मी दिनेश विश्वनाथ शिंदे....

Submitted by दिनेश. on 10 May, 2017 - 08:25

मी दिनेश विश्वनाथ शिंदे....
मी ऑगस्ट २००१ पासून मायबोलीचा सभासद आहे ( माझ्या प्रोफाईल मधली तारीख चुकलेली आहे, कारण
जून्या मायबोलीवरून डेटा घेण्यात काहीतरी गल्लत झाली असावी. )
मी माझ्या पाककृती या संकेतस्थळावरुन का मागे घेतोय, त्यामागची माझी भुमिका.
ही कैफियत नाही, आरोपपत्रही नाही. आहे ती निव्वळ माझी भुमिका.

१) पहिल्याप्रथम, भारतीय नागरिकांबद्दल अभिमान असणे वगैरे..

तामाम भारतींयाबद्दल केलेले एक खोडसाळ विधान हे कदाचित निमित्त झाले असेल, पण ज्या बाबींबद्दल मी
संवेदनशील आहे, त्यापैकि हि एक. पुर्वीदेखील असे प्रकरण झाले आहे.
त्यावेळी सगुणा या आय डी ने, मुलगा होण्यासाठी काय उपाय करावेत, असा बीबी उघडला होता. त्यावर इथल्या
काही जेष्ठ सभासदांनीही प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. कुणाला त्यात काही आक्षेपार्ह वाटले नव्हते.
त्यावेळी " बेटी बचाओ आंदोलन" वगैरे सुरु झालेही नव्हते पण गर्भनिदान चाचणीवर भारतात बंदी आली होती.
( भारताबाहेर अनेक देशांत नव्हती ) तरीही भारतीय भाषेत असलेल्या एका संकेतस्थळावर अशी चर्चा व्हावी,
हे मला अजिबात पटले नव्हते. त्यावर इथल्याच एका सभासदाने, फारसे सिरियसली घेऊ नकोस, ओल्ड वाईव्ज
टेल्स एवढेच याचे महत्व आहे. असे मला सांगितले होते. तरीही मी आग्रही राहिलो, आणि तो बीबी नंतर बंद करण्यात आला.
त्यामूळे एखाद्या तत्वासाठी माझा आग्रह आजचा नाही.

२) मेघना पेठे यांचे पुस्तक, नतिचरामी

या पुस्तकांची अत्यंत व्यापक प्रमाणावर जाहीरात करण्यात आली होती. भारतीय साहित्याचा
इतिहास बदलवणार वगैरे दावे करण्यात आले होते. हे पुस्तक मी वाचले. त्यापुर्वी या लेखिकेच्या
काही कथाही वाचल्या होत्या.
एकंदर पुस्तक वाचल्यावर मला ते अजिबात आवडले नव्हते आणि त्यब्बद्ल मी इथे लिहिले. आता सर्व संदर्भ
आठवत नाहीत, पण दोन उदाहरणे आठवताहेत ती लिहितो.

पुस्तकात असे विधान आहे कि मुंबईतील फोर्ट मधे पारश्यांची जी विहिर आहे, त्यात पारसी लोक प्रेते टाकतात.
हे विधान अत्यंत खोडसाळ आहे. ती विहीर आणि त्या विहीरीतले पाणी हे पारसी लोकांसाठी अत्यंत पवित्र आहे.
फोर्ट मधल्या अनेक इमारतीत पुर्वी पाणीपुरवठा होत नसे ( तशी सोयच नव्हती ) अनेक पारसी केवळ त्याच विहिरीचे
पाणी पित असत. आणि मी त्या काळात फोर्ट विभागात अनेक वेळा जात असे म्हणुन हे मला माहीत होते.
मुंबई विद्यापिठाच्या कुंपणालगत पण अशी विहीर होती ( अजूनही असेल ) आणि तिथूनही प्यायचे पाणी
पुरवले जात असे. ( कारण वरचेच, अनेक इमारतीत पाणी पुरवठ्याची सोय नव्हती. ) आणि पारसी लोक,
त्यांचे मृतदेह, एका अत्यंत पवित्र भावनेने, टॉवर ऑफ सायलेंस मधे ठेवतात. त्यामूळे लेखिकेचे हे विधान अयोग्य होतेच.

त्याच पुस्तकात आणखी एक बेधडक विधान असे होते कि, फोर्ट मधे गुलाबाची फुले विकणारी मुले, ती फुले
थडग्यावरुन उचलून आणतात. हे पण एक खोडसाळ विधान होते. ( आजही के रुस्तम च्या बाहेर, ती मुले अत्यंत
निगुतीने फुले नीट करताना दिसतील )

आणि एकंदरच पुस्तकाबाबत बर्याच न पटणार्या गोष्टी होत्या, त्याबद्दलही मी तीव्र नापसंती व्यक्त केली. आणि
ती करताना, लेखिकेचाच " क्लायमॅक्स" हा शब्द वापरला. झालं, त्यावरून या सभासदांचा पापड मोडला.
म्हणजे त्यांच्या विरोधात मत नोंदवायचा इथे कुणाला अधिकारच नाही जणू. त्यापुर्वी प्रत्यक्ष भेटलेल्या आणि परीचित
असलेल्या एका कवियत्रीने पण माझ्याशी अबोला धरला होता. पण पुढे माझ्या चुलतभावाच्या अपघातानंतर
स्वतःहून सांत्वनाचा प्रतिसाद दिला. सध्या ती मायबोलीवर दिसत नाही. या संपूर्ण ग्रूप माझ्या विरोधात
जायचे कारण हे. त्यापुढे लेखिकेची काही पुस्तके प्रसिद्ध झाली का, किंवा काय इतिहास घडवला ते मला माहीत
नाही. पण इथे मात्र इतिहास घडला.

३) पित्त, गुरुवर्य डॉ. शरदीनी डहाणूकर आणि मी

डॉ. डहाणूकर माझ्या लेखनातील गुरु. त्यांच्याबद्दल चार शब्द लिहायला हवेत. २५ वर्षे अलोपथीची
प्रॅक्टीस करून त्या आयुर्वेदाकडे वळल्या होत्या. पण त्यांना इतर अनेक विषयात रस होता आणि
त्या विषयांवर, खास करुन झाडांवर त्या महाराष्ट्र टाईम्स मधे लेख लिहित होत्या. त्यासोबत आमच्या
कॉलनीत राहणारी मृदुला नाडगौडा हिने काढलेले सुंदर फोटोही असत. त्यांचा मी चाहता होतो आणि आहेही.

