मी दिनेश विश्वनाथ शिंदे....

Submitted by दिनेश. on 10 May, 2017 - 08:25

मी दिनेश विश्वनाथ शिंदे....
मी ऑगस्ट २००१ पासून मायबोलीचा सभासद आहे ( माझ्या प्रोफाईल मधली तारीख चुकलेली आहे, कारण
जून्या मायबोलीवरून डेटा घेण्यात काहीतरी गल्लत झाली असावी. )
मी माझ्या पाककृती या संकेतस्थळावरुन का मागे घेतोय, त्यामागची माझी भुमिका.
ही कैफियत नाही, आरोपपत्रही नाही. आहे ती निव्वळ माझी भुमिका.

१) पहिल्याप्रथम, भारतीय नागरिकांबद्दल अभिमान असणे वगैरे..

तामाम भारतींयाबद्दल केलेले एक खोडसाळ विधान हे कदाचित निमित्त झाले असेल, पण ज्या बाबींबद्दल मी
संवेदनशील आहे, त्यापैकि हि एक. पुर्वीदेखील असे प्रकरण झाले आहे.
त्यावेळी सगुणा या आय डी ने, मुलगा होण्यासाठी काय उपाय करावेत, असा बीबी उघडला होता. त्यावर इथल्या
काही जेष्ठ सभासदांनीही प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. कुणाला त्यात काही आक्षेपार्ह वाटले नव्हते.
त्यावेळी " बेटी बचाओ आंदोलन" वगैरे सुरु झालेही नव्हते पण गर्भनिदान चाचणीवर भारतात बंदी आली होती.
( भारताबाहेर अनेक देशांत नव्हती ) तरीही भारतीय भाषेत असलेल्या एका संकेतस्थळावर अशी चर्चा व्हावी,
हे मला अजिबात पटले नव्हते. त्यावर इथल्याच एका सभासदाने, फारसे सिरियसली घेऊ नकोस, ओल्ड वाईव्ज
टेल्स एवढेच याचे महत्व आहे. असे मला सांगितले होते. तरीही मी आग्रही राहिलो, आणि तो बीबी नंतर बंद करण्यात आला.
त्यामूळे एखाद्या तत्वासाठी माझा आग्रह आजचा नाही.

२) मेघना पेठे यांचे पुस्तक, नतिचरामी

या पुस्तकांची अत्यंत व्यापक प्रमाणावर जाहीरात करण्यात आली होती. भारतीय साहित्याचा
इतिहास बदलवणार वगैरे दावे करण्यात आले होते. हे पुस्तक मी वाचले. त्यापुर्वी या लेखिकेच्या
काही कथाही वाचल्या होत्या.
एकंदर पुस्तक वाचल्यावर मला ते अजिबात आवडले नव्हते आणि त्यब्बद्ल मी इथे लिहिले. आता सर्व संदर्भ
आठवत नाहीत, पण दोन उदाहरणे आठवताहेत ती लिहितो.

पुस्तकात असे विधान आहे कि मुंबईतील फोर्ट मधे पारश्यांची जी विहिर आहे, त्यात पारसी लोक प्रेते टाकतात.
हे विधान अत्यंत खोडसाळ आहे. ती विहीर आणि त्या विहीरीतले पाणी हे पारसी लोकांसाठी अत्यंत पवित्र आहे.
फोर्ट मधल्या अनेक इमारतीत पुर्वी पाणीपुरवठा होत नसे ( तशी सोयच नव्हती ) अनेक पारसी केवळ त्याच विहिरीचे
पाणी पित असत. आणि मी त्या काळात फोर्ट विभागात अनेक वेळा जात असे म्हणुन हे मला माहीत होते.
मुंबई विद्यापिठाच्या कुंपणालगत पण अशी विहीर होती ( अजूनही असेल ) आणि तिथूनही प्यायचे पाणी
पुरवले जात असे. ( कारण वरचेच, अनेक इमारतीत पाणी पुरवठ्याची सोय नव्हती. ) आणि पारसी लोक,
त्यांचे मृतदेह, एका अत्यंत पवित्र भावनेने, टॉवर ऑफ सायलेंस मधे ठेवतात. त्यामूळे लेखिकेचे हे विधान अयोग्य होतेच.

त्याच पुस्तकात आणखी एक बेधडक विधान असे होते कि, फोर्ट मधे गुलाबाची फुले विकणारी मुले, ती फुले
थडग्यावरुन उचलून आणतात. हे पण एक खोडसाळ विधान होते. ( आजही के रुस्तम च्या बाहेर, ती मुले अत्यंत
निगुतीने फुले नीट करताना दिसतील )

आणि एकंदरच पुस्तकाबाबत बर्याच न पटणार्या गोष्टी होत्या, त्याबद्दलही मी तीव्र नापसंती व्यक्त केली. आणि
ती करताना, लेखिकेचाच " क्लायमॅक्स" हा शब्द वापरला. झालं, त्यावरून या सभासदांचा पापड मोडला.
म्हणजे त्यांच्या विरोधात मत नोंदवायचा इथे कुणाला अधिकारच नाही जणू. त्यापुर्वी प्रत्यक्ष भेटलेल्या आणि परीचित
असलेल्या एका कवियत्रीने पण माझ्याशी अबोला धरला होता. पण पुढे माझ्या चुलतभावाच्या अपघातानंतर
स्वतःहून सांत्वनाचा प्रतिसाद दिला. सध्या ती मायबोलीवर दिसत नाही. या संपूर्ण ग्रूप माझ्या विरोधात
जायचे कारण हे. त्यापुढे लेखिकेची काही पुस्तके प्रसिद्ध झाली का, किंवा काय इतिहास घडवला ते मला माहीत
नाही. पण इथे मात्र इतिहास घडला.

३) पित्त, गुरुवर्य डॉ. शरदीनी डहाणूकर आणि मी

डॉ. डहाणूकर माझ्या लेखनातील गुरु. त्यांच्याबद्दल चार शब्द लिहायला हवेत. २५ वर्षे अलोपथीची
प्रॅक्टीस करून त्या आयुर्वेदाकडे वळल्या होत्या. पण त्यांना इतर अनेक विषयात रस होता आणि
त्या विषयांवर, खास करुन झाडांवर त्या महाराष्ट्र टाईम्स मधे लेख लिहित होत्या. त्यासोबत आमच्या
कॉलनीत राहणारी मृदुला नाडगौडा हिने काढलेले सुंदर फोटोही असत. त्यांचा मी चाहता होतो आणि आहेही.

१९९६ - १९९८ या काळात मी नायजेरियात होता. तिथेही मी त्यांचे लेख वाचतच असे ( तेव्हा इंटरनेट नव्हते,
मी वर्तमानपत्रे कुरियर ने मागवायचो ) तिथे असताना मला यलांग यलांग ( हे नाव तेव्हा माहीत नव्हते )
या झाडाची ओळख झाली. त्यांच्या कुठल्या लेखात या झाडाचा उल्लेख नव्हता ( हे झाड भारतात मी
त्यापुर्वी बघितले नव्हते. ) म्हणून कौतूकाने मी त्यांना त्या झाडाचा फोटो आणि एक पत्र पाठवले. पत्रात
अर्थात त्यांच्याच काही लेखांचा उल्लेख होता. त्या उत्तर देतील, अशी अपेक्षाही नव्हती, पण त्यांनी तत्परतेने
उत्तर पाठवले, माझ्या चार ओळींचे खुप कौतूक केले आणि चक्क भेटायला बोलावले.

पुढच्या भारतभेटीत मी त्यांना भेटलो. तो पर्यंत त्यांनी झाडांवरचे लेखन थांबवले होते आणि पाककलेवरच्या
लेखनाकडे वळल्या होत्या. मी तिच तक्रार केली तर त्या म्हणाल्या, कि आता तू लिहायला सुरवात कर.
मी माझा एक लेख, लोकसत्ता कडे पाठवला, पण तो प्रसिद्ध होईपर्यंत त्यांचे निधन झाले होते.

झाडांबद्दल, पुढे प्रा. महाजन, प्रा. घाणेकर वगैरेनेंही विपुल लेखन केलेय, पण तरीही डॉ. डहाणुकरांची
मिश्किल शैली, एकमेव अशीच आहे. त्यांचे बोलणेही असेच मिश्किल होते. सहज बोलता बोलता त्यांनी
मला विचारले कि तू पित्त प्रकृतीचा का ? मला तेव्हा ते नीट कळले नाही, पण तरीही त्यांनी माझ्याबद्दल
त्यांचे काही आडाखे सांगितले ( उदा. मला उपवास सोसत नाहीत वगैरे ) आणि ते खरे होते.

पुढे एका लेखाच्या निमित्ताने मी ते आडाखे इथे लिहिले. ते सत्य असल्याने, पित्त प्रकृतीची माणसे ते
सहज स्वीकारणार नव्हतीच. झालं, त्यावरून पण इथे वादळ. एका विदुषीने तर थेट असा आरोप केला,
कि माझा कुणाबद्दल तरी आकस असणार म्हणून मी असे लिहिले. ( आणि त्यांची प्रकृती कुठली, हे मला
माहीत असायचे काही कारणच नव्हते. ) काय काय लिहिले गेले इथे माझ्याबद्दल.

पुढे, डॉ डहाणूकरांच्या " स्वास्थ्यवृत्त " या पुस्तकातील पानांचे स्कॅन इथे दिले. मी केलेली बहुतेक विधाने
त्या पुस्तकातीलच होती. त्या लेखाला मी, " हा सूर्य आणि हा जयद्रथ" असे नाव दिले होते. एवढा सबळ
पुरावा, या लोकांच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. पुढे मग गंमतच झाली, तो लेखच इथून गायब करण्यात
आला. त्यानंतर तो गूगलवर दिसत होता, पण इथे दिसत नव्हता. हे त्यांचे कर्म, त्यांनाच जाचत राहिले.
मग त्यांच्याच एका गटग च्या चर्चेत, गटग ला जयद्रथ येणार आहे का ? अशी चर्चा झाली होती. आहे कि नाही मज्जा ?

४) वर्षा विहार आणि मी

मायबोलीचे वर्षा विहार सुरु होण्यापुर्वी मी स्वतः एक वर्षा विहार आयोजित केला होता. क्षिप्रा, सोनचाफा,
बॉम्बे व्हायकिंग वगैरे काही मोजके मायबोलीकर त्याला हजर होते. त्यानंतर सिंहगडावर एक सहल गेली होती,
त्यातही मी सहभागी होतो, तो जरी पहिला वर्षाविहार मानण्यात आला असला तरी त्याला मायबोलीचे नाव नव्हते,
ती प्रथा नंतर सुरु झाली.

