डायलॉगबाजीतले सेक्सिझम!!

Submitted by π on 19 May, 2017 - 11:38

कुठल्याही चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, छायाचित्रण याबरोबरच 'संवाद' हेही महत्वाचं अंग असतं.
काही चित्रपटांमधले निवडक quotes, किंवा आपल्या देशी भाषेत 'डायलॉग्स' हे त्या चित्रपटांइतकेच फेमस आहेत.
उदा.
'I made him an offer he couldn't refuse!'
'Play it again, Sam!'
किंवा अगदी आपल्या गवर्नरसाहेबांचा 'I'll be back!'

आपले हिंदी चित्रपटही याबाबतीत मागे नाहीत.
राजकुमार, अजित यांच्यासारखे नरपुंगव तर इतर कुठल्याही बाबीपेक्षा त्यांच्या डायलॉगबाजीनेच अजरामर झाले.
पण एक गोष्ट लक्षात आल्यावाचून राहात नाही. बॉलिवुडचे सर्व 'डायलॉग्स' सहसा मेल कॅरॅक्टर्सच्याच तोंडी असतात! स्त्री अभिनेत्यांचे लक्षात राहाण्यासारखे डायलॉग्स जवळजवळ नाहीत! असं का बुवा?
हिंदी चित्रपटांमधले टॉप डायलॉग्स आठवून पहा.
'जाओ, पैले उस आदमी का साइन लेके आओ'
'मेरे पास मां है'
'जो डर गया, समझो मर गया'
'साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है'
'पुष्पा, आय हेट टिअर्स'
'ये बच्चोंके खेलने की चीज नही, हाथ कट जाये तो खून निकल आता है'
'जली को राख कहते है...' वगैरे वगैरे.
पण सर्वच्या सर्व पुरुष पात्रांचे.
स्त्री नट्यांच्या वाट्याला मात्र 'मैं तुम्हारे बच्चों की मां बनने वाली हूं' किंवा 'बेटा, मैंने तुम्हारे लिये गाजर का हलवा बनाया है' अशा जेनेरिक डायलॉगांपलिकडे नसतंच.
कधीकधी हिरोला एखाद्या स्त्रीपात्राला तिची जागा दाखवून देता येण्यासाठी, किंवा तिचा बावळटपणा अधोरेखित करता यावा म्हणून तिला एखादा 'लिडिंग' डायलॉग दिला जातो.
उदा. बराच वेळ बसंतीची बालिश बडबड, आणि अमिताभने 'तुम्हारा नाम क्या है बसंती' विचारणे.
किंवा 'लोग इस तरह अपने दरवाजे खिडकियां खुल्ली रखे तो चोर-उचक्के घरमे घुसेंगे ही' सारखा चीप डायलॉग.

बराच वेळ विचार केल्यावर एक स्त्रीपात्री डायलॉग सापडला... 'थप्पड से डर नही लगता साब, प्यार से लगता है'
आणखी खूऽऽप वेळाने आठवला 'परमिसन लेना चाहिये ना!??...'
पण असे एका हाताच्या बोटावर मोजता येतील.

असं का बुवा? स्त्री अभिनेत्यांवर नाच, गाणी अशांसारखी महत्वाची कामे सोडून चांगले डायलॉग 'वाया' घालवणे अडचणीचे पडत असावे का? की हिरॉइनच्या पर्सनॅलिटीला जितका फोकस मिळेल तितकी तिची इतर 'अंगे' झाकोळली जात असावीत?

बहुत नाइन्साफी है ये (छ्याः... पुन्हा पुरुषाचाच डायलॉग)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकीजा मधला वीणाचा करारी डायलॉग , ज्यापुढे अशोक कुमार सुद्धा किस झाडकी पत्ती वाटू लागतो....
' शहाबुद्दीन ....

कळलं .. !

आक्कासाहेबांचा डायलॉग आहे. मराठी मालिका सखे ग्ग टाक पुढचे पाऊल मधला. एकच शब्द पण शत्रुघ्न सिन्हाच्या खामोशच्या तोडीचा !

तो लेखातला डायलॉग.. आपल्या खामोश शत्रूचीच पोरगी सोनाक्षी..
थप्पडसे डर नही लगता साहब, प्यार से लगता है.. हा प्रचंड म्हणजे प्रचंड आवडीचा. मी स्वत: कित्येकदा मारतो. पटतो. आणि मला लागूही होतो. ईथेही कुठे कुठे लिहिला असावा.

एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट...
यातला हा शब्द बदलून कित्येक ठिकाणी वापरला जातो.

एक मनाला भिडणारा ...
मराठीतला...
माझा बच्चू आहेस रे तू Happy

राहुल ईझ ए चीटर .. राहुल ईझ ए चीटर ..

यातला राहुल, नाम तो सुनाही होगा.. म्हणजे शाहरूख हे सांगायला नको.

पण वरचा डायलॉग काजोलचा !

अवाण्तर - ईंग्रजी वाईच कच्चे असल्याने सेक्सिझमचा अर्थ पटकन कळला नाही आणि भलत्याच अपेक्षेने धागा उघडलेला Happy

काजोल पुन्हा एकदा ...

मैने कहा था राज मुझे यहासे ले चलो.. मैने कहा था ना.. बाबूजी नही मानेंगे.. मैने कहा था ना.. यहा हमारे प्यर को समझनेवाला कोई नही है.. मैने कहा था ना राज.. मैने कहा था ना.. मैने कहा था ना..

या वरच्या डायलॉग्जमध्ये दम होता म्हणूनच त्यावर .. बाबूजी ठिक कहते थे सिम्रन या डायलॉग्जना मजा आली Happy

https://youtu.be/uoKGCtaqkxU

तुम्ही तनु वेड्स मनु रिटर्न्स नाही पाहिलात का?
लई भारी आहेत दोन्ही भाग. एक से एक डायलॉग आहेत कंगनाचे

शहाबुद्दीन ... वाला जो डायलॉग आहे बराचसा तसाच एक डायलॉग माधुरीला देवदास मधे आहे. तिनेही छान केलाय तो सीन. "तवायफोंके घर मे बत्ती जलती है तो ठाकुरोंके वजह से, उनके यहां बच्चे पैदा होते है वोभी ठाकुरोंके. हमारेभी रगोंमे ठाकुरो़ंका खून है ... वगैरे

पहिला दोन दिवसांपुर्वीच बसून पुर्ण बघितला. २ रा कुठेच सापडेना. आता मला सिडी घेऊन यावी लागेल. नेटफ्लिक्स वर नाहीये.

मेरा सेन्स ऑफ ह्यूमर बडा अच्छा है!
देवदास मधले पारो आणि चंद्रमुखीतले संवाद चांगले आहेत.
पारो "मत भूलना तवायफोंकी किस्मत में शौहर नहीं होते"
चंद्रमुखी "तवायफोंकी तो किस्मत ही नहीं होती!"

तवेमरि मध्येच

शर्माजी हम थोडे बेवफा क्या हुए, आप तो बदचलन हो गये.

अजून एक- अभी तो हमे और जलिल होना है.

मुघल ए आझम मध्ये मधुबाला च्या तोंडी एक से एक संवाद आहेत.
ये कनीज देखना चाहती थी के अफसाने हकिकत में कैसे बदलते हैं
काँटोंको मुरझाने का खौफ नहीं होता

Not my daughter.... You Bitch... Molly weisley
Dodge this..... Trinity
My biological clock ..... Marissa Tomei

हे पटकन आठवले

पिंजरा? पन त्यो सोन्याचा हाय. गुर्जी मला सांगा, पिंजरा कुनाला चुकलाय? पिंजरा हाय तर सगळं हाय. अहो, मानसाचं घर तरी काय असतं म्हंता? मान्साचं घर ह्यो बी एक पिंजराच की! मानूस कुटं बी गेला तरी त्याला या घराची वढ असती का न्हाय? आनि ही वढ असते म्हनून जगावसं वाटतं. अवो, येवडी रानोमाळ भटकणारी पाखरं तर ती सुदीक सांच्यापारी घरट्याकडे धाव घ्येतात का न्हाय? अनी गुर्जी भुंगा हो, दिवस मावळायला कमळाच्या पिंजर्‍यात सोताला कोंडून घेतो. गुरुजी, एक इचारू? तुमचा जीव कुटं हाय सांगा बगू? अवं त्याला सुदीक या कुडीच्या पिंजर्‍यातच कोंडलंय न्हवं? ह्यो पिंजरा हाय म्हनून जीव हाय. पिंजरा हाय तर सगळं हाय बगा.

- चंद्रकलेचा कसला पॉवरफुल डायलॉग आहे हा पिंजरा चित्रपटात.

Pages