डायलॉगबाजीतले सेक्सिझम!!

Submitted by π on 19 May, 2017 - 11:38

कुठल्याही चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण याबरोबरच 'संवाद' हेही महत्वाचं अंग असतं.
काही चित्रपटांमधले निवडक quotes, किंवा आपल्या देशी भाषेत 'डायलॉग्स' हे त्या चित्रपटांइतकेच फेमस आहेत.
उदा.
'I made him an offer he couldn't refuse!'
'Play it again, Sam!'
किंवा अगदी आपल्या गवर्नरसाहेबांचा 'I'll be back!'

आपले हिंदी चित्रपटही याबाबतीत मागे नाहीत.
राजकुमार, अजित यांच्यासारखे नरपुंगव तर इतर कुठल्याही बाबीपेक्षा त्यांच्या डायलॉगबाजीनेच अजरामर झाले.
पण एक गोष्ट लक्षात आल्यावाचून राहात नाही. बॉलिवुडचे सर्व 'डायलॉग्स' सहसा मेल कॅरॅक्टर्सच्याच तोंडी असतात! स्त्री अभिनेत्यांचे लक्षात राहाण्यासारखे डायलॉग्स जवळजवळ नाहीत! असं का बुवा?
हिंदी चित्रपटांमधले टॉप डायलॉग्स आठवून पहा.
'जाओ, पैले उस आदमी का साइन लेके आओ'
'मेरे पास मां है'
'जो डर गया, समझो मर गया'
'साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है'
'पुष्पा, आय हेट टिअर्स'
'ये बच्चोंके खेलने की चीज नही, हाथ कट जाये तो खून निकल आता है'
'जली को राख कहते है...' वगैरे वगैरे.
पण सर्वच्या सर्व पुरुष पात्रांचे.
स्त्री नट्यांच्या वाट्याला मात्र 'मैं तुम्हारे बच्चों की मां बनने वाली हूं' किंवा 'बेटा, मैंने तुम्हारे लिये गाजर का हलवा बनाया है' अशा जेनेरिक डायलॉगांपलिकडे नसतंच.
कधीकधी हिरोला एखाद्या स्त्रीपात्राला तिची जागा दाखवून देता येण्यासाठी, किंवा तिचा बावळटपणा अधोरेखित करता यावा म्हणून तिला एखादा 'लिडिंग' डायलॉग दिला जातो.
उदा. बराच वेळ बसंतीची बालिश बडबड, आणि अमिताभने 'तुम्हारा नाम क्या है बसंती' विचारणे.
किंवा 'लोग इस तरह अपने दरवाजे खिडकियां खुल्ली रखे तो चोर-उचक्के घरमे घुसेंगे ही' सारखा चीप डायलॉग.

बराच वेळ विचार केल्यावर एक स्त्रीपात्री डायलॉग सापडला... 'थप्पड से डर नही लगता साब, प्यार से लगता है'
आणखी खूऽऽप वेळाने आठवला 'परमिसन लेना चाहिये ना!??...'
पण असे एका हाताच्या बोटावर मोजता येतील.

असं का बुवा? स्त्री अभिनेत्यांवर नाच, गाणी अशांसारखी महत्वाची कामे सोडून चांगले डायलॉग 'वाया' घालवणे अडचणीचे पडत असावे का? की हिरॉइनच्या पर्सनॅलिटीला जितका फोकस मिळेल तितकी तिची इतर 'अंगे' झाकोळली जात असावीत?

बहुत नाइन्साफी है ये (छ्याः... पुन्हा पुरुषाचाच डायलॉग)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मानव.

Alpha males के बीच में अगर एक ambitious woman को अपनी जगह बनानी है ना, तो थोडा बहुत alpha woman बनना पडता है.

