दिल दोस्ती दोबारा - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 5 February, 2017 - 02:57

तर, दिल दोस्ती दोबारा ही नवी मालिका झी मराठीवर १८ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री १०३० वाजता प्रक्षेपित होईल. दिल दोस्ती दुनियादारीचा हा दुसरा भाग...
तर याविषयी चर्चा, काथ्याकूटास या धाग्याचे प्रयोजन. चलो, शुरू करो... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतुरतेने वाट बघतेय मी. Happy

दाढी वाढवलेले सुजय अजिबात आवडला नाहीये. तो क्लिन शेव्हच मस्त दिसतो. Happy

प्रोमो भारी आहे..
खूप आतुरतेने वाट बघतेय ह्या मालिकेची.
होप सो मागच्या वेळेसारखीच धम्माल असेल.

वेटींग.

सुजय दाढीशिवायंच मला जास्त आवडतो पण बहुतेक तो ज्या दोन नाटकांत काम करतोय, त्यात त्याला तसं दिसायचंय म्हणून असेल दाढी.

कैवल्य कैवल्य !!
वैलेंटायीन नंतर चारच दिवसांनी, आमीन !!!

आले आले dolyat badam.jpg
या सिरिअल बद्दल काहीह मत व्यक्त करता येत नाहीये... फक्त आणि फक्त उत्सुकता

अरे रे रे. या वेड्यांची मालिका परत सुरु होणार ?
डोक्याचा ताप कमी झालेला पुन्हा वाढणार.
खासकरून खोबणीतून बाहेर येणार्या डोळ्यांचा मालक "कैवल्य"
आणि दुसरा "आशू" कायम दाढी वाढवून फिरत असतो. "स्वच्छ भारत अभियान"वाल्यांना "आशू"चा पत्ता द्यायला हवा. अनिल कपूरचा कुंभमेळ्यात हरवलेला भाऊ वाटतो.

त्या चार मसाला डोसा वाल्या प्रोमो मध्ये स्वानंदी टिकेकरच्या गळ्यात मंगळसूत्र टाईप काहीतरी आहे का? कि तावीज? मालिकेत तिच्या पात्राचे नाव काय आहे बरं?

ओके!
मग मी चांगल्या प्रतिसादांसाठी वेगळा धागा काढणार.

@ मंजूडी.. सहमत.
योकु, कधी कधी चांगल्या मालिके बद्द्ल चांगल पण लिहावं की.!

>>>>>> अरे रे रे. या वेड्यांची मालिका परत सुरु होणार ? <<<<< संदर्भाने
>>>>>> मग मी चांगल्या प्रतिसादांसाठी वेगळा धागा काढणार. <<<<< उद्देशुन

लोड मत लेओ.... Happy
गोष्ट अशी आहे की, त्या मालिकेत जस दाखविले, तसे जगणे आता या जन्मात तरी आपल्याला शक्य नाही याची भयानक निर्घृणरित्या जाणिव झालेले व त्यामुळे "मुळापासुन" हादरुन दुखावलेलेच "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" या न्यायाने मालिका व त्यातिल पात्रे यांना नावे ठेवुन स्वतःच्या निराशेवर मात करु पहातात, असे मला माझा सायकॉलॉजिकल सिद्धांत सांगतो.... Proud

>>>> आजकाल वेडे सुध्दा स्वतःला psychologist समजू लागले आहे. जास्त वय झाल्याचा परिणाम वाटते. <<<<

>>>> अरे रे रे. या वेड्यांची मालिका परत सुरु होणार ? डोक्याचा ताप कमी झालेला पुन्हा वाढणार. <<<<
अशी "भाऊबंदकी" करण्यापेक्षा अधिक वाईट काय असु शकेल? Proud

वरील एक आयडी सगळीकडे भांडणच करीत बसलेला दिसतो... चांगलं बोलता येत नाहि का? सगळीकडेच खुसपट दिसत का?

त्या चार मसाला डोसा वाल्या प्रोमो मध्ये स्वानंदी टिकेकरच्या गळ्यात मंगळसूत्र टाईप काहीतरी आहे का? कि तावीज? मालिकेत तिच्या पात्राचे नाव काय आहे बरं?

>> मी आज पुन्हा पाहिले.. मंगळसुत्राच्या वाट्यांसारखे काहितरी दिसले. तिचे नाव का आठवत नाहीये मला देवजाणे. Uhoh

मिनल>>> येस निधी.

मंगळसूत्र टाईप >>> नाही, मला ताईत वाटतो तो.

हे बेस्ट आहे उलट... आता मालिकावाल्यांवर जबाबदारी आहे की आधीच्या सीझनच्या प्रभावातून प्रेक्षकांना बाहेर काढून दुसरा सीझनही लोकप्रिय करायचा!
प्रेक्षकांनीही त्या जबाबदारीने मालिका पाहायला हवी.
मी पहिल्या सीझनचा एकही एपिसोड पाहिलेला नाही. Proud

Pages