झुकिनी/स्क्वॉश- नूडल्सकरता १,२ किंवा जशी क्वांटिटी हवी तशा,
सॉसकरता- रंगीत भोपळी मिरच्या- लाल, पिवळ्या, केशरी- चौकोनी तुकडे करुन,
झुकिनी/स्क्वॉश- चौकोनी तुकडे करुन,
ताजे टोमॅटो- जरा मऊसर, रस निघतील असे, १,२
लसणीच्या पाकळ्या- ३,४ स्लाईस करुन,
ताजी मिरपूड, पास्ता सिझनिंग, ताजी बेसिल पानं आणि हवं ते चीज वरुन घ्यायला, चवीपुरतं मीठ, ऑलिव ऑईल- नूडल्सकरता आणि सॉसकरता
हल्ली बाजारात स्पायरलायझर मिळायला लागलंय ते वापरुन झुकिनीचा शेंडा उडवून अर्ध्यात कापून तुकडा करुन घ्यावा. फ्लॅट भाग स्पायरलाझरवर अॅडजस्ट करुन उजव्या बाजूला गोल गोल फिरवत नूडल्स करुन घ्याव्यात.
आधी तेलावर लसणीच्या पाकळ्या घालून मग त्यात भोपळी मिरच्या आणि झुकिनी परतून घेऊन मीठ, मिरपूड, पास्ता सिझनिंग घालून शिजत ठेवावं. एकीकडे नूडल्सकरता पाणी उकळत ठेवावं. (ह्या नूडल्स अगदी दोनच मिनिटं शिजवायच्या असल्याने आधी सॉस करुन घ्यावा). भोपळी मिरच्या, झुकिनी जरा शिजल्यासारखी वाटली त्यात टोमॅटॉच्या फोडी घालून रस सुटू द्यावा.
नूडल्सकरता पाणी उकळायला लागलं असल्यास त्यात ऑऑ घालून नूडल्स घालाव्यात. दोनेक मिनिटांनी तोडून बघाव्यात. शिजलेल्या आणि किंचीत कच्चट ह्या मध ला रिझल्ट अपेक्षित आहे. नूडल्स शिजलेल्या वाटल्या की चाळणीत ओतून गार पाण्याखाली धुवाव्यात आणि सॉसमध्ये मिक्स करुन एक दोन मिनिटं शिजवाव्यात.
वाढताना वरुन हवं असेल ते चीज, बेसिलची पानं घालून सर्व्ह करावं.
स्पायरलाझर-
अख्ख्या भाज्या खायला आवडत नसतील तर भाज्या शिजल्यावर मिक्सरमध्ये फिरवूनही चालेल.
वा मस्त फोटो. एकदम भूकच लागली
वा मस्त फोटो. एकदम भूकच लागली बघून. मध्ये हिरव्या रंगाचं काय आहे? भो मिरची की कांद्याची पात?
झुकिनी किवा परशियन काकडी असेल
झुकिनी किवा परशियन काकडी असेल , कॉस्ट्को मिळणार्या कलर्फुल स्विट पेपर मिरच्या, ग्रिन बेल पेपर, कान्दा अस टाकल होत... मला पण फार आवडला हा प्रकार टेस्ट मधे अजिबात कॉम्प्रोमाइझ न होता मस्त हेल्दी खाल्ल्याच समाधान.
तुझ्या रेसिपिने पास्ता पण केला पण भुक न आवरल्याने फोटो काढायचा राहिला
हो, हेल्दी नक्कीच आहे. जरा
हो, हेल्दी नक्कीच आहे. जरा जास्त खाल्लं गेलं तरी गिल्टी वाटत नाही अजिबात.
अॅप्॑ल चाट
सफरचंद चाट


बिया काढलेल्या अॅपल्सच्या जाड जाड स्लायसेस करून मग स्पायरल्स करावे लागले.
अॅपल स्पायरल्स मधे चाट मसाला, मिरेपुड, चिरलेला पुदिना, लिंबाचा रस, काळं मीठ, लाल तिखट, खारे दाणे
डाळींबाचे दाणे आणि चिमुटभर साखर मिक्स केलं आणि खाल्लं
हे गाजराच्या स्पायरल्स चे नुड्ल्स

गरम तेलात भरपूर लसुण, हिरवी मिर्ची , कान्दा घालून परतला, त्यात थॉ न करता डायरेक्ट फ्रोजन कॅरट स्पायरल्स टाकले थोडे मिक्स करून झाकण लाऊन ४-५ शिजवलं, मग झाकण काढून सिमला मिर्ची घालून हलवून घेतलं.
क्रश्ड ब्लॅक पेपर , रेड चिली फ्लेक्स, चिंग्ज सिक्रेट्स फ्राइड राइस मसाला, सोया सॉस , व्हिनेगर/लिंबाचा रस आणि ट्रेडर जो चा स्विट चिली सॉस टाकला, मिक्स केलं.
मी उकडलेल्या अंड्याचे पांढरे काप सुध्दा टाकलेत पण ते पूर्णपणे ऑप्शनल, अॅक्चुअली देशात चायनीज फ्राइड राइसमधे भुर्जीसारखं अंड परतून टाकतात त्यातला मला एग यल्लोचा स्वाद आवडायचा नाही म्हणून ही माझी तेंव्हापासूनची सवय म्हणून अॅड करते.
सर्व्ह करण्या आधी तीळ आणि बारीक चिरलेली कांद्याची पात +लसणाची पात घातली, नुड्ल्स तय्यार !
वा! फोटो मस्तच आहेत एकेक!
वा! फोटो मस्तच आहेत एकेक!
डीज्जे, सफरचंदाची साल काढून टाकलीस काय गं?
मला गाजराचा फोटो भयंकरच
मला गाजराचा फोटो भयंकरच आवडलाय डिजे.
No Sashal, not sure why it's
No Sashal, not sure why it's not showing though
>>वरच्या चित्रातील
>>वरच्या चित्रातील स्पायरलायझर कुठल्या कंपनीचे आहे?
अमेझॉनवर आहे का?>> विनिता, हे वर टाकलेलं स्पायरलायझर ओक्सो (oxo) कंपनीचं आहे. अॅमेझॉन वर oxo hand held spiralizer असा सर्च देऊन बघा.
बेड बाथ अँड बियाँड मधे आहे हे
बेड बाथ अँड बियाँड मधे आहे हे स्पायरलायझर.
झुकिनी पास्ता हा प्रकार वाटतो
झुकिनी पास्ता हा प्रकार वाटतो त्यापेक्षा बराच बरा लागतो असा निर्वाळा देण्यात येत आहे.
) थोडं रागु सॉस पण टाकलं.

स्पायरलायझर घेताना गरागरा हॅंडल फिरवायचा असतो त्या टाईपचा घेतलेला बरा. स्क्रू-ड्रायव्हर सारखं झुकिनी फिरवत नूडल्स पाडता पाडता हात दुखायला लागला!
नूडल्स बॉईल करायचे कष्ट घेतले नाहीत! त्याऐवजी इतर भाज्यांबरोबरच कढईत थोडे शिजायला दिले! (Guy method
चांगल्या दिसतायत झूडल्स.
चांगल्या दिसतायत झूडल्स. जास्त खाल्ल्याचा गिल्ट येत नाही म्हणून माझ्या आवडत्या. बीट, गाजर यांच्या नूडल्स मी अजून ट्राय केलेल्या नाहीत.
Pages