ए ssss झब्बू! - मराठी खाद्यपदार्थ

Submitted by संयोजक on 1 March, 2017 - 00:47

बटाटा वडा, मिसळ, झुणका भाकर असे चविष्ट मराठी पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. अस्सल खवय्यांनो, येऊ द्यात तुमची प्रकाशचित्रे. सुगरणींनो, दाखवा तुमच्या खाद्यपदार्थांमधील कलाकृती Happy

हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.

१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाचणीची भाकरी.
(इंडक्शनवरही भाकरी टम्म फुगते हे दाखवण्यासाठी काढला होता फोटो. इंडक्शन दिसण्याच्या नादात टम्म फुगण्याचा फोटो अँगल नाही जमला).
PicsArt_12-13-10.41.53.jpg

Dalbati.jpg

डाळ-बट्टी

सुरमई फ्राय , कोलंबी सुक्का ,सुरमई चा रस्सा आणि तांदळाची भाकरी,लिंबू fish.jpg

लाल भोपळ्याचे घारगे

सांजोर्‍या

sanjori.jpg

बटाटेवड्याला रस्सा पाहीजे होता ! तोंपासु>> धन्यवाद!

<<पुडाच्या पाटोड्या- खान्देशी पदार्थ>> पदार्थाची कृती पण द्याल का?<<
भगवति, इथे दिलिय पाकृ!
http://www.maayboli.com/node/25611
तेव्हा साध्या मोबाईलने फोटो काढल्यामुळे इतके नीट नाही आलेत.

घावणे व नारळाचं दूध!
DSCN7672-1.JPG

Pages