खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बादवे, बोकलतांनी कोरोनामुळे मांसाहार बंद केला वाटतं, हल्ली त्यांचे कातील पदार्थ दिसत नाहीत.>>> उद्यापासून परत सुरू करतो.

ऋ बड्डे पार्टी का?
>>
नाही तेव्हाचा मेनू वेगळा होता. केक , डोनट! फ्रेंच फ्राईज , वेज-चिकन पफ, बर्गर आणि सॅण्डवीच गार्लिक ब्रेड. चीज वडापाव वगैरे बरेच काही शेअर करत.. स्विगी जिंदाबाद..

IMG-20200314-WA0054.jpg
Lunch

काय मस्त खरपूस कलर आलाय गार्लिक ब्रेडला...
मागच्या आठवड्यात आम्ही एके ठिकाणहून सॅंडवीच पफ गार्लिक ब्रेड वगैरे मागवले होते. पाहतो तर गार्लिक ब्रेड म्हणजे लांबोकडा गार्लिक पाव आला. मग लक्षात आले की ती बेकरी होती जिथून आम्ही मागवलेले.
मग दुसरया दिवशी ते पाव होळीच्या मटणासोबत खाल्ले . त्यात मजा आली.

आज मीही भाजणीच्या पिठाचे थालीपिठ केले होते.रात्रीचे वरण्,त्यात तेलात परतलेला कांदालसूण मसाला,घातला. कांदा+कोथिंबीर हे नेहमीचे यशस्वी कलाकार होतेच.पण मस्त झाले होते.
थालीपिठ मऊ होण्यासाठी त्यात वरण किंवा कुठलीही भाजी किसून घालावी.

मला फक्त चिकन लॉलीपॉप मधला कच्चा कोबी आवडतो
+७८६
मी कोबी त्याचमुळे खायला सुरुवात केली.
पण आता कोबीची भाजीही खातो. फक्त ती कचकचीत हवी. शिजवून नरम करू नये. त्यात बटाटा वगैरे तर मुळीच घालू नये.

लहानपणी आई कोबीच्या वड्या करायची त्या सुद्धा आवडायच्या. कोथिंबीर वड्यासारखेच ताटात शिजवायचे, तुकड्या करायच्या, आणि मग तळायचे... पावात भरूनही छान लागायच्या. सोबत चहा मस्ट!

आता बायको कोबीची भाजी जास्त उरली असेल तर त्यात बेसन वगैरे घालून कटलेट करते. ते ही छान लागते नुसतेच खायला. एखादा फोटो असेल तर बघतो

बोकलत मटण वडे भारी.

पास्ता सोपा आहे.
रेडी पास्ता सॉस मिळतो Dr. Oetkar चा.
नेहमीप्रमाणे पास्ताउकडुन घ्यावा. थोड्या तेलावर बार्रीक चिरलेली लसुण घालुन ४ चमचे रेडी पास्ता सॉस घालावा. त्यात आवडीच्या भाज्या परताव्या. मी हिरवी, लाल, पिवळी सिमला मि चौकोनी तुकडे करुन, ३ बेबी कॉर्न लांब कापुन, चेरी टोमाटो ७-८ घेतले होते.
मग उकडलेला पास्ता घालुन वर सिझनिंग वैगेरे घाला. मग वरुन मस्तपैकी चीज. गरम गरम गट्टम.

हिरव्या मुगाची उसळ आहे.. प्रकाश पडल्यामुळे वेगवेगळे कडधान्य असावेत असं वाटतंय Proud
नवऱ्याच्या आवडीप्रमाणे जरा कोरडी केलीये.. त्याने कोथिंबीर वगळता बाकी पदार्थ खाल्ला..

कोथिंबिरीत खूप व्हिटामिन असते हे सांगा की त्यास्नी. कोथिंबीर न आवडणारी व्यक्ती असू शकते यावर विश्वास बसत नाही.

कोथिंबीर न आवडणारी व्यक्ती असू शकते यावर विश्वास बसत नाही. >> असतात. माझ्या भाचीला कोथिंबीर अजिबात आवडत नाही. तिची आई आणि सासू कोथिंबीर टाकण्या आधी तिच्यासाठी पदार्थ काढून ठेवतात. इतर कुठे जेवताना ती कोथिंबीर निवडून निवडून जेवते.

मटण वडे भारी बोकलत.

सस्मित धन्यवाद

कोथिंबिरीत खूप व्हिटामिन असते हे सांगा की त्यास्नी. कोथिंबीर न आवडणारी व्यक्ती असू शकते यावर विश्वास बसत नाही.>>>मुलं ऐकत नाहीत हो, माझा मुलगा पण अजिबात पडू देत नाही कोथिंबीर पानात

Pages