- इन्कार, चित्रांगदा सिंग

... अरे तरण्या ताठ्या बाई वर हात टाकायला, तू दुर्योधन आहेस की दु:शासन !!
... सारखा सारखा त्याच झाडावर काय ??
... का ओ माने, तुम्हाला लिंबाचे पदार्थ आवडतात का ?
.. चालेल.. बायकांची कामं करायला लागली तरी चालेल, धनि !
कसल्या या आजकालच्या मुली.. नमस्कार पण नाही केला
या हून छोटं नव्हतं ???
तेरी मां, मेरी मां.. तेरी मां, मेरी मां दोनो ने टांग से झाडू करदिया
... वगैरे वगैरे Happy

... अरे तरण्या ताठ्या बाई वर हात टाकायला, तू दुर्योधन आहेस की दु:शासन !!
... सारखा सारखा त्याच झाडावर काय ??
... का ओ माने, तुम्हाला लिंबाचे पदार्थ आवडतात का ?
.. चालेल.. बायकांची कामं करायला लागली तरी चालेल, धनि ! >>>>>>>>>> Lol लॉजीक पटले

"टकलु म्हणाला????, तुमच्या तोंडावर तुम्हाला टकलु म्हणाला????? " Lol Lol

"ठकठक..... धनंजय माने ईथेच राहतात का?"

"तो माझा मित्र वारला..... आणि त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले ७५ रुपये पण वारले...." Lol Lol

आता मला अख्खा 'बनवाबनवी' लिहावा लागेल ईथे.... Happy

Lol Lol

चंद्रकलेचा कसला पॉवरफुल डायलॉग आहे हा पिंजरा चित्रपटात. >>> +१ मामी , खरचं जबर्दस्त आहे तो डायलॉग.

सेक्सिझम वाचुन काय वेगळंच वाटलेलं. Happy
धागा वाहुन पहिलाच मै अपनी फेव्ह्रेट हु आठवला. मग मराठीत सांगितलेलं कळत नाय? इंग्लिशमधे सांगु? आठवला. दोन्ही प्रतिसादात लिहिलेत बर्याच जणांनी.

अख्खा 'बनवाबनवी'>>>> हिरोइणींच्या तोंडचे डायलॉग हवेत ना?

Vichar kela ki mi tula Kay devu shakte, , tar uttar milali,, Prem devu shakte..
DuNiyadari

Kisi ki itana bhi mat darao k dar hi khatam Ho Jaye..
Mery com

Kiski talvar Par sar rakhu bata do mujhe muhobbat Karna agar khata hai to saja do mujhe
Bajirao mastani

टोटली अग्री बनवाबनवी आणि तनु वेडस मनू रिटर्न साठी... अद्रक वाला आणि धनंजय माने येथेच राहतात का तर बेष्टच... अजून त्यातले काही..
जाउबाई, नका हो जाऊ बाई...
माझा बायको...
तुमची बायको निदान सुंदर तरी आहे हो नाहीतर आम्हाला या रानरेड्याबरोबर संसार करावा लागतोय...
झंड होगयी हैं मेरी जिंदगी...
नाम लेके बतावू की लेके दिखाऊ असा काहीसा..
तलाश मधले , क्या साब आपभी बहोत मझाक करते हो..
अरे इतनी जलदी याद आ गयी मेरी...
अजून असेच,
पता नाही कॉलेज के दिन कैसे गुजर गये आंटी, "फोन पे बेटा ,फोन पे"...
जिस झूठ से किसीं का भला हो वो झूठ ,झूठ नही होता...
किसीं का विश्वास तोडना जितना आसान है उससे भी मुश्किल हैं उसे निभाना...मनं
मुझे किसींकी जरूरत नहीं ,चाहत बनाना हैं असा काहीसा..
मेरी जैसी तो कोई डान्सर हो ही नही सकती..
मुझे मेरे सपनोंका राजकुमार जरूर मिलेगा..
हमारे यहा तो लडकियोंको डकार लेना भी अलाऊड नही..
गुप्ता अंकलने कभी शराब तक नहीं पी फिर भी उनको कँसर हो गया ,उससे अच्छा तो पीही लेते...
मैं अपने हनिमून पे एकेली आई हुं...
सगळे बरोबर आठवत नाहीत पण असेच काहीसे असावेत हे डायलॉग्ज...

