नेट्फ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, हुलू वर आलेले नवीन मराठी चित्रपट

Submitted by अजय on 3 January, 2017 - 16:38

नेटफ्लिक्स अ‍ॅमेझॉन, हुलू सारख्या अधिकृत , पायरसीमुक्त स्ट्रिमिंग सर्विसेस वर उपलब्ध होणार्‍या मराठी चित्रपटांबद्दलची चर्चा.

नेटफ्लिक्स वर मधूनच मराठी चित्रपट उपलब्ध होत असतात. काही चित्रपटांची टायटल्स इंग्रजीत असल्यामुळे जर चित्रपट माहीती नसेल तर नुसते पोस्टर पाहून तो मराठी असेल याचा पत्ताही लागत नाही. इथे लिहण्याचा आणखी कि उद्देश म्हणजे इंग्रजीत सबटायटल असतील तर परदेशात वाढलेल्या आणि मराठी कच्चे असणार्‍या मुलांबरोबरही पाहता येतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काशिनाथ घाणेकर - प्राईमवर दिसत नाही आहे. मोगरा फुलला हा शेवटचा नवीन मराठी चित्रपट आला प्राईमवर.

अमेरिकेत तरी दिसतोय. रेंट वर आहे.
प्राईम चा सर्च बेकार आहे. मराठी असा सर्च दिला आणि 5 6 स्क्रोल केले की कुठेतरी दिसतो.

राईम चा सर्च बेकार आहे. मराठी असा सर्च दिला आणि 5 6 स्क्रोल केले की कुठेतरी दिसतो. >>> हो प्राइम वर नावावरून सर्च केले की सापडेल असे नाही. पण beating around the bush पद्धतीने भाषा, कलाकार वगैरे आजूबाजूने सर्च केले की मिळतो Happy मी पद्मावत शोधायला बाजीराव मस्तानी, हिंदी, इण्डियन वगैरे टर्म्स वापरून शोधायचो.

परत परत पाहिलास वाटतं >>> Lol नाही एकदाच जेमतेम बघवला. पण सलग पाहिला नाही आणि समहाऊ माझ्या टीव्हीवर च्या अ‍ॅप मधे प्राइम ने ती अर्धे पाहिलेले आधी दिसतात त्या लिस्ट मधे तो टाकला नव्हता अर्धा बघूनही. असे एक दोनदा झाले. त्यामुळे प्रत्येक वेळेस पाहताना शोधून पाहावा लागे. पण सिलेक्ट केला की "Resume" दिसे - म्हणजे तो पॉइण्टर होता बरोबर त्यांच्या डेटाबेस मधे.

प्राईमचं हेच आवडत नाही, सिनेमा आला तरी फुकट असेलच असं नाही. त्याला पुन्हा ज्यादा पैसे द्या.. हावरट.
नेटफ्लिक्सवर कसं छान. आलाकी डोळे झाकुन चालु करा, पैसे मागत नाही. (मग मात्र डोळे उघडे ठेऊनच पहा). (उगाच पीजे).

इथे चांगल्या किंवा पॉप्युलर वेबसिरिज बद्दल पण लिहा ना
मी काही पाहिल्या
ज्यांचे रिव्ह्यू बरे वाईट दोन्ही दिसले
Made in Heaven, Mirzapur
नेटफ्लिक्स वर
लैला (Leila)
Made in Heaven
Typewriter (horror)

हा धागा ऑनलाइन उपलब्ध असलेल्या मराठी चित्रपटांसाठी आहे.
वेबसीरिजवर दुसरा एक धागा आहे बहुतेक.

बीएस,
शॉर्टफिल्म्ससाठी धागा आहे का?
नसाल तर काढाल का?
बहुतेक युट्यूबवरच असतात.

Pages