रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पुर्ण बघितलेले चित्रपट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2017 - 14:26

काही चित्रपट बघितल्यावर आपण का पुर्ण बघितला असा प्रश्न पडतो.
कोणी जबरदस्ती केलेली नसते बघच म्हणून, तरीही आयुष्यात रिकामा वेळ जास्त झालाय अश्या मस्तीत आपण बघतो.
थिएटरमध्ये बघायला गेलो असू तर एकवेळ समजू शकते. आता आलोच आहोत पैसे मोजून तर बघूया शेवटपर्यंत. असते अशी एक मिडलक्लास विचारसरणी. पण काही चित्रपट घरबसल्याही आपण पुर्ण बघतो.
बघून झाल्यावर तो आपल्याकडून कसा बघितला गेला हे आपले आपल्यालाच समजत नाही.
कधी एखादेच गाणे चांगले असते, कधी एखादाच ट्रेलरमध्ये दाखवलेला ईंटरेस्टींग शॉट असतो, एखाद्या कलाकारावर फालतूचा विश्वास असतो, एक आशावाद असतो, काहीतरी पुढे चांगले निघेल, एवढा पाहिला आहे तर थोडी कळ आणखी काढूया असे मनाला समजावणे असते.
आणि मग द एण्डची पाटी पडल्यावर, एकूणच हातात तंबूरा आलाय हे जाणवल्यावर, अगदी ‘श्या’ होऊन जाते.
मग कधी आपण स्वत:शीच हसतो, तर कधी आपल्याच मुर्खपणाला दोष देतो.
जसे एखाद्या हिरोची चित्रपटाची निवड चुकते, जसे एखाद्या दिग्दर्शकाची पटकथेची निवड चुकते, तसेच एक प्रेक्षक म्हणून आपलीही निवड कधीकधी चुकते. आणि पुर्ण बघितला जातो असा एखादा बंडल चित्रपट.
अश्याच त्रासदायक आठवणींना उजाळा द्यायला हा धागा.
मला आता अचानक हा भयानक विचार सुचायचे कारण म्हणजे शाहीद कपूरचा "पाठशाला"!
आताच त्यातील "ए खुदा" हे गाणे एका म्युजिक चॅनेलवर पाहिले. माझे आवडते गाणे. पण त्याच गाण्याने आणि शाहीद कपूर - नाना पाटेकर या जोडीने फसवले.
मोहोब्बते मधल्या शाहरूख-अमिताभ सारखी शाहीद-नानाची जोडी आणि ऐश्वर्या रायच्या जागी आयेशा ताकिया (कि टाकिया?) असेल असे म्हणत खास थिएटरला तिकिटाचा खर्चा करून गेलो. पण पॉपकॉर्नचेही पैसे डुबले. ते देखील घश्याखाली उतरेनात.
बरं वर म्हटल्याप्रमाणे आता थिएटरला गेलोच आहोत तर पुर्ण चित्रपट बघूनच बाहेर पडूया असा मिडलक्लास विचार मी काही करत नाही. पिक्चर झेपला नाही तर ईंटरवलला किंवा त्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनी निघायचा प्रकार तीनचार वेळा करून झालाय. असे केल्याने हुशारी दाखवत तासभर वेळ वाचवल्याचे समाधान मिळते. तो काही क्रिकेटचा सामना नसतो की आपण गेल्यावर मॅच फिरली, इंडिया जिंकली आणि आपला पोपट झाला. तर फालतू पिक्चर हा शेवटपर्यंत फालतूच राहतो. पण या पाठशाला बाबत का माहीत नाही, आता खरी मजा येणार. नाना आणि शाहीदची जुगलबंदी बघायला मिळणार. असे ईंटरव्हलनंतर सतत वाटत राहीले. पण या वाटण्यावाटण्यातच चित्रपट संपला आणि त्यानंतर (तेव्हाच्या) गर्लफ्रेंडने माझ्या डोक्यावर मिर्‍या वाटल्या.
हो, गर्लफ्रेंडलाही सोबत न्यायचा आणि ‘ती चल निघूया आता’, असे म्हणत असतानाही नानावर भरवसा ठेवायचा शानपणा मी केला होता. ज्याने तो पिक्चर अर्धामुर्धा का होईना पाहिला असेल तोच माझे हे दु:ख समजू शकतो. कधी कधी मला वाटते की माझे ते रीलेशन ब्रेक व्हायच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण एक तेच तर नाही ना..
असो, तर अशीच आणखीही काही दर्दभरी दास्ताने आहेत. तुमचीही असतील. एकेक करत शेअर करूया Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्फी -
ओक्टॉबर - वरून धवन
रेस 3 - सलमान वाला
धोम 3- अमीर वाला
सदमा
मुंबई पुणे मुंबई 1
हरामखोर
इंग्लिश बाबू देशी मेम
गोल्ड ( अक्षय चा)
व्हेन हॅरी मेट सेजल
नो स्मोकिंग - अनुराग कश्यप
तशन

