कुठल्याही चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण याबरोबरच 'संवाद' हेही महत्वाचं अंग असतं.
काही चित्रपटांमधले निवडक quotes, किंवा आपल्या देशी भाषेत 'डायलॉग्स' हे त्या चित्रपटांइतकेच फेमस आहेत.
उदा.
'I made him an offer he couldn't refuse!'
'Play it again, Sam!'
किंवा अगदी आपल्या गवर्नरसाहेबांचा 'I'll be back!'
आपले हिंदी चित्रपटही याबाबतीत मागे नाहीत.
राजकुमार, अजित यांच्यासारखे नरपुंगव तर इतर कुठल्याही बाबीपेक्षा त्यांच्या डायलॉगबाजीनेच अजरामर झाले.
पण एक गोष्ट लक्षात आल्यावाचून राहात नाही. बॉलिवुडचे सर्व 'डायलॉग्स' सहसा मेल कॅरॅक्टर्सच्याच तोंडी असतात! स्त्री अभिनेत्यांचे लक्षात राहाण्यासारखे डायलॉग्स जवळजवळ नाहीत! असं का बुवा?
हिंदी चित्रपटांमधले टॉप डायलॉग्स आठवून पहा.
'जाओ, पैले उस आदमी का साइन लेके आओ'
'मेरे पास मां है'
'जो डर गया, समझो मर गया'
'साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है'
'पुष्पा, आय हेट टिअर्स'
'ये बच्चोंके खेलने की चीज नही, हाथ कट जाये तो खून निकल आता है'
'जली को राख कहते है...' वगैरे वगैरे.
पण सर्वच्या सर्व पुरुष पात्रांचे.
स्त्री नट्यांच्या वाट्याला मात्र 'मैं तुम्हारे बच्चों की मां बनने वाली हूं' किंवा 'बेटा, मैंने तुम्हारे लिये गाजर का हलवा बनाया है' अशा जेनेरिक डायलॉगांपलिकडे नसतंच.
कधीकधी हिरोला एखाद्या स्त्रीपात्राला तिची जागा दाखवून देता येण्यासाठी, किंवा तिचा बावळटपणा अधोरेखित करता यावा म्हणून तिला एखादा 'लिडिंग' डायलॉग दिला जातो.
उदा. बराच वेळ बसंतीची बालिश बडबड, आणि अमिताभने 'तुम्हारा नाम क्या है बसंती' विचारणे.
किंवा 'लोग इस तरह अपने दरवाजे खिडकियां खुल्ली रखे तो चोर-उचक्के घरमे घुसेंगे ही' सारखा चीप डायलॉग.
बराच वेळ विचार केल्यावर एक स्त्रीपात्री डायलॉग सापडला... 'थप्पड से डर नही लगता साब, प्यार से लगता है'
आणखी खूऽऽप वेळाने आठवला 'परमिसन लेना चाहिये ना!??...'
पण असे एका हाताच्या बोटावर मोजता येतील.
असं का बुवा? स्त्री अभिनेत्यांवर नाच, गाणी अशांसारखी महत्वाची कामे सोडून चांगले डायलॉग 'वाया' घालवणे अडचणीचे पडत असावे का? की हिरॉइनच्या पर्सनॅलिटीला जितका फोकस मिळेल तितकी तिची इतर 'अंगे' झाकोळली जात असावीत?
बहुत नाइन्साफी है ये (छ्याः... पुन्हा पुरुषाचाच डायलॉग)
ओ प्यान्टवालं!
ओ प्यान्टवालं!
ओ प्यान्टवालं!>>> हे तर लई
ओ प्यान्टवालं!>>> हे तर लई भारी होतं. अजूनही आठवतोय तो संवाद. रंजना आणि अशोक सराफ! काय धमाल आली होती दोघांची! २५ एक वर्षांपूर्वीचा चित्रपट असावा.
बघा! संवाद वाचल्याबरोबर असं आठवलं पाहिजे लोकांना. धागा कर्त्याला असेच स्त्रियांच्या तोंडचे संवाद हवेत ना!?
लोकांना आठवणे न आठवणे हे
लोकांना आठवणे न आठवणे हे सापेक्ष झाले. उदाहरणार्थ वरचा पॅण्टवाले मला माहीत होता पण नेनका कुठे ऐकला हे आठवत नव्हते.
तसेच बहुतांश लोकांना आठवणारा, आवडणारा, लोकप्रिय डायलॉग असण्याचा नेहमी दर्ज्याशी संबंध असेलच असे नाही. सैराटमधील आर्चीच्या तोंडचे डायलॉग असो वा टाईमपासच्या दगडूच्या तोण्डचे, हे दर्जेदार नसूनही फेमस होतात. तर एखादा अर्थपुर्ण संवाद मनोरंजनाची अपेक्षा ठेवून पिक्चर बघायला जाणारया बहुतांश लोकांच्या पचनी पडत नसल्याने तितका फेमस होत नाही.
जे संवादाबाबत तेच गीताबाबत. एखादी जगजीतसिण्गची गझल चार बोटल वोडकापेक्षा कमी लोकांना माहीत असते.
{{{ बघा! संवाद वाचल्याबरोबर
{{{ बघा! संवाद वाचल्याबरोबर असं आठवलं पाहिजे लोकांना. धागा कर्त्याला असेच स्त्रियांच्या तोंडचे संवाद हवेत ना!? }}}
असे जुन्या सिनेमांमध्ये स्त्रीपात्रांना फारसे असलेले आठवत नाहीत. बसंती (शोले) चा अपवाद वगळता. नव्या सिनेमांमध्ये चटकन आठवतील असे दोन सापडले.
मै अपने मायकेसे जो तीन अॅम्बेसेडर गाडी भरके सोना लाई थी वो सूद समेद वापस चाहिए|
कल्पना जादू की छडी है|
डान्स एक आर्ट है ! आर्ट -
डान्स एक आर्ट है ! आर्ट - हॅप्पी न्यु इयर (दीपिका चा डायलॉग)
यु के ये कौन बोला? - शोले (हेमा उर्फ बसंती)
ये षडयंत्र नही मार्तंड, ये है राजतंत्र!... (बाहुबली - शिवगामी)
तुस्सी बडे मजाकिया हो! , वड्डे लोग वड्डी बातें! (कभी खुशी कभी गम - काजोल)
गिनती भुला दी ! , उह्हु उह्हु ! (हम आपके है कौन - निशा)
Don goshti majhya samor alya
Don goshti majhya samor alya na ki Mala Kay karaicha te kalat nahi,,
Vanilla ice cream ani tu..
A Anya Chaddit rahaich Kay,,
A Anya Chaddit rahaich Kay,, Chaddit rahaich. .
Pages