नेट्फ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, हुलू वर आलेले नवीन मराठी चित्रपट

Submitted by अजय on 3 January, 2017 - 16:38

नेटफ्लिक्स अ‍ॅमेझॉन, हुलू सारख्या अधिकृत , पायरसीमुक्त स्ट्रिमिंग सर्विसेस वर उपलब्ध होणार्‍या मराठी चित्रपटांबद्दलची चर्चा.

नेटफ्लिक्स वर मधूनच मराठी चित्रपट उपलब्ध होत असतात. काही चित्रपटांची टायटल्स इंग्रजीत असल्यामुळे जर चित्रपट माहीती नसेल तर नुसते पोस्टर पाहून तो मराठी असेल याचा पत्ताही लागत नाही. इथे लिहण्याचा आणखी कि उद्देश म्हणजे इंग्रजीत सबटायटल असतील तर परदेशात वाढलेल्या आणि मराठी कच्चे असणार्‍या मुलांबरोबरही पाहता येतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपलीमराठी वर ते आहेत हे अधिकृत सत्य आहे. ते अधिकृतरीत्या टाकले नसतील तर त्याची जवाबदारी दाखवणाऱ्याची आणि बघणाऱ्याची.
जोपर्यंत आपलीमराठी कडून मायबोली जाहिराती वा इतर मदत स्वीकारत नाही किंवा इन्टरेस्ट शेअर करत नाही तोपर्यंत जे सत्य आहे ते सांगायला आडकाठी नसावी. क्लोज्ड डोअर कशाला हवंय?
मॉरल्सचा प्रश्न असेल तर ते कोण ठरवणार? अर्थात साईट चालवणारे म्हणून पोस्ट (आणि सदस्यत्व) उडवायचा अधिकार आहेच.
वादाचा विषय आहे, म्हणूनच म्हटलं राहुद्या.

आपली मराठी हा अधिकृत सोर्स नाहीये का मराठी सिनेमे बघण्याचा? मागे एक दोन मूव्हीज आम्ही पैसे भरुन बघितले होते असं आठवतंय.

मुव्ही अधिकृतरित्या टाकलेल्या नसतात. त्यांच्या सर्वर / बॅन्डविड्थसाठी (का पैसे कमवायला) नवीन मुव्ही आली की ते कधीकधी पैसे घेतात.

https://www.law.cornell.edu/wex/contributory_infringement वरून -

One who knowingly induces, causes or materially contributes to copyright infringement, by another but who has not committed or participated in the infringing acts him or herself, may be held liable as a contributory infringer if he or she had knowledge, or reason to know, of the infringement. See, e.g., Metro-Goldwyn-Mayer Studios Inc. v. Grokster, Ltd., 545 U.S. 913 (2005); Sony Corp. v. Universal City Studios, Inc., 464 U.S. 417 (1984).

इन एनी केस, युज्वली हे सर्व कायदे क्रिस्टल क्लीअर नसल्याने, व ज्युरीच्या मताप्रमाणे बदलत असल्याने सेफ साईडला राहिलेलेच जास्त चांगले.

युट्युबचाही बहुतांशी मराठी कंटेंट अधिकृत नसावाच. हल्ली रेंट करायला मिळतात असं ऐकून आहे, अजून मराठी साठी कधी वापरलं नाही.

युट्युब वर अल्ट्रा, इरॉस, शेमारू अशा डिस्ट्रीब्युटर्स (?) ची अधिकृत चॅनल्स आहेत ज्यावर पिक्चर बघायला मिळतात माझ्या मताप्रमाणे.

ओह्ह ती अधिक्रुत असतात होय .
बाकी भाचा, अरे xyz साईटवर अबक पिक्चर आलेला आहे. कस्सं बाई पायरेटेड पसरवतात, पोलिसात टाकलं पाहिजे एकेकाला, म्हणजे अद्दल घडेल! या आणि अनेक प्रकारे कायद्यात न अडकता लिहिता येतच.
एथिकल. रिस्पोन्सिबल करायचं असेल तर निर्मात्याला आणि साईट ओनरला मेल टाकावी की अशी अशी मुव्ही शेअर झाल्येय. त्यानंतर निर्धारित वेळात काही कारवाई झाली नाही तर बातमी पब्लिक डोमेन मध्ये आणावी. अंडर द रग हेच सोल्युशन असेल तर ते त्यांच्या (निर्मात्याच्या) सोयीचं आहे (मग त्या आनंद यादावासारखेच कणाहीन निर्माते दिग्दर्शक आहेत म्हणून म्हणा, फारच सव्यापसव्य म्हणून किंवा त्याने प्रसिद्धीला फायदा होतो म्हणून का आणखी काही कारणाने) याशिवाय कन्क्लूजन नाही.

