जातीयवाद कसा कमी होईल?

Submitted by प्रजोत कुलकर्णी on 12 April, 2017 - 11:37

मित्रहो जातीयवाद होण्याची बरीचशी कारणे आहेत, कोणीही त्यांच्या धर्माने, जातीने किंवा पंथाने जसे सांगितले आहे तसे वागले तर जातीयवाद निर्माण होत नाही. माझ्या माहिती प्रमाणे कोणत्याही धर्माने, जातीने किंवा पंथाने असे सांगितले नाही कि ते सोडून दुसरे वाईट आहे. सांगायचे झाले तर बरेच भारतीय सणवार हे सर्व धर्म मिळून साजरे करतात. यामध्ये कुठेही जातीयवाद येत नाही. आताच्या घडीला जातीयवाद हा वेगळ्या कारणामुळे होतो. माझ्या परीने मी त्याचे विश्लेषण केले आहे. माझे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
राजकारणामुळे जातीयवादाला खतपाणी घातला जाते. मतांच्या राजकारणासाठी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घ्यायचे काम सध्या चालू आहे.
आपली न्यायिक व्यवस्थेमधेही काही जातींना हुकते माप दिल्या गेले. खरे तर हे कायदे त्या जातींना संरक्षण म्हणुन अस्तित्वात आले, पण आज त्याच दुरूपयोग होतो आहे. त्याचा मोठा परिणाम यावर होतो.
आरक्षण हा पण एक मोठा मुद्दा आहे.
दुसऱ्या धर्म, जाती बद्दल समाजात द्वेष पसरवणे.
वरील मुद्द्यावर काही उपाय:
सध्या राजकीय फायदा उठवण्यासाठी सर्व पक्ष आपल्या आपल्या परीने समाजात तेढ निर्माण करून आपल्या आपल्यात भांडणे लावत आहेत. यातून आपला समाज विखुरला जात आहे. बरेच असे पक्ष आहेत कि जे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेवून स्वतः अश्या प्रकारचे राजकारण करत आहेत. आपल्याला सर्व राजकीय पक्षांना ठणकावून सांगायची वेळ आली आहे कि तुम्ही जे याचे राजकारण करत आहात ते थांबवा अन्यथा सामान्य माणूस तुम्हाला जगू देणार नाही. याचा सर्वात मोठा तोटा हा सामान्य माणसाला होतो, कारण जे मोठे लोक असतात जे अश्या प्रकारचे आदेश देतात त्यांना काहीही तोटा होत नाही त्यांना राजकीय अभय मिळते व जो सामान्य नागरिक असतो त्याचा यात बळी जातो.
आपली न्यायिक व्यवस्थेत काही काळनुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे. सर्व जाती आणि धर्म यांना एकच न्याय लागू करावा.
आरक्षण हा ही एक मोठा मुद्दा होतो, कारण ज्याला चांगले मार्क्स असूनही तो बऱ्याचवेळा पात्र होत नाही पण जो जेमतेम पास झाला आहे तो मात्र पात्र ठरतो. यामुळे त्या गुणी विद्यार्थाची मानसिकता ढासळते आणि तो अश्या लोकांना शिव्या द्यायला सुरुवात करतो त्यातून हा तेढ अजून वाढत जातो. काहीवेळा जे विद्यार्थी खरोखरच खूप गुणी आहेत पण जे खालच्या जातीचे आहेत हे त्यांच्या आरक्षित जागा आहेत त्याचा वापर न करता खुल्या जागा आहेत त्याचा वापर करतात व खुल्या जागांमधील जागा कमी होतात, त्यामुळेही खुल्या वर्गातले लोक बाकीच्या लोकांबद्दल वाईट बोलू लागतात व त्यातून तेढ निर्माण होते. काही लोक ज्यांना आरक्षण आहे आणि सरकार त्यांचा संपूर्ण खर्च उचलते म्हणून पुढील शिक्षण घेतात, ते याचा तीळमात्रही उपयोग करून घेत नाहीत त्यामुळे आरक्षणामुळे खुला वर्ग आणि आरक्षित वर्ग असे गट पडत चालले आहेत.
दुसऱ्या धर्म, जाती, पंथ यांना शिव्या देणे यामुळे जातीय तणावाचे वातावरण तयार होते आणि यातून समाजात फुट पडते. यातूनच ज्यांचा मनातही दुसऱ्या बद्दल द्वेषाची कल्पना देखील नसते त्यांचीही मानसिकता बदलते. त्यामुळे ही तेढ वाढतच जाते.
कृपया यावर थोडा विचार करा, आणि देशाला एकत्र करून गुण्यागोविंदाने राहण्यासाठी काहीतरी पाउल आपल्या आपल्या परीने उचला. तसेच जर हे मुद्दे तुम्हाला पटले तर ही पोस्ट नक्की शेअर करा......
टीप: हे माझे वैयक्तिक मत आहे, वस्तूस्थिती वेगळी असू शकते.
धन्यवाद,
प्रजोत कुलकर्णी
मो. +९१ ९७६४२३११६०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजपे सत्तेवर आल्यावर अन संघाने समरसतेचे आवाहन केल्यावर 'आरक्षित लोकाना' प्रेमाने मिठीत घेण्याचे प्रकार भलतेच वाढु लागलेत.
स्वतःच्या जातीचा वर्षानुवर्षे फायदा घेऊन झाला , आता त्याचा काडीमात्र उपयोग राहिला नाही... दुसरा त्याच्या जातीचा वापर करुन काही कमवतोय तर त्याला सांगायचे , अरे जातीचे सर्टिफिकेट वापरु नकोस .

