ए ssss झब्बू! - मराठी खाद्यपदार्थ

Submitted by संयोजक on 1 March, 2017 - 00:47

बटाटा वडा, मिसळ, झुणका भाकर असे चविष्ट मराठी पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. अस्सल खवय्यांनो, येऊ द्यात तुमची प्रकाशचित्रे. सुगरणींनो, दाखवा तुमच्या खाद्यपदार्थांमधील कलाकृती Happy

हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.

१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदा भाजून केलेला मराठमोळी कोंबडी रस्सा

ChickenCurry

काय एकेक पदार्थ आहेत, सर्व शाकाहारी पदार्थ असे उचलून तोंडात टाकावेसे वाटतायेत.

ऋ माझ्या सासरी हे वडे फेमस आहेत, नेहेमी करतात पण आम्ही शाकाहारी असल्याने ते नारळाच्या दुधाबरोबर, रस्सा भाजी, उसळी अशाबरोबर खातात. माहेरी भाजणीचे वडे फेमस आहेत. हे करत नाहीत.

नलिनी, रश्याला तवंग भारी आलाय.. Happy

अंजू हो, आमच्याकडेही वाटाण्याच्या उसळीसोबत खातात, पण मला भाज्या कमीच आवडतात. त्यापेक्षा गरमागरम चहासोबत खायला आवडतात.

असो, तरी कोणाला हे वडेच आवडत नसतील तर मटणासोबत पारश्यांच्या बेकरीतील पाव दिला जाईल Happy

mutton paav.jpg

अंजू, वाटी कश्याला, हे ताटच घ्या बदलून...
पण मुल्ला की दौड मसजिद तक..
मी मटण बदलून मासेच देऊ शकतो Happy

fish fry.jpg

शुभरात्री Happy

मस्त आहेत फोटो
आंब्याचे क्वीक आईसक्रीम
mangoice.jpg

एन्जॉय ऋ.

मी तुझ्या ताटातले वडे सशलच्या क्रॅनबेरांबाबरोबर स्वाहा केले.

पिठलं, मेथीची भाजी, लसणीची चटणी , भाकरी आणि कांदा. >>>> वाह मस्तच सजलंय ताट.. जाता जाता काय दाखवलेत हे.. आता हळदीचे गरम दूध पिऊनच झोपावे लागणार.. शुभरात्री Happy

Pages