तोपर्यंत मायबोलीवर अत्यंत मोकळे वातावरण होते आणि त्याला अनुसरून मी माझ्या एका नव्या मैत्रीची कबूली
दिली होती. ती पुढे मायबोलीवर आली, पण आमच्या मैत्रीबद्दल इथे एवढ्या घॄणास्पद चर्चा झाल्या, कि तिने
मायबोली सोडली, ती कायमची. ती आजही माझी अत्यंत जिवलग मैत्रिण आहे.

त्यानंतर मायबोली वर्षाविहार सुरु झाले. त्यावेळी आयोजकांची चर्चा इथे न होता, याहू ग्रूप वर(सुद्धा) व्हायची. तर
इथल्या साळसूद चर्चेत मी भागही घेत असे. पण तिथे माझ्याशी गोड गोड बोलणारे सदस्य माझ्या माघारी
माझ्या पुरुषार्थाची चवीने चर्चा करत होते. म्हणजे सगुणा फार्म मधल्या म्हशीवर दिनेश बसला म्हणायचा कि
बसलं म्हणायचं अशी. आहे कि नाही मज्जा ? म्हणजे ज्या गोष्टीची चिंता माझ्या बायकोने करायची, त्या ह्या सर्व
जणी करत होत्या. ही सर्व चर्चा मला, तिथल्याच एका सदस्याने पाठवली होती. मी प्रतिक्रिया दिली नाही,
पण त्यानंतर कुठल्याही व वि ला हजेरी लावली नाही.

या पातळीवरची चर्चा करण्यासाठी त्यांना एक क्लोज्ड ग्रुप हवा असतो. आणि तो इथे उपलब्ध करुन दिला
जातो. आनंद आहे.

५) मैत्री आणि यांची मते

स्त्री पुरुष मैत्रीबद्दल विद्वत्तापुर्ण आव आणून चर्चा करणार्या इथल्या सभासदांची मानसिकता सांगणारा, एक किस्सा.
मायबोलीवरच्या एका उपक्रमाच्या निमित्ताने, एक जूनी सभासद परत इथे आली. तिचे स्वागत करताना मी
"जूनी मैत्रिण" असे शब्द वापरले. हे शब्द माझ्या वैयक्तीक आयुष्यात तर अनेक स्त्रिया आणि मुलींबद्दल
वापरेन.
तर या दोन शब्दांवरुन, इथल्या सभासदांनी तिला जीव नकोसा केला. तिची मानसिक अवस्था काय केली असेल
याची मला तर कल्पना आहेच पण आणखी एका सभासदाला आहे.
पुढे याच सभासदाने, या ग्रुपचे वकीलपत्र घेतले. हि बाब तर आणखी नवलाची.

६) मी आणि माझ्या कथा

मायबोलीवर मी सुरवातीला अनेक कथा लिहीत असे. त्या काळात त्या खुप लोकप्रिय पण झाल्या
होत्या. गिरीराज सारखे माझे मित्र तर मला केवळ माझ्या कथांमुळे लाभले होते. तो आजही
माझा मित्र आहे पण मी आता कथा लिहित नसल्याने, तो मायबोलीवर फिरकत नाही.

मी आजही इथल्या कथा ( क्रमशः नसतील तर ) वाचतो. काही अपवाद वगळले तर मला त्या एका
ठराविक वर्तुळात फिरताहेत असे वाटते. एका कथेत तर हुंडा वगैरे पण उल्लेख होता. शक्यतो,
नकारात्मक प्रतिसाद द्यायचा नाही, हा माझा विचार असल्याने, मी तिथे काहीच लिहिले नव्हते.

चौदा वर्षांपेक्षा जास्त वर्षे मी आफ्रिकेत घालवली. इथले माझे सहकारी माझे जिवलग मित्र आहेत.
एकदा आपला मानल्यावर ते माझ्यावर खुप विश्वास ठेवतात आणि आपले प्रश्न आणि अनुभव
अत्यंत मोकळेपणानी माझ्याशी शेअर करतात. ठराविक भारतीय संकल्पनाना छेद देणारे
आयुष्य हे लोक जगतात. यांच्या आयूष्यावर कथा लिहिण्याचा प्रयत्न मी केला होता. त्यावर इथल्या
एका विदुषीने इतका थयथयाट केला, कि विचारता सोय नाही. माझ्यावर चक्क सेक्स्यूअल हरासमेंट
वगैरेचा आरोप. अरे प्रत्यक्ष ती मुलगी विश्वासाने मला सांगते ( अर्थात हे विषय आफ्रिकेत मोकळेपणी
चर्चिले जातात. ) या विषयावर आफ्रिकन देशात नाटकेही सादर होत असतात.
पण इथले वातावरण बघता ( ज्या प्रयोगात जेन फोंडा आणि व्हुपी गोल्डबर्ग सारख्या अभिनेत्री
सहभागी होतात ) त्या नाटकांच्या नावाचाही उल्लेख इथे करावासा वाटत नाही. त्या कथेवर
माझ्यातर्फे एका दुसर्याच सभासदांने या विदुषींना उत्तरे दिली होती, पण मी मात्र ना त्या बीबी कडे
परतलो ना कधी परत कथा लिहिली. इथले वातावरण प्रगल्भ व्हायला, माझी हयात पुरणार नाही
एवढे नक्की.. ( रच्याकने, एका चित्रपटासंदर्भात मी प्रगल्भ हा शब्द वापरला, तर तो देखील यांच्यासाठी
विनोदी ठरला. )

७) माझे ललित लेख.

पुर्वी मी भरपूर ललित लेखन करत असे. तेव्हा फोटो वगैरे द्यायची सोय नव्हती. आता मी ते देखील
बरेच कमी केले आहे, कारण तेच.
एक उदाहरण सांगतो. माझ्या नायजेरियातील वास्तव्याबद्दल मी लिहिले होते, त्या १० वर्षांपुर्वी लिहिलेल्या
लेखाचा फोकस होता, माझे मित्र. त्यानंतर अलिकडे मी माझ्या वेगवेगळ्या देशांतील घरांवर एक मालिका
लिहिली.
आता मूळ घटना अशी. माझ्या फ्रेंच मित्राने त्याच्या आफ्रिकन मैत्रीणीसाठी मला भारतातून साडी आणायला
सांगितली. ती मी नेली. तिथे नेल्यावर त्याने मला सांगितले कि तूच तिला नेसव, ते मला अवघड वाटल्याने
मी स्वतः साडी नेसून दाखवली. आता त्यात वावगे ते काय ?
आणि झाले एवढेच कि माझ्या दुसर्या लेखात, मी स्वतः साडी नेसल्याचा उल्लेख केला नाही. त्यात लाजण्या
सारखे काही नव्हते आणि मुद्दाम मिरवण्यासारखेही काही नव्हते. लेखाच्या अनुषंगाने जे रेलेव्हंट वाटले,
तेवढा उल्लेख मी केला. झालं, विदुषी खवळल्या. चक्क दहा वर्षापुर्वीच्या एका लेखाची लिंक घेऊन
हजर झाल्या ( आता त्यापुर्वी तिथे किती चविष्ठ चर्चा केली असेल, त्याची कल्पना करा. ) अरे बाबा, नाही
ना पटत आपलं. मग दूर रहा कि. मी काही कुठे रिक्षा घेऊन जात नाही, माझे लेख वाचा म्हणुन. कि प्रतिसाद
द्या अशी याचनाही करायला जात नाही.
बरं, आता या विदुषीबाईंची आणखी एक मजा. एका विषयाच्या लेखात मी माझी बाजू मांडताना एक
अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातल्या एका उतार्याचा संदर्भ दिला, तर तोच या बाईंना आठवेना.
मग मी त्या पुस्तकाचा स्कॅन दिला.. असो नंतर काय झाले, ते बघायला मी आलो नाही. तात्पर्य काय कि,
कधीकाळी मी लिहिलेल्या लेखातला संदर्भ यांना आठवतो. पण अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातला नाही.

असो, मी नंतर ललित लेखनही थांबवले.

८) युक्ती सुचवा आणि युक्ती सांगा

या बीबीवर स्वयंपाक करताना काही अडचणी आल्या तर त्यावर सल्ले दिले जातात. गेली
अनेक वर्षे मी पाककलेत प्रयोग करत असल्याने भरपूर अनुभव माझ्या गाठीशी आहे. आणि
त्यानुसार मी सल्ले देत असे.

तर त्यावरुन यांच्या ग्रुपवर माझा उल्लेख "वहिनोदा" असा करण्यात आला, आणि तो
उल्लेख त्यांच्याच पैकी एकीने मला सांगितला. मी उद्वैगाने तक्रार केली, पण त्याबद्दल
काहिही करण्यात आले नाही.

त्या उल्लेखात सहभागी असणार्या एका सभासदाने मात्र, मुद्दाम फोन करुन, दा, लहान
समजून मला माफ करा, असे सांगितले. पुढे आमच्यात काही कटूता राहिली नाही. पण
आता तिच सभासद इथे काही लिहित नाही. कारणांचा उल्लेखही तिला करावासा
वाटत नाही.

त्यानंतर मी फारश्या युक्त्या सांगायला तिथे गेलो नाही. धाकटी बहिण असणार्या एका
सभासदाने काही विचारले, तर सांगितले असेन, तेवढेच.
"भाकरीचे पिठ भिजवून फ्रीजमधे ठेवा आणि भाकरी करण्याआधी मळून घ्या" असे सल्ले
तिथे दिले गेले. तेवढे पाककौशल्य माझ्याकडे नाही. सो, माझा पास !!

९) रविवार सकाळ आणि ते

माझ्याबद्दलच्या विकृत पातळीवरच्या चर्चा मायबोलीवरच्या सो कॉल्ड क्लोज्ड ग्रुप पुरत्याच
मर्यादीत राहिल्या नाहीत. रविवार सकाळ मधल्या एका लेखावर, दिनेशदा असे नाव घेऊन,
माझे आणि माझ्या आफ्रिकन हाऊसमेड चे सबंध आहेत, असे सुचवणारा एक प्रतिसाद दिला
गेला. मी काही तो पेपर वाचत नाही, पण माझ्याच एका चाहत्याने, त्या बातमीची लिंक
मला पाठवली होती.

मीसुद्धा पाठपुरावा करण्याचे ठरवले. सायबर सेल कडे तक्रार केली. त्या बातमीची लिंक
आणि मी लिहिलेल्या इ मेल ची कॉपी मी इथे दिली होती. ती व्यक्ती कोण असेल, याचा
साधारण अंदाज होताच आणि त्यावर नंतर शिक्कामोर्तबही झाले. त्या व्यक्तीबद्दल कुठलिही
कार्यवाही करण्याची मला इच्छा नव्हती म्हणून मी ती तक्रार मागे घेतली.