असो.यापुढे मुव्ही माहित असेल तर लिहीन.

ज्या मूव्हीज उपलब्ध केल्या असतील त्यातून निवडावं लागतं. पण जसेजसे आपण पाहत जातो. आपल्या आवडीचा ट्रॅक ठेवुन नवीन मुव्हीज अ‍ॅड होतात. << ह्यासाठी मी नेहमी मुव्ही रेट करत असते. त्यांच्या नविन मुव्ही अ‍ॅड करण्यावर फरक पडतो की नाही माहित नाही पण मला रेकमेंड तरी केल्या जातात आणि सर्च करायला सोप होतं

मायबोलीकर सखा (सत्यजीत खारकर) यांचा लघुपट पायथागोरसचे अदभूत प्रकरण इथे संपूर्ण बघू शकता

अनमोल मुवीज या त्यांच्या संस्थेच्या अधिकृत युट्युब चॅनेलला ला इथे भेट देता येईल.
https://www.youtube.com/user/Anmolmovies

Twisted Trunk, Big fat body (वक्रतुंड महाकाय) पाहिला ने.फ्लि. वर. काय अफाट सिनेमा आहे.बहुतांशी मराठी अभिनेते आहेत आणी मराठी भाषेत आहे. कधीच या सिनेमाबद्दल एकले/वाचले नव्हते. जरुर पहा. नक्कीच आवडेल.

अरूणोदय (Sunrise) हा नवीन मराठी चित्रपट नेटफ्लिक्स वर आला आहे. अजून पाहिला नाही पण Dark movies या विभागात आहे.

Dont miss original documentary Abstract. Amazing. Bjrke Engles and one lady designer from NewYork and one set designer from Britain are three parts i have seen. Too good. On netflix.

किल्ला (Fort) हा नवीन मराठी चित्रपट नेटफ्लिक्स वर आला आहे.

फॅन्ड्री हा मराठी चित्रपटही दिसतो आहे. तो अगोदर पासूनच आहे पण मधे काही दिवस सापडत नव्हता.

अज्जिब्बात आवडला नाही १००० ची नोट. नेहमीची घिसिपिटी स्टोरी. पोलिस अत्याचार.. मिन दुकानदार, अति आदर्श वादी गरीब,आणि त्यांचा जिव्हाळा. भ्रष्टाचारी नेते. बोर झाली स्टोरी. सॉरी बरेचजणांना आवडला पण मला कंटाळा आला म्हणुन लिहिले.
सर्वानी काम मात्र चांगले केले आहे.

मलाही १००० रू ची नोट मध्ये मध्ये बराच बोअर झाला. सीमाने सांगीतलेले कारण.

असे पिक्चर बनवताना नक्की कोणता ऑडियंस असतो समोर?

अरे अचानक लाट आली की (टेक्सास मधून? ;)) पिक्चर बोअर वाटला असं सांगणार्‍यांची.

मला तरी पिक्चर बघताना अजिबात असं काही वाटलं नाही. सगळ्यांचे उत्तम अभिनय, चांगलं डायरेक्शन आणि चांगले स्टोरी ह्या कारणांसाठी आवडला हा पिक्चर.

मलाही आवडला पिक्चर. काही काही प्रसंग तर खुपच छान. (शेजारणीचे नवर्‍याला टोमणे मारणे, उषा नाईक गावभर फिरुन चहा पावाचे सामान आणते आणि मग ती आणी तिचा मानसपुत्र चहा भुरकुन पितात ते, पुढार्‍याच्या भाषणाला लग्न असल्यासारखे जेवणासाठी जाणे, गावातल्या पोलिसांचे रुटीन, मुलाची फ्रेम बनवुन देणारा माणुस असं खुप काही आहे सिनेमात). किल्ला पहायचाय आता.

Pages