१९९६ - १९९८ या काळात मी नायजेरियात होता. तिथेही मी त्यांचे लेख वाचतच असे ( तेव्हा इंटरनेट नव्हते,
मी वर्तमानपत्रे कुरियर ने मागवायचो ) तिथे असताना मला यलांग यलांग ( हे नाव तेव्हा माहीत नव्हते )
या झाडाची ओळख झाली. त्यांच्या कुठल्या लेखात या झाडाचा उल्लेख नव्हता ( हे झाड भारतात मी
त्यापुर्वी बघितले नव्हते. ) म्हणून कौतूकाने मी त्यांना त्या झाडाचा फोटो आणि एक पत्र पाठवले. पत्रात
अर्थात त्यांच्याच काही लेखांचा उल्लेख होता. त्या उत्तर देतील, अशी अपेक्षाही नव्हती, पण त्यांनी तत्परतेने
उत्तर पाठवले, माझ्या चार ओळींचे खुप कौतूक केले आणि चक्क भेटायला बोलावले.

पुढच्या भारतभेटीत मी त्यांना भेटलो. तो पर्यंत त्यांनी झाडांवरचे लेखन थांबवले होते आणि पाककलेवरच्या
लेखनाकडे वळल्या होत्या. मी तिच तक्रार केली तर त्या म्हणाल्या, कि आता तू लिहायला सुरवात कर.
मी माझा एक लेख, लोकसत्ता कडे पाठवला, पण तो प्रसिद्ध होईपर्यंत त्यांचे निधन झाले होते.

झाडांबद्दल, पुढे प्रा. महाजन, प्रा. घाणेकर वगैरेनेंही विपुल लेखन केलेय, पण तरीही डॉ. डहाणुकरांची
मिश्किल शैली, एकमेव अशीच आहे. त्यांचे बोलणेही असेच मिश्किल होते. सहज बोलता बोलता त्यांनी
मला विचारले कि तू पित्त प्रकृतीचा का ? मला तेव्हा ते नीट कळले नाही, पण तरीही त्यांनी माझ्याबद्दल
त्यांचे काही आडाखे सांगितले ( उदा. मला उपवास सोसत नाहीत वगैरे ) आणि ते खरे होते.

पुढे एका लेखाच्या निमित्ताने मी ते आडाखे इथे लिहिले. ते सत्य असल्याने, पित्त प्रकृतीची माणसे ते
सहज स्वीकारणार नव्हतीच. झालं, त्यावरून पण इथे वादळ. एका विदुषीने तर थेट असा आरोप केला,
कि माझा कुणाबद्दल तरी आकस असणार म्हणून मी असे लिहिले. ( आणि त्यांची प्रकृती कुठली, हे मला
माहीत असायचे काही कारणच नव्हते. ) काय काय लिहिले गेले इथे माझ्याबद्दल.

पुढे, डॉ डहाणूकरांच्या " स्वास्थ्यवृत्त " या पुस्तकातील पानांचे स्कॅन इथे दिले. मी केलेली बहुतेक विधाने
त्या पुस्तकातीलच होती. त्या लेखाला मी, " हा सूर्य आणि हा जयद्रथ" असे नाव दिले होते. एवढा सबळ
पुरावा, या लोकांच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. पुढे मग गंमतच झाली, तो लेखच इथून गायब करण्यात
आला. त्यानंतर तो गूगलवर दिसत होता, पण इथे दिसत नव्हता. हे त्यांचे कर्म, त्यांनाच जाचत राहिले.
मग त्यांच्याच एका गटग च्या चर्चेत, गटग ला जयद्रथ येणार आहे का ? अशी चर्चा झाली होती. आहे कि नाही मज्जा ?

४) वर्षा विहार आणि मी

मायबोलीचे वर्षा विहार सुरु होण्यापुर्वी मी स्वतः एक वर्षा विहार आयोजित केला होता. क्षिप्रा, सोनचाफा,
बॉम्बे व्हायकिंग वगैरे काही मोजके मायबोलीकर त्याला हजर होते. त्यानंतर सिंहगडावर एक सहल गेली होती,
त्यातही मी सहभागी होतो, तो जरी पहिला वर्षाविहार मानण्यात आला असला तरी त्याला मायबोलीचे नाव नव्हते,
ती प्रथा नंतर सुरु झाली.

तोपर्यंत मायबोलीवर अत्यंत मोकळे वातावरण होते आणि त्याला अनुसरून मी माझ्या एका नव्या मैत्रीची कबूली
दिली होती. ती पुढे मायबोलीवर आली, पण आमच्या मैत्रीबद्दल इथे एवढ्या घॄणास्पद चर्चा झाल्या, कि तिने
मायबोली सोडली, ती कायमची. ती आजही माझी अत्यंत जिवलग मैत्रिण आहे.

त्यानंतर मायबोली वर्षाविहार सुरु झाले. त्यावेळी आयोजकांची चर्चा इथे न होता, याहू ग्रूप वर(सुद्धा) व्हायची. तर
इथल्या साळसूद चर्चेत मी भागही घेत असे. पण तिथे माझ्याशी गोड गोड बोलणारे सदस्य माझ्या माघारी
माझ्या पुरुषार्थाची चवीने चर्चा करत होते. म्हणजे सगुणा फार्म मधल्या म्हशीवर दिनेश बसला म्हणायचा कि
बसलं म्हणायचं अशी. आहे कि नाही मज्जा ? म्हणजे ज्या गोष्टीची चिंता माझ्या बायकोने करायची, त्या ह्या सर्व
जणी करत होत्या. ही सर्व चर्चा मला, तिथल्याच एका सदस्याने पाठवली होती. मी प्रतिक्रिया दिली नाही,
पण त्यानंतर कुठल्याही व वि ला हजेरी लावली नाही.

या पातळीवरची चर्चा करण्यासाठी त्यांना एक क्लोज्ड ग्रुप हवा असतो. आणि तो इथे उपलब्ध करुन दिला
जातो. आनंद आहे.

५) मैत्री आणि यांची मते

स्त्री पुरुष मैत्रीबद्दल विद्वत्तापुर्ण आव आणून चर्चा करणार्या इथल्या सभासदांची मानसिकता सांगणारा, एक किस्सा.
मायबोलीवरच्या एका उपक्रमाच्या निमित्ताने, एक जूनी सभासद परत इथे आली. तिचे स्वागत करताना मी
"जूनी मैत्रिण" असे शब्द वापरले. हे शब्द माझ्या वैयक्तीक आयुष्यात तर अनेक स्त्रिया आणि मुलींबद्दल
वापरेन.
तर या दोन शब्दांवरुन, इथल्या सभासदांनी तिला जीव नकोसा केला. तिची मानसिक अवस्था काय केली असेल
याची मला तर कल्पना आहेच पण आणखी एका सभासदाला आहे.
पुढे याच सभासदाने, या ग्रुपचे वकीलपत्र घेतले. हि बाब तर आणखी नवलाची.