तर यावरुन इथल्या एक विदुषी ( अरे यार, सगळ्याच विदुषी आहेत, आणि त्यांना क्रमांक
देण्यातही अर्थ नाही ) माझ्यावर खार खाऊन आहेत, का तर ती व्यक्ती कोण, हे मी उघड
केले नाही. याच विदुषी मी कधी काळी इथे केलेल्या माझ्या गौरवर्णाच्या उल्लेखावर नाराज
आहेत. आता तो कधी आणि कुठल्या संदर्भात केला होता, ते आठवतही नाही.
( पण चुकीचा नाहीच... आणि त्या बाई हा वारसा अगदी निष्ठेने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात.
विडंबनातील गोरेपणाचा संदर्भ आहे तो हा. फारेण्ड यांनी लिहिले आहे, कि असे संदर्भ नवीन
लोकांना माहीत नसतात. पण माझ्या बाबतीत मात्र सर्व संदर्भ असे पुढच्या पिढीपर्यंत
पोहोचवले जातात. )

त्यानंतर मी इथले दिनेशदा हे नाव टाकले ( हे नावाचे बारसे पण इथल्याच एका विदुषीबाईनी
केले होते. )

१०) मी इतरांवर केलेली टिका

एका सभासदाने, मी पण इतरांवर टिका करतो आणि ती त्यांनी वाचली आहे, असे लिहिले आहे.
मी ती सार्वजनिक ठिकाणी केली होती, आणि अर्थातच फार पातळी सोडून केली नव्हती.
आणि ती सातत्याने तर नक्कीच नाही.

त्यापैकी एक ऋन्मेष. त्याच्यावर विनोद केले होते. ते त्यानेही मनावर घेतले नाहीत.
दुसरे : प्रा. देवपूरकर. ते गृहस्थ एकाकी आणि आजारी असतात, असे मला कळले होते. त्यांची
विचारपूस देखील मी केली होती. त्यांच्या एका गझलेवर टिका केली होती, तर त्यांनी मला
गझलेतलं काय कळतं, असे विचारले होते ? नंतर मी कधीच त्यांच्या गझलेवर प्रतिसाद दिला
नाही. पण त्यांचे भरमसाठ लेखन सुरुच होते. नंतरही मी इतरत्र टिका केली होती, त्यावर
इथल्या एका विदुषींनी मला ओसीडी झाला आहे, असे थेट विधान केले होते ( थेट विधान, लक्षात
घ्या. ) त्याचा पुरावा देऊन मी तक्रार केली होती.. पण त्यांच्यावर देखील काहिही कार्यवाही झाली
नाही.
आणि राहिला बी ! अगदी पहिल्या वहिल्या दिवसांपासून तो माझा मित्र होता. आताच नाही तर
पुर्वीदेखील तो अनेक नावाने खोडसाळ लिहित असे. मी त्याला आव्हान केले होते आणि त्याने
स्वतःहून त्याची कबूली दिली होती. मला प्रत्यक्ष फोन करून त्याने माफी मागितली होती.
त्याच दिवसात डॉ. डहाणुकरांचे पत्र इथे अपलोड करायलाही त्यानेच मदत केली होती.

वैयक्तीक आयूष्यातले प्रॉब्लेम्स आणि एकटेपणा यांनी तो गांजला होता. त्याच्या इथल्या शेवटच्या
दिवसातही मी त्याच्या बाजूने ठाम राहिलो. आजही आम्ही फेसबूक वर मित्र आहोत. मायबोली
सोडून तो सुखी आहे. अत्यंत सुंदर असे फोटो, तिथे पोस्ट करत असतो तो.
आपल्याच घरातलं एखादं माणूस जर कुठल्या समस्येने ग्रासलेले असल, तर आपण
त्याला आणखी त्रास देतो का ? तो आणि मी ज्या काळात इथे सभासद झालो होतो,
तो काळ असाच जिव्हाळ्याचा होता. त्याला होणारा त्रास त्याच्याच शब्दात सांगायचे
तर बलात्काराइतकाच क्लेशदायी होता. त्याने जरूर इतरांचा अपमान केला असेल,
पण आपण मन मोठे केले नाही, हे देखील आहेच.
गेलेल्या लोकांबद्दल वाईट लिहायचे नाही, असा एक संकेत आहे. पण सत्य लिहायला हरकत
नसावी.

नताशा यांची आणि माझी ओळख असायचे काही कारणच नाही. माझ्या लेखनात काही
शुद्धलेखनाच्या चुका होत असतात. त्याबद्दल त्यांनी एकदा नापसंती व्यक्त केली होती
आणि मी त्यांची माफी मागितली होती.
त्याच्या रहमानीया या लेखावर प्रतिक्रिया देताना, मी त्याचे संगीत मला आवडत नाही,
असे लिहिले होते. मी लिहिलेल्या मुद्द्यांपैकी १ मुद्दा लता मंगेशकर यांचे मत होते.
माझ्या धोरणाप्रमाणे मी नंतर कधीच त्याच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया दिली नाही.

पण नंतर माझ्या एका लेखात, एक संदर्भ मला सापडला नव्हता तो त्यांनी शोधून दिला होता
आणि दुसर्या एक लेखात, चित्रपट संगीतातील प्रादेशिकता, यावर आमचे मतभेद झाले होते.
ते सुद्धा थेट नव्हेच, दोन्ही वेळेस त्यांनी स्वतःहून प्रतिक्रिया दिली होती.

त्यानंतर त्या माझा उल्लेख, जुनी खोडं असा करु लागल्या होत्या. मुद्दाम सविस्तर लिहिले
कारण, या एवढ्याश्या मतभेदाला नंतर कुठे खतपाणी घातले गेले, त्याची कल्पना येईलच.

आणि आता राहिल्या त्या माझ्या पाककृती.

आधी लिहिल्याप्रमाणे पाककृती लिहिणे हि माझ्यासाठी पॅशन होती. ( आहे आणि राहीलच )
पण त्याही कुणाच्या कुचेष्टेचा विषय का व्हाव्यात ? विडंबन हा साहित्यप्रकार मलाही आवडतो,
पण त्यातही एक आब राखलेला असतो. दृष्टीआड सृष्टी असे म्हणत मी कधी लक्ष दिले नाही,
पण जे समोर आले ते अत्यंत क्लेशकारक होते, शिवाय हे इथे सातत्याने होत होते ( आणि
ते होऊ दिले जात होते ) ते तर त्याहूनही क्लेशकारक आहे.

आणि याबाबतीतही काही लिहून मोकळे झालेच पाहिजे. मी रुढ अर्थाने भाविक नाही. पण
संतसाहित्य माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केनयातील वास्तव्यात मला तिथे अनेक भाज्या
सहजी उपलब्ध व्हायच्या. त्यातल्या अनेक भाज्या, भारतात ( निदान त्या काळात तरी ) सहज
मिळत नव्हत्या.

म्हणुन त्या भाज्यांची ओळख व्हावी म्हणुन मी अवघी विठाई माझी, हि मालिका सुरु केली.
प्रत्येक भाजी स्वतः शिजवून, तिची माहिती आणि फोटो असे त्या मालिकेचे स्वरुप होते.
तर विठाई हा शब्द सुद्धा कुचेष्टेचा विषय व्हावा ? आपला अपमान आपण सहनही करतो, पण
आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान, सहन करु ? डॉ. डहाणुकरांचाही असाच उपमर्द इथल्या
विदुषींनी केला होता.

याच मालिकेत, मी लीक या भाजीबद्दल लिहिले होते. स्पेलिंगवरुन देवनागरीत लिहायचे
झाले तर त्या भाजीचे नाव असेच लिहावे लागणार. आता मी ते नाव असेच का लिहिले असा
एक निरोप घेऊन एक विद्वान आले होते.. निरोप अश्यासाठी लिहितोय कारण, काल आमची
तिथे चर्चा झाली.. वगैरे सुरवात होती. या शब्दावरून त्यांना नेमके काय आठवले ते त्यांनाच
माहीत.

पाककृती मला काही अधिकार आहे असे मी अजिबात मानत नाही. उलट या क्षेत्रात लाजो माझी
गुरु आहे, असे मी जाहीररित्या मान्य केले होते. इथेही ज्या ज्या सूचना चांगल्या मनाने केल्या
जातात त्यांचे मी स्वागत करतोच आणि गरज वाटल्यास मी बदलही करतो. त्यात लाजिरवाणे ते
काय ? पण अर्धवट ज्ञानावर जर काही प्रतिक्रिया आल्या, आणि त्या सुद्धा काही विशिष्ठ आयडी कडून
तर मी काय म्हणून सहन कराव्यात ? वाटीभर काजू घेऊन त्यात १ टेबलस्पून तांदूळ घालून केलेल्या
पदार्थाला, खांडवी म्हणालेले मी सहन करायचे ?

आता मला मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेचा संदर्भ देणात येणार हे नक्की, मी जी प्रतिक्रिया दिली होती
त्यात एक म्हण वापरली होती पण त्यातलाही मला ग्राम्य वाटलेला शब्द वगळला होता.
एका संताच्या अभंगाचा दाखला दिला होता, तर त्यातला एकच शब्द उधृत केला गेला होता.
असो त्यानंतर तिथल्याच काही प्रतिक्रिया उडवल्या गेल्या आणि नंतर मी त्या पानावर गेलो
नाही. तसेही मी मायबोलीवर येतो तेव्हा, फारतर पहिलेच पान बघतो. त्यामूळे कुणी मी
लिहिलेल्या पाककृतीवर नंतर कुणी प्रतिसाद दिला असेल, तर माझ्या नजरेत तो येत नाही.

----

आता परत एका रुपकाचा आधार घेतो. रवांडा देशात जो नरसंहार झाला त्यावर ३ चित्रपट आले.
त्यापैकी हॉटेल रवांडा अनेक जणांनी बघितला असेल. त्यात मुख्य कलाकार अमेरिकन होते.
तो चित्रपट अंगावर येतोच पण याच काळावर आधारीत समटाईम्स इन एप्रिल आणि किनयारवांडा
हे दोन चित्रपट आले होते. त्यात स्थानिक कलाकारच होते. ते चित्रपट अगदी थेट चित्रण दाखवतात.

त्या देशातले दोन गट, एकमेकांच्या विरुद्ध ऊभे रहायला काय कारण झाले होते. तोपर्यंत ते एकत्रच
रहात होते, त्यांचे आपापसात विवाहही होत होते, पण त्यांच्यात एक कृत्रिम रेषा आखण्यात आली..
अत्यंत अनैसर्गिक अशी.