मोस्टली पूर्ण बघितले कारण ठेतर मध्ये होतो. >>>>>>

आ, बर्फी, ओक्टॉबर , सदमा हे रटाळ सिनेमे? Uhoh

ओक्टॉबर न आवडणारे खूप आहेत. बर्फी खरच बोर झालो.
सदमा tv वर पाहिल्यामुळे कदाचित आवडला नाही, शेवटचा कमल चा कॉमेडी सिन फक्त आवडला.

क्लायमॅक्सचा 'गणपती डान्स' तर छान होता. अन्गावर शहारे येतात अक्षरक्षः त्यावेळी.
√√√√
+७८६
गाणे तसे छान आहेच. पण पिक्चरायझेशन आणि कोरीओग्राफीमुळे बघायला आणखी छान आहे वाटते. केके मेनन आणि प्रभूदेवाचे ईंटरएक्शन सुद्धा छान वाटते क्लायमॅक्सला.. ते केके मेनन आपल्याच छातीवर मूठ मारतो. हलकीशी एक्शन विथ एक्स्प्रेशन, पण लक्षात राहणारी.. भारी कलाकार आहे तो...
अगदी ते टिपिकल, एक मुसलमान नाचाला विरोध करणारा बाप गणपती डान्सवर नाचतो, फॉरेनर नतमस्तक होतात.. वगैरे टिपिकल असूनही छान वाटते हे एक यशच...

सदमा tv वर पाहिल्यामुळे कदाचित आवडला नाही, शेवटचा कमल चा कॉमेडी सिन फक्त आवडला.
>>>>

अरे देवा.. सद्मा आला का ईथेही Happy
मला खरे तर असे शांत तरल संथ चित्रपट एकांतात टीव्हीवर बघायलाच आवडतात. सद्मा मी त्या वयात पाहिला जेव्हा असे काहीतरी हटक्या धाटणीचे चित्रपट पाहिले की आपली आवड काय क्लास आहे असे वाटायचे. पुढे मात्र पुन्हा बघायला गेलो तेव्हा रटाळ किंबहुना गंडलेला वाटला. क्लायमॅक्सच्या सीनवर आमच्याईथेही हसायची पद्धत आहे Happy

सध्याचा चित्रपट, झीरो.

सूरज बडजाट्याचे सर्व मूवीज.

स्वपनील जोशी आणि मुक्ताच्या मूवीज सीरीज( मूवी सीरीज‘च’ म्हणावे लागेल असे एकामागोमाग केलेले सर्व चित्रपट).

प्यासी शाम - सुनील दत्त + शर्मिला टॅगोर + फिरोज खान

स्वप्ना राज यांनी या सिनेमाचे पोस्ट्मार्टेम करायला घ्यावे.

शेवटचा कमल चा कॉमेडी सिन क्लायमॅक्सच्या सीनवर आमच्याईथेही हसायची पद्धत आहे >>>>>>> सदमा च्या क्लायमॅक्स सीनवर कोणी हसू कस शकत हेच मला कळत नाही. तो शेवट मला पटला नाही तरीही बघताना हळहळल्यासारख वाटत. खुपच टचिन्ग क्लायमॅक्स होता तो.

