खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

़Jui purapoli .. patkan ek tukda uchlun khavasa vatla.. ekdam lushlushit ahe.. mala vatalech hote tumchya mummy nech banvali asel...mazihi aai ashich banvaychi puranpoli.. mhanje..size..colour.. n evdhich bhajnar.. kaacchi nahi k karpavnar nahi.. aata tila jamat nahi.. evdha sagla ghat ghalat basayala..

Jui sunth ghatli ahe ka puranpolit.. mazi aai ghalte.. digestion sathi..

Devki Gulpoli pan mast.. garam garam poli sajuk tup ghalun khayla maja yete..

Jui sunth ghatli ahe ka puranpolit.. mazi aai ghalte.. digestion sathi..

थँक्स श्रवू..
पुरणपोळी, मोदक असे पदार्थ मम्मीचा करते मला अजून तितके चांगले नाही जमत.. मला तिच्या हातचंच आवडतं सर्व.. Happy आणि सुंठ नाही घालत मम्मी पुरणपोळीत..

मुंबई पुण्यात आहात का?मग अवघड आहे.दुसरीकडे असाल तर आलेच लगेच.आत्ताच आम्ही महाराष्ट्रात यायला निघालो होतो.पून cancel karawe lagle.faar wait watatay.

हे मी बनवलेले बटाटा वडे...
PicsArt_06-29-01.52.17.jpg

कमळ काकडीची भाजी

सुरण , बांबू शूट , अळूकंद ... ह्या प्रकारातील चव वाटते, एक चवदार लाकूड
IMG-20191125-WA0009.jpg

आषाढी एकादशी - सासुरवाडी मेनू

कमळ ही अशी एक वनस्पती आहे जिची फुले, पाने, बिया, खोड सगळे खाता येते. मानवाला वरदान आहे कमळ. आणि तिला वाढवायला अजिबात काही करावे लागत नाही. एकदा लावली की ती अमर..

पुणे शहराच्या बाहेर सतीश गडीया हे गृहस्थ कमळशेती करतात… ह्या माणसाला कमळाचे वेड आहे, इतके की खिशात फारसे पैसे नसतानाही त्याने भारतात जिथे दुर्मिळ कमळे मिळतील तिथे जाऊन संबंधितांच्या मागे लागून कमळे मिळवली आहेत. त्यांच्याकडूनच मला कमळाच्या पानाचे व खोडाचे औषधी गुण कळले, कमळपाने खाल्ली जाऊ शकतात हे आधी कधी लक्षातही आले नाही. पुणेकरांनी शक्य होईल तेव्हा जरूर त्यांच्या फार्मला भेट द्या.

ही राजकीय पोस्ट नाही Lol

जाई, एकदम प्रोफेशनल टच..

देवकी, तू इतकेसेच जेवतेस???

बटाटेवडे छान दिसताहेत. इकडे भरपूर पाऊस आहे, आईला थोडा मस्का लावायला हवा, म्हणजे आयते ब वडे मिळतील संध्याकाळी. Happy Happy

ब्लॅककॅट, ताट छान आहे. तिकडे बेलापुरात माझ्या घराशेजारी कमळतळे आहे, सध्या फुलेही आलीत. पण कमळकाकडीचा शोध घ्यायचे सुचले नाही.

Pages