आणि पुढे जे झाले ते झालेच.
------------------------------------------------------------------------------------------------------
ज्या संकेतस्थळाशी गेली १५ वर्षे बांधलो गेलो होतो, आणि जिथे अनेक मित्र मैत्रिणी ( हो मैत्रिणी )
लाभले, त्यांच्याशी ऋणानुबंध जूळले, तिचा निरोप घेताना कटूता नाही.
एक जूनी मायबोलीकर म्हणाली, इतकी वर्षे सहन का केले ? खरंच, का केले ?
वर साधना म्हणतेय, कि माझ्या लेखनावर मालकी मायबोलीचीही होती, त्याच न्यायाने जे,
इथे भले बुरे लिहिले गेले, त्याचीही मालकी मायबोलीचीच आहे.

मला पाककलेतले फार काही येते असा माझा समज अजिबात नाही, तरीही माझी कुठलीही
पाककृती हवी असेल, याच किंवा इतर कुठल्याही बाबतीत माझी मदत हवी असेल,
तर मी सदैव उपलब्ध असेन.
मी इथले लेखन थांबवल्याने मायबोलीला काही फरक पडेल, या भ्रमात मी
नाही. सकस आणि दर्जेदार लेखन इथे होतच राहिल. पण अगदी कालच्या
तारखेपर्यंत चालू असलेली मुजोरी थांबेल का ?

या लेखात मी कुणाचेही ( म्हणजे घेऊ नये त्यांचे ) नाव घेतलेले नाही. तरीही हा लेख इथे
राहणे, अनेकांना अडचणीचे वाटेल. हे माझ्यातर्फे सत्यकथन आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ३ ह्यांच्या म्हणण्यात अनेक अंशांनी तथ्य आहे हे मी माझ्या मायबोलीच्या 6 वर्ष 11 months च्या सदस्यत्वाच्या अनुभवावरून सांगतो.

दिनेश हा आयडी आक्रस्ताळेपणा किंवा कांगावा करणार्‍यांपैकी नाही अशी माझ्या मनात तरी त्यांची प्रतिमा आहे.

बापरे दिनेशजी....ईतका मोठा ईतिहास आहे या सगळ्यामागे...
वाचुन खरच वाईट वाटले...संयम ठेवायला देखिल मर्यादा असते...

माबो वरच्या बर्याच चर्चेवर प्रतिक्रीया द्याव्याशा वाटतात, कधी काही लिहावसं वाटतं. पण ईथले काही धागे आणि त्यावरचा गोंधळ बघुन असं वाटतं की जाउ दे.कशाला फंदात पडायचं.उगीच आपण काही लिहिणार्,लोकांना काही वेगळंच वाटणार,लोकांनी चिडवलं तर आपण नाराज होणार्,त्यापेक्षा नकोच..आपलं लेखन्,आपलं मत आपल्याजवळ..असा माझ्यासारखा विचार करणारे देखिल खुप लोक असतील ईथ.

अजुन एक मला असं वाटतय की वेमा चोवीस तास ऑनलाईन राहुन प्रत्येक धागा आणि त्यावरची कमेंट नाही वाचु शकत त्यामुळे कुठलीही प्रतिक्रीया लिहिताना आणि मग पोस्ट करताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे की माझ्यामुळे कोणी दुखावले तर नाही ना जात.आणि जो धागा आवडला नाही, पटला नाही त्यावर कमेंट द्यायचा अट्टाहास कशाला..नाही ना आवडला मग नका ना बघु...नाही पटत तर नका करु कमेंट..प्रत्येक ठीकाणी आपलं मत मांडलंच पाहिजे असं नसतं...ज्याना आवडलाय ते बघतील....

दिनेशजी परत पाककॄती द्यायच्या की नाही..लिहायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय..तुम्हाला किती उबग आलाय या सगळ्या गोश्टी चा ते समजु शकतं.
तुम्ही परत लिहायला लागलात तर आम्हाला आनंदच होईल.

साधना,
तुम्ही उल्लेखलेला काहि लोकांचा
>>>>शा पापी माणसाला आता नवे मेंबर चांगला म्हणताहेत, भजनी लागताहेत, त्यामुळे यांचा पर्दाफाश करायलाच हवा हा जो आविर्भाव सतत दिसत राहतो त्याचे नेमके कारण काय? >>>>

हा attitude दुसऱ्या बाफांबद्दल सुद्धा दिसतो,
उदाहरणार्थ कोणी अड्ड्यावर ऍक्टिव्ह असणारा id, tpp वर वाद घालत असेल तर, सातींचा सैनिक आला, याला सातीनी छु केले असणार,
आपल्या पोसिशन, पैश्याचा प्रभाव पाडून ते (आरारा आणि साती) दुसऱ्या id ना provocative भाषा वापारायला भरीस पाडतात, आणि आपले id सुरक्षित ठेवतात वगैरे आरोप इकडे झाले आहेत.

>>>> उदा. दिनेशदा यांच्या एका धाग्यावर बहुदा "निकाल" या धाग्यावर गंभीर चर्चा चालू असताना कोणीतरी मुळव्याध, वगैरे विषय मुद्दामुन घुसवले होते. त्यामुळे पुढील काही प्रतिसाद अक्षरशः खिल्ली उडवणारे होते. त्यावरून काही सदस्यांनी आक्षेप घेतलेला दिसला परंतू तो विषय काही बंद झाला नाही. काहींची तर टिंगलटवाळी नेहमीप्रमाणे त्यावरून सुरु झाली. एकीकडे दिनेशदा पोटतिडकीने एका गंभीर विषयावर बोलू पाहत होते तर दुसरीकडे मुळव्याध वगैरे वर टवाळी चालू होती. अशा प्रकारला ट्रोल करणे म्हणतात <<<<<<

दिनेशदा अन माझे अगदी घनिष्ठ मैत्रिचे संबंध नसले तरी जे आहेत, ते दोन सद्गृहस्थांचे संबंध जसे असतील तितके नक्कीच आहेत. वर दिनेशदांच्या धाग्यावर (इसवीसन २००९ च्या ऑगस्टमध्ये, लक्षात घ्या.... हा २००९ सालचा संदर्भ दिलाय २०१७ मध्ये, किती अभ्यासू , नै? ) "मुद्दामहुन मुळव्याध वगैरे विषय घुसवले होते" असे म्हणले आहे ते अमान्य आहे. कदाचित दिनेशभौंनी देखिल त्यांचाच तो धागा अथपासुन इति पर्यंत वाचला तर ते देखिल अमान्य करतिल. कारण खिल्ली कशी उडवली जाते याचे माझ्याचबाबतचे मुळव्याधीसंदर्भातील घडलेले उदाहरण मी दिले होते, प्रत्यक्षातील खिल्ली व आक्षेप घेणे हे दिनेशदांनी हे इथे मांडलेच का /सहानुभुति मिलविणे वगैरे मुद्द्यावरुन होत होति हे धाग्यावर सुस्पष्ट दिसते आहे.
मात्र वरील २००९ मधिल माझ्या पोस्ट्स बद्दलचा २०१७ मध्ये घेतलेला आक्षेप दिनेशभाऊंना देखिल मान्य असेल, किंवा दुसर्‍या शब्दात "माझ्या विरुद्ध वापरुन घेणे त्यांना मान्य असेल", तर मग इथे लिहिणेच खुंटले.

शिवाय हा धागा लिंकसहित व इतके संदर्भ लिम्ब्याने दिलेच का, या आक्षेपास मी उत्तर देणार नाही, कारण २००९ चा अर्धवट व खोडसाळ असा संदर्भ २०१७ मध्ये आधीच गजोधर या आयडीने दिलेला आहे, तेव्हा त्याचे परिपूर्ण प्रकटीकरण/परिशिलन करणे भाग पडले आहे. दिनेशदा, याबद्दल माफी असावी.

धाग्याची लिंक http://www.maayboli.com/node/9726
आता ऑगस्ट २००९ चा संदर्भ २०१७ मध्ये देत जे काही "घडवुन आणायचा" प्रयत्न होतोय, त्यामागिल मूळ विचारधारा कुणाची असु शकेल, व असे करत राहणे हे कसल्याप्रकारचे "ट्रोलिंग म्हणायचे" हे वाचक अन वेमांनीच ठरवावे.
तसेच, http://www.maayboli.com/node/62490 या धाग्यावर limbutimbu या आयडीला पुरेसे कॉर्नर करता आले नाही, तर दिनेशदांच्या या चालु धाग्यावर जिथे माझा दुरान्वयाने संबंध नाहिये, तिथेही वरिल प्रमाणे खोडसाळ (गुळगुळीत दगड??? Proud ) उल्लेख करुन, नाव न घेता पण संशय निर्मिती करीत, एकतर्फी एका आयडी विरुद्ध वातावरण निर्मिती करण्याच्या या कृतिस "कारस्थान " म्हणावे वा नाही हे देखिल समजुन घेणे भाग आहे.

तेथिल पोस्ट्स इथे पुनरुधृत करतोय.
*****************************
दिनेश, तुमच्या आयुष्यात घडलेल्या एका वादळाची कहाणी तुम्ही इथे नाही मान्डायची तर कुठे?
तुम्हाला बसलेल्या ठेचा बाकी कुणाला माहीत करुन घ्यायचि गरज वाटत नसली, अन अशा गोष्टी (माझ्यासहित) इतर कित्येकान्च्या आयुष्यात घडायची सूतराम शक्यता दिसत नसली तरी घडलेल्या घटना कुणी सान्गुच नयेत अन कुणी वाचूच नयेत असे आहे की काय?
अन तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटना वाचून कुणी मायबोलीकर लगेच स्वतःची मने कुणाएका बाजूने पूर्वग्रहदुषित करतील इतकी का मायबोलीकरान्ची मने अन बुद्ध्या तकलादू आहेत?
किम्बहुना, आपल्यातच वावरणार्‍याच्या बाबतीत असेही घडत असू शकते हे माहिती करुन घेण्याची सन्धी मला वाटते की (घालून घेतली तर) अक्कलेत भर घालणारीच आहे!
तुम्ही इथे या विषयावर काही एक लिहीणे, मत माण्डणे यात मला तरी गैर वाटत नाही!
अन्यथा आहेच की, लिम्ब्याला मूळव्याध आहे, दमा आहे, पाठदुखी आहे, दातदुखी आहे तरी त्याचा उल्लेख त्याने चूकूनही करू नये अशी अपेक्षा असणारे नरपुन्गव काही कमी नाहीत! का? तर मूळव्याध म्हणले की डोळ्यासमोर भलते सलते दृष्य येते म्हणून? Lol
अन वर असले काही लिहीले की लग्गेच तुम्ही "सहानुभुतीची" भीक गोळा करणारे ठरता! Proud

