खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Yes Happy

Shraddha pan dhokla safed distoy...... >>
फोटोत दिसतोय तो तसा पण तो light yellow आहे. Happy

मेनू आजचा नाही, परवा संध्याकाळ चा आहे. पण सगळे yummy
फोटोस् बघून मलाही upload करावेसे वाटले..
भावाच्या वाढदिवसानिमित्त घरी केलेला चॉकलेट केक (वरचा फोटो) , पिझ्झा आणि ब्रेड स्टिक्स..

PicsArt_02-21-12.00.04.jpg

आप्पे छान जाळीदार दिसताहेत. मस्त हलके झाले असणार. पिकु काय कातिल फोटो. केक, पिझ्झा ब्रेड स्टिक्स.. याम्मी.
एकदम बाहेरुन मागवलेले वाटतंय.
रेसेपी लिहा वेगळा धागा काढुन डीट्टेलवार.

रवा डोसा, अप्पे छान आहेत.
चॉकलेट केक (वरचा फोटो) , पिझ्झा आणि ब्रेड स्टिक्स..>>> खूप मस्त आहेत.

Happy Happy सस्मित.. चैत्रगंधा.. देवकी.. श्रद्धा.. thank u..
रेसिपी .. internet वर बघूनच केले सगळे.
आधी असे धागे आहेत का बघते आणि लिहिते त्या प्रमाणे.

श्रवु..चनाचाट बघून एकदम चाट मसाला ची चव दरवळली.. तुमचे recent photos मस्तच आहेत.. आणि अर्थात बाकीच्यांनी टाकलेले सुद्धा.. लगेच ते खाउन/ करून बघावे वाटतात पदार्थ..

Happy _/\_

Pages