बस एक साल के लिए भूल जाओ की तुम्हारी कोई मा है... अरे इतने जल्दी भूल गयी के..
पेलवानी कर करके तुम दोन्नो की चाल्ले मर्दानी हो गयी है.
तेरा बापू कमसे कम थारे बारे मे सोचता तो है.

बस.. छोरी समझ के ना खेलना..

अजून एक from दुनियादारी - " हातात कॅडबरी असताना समोर बिस्कीट आले तर तेहि सोडवत नाही तुला"

मे किसीकी जरुरत नही .. ख्वाहिश बनना चाहती हू ..
अपनी धून पर लोगों को नचाना तो हर इन्सान का ख्वाब है . (ए दिल है मुश्किल)

आता मला अख्खा 'बनवाबनवी' लिहावा लागेल ईथे << सेम फॉर अंदाज अपना अपना. एक सेपरेट धागाच काढावा लागेल..

आप कँविन्स हो गये या मैं और बोलू... >>>> सेम पिंच. माझाही फेवरिट.
या मुव्हीमधे आलियाच्या तोंडी ( आणि फॉर अ चेंज शाहरुखच्याही) बरेच मस्त डायलॉग्ज होते. मला आवडलेला हा मुव्ही. ( Thumbs up)

मनिमाऊ, आप कन्व्हिन्स हो गए हा जब वी मेट मधला करीनाचा डायलॉग आहे. आलिया - शाखा म्हणजे डियर जिंदगी ना?

डायलॉग पुढं सिनेमाच नाव अभिनेत्यांच नाव काहीतरी लिहा लोकहो.. काही आठवत नाहियेत कशातले आहेत

डायलॉग पुढं सिनेमाच नाव अभिनेत्यांच नाव काहीतरी लिहा लोकहो.. काही आठवत नाहियेत कशातले आहेत
>>>
+१

वरती सर्वांनी जे डायलॉग लिहिलेत ते आवडलेले आहेत, खूप गाजलेले नाहीत.
जसे की शोलेचे ... अरे ओ सांबा पासून रख दो सब माल वही पर असू दे,
नाहीतर मैने आपका नमक खाया है सरकार असू दे.
ये डायलॉग बच्चा बच्चा जानता है.
सोनाक्षी चा डायलॉग नक्की गाजला, आणि आर्ची चा पण खूप गाजला...
पण बाकी डायलॉग जे लोकांनी लिहिलेत ते खूप गाजलेले या कॅटेगरीत येत नाहीत..

आणि लेखकाशी सहमत, मोस्ट्ली खूप गाजलेले आणि लोकांच्या तोंडी सतत घोळणारे डायलॉग मोस्ट्ली मेल कॅरेक्टर च्या तोंडीच असतात्/होते सिनेमात. आता कदाचित हा ट्रेंड बदलतोय असं वाटतंय.

हारने का डर और जीतने की उम्मीद ... इन दोनों के बीच जो एक टेंशन वाला वक़्त होता है ना ... कमाल का होता है >>> इम्रान हाश्मि
तुम भी मुझसे प्यार करती हो बहुत प्यार, लेकिन कहोगी नहीं ... तड़पोगी मेरे बगैर लेकिन जताओगी नहीं ... मेरे पास आना चाहती हो. सीने से लगके रोना चाहती हो, दिल में रहना चाहती हो लेकिन रहोगी नहीं ... लेकिन मैं तुम्हारी तरह नहीं हूँ ... मैं तो रह ही नहीं सकता यह कहे बिना की मुझे तुमसे इश्क़ है >>> हमारि अधुरि कहानि

Pages