मिसो

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 December, 2016 - 06:37

मिलिंद सोमण मिलिंद
सोमण
मिलिंद सोमण
मिलिंद
सोमण मिलिंद सोमण

Milind-Soman1.jpeg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्म्या लेका माझ्यात आणि मिसो मधे काय रे साम्य शोधलंस
वयाने, उंचीने, कर्तबगारीने, कामगिरीने सगळ्याच बाबतीत तो मोठा आहे की रे माझ्यापेक्षा
नवीन Submitted by हर्पेन on 23 April, 2018 - 17:49
>>>>>>
@हार्पेन तुमचा फोटो पहिल्यांदा पाहिला तेव्हा मलाही तसेच वाटलेले. शिवाय मॅरेथॉन काॅमन आहेच. Happy

वयाने, उंचीने, कर्तबगारीने, कामगिरीने सगळ्याच बाबतीत तो मोठा आहे की रे माझ्यापेक्षा
>>>

थोडक्यात तुम्ही ज्युनियर मिसो आहात की Happy

नाही हो.. एवढ्यात नाही.. जेव्हा तुम्ही मला प्रत्युत्तर म्हणून ज्युनिअर शाहरूख बोलाल तेव्हा धागा भरकटायला सुरुवात होईल Happy

पाफा +100
तुम्ही लिहिल्यावर जाणवतंय, दोघांमध्ये काहीतरी साम्य आहे नक्की,
आपण तर बाबा त्यांना आज पासून ज्यू मिसो च म्हणणार :p

मराठी भाषा दिवस २०१९ - उपक्रम - मोरपिसारा
आपल्या ओळखीच्या माणसांमध्ये किंवा सार्वजनिक जीवनात अशी काही चतुरस्र व्यक्तिमत्त्वं आपल्यासमोर येतात, ज्यांना आपापल्या कार्यक्षेत्राबरोबरच इतरही अनेक क्षेत्रांमध्ये रस असतो, विविध विषयांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं असतं. त्यांच्या या बहुरूपी व्यक्तिमत्त्वाचं आपल्याला नेहमी कौतुक वाटतं. अशा तुमच्या आवडत्या एखाद्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहिण्याची संधी म्हणजे आपला मोरपिसारा उपक्रम!
https://www.maayboli.com/node/69006

मिसो नॅशनल लेवल स्विमर, सुपर मॉडेल, अभिनेता, ट्रायथ्लिट खेळाडू, उद्योजक, ई. ई. आहे तर मभादि उपक्रमात मिसो वर कोणीतरी लिहावे अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही ना!

पण सगळ्यांना विशेषतः मुलींना इतकं मात्र सांगता येईल की तुम्हाला त्याच्या सोबत फोटो घेणे एक्दम सहज शक्य आहे विशेषतः पिंकेथॉनमधे धावलात तर नक्कीच.>>>@ हर्पेन एकदम बरोबर, माझी पण एक ट्रेन फ्रेंड आहे ती नेहमी जाते पिंकेथॉनला आणि फोटो पण काढते मिसो बरोबर. पण जर तुम्हाला मिसो बरोबर सेल्फी हवी असेल तर अजून थोडे कष्ट घ्यावे लागतात. २० पुशअपस् मारावे लागतात. माझ्या ह्या मैत्रिणीने मिळवलेत सेल्फी पुशअपस् मारुन

आज मी थोडी आतली खबर काढली. आमीरने त्याचा पत्ता कट केला. कारण आपल्यापेक्षा चिकणा हिरो त्याला पिक्चरमध्ये नको होता .. अन्यथा पहिला नशा गाण्यात मिसोच भाव खाऊन गेला असता>>> नुकतंच मिलिंद सोमणची बायोग्राफी प्रसिद्ध झाली. त्या वेळच्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं की घाटात सायकल चालवण्यासारखी कष्टाची गोष्ट करून झाल्यावरसुद्धा योग्य आणि पुरेसं, वेळेवर खायलप्यायला मिळत नव्हतं. युनिटवाले पुरेशी काळजी घेत नव्हते लोकांची म्हणून जो जिता सोडला.

आमीरने त्याचा पत्ता कट केला. कारण आपल्यापेक्षा चिकणा हिरो त्याला पिक्चरमध्ये नको होता

>>>>

मिसो आमीरपेक्षा चिकणा आहे ???

मिसोला जो जिता मध्ये कोणता रोल होता.
चला हवा येऊ द्याच्या जुन्या भागात त्यादिवशी दिसला. नामांकन (की मानांकन) मिळालेले लोक होते. मिसो जेव्हा मराठी कार्यक्रमात येतो तेव्हा तो नेहमी अलिप्त, कधी संपणार हे सगळं असे भाव घेऊन बसलेला असतो. मराठी अडखळत बोलतो. मच्छिन्द्र कांबळी यांच्या वस्त्रहरण नावाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात तो आला होता. त्यावेळी त्याच्या आणि मधूच्या त्या फोटोवरून प्रमोद नवलकर यांनी बरेच रान उठवले होते. त्याविषयी त्याला छेडले असता त्याने नवलकरांविषयी अतिशय अपमानास्पद उद्गार काढले होते जे मला बरेच उद्धटपणाचे वाटले होते.
पहिल्या कामाचे त्याला पन्नास हजार मिळाले होते आणि ह्याला मॉडेलिंग म्हणतात हेही त्याला माहित नव्हते. त्याचे चारही आजी-आजोबा डॉक्टर होते. हे सगळे तो चहयेद्या मध्ये सांगत होता.

घनशु चा
घनशु आहे का ते
मी घंचू घोडे समजायचो
काहींना त्या नावानेही चिडवायचो
बाकी मिसोला कुठलाही रोल दिला असता तरी ॲक्टींगची बोंब होती.

फोर मोअर शॉट्स पाहिली ... मिसो ने अगदीच त्याला सूट होणारा रोल केला आहे Wink एक विनोदी मारामारी पण आहे त्याची

तीन चार वर्षांपूर्वी, Pinkathon च्या प्रमोशन साठी ऑफिस मध्ये आला होता ... सगळ्या ताई,माई,आक्कांनी लय दंगा केला होता...

https://www.loksatta.com/manoranjan-news/actor-milind-soman-shares-video...
मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर महिलेचा पुशअप्स मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘सेल्फी घेण्यासाठी पुशअप मारणाऱ्यांपैकी आवडता सेल्फी. रायपूरच्या एका छोट्या बाजारात मी होतो. तेथील चविष्ठ पदार्थांचा आस्वाद घेत होतो. तिथे एका महिलेने मला सेल्फीसाठी विचारलं. मी म्हटलं १० पुशअप मारावे लागतील. त्या महिलेने कोणाताही विचार न करता मी माझ्या मोबाइलचा कॅमेरा ऑन करण्याआधीच १० पुशअप्स मारण्यास सुरुवात केली’ असे म्हटले.

सुपर्ब !!! व्हेरी ईन्स्पायरिंग... त्या बाईचे जाम कौतुक वाटले, अगदी चारचौघींसारखी गृहीणी दिसत होती. आणि काय उत्स्फुर्तपणे वागली. मलाच ते बघून लाज वाटायला लागली मी दिवसभर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली नुसता बसून असतो लोद्यासारखा..

बस्स हाच तो क्षण, मी उद्यापासूनच काही ना काही सुरू करतो

Pages