६) मी आणि माझ्या कथा

मायबोलीवर मी सुरवातीला अनेक कथा लिहीत असे. त्या काळात त्या खुप लोकप्रिय पण झाल्या
होत्या. गिरीराज सारखे माझे मित्र तर मला केवळ माझ्या कथांमुळे लाभले होते. तो आजही
माझा मित्र आहे पण मी आता कथा लिहित नसल्याने, तो मायबोलीवर फिरकत नाही.

मी आजही इथल्या कथा ( क्रमशः नसतील तर ) वाचतो. काही अपवाद वगळले तर मला त्या एका
ठराविक वर्तुळात फिरताहेत असे वाटते. एका कथेत तर हुंडा वगैरे पण उल्लेख होता. शक्यतो,
नकारात्मक प्रतिसाद द्यायचा नाही, हा माझा विचार असल्याने, मी तिथे काहीच लिहिले नव्हते.

चौदा वर्षांपेक्षा जास्त वर्षे मी आफ्रिकेत घालवली. इथले माझे सहकारी माझे जिवलग मित्र आहेत.
एकदा आपला मानल्यावर ते माझ्यावर खुप विश्वास ठेवतात आणि आपले प्रश्न आणि अनुभव
अत्यंत मोकळेपणानी माझ्याशी शेअर करतात. ठराविक भारतीय संकल्पनाना छेद देणारे
आयुष्य हे लोक जगतात. यांच्या आयूष्यावर कथा लिहिण्याचा प्रयत्न मी केला होता. त्यावर इथल्या
एका विदुषीने इतका थयथयाट केला, कि विचारता सोय नाही. माझ्यावर चक्क सेक्स्यूअल हरासमेंट
वगैरेचा आरोप. अरे प्रत्यक्ष ती मुलगी विश्वासाने मला सांगते ( अर्थात हे विषय आफ्रिकेत मोकळेपणी
चर्चिले जातात. ) या विषयावर आफ्रिकन देशात नाटकेही सादर होत असतात.
पण इथले वातावरण बघता ( ज्या प्रयोगात जेन फोंडा आणि व्हुपी गोल्डबर्ग सारख्या अभिनेत्री
सहभागी होतात ) त्या नाटकांच्या नावाचाही उल्लेख इथे करावासा वाटत नाही. त्या कथेवर
माझ्यातर्फे एका दुसर्याच सभासदांने या विदुषींना उत्तरे दिली होती, पण मी मात्र ना त्या बीबी कडे
परतलो ना कधी परत कथा लिहिली. इथले वातावरण प्रगल्भ व्हायला, माझी हयात पुरणार नाही
एवढे नक्की.. ( रच्याकने, एका चित्रपटासंदर्भात मी प्रगल्भ हा शब्द वापरला, तर तो देखील यांच्यासाठी
विनोदी ठरला. )

७) माझे ललित लेख.

पुर्वी मी भरपूर ललित लेखन करत असे. तेव्हा फोटो वगैरे द्यायची सोय नव्हती. आता मी ते देखील
बरेच कमी केले आहे, कारण तेच.
एक उदाहरण सांगतो. माझ्या नायजेरियातील वास्तव्याबद्दल मी लिहिले होते, त्या १० वर्षांपुर्वी लिहिलेल्या
लेखाचा फोकस होता, माझे मित्र. त्यानंतर अलिकडे मी माझ्या वेगवेगळ्या देशांतील घरांवर एक मालिका
लिहिली.
आता मूळ घटना अशी. माझ्या फ्रेंच मित्राने त्याच्या आफ्रिकन मैत्रीणीसाठी मला भारतातून साडी आणायला
सांगितली. ती मी नेली. तिथे नेल्यावर त्याने मला सांगितले कि तूच तिला नेसव, ते मला अवघड वाटल्याने
मी स्वतः साडी नेसून दाखवली. आता त्यात वावगे ते काय ?
आणि झाले एवढेच कि माझ्या दुसर्या लेखात, मी स्वतः साडी नेसल्याचा उल्लेख केला नाही. त्यात लाजण्या
सारखे काही नव्हते आणि मुद्दाम मिरवण्यासारखेही काही नव्हते. लेखाच्या अनुषंगाने जे रेलेव्हंट वाटले,
तेवढा उल्लेख मी केला. झालं, विदुषी खवळल्या. चक्क दहा वर्षापुर्वीच्या एका लेखाची लिंक घेऊन
हजर झाल्या ( आता त्यापुर्वी तिथे किती चविष्ठ चर्चा केली असेल, त्याची कल्पना करा. ) अरे बाबा, नाही
ना पटत आपलं. मग दूर रहा कि. मी काही कुठे रिक्षा घेऊन जात नाही, माझे लेख वाचा म्हणुन. कि प्रतिसाद
द्या अशी याचनाही करायला जात नाही.
बरं, आता या विदुषीबाईंची आणखी एक मजा. एका विषयाच्या लेखात मी माझी बाजू मांडताना एक
अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातल्या एका उतार्याचा संदर्भ दिला, तर तोच या बाईंना आठवेना.
मग मी त्या पुस्तकाचा स्कॅन दिला.. असो नंतर काय झाले, ते बघायला मी आलो नाही. तात्पर्य काय कि,
कधीकाळी मी लिहिलेल्या लेखातला संदर्भ यांना आठवतो. पण अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातला नाही.

असो, मी नंतर ललित लेखनही थांबवले.

८) युक्ती सुचवा आणि युक्ती सांगा

या बीबीवर स्वयंपाक करताना काही अडचणी आल्या तर त्यावर सल्ले दिले जातात. गेली
अनेक वर्षे मी पाककलेत प्रयोग करत असल्याने भरपूर अनुभव माझ्या गाठीशी आहे. आणि
त्यानुसार मी सल्ले देत असे.

तर त्यावरुन यांच्या ग्रुपवर माझा उल्लेख "वहिनोदा" असा करण्यात आला, आणि तो
उल्लेख त्यांच्याच पैकी एकीने मला सांगितला. मी उद्वैगाने तक्रार केली, पण त्याबद्दल
काहिही करण्यात आले नाही.