Proud

श्रीमंत लोकाना पेमेंट सीट उपलब्ध असतात ... त्यावर कुणीही गरीब मनुष्य अ‍ॅडमिशन घेऊ शकत नाही.. म्हणजे पेमेंट सीट हेही श्रीमंत लोकाना असलेले आरक्षणच आहे. जातीय आरक्षणाविरुद्ध तावातावाने बोलणारे लोक या आरक्षणाविरुद्ध मात्र मूग गिळून बसतात. ५ १% असलेला अतीश्रीमंत मुलगा पेमेंटमधुन डिग्री घेतो. आजवर कुठल्याही उच्चवर्णियाने त्यावर ऑब्जेक्शन घेतलेले नाही , उलट , त्याच्या फीमुळे शिक्षण क्षेत्राला मदत होते , असे त्याचे कौतुक केले जाते.

....
ऑपन अन आरक्षित यांच्या कट ऑफ मार्कातही फारसा फरक राहिलेला नाही. आरक्षित वर्गामुळे अनारक्षित मुलावर अन्याय होतो असा गळा काढण्यापुर्वी या वर्षाचे कट ऑफ काय आहेत , याचे एक्सेल द्यावे , अन्यथा असे ब्लँकेट / ब्लाइंड स्टेटमेंट करु नये.

.....
दलित आरक्षणाला विरोध करणार्‍यानी मराठा आरक्षणाबाबतही आपली भूमिका मांडावी.

>> माझ्या माहिती प्रमाणे कोणत्याही धर्माने, जातीने किंवा पंथाने असे सांगितले नाही कि ते सोडून दुसरे वाईट आहे.

अय्या खरं की काय? मग ते अस्पृश्यता, विटाळ वगैरे कशामुळे होतं?

प्रेमविवाह !

प्रेमविवाह !

आणि

प्रेमविवाह !

>>>> माझ्या माहिती प्रमाणे कोणत्याही धर्माने, जातीने किंवा पंथाने असे सांगितले नाही कि ते सोडून दुसरे वाईट आहे. <<<<
आपली माहिती बरोबर नाही. सर्व धर्मात, अन्य धर्मिय कसे वाईट व त्यांचेशी कसे वागावे याबद्दलचे विवेचन आहे. Happy
माझ्या हिंदू धर्मापुरते बोलायचे तर "परधर्मो भयावहः" असे केव्हाच सांगुन ठेवलेले आहे Proud

Proud

धार्मिक दुकानदारांची गिर्‍हाइकं कमी होतील आणि धार्मिक दुकानदारांची स्वधर्मातच भयावहो स्थिती होईल म्हणून त्यानी असे खोटेच लिहून ठेवले आहे.