खड्या अनुभवाचे चरचरीत बोल ऐकवण्यामागची तळमळ जाणवण्यायेवढी सजगता जर असती तर काय हवे होते? पण तसे ते नसते! प्रत्येकजण आपापल्या दैवगतिने प्राप्त परिस्थितीचा व त्यातुन आलेल्या अक्कलेचा चष्मा लावून "दुसर्‍याकडे-त्याच्या आयुष्याकडे" बघत असतो.
जोवर असे बघताना तो "स्वतन्त्र-त्रयस्थ" अस्तो तोवर तर्‍हेतर्‍हेची मते, कित्येकदा अ नि अ, नोन्दवायला त्यान्ना कुणाची भिती बाळगायचि गरज नस्ते! पण जर आपल्या दैवगतीने प्राप्त झालेल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण बाजुला ठेवून समोरच्याच्या परिस्थितीशी मनाने/विचाराने एकरुप व्हायचा प्रयत्न केला, तर अन तरच, तुमच्यासारख्यान्चे "असले" अनुभव काय व्यक्त करतात, व ते अनुभव का व्यक्त व्हावेत हे समजू शकेल!
तर थोडक्यात म्हणजे, तुम्ही जो विषय काढला आहे, तो अतार्किक, अप्रस्तुत, अस्थानी वगैरे नसून, भले आमच्या सुरक्षित बुडाला अशा विषयान्मुळे चटके बसत नसतील, तरी असे विषय नि त्यान्चे चटके अस्तित्वातच नाहीत असे नाही! माझ्या मते ज्यान्ना यात काही गम्य वाटत नसेल, त्यान्नी वाचू नये, वादळात सापडलेल्या उन्टासारखे वाळून तोन्ड खुपसून बसावे, हाच उपाय योग्य ठरेल! Proud
Submitted by limbutimbu on 11 August, 2009 - 16:34
संपादन

लिंबुडाच्या पहिल्या पॅराला अनुमोदन.
(मुळव्याधाबद्दल मात्र काहीच बोलायचे नाही. त्याचा अन या बीबीवर मांडलेल्या समस्येचा/विषयाचा काय संबंध? तुला मुळव्याध असल्यामुळे चिंचवडाहून स्वारगेटास स्कुटरीवरनं येता येता तुझे कसे अतोनात हाल झाले हा विषयावर इथे पोस्ट/बीबी टाकून इतरांना मार्गदर्शन/प्रबोधन किंवा तुला सोल्युशन्स मिळतील, असे तुला म्हणायचे आहे काय? Uhoh )
Submitted by साजिरा on 11 August, 2009 - 17:05

पहिल्या प्यार्‍यास दिलेल्या अनुमोदनाबद्दल आभार साजिर्‍या Happy
>>>> विषयावर इथे पोस्ट/बीबी टाकून इतरांना मार्गदर्शन/प्रबोधन किंवा तुला सोल्युशन्स मिळतील, असे तुला म्हणायचे आहे काय?
नाही नाही त्रिवार नाही
वविला जाऊन आल्यावर फोटोशिवायच तिथे कोणी कोणी काय काय केल, काय काय बघितल वगैरेची वर्णने टाकताना टाकणार्‍यास "जे म्हणायचे" अस्ते तेच मलाही, फक्त "मूळव्याध (अन सध्या भगन्दर)" बाबत म्हणायच अस्त! Wink Proud
चल, असा कोपच्यात ये, इथे विषयान्तर नको! Happy
Submitted by limbutimbu on 11 August, 2009 - 17:19

वरील दोन पोस्ट वगळता आख्ख्या धाग्यावर मला कुठेही "मुळव्याधीचा उल्लेख आढळत नाहीये". व जो उल्लेख केलाय तो स्वानुभवाचा ओझरता उल्लेख केलाय, कारण त्यावेळेस माझ्या मुळव्याधीच्या दुखण्याची/ते इथे सांगितल्याबद्दलही खिल्ली/कुचेष्टा केली गेली होती, स्क्रिनशॉट्स अर्थातच नाहीयेत.

याच धाग्यावरील माझ्या विषयासंदर्भातील पुढील पोस्टी मी विषयाचे गांभिर्य किती जपत होतो हे दाखवुन देतात (असे मला तरी वाटते).

>>>>>> माझे लग्न नोंदणी पद्दतीने दि १८.०३.१९९३ ला झाले.
या पोस्ट मधे, दरम्यानच्या काळात विमानतळावर झालेली अटक व कारावास नेमका केव्हा झाला याचाही उल्लेख असता तर बरे झाले असते, जमल्यास एडीट करुन टाकावा Happy
दुसरे असे की, ४९८अ हे कलम माझ्या अल्पस्मृतीप्रमाणे बहुधा १९९४ मधे लागू झाले असावे, ते नेमके केव्हा लागू झाले, व त्या अन्तर्गत खटला दाखल करताना, कलम लागू होण्यापूर्वीच्या व नन्तरच्या घटनान्चे आरोप, यान्चा मेळ कसा घातला जातो/गेला? माझा प्रश्न काहीसा पूर्वानुलक्षी प्रभावाबद्दल आहे, नेमक्या शब्दात मान्डता येत नाहीये. यावरही काही प्रकाश टाकलात तर बरे.
Submitted by limbutimbu on 17 August, 2009 - 08:56

तात्पर्य काय?
तर "परदु:ख शीतलः " हेच खरे! Wink
Submitted by limbutimbu on 17 August, 2009 - 14:48

बापरे, एकन्दरीत अवघड प्रकरण होते!
Submitted by limbutimbu on 19 August, 2009 - 10:45

दिनेशभाउ, तुम्ही काळजी घेतच असाल, तरीही एक सुचना, हे सर्व लिहिताय ते चान्गलेच आहे, सत्यकथा म्हणून अन साहित्यिक मुल्य म्हणूनही,पण यातिल कोणत्याही शब्दरचनेमुळे पुन्हा काही कायदेशीर अडचण उपस्थित होणार नाही याची खबरदारी घ्या Happy अजुनपर्यन्त मला तरी आक्षेपार्ह काही आढळले नाहीये, पण लिखाणाबाबत कायदेशीर सल्ला घ्यावात असे वाटते, घेतला असेल तर उत्तमच
बाकी यावर प्रश्णोत्तराचा तास नन्तर सुरू करुयात! Proud
Submitted by limbutimbu on 20 August, 2009 - 09:07

लिंबू, मी काळजी घेतोच आहे.
पुराव्याशिवाय बोलायचे नाही, अशी सवयच जडलीय आता !!!!
हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. सगळ्याना इतके वाईट अनुभव येतील असेही नाही. पण आमच्यासारख्या
सरळमार्गी कुटूबावर अचानक हे सगळे कोसळले, त्यातनं जे शिकलो, तेच इथे लिहितोय.
आता कदाचित कायदे बदलले असतील, अद्यावत सल्ले वकीलच देऊ शकतील.
या सगळ्याबाबत आम्ही कुठलीच कायदेशीर प्रक्रिया सुरु केली नाही, वा कुठे तक्रारही केलेली नाही.
आता या आठवणीनी, फारसा त्रासही होत नाही, तरीपण सत्य बदलत नाही ना. तेच आहे हे.
Submitted by दिनेश. on 20 August, 2009 - 11:52

व्यक्तिशः मला तसे सन्दर्भ पूरवू नयेत असे वाटते Happy
व्यक्तीची चूक झाली असल्यास, तिला पुन्हा सन्धी मिळणे आवश्यक, अशी माहिती दिल्यास ती व्यक्ति आयुष्यातून उठेल, अन असे होऊ देणे आपल्यापैकी कुणालाच पसन्द पडणार नाही
आपल्या प्रार्थनातून देखिल देवाकडे, चक्क शत्रूबद्दल देखिल प्रत्यक्ष शत्रूचा नाश नव्हे तर त्याच्या "शत्रुबुद्धी विनाशाची" मागणी केलेली आढळते Happy
आपल्याच धर्माच्या, जातीच्या, एकेकाळी आपल्याशी रक्ताचा सन्दर्भ अस्ताना अशा व्यक्तिच्या बाबत हिन्दू सन्कृती तुलनेत सुवळ आहे, व त्या त्या व्यक्तिच्या विचारधारेत/वृत्तीत चान्गला बदल कालौघात घडून येईल अशा दृढ विश्वासाने बरेचसे काम चालते.
यावर मतमतान्तरे असू शकतात
Submitted by limbutimbu on 23 August, 2009 - 08:58
********************************

साधना, फार सुंदर आणि परिपुर्ण प्रतिसाद...
माझ्यामते हा प्रतिसाद इथल्या पुढच्या चर्चा थांबवायला पुरेसा आहे...

दिनेशदांनी इथे लिहायचं की नाही हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे...

माबोवर अनेकांनी लिखाण थांबवलंय पण त्यामुळे माबोचा आणि लेखकांचा किंवा अगदी वाचकांचाही काही तोटा झालेला नाहीये.... आम्ही जाऊन त्यांचे ब्लॉग्स वाचतो... माबोवर रोज लॉगिन करून एक चक्कर टाकून जातो..

दिनेशदांचं रेसीपीप्रेम हे माबोसाठी किंवा माबोपुरतं नक्कीच नसावं...त्यांनी वर लिहिल्याप्रमाणे पदार्थ मिळवण्यालासून ते बनवण्यापर्यंतचा आटापिटा ते नक्कीच स्वत:च्या आवडी साठी करतात, माबोवर लिहिण्यासाठी नाही...
आणि आता या आणि धनिच्या बीबीवरून त्यांना त्यांच्या फॅन्सक्ल्ब जाणिव झालेली असेलच..
तेंव्हा त्यांना वाटलं तर त्यांनी माबोवर लिहावं/ब्लॉग काढावा किंवा सगळ्या फॅन्सना इग्नोर मारावं हा त्यांचा पर्सनल चॉईस आहे... आणि आपण सगळेच त्याचा रिस्पेक्ट करुयात...

त्यांच्या पाकृ न् लिहिल्याने/काढुन टाकण्याने माझं काहीच नुकसान झालेलं नाहीये पण ते निगवर ही न लिहिण्याचं ठरवत असतील तर मला थोडंस वाईट वाटेल..

माबोवर कित्येकांनी लिहिणं थांबवलंय... वाईट वाटलं, बरंच चांगलं लिखाण मिस होतंय... इथे येऊन वाचावं काय असा प्रश्न पडतोय हे सगळं खरं आहे पण तरीही कोणामुळेच कोणाचंच काहीच अडत नाही हे सत्य आहे....

