रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26

काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्‍या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं आहे. चाळ, flat दोन्हीतला अनुभव चांगला आहे. >>>>>> +++++++ ११११११११११

मला पुर्वीचे कौटुम्बिक सिनेमे आठवले ज्यात आधुनिक रहाणीच्या मुली /सुना कित्ती कित्ती वाईट आणि पारंपारिक रहाणीच्या मुली/सुना कित्ती कित्ती चांगल्या असं दाखवायचे. >>>>>>>>>> अस आता सिरियल्समध्ये दाखवतात.

मला पुर्वीचे कौटुम्बिक सिनेमे आठवले ज्यात आधुनिक रहाणीच्या मुली /सुना कित्ती कित्ती वाईट आणि पारंपारिक रहाणीच्या मुली/सुना कित्ती कित्ती चांगल्या असं दाखवायचे. >>> बहुतेक त्यात वर्षा उसगावकर च मॉडर्न सून असायची. Proud
ती एक कधी गरीब, कष्टाळू, साधी दाखवलेली कोणत्याच पिक्चर मधे आठवत नाही .

वा वा मसान...
बरेच लोकांकडून छान असे ऐकून पिक्चर पाहिला. पण ठिकठाकच निघाला. नसता बघितला तरी आयुष्यात काही मिसलं नसतं. ओल्ड फ्याशन कलात्मक समांतर काय म्हणतात तसे आशयघन पण त्याचवेळी फार काही मालमसाला नसलेला एखाद्या समाजावर डोक्युमेंटरी बनवावी तसा चित्रपट आहे. यापेक्षा मस्त ड्रामा क्राईम पेट्रोलच्या रिअल स्टोरीत असतो. शेवटाने तर फारच निराश केले. काही शेवट झालाय असे वाटलेच नाही. कॉलेजातल्या पिरीअडची वेळ संपली अन प्राध्यापकांचा लेक्चर संपला तसे वाटले. दोन वेगळे कथानकांची शेवटपर्यंत कुठेच सांगड घातली नाही हे आणखी डोक्यात गेले. सैराटच्या वळणाने जाणारया लव्हस्टोरीला तर उगाचच असे संपवले की जसे डेलीसोपमधील एखादा कलाकार सोडून गेला तर जसे कथानकच बदलून त्याचा रोल कापून टाकतात. पैसा वापस दे दो भाई फिलींग आली...

असो, उद्या आणखी लिहेन. वेळ वाया गेल्याचा त्रास म्हणून मुद्दाम मायबोलीवर मसान सर्च मारून हा धागा शोधून हलका झालो. आता हिच पोस्ट आणखी एका धाग्यावरही कॉपीपेस्ट करतो म्हणजे हलके होणे द्विगुणित होईल.
तुर्तास शुभरात्री ....

शोधतो मग.
तिथेही टाकतो...
मसान सगळं आहे

Pages