समुद्र ओलांडू नये अशीही तुमच्या धर्माची आज्ञा होती ना ? ती मोडीत निघालीच ना?

गादीवर बसलेले लोक , पालखीत बसलेले लोक यांच्या मागेपुढे अब्दागिर्‍या धरायला लोक हवे असतात. समुद्र ओलांडुन , धर्म सोडुन लोक बाहेर गेले की अब्दागिर्‍या कोण धरणार ? म्हणुन गादीवाल्या लोकानी अशी सुभा-शिटं तयार केलेली आहेत.

Proud

माझ्या हिंदू धर्मापुरते बोलायचे तर "परधर्मो भयावहः" असे केव्हाच सांगुन ठेवलेले आहे
ठीक आहे, पण याच हिंदू लोकांचा एक पवित्र ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेत म्हंटले आहे - चातुर्वण्यं मया सृष्टं, गुणकर्म विभागशः
त्याचा अनर्थ करून जन्मजात जातिव्यवस्था हिंदूंनीच चालू केली, जोपासली नि अजूनहि जिवंत ठेवली आहे.
अर्थात यात राजकारण्यांचा भाग मोठा. पण राजकारण्यांना जनतेचे कल्याण करण्यासाठीच निवडून यायचे असते नि अमुक जातीचा माणूस निवडून आला तर त्या जातीचेच भले होते, म्हणून जातींचे राजकारण. दुसरा उमेदवार अमुक जातीचा आहे म्हणून त्याला मत देऊ नका!! नाहीतर तो तुमचे अकल्याण करेल!! नि लोक ते खरे मानतात.
जोपर्यंत शिक्षण प्रसार होत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. म्हणून आरक्षण, कारण याच वर्गातील लोकांमधे जास्तीत जास्त जातीयवाद आहे, तो नाहीसा व्हायचा तर त्या वर्गातील जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायला पाहिजे.
जे ब्राह्मण जातीयवाद मानतात ते ढोंगी आहेत, त्यांना जे सोयीचे वाटेल त्यावर विश्वास ठेवतात. एकनाथांनी ब्राह्मणांच्या आधी इतरांना जेवायला घातले ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात.
बाकी आजकालच्या जगात जो खोटे बोलून लोकांना फसवतो तोच निवडून येतो, नि त्याच्या हाती अधिकार! त्याला अक्कल असो वा नसो. अमेरिका सध्या या बाबतीत फार पुढे आहे. भारतीयांनी त्याचे अनुकरण करू नये ही सदिच्छा.

नंद्या भौ, शिक्षणाने जातीयवादी असण्यावर फरक पडत नाही. चांगले सुशिक्षित शहरी माणसेही जात पाहून मतदान करतात, व तसा प्रचारही करतात.

जातिव्यवस्था राजकारण्यांनी जिवन्त ठेवली हे अर्धसत्य आहे. डिस्क्रिमिनेशन करीत राहणे व त्यातून आयडेन्टीटी शोधणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. कारण असुरक्षितता. आता राजकारण्यांचे म्हणाल तर स्वातंत्र्यपूर्व काळात कुठे होते मताधारित निवडणुकांचे राजकारण ? त्यावेळे विशेषटः पेशावाईत जातियता पराकोटीला पोचली होती. अगदी कथित खालच्या जातीचे लोकही ती विनातक्रार मान्य करीत किम्बहुना आपली लायकीच ती आहे असे कंडिशनिंग त्यांचेच झालेले असे. ब्रिटीश आमदनीमुळे पाश्चिमात्य समतेचे वारे इथेही झिरपू लागल्यानेही उच्च्वर्णीयांच्या विचारात देखेल फरक पडला. समाजसुधारकांच्या प्रभावाने मानसिकता बदलत आहे. जातिव्यवस्था म्हटले की सर्वाना मुख्यतः अनारक्षित मंडळीना शिक्षण नोकर्‍यातले आरक्षणच फक्त आठवते. तेवढ्यापुरतीच ही चर्चा सिमीत राहते.