ट्रोल करणारे आता थांबतील अशी आशा आहे.... आपल्या न कळत आपण एखाद्याला दुखावलंय हे लक्षात येताच माफी मागणारे लोकं असतात तसेच गपचुप बसून मान फिरवणारे लोकंही जगात असतात.....आणि मुद्दाम एखाद्याला त्रास देणारेही असतात....आपण जगात कोणालाच बदलू शकत नाही पण त्या माणसासोबत आपलं वागणं नक्कीच बदलू शकतो.. तेंव्हा त्या ग्रूपसोबत काय करायचं हे दिनेशदांनी ठरवावं.
मी खरंतर इथे सल्ले द्यायला खुप लहान आहे पण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी असताना कोणाला किती भाव द्यायचा ते शिकलेय...
काही महिन्यांपुर्वी अशाच केलेल्या एका मस्करीत माझे आणि राया या आयडीचे वाद झाले होते, ती घटना तिथेच सोडून देऊन आम्ही दोघी मूव्ह ऑन होऊन इतर ठिकाणी नॉर्मल बोलायलाही लागलो
हेच किरण्यके या आयडीने मला मागे मानसिक त्रास दिला होता, त्या आयडीकडे मी पुर्णपणे दुर्लक्ष करते कारण माझ्या आयुष्यात इयर अनेक गोष्टी चालू असताना मानसिक त्रास करून घ्यावा इतका महत्वाची ही व्यक्ती माझ्यासाठी नाही, आणि एकुणातच ती व्यक्ती तिची सवय सोडणार नाहीये तेंव्हा आपण इग्नोर करणे हा एकच उपाय आहे..

आता मिळालाच आहे तर एक सांगायचा चान्स घेते - जोपर्यंत आपण करून घेत नाही तोपर्यंत या जगात कोणीच आपल्याला त्रास देऊ शकत नाही..

आणि हे आव्हान नाही सहज एक सांगणं आहे

आपल्या पोसिशन, पैश्याचा प्रभाव पाडून ते (आरारा आणि साती) दुसऱ्या id ना provocative भाषा वापारायला भरीस पाडतात, आणि आपले id सुरक्षित ठेवतात वगैरे आरोप इकडे झाले आहेत.

<<

Lol

दिनेश, तुम्ही गेल्या अनेक वर्षांत प्रचंड मोठा लेखनसंग्रह मायबोलीवर निर्माण केलेला आहे. पाकृ च्या व्यतिरिक्त इतर अनेक चांगले लेखही वाचल्याचे आठवते (मी माबो वर नवीन आलो तेव्हा जुन्या माबोवर तुमचे मुंबईबद्दल चे लेख माझ्यासारख्या मुंबईबद्दल तुलनेने बरीच कमी माहिती असलेल्याला खूप आवडले होते). यातले बरेच लेख आवडले आहेत, तर इतर असंख्य असे आहेत की मी ते वाचलेले नाहीत (बहुतांश पाकृ). काही वेळा पाकॄ वर प्रतिक्रियांत झालेले वाद लक्षात आहेत. पण त्यातील मुद्द्यांची हिस्टरी बहुतांश माहीत नाही, कारण त्या त्या वेळेस ते लक्षात ठेवलेले नाही.

पण तुमचे कोणाशीही वाद होत असले, कसलेही भांडण असले, तरी त्यामुळे हे लेखन तुम्ही बंद करू नये असेच वाटते. मायबोलीवरचे वाद तेथील चर्चेतच राहावेत, त्यावरून कोणाला असे खेदजनक निर्णय घेण्याची वेळ येउ नये, असेही वाटते. त्याकरता लिहीणे तर बंद करू नकाच, पण आधीचे लेखही जमेल तितके रिस्टोअर करा. कदाचित अ‍ॅडमिनकडून मदत होईल. माझ्याव्यतिरिक्त अनेकांनी इथे विनंती ऑलरेडी केलेली आहेच, पण आता तर नताशानेही दिलगिरी व्यक्त केलेली आहे (आणि खुलासाही दिलेला आहे).

हे अशा प्रकारचे ट्रोलिंग बहुतेक फोरम्स वर चालते. मायबोलीवर ते धक्कादायक अशासाठी आहे माय्बोली एक एक कुटुम्ब असल्यासारखे होते. केवळ मायबोलीच्या माध्यमातून स्नेह झाल्याने खाजगी जीवना तही संपर्क निर्माण झाला. येणे जाणे आहे. काही तर लग्नेही जमली आहेत म्हणे ! ववि ची त्याबा ब्बत प्रेमाने टिंगलही झाली आहे. अडि अडचणीला मदत केली जाते. परदेशाहून एखा माबोकर आला /आली तर भेटी गटग आयोजित केली जातात. तिथे असे चालावे हा शॉक आहे. काही भांड कुदळ आय डी बाबत असे झाले असते तर लोकांची सहानुभूती मिलाली नसती. एक आवडाबाई आहेत माबोवर त्यांना सतत आपल्यालाच उद्देशून कुणीतरी काहीतरी लिहि तेय अथवा हे मलाच उद्देशून लिहिले आहे असा एक सिंड्रोम आहे. त्या सर्वज्ञही आहेत. माबोवर असा एकही आयडी नसावा की ज्याबरोर या आवडाबाई भांडल्या नाहीत. अगदी त्यांच्या कम्पूतले सुद्धा. त्याला त्या सडेतोडपणा म्हणतात. त्यांचा टोन दुर्दैवाने सातीने वापरलेल्या वाक्याप्रमाणे ' तुमचा आय क्यू च तेवढा नाहीये' असा असतो . ह्या आयडीची कुणाशी जुम्पली की लोक मोठीच मजा घेत.
मग एखाद्याच्या अकलेचे ' प्याकेज ' ठरवण्याचीही टूम आली म्हनजे असे की ' आलं आलं तिच्या/ त्याच्या आवडीवरून त्याचं/ तिचं प्याकेज लक्षात आलं ! " असं.
पूर्वीच्या वेमांच्या काळात मायबोलीचा विस्तार होत होता संकेत्स्थळ व्यापक करायचे होते. पहिलेच पोर्तल असल्याने लोक हौसेने येत होते त्यामुळे वेमा सर्वाना सांभाळून घेत . अगदी शाब्दिक हिंसा देखील करीत नसत Happy गुपचूप सफाइ करून जात. फार क्वचित म्हनजे फारच क्वचित वार्निंग येई. अगदी झक्कींना देखीएल जुन्या काळात वार्निंग आलेली आहे. Happy पण ते तेवढ्यापुरतेच.
हल्लीच्या वेमाण्चा रोल वेगळा वाटतो. नव्नवीन सायबर लॉज आलेत. मायबोलीवरचे विषय बाळबोध आणि इनोसंट राहिलेले नाहीत. सामाजिक तणाव निर्माण होणार्‍या विषयांवर लेखन होते आहे त्यातून काही आक्षेपार्ह लेखनही होते. वादाच्या शब्दांच्या मर्यादा ओलांडल्या जाऊ लागल्या आहे. काही बाजरबुणगे घुसून मुद्दाम त्ट्रोलिंग करताहेत. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या वेमा ना सजग व्हावे लागते आहे. प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असते. त्यामुळे वेमा मधेच ' वाचकहो तिकडे रायगडावर कायचाललेत्य ते पाहू' असे सूत्रधारासारखे अचानक पॉप अप होत आहेत हे न्वीनच आहे. आणि गम्नतीशीर आहे. एखाद्या नाटकात पात्राने मधेच स्वगत म्हणत प्रेक्षकांशी बोलावे असे ते वाटते.

दिनेश यांची तक्रार ट्रोलिंग किंवा बुलीइंग बद्दल नसून त्यानी स्पेसिफिकली तक्रार करूनही कोणालाही साधी समज देखील दिली नाही ही आहे. दिनेश आणि माबो चे संबंध लक्षात घेता त्याची दखल थोडी तरी घेतली जायला हवी होती असे आता सगळ्यानाच वाटू लागले आहे.
पण असे न होण्याचे कारण म्हणजे संस्थापक सदस्याना भिडेपोटी कदाचित वार्न केले नाही. आणि दुसरीकडे सपासप आय डीज उडविल्या जात आहेत.

असो माझा माबो शी संपर्क नसतोच हल्ली . पासवर्ड आठवला तरच मी येतो. माबोविरहित जगात माझे उत्तम चालले आहे. पण मायबोलीने अनेक सोनेरी क्षण दिलेले आहेत त्याबद्दल कृतज्ञता आहेच.

बापरे, दिनेशदा हे इतकं सगळं असेल ह्याची कल्पना नव्हती.
साधनाचा प्रतिसाद पट्ला. आभासी जगात लोकांचं असं वागणं खरंच हास्यास्पद वाटतं.
फारेंड, ३अ चे ही प्रतिसाद पटलेत.
३अ, आवडाबाई बद्दल + १

नताशा ह्या आयडीचा खुलासा खूपच विसंगत वाटला. आणि तो सारवासारवीचाच वाटला.

मी बर्‍याच वेळा ह्या नताशा आयडीच्या पोस्ट वाचल्यात. अगदी जाणून बुजून दिनेश ह्यांची एखादी पोस्ट, त्यांनी लिहिलेली पाककृती ह्यातले संदर्भ ओढून ताणून पोस्टी टाकणे चलायचेच. बरे, हे एखाद वेळेला नाही तर जेव्हा तेव्हा त्या लिहायच्या टीपापावर त्यात असायचेच. अगदी जोडीला स्वाती_आंबोळे ह्या असायच्याच. ह्या ( स्वाती_आंबोळे) एका आयडीची गरज मला अजून समजली नाही कारण त्यांच्या त्या पोस्टी वाचून वाटायचा की, इतकी काय बरं गरज असावी की नित्यनेमाने दिनेश आयडीच्या पोस्टी पकडून टवाळी करावे?
दिनेश ह्यांची पोस्ट आली रे आली की एखादी हिणकस कमेंट टाकायचीच, किंवा आपण काही खूप विनोद करतोय अश्याच आविर्भावात असायची. आणि हे अगदी उघडपणे करून वर असा शेरा की , बघा आम्ही कसे विनोद करतोय.
आश्चर्य हेच वाटायचे की, हि टवाळी सातत्याने होत असायची. पण अ‍ॅडमिन काहीच करत न्हवते.
आणि आज सर्व बोलायला लागले तर आम्हाला( टीपापाला) टारगेट करताहेत हा प्रश्ण पडलाय? कमाल आहे. जेव्हा हे दुसर्‍यांना टारगेट करत, तेव्हा नाही काही वाटले का?