सदमा च्या क्लायमॅक्स सीनवर कोणी हसू कस शकत हेच मला कळत नाही. तो शेवट मला पटला नाही तरीही बघताना हळहळल्यासारख वाटत. खुपच टचिन्ग क्लायमॅक्स होता तो.++++१११११११११११११
एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावलाय, आणि त्या व्यक्तीच्या लेखी आपलं अस्तित्व न उरण, तेव्हा माणूस जिवाच्या आकांताने तिला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतोय, हे बघून खूप वाईट वाटलं होतं...
सुलू तुम्ही moondram pirai जमलं तर बघा. नाही जमलं तर युट्युब वर कलायमॅक्स तरी नक्की बघा. कमल हसन कडे बघून अक्षरशः काळीज हेलावंत.
हिंदी मध्ये हाच सिन थोडा भडक होऊन बटबटीत वाटतो

कुठल्या मनस्थितीत आणि किती गुंतून चित्रपट बघितलाय यावर अवलंबून आहे ते. फार न गुंतता बघितला असेल तर शेवटल्या सीन मध्ये हसू येणे सहज शक्य आहे.

सद्मा लास्ट सीन - ओवर एक्टींग + गंडलेले लॉजिक = हसू

म्हणजे हे असे याद्दाश येणे जाणे वगैरे फिल्मी फण्डे पचायला जड जातात. त्यावर विश्वासच नाही बसला की भावनिक गुंतवणूक वगैरे नाही होत. चटका तेव्हा जास्त लागतो जेव्हा हे असे उद्या आपल्या आसपासच्या व्यक्तीशीही होऊ शकते असे वाटते तेव्हा....

असो,
वर कोणीतरी क्यो हो गया ना या चित्रपटाला सुद्धा या धाग्यात घेतलेय.
म्हटलं तर हा माझ्यासाठी धक्का आहे !

हा चित्रपट आणि एकूणच विवेक ओबेरॉय साथिया आणि दम सारख्या चित्रपटातून झळकला तेव्हा आम्ही पौगंडावस्थेत होतो आणि तो आमचा आयकॉन होता.
त्यात त्याची गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय.. ती सुद्धा तेव्हाची ऐश्वर्या राय!

प्रत्येक जण स्वताला विवेक ओबेरॉय समजून ऐश्वर्या राय शोधत फिरायचा..

आणि त्यातील ते गाणे.. आहाहा.. आओ ना आओ ना ... कसले जबराट रोमॅण्टीक साँग आहे..
साधारण त्याच काळात अक्षयचा खाकी आलेला आणि त्यातही ऐश्वर्याचे वादा रहाss प्यार से प्यार का.. अब हम ना होंगे जुदा... आहा ! काही काळासाठी शाहरूखला विसरायला लावणारा काळ होता तो... किंवा म्हटले तर नाही. कल हो ना हो आणि मै हू ना सुद्धा त्याच काळातले. आणि पुन्हा आमची निष्ठा शाहरूखकडे वळाली Happy

2.0

एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावलाय, आणि त्या व्यक्तीच्या लेखी आपलं अस्तित्व न उरण, तेव्हा माणूस जिवाच्या आकांताने तिला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतोय, हे बघून खूप वाईट वाटलं होतं...
सुलू तुम्ही moondram pirai जमलं तर बघा. नाही जमलं तर युट्युब वर कलायमॅक्स तरी नक्की बघा. कमल हसन कडे बघून अक्षरशः काळीज हेलावंत. >>>>>>> ++++++++११११११

विवेक ओबेरॉय साथिया आणि दम सारख्या चित्रपटातून झळकला >>>>>>>> कम्पनी ते दम पर्यत छान फॉर्मात होता तो. छान अ‍ॅक्टिन्ग करायचा. पण ऐश्वर्या आणि सलमानच्या नादी लागून त्याने करियची वाट लावली.