तीन वेळा प्रेमविवाह केल्याने जातीयवाद कसा कमी होईल? 
>>>>>

लोकहो, माझ्यावर विश्वास ठेवा आणि करून तर पहा. मी ग्यारण्टी घेतो.

जे संस्कार तुम्ही तुमच्या मागच्या पिढीकडून उचलता ते पुढे नेता, अनुकरण करता. जर तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला काही वेगळे संस्कार द्यायचे, दाखवायचे असेल तर प्रेमविवाहाला पर्याय नाही !

उद्या कधीतरी माझा प्रेमविवाह होईल. प्रेम जात बघून होत नसल्याने आणि माझी गर्लफ्रेंड माझ्या जातीची नसल्याने किंबहुना अगदीच भिन्न जातीप्रांताची असल्याने आमची मुले जेव्हा होतील त्यांना आपसूकच दोन्ही जातींचा अभिमान वाटू लागेल. पुढे ते आणखी एका तिसरयाच जातीच्या मुलीशी लग्न करतील जिलाही अश्या दोन भिन्न जातींचा अभिमान असेल मग पुढच्या पिढीत त्यांच्या मुलांना टोटल चार जातीचा अभिमान असेल.. एखादी पिढी अजून आणि कोणाला काय अभिमान बाळगावा याचा हिशोब एवढा गुण्तागुण्तीचा आणि किचकट होईल की लोकं अभिमान बाळगणेच सोडून देतील. एकदा का लोकांनी आपल्याला जन्माने मिळालेल्या जातीचा अभिमान बाळगणे सोडले तर आपसूकच जातीयवाद कमी, नव्हे नष्ट होईल.

हे वर माझे उदाहरण दिले असले तरी मला माझ्या जातीचा काडीचाही अभिमान नाही की लाज नाही की आणखी काही नाही.
कारण मला कल्पना आहे की जातीभेद मानणे तुम्ही तेव्हा सोडाल जेव्हा तुम्ही जात मानणे सोडाल.

"मी जात मानतो, मला माझ्या जातीचा अभिमान आहे, पण मी ईतर जातींचा द्वेष करत नाही, म्हणून जातीयवादी नाही" .... असे काहीही नसते. कुठल्यातरी ठराविक जातीचा शिक्का असलेल्या आईबाबांच्या पोटी जन्म घेतल्याने ती तुमची जात झाली आणि तुम्हाला त्याचा अभिमान वाटू लागला यातील फोलपणा तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हाच तुम्ही या जातीयवादाच्या चक्रातून बाहेर पडाल!

मी मागे कुठे तरी माबोवर लिहिलं होतं, कि आपल्या मुलांच्या बोर्ड एक्झामच्या फॉर्म मधे मुलांना पहिल्यांदा जात कळते. माझ्या मुलाला तरी पहिल्यांदा तेव्हाच प्रश्न पडला कि आपली जात कोणती? आपण SC / ST अशा काही कॅटेगरीत आहोत का? आणि ते नक्की काय असतं? मला तरी शाळा-कॉलेजच्या एक्झाम फॉर्म मधे जातीचा उल्लेख का असतो त्याचा उद्देश कळला नाहीए. (म्हणजे खरं तर माहित आहे आरक्षण) पण म्हणजे शिक्षण संस्थाच मुलांना जात इन्ट्रोड्युस करतात. फॉर्म मधुन जात हटली तर पुढच्या पिढ्यांना जातीबद्द्ल फार कळणार नाही, कारण हल्ली जुन्या काळासारखा जात आणि त्या रिलेटेड गोष्टींचा रोजच्या जीवनात उल्लेख नसतो. शाळेतल्या मुलांना कोणत्याही कारणाने जातीचा उल्लेख आणि माहिती करुन दिली नाही तर जातीयवाद नक्कीच कमी होइल. ( मोठं झाल्यावर ते टाळता येणार नाही, पण तो पर्यंत समज आलेली असते आणि रॅशनली विचार करण्याची क्षमता सुद्धा.)