आणि जगात असा कोणी आहे का, जो कधीच चुकत नाही का अगदी नेहमीच खरे आणि बरोबरच बोलतो/असतो?

मला तर कमाल त्या लोकांची वाटते, जे दुसर्‍यांच्या उच्चारावरून/व्याकरणावरून इतरांना सातत्याने टोमणे मारणे, आडून पाडून बोलणे करतात, जसे काही ते स्वतः अगदी विदुषी असतात.

एखादा आयडी जे लिहितो त्याचा कंटाळा येतो, त्याचे लिहिणे आवडत नाही म्हणून तुम्हाला कोणीच अधिकार देत नाही की "सतत" त्याची टवाळी करावी?
ह्याच कारणासाठी मला , जे (आयडी)लोकं सतत ऋन्मेषला दुषणे देतात की, ऋन्मेष कसा वैताग आणतो, दुर्लक्ष करा, ह्याच्या बाफवर जावु नका सांगत/सांगतात त्याचे आश्चर्य वाटे.
कोणी अधिकार दिलाय तुम्हाला? ऋन्म्हेष तुमची घरची जागा नाही ना वापरत? आणि तुम्हाला एखादा आवडत नाही म्हणून दुसर्‍याला परावृत करणारे तुम्ही कोण?

नताशा ज्या उघडपणे टोमणे मारत पोस्टी लिहित दिनेश ह्या आयडीच्या लिखाणावर्/मतावर त्याच हिंमतीने मग त्या का नाही कबूल करत की, हो मी हे एकच विडंबन केले नाही पण बहुतेकदा करायची दिनेशची चेष्टा. जसा त्यांचा( नताशा) आग्रह होता/आहे की, दिनेश कधीच कबूल करत नाहीत स्वतःच्या चुका, थापा मारतात मग नताशा तुम्ही काय कबूल करता का की नेहमीच खरे बोलता?
तुम्ही कोकणातले नाहीत( तुमच्याच माहितीनुसार) मग तुम्हाला सुद्धा सगळेच जे काही माहित आहे ते बरोबर आहे?
त्या ईतक्यांदाच्या टवाळकीच्या बदल्या शेवटी आज तुम्ही माफी मागितलीत त्याचे स्वागतच!

आता, नताशा ह्यांचेच स्वतःचे वाक्य आहे, मतं पटली नाही तर इतके सातत्याने विखारी प्रतिसाद का? आणि एकीकडे जर तुम्हाला दिनेश ह्यांचे पटत न्हवते तर मग तुम्ही सुद्धा तेच तर करत होतात ना?

मी फक्त विसंगत पणा दाखवतेय. मला खरे तर हेच म्हणायचेय की, प्रत्येक जण कधी ना कधी , कुठे ना कुठे त्याच चुका जाणतेपणी/अजाणपणी करत असतो. पण हा कुठला अ‍ॅप्रोच की, दिनेश ह्यांचे भक्त कसे फसतात दिनेशच्या थापांना, मग आपण त्यांचा बुरखा फाडाय्चा. इतकी जेलसी कशाला? हा सुद्धा विखारच म्हणावा लागेल.
बुरखा फाडायचा असेल तर फाडा ना.... पण तुम्ही तितके महान आहात का आणि बुरखा फाडणे हे नित्यनेमाने टवाळी करूनच येतो का?

मलाही दिनेश/कोणाही आयडीची बरीचशी मतं पटत नाही. कधी आवडत नाहीत. पण मी मांडलेय माझे मत. ज्यांनी मला उगाच त्रास दिला, त्यांचे वाण त्यांनाच तिथल्या तिथे परत केलेय. पण असली मानसिक गरज वाटली नाही की , सातत्याने दोन चार लोकं सोबत घेवून कोणाला त्रास देइन.
कारण शेवटी ती मानसिक गरज न रहाता विकृतीच ठरते. अगदी डॉकटर सुद्धा मान्य करतील. पण हेच जर कोणी तुम्हाला बोलले तर, लगेच आम्हाला विकृत म्हटले म्हणून कांगावा? का बरं?
का फक्त तुम्हालाच मन आहे आणि इतरांना नाही कारण त्यांची मतं आणि पोस्टी तुम्हाला पटत नाहीत?
बी आयडीबाबत बोलायचं तर मला इतकेच वाटले की असतो कोणी असे प्रश्ण विचारणारा... आणि तो बोलला हि आहे जरा अदा तदा. पण नंतर त्यांची खाजगी बाजू ( त्रासलेली होती वगैरे वाचले त्याचे लेख ) बघून म्हटले झालं असेल. नंतर त्याचा बहुधा विश्वास इतका उडालेला होता( असे मला वाटले) की त्याला चांगले आणि वाईट सल्लागार कळेनासे झालेले( हे आपले मी लावलेले अर्थ आणि त्यांच्या पोस्टीकडी केलेले दुर्लक्ष ; म्हटले लिव हिम अलोन हिच रीमेडी आहे त्याला).

एकंदरीत, अ‍ॅडमिनने जो काही पवित्रा घेतलाय तो बरा आहे. अश्या प्रकारांना आळा बसायची गरजच होती.
बाकी, इथे येणे, जाणे. लिहिणे हा खाजगी प्रश्ण आहे कोणाचाही. कोणाच्या आग्रहाने कोणी येणे/जाणे थांबवु नये वा निर्णय घेवु नये.

त.टी : मी दिनेश अथवा बी ला ओळखत नाही आणि मैत्री नाही. त्यामुळे बाजू घेणे/ राग करण्याचा प्रश्णच नाही. जे वाचले गेले त्यावर मत आहे.

अरे काय लोक टिपापा टिपापा विचारुन राह्यले सारखे.
अहो तो एक क्लोज्ड ग्रुप आहे. गप्पांचा वाहता धागा. क्लोज्ड म्हणजे सभासद होउ शकता इंटरेस्ट असेल तर. आता त्याचं नाव बिटरगाव आहे. टिपापा नव्हे.

<<<<< विनोदाची वेगळी धार म्हणजे, ज्यावर हल्ली पाच वर्षांची मुलंही हसत नाहीत असे विनोद का? ह्यालाच हल्ली प्रतिभा म्हणत असावेत. वेमा फक्त ह्यांच्याच गटगला जातात ही फुशारकी आहे की धमकी?
--- हा प्रतिसाद मी नंद्या४३ यांच्या लेटेस्ट प्रतिसादावर दिला. पण पोस्ट करेतो त्यांचा प्रतिसाद दिसत नाहीए. असो.>>>>
अर्रर्र, माझे पोस्ट उडवलेले दिसते आहे - त्यावर मी टीपापा चा चांगला इतिहास लिहीला होता. असो.

एक खुलासा - ते विनोदाची धार वगैरे शब्द माझे नाहीत, दुसर्‍या कुणितरी लिहीलेले मी तिरक्या अक्षरात लिहून उद्धृत केले होते. असो. असले बारकावे लक्षात येत नाहीत. कारण लक्ष टीका करण्याकडे असते.

आता तुम्हाला ते विनोद आवडत नाहीत तर सोडून द्या. तुम्हाला Bitterगाव आवडत नसेल तर तिथे येऊच नका. म्हणजे माहित आहे की तिथे जे काय चालते ते आपल्याला आवडत नाही तर मुद्दाम तिथे जाऊन, तिथले वाचून, किंवा तिथल्या लोकांनी इतरत्र लिहीलेले वाचून, आपणहून आपल्या मनाला लावून घ्यायचे. मुंबईच्या लोकलमधे कल्याणहून दादरपर्यंत सकाळी ९ वा. प्रवास केला आहे का सेकंड क्लास मधे? तशी वेळ तुमच्यावर आली की किंवा तुम्ही ओढवून घेतली तर तिथे लोक धक्के मारतात, त्रास देतात अशी तक्रार त्या लोकलमधे बसून केली तर काय होणार?
स्वतःहून दु:ख ओढवून घ्यायचे नि दोष मात्र दुसर्‍याला द्यायचा असे कराल तर या जगात रहाणे कठीण आहे हो!! अनुभवावरून सांगतो.

माझ्या मानापमानाच्या कल्पना मी चव्हाट्यावर आणत नाही, त्यांना लहान मुलांसारखा जपतो, धोक्याच्या ठिकाणांहून दूर.
जेंव्हा मला (खूप खूप उशीरा) ही अक्कल आली तेंव्हापासून मला सगळीकडे आनंदी आनंदच दिसतो.

अ.अ.अ.
तुमचा लेख वाचून जुन्या दिवसांची आठवण येऊन ट. डो. पा. आले (एक bitterगावी शब्द) - इतरांना तो पाच वर्षाच्या मुलाच्या अकलेपेक्षा कमी वाटतो. त्यांना उद्या दुसर्‍या भाषेतला शब्दहि बेअक्कल वाटेल!
बाकी आंतर्जालावरील लिखाणासंबंधी आलेले कायदे, बदलती सामाजिक परिस्थिती (राजकीय कारणांवरून, राजकीय लोकांच्या पाठिंब्याने हिंसाचार करणे) यामुळे मायबोलीची जुनी गंमत गेली, खरे तर कुठल्याहि आंतर्जालीय संकेतस्थळाची गंमत गेली!

<<<<आता तर मायबोली इतर गावंढळ लोकानी डॉमिनेट केली आहे त्यामुळे ह्या लोकांचे महत्व कमी झाले असले >>>
मी १९७० पर्यंत भारतात असताना गावंढळ हा शब्द, ज्यांना शहरी चालीरिती, शहरी भाषा माहित नाही, सहसा अशिक्षित, अज्ञानी अश्या लोकांसाठी वापरला जायचा. तो शब्द Derogatory अर्थाने वापरला जाई.
आता त्याचा काय अर्थ आहे माहित नाही, पण अजूनहि त्याचा अर्थ तसाच असेल तर मात्र वरील वाक्याचा निषेधा!
फक्त असे म्हणायला पाहिजे की लोक अतिशय संवेदनाशील, स्वतःचा मानापमान जिथे जातील तिथे काळजीपूर्वक जपणारे, उपहास न समजणारे, इतर लोकांना जे गंमतीचे वाटते ते पाच वर्षाच्या मुलाहून कमी अक्कल असल्यासारखे ज्यांना वाटते, असे लोक फार झाले आहेत. ते म्हणजे होळीच्या दिवशी घराबाहेर पडतील नि कुणि रंग टाकला तर त्याला ताबडतोब तुरुंगात टाका अशी मागणी करणारे झाले आहेत.