क्यो हो गया ना >>>>>> हा पिक्चर तर कन्टाळवाणा होता. विवेकने ओव्हरअ‍ॅक्टिन्ग केली होती त्यात. बाकी गाणी छान होती.

वादा रहाss प्यार से प्यार का.. अब हम ना होंगे जुदा... >>>>>>> हे सुद्दा माझ आवडत गाण.

रटाळ, बंडल, बकवास ..... आणि तरीही पूर्ण बघितलेला लेटेस्ट चित्रपट- झीरो!
शेवटी शेवटी तर मला हा पिक्चर संपतो की नाही याची भीती वाटायला लागली होती.

लक्ष्मणरेखा.लहानपणी बडोद्याला शाळेच्या सहलीला गेलं असताना पाहिला होता.अती भयंकर.
अश्रूंची झाली फुले सारखी किंचित कथा.

नसरुद्दीन शहाचा एक चित्रपट ८० च्या दशकातील.
त्यात त्याचा भावी सासरा त्याला एका आठवड्यात एक करोड रुपये खर्च करून दाखवायला सांगतो. डोकं उठवणारा चित्रपट!
बाहेर कडाक्याची थंडी आणि गावच्या बसला खूप वेळ, बघितला कसाबसा शेवट पर्यंत.

मालामाल तो.
नासरुद्दीन शाह चा तो कोणता ज्यात तो शेवटी पाण्याच्या काचेच्या कपाटात बुडणार असतो?तो हाच का?

हां मालामाल.

यात पाण्याचा काचेच्या कपाटात बुडतो असं वाटत नाही.
तो हिरो हिरालाल असेल कदाचित. किंवा जलवा.

हिरो हिरालाल पण रटाळ वाटला मला. काहींना आवडला होता.

अरे हो, मी पण लवयात्रीचा उल्लेख करायला विसरले. किती भंकस सिनेमा होता. वरीना हुझेन खूप क्युट आहे, पण हिरो फारच बोअर आहे. सेम आमच्या इथल्या दुकांनदारासारखा दिसतो. राम कपूर ओव्हरacting ची दुकान आणि सिनेमाची कथा एखाद्या शाळेतल्या मुलानी लिहिल्यासारखी काहींच्या काही. एका गाण्यासाठी पूर्ण रटाळेस्ट सिनेमा पाहिला.

@मीरा..>>>>
तुमच्या दुःखात मी सहभागी आहे... बॉसने सरप्राईज म्हणून हा चित्रपट दाखवला होता...!

दुनियादारी.
आत्ता संपेल मग संपेल असं वाटत होतं शेवटी. पण संपतच नव्हता. रट्टाळ.

असाच एक मराठी चित्रपट पाहिला होता, टीव्हीवर.
चाळीतील दोन मित्र, एक पैसे कमावून फ्लॅटमध्ये राहायला जातो. पॉश एरिया, स्टॅटस वगैरे.
तिथे त्याला रात्री हृदय विकाराचा झटका येतो. त्याची बायको शेजाऱ्यांना मदत मागायला जाते तर सगळे शेजारी तिच्यावर खेकसताना दाखवले आहेत, "मग आम्ही काय करू, आमची झोप मोड का करतेस? कसली बाई आहे ना!"टाइप. Lol

मग ती त्या चाळीतल्या मित्राला फोन करते. आणि काय अख्खी चाळ मदतीला धावून येते. आणि ती ही किती शिस्तीत, व्यवस्थीत कामे वाटून. इस्पितळात नेऊन बरा झाल्यानंतर घरी येई पर्यंत.

जाल पुन्हा चाळ सोडून फ्लॅट मध्ये राहायला!

तो पिक्चर भयंकर पकाव आहे.बहुधा व पु कथा आहे कोणतीतरी.
मला हिंदी मिडीयम सुद्धा काही बाबतीत आवडला नाही.सुरुवातीला चांगला वाटला.

Pages