<<<<<नंद्या भौ, शिक्षणाने जातीयवादी असण्यावर फरक पडत नाही. चांगले सुशिक्षित शहरी माणसेही जात पाहून मतदान करतात, व तसा प्रचारही करतात.>>>>
खरे आहे. शिक्षणाने माणसाला अक्कल येतेच असे नाही हेहि खरे आहे. चांगले शिक्षण घेतले, चांगले काम केले म्हणजे चांगले यश मिळेल असेहि नाही. चांगले अन्न खाल्ले, चांगला व्यायाम केला म्हणून माणसाची तब्येत बिघडणारच नाही असेहि नाही. खूप उपचार करूनहि माणूस शेवटी मरणारच.
थोडक्यात काय, तुका म्हणावे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे! कश्शाला उगाच काही करायचे. स्वस्थ बसावे झाले.

हल्ली जुन्या काळासारखा जात आणि त्या रिलेटेड गोष्टींचा रोजच्या जीवनात उल्लेख नसतो.
>> ह्याबद्दल जरा शंका आहे. ज्ञातीसंमेलने, वधूवर मेळावे, लग्न, यासोबतच इतरही अनेक गोष्टी होत असतात जात दाखवणार्‍या. पण जेव्हा जातीयवाद हा विषय चर्चेला येतो तेव्हा अ३ म्हणाले तसे तो केवळ आरक्षणाभोवतीच फोकस राहील असे पाहिल्या जाते.

नन्द्याभौ, तुम्ही माझा प्रतिसादाला उगाच तिरकस उत्तर देत आहात. कॄपया शक्य असल्यास तुमच्या या विधानांचा विस्तार कराल काय? म्हणजे तुमचे मत मला कळेल स्पष्टपणे.

जोपर्यंत शिक्षण प्रसार होत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. म्हणून आरक्षण, कारण याच वर्गातील लोकांमधे जास्तीत जास्त जातीयवाद आहे, तो नाहीसा व्हायचा तर त्या वर्गातील जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायला पाहिजे.

याच वर्गातील म्हणजे कोणत्या व शिक्षणाने तो कसा दूर होईल तेही सांगा.

जातीयवाद हा व्यसनासारखा असतो..तो कमी किंवा जास्त करता येत नाही..मी जातीयवादी असेन,तर मला तो माझ्यापुरता थांबवता येतो. (बंद करता येत नाही.) मी माझ्यापुरती जात थांबवली याचा अर्थ मी जात पाळायची-बंद केली. दुसर्‍यांनी मला कित्तीही जातीवरून टीका, टोमणे मारले किंवा मला ते लागले ,तरी मी त्यावर प्रतिक्रीया देत नाही..दिलीच तर अत्यंत संयमी व शांततेनी देतो. अश्या अनेक लक्षणांवरून मला माझ्यापुरती जात थांबविता येते.

जाता जाता:- वरील वर्तन प्रक्रीयेत "मग बाकिचे कधी जात (पाळायची) थांबविणार?" असा प्रश्न जर मला पडत असेल,तर त्याचा अर्थ मला जात थांबविण्यात काहिही स्वारस्य नाही,असा होतो.

जोपर्यंत शिक्षण प्रसार होत नाही तोपर्यंत हे असेच चालायचे. म्हणून आरक्षण, कारण याच वर्गातील लोकांमधे जास्तीत जास्त जातीयवाद आहे, तो नाहीसा व्हायचा तर त्या वर्गातील जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायला पाहिजे.
याच वर्गातील म्हणजे कोणत्या व शिक्षणाने तो कसा दूर होईल तेही सांगा.
>>

जात म्हणजे एका प्रकारे लादलेली गुलामगिरीची व्यवस्था आहे, अन म्हणून ती चुकीची आहे; हे शिक्षणाव्यतिरिक्त कशाने साध्य होईल ?
उदारमतवाद किंवा सो कॉल्ड मोकळे विचार, हे शिकलेल्या समाजात जास्त आढळतात की निरक्षर माणसांत ?

आता शिक्षण मिळून सुद्धा प्रचलित चुकीच्या व्यवस्थेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणारे सगळीकडेच आढळतील, उडदामाजी काळे गोरे सापडायचेच. पण म्हणून सगळे तसेच वागतील असं मानता येणार नाही.

