ए ssss झब्बू! - मराठी खाद्यपदार्थ

Submitted by संयोजक on 1 March, 2017 - 00:47

बटाटा वडा, मिसळ, झुणका भाकर असे चविष्ट मराठी पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. अस्सल खवय्यांनो, येऊ द्यात तुमची प्रकाशचित्रे. सुगरणींनो, दाखवा तुमच्या खाद्यपदार्थांमधील कलाकृती Happy

हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.

१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिटलर नंतर तुम्हा सगळ्यांचा नंबर लागतो , अरे किती अत्याचार कराल या जीवावर , तोंडातनं झरे वाहायला लागलेत येवढे सगळे प्रकार एकाच ठिकाणी बघुन. Proud
एकसो एक फोटोज/ रेसिपीज आल्यात. jumping0006.gif

नलिनी, कसले तुफान देखणे फोटो टाकते आहेस! आणि तो रव्याचा लाडू केवढा घोटीव वळलायस, माझ्या समोर ठेवलास तर मी नुसती बघतच बसेन, तो खाणं सुचणार नाही. कमालीचं कौशल्य आहे >>>>>>> +१

वरती सर्वांनी घरी केलेले पदार्थ दिसताहेत. काय करतात एकेक पदार्थ...

.................
संयोजक,

पदार्थ सर्व स्वतःच्या घरी केलेलेच असायला पाहिजे का?
की बाहेरून आणून त्याचे फोटो काढले तर चालतील का?

शोभा फोटू दिसत नाही नाही ना
फक्त सुरळी वडी दिसली>>>>>>>>>>.का? का? का? >> दिसलेत बाई !
आईस्क्रीम झकास !

मोदक
20150917_133130.jpg

दसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी केलेली मेजवानी ..मसाले भात, बटाट्याची भाजी, भज्जी , पुरी , पनीर मटार भाजी, पापड, श्रीखंड , शिरा . dasara.jpg

मेथीचे लाडु
WhatsApp Image 2017-03-01 at 1.33.55 PM(1).jpeg

WhatsApp Image 2017-03-01 at 1.33.55 PM(2).jpeg

चकली

Pages