खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मुलींनो. Happy
तुम्हा सगळ्यांचे पदार्थ तोंपासू.
#inspired#loveforcooking

Dhokla..samose..chocolate icecream..saglech mast..anamika..kaal pista..aaj chocolate..udya kasle icecream asel..mazya tondala paani sutle..

स्ट्रॉबेरी व कैरी रोल>>>> भन्नाट आहेत.कसं काय सुचतं तुम्हा लोकांना.बाकी वॉलनट आईसक्रीमसाठी कट्टी.

स्ट्रॉबेरी व कैरी रोल>>>> भन्नाट आहेत.कसं काय सुचतं तुम्हा लोकांना.बाकी वॉलनट आईसक्रीमसाठी कट्टी.>>>> ++१११
मी पण कट्टी

Anamika.. coffee walnut icecream colour kay sundar aalay..strawberry n kairi roll..ekdam creative..yummy..aata kalchach prashna punha..

Icecream मस्तच.. कैरी, स्ट्राबेरी रोल भारी..

ढोकळा सामोसा मफिन्स.. एकदम तोंपासु..

@देवकी & धनुडी - लाॅकडाऊन संपले की पार्टी करु. ओन्ली आईस्क्रीम्स. सो नो कट्टी Happy
देवरुप - रेसिपीज् नक्की
शितलक्रिष्णा & बोकलत - धन्यवाद.

IMG_20200508_205808_copy_1976x1124.jpg
मसाला पापड & रोस्टेड टोमॅटो सूप

काल नवर्‍याच्या वाढदिवसानिम्मित त्याची फेवरेट बासुन्दी,आमरस,पुर्‍या आणि ढोकळा , मुलिने घरीच केक केला होता
97616492-48CA-4805-9851-089118928912.jpeg

सगळे पदार्थ कसले मस्त दिसतायत .. एक से एक .. भारी एकदम
@ अनामिका स्ट्रॉबेरी व कैरी रोल मस्तच , ते ठेवायला वापरलेली Plate पण अगदी परफेक्टली match झालीये !!

Pages