चर्चा जातीयतेच्या संदर्भात आरक्षणाबद्दल आहे म्हणून आधीच इथे मांडलेला विचार मांडतोय परत :

मला माहित आहे की आरक्षण हा बर्‍यापैकी चर्चिलेला विषय आहे. पण असं वाटतं की बर्‍याचदा ही बाब भावनिक पद्धतीने मांडली जाते. म्हणजे असं की आरक्षणाचे हेतू तर नाकारता येत नाहीत, त्याचबरोबर त्या ध्येयाकडे जाताना थोडी दिशा भरकटलेली आहे हे ही तितकंच खरंय.

आज हा विषय आठवायचे कारण म्हणजे, आज लोकसत्तामध्ये एक वाचण्यात आली ते अशी : ओबीसी नेत्यांच्या मुलांना आरक्षण नको!

यावरुन असं वाटलं की आरक्षणावर समग्र विचार व्हायला हवा. आधीच्या चर्चा आणि त्यावरुन बनवलेल्या काही मतांवरुन "काय असावे" अशी मांडणी करुन बघायचा हा प्रयत्न आहे. हे मान्य की लगेच कोणी या बाबी अमलात आणायला जात नाही परंतु एक सर्वसमावेशक धोरण म्हणून, समाजहितासाठी म्हणून आरक्षण कसे असेल अशी चर्चा अपे़क्षित आहे.

प्रथमतः एक मान्य बाब म्हणजे आऱक्षण कोठेही जात नाही आणि एक समाज म्हणून पुढील काही काळासाठी ते राहणार आहे हे इथे स्वीकारलेले आहे. त्यास सामाजिक, आर्थिक आणि राजकिय कारणे असतील पण ते राहू नये आणि समाजात किमान समतोल साधावा हाच त्यचा हेतू असेल हे महत्त्वाचं.

१. जात ही फक्त जात प्रमाणपत्रावर नोंदलेली असावी. इतर ठिकाणी (शाळेचा दाखला इ. इ.) फक्त त्या प्रमाणपत्राचा नंबर वापरावा फारतर. पण कोठेही जातीचा उल्लेख हा जातीयता जिवंत ठेवण्यास मदतच करेल. (जातीप्रमाणेच धर्माचाही उल्लेख सरकारी कागदपत्रातून कमी झालेला पहायला आवडेल पण ते अवांतर इथे. )

२. सर्व आरक्षण प्रवर्गांसाठी क्रिमी लेयर ही अधोरेखित व्हावी. वरच्या बातमीनुसार ओबीसी या प्रवर्गासाठी क्रिमी लेयरची प्रस्तावित अट ही वार्षिक १० लाख उत्पन्नाची आहे (किती उत्पन्नाची अट हा वेगळा मुद्दा आहे आणि इथे त्यावर चर्चा अपेक्षित नाही. मुद्दा सर्वच प्रवर्गांसाठी ही क्रिमी लेयर लागू व्हावी हा आहे).

३. खुल्या प्रवर्गासाठी इबीसी ही एक रेखा आहे (जी क्रिमी लेयरपेक्षाही दारिद्र्य रेषेच्या जवळ जाणारी संकल्पना आहे) त्यांना ओबीसी अंतर्भूत करावे.

४. एकाच घरातील तीन पिढ्यांनंतर नोकरीतील आऱक्षण व उच्च शिक्षणासंदर्भातील आरक्षण व सवलती यांवर मर्यादा याव्यात (जर क्रिमी लेयर हा मुद्दा लागू होत नसेल तर).

हे सहज आठवलेले आणि सुचलेले मुद्दे. अजून काही मुद्दे असतील तर स्वागत आहे.

