दिल दोस्ती दोबारा - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 5 February, 2017 - 02:57

तर, दिल दोस्ती दोबारा ही नवी मालिका झी मराठीवर १८ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री १०३० वाजता प्रक्षेपित होईल. दिल दोस्ती दुनियादारीचा हा दुसरा भाग...
तर याविषयी चर्चा, काथ्याकूटास या धाग्याचे प्रयोजन. चलो, शुरू करो... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सोडली बघायची, तिघं नसतात मालिकेत. दुसरी दोघं कोण आणली आहेत, त्याने मी बोअर झाले. बरेच दिवस झाले बाय बाय करुन.

मी सोडली बघायची, तिघं नसतात मालिकेत. दुसरी दोघं कोण आणली आहेत, त्याने मी बोअर झाले. बरेच दिवस झाले बाय बाय करुन >> हो . बोर झालं ते फार. मला वाटले होते काही दिवसात तिघांना परत आणतील पन अजुनही ते आलेले नाहीत. नवीन दोघे तर प्रचंड बोर आ हेत.

अरे बरं झालं मी फार पूर्वीच बघायची सोडली. अमेय मुरांबाच्या प्रमोशनसाठी गायब झाल्यावरच मी सोडलेली मालिका बघणे.

अमेय नसला तरी मी बघत होते कारण माझा सुव्रत, स्वानंदी आणि पुष्कराजसाठी. पण आता सुव्रत गेल्यावर नको वाटलं. त्यात पप्याने दाढी काढली, त्यात ती दोन कोण आली. जाऊदे का उगा डोक्याला शॉट द्या. बेटर ऑप्शन न बघणं.

अति बोअर मालिका आहे ही.. काहीच भट्टी जमली नाही..
finally बंद होतेय.. जागो मोहन प्यारे सुरु होणारेय

Pages