त्या उल्लेखात सहभागी असणार्या एका सभासदाने मात्र, मुद्दाम फोन करुन, दा, लहान
समजून मला माफ करा, असे सांगितले. पुढे आमच्यात काही कटूता राहिली नाही. पण
आता तिच सभासद इथे काही लिहित नाही. कारणांचा उल्लेखही तिला करावासा
वाटत नाही.

त्यानंतर मी फारश्या युक्त्या सांगायला तिथे गेलो नाही. धाकटी बहिण असणार्या एका
सभासदाने काही विचारले, तर सांगितले असेन, तेवढेच.
"भाकरीचे पिठ भिजवून फ्रीजमधे ठेवा आणि भाकरी करण्याआधी मळून घ्या" असे सल्ले
तिथे दिले गेले. तेवढे पाककौशल्य माझ्याकडे नाही. सो, माझा पास !!

९) रविवार सकाळ आणि ते

माझ्याबद्दलच्या विकृत पातळीवरच्या चर्चा मायबोलीवरच्या सो कॉल्ड क्लोज्ड ग्रुप पुरत्याच
मर्यादीत राहिल्या नाहीत. रविवार सकाळ मधल्या एका लेखावर, दिनेशदा असे नाव घेऊन,
माझे आणि माझ्या आफ्रिकन हाऊसमेड चे सबंध आहेत, असे सुचवणारा एक प्रतिसाद दिला
गेला. मी काही तो पेपर वाचत नाही, पण माझ्याच एका चाहत्याने, त्या बातमीची लिंक
मला पाठवली होती.

मीसुद्धा पाठपुरावा करण्याचे ठरवले. सायबर सेल कडे तक्रार केली. त्या बातमीची लिंक
आणि मी लिहिलेल्या इ मेल ची कॉपी मी इथे दिली होती. ती व्यक्ती कोण असेल, याचा
साधारण अंदाज होताच आणि त्यावर नंतर शिक्कामोर्तबही झाले. त्या व्यक्तीबद्दल कुठलिही
कार्यवाही करण्याची मला इच्छा नव्हती म्हणून मी ती तक्रार मागे घेतली.

तर यावरुन इथल्या एक विदुषी ( अरे यार, सगळ्याच विदुषी आहेत, आणि त्यांना क्रमांक
देण्यातही अर्थ नाही ) माझ्यावर खार खाऊन आहेत, का तर ती व्यक्ती कोण, हे मी उघड
केले नाही. याच विदुषी मी कधी काळी इथे केलेल्या माझ्या गौरवर्णाच्या उल्लेखावर नाराज
आहेत. आता तो कधी आणि कुठल्या संदर्भात केला होता, ते आठवतही नाही.
( पण चुकीचा नाहीच... आणि त्या बाई हा वारसा अगदी निष्ठेने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात.
विडंबनातील गोरेपणाचा संदर्भ आहे तो हा. फारेण्ड यांनी लिहिले आहे, कि असे संदर्भ नवीन
लोकांना माहीत नसतात. पण माझ्या बाबतीत मात्र सर्व संदर्भ असे पुढच्या पिढीपर्यंत
पोहोचवले जातात. )

त्यानंतर मी इथले दिनेशदा हे नाव टाकले ( हे नावाचे बारसे पण इथल्याच एका विदुषीबाईनी
केले होते. )

१०) मी इतरांवर केलेली टिका

एका सभासदाने, मी पण इतरांवर टिका करतो आणि ती त्यांनी वाचली आहे, असे लिहिले आहे.
मी ती सार्वजनिक ठिकाणी केली होती, आणि अर्थातच फार पातळी सोडून केली नव्हती.
आणि ती सातत्याने तर नक्कीच नाही.

त्यापैकी एक ऋन्मेष. त्याच्यावर विनोद केले होते. ते त्यानेही मनावर घेतले नाहीत.
दुसरे : प्रा. देवपूरकर. ते गृहस्थ एकाकी आणि आजारी असतात, असे मला कळले होते. त्यांची
विचारपूस देखील मी केली होती. त्यांच्या एका गझलेवर टिका केली होती, तर त्यांनी मला
गझलेतलं काय कळतं, असे विचारले होते ? नंतर मी कधीच त्यांच्या गझलेवर प्रतिसाद दिला
नाही. पण त्यांचे भरमसाठ लेखन सुरुच होते. नंतरही मी इतरत्र टिका केली होती, त्यावर
इथल्या एका विदुषींनी मला ओसीडी झाला आहे, असे थेट विधान केले होते ( थेट विधान, लक्षात
घ्या. ) त्याचा पुरावा देऊन मी तक्रार केली होती.. पण त्यांच्यावर देखील काहिही कार्यवाही झाली
नाही.
आणि राहिला बी ! अगदी पहिल्या वहिल्या दिवसांपासून तो माझा मित्र होता. आताच नाही तर
पुर्वीदेखील तो अनेक नावाने खोडसाळ लिहित असे. मी त्याला आव्हान केले होते आणि त्याने
स्वतःहून त्याची कबूली दिली होती. मला प्रत्यक्ष फोन करून त्याने माफी मागितली होती.
त्याच दिवसात डॉ. डहाणुकरांचे पत्र इथे अपलोड करायलाही त्यानेच मदत केली होती.

वैयक्तीक आयूष्यातले प्रॉब्लेम्स आणि एकटेपणा यांनी तो गांजला होता. त्याच्या इथल्या शेवटच्या
दिवसातही मी त्याच्या बाजूने ठाम राहिलो. आजही आम्ही फेसबूक वर मित्र आहोत. मायबोली
सोडून तो सुखी आहे. अत्यंत सुंदर असे फोटो, तिथे पोस्ट करत असतो तो.
आपल्याच घरातलं एखादं माणूस जर कुठल्या समस्येने ग्रासलेले असल, तर आपण
त्याला आणखी त्रास देतो का ? तो आणि मी ज्या काळात इथे सभासद झालो होतो,
तो काळ असाच जिव्हाळ्याचा होता. त्याला होणारा त्रास त्याच्याच शब्दात सांगायचे
तर बलात्काराइतकाच क्लेशदायी होता. त्याने जरूर इतरांचा अपमान केला असेल,
पण आपण मन मोठे केले नाही, हे देखील आहेच.
गेलेल्या लोकांबद्दल वाईट लिहायचे नाही, असा एक संकेत आहे. पण सत्य लिहायला हरकत
नसावी.

