दिल दोस्ती दोबारा - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 5 February, 2017 - 02:57

तर, दिल दोस्ती दोबारा ही नवी मालिका झी मराठीवर १८ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री १०३० वाजता प्रक्षेपित होईल. दिल दोस्ती दुनियादारीचा हा दुसरा भाग...
तर याविषयी चर्चा, काथ्याकूटास या धाग्याचे प्रयोजन. चलो, शुरू करो... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पप्या राणे आणि आनंदि हि दोन पात्रांची नावं आहेत, हे दोघं नविन आहेत कि जुन्यांपैकि ते १८ लाच कळेल

आता सुजु, मीनल, आशू, कैवल्य, रेश्मा, अ‍ॅना ही नावं नाही. माजघरपण नाही. टोटल वेगळी स्टोरी.
>>
ओह! आय एम गोन्ना मिस देम Sad

आत्ताच वाचलेलि बातमी ...
अभिनेता अमेय वाघ छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील नावाजलेले नाव आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून तो घराघरांत पोहोचला. आता या मालिकेचे दुसरे सिझन दिल दोस्ती दोबारामधून तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणारेय. अमेयने ब-याच मराठी फिल्म्समध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अमेयची व्हॅलेंटाईन असलेली मिताली पालकर हेदेखील प्रसिद्ध नाव आहे.

मिताली पालकर >>> आवडते मला . ती अमेयची व्हॅलेंटाईन आहे , हे नव्हतं माहीती.

रियाका दिल टुटेगा ये पढके.

रिया Lol

बायदवे त्याचं तर लग्न झालंय ना?>>> कधी, मला नाही माहीती?

आता या नव्या सिझनमध्ये ही मंडळी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत परंतु नव्या व्यक्तिरेखांसह. साहिल, गौरव, पप्या, मुक्ता, आनंदी आणि परी अशा या सहा व्यक्तिरेखा असणार आहेत. हे सहा जण मुंबईत एकमेकांना कसे भेटतात आणि ‘खयाली पुलाव रेस्टॉरंटचा’ प्रवास कसा सुरु होतो त्याची ही गोष्ट.

अगं मी कुठे तरी वाचलेलं , त्यवरून माझं आणि माझ्या बहिणीचं वाजलं पण होतं
नसेल झालं तर बरंच आहे की dolyat badam.jpg

मिथीला त्याची gf असेल असं मला तरी वाटत नाही, काहीतरी प्रमोशन असेल मीन्स एकत्र प्रोजेक्ट एखादा. त्यामुळे रिया तू धीर सोडू नकोस Wink .

तायडे झोप गं तू आता Happy
होप्स तो हमेशा रहेंगे... कोणी भेट घालून दिली त्याची तर मी काय बोलेन ते मात्र मला माहीत नाही

मिथिला क्युट आहे >>> मला आवडते ती.

आयेम हॅपी फॉर माय लव्ह >>>गुड रिया.

त्याचा चॉईस चांगला आहे पण तिचा, हम्म्म Wink . आता मला झोडू नकोस.

हो जानू बाई आणि श्री वेगळे झालेत अशी न्यूज आहे .डिवोर्स प्रोसेस मध्ये आहे
त्या न्यूज मध्ये लिहिलं आहेच कि तो फोटो प्रियांका ढवळे चा आहे म्हणून आणि इतर पण बरीच माहिती आहे.
डिव्होर्स चा अर्ज शशांक ने दाखल केलाय

Pages