रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26

काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्‍या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाळीतील दोन मित्र, एक पैसे कमावून फ्लॅटमध्ये राहायला जातो. पॉश एरिया, स्टॅटस वगैरे.
तिथे त्याला रात्री हृदय विकाराचा झटका येतो >>
वन रूम किचन

वन रूम किचन >>>> हा तोच. त्याचा शेवट पटला नाही. अ‍ॅटलिस्ट नायिकेने मुलान्चा तरी विचार करुन फ्लॅटमध्ये राहण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. कारण भविष्यात हिच मुले आई वडिलान्नाच दोष देतील, आम्हाला चाळीतच का वाढवल म्हणून.

बाकी एक मात्र खरे आहे की चाळीतले लोक कितीही एकमेकान्शी भान्डले तरी अडि- अडचणीवेळी मदत सुद्दा करतात.

चाळीतील दोन मित्र, एक पैसे कमावून फ्लॅटमध्ये राहायला जातो.
>>> चूक.
बहुतेक बायका मित्र असतात. नवरे नाहीत.

बहुतेक बायका मित्र असतात. नवरे नाहीत.>>
हो त्यांच्या बायका मैत्रीणी असतात. राजेश श्रृंगारपुरे पण आहे त्यात.

बाकी एक मात्र खरे आहे की चाळीतले लोक कितीही एकमेकान्शी भान्डले तरी अडि- अडचणीवेळी मदत सुद्दा करतात.
>>>>>
हे एक्चुअली खरे आहे.
कल्चरच तसे असते
पण चाळीतले हेच लोकं जेव्हा बंद दाराआडच्या फ्लॅटमध्ये जातात तेव्हा काही वर्षांनी बदलतात. माणसे तीच पण बदललेल्या कल्चरनुसार बदलतात. त्यामुळे कितीही म्हटले तरी हा कल्चरल फरक आहे आणि राहणारच.

पिक्चर मात्र तो वन रूम किचन पकाव होता...

हिरो हिरालाल खरेच पकाव होता.

जलवा मस्त होता.

मालामाल मी लहानपणी पाहिलेला. तेव्हा आवडलेला. कल्पनाच चमकदार वाटलेली.

झिरोचे नाव आता ईथेतरी कोणी घेऊ नका. सगळीकडे तेच वाचून डोक्याचा झिरोचा बल्ब झालाय.

दुनियादारीचे नाव या धाग्यात बघून मी खपलोय. दुनियादारी हा एकमेव मराठी चित्रपट आहे जो मी महिन्याभरात तब्बल तीन वेळा थिएटरात बघितला होता.

दुनियादारी कुठला, भाभा आण्विक संशोधन केंद्रातील काम करणाऱ्याच्या मुलीवर झोपडपट्टीतला मुलगा प्रेम करतो तो का?

तो टाइमपास. नया है वो वाला

मला फक्त नूतन आणि परीक्षित सहानी यांचाच दुनियादारी माहीत आहे.
नाव कागज की गहरा है पानी
जिंदगी की यही है कहानी
फिर भी हर हाल में मुस्कुराके
दुनियादारी पडेगी निभानी

दुनियादारीचे नाव या धाग्यात बघून मी खपलोय. दुनियादारी हा एकमेव मराठी चित्रपट आहे जो मी महिन्याभरात तब्बल तीन वेळा थिएटरात बघितला होता.>>>>>>>>> Lol अरे कसला रटाळ होता दुदारी. तो पोटल्या स्वेटर्‍या विगेर्‍या स्वप्नील. अंकुश आवडतो म्हणुन त्याला काय बोलणार नाही मी. Happy पण दोन्ही हिरविणी पण कायच्या काय पकाव. ती सै तर त्याची मोठी बहिण वाटली. उर्मिला त्यातल्या त्यात बरी. Happy
च्रप्स, टिक टिक वाजते डोक्यात म्हणजे शाळेतली प्रार्थना Lol

सस्मित Lol Lol

इथे thumbs up टाकायची / पोस्ट लाईक करायची सोय हवी.