नताशा यांची आणि माझी ओळख असायचे काही कारणच नाही. माझ्या लेखनात काही
शुद्धलेखनाच्या चुका होत असतात. त्याबद्दल त्यांनी एकदा नापसंती व्यक्त केली होती
आणि मी त्यांची माफी मागितली होती.
त्याच्या रहमानीया या लेखावर प्रतिक्रिया देताना, मी त्याचे संगीत मला आवडत नाही,
असे लिहिले होते. मी लिहिलेल्या मुद्द्यांपैकी १ मुद्दा लता मंगेशकर यांचे मत होते.
माझ्या धोरणाप्रमाणे मी नंतर कधीच त्याच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया दिली नाही.

पण नंतर माझ्या एका लेखात, एक संदर्भ मला सापडला नव्हता तो त्यांनी शोधून दिला होता
आणि दुसर्या एक लेखात, चित्रपट संगीतातील प्रादेशिकता, यावर आमचे मतभेद झाले होते.
ते सुद्धा थेट नव्हेच, दोन्ही वेळेस त्यांनी स्वतःहून प्रतिक्रिया दिली होती.

त्यानंतर त्या माझा उल्लेख, जुनी खोडं असा करु लागल्या होत्या. मुद्दाम सविस्तर लिहिले
कारण, या एवढ्याश्या मतभेदाला नंतर कुठे खतपाणी घातले गेले, त्याची कल्पना येईलच.

आणि आता राहिल्या त्या माझ्या पाककृती.

आधी लिहिल्याप्रमाणे पाककृती लिहिणे हि माझ्यासाठी पॅशन होती. ( आहे आणि राहीलच )
पण त्याही कुणाच्या कुचेष्टेचा विषय का व्हाव्यात ? विडंबन हा साहित्यप्रकार मलाही आवडतो,
पण त्यातही एक आब राखलेला असतो. दृष्टीआड सृष्टी असे म्हणत मी कधी लक्ष दिले नाही,
पण जे समोर आले ते अत्यंत क्लेशकारक होते, शिवाय हे इथे सातत्याने होत होते ( आणि
ते होऊ दिले जात होते ) ते तर त्याहूनही क्लेशकारक आहे.

आणि याबाबतीतही काही लिहून मोकळे झालेच पाहिजे. मी रुढ अर्थाने भाविक नाही. पण
संतसाहित्य माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केनयातील वास्तव्यात मला तिथे अनेक भाज्या
सहजी उपलब्ध व्हायच्या. त्यातल्या अनेक भाज्या, भारतात ( निदान त्या काळात तरी ) सहज
मिळत नव्हत्या.

म्हणुन त्या भाज्यांची ओळख व्हावी म्हणुन मी अवघी विठाई माझी, हि मालिका सुरु केली.
प्रत्येक भाजी स्वतः शिजवून, तिची माहिती आणि फोटो असे त्या मालिकेचे स्वरुप होते.
तर विठाई हा शब्द सुद्धा कुचेष्टेचा विषय व्हावा ? आपला अपमान आपण सहनही करतो, पण
आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान, सहन करु ? डॉ. डहाणुकरांचाही असाच उपमर्द इथल्या
विदुषींनी केला होता.

याच मालिकेत, मी लीक या भाजीबद्दल लिहिले होते. स्पेलिंगवरुन देवनागरीत लिहायचे
झाले तर त्या भाजीचे नाव असेच लिहावे लागणार. आता मी ते नाव असेच का लिहिले असा
एक निरोप घेऊन एक विद्वान आले होते.. निरोप अश्यासाठी लिहितोय कारण, काल आमची
तिथे चर्चा झाली.. वगैरे सुरवात होती. या शब्दावरून त्यांना नेमके काय आठवले ते त्यांनाच
माहीत.

पाककृती मला काही अधिकार आहे असे मी अजिबात मानत नाही. उलट या क्षेत्रात लाजो माझी
गुरु आहे, असे मी जाहीररित्या मान्य केले होते. इथेही ज्या ज्या सूचना चांगल्या मनाने केल्या
जातात त्यांचे मी स्वागत करतोच आणि गरज वाटल्यास मी बदलही करतो. त्यात लाजिरवाणे ते
काय ? पण अर्धवट ज्ञानावर जर काही प्रतिक्रिया आल्या, आणि त्या सुद्धा काही विशिष्ठ आयडी कडून
तर मी काय म्हणून सहन कराव्यात ? वाटीभर काजू घेऊन त्यात १ टेबलस्पून तांदूळ घालून केलेल्या
पदार्थाला, खांडवी म्हणालेले मी सहन करायचे ?

आता मला मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेचा संदर्भ देणात येणार हे नक्की, मी जी प्रतिक्रिया दिली होती
त्यात एक म्हण वापरली होती पण त्यातलाही मला ग्राम्य वाटलेला शब्द वगळला होता.
एका संताच्या अभंगाचा दाखला दिला होता, तर त्यातला एकच शब्द उधृत केला गेला होता.
असो त्यानंतर तिथल्याच काही प्रतिक्रिया उडवल्या गेल्या आणि नंतर मी त्या पानावर गेलो
नाही. तसेही मी मायबोलीवर येतो तेव्हा, फारतर पहिलेच पान बघतो. त्यामूळे कुणी मी
लिहिलेल्या पाककृतीवर नंतर कुणी प्रतिसाद दिला असेल, तर माझ्या नजरेत तो येत नाही.

----

आता परत एका रुपकाचा आधार घेतो. रवांडा देशात जो नरसंहार झाला त्यावर ३ चित्रपट आले.
त्यापैकी हॉटेल रवांडा अनेक जणांनी बघितला असेल. त्यात मुख्य कलाकार अमेरिकन होते.
तो चित्रपट अंगावर येतोच पण याच काळावर आधारीत समटाईम्स इन एप्रिल आणि किनयारवांडा
हे दोन चित्रपट आले होते. त्यात स्थानिक कलाकारच होते. ते चित्रपट अगदी थेट चित्रण दाखवतात.

त्या देशातले दोन गट, एकमेकांच्या विरुद्ध ऊभे रहायला काय कारण झाले होते. तोपर्यंत ते एकत्रच
रहात होते, त्यांचे आपापसात विवाहही होत होते, पण त्यांच्यात एक कृत्रिम रेषा आखण्यात आली..
अत्यंत अनैसर्गिक अशी.

