आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<हे बघा मागचे २० वे शतक होते तेंव्हा २००० साल पुर्ण झाले. सध्या २१ वे शतक सुरु आहे म्हणजे २१०० साल पुर्ण होईल शतका अखेरीस.
तसेच दशकांचे पण मोजमाप.. ७० चे दशक म्हणजे १९६१-७०, ८० चे दशक म्हणजे १९७१-८० इत्यादी..>>>

ह्याच हिशोबाने ९० चे दशक म्हणजे ८१-९०

परफेक्ट!
प्रश्न नको उत्तर लिहा पुर्ण! Happy

८९३. हिंदी ९० चे दशक. --- उत्तर
चार पैसे क्या मिले क्या मिले भई क्या मिले
वो ख़ुद को समझ बैठे ख़ुदा
वो ख़ुदा ही जाने अब होगा तेरा अंजाम क्या

काहे पैसे पे इतना ग़ुरूर करे है
यही पैसा तो अपनों से दूर करे है

कुठलं गाणं आणि किती वेळ सुचत नव्हतं......!!

माझ्या मते ९० चे दशक म्हन्जे १९९०-२०००>>>

पंडीतजी वर मी लिहले आहे माझ्या माहिती प्रमाणे!
कारण १ ते १० चे पहिले दशक. आता ह्याला शुन्याचे दशक म्हणायचे की दहाचे दशक!

आज खूपच स्लो चालू आहे खेल आता तिसरं कोडं सुटल. अजून किमान ७-८ तरी झाले पाहिजेत. द्या पटापट कोडे. ते साल सरळ १९९०-२००० असच देऊ म्हणजे गोंधळ होणार नाही.

मराठी कोण होतं लावारिसमध्ये?>>>
डॉ. श्रीराम लागु. अमिताभचा सांभाळ करणारे!
म्हणून मराठीतील सम्राट अभिनेता असा क्ल्यु दिलेला! Happy

बरं.... सिनेमा पाहिलेला नाही...माहीत नव्हतं....
नटसम्राट कळले, मग डॉ लागू आणि नाना पाटेकर आठवले... पण हे दोघे + सुपरस्टारला अडली गाडी

mr.pandit तुम्ही द्या पुढचे, मी जाईन आता...मग क्ल्यूसाठी अडेल धागा.

८९४. हिन्दि ५०-६०
त प क स ह
त अ ब क प ह
ल ज द त
च ज ज स ह

तू प्यार का सागर है, तेरी एक बूँद के प्यासे हम
लौटा जो दिया तूने, चले जायेंगे जहां से हम
गायक - मन्ना डे

सुपरस्टार आजवर दोन झाले पहिला राजेश खन्ना आणि दुसरा अमिताभ!
त्यांनतर केवळ स्टार झाले!
खामोश कन्या म्हणजे सोनाक्षी सिन्हा!
राजेश खन्ना असणे शक्य नाही अमिताभ सोनाक्षी एकत्र काम केलेला सिनेमा??

सोनाक्षीचा पहिला सिनेमा दबंग असावा... बहुतेक पण त्यात बच्चन साहेब नव्हते विनोद खन्ना होते!

ताकते रहते तुझको सांझ सवेरे
नैनो मे बसिया जैसे नैन ये तेरे
नैनो मे बसिया जैसे नैन ये तेरे
तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिल का ले गये चैन
मेरे दिल का ले गये चैन
तेरे मस्त मस्त दो नैन

अंदाज...
माना के हम यार नहीं

गाणे ठाऊक नाही ऐकलेले नाही अटकेपार झेंडा ह्याचा अर्थ पर्देशी सिनेमात त्यात दिपिका आणि प्रियंका पण दिपिकाला बहिण नाही म्हणिन प्रियंकाची बहिण तिने गायलेले हे गाणे असे गुगलबाबा म्हणतोय माझे ज्ञान शुन्य!

Pages