण ठेवावे.

खायला देताना वरुन चमचाभर sour क्रीम आणि थोड्या ताज्या ब्लूबेरीज घालून द्यावे.

bb1.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात ५-६ बोल होतील.
अधिक टिपा: 

हाच पदार्थ स्ट्रॉबेरीज वगैरे बाकी berries वापरुनही करता येईल.

माहितीचा स्रोत: 
रिडर्स डायजेस्ट चे 'रेसिपीज फॉर हेल्दी हार्ट' पुस्तक.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नावावरुन मला जर्मन चीज चा प्रकार लिहिलास असे वाटले , वाचून आणि फोटो बघून कळले . मस्त आहे कॄती . सगळ्याच फ्रोझन बेरीज वापरून हे करता येईल ना ?

मस्त रंग, (अश्या रंगाचे पदार्थ खाण्यात जरा कमीच असतात .) चवही छान असणार.

लालू, बव्हेरियन मॅजेंटा नाव कसं वाटेल? Wink

छान वाटतेय रेसिपी.

पुस्तकात त्या रेसिपीचे नाव 'ब्लूबेरी बव्हेरियन' आहे. Happy मुलांना लायब्ररीतून तुम्हाला आवडतील ती रेसिपीजची कोणतीही पुस्तकं आणा म्हणून सांगितलं तर त्यांनी २ पुस्तकं आणलीत. हे एक (यात रॅटॅटुई ची पण रेसिपी आहे) आणि अजून एक स्लो कुकिंग चे आहे. मी आणते कधीतरी पण सहसा करण्यासारखे फार काही सापडत नाही पण या २ पुस्तकांत बर्‍याच आवडण्यासारख्या आणि वेगळ्या आहेत. प्रयोग करुन लिहिते आता इथे. Wink

या रेसिपीचा पुस्तकातला फोटोही छान आहे, ते बघूनच करायला लावली असं वाटतंय. याची चवही छान आहे, अतिगोड नाही. संपदा, कोणत्याही फ्रोजन बेरीज वापरुन करता येईल. सायो, मॅजेंटा नाही गं. त्यात जरा लाल जास्त असतो.

रॅटॅटुई >>> हे जपानी उंदरांच ब्रीड वाटतय. त्यापेक्षा 'ब्लूबेरी बव्हेरियन' बरं आहे.

रॅतॅटुई हा एक भाज्या वगैरे घालून केलेला पातळ पदार्थ असतो. सपक असला तरी पोटभरीचा असतो. ( या नावाचा सिनेमा पण आला होता ना ? )

मस्तय की. नावावरुन मला आधी ही बव्हेरीया भागातल्या कुठल्यातरी पेयाची पाककृती वाटली.
सिंडी तू इशान सोबत रॅटॅटूइ बघीतला नाहीस वाटतं म्हणुन असे काही तरी म्हणतेयस Happy

सिंडीला अनुमोदन. रॅटॅटुई करायला घ्या नी उंदरांना आमंत्रण द्या, त्यापेक्षा ब्लू बव्हेरीयनच बरं. Proud

फाटे फोडल्याबद्दल क्षमस्व.

बर Happy , मला वाटत होतं पूनमच्याच रेसिपीवर प्राणी येतात...

काय सुंदर जांभळा रंग आलाय, झकास !!

उद्या पॉटलकसाठी बव्हेरियन ब्लू घेऊन जाणार. घरात आहेत म्हणुन स्ट्रॉबेरीजचं करावं म्हणतेय. पण हा रंग खूप आवडला. ब्लुबेरीज मिळाल्या तर उत्तम.
फोटो खूप सुंदर. (पहील्या पानावर का टाकंत नाही ?)

(पहील्या पानावर का टाकंत नाही ?) >>
आमाला पावर नाय Proud

Lol
ज्यांना हाय त्यांना म्हनलं!

फ्रोझन ऐवजी फ्रेश स्ट्रोबेरी वापरुन करता येइल का? माझ्याकडे बरयाच स्ट्रोबेरी आहेत.

फ्रेश स्ट्रॉबेरीज वापरून माझं बव्हेरियन गडगडलं. स्ट्रॉबेरीज आंबट निघाल्या. जास्त साखर घालावी लागली. आणि जिलेटीन कमी पडलं की काय माहिती नाही पण व्यवस्थीत सेट झालं नाही. खूप पाणी सुटलं. Sad

स्ट्राबेरीज मधील आंबटपणा नी जिलेटीन मध्ये एक केमीकल रीयक्शन होवून ते सेट व्यवस्थित होत नाही. नाहीतर स्ट्रॉबेरी कमी घ्यायच्या पण थोडे कॉर्नस्टार्च टाकावे लागते. मी केलेला स्ट्रॉबेरी जे लो चा प्रयत्न असाच फसला. थोडेसे कॉर्नस्टार्च टाकले की होते मग. एकतर फ्रोजन चांगल्या नाहीतर विन्टर(Dec - Feb) मध्ये येतात त्या स्ट्रॉबेरीच गोड असतात तर समर(April -May) मधल्या बर्‍यापैकी आंबट.

मने, हा केमेस्ट्रीचा धडा मी 'स्ट्रॉबेरीजचं बव्हेरियन करते' म्हंटल्यावर नाही का द्यायचा! Happy बव्हेरियन प्यावं लागलं नसतं!!! Proud

अगं मी खरचं वाचलं न्हवत तुझ्या प्लॅनविषयी.
लालू,बाकी सॉलीड कलर आलाय ब्लुबेरीचा. एक पैठणी आठवली. काय म्हणतात ह्या रंगाला मराठीत?

काय म्हणतात ह्या रंगाला मराठीत?
<< जांभळा Happy

धन्यवाद म्रुन्मयी व मनुस्विनी.