आणि पुढे जे झाले ते झालेच.
------------------------------------------------------------------------------------------------------
ज्या संकेतस्थळाशी गेली १५ वर्षे बांधलो गेलो होतो, आणि जिथे अनेक मित्र मैत्रिणी ( हो मैत्रिणी )
लाभले, त्यांच्याशी ऋणानुबंध जूळले, तिचा निरोप घेताना कटूता नाही.
एक जूनी मायबोलीकर म्हणाली, इतकी वर्षे सहन का केले ? खरंच, का केले ?
वर साधना म्हणतेय, कि माझ्या लेखनावर मालकी मायबोलीचीही होती, त्याच न्यायाने जे,
इथे भले बुरे लिहिले गेले, त्याचीही मालकी मायबोलीचीच आहे.

मला पाककलेतले फार काही येते असा माझा समज अजिबात नाही, तरीही माझी कुठलीही
पाककृती हवी असेल, याच किंवा इतर कुठल्याही बाबतीत माझी मदत हवी असेल,
तर मी सदैव उपलब्ध असेन.
मी इथले लेखन थांबवल्याने मायबोलीला काही फरक पडेल, या भ्रमात मी
नाही. सकस आणि दर्जेदार लेखन इथे होतच राहिल. पण अगदी कालच्या
तारखेपर्यंत चालू असलेली मुजोरी थांबेल का ?

या लेखात मी कुणाचेही ( म्हणजे घेऊ नये त्यांचे ) नाव घेतलेले नाही. तरीही हा लेख इथे
राहणे, अनेकांना अडचणीचे वाटेल. हे माझ्यातर्फे सत्यकथन आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रेयी या लेखाची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.

बरेच गैरसमज दूर झाले आणि या सर्व प्रकरणाची दुसरी बाजूदेखील समोर आली.

भरत. आणि दिनेश. यांचे त्या लेखावर झालेले वादही दिसले आणि आता त्यांनी दिनेश. यांची बाजू घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल एका विशिष्ट गटातील आयडींना घालवून देण्याचे मिशनचाही उलगडा झाला.

तुमचे व त्यांचे मागच्या जन्मातले भांडण आमी पायलेय. शेवटी तुमचा आय क्यू कमी असल्याने त्यानी तुमचा नाद सोडला.
<<
एक कुतुहलात्मक शंका : देशी यांचा मागचा जन्म कोणता?
एक निरागस विनंती : आयक्यू काढणे सोडा की राव. त्यावरून तर इतकं रामायण सुरु आहे.

बाकी २ अन ३ आकडी सदस्यता क्रमांक असलेल्या आयड्या येऊन लिहिताना पाहून लय विंटरेश्टिंग वाट्टंय.

माबोवर काही शब्द लिहिले किबत्याचे रूपांतर smily मध्ये होते,
जसे की " आ*रमो*" तसे बहुतेक लौकरच "IQ" लिहिले कि स्मायली उमटणार Happy

दिनेश, तुमचे धागे आवर्जुन वाचायचो. बचेंगे तो फिर मिलेंगे.

सगळे साद प्रतिसाद वाचायला वेळ नाही. फक्त यावरून धडा घेऊन सर्वानी मायबोली चा दर्जा उत्तम ठेवायला मदत करावी ही मनोमन प्रार्थना!

अच्छा सुलुचे पोस्ट आहे होय ते . शेवटच्या वाक्यामुळे शेवटी पडदा टाकण्यापूर्वीचा डायलॉक मारायला वेमा आले की काय असे वाटले. हल्ली पोस्ट वाचून झाल्यावर कोणाची आहे ते कळते. त्यामुळे एक फायदा आहे. पूर्वी नाव वाचूनच पोस्ट वाचण्यापूर्वीच ही पोस्ट झोडपायची आहे हे ठरत असे. आता पूर्ण पोस्ट वाचल्यावर मग नाव वाचून ठरते की पोस्ट म्हणण्यापेक्शा माणूस झोडपायचा की नाही ते ! Happy

एक निरागस विनंती : आयक्यू काढणे सोडा की राव. त्यावरून तर इतकं रामायण सुरु आहे.
>> अशे कशे अशे कशे ? आय क्यू वरूनच तर तुमचे प्याकेज कळते ना. आणि प्याकेज वरून तुम्हाला झोडायचे की नाही ते ठरवता येते. पर्तेकाने आपापला आय क्यू काढून तो आधार कार्डासारखा नमूद करीत जावा. माझा ५० च्या आसपास हय .

एक कुतुहलात्मक शंका : देशी यांचा मागचा जन्म कोणता?
>> ह्या: ह्या: काय राव म्हस्करी कर्ता? डबल रोल भौ डबल रोल... मत्स्य, कच्छ ,वराह, वामन लै औतार त्याचे म्हाराज्या.

असूं द्या. आजचा वग डुप्लिकेट आय डी अथवा मल्टिपल आय डी नसून वेबमास्तर तुम्हारा चुक्याच असा आहे. हवाहवाइ उर्फ हह ची उणीव जाणवते ..

हुश्श .. बाईंच्या लिंकवरून 'तो ' सगळा धागा वाचून काढला बुवा एकदाचा. ' लुगडं ब्रिगेड ' एकदम जोसात . (लुगडं ब्रिगेड हा शब्द कुणी काढला होता बरे? मिलिन्दा, वैद्यबुवा उर्फ नयनीश की आनखी कोणी? बॅटरी मारा ! )

लुगडं ब्रिगेड >>> बुवांचा जन्म व्हायच्या लै आधीपासून हा शब्द आहे. बहुतेक मिल्यानेच काढला होता तो.
बाकी या धाग्यावर कंधे के उपर कंधा आणि बंदूक के उपर बंदूक असे चालू आहे.

@दिनेश, वुइथ ऑल ड्यु रिस्पेक्ट टू यू,: या उपरोल्लेखित उदाहरणात कोण टिपापा मेंब्र आहेत आणि कोण नाहीत ते पण मांडून टाका. आता तुम्ही सगळंच लिहिलं आहेत तर मोघम या विदुषी अन त्या विदुषी का करता? जर सगळ्याच विदुषी टिपापावरील असल्या तर तसे वरती हेडरात लिहा.

