दिल दोस्ती दोबारा - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 5 February, 2017 - 02:57

तर, दिल दोस्ती दोबारा ही नवी मालिका झी मराठीवर १८ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री १०३० वाजता प्रक्षेपित होईल. दिल दोस्ती दुनियादारीचा हा दुसरा भाग...
तर याविषयी चर्चा, काथ्याकूटास या धाग्याचे प्रयोजन. चलो, शुरू करो... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाल्मली पालेकर ही मुलगी अमोल आणि चित्राची. कच्ची धुप मधे होती. आता ऑस्ट्रेलियात असते.

मला आवडले तिन्ही भाग. ह्यावेळीपण मी फिदा पुष्कराज, स्वानंदी आणि सुव्रतवरंच. अमेय पार डोक्यात गेला मंगळवारच्या भागात. ती पुजा जातेच आहे. ती सखीपण जाणार, प्रीकॅपवरुन वाटतंय.

ओव्याचा शिरा, हाईट होती. हसून हसून पुरेवाट. टायटल साँग मात्र अजूनही आवडलं नाही. एनीवे मी सिरीयल एन्जॉय करतेय.

पुढच्या भागात परी लग्न सोडून पळून जाताना दाखवणार बहुधा. अगदीच फ्रेंड्स मधल्या रेचल ची आठवण झाली.
>>
+११११११

मला फ्रेण्ड्स सारखं नकोय काही यात Sad

माझा रविवार सोमवार मंगळवारचा भाग बघायचा राहिलाय.. आज संध्याकाळी घरी जाऊन बघते

आनंदी डोक्यात जातेय... तुम्हाल अका नाही आवडला साहिल? Sad

कालचा भाग पण आवडलाच. टासाँ मी अजूनही बघितलं नाहीये. मी टीव्ही लावेपर्यंत ते संपलेलं असतं.
साहिल मला तरी आवडतोय. त्याचं आधीचं कॅरॅक्टर तसंच ठेवलंय त्यांनी. मला आनंदीही आवडते. ती बोलते खूप मस्त.

ते सतत राणी राणी म्हणणं आणि असह्य गोडं गोडं बोलणं डोक्यात जायला लागलाय. हि सगळी करामत बहुदा अमर फोटो स्टुडिओ ची आहे. आणि मीनल बळच करून इतका माज करतीये, एकतर कुणी न बोलावता घरी जाते आणि वर पुन्हा त्यांना म्हणते तुमचा डाव.
साहिल मस्त सूनवतो तिला
त्यातून जिच्या आश्रयाने राहतीये तिलाही इतके हिडीस फिदिस करते, सगळीच पात्र साफ गंडलीयेत,
त्या आशु ला तोच तो रोल पुन्हा दिलाय,
हि साफ फेल जाणारे आणि लवकर गुंडाळली तर बरे होईल

आशू, फार लवकर नको कमेंट करूयात Happy त्यांना कोरी पाटी ठेवून चान्स द्यायला काय हरकत आहे?
मान्य आहे की अती आहेत काही पात्र... होपफुली हळू हळू शिकत जातील, बदलत जातील...

मला पहिला, तिसरा आणि चौथा.. तीनही भाग फारसे आवडले नाहीत...

सगळे एकत्र येऊन त्यांची मैत्री होईल तेंव्हा कदाचित जराशी धम्माल येईल... बघुयात !:)

>>>ते सतत राणी राणी म्हणणं आणि असह्य गोडं गोडं बोलणं डोक्यात जायला लागलाय.
काल त्या कॉफीवाल्याने विकेट्च काढली तिची... Happy

रीया + १

मलाही तसेच वाटतेय कदाचित सगळे एकत्र आल्यावर मज्जा येईल पुर्वीसारखी

kahi dialogues bhari ahet. Waiting for next episodes where all wld be toegether. Te pahayla maja yeil.

काल खुप बोर केले. चाकु घेउन पम्याच्या अंगावर बसणे, रिकामा कॉफी पॉट ठेउन कॉफी पिणे, मोठ्या आवाजात घोरणे ह्या सारखे पाणी घालण्याचे प्रकार पाहुन कंटाळा आला. हे असले प्रकार सोडुन मुळ गोष्टीकडे आले जर मजा येईल.

आशू बारीक वाटतोय ना गेल्यावेळेपेक्षा.... आणि त्याचा तो लाल शर्ट लास्ट सि़जनच्या शॉपिंगवाल्या एपिसोडमधे होता बहुतेक.
मला आनंदी लग्न झालेलीच वाटली. लग्नाआधीच एवढा संसार थाटलाय Happy

आनंदीला घेण्यासाठी पप्या आणि कंपनी गेली तेव्हा ती म्हणते कि 'आयुष्यात कोणी माझ्यासाठी असं काही केलेलं नाहीये.'
मग तो फोनवर गप्पा मारतो तो बॉयफ्रेंड फक्त फालतु गप्पा मारायला आहे का?
त्याने हिच्यासाठी काहीच केलेलं नाहीये का? तिला तो कुठे भेटला? मी महाएपिसोड मिसल्याने कळेना.

तो बाॅफ्रे डायरेक्ट तिच्याशी फोनवर बोलतानाच दाखवला. ते पण यांच्या लग्नाला त्याच्या आईची परमिशन मिळाल्यावर तो हिच्याशी लग्न करणार. जी कधीच मिळणार नाही कारण आनंदी अनाथ आहे.
परी फारच ओव्हरअॅक्टींग करतेय. तिचं ओरडणं फार इरिटेट करतं.

सखी गोखलेची डायलॉग डिलिव्हरी खूपच इरिटेटिंग वाटते मला>>> मम. मी लिहीलं नाही कारण मला वाटलं सखी मला आवडतंच नाहीये, त्यामुळे वाटतंय की काय.

असो सध्यातरी मला अमेय, सखी आणि पुजा आवडले नाहीत हे खरं.

हो त्या सखीची अ‍ॅक्टींग जाम डोक्यात गेली. काय ते लाडं लाडं बोलणं आणि ओठांचे चंबु पण विचित्र!
पेशंट डेड बॉडीचा सीन आवडला सुजय आणि कैवल्य चा. (श्या...! आधीची नावं डोक्यातून जात नाहीत)
सुजय चा युनिव्हर्सल प्रोटोकॉल Proud

श्या...! आधीची नावं डोक्यातून जात नाहीत >> +१११

मला पुर्वी रेश्मा हे पात्र आवडलं नव्हतं, आता आनंदी हे पात्र आवडत नाहीये... म्हणजे एकुणात मला अशा गुळूमुळू मुली आवडत नाहीत असं दिसतंय

आमच्या रिजन मधे म्हणे ओझी अबेलेबल नाहेये Uhoh

मला प्लिज पाचव्या भागापासूनच्या लिंका द्या ना.. प्लिज प्लिज प्लिज!

सध्या तरी पप्या च आवडलाय फक्त. पण सगळे एकत्र येतात तेव्हा बघायला भारी मजा येते. काही similarities दिसत्याइत विथ English सिरिअल्स. पप्या चे mulinsamor न बोलणे - राज फ्रॉम big bang, gaurav चे हटके आणि ओव्हर एन्थु वागणे about his passion - रॉस फ्रॉम फ्रेंड्स , परी - rachel फ्रॉम friends , मुक्ता, साहिल आधीचे मीनल आणि कैवल्य च वाटत आहेत.

Pages