आरक्षणाचा मूळ हेतू आहे प्रतिनिधित्व. हे बहुतेकांना माहित नसते. बहुसंख्य लोकांना आरक्षण म्हणजे गरिबी-हटाओ-योजना वाटते. पण ती अशी नाहीये. सामाजिक व्यवस्थेत ज्या लोकांना प्रतिनिधित्व, सन्मान, संधी ही जातीनिकषांवर नाकारली गेली व त्यामुळे त्यांच्या पिढ्यांपिढ्या मुख्य प्रवाहात येण्यापासून वंचित राहिल्या, मानहानीकारक जगणे जगत राहिल्या त्यांना समानहक्क असलेले माणूस म्हणून संविधान संधी देत आहे. यात अनेक जाती, जातीसमूह हे व्यवस्थेत महत्त्वाच्या पदांवर, जागांवर, निर्णयप्रक्रियेत नसायचे ते त्यांनी असावे ह्यासाठी आरक्षण हे एक साधन आहे.

आरक्षण विरोधी लोकांनी आकसातून अनेक गैरसमज पसरवलेले आहेत. त्यासंबंधी जनजागृती करायची सोडून आरक्षणसमर्थक आक्रमक तलवारबाजाची भूमिका घेतात, हे दोन्ही प्रकार दुर्दैवी आहेत. आता सामंजस्याने, तथ्यांवर आधारित चर्चा करण्याचे, आपले समज तपासून घेण्याचे दिवस आले आहेत असे मला वाटते.

आरक्षणासंबंधी काही समज प्रचलित आहेत, ते कोणते?

१. आरक्षणामुळे ना-लायक लोकांना संधी मिळून लायक लोकांवर अन्याय होतो
२. आरक्षणामुळे लायकी नसलेल्या लोकांना त्यांच्या लायकीपेक्षा जास्त अधिकार, पद, सत्ता मिळते व त्यातून भ्रष्टाचार निर्माण होतो.
३. आरक्षणामुळे कम-अस्सल लोकांना संधी मिळून व्यवस्थेचा दर्जा खालावतो.

अजून काही आहेत काय?

तिरकसपणा नसून मान्यता आहे की नुसत्या शिक्षणामुळे, किंवा नुसत्या एकाच गोष्टी मुळे प्रश्न सुटणार नाहीये. कधीच सुटत नाही.
इथे मी दोनच वर्ग मानतो, जातिभेद मानणारे व न मानणारे, त्यापैकी जे जातीभेद मानतात त्यांना हे शिक्षण देणे महत्वाचे आहे की माणसाचे महत्व, उपयुक्तता त्याच्या जातीवर अवलंबून नसून त्याच्या कर्तुत्वावर असते. हे कळले म्हणजे मग मतदान करणे, किंवा इतर गोष्टी जात कुठली आहे यावर अवलंबून न रहाता इतर मह्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष जाते. शिक्षणाने विकासाचे दरवाजे उघडे होतात, मग कळते की तिथे जातीचा संबंध नाही. परत मान्य करतो की हा एकच उपाय नाही -फक्त माझे मत आहे की याचा उपयोग होईल.
जातिव्यवस्था राजकारण्यांनी जिवन्त ठेवली हे अर्धसत्य आहे.
बरोबर पण जातपातभेद चालू ठेवण्यात त्यांचा भागहि मोठा आहे.
वर ननाकळा यांनी आरक्षणाची गरज का हे लिहीले आहे ते पटले. शिक्षण अश्यासाठी की अशी आशा आहे की लोकांना शिक्षणामुळे कळेल की

माझ्या हिंदू धर्मापुरते बोलायचे तर "परधर्मो भयावहः" असे केव्हाच सांगुन ठेवलेले आहे
ठीक आहे, पण याच हिंदू लोकांचा एक पवित्र ग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेत म्हंटले आहे - चातुर्वण्यं मया सृष्टं, गुणकर्म विभागशः

तुमच्या मुद्यावर माझे मत मांडायचे म्हणले की वाद होणारच. पण पर्याय नाही.