दिनेशच्या लेखनाची मलाही गंमत वाटते आणि त्याच्या पाककृतींचे कौतुकपण. जिथे एखादी पाकृ आवडते वा फोटो आवडतो तिथे तसे नमूदही केले आहे. जिथे त्यांच्या लेखनाच्या शैलीची गंमत वाटते तशी खिल्ली उडवली आहे. खिल्ली उडवणे हे अर्थातच गप्पांच्या ओघात होणार. ते दिनेशच्या धाग्यावर जाऊनच करावे अशी सक्ती का? जर खिल्ली उडवायची नसेल तर प्रशासनाने तसे सरळ लिहावे. कौतूक करा, खिल्ली उडवू नका म्हणुन. खिल्ली किती उडवायची त्याचेही निकष द्या. नाहीतर सरळ लिहा इथे फक्त गंभीर चर्चा होतील.

नताशाने केलेल्या कवितेतील पाकिस्तानी मीठ हा शब्द मी अफगाणी मीठ, बांग्लादेशी मीठ असा असता तर जसा वाचला असता तसाच वाचला. त्यातून पाकिस्तानचे मीठ खाल्ले आहे वगैरे अर्थ माझ्या डोक्यात आला नाही. तो नताशांच्या डोक्यात होता की नाही ते माहिती नाही. आणि पाकिस्तान आपलाच भाऊराष्ट्र असल्याने तो काही अपमान करणारा शब्द नाहिये असे इथले बंदूकधारी (ज्यांनी दिनेशच्या खांद्यावर बंदूक धरली आहे ते) आनंदाने नमूद करतील.

मी गेल्या ३-४ वर्षापासून टीपापावर बऱ्यापैकी रेग्युलरली जातो. टीपापा मला कार्टून स्ट्रीप सारखं वाटतं, जिकडे मजा, टिंगल करून घ्यायला ही मजा येते. अनेकदा मायबोलीवर आलेल्या एखाद्या बीबी वर तो आवडल्याची प्रतिक्रिया देऊन टीपापा वर त्याचं विडंबन किंवा एखाद्या व्यक्तीची काही सिग्नेचर असते, लकब असते त्याची टिंगल करत केलेल्या कमेंट जाम मजा आणतात. एखाद्या व्यक्तीचं (अनेकदा आवडत्याही) क्यारीकेचर पाहिलं की जस मनापासून हसू फुटतं तसं. दिनेश यांच्या अनेक रेसिपी आवडल्याचे मी ही लिहिलं आहेच, आणि प्रत्येक फोटोत केचपच्या रेघेची नक्षी, किंवा रेसिपीत ज्याचा संबध नसतो त्याचं लावलेलं पाल्हाळ जाम फनी वाटते त्या बद्दल चिक्कार हसलो ही आहे. आजही हसतो. त्यात नक्की काय चुकीचं आहे ते कोणी सांगेल का?

दिनेश यांनी कोतबो काढला ते ठीकच आहे, ज्याचा त्याचा प्रश्न. आपले धागे उडवले ते ही ठीकच, अगेन ती त्यांची मालमत्ता आहे. पण या दोघांचा परस्पर संबध जोडून, (मागील गोष्टी उकरून काढू नका, ही खाजगी जागा आहे हे वेमांनी स्पष्टपणे सांगूनही) दहा पंधरा वर्षांपूर्वीच्या गोष्टी उकरून काढून त्यावर आपल्या रेसिपी लेवरेज ठेवून टीपापाला उडवा, म्हणून धरणे धरणे मला अजिबात पटत नाही. अत्यंत चुकीचा पायंडा पाडला जात आहे. यावर जुजबी मलमपट्टी म्हणून जर वेमांनी नताशाचा आयडी उडवला असेल (ज्या पोस्ट मध्ये काय वावगं होतं हे मला आजही समजलेलं नाही) आणि त्याने जर या सगळ्या प्रकरणाला क्लोजर मिळणार असेल तर मग हे टिपिकल भारतीय प्रथेप्रमाणे होईल.
अत्यंत घातक पायंडा.

बुवांचा जन्म व्हायच्या लै आधीपासून हा शब्द आहे. बहुतेक मिल्यानेच काढला होता तो. >> +१. लुगड ब्रिगेड हा पार्ल्यात असलेल्या महिला मंडळाला उद्देशून काढलेला होता, त्यावेळी त्याला रॉबिन हूड ने वर वापरलेले कनोटेशन नव्हते.

बाकी या धाग्यावर कंधे के उपर कंधा आणि बंदूक के उपर बंदूक असे चालू आहे. >> +१. एकदम पटले.

भरत. आणि दिनेश. यांचे त्या लेखावर झालेले वादही दिसले आणि आता त्यांनी दिनेश. यांची बाजू घेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल एका विशिष्ट गटातील आयडींना घालवून देण्याचे मिशनचाही उलगडा झाला.

>> येडं का खुळं पावणं तुमी म्हनायचं. भरत यांनी कोणाचेही आय डी घालवून देण्याचे मिशन राबवलेले नाही. जे गेले ते त्यांच्या तोंडाळपणामुळे गेले. ते तरी मागे उभे राहून उगी उगी .. शांत शांत गदाधारी शल्यक शांत असे पुटपुटत असल्याचे (प्रॉम्प्टरचे वाक्य ऐकू यावे तसे ) ऐकू येत असे. पण लोक ऐकत नाहीत ना. गेलेच क्रीजच्या बाहेर फटके माराइले. . मंग आडमिन ने उडिवल्या बेल. फटका तर बसला नाईच पन डग आउट मंदी बसायची पाळी आली कोक पीत. बरं हेच पर्तेक इनिंगले बाप्पू. भरत काय करणार? ते आपले गावस्करसारके संबूर पडणार्‍या इकेट पघत र्‍हायले. बरं तेंचा ख्योळ कसा तं पर्तेक शॉट ' ऑल अलाँग द ग्राउन्ड " . ' इन द एअर' ची भानगडच नाही. परिणाम ६० ओव्हर मंदी नाबाद ३६ ! ते असूंद्या
बरं ' तिकडच्या' आय डी घालवायचे मिशन कसे राबवणार ? तिकडे सगळे ' प्रोटेक्टेड टेनन्ट्स' बरं इकडं बेल उधळाव्यात , कॅच घ्यावा तर अंपायर नेमके उलटीकडे तोंड करून स्कोअररशी खाणाखुणा करण्यात दंग. त्यामुळे भरतला दोष देऊ नका. थोच फ्रकार थिकडे म्हंजी वाघा बॉर्डरच्या पलिकडे. तिथे एक बोरूबहाद्दर ' अहो हे चांगले नाही , सरकार टिकवायचे अशेल तर माणसे टिकली पाहिजेत , कड्यावरून डोकावू नका' असे फक्त स्वतःलाच ऐकू येईल एवढ्या आवाजात बोरू नाचवून म्हणायलेत. वात्रट कार्टी कड्यावरून पडलीच. अर्थात पुन्हा चढून मागच्या बाजूने वेगळे टी शर्ट घालून आली ते सोडा...