अहो झंपी,

दिनेश बाबतीत बोलताना तुम्ही मुद्द्याला हात घालून सोडून दिला आहे. नताशा नवीन (तुलनात्मक) आहेत. काही चार-पाच स्त्री आयडींना दिनेशचा त्रास आहे. तो फार आधीपासून आहे. दिनेश आपल्याकडे नवीन आयडी वळवून घेतो असे नसून जे नवीन आयडी टीपापावर येतात, ते आपोआप ह्या "आम्ही बरोबर, ते चूक" जालात फसतात असे म्हणा. ( म्हणजे ती अपेक्षा होती). नताशा ह्या अर्धरथी होत्या. त्यांना जुने माहिती नव्हते.

नताशाच्या पोस्ट नंतर "पिटी टूर" असे त्यामुळेच महारथी म्हणाल्या अन त्यांचे पदाती बुवा येऊन लगेच झील तोडून गेले.

हुडसाहेब, जसे आवडाबाई होत्या तसे हे वरचे आवडाबुवा पण आहेत. ( येथे बुवा केवळ नामसाधर्म्य आहे. ) अता हेच बघा, त्या दुसर्‍या दिनेशच्या बाफवर बुवा आयडीने बाण मारला. नानाकळाने बरोबर विचारले की बाण मारायची हौस गेली की नाही? पण नाहीच. इतरांना उच्चासन असे म्हणतात, पण ते स्वतः मात्र अजूनही "हाय चेअर" वर बसलेले आहेत. त्याच अर्विभावात ते नेहमी असतात. माझेच बरोबर, माझेच बरोबर , ठीक बाबा, तुमचेच बरोबर. "हाय चेअर" बसून राहा.

झंपी आणी देशी पर्फेक्ट लिहीलेत. हुडांनी पण रोखठोक लिहीलेय. खूप दिवसानी असे सणसणीत परखड प्रतीसाद वाचायला मिळाले.

साधना, मी हिमनगाचा १/४ भागच लिहीलाय, ३/४ तर अजून खालीच आहे. पण तरीही जुने वाहत्या बाफावरचे संदर्भ कसे देणार? आमचे डोळे हीच एकमेव आमची साक्ष. एकमेकाला प्रत्यक्ष भेटलो म्हणजे आपले स्वभाव कळतातच असे नाही. त्यामुळे गटग झाले, फोनाफोनी झाली तरी दुसरी बाजू कुठे उलगडली गेली? इतिहास अनेक घटनांचा मुक साक्षीदार असतो असे म्हणतात, आम्ही पण त्यातलेच.

दिनेशजींनी तर कदाचीत मागेच मायबोली सोडली असती, कारण हेच लोक. पण आज तुमच्या- आमच्या मैत्रीखातर, मायबोलीच्या प्रेमामुळे ते इथे आहेत. वाईट याचेच वाटते की कवि आणी कवयत्री हे कोमल मनाचे असतात, कुणाला दुखावत नाहीत असे ऐकले होते, पण तो गैरसमज होता हे आता सिद्ध झाले आहे. उलट हेच लोक अनेकदा कडवट होऊ शकतात असेच पहाण्यात आले आहे.

लिहावे तितके कमी.

लगेच झील तोडून गेले.
>>> अरारारारारारारारा ................... (हे उद्गारवाचक आहे. कोणत्या आय डीचे नाव नव्हे Wink ) हे चांगले नाही झाले.

आवडाबाई होत्या नव्हे आहेत . एक तर त्यांचे झीलकरी नाहीत अथवा त्या त्यांच्या इंटेलेक्च्युअल कामात बिझी असतील म्हणून त्या येत नाहीत सध्या. तुमचे व त्यांचे मागच्या जन्मातले भांडण आमी पायलेय. शेवटी तुमचा आय क्यू कमी असल्याने त्यानी तुमचा नाद सोडला. तुमचे आवडाबुवा म्हणजे हा झक्की बाबा की वैद्यबुवा ? सपष्ट बोला. आज होली है बुरा नही मानेंगे लोग. कन्फेशन डे है भै . मनातले ओकून मोकळे व्हा. मग सगळे स्वच्छ होइल. अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आपण जे करतो सगळ्याना कळाले म्हणून आता कोणी ट्रोलिंग करणारच नाही. बिटर्गाव कुठे आलं शिंचं ? मला तर तो राजकवींचा कट्टाच सापडत नाही. आता राजकवी कोण म्हणून काय इच्यारता दाताड वेंगाडुनि? तेच ते ज्यांनी प्रोफेश्वरांना रदीफ सेनेच्या सहायाने पळवून लावले . प्रोफेश्वर ही महाचिवट माणूस. असो तो आता वितिहास झाला. (नाविलाज चालते तर हेही चालावे)
तर खंय इलंय हे बिटरगाव ? त्याले का टिकट- गिकट लागते का भौ? बाकी अड्डा आणि कट्टाचे के एन सिंग सारखे खरे महन्त भलतेच निघाले. बाकी बापडी प्यादी.
मध्ये काश्मीर वर लेखमाला माबोवर वाचली. उत्तम लेखन , त्यासाठी तर बुरखा घालून याय लागते बाप्पा ... असो.

ट्रिपल ए, पोस्टी आवडल्या. नन्द्या, तुमची पण.

देशी Lol अगदी स्पेशल अज्ञातवासातून बाहेर आलात. धन्यवाद! कसं आहे वर बसलेल्यांशी दोन हात करायला स्वतःची जमीनीवरची जागा सोडावी लागते.

मध्ये काश्मीर वर लेखमाला माबोवर वाचली. उत्तम लेखन , त्यासाठी तर बुरखा घालून याय लागते बाप्पा ... असो.>>>> हो हो. केपी नी टाकली आहे. मी पण जातो तिथे, बरं वाटतं जरा गुल गुलशन गुलफाम टुअर घेतल्यासारखं. Proud

वैद्यबुवासाहेब, केपीची नाही हो. काश्मीरच्या राजकारणाचा इतिहास सांगणारी. त्याचे आधी पूर्वी कोणी करण सिंगांच्या दिवाणाने की कुणी लिहिलेल्या आठवणींवरील पुस्तकाचा परिचय लिहिणा रा एक लेख होता. त्यात ' ग्रेट गेम थिअरी' चा उल्लेख होता ते पुन्हा वाचायचे आहे. पण ते सापडतच नाही. त्याला शब्द खुणा काय द्याव्या तेही कळत नाही. त्यापेक्षा गारुड्याच्या खेळासारखे एक दोन बीबीवरचे भांडणे पहावीत आनि लॉग ऑफ व्हावे एवढेच सध्या.

समुद मंथनातून जशी बरी वाईट रत्ने आली तशी गेल्या काही दिवस सुरू असलेल्या मायबोली मंथनातून बऱ्यावाईट आठवणी येत आहेत.
एकच करा बाबांनो, बाईनो
वेमाना हलाहल प्यायला लावून त्यांचा गळा निळा करु नका

त्यापेक्षा गारुड्याच्या खेळासारखे एक दोन बीबीवरचे भांडणे पहावीत आनि लॉग ऑफ व्हावे एवढेच सध्या.
अत्त्युत्तम विचार. एकदम बरोब्बर.
ज्याला/जिला हे कळले त्याचे/तिचे मन एकदम शांत राहील. जीवनात इतरत्र काय कमी कटकटी असतात का? उगाच इथे येऊन आपल्या नि इतरांच्या डोक्याला ताप द्यायचा!
तशी बरीचशी चांगली माहिती मिळते इथे. कविता. लेख पण छान असतात म्हणे. मला त्याटले काही कळत नाही म्हणा. बाकी मनोरंजन सुद्धा खूप होते.
अ. अ. अ. - छान लिहिलय, (११ मे, ८:४१ EST, USA - अगदी पूर्वीची आठवण यावी - तेंव्हाहि असेच लिहीत, पण गेले ते दिन गेले!
<<<<तुमचे आवडाबुवा म्हणजे हा झक्की बाबा की वैद्यबुवा ?
>>>
आमचे आवडाबुवा म्हणजे वैद्यबुवा. सिक्स्पॅक वाले, गाणे म्हणणारे, गेट्टुगेदर साठी मला दूर दूर घेऊन जाणारे. त्यांच्या घरी बोलावून जेवायला देणारे.

दिनेश यांनी जुन्या,नव्या, आता नसलेल्या, अशा बर्‍याच कुणा कुणाचे बिल टिपापाच्या नावाने फाडलेले दिसते.
या लेखातले अर्धे अधिक आरोप आणि टिपापा (सध्याचे मेंबर्स) यांचा संबंध नाही.
त्यांचा पुरुषार्थ, 'बसला की बसलं', ववि, सिंहगड सहल आणि दिनेश ची जिवलग मैत्रिण/ मैत्रिणी, अफ्रिकन मेड शी संबंध - यातले काहीही टिपापा मेंबर्स ने म्हटलेले नाही.
रविवार सकाळ की मुक्तपिठात कुणीतरी दिनेशदा या नावाने काहीतरी लिहिले हे २-३ वर्षापूर्वी दिनेश यांनी त्या जयद्रथ बाफ वर लिहिले होते. कशामुळे कल्पना नाही पण त्यांनी अचाट कन्क्लुजन काढले की हे 'टिपापा' ने केले! तेव्हाही त्यांना तिथेच खुले आव्हान दिले होते की कोणी केले हे जर तुम्हाला माहित आहे आणि सिद्धही झालेय म्हणताय तर लिहाच सरळ नाव. पण तेव्हाही त्यांनी लिहिले नाही आणि आताही विदुषी वगैरे शब्द वापरून अशीच अनेक ब्लॅन्केट स्टेटमेन्ट केली आहेत ज्याला काही आधार नाही आणि ज्याचा टिपापाशी काही संबंध नाही.
अफ्रिकेतील कथा आणि ललिते - हे बरोबर, आताही ती चर्चा झाली असती तर तेच म्हटले असते. इतकेच नव्हे तर त्या कथेवर निम्म्याहून जास्त लोकांनी त्या कथेत मॅनेजर ने हाताखालच्या स्त्रीकडून तिच्या सेक्स लाइफ बद्दल लिहून घेणे हा प्रकार खटकला असेच लिहिले होते. खोटे वाटत असल्यास ही लिन्क:
http://www.maayboli.com/node/45825

असो. बाकी चालू द्या.
या फॅक्ट्स इथे देणे जरुरी वाटले म्हणून लिहिले.

अगदी जोडीला स्वाती_आंबोळे ह्या असायच्याच. ह्या ( स्वाती_आंबोळे) एका आयडीची गरज मला अजून समजली नाही कारण त्यांच्या त्या पोस्टी वाचून वाटायचा की, इतकी काय बरं गरज असावी की नित्यनेमाने दिनेश आयडीच्या पोस्टी पकडून टवाळी करावे? > +११११ बेन्ग ओन

Pages