रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26

काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्‍या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे लोकहो त्या `हम तुम्हारे है सनम' मधले एक गाणे जबरदस्त होते. म्हणजे आहे. मी अजूनही गातो कधीमधी. ते सुद्धा भिकार्‍याच्या टोनमध्ये गायला खूप मजा येते..
कभी बंधन जुडा लिया, कभी दामन छुडा लिया, ओ साथी रे, सबकुछ भुला दिया ये वफा का कैयसा सिलाह दिया.. ये वफा का कैयसा सिलाह दिया
तेरे वादे, ओ ईरादे, तेरे वादे, ओ ईरादे, ओ साथी रे, सबकुछ भुला दिया वो वफा का कैयसा सिलाह दिया..

तो आयो.... जायो... लायो.... गायो.. असे अत्यंत भक्तीभावाने गायलेले गाणे असलेला चित्रपट, तो सुद्धा या कॅटेगरीतला असावा असे वाटते. कसा आहे तो?

असावा असे वाटते. कसा आहे तो?
>>> ईथे तुम्ही पुर्ण पाहिलेले पकाव चित्रपट लिहायचे आहेत. लोकांना कसा आहे विचारून मग बघायचाच नाही हे ठरवायचे नाहीये. नो चिटींग Happy
बाकी आपण उल्लेखलेला आयो सायो गायो चित्रपट समजला नाही

प्रेम रतन धन पायो रे Lol

तो मला पकाऊ नाही वाटला. फुल्ल टू टाईमपास. म्हणा आमची आवडच ती आहे Proud

प्रेम रतन धन पायो रे Lol
तो मला पकाऊ नाही वाटला. फुल्ल टू टाईमपास. म्हणा आमची आवडच ती आहे>>>> + १ Lol

विकु, Lol

हेल्लो ब्रदर

अत्यंत किळसवाणा चित्रपटाचा प्रकार. काही काही सीन बघून तर शिरशिरी येत होती.
पुन्हा कधी टिव्हीवर जरी लागलेला दिसला तर चॅनेल बदलत नाही तर टिव्हीच बंद करून टाकतो.

दोन भयाण चित्रपट थेटरवर पैसे देऊन पाहिलेत.
१) इशा देओल आणि झायेद खानचा 'चुरा लिया है तुमने" - लीड पेअरची नावं बघूनही का गेलो असू आम्ही हे आता आठवत नाहीये, वेळ असते एकेक!
संपूर्ण थेटरमध्ये सहा ते आठ लोक होतो आम्ही- सगळे एकाच लाईनमध्ये . तरी शेवटपर्यंत पाहिला. दु:खद प्रसंगी अनोळखी लोकांचाही आधार वाटतो असं म्हणतात. त्याची अनुभूती त्या दिवशी आली.

२) अर्शद वारसीचा "अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूं आता है" अशा तत्सम नावाचा सिनेमा! भयाण होता, भयाण!

रिसेन्टली टीव्हीवर "आता काहीतरी होईल, मग काहीतरी होईल" म्हणत तब्बल तीन तास सहन केलेला "ए दिल है मुश्किल"!! वाईट आहे सिनेमा. अगदीच वाईईईईट. रणबीरसाठी काय काय सहन करावं लागलं! म्हणे हा सिनेमा हिट आहे? खरंच?

अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूं आता है हा नासीर, शबाना आणि स्मिता यांचा चित्रपट आहे.
अर्शद वारसीच्या चित्रपट 'अ‍ॅन्थनी कौन है?'

दु:खद प्रसंगी अनोळखी लोकांचाही आधार वाटतो असं म्हणतात. त्याची अनुभूती त्या दिवशी आली. Rofl

मला मैत्रिण कृपेने हिमेसभायचा कर्ज सहन करावा लागला. Sad इमोशनलली ब्लॅकमेल करून तिने जबरदस्तीने थेटरात यायला भाग पाडले होते. यायलाच कारण पैसे तिने भरले होते. पैसे वाया नाही गेले तेवढंच एक दुःखात सुख Proud

बाकी तो हॅपी न्यू इयर इतका पकाव होता की शाखा आवडत्या लिस्टितून नावडत्या लिस्टित गेलेला . दिलवाले , स्लमान खानचा प्रेम रतन धन पायो , हृतिकचा प्रेम कि दिवानी हु , आमिरचा मंगल पांडे हे हि त्यातलेच . फक्त टीव्हीवर पाहिल्याने तेवढाच रिलीफ

मी 'अभय ' नावाचा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पहिलाय.
बाकि ९० च्या दशकातील असंख्य सिनेमे आहेत लिस्टित

शब्द
जिंंदा
दुनियादारी
ओम जय जगदीश
गायब
कभी खुशी कभी गम
दिल तो पागल है
ह्रितिक इशा देओल आणि सैफ अली खान यांंचा एक सिनेमा पाहीला होता नाव आठवत नाहीये

शिवाय

पहिल्याच सीन मधे डोके आउट झाले. पण तिकीट स्वतः खरेदी केल्यामुळे ३ तास तिथेच झोप काढावी लागली

