जातीयवाद कसा कमी होईल?

Submitted by प्रजोत कुलकर्णी on 12 April, 2017 - 11:37

मित्रहो जातीयवाद होण्याची बरीचशी कारणे आहेत, कोणीही त्यांच्या धर्माने, जातीने किंवा पंथाने जसे सांगितले आहे तसे वागले तर जातीयवाद निर्माण होत नाही. माझ्या माहिती प्रमाणे कोणत्याही धर्माने, जातीने किंवा पंथाने असे सांगितले नाही कि ते सोडून दुसरे वाईट आहे. सांगायचे झाले तर बरेच भारतीय सणवार हे सर्व धर्म मिळून साजरे करतात. यामध्ये कुठेही जातीयवाद येत नाही. आताच्या घडीला जातीयवाद हा वेगळ्या कारणामुळे होतो. माझ्या परीने मी त्याचे विश्लेषण केले आहे. माझे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
राजकारणामुळे जातीयवादाला खतपाणी घातला जाते. मतांच्या राजकारणासाठी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घ्यायचे काम सध्या चालू आहे.
आपली न्यायिक व्यवस्थेमधेही काही जातींना हुकते माप दिल्या गेले. खरे तर हे कायदे त्या जातींना संरक्षण म्हणुन अस्तित्वात आले, पण आज त्याच दुरूपयोग होतो आहे. त्याचा मोठा परिणाम यावर होतो.
आरक्षण हा पण एक मोठा मुद्दा आहे.
दुसऱ्या धर्म, जाती बद्दल समाजात द्वेष पसरवणे.
वरील मुद्द्यावर काही उपाय:
सध्या राजकीय फायदा उठवण्यासाठी सर्व पक्ष आपल्या आपल्या परीने समाजात तेढ निर्माण करून आपल्या आपल्यात भांडणे लावत आहेत. यातून आपला समाज विखुरला जात आहे. बरेच असे पक्ष आहेत कि जे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेवून स्वतः अश्या प्रकारचे राजकारण करत आहेत. आपल्याला सर्व राजकीय पक्षांना ठणकावून सांगायची वेळ आली आहे कि तुम्ही जे याचे राजकारण करत आहात ते थांबवा अन्यथा सामान्य माणूस तुम्हाला जगू देणार नाही. याचा सर्वात मोठा तोटा हा सामान्य माणसाला होतो, कारण जे मोठे लोक असतात जे अश्या प्रकारचे आदेश देतात त्यांना काहीही तोटा होत नाही त्यांना राजकीय अभय मिळते व जो सामान्य नागरिक असतो त्याचा यात बळी जातो.
आपली न्यायिक व्यवस्थेत काही काळनुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे. सर्व जाती आणि धर्म यांना एकच न्याय लागू करावा.
आरक्षण हा ही एक मोठा मुद्दा होतो, कारण ज्याला चांगले मार्क्स असूनही तो बऱ्याचवेळा पात्र होत नाही पण जो जेमतेम पास झाला आहे तो मात्र पात्र ठरतो. यामुळे त्या गुणी विद्यार्थाची मानसिकता ढासळते आणि तो अश्या लोकांना शिव्या द्यायला सुरुवात करतो त्यातून हा तेढ अजून वाढत जातो. काहीवेळा जे विद्यार्थी खरोखरच खूप गुणी आहेत पण जे खालच्या जातीचे आहेत हे त्यांच्या आरक्षित जागा आहेत त्याचा वापर न करता खुल्या जागा आहेत त्याचा वापर करतात व खुल्या जागांमधील जागा कमी होतात, त्यामुळेही खुल्या वर्गातले लोक बाकीच्या लोकांबद्दल वाईट बोलू लागतात व त्यातून तेढ निर्माण होते. काही लोक ज्यांना आरक्षण आहे आणि सरकार त्यांचा संपूर्ण खर्च उचलते म्हणून पुढील शिक्षण घेतात, ते याचा तीळमात्रही उपयोग करून घेत नाहीत त्यामुळे आरक्षणामुळे खुला वर्ग आणि आरक्षित वर्ग असे गट पडत चालले आहेत.
दुसऱ्या धर्म, जाती, पंथ यांना शिव्या देणे यामुळे जातीय तणावाचे वातावरण तयार होते आणि यातून समाजात फुट पडते. यातूनच ज्यांचा मनातही दुसऱ्या बद्दल द्वेषाची कल्पना देखील नसते त्यांचीही मानसिकता बदलते. त्यामुळे ही तेढ वाढतच जाते.
कृपया यावर थोडा विचार करा, आणि देशाला एकत्र करून गुण्यागोविंदाने राहण्यासाठी काहीतरी पाउल आपल्या आपल्या परीने उचला. तसेच जर हे मुद्दे तुम्हाला पटले तर ही पोस्ट नक्की शेअर करा......
टीप: हे माझे वैयक्तिक मत आहे, वस्तूस्थिती वेगळी असू शकते.
धन्यवाद,
प्रजोत कुलकर्णी
मो. +९१ ९७६४२३११६०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भागवत धर्मात किण्वा पंथात जी समता / अजातिभेद सांगितला जातो तो फक्त अध्यात्म क्षेत्रा तील स्वातंत्र्यापुरताच होता हे लक्षात घेतला पाहिजे.

हे मी मान्य करीन. मी शिक्षण म्हणजे नुसते शाळेत जाऊन शिकणे हेच असे समजत नाही. अध्यात्म क्षेत्रात वावरणारे अभ्यासू व पर्यायाने काहीतरी शिकलेले असतात. युद्धावर जाणारे सैनिक युद्धशास्त्र शिकतात. धंदा करणारे लोक धंदा कसा करावा हे शिकतात. या सर्व लोकांत जातिभेद कमी आढळतात. बाजीरावाने युद्धकला शिकून मराठी राज्याचे संरक्षण व वृद्धि करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. हे करताना तो बरेच काही काही शिकला. त्यात धर्म जात या कल्पनांचा फोलपणा त्याला कळला. पुण्यात बसून नुसते संध्या करणारे लोक, ज्यांना फक्त हेच शिक्षण मिळाले की जात पात मानायची, इतर काही नाही, त्यांचे नाव इतिहासात नाही, कारण नाव घ्यावे असे त्यांनी काही केलेच नाही.
म्हणून जरा विस्तारित शिक्षण घ्यावे, उद्योग करावे ज्यामुळे लोकांचे भले होईल, अश्याने जातिव्यवस्था जाईल.

जातीयवाद गेला तरी धार्मिक , प्रांतीय , आणि असे इतर वाद माणूस जोपर्यंत स्वताला फक्त माणूस समजत नाही तोपर्यंत राहणारच की !

काहीवेळा जे विद्यार्थी खरोखरच खूप गुणी आहेत पण जे खालच्या जातीचे आहेत हे त्यांच्या आरक्षित जागा आहेत त्याचा वापर न करता खुल्या जागा आहेत त्याचा वापर करतात
-------------------

फारच अविचारी विधान आहे... कायद्यानेच अशा ' ईअर मार्किंग'ला पर्मिशन दिलेली आहे.

निदान थोडा अब्यास तरी करुन लिहावे.

1) All candidates are eligible to compete under General Category, alongwith their respective reserved quota, except General category candidates, who have to compete only under General Category..

बसमध्ये चार सीट स्त्रीयाना राखीव असतात , म्हणुन स्त्रीयानी फक्त त्याच चार सीटवरच बसायचे का ? स्त्रींच्या सीटवर फक्त स्त्रीयाच बसणार.

पण इतर सर्व सीटवर पुरुष व स्त्री यापैकी कुणीही बसू शकते.

साधे लॉजिक आहे. कोर्टाच्या जुन्या ऑर्डर्स वाचून बघा.

जातीयवाद हा शब्द ऋण अर्थाने हायजॅक केलेला आहे. जातीयवाद कमी व्हावा हे पुरोगामी लोकांचं निरर्थक टुमणं आहे. जातीयवाद म्हणजे जाती असाव्यात, व्यक्तिगत पातळीवर किमान मला माझी जात पाळण्याची मुभा असावी. जातीयवाद म्हणजे अन्य जातींचा द्वेष करणं हा अर्थ कुठून आला. आणि जन्मावर आधारित गट नसावेत हे अभिव्यक्तिस्वातंत्र्यात कसं बसतं?

राजकारणामुळे जातीयवादाला खतपाणी घातला जाते. मतांच्या राजकारणासाठी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घ्यायचे काम सध्या चालू आहे. >>>>>>> हे वास्तव नाही.

जन्मावर आधारित गट नसावेत हे अभिव्यक्तिस्वातंत्र्यात कसं बसतं? >>>> अनुमोदन
कारण असे नाही फॉलो करायचे तर आपल्याला मानवी पिढ्यांची वंशावळ एकतर रोबोटच्या क्रमांकासारखी नुमेरीकल ठेवावी लागेल जसे XYZ१००००००१, XYZ१००१२३४५ नाहीतर जेनेटिक्समध्ये इतर प्राण्यांना संबोधतात तसे F१ जनरेशन, F४ जनरेशन, .... वगैरे.

जोशीसाहेब, नमस्कार!

खालच्या जातीत जन्म घेतल्या माणसांचे त्रास वरच्या जातीतल्या माणसांना नाही समजत हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. कसा सोल्व करायचा?

जात पाळण्याची गरज काय या प्रश्नाचे लॉजिकल उत्तर शोधत आहे, तुमच्याकडे आहे काय जोशी साहेब?

जातीयवाद गेला तरी धार्मिक , प्रांतीय , आणि असे इतर वाद माणूस जोपर्यंत स्वताला फक्त माणूस समजत नाही तोपर्यंत राहणारच की !
खरे आहे. पण प्रश्न जातीयवादाबद्दल आहे. धार्मिक, प्रांतीय असेहि वाद आहेतच. त्याम्चा जातीयवादाशी काही संबंध असल्यास तो कसा नि त्याबद्दल काय करावे या साठी काही उपाय असल्यास सुचवावे. त्यांचा संबंध नसेल तर दुसरा धागा काढावा तिथे चर्चा करता येईल.

खालच्या जातीत जन्म घेतल्या माणसांचे त्रास वरच्या जातीतल्या माणसांना नाही समजत हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. कसा सोल्व करायचा? >>>>>> खटला दाखल करा. प्रश्न सॉल्व होईल. म्हणावं लोकांना जातीस्वातंत्र्य का दिलं आहे? काढून घ्या.

जात पाळण्याची गरज काय या प्रश्नाचे लॉजिकल उत्तर शोधत आहे, तुमच्याकडे आहे काय जोशी साहेब??
मला माझ्या जातीचा अभिमान आहे हे माझं उत्तर आहे. मानाल तर सर्वच अस्मिता तुच्छ, हिन, घाणेरड्या, त्याज्य आहेत, मानाल तर नाहीत. घटना जितक्या पवित्र विचारांना जवळ करते तितकेच धर्मग्रंथही करतातच कि! लोकशाहीतही गुन्हेगारी वाढत आहे, धर्मसंस्थांच्या काळातही होती!!!

खरे आहे. पण प्रश्न जातीयवादाबद्दल आहे. धार्मिक, प्रांतीय असेहि वाद आहेतच. त्याम्चा जातीयवादाशी काही संबंध असल्यास तो कसा नि त्याबद्दल काय करावे या साठी काही उपाय असल्यास सुचवावे.>>>>> उपाय तर त्या कमेंट मधील वाक्यातच दिलाय की, पण तसे वागत नाही आपण म्हणून हे सर्व प्रश्न उद्भवतात ! बरोबर न ?
पहा बरे पुन्हा एकदा - >> असे इतर वाद माणूस जोपर्यंत स्वताला फक्त माणूस समजत नाही तोपर्यंत राहणारच की !

जातीयवाद कमी कसा होईल असा बाफ तुम्हीच काढता आणि नंतर लिहिता की तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान आहे?
Uhoh
यामागे काय लॉजिक आहे सांगाल का?

माणूस जोपर्यंत स्वताला फक्त माणूस समजत नाही तोपर्यंत राहणारच की
बरोबर आहे. अश्याने देशा देशांमधील वैमनस्यहि कमी होईल.
आता फक्त हे कसे करायचे? नुसते सांगून ऐकतील का लोक?

>>>आरक्षणाचा मूळ हेतू आहे प्रतिनिधित्व. हे बहुतेकांना माहित नसते. बहुसंख्य लोकांना आरक्षण म्हणजे गरिबी-हटाओ-योजना वाटते. पण ती अशी नाहीये. सामाजिक व्यवस्थेत ज्या लोकांना प्रतिनिधित्व, सन्मान, संधी ही जातीनिकषांवर नाकारली गेली व त्यामुळे त्यांच्या पिढ्यांपिढ्या मुख्य प्रवाहात येण्यापासून वंचित राहिल्या, मानहानीकारक जगणे जगत राहिल्या त्यांना समानहक्क असलेले माणूस म्हणून संविधान संधी देत आहे. यात अनेक जाती, जातीसमूह हे व्यवस्थेत महत्त्वाच्या पदांवर, जागांवर, निर्णयप्रक्रियेत नसायचे ते त्यांनी असावे ह्यासाठी आरक्षण हे एक साधन आहे.
आरक्षण विरोधी लोकांनी आकसातून अनेक गैरसमज पसरवलेले आहेत. त्यासंबंधी जनजागृती करायची सोडून आरक्षणसमर्थक आक्रमक तलवारबाजाची भूमिका घेतात, हे दोन्ही प्रकार दुर्दैवी आहेत. आता सामंजस्याने, तथ्यांवर आधारित चर्चा करण्याचे, आपले समज तपासून घेण्याचे दिवस आले आहेत असे मला वाटते.

अगदी बरोबर. मला हा मुद्दा १००% पटला. आणि भारतातच असे आरक्षण आहे असे नसून साऊथ आफ्रिका, न्यू झीलंड, जिथे जिथे अबोरिजिनल्स आहेत, किंवा जिथे गुलामगिरीच्या काळात बाहेरून लोक गुलाम म्हणून आयात करण्यात आले होते, किंवा भारतात जे पिढ्यानपिढ्या अस्पृश्यता चालत आलेली आहे अशा देशांतून "अफर्मेटिव्ह ऍक्शन" या नावाखाली अशी आरक्षणे दिली जातात आणि त्यांचा हेतू हे सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळावे आणि प्रगतीची संधी मिळावी हे आहे.

>>>>जात पाळण्याची गरज काय या प्रश्नाचे लॉजिकल उत्तर शोधत आहे, तुमच्याकडे आहे काय जोशी साहेब?

यात दोन भाग आहेत. आरक्षणाचा मुद्दा इथे चर्चेत आहे म्हणून. एक म्हणजे कायद्याने जात मानावी का? याचे उत्तर माझ्यासाठी वरील मुद्द्यांमुळे हो असे आहे. कारण जर कायद्याने आत्ता या क्षणी सगळी जात प्रमाणपत्रे रद्द केली तर भारतीय जनता (यात अधिकाराच्या जागेवर बसलेले लोक आणि आम जनता) आपल्या जातीमुळे कुठलाही पक्षपात न करता सगळ्यांना सामान वागणूक देईल का? आरक्षण रद्द केल्याने आरक्षित समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही अशी परिस्थिती खरेच आहे का? म्हणजे त्या सगळ्या समाजामध्ये आरक्षणाची गरजच लागू नये एवढी सुबत्ता आली आहे का (इथे ग्रामीण समाजांचा विचार व्हावा. कारण अजून भारतात अधिकांश लोक ग्रामीण भागातच राहतात)? जर या प्रश्नाचं उत्तर नाही असे असेल तर कायद्याने जात मानावी.

आणि कायद्याने जात मानावी अशी अजूनही परिस्थिती असेल तर त्याचा अर्थ असा होतो की समाजात अजूनही जातीच्या आधारे निर्णय घेतले जातात. त्यामुळे लोकांनी (त्यांच्या वैयक्तिक निर्णयांमध्ये) जात मानायची नाही पण कायद्याने मात्र आरक्षण गरजेचे आहे अशी दुहेरी तयार होते तेव्हा वादविवाद होतात.

लोक जेव्हा जात मानणे बंद करतील तेव्हा आरक्षणाची गरज लागणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की आरक्षण बंद केले तर सगळ्यांना सामान वागणूक मिळेल. हा विरोधाभास आहे कारण आपण जातींमधली जनसंख्या मोजू शकतो, जातींमधली सुबत्ता देखील गणितात मांडू शकतो, आरक्षणामुळे होणारा न्याय/अन्याय कॉलेजमधल्या पर्सेंट कटऑफ मध्ये मोजू शकतो, महिलांची शिक्षणात आणि अर्थार्जनाने मोजू शकतो. पण आपण कुणाचेही संस्कार मोजू शकत नाही आणि ते त्यांच्यावर लादू शकत नाही. त्यासाठी थोडा वेळ देऊन मागच्या परिस्थिती आणि आत्ता काय काय बदल झाले आहेत हे पाहूनच (आपल्या संस्कारांच्या चष्म्यातून) ठरवू शकतो.

परशुराम जयंतीला एका ब्राह्मण स्त्रीने टाहो फोडला .. आरक्षणामुळे आमच्या मुलाना शिक्षण व नोकर्‍या मिळत नाहीत.
आरोपात तथ्य किती अन सत्य किती माहीत नाही.
पण मुहूर्त अगदी योग्यच निवडला होता.
ज्या परशुरामाने एका सूतपुत्राला ( कर्णाला) , तो ब्राह्मण असेल तरच विद्या मिळेल , इतर जातीच्या लोकाना विद्या मिळत नाही, असे सांगितले होते, कर्ण ब्राह्मण नाही , हे समजल्यावर त्याला विद्याविस्मरणाचा शापही दिला होता , त्याच परशुरामाच्या जयंतीचा मुहुर्त .

Proud

Pages