टिपापा (बिटरगाव) बद्दल फार पूर्वी मनात अढी असायची. नंतर तेथे जाऊ लागल्यावर एकंदर मजेची कल्पना आली. एखाद्या वाहत्या पानावर, तेही ज्याचे सदसयत्व खासकरून घ्यावे लागते, तेथे अशी थट्टामस्करी चालणे हे मला तेव्हाही थोडे नकोसे वाटायचे. म्हणजे मी जायला लागल्यानंतर आणि मजा येऊ लागल्यानंतरही! त्यामुळे दिनेश ह्यांच्यावरील थट्टेत कधी सामील होऊ शकलो नाही. मुळातच मूळ धाग्याखाली काय म्हणायचे ते म्हणावे हे माझे मत मी येथे जॉईन झाल्यापासूनचे होते व नंतर कधीतरी तेही गढूळ झाले. पण टिपापा टीम मला नेहमीच 'ऑस्सम' वगैरे वाटली कारण त्यांच्या प्रतिक्रियांमधील (तेच ते) आय क्यू की काय हे मला फार भावायचे. दिनेश ह्यांच्या दुर्दैवाने ते 'तेच ते' अनेकदा त्यांच्याविरुद्ध वापरले गेले ह्याचे वाईटही तेव्हाच वाटायचे. पण एकुणातच मी टिपापा विरुद्ध दिनेश ह्यात कोणालाच चूक म्हणण्याच्या पोझिशनमध्ये नाही. दिनेश ह्यांचे अमाप फॅन्स आहेत आणि ते वाहत्या पानाकडे दुर्लक्ष करू शकतात. तसेच टिपापाला दिनेश सोडून इतर अनेक उद्योग असायचे आणि ते केलेही जायचे. तिथे कोणताही एककलमी कार्यक्रम दिसायचा नाही.

ह्या लेखाचे प्रयोजन पटले नाही. अश्या लेखांवर दोन्ही बाजूंचे लोक आपापली व्हर्जन्स मांडत राहणार आणि पुन्हा तेच होणार असे वाटत होते व काही प्रमाणात ते सुरूही झालेले आहे.

इतकेच म्हणावेसे वाटते की मा. वेमांनी सध्या हाती घेतलेला उपक्रम साधारण दर महिन्यातून एकदा दोन एक दिवस हाती घेतला तर वातावरण नेहमीच नियंत्रणात राहील. चु भु द्या घ्या

अअअ Rofl
कुठेही कोणीही प्रोटेक्टेड नाहीये मायबोलीवर - हे मी तुम्हाला सांगायला नको. पण पोस्ट लै फनी!! Happy

तुमच्या त्या पानपताच्या कॉमेन्टरीची आठवण झाली! Lol

३अ Biggrin

ट्रिपल ए Rofl
वात्रट कार्टी कड्यावरून पडलीच. अर्थात पुन्हा चढून मागच्या बाजूने वेगळे टी शर्ट घालून आली ते सोडा...>>>>>> Rofl

हे बिटर्गाव की टीपापा कुठे आहे कळेल का ? मी ते कधी वाचलेलेच नाही पण दिनेशच्या लेखाची जी लिण्क आहे त्यावरून तिथली मंडळी किती अ‍ॅरोगण्ट असलीपाहिजे त याचा अंदाज येतो.

≥>>>>>>
कुठेही कोणीही प्रोटेक्टेड नाहीये मायबोलीवर - >>>>
यात राहिलेला "सध्या" ऍड करतो Wink

>>>अर्रर्र, माझे पोस्ट उडवलेले दिसते आहे - त्यावर मी टीपापा चा चांगला इतिहास लिहीला होता. असो.----
नंद्या४३, मला वाटले तुम्ही उडविले पोस्ट. पण तुम्ही नाही म्हणजे वेमांनी उडवलेले दिसतेय. का बरे त्यांना इतिहास घाईघाईने काढुन टाकावा लागला? घाबरण्यासारखे काय लिहिले होते तुम्ही? मीच एकटीने वाचलेली दिसतेय ती पोस्ट (वेमा सोडुन). बायस्ड अ‍ॅप्रोच कधीच जाणर नाही याचीच ही पावती समजावी झाले.

हे पान पहायची परवानगी नाही.

Submitted by webmaster on 18 July, 2010 - 20:15
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.

बेफिकिर, बर्‍याच दिवसानी पोस्ट पटली तुमची, ती ह्या करता की उशिरा का होईना तुमच्या लक्षात आले की टिपापा गृप वर असं काही फार एक मेकांचे पाठीराखे म्हणून कोणी वावरत नाही. बर्‍याच वेळा बर्ड्स ऑफ अ फेदर ... ह्या न्यायाने बरेच विचार जुळतात आणि आपोआप पोस्टी पण सहसा अलाईनमेंट मध्येच असतात पण नेहमीच नाही. कित्येक वेळा ह्यातले मेंब्र एक मेकांच्या विरोधात होते, असतात. हे सांगायचं प्रयोजन, वर आरारा ह्यांनी काही विशिष्ट आयडी अगदी कोऑर्डिनेटड पोस्टी टाकत आहेत असा संशय व्यक्त केला त्यामुळे. येवढं को ऑर्डिनेशन वगैरे करुन उत्तरं द्यायची कोणाला पडलेली नाहीये. इट जस्ट हॅपन्स.

जाऊ द्या तिथे जाउन तरी काय सापडणार ? हेच वर चाललेले>>>> आजिबात नाही. आता तुम्ही न बघ्ता बाण सोडू नका ट्रिपल ए. Lol

येवढं को ऑर्डिनेशन वगैरे करुन उत्तरं द्यायची कोणाला पडलेली नाहीये. इट जस्ट हॅपन्स.
<<
सिरियसली?
हाऊ ओल्ड अ‍ॅम आय?

हाऊ ओल्ड अ‍ॅम आय?>> there we go again! Sorry I said anything. my mistake! Lol

ट्रिपल एंचं काही कळेना मला. डबल एजंट खेळू राहिलेत की काय? Lol

पॉझिटिव्ह कथा प्रतिसाद वाचले सर्व.... भयंकर आहे सगळं,
टार्गेटेड harrasament, मेंटल torture केले आहे
पोलीस कम्प्लेंट होऊ शकली असती....

Pages