अजय देवगण ने स्व्तःच्या घरात एसीचे १६ temp ठेवून १ तासानंतर बेडरूम मधल्या फर्शीवर उघडे रात्रभर झोपून दाखवावे. मी "शिवाय" १० वेळा अजिबात फॉर्वर्ड न करता बघेन.
चॅलेंज

सॉरी ऋ हा माझा नाही घरच्यांचा अनूभव आहे. मी अमिताभची जबरी फॅन असले तरी त्याचे महान, पुकार वगैरे भयानक सिनेमे बघीतलेले नाहीत. पण एकदा माझे मामा, मामी आमच्या घरी आलेले असताना, मला काय लहर आली काय माहीत. मी, मामा, माझी आई, मामी या तिघांना अमिताभचा महान सिनेमा बघायला पाठवले. मामा घरी आल्यावर जाम पकला होता, मला म्हणाला काय पाणचट सिनेमा होता, काय तुम्हा लोकांना हा हिरो आवडतो देव जाणे. तिघेही बोअर झाले होते पण मध्येच कस उठणार म्हणून तिघांनी तो पूर्ण बघीतला आणी आल्यावर माझी खरडपट्टी काढली.:फिदी:

नावाजलेल्या कलाकारांचे सिनेमे बोर निघाले तर आणखी त्रास होतो.
जेवढ्या अपेक्षा जास्त, तेवढा निराशेचा झटका जबरदस्त.

माझी लिस्ट -

अमिताभ बच्चन - मृत्युदाता, अक्स, जादूगर, तूफान....... आणि सगळ्यात बेस्ट, अजूबा Happy

शाहरूख खान - जब तक है जान, वीर झारा, गुड्डू, वन टू का फोर........ आणि सगळ्यात बेस्ट, ओह डार्लिंग येह है ईंडिया Happy

आमीर खान - मंगल पांडे, धूम, दिवाना मुझसा नही, ईसी का नाम जिंदगी....... आणि सगळ्यात बेस्ट, मेला Happy

Lol

इथे काही पोस्टा एकदम भारी आहेत , काही उगाच ऋन्मेष वर सुड उगवायला म्हणून सई, शाहरुख आणि स्वप्निल वर तारेशे उडवल्यासारख्या आहेत
तरीही करमणुक झालीच

मृत्युदाता - अशा नावाचा सिनेमा कधी आला होता ? ते ही अमिताभ बच्चनचा ?? नंदूरबार सारख्या गावात डॉक्टर बिक्टर असतो कि काय ?

प्रेमकथेच्या नावाखाली यश चोप्राने बनवलेले अनेक अर्धपॉर्न चित्रपट बकवास आहेत. त्यातल्या त्यात "मोहब्बते". एक तासाचा चित्रपट तीन हिरो हिरोईन घेऊन तीन तासाचा केलाय. तसेच मराठीत भारत जाधवचे पण दोन तीन चित्रपट असेच एकदम बकवास आहेत.

थियेटर मध्ये डिप्रेशनचा attack येतो का काय असे वाटले होते असे चित्रपट पाहताना.

काही उगाच ऋन्मेष वर सुड उगवायला म्हणून सई, शाहरुख आणि स्वप्निल वर तारेशे उडवल्यासारख्या आहेत >>> काहीही काय? जे सई, शाहरुख आणि स्वप्निल चे पिक्चर रटाळ वाटले त्याबद्दल लिहीले आहे तसेच दुसर्‍या कलाकारांचे रटाळ चित्रपटांबद्दल लिहीले आहेच की. ऋन्मेषचा धागा आहे म्हणुन सई, शाहरुख आणि स्वप्निल यांच्याबद्दल वावगे लिहायचेच नसेल तर वरती धाग्यात तसे डिस्क्लेमर लिहले जावे. Happy

प्रेमकथेच्या नावाखाली यश चोप्राने बनवलेले अनेक अर्धपॉर्न चित्रपट बकवास आहेत. त्यातल्या त्यात "मोहब्बते".
>>>>

अर्धपॉर्न ?? मोहोब्बते ???

ऋन्मेषचा धागा आहे म्हणुन सई, शाहरुख आणि स्वप्निल यांच्याबद्दल वावगे लिहायचेच नसेल तर वरती धाग्यात तसे डिस्क्लेमर लिहले जावे. Happy
>>>>
गिरीकंद गैरसमज नसावा. ते तिने तिला वाटले ते लिहिले. कदाचित आपल्या प्रतिसादाबद्दल नसेलही. राहीला प्रश्न डिस्क्लेमरचा, तर ते धागाकर्ता म्हणून मी लिहायला हवे आणि मला तसे काही वाटले नाही. आणि वाटले तरी असा कुठलाही डिस्क्लेमर लिहून मी माझ्या धाग्यावरचे प्रतिसाद कमी करायचा वेडेपणा करणार नाही. Happy
जोक्स द अपार्ट - शाहरूख असो वा आमिताभ दोघे प्रोफेशनल कलाकार आहेत. दोघांनीही कैक रटाळ आणि बंडल चित्रपट दिले आहे. पण त्यांचे स्टारपण त्या बकवास चित्रपटांनी मोजले जात नाही. वा घसरत नाही. त्यामुळे ईथे स्टार वॉर न करता फक्त आपल्याला बकवास बंडल रटाळ वाटलेल्या चित्रपटांबद्दलच लिहूया. Happy

Pages