परधर्मो भयावहः - याची व्याख्या करताना "धारयेती धर्मः "अशी धर्म या शब्दाची व्याख्या आहे. हिंदु धर्म रिलीजन अर्थाने वापरत नाहीत तर आपले विहीत कर्म या अर्थाने शब्द आलेला आहे.उदाहरणा दाखल एक उदाहरण घेऊ. आपण बाजीराव मस्तानी हा सिनेमा पाहिला असेल. यात मुळचे ब्राह्मण असलेले पेशवे जेव्हा राज्यकर्ते झाले त्यांना तुम्ही अधर्म करताय नरकात जाल असे सांगुन ब्राह्मण समाजाचा झालेला विरोध पहाता एक सामान्य माणुस आपला धर्म " विहीत कर्म " बदलतो तेव्हा त्याला आधीचे संस्कार आणि नविन धर्म यात नेमके काय करायचे याबाबत वैयक्तीक स्तरावर गोंधळ असतोच शिवाय समाज ते मान्य करत नाही त्यामुळे भयावह परिस्थीती निर्माण होते असा त्याचा अर्थ.

दुसरे उदाहरण घेऊ. नगर जिल्ह्यात मुळच्या हरीजन नंतर १९७२ च्या दुष्काळात ख्रिश्चन धर्म स्विकारलेल्या तरुणाने जेव्हा हिंदुत्व स्विकारले तेव्हा त्याचा मुळचा समाज त्याच्या जीवावर उठला. ( मुद्दाम मी नाव टाळतो आहे ) अत्यंत भयावह अवस्थेत त्याला नगर जिल्हा सोडुन पुण्याला पलायन करावे लागले. त्याची बायको सुध्दा त्याला साथ देण्यास तयार नव्हती.

गीता परधर्माचा द्वेष करा असा संदेश देत नाही पण आपण ज्या कुळात जन्माला आलो ते संस्कार सोडताना भितीदायक परिस्थीती होते. ते झेलण्याची मानसीक अवस्था फारच कमी लोकांच्यात असते. सबब हा इशारा आहे.

चातुर्वर्ण्य ही समाज व्यवस्था त्या काळी होती याचाच अर्थ एखादा गुणवान ( गुणाप्रमाणे भेद असा शब्द आहे - जन्माप्रमाणे नाही ) आपले काम बदलणे गुणाप्रमाणे शक्य होते. इतिहासात असे अनेक दाखले देता येतील की अनेकांनी अशी कर्मे बदलली आहेत. याला मान्यता मिळायला मानवी प्रवृती अडथळे करतात. युरोपात काळ्या वर्णाच्या लोकांना आजही वाईट वागणुक मिळते हे ख्रिश्चन धर्म शिकवत नाही. ह्या मानवी प्रवृत्ती आहेत. आपणच श्रेष्ठ हे दाखवण्याचा मानवी स्वभाव आहे. ज्याच्या हाती सत्ता आली तो आणखीनच वाईट पध्दतीने हे सांगतो.

आता मुळ प्रश्नाकडे जाऊ.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो भागवत धर्म निर्माण केला ( ज्ञानदेवे रचिला पाया ) हा जातियवाद कमी करण्यासाठीच आहे. महाराष्ट्रात हा धर्म पोसला म्हणुन इतर राज्यांपेक्षा जातीयता महाराष्ट्रात कमी आहे असे माझे मत आहे.

आषाढी वारी संपताना काल्याच्या किर्तनानंतर जेव्हा वारकरी एकमेकांना प्रसाद भरवतो तेव्हा तो कोणत्या जातीचा आहे ? असा प्रश्न कोणी विचारत नाही. इतकी मोठी परंपरा असताना महाराष्ट्रात तरी जातियवादाच्या प्रश्नाला काय उत्तर असा प्रश्न मोठा नाही.

अद्याप दक्षिण भारतात आणि उतर भारतात मात्र जातियतेच्या मोठ्या भिंती आहेत. महाराष्ट्र फक्त संतांच्या शिकवणुकीमुळे वेगळा आहे.

भागवत धर्मात किण्वा पंथात जी समता / अजातिभेद सांगितला जातो तो फक्त अध्यात्म क्षेत्रा तील स्वातंत्र्यापुरताच होता हे लक्षात घेतला पाहिजे. चोख्याला तरी कोठे मंदिर प्रवेश मिळाला. त्या काळी वारकरी इतर सामाजिक संदर्भात अस्पृश्यता पाळीतच होते . वारकरी संप्रदायातही आंतरजातीय विवाहाना मान्यता नव्हतीच.

Pages