अरे कसला रटाळ होता दुदारी. >>> अगदी..
पहिल्या अर्ध्या तासातच अरे संपवा आता असं झालं होतं..
अति close ups होते सगळ्यांचेच.. डोळ्यात जाणारे..

मी दुनियादारी बघितलेला नाहीये. छानच झालं म्हणायचं.>>>> असं काही काही मानव. बघा एकदा. तुम्हाला आवडेलही.
दुनियादारी खुप्पच आवडलेले लोक आहेत. इथे ऋन्मेषलाही खुपच आवडलाय. पसंद अपनी अपनी.

दुनियादारीवर धागा आहे का एखादा परीक्षणाचा? चर्चेचा?

गेल्या काही काळात दुनियादारीने सर्वप्रथम मराठी चित्रपटांना बॉक्स ऑफिस यश दाखवले. मग मागाहून सैराट कट्यार नटसम्राट वगैरे आले. परप्रांतीयांनीही आवडीने बघितला तो चित्रपट मराठी चित्रपट रसिकांनीही डोक्यावर उचलून धरला म्हणूनच हा बॉक्स ऑफिस रिझल्ट आला. तिथे सोशलसाईटवर मात्र हे कबूल केले जात नाही याचे खरेच आश्चर्य वाटते.

Submitted by सुश्या on 29 December, 2018 - 14:28
मी दुनियादारी बघितलेला नाहीये. छानच झालं म्हणायचं.>>>> असं काही काही मानव. बघा एकदा. तुम्हाला आवडेलही.
दुनियादारी खुप्पच आवडलेले लोक आहेत. इथे ऋन्मेषलाही खुपच आवडलाय. पसंद अपनी अपनी.

√√√√√√√√√

तुम्ही तुमच्या आयुष्याशी कॉलेजलाईफशी तो रिलेट करू शकला तर अफाट आवडेल. आम्हा मित्रांचे हेच झाले. आम्ही एकाच ग्रूपने तो दोनदा थिएटरला बघितला.

म्हणजे मी दुनियादारी बघितलेला नाहीये. छानच झालं म्हणायचं. >>> माझ्यामते हो. अतिशय कंटाळा आलेला तरीही पूर्ण बघितलेला मी, दुनियादारी. Tv वर बघितलेला.

दुसरा चित्रपट बाजीराव मस्तानी, कंटाळवाणा पण मिसो होता म्हणून येता जाता बघितलेला tv वर. अजून कोणाचे तरी काम आवडलेलं. आता आठवत नाही. मिसो एरवी acting so so करतो माझ्यामते, मला आवडत असला तरी पण ह्यात चांगली केलेली.

{{{ दुसरा बाजीराव मस्तानी, कंटाळवाणा }}}

दुसरा नाही हो. तो कितीही बाहेरख्याली असला तरीही मस्तानी त्याची नव्हतीच, ती पहिल्या बाजीरावाचीच..

मिलिन्द सोमण मायबोलीवरच्या आणि एकूणच बायकांना इतका का आवडतो? मला तर शाहबाज खान आणि समीर धर्माधिकारी हे देखील त्याच्याच तोलामोलाचे वाटतात पण त्या दोघांना मिसो इतकं लेडीज फॅन फॉलोइंग मिळालेलं दिसत नाही. असो. अमिताभपेक्षा उंची, धिप्पाड शरीरयष्टी, चेहर्‍यावरील देखणेपण आणि भारदस्त आवाज या चारही आघाड्यांवर उजवा असूनही कबीर बेदी अमिताभच्या तुलनेत अगदीच कमी यशस्वी ठरला तसेच काहीसे हे असावे.

मिलिंद सोमण आवडतो तो निव्वळ लुक्स म्हणून नाही, त्या लुक्स मागची मेहनत दिसते, तो एका कारणासाठी या मॅरेथॉन करतो.हे वलय बाकी देखण्